Professional Documents
Culture Documents
वाघ
वाघ
आढळ व वसतीस्थान
वाघाचे खरे माहे रघर हे पूर्व सायबेरियातील जंगलात मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहे त.
संदर्भ हवा ]
तिथून वाघ मंचुरिया चीन, आग्नेय अशियातून भारतात आला असे मानले जाते[ . यातील बर्याच भागात पूर्वी
वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परं तु शिकार व वसतीस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला. आज
प्रामुख्याने जंगली वाघ हा भारत, ब्रह्मदे श, थायलंड, चीन व रशिया या दे शात आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील
वाघ आज जगभर सर्वत्र पोहोचले आहे त व वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहे . जंगली वाघातील ५०
टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहे त.
वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात दे खील वाघ आज दर्मि
ु ळ झ़ाला असून त्यांची संख्या चिंताजनक
आहे . भारतातील पंजाब, हरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे .
1. हिमालय व तराई विभाग - यात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदे श, उत्तरांचल, उत्तरप्रदे श, बिहार,
सिक्कीम, आसाम अरुणाचल प्रदे श व इशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयाच्या तराई
जंगलांमध्ये वाघांचे वसतीस्थान आहे .
2. अरावली पर्वताच्या पूर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे यात रणथंभोर सरिस्का सारखी
राष्ट्रीय उद्याने येतात.
3. सुंदरबन व ओरिसा .
4. मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व येथे आढळते. यात कान्हा, बांधवगड,
मेळघाट(गुगमाळ्), ताडोबा यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये येतात.
5. सह्याद्री व मलबार किनारा यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दक्षिण भाग येतो. बंदीपूर, मदम
ु लाई पेरियार इत्यादी.
महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे .[ ]
३
वर्णन
वाघ हा वर नमद
ू केल्याप्रमाणे मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे . वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे
कमी जास्त असतो. सायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरीयन
वाघ हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परं तु १९० -२०० सेमी
पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८०
किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. सुमात्रा मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची
सर्वात मोठी खूण ् त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबस
ू रं गाची फ़र. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे
प्रत्येक माणासाचे ठसे वेगळे असतात त्याच प्रमाणे. यावरून वाघांना ओळखता येते. परं तु जंगली वाघ दिसायला
मिळणे ही दर्मि
ु ळ घटना असते त्यामुळे ही पद्धत अजूनही ग्राह्य ज़लेली नाही. वाघाच्या अंगावर साधारणपणे १००
पर्यंत पट्टे असतात. पट्टय
् ांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सद्रश
ु होण्यासाठी होतो. पट्टय
् ांबरोबरच प्रत्येक
वाघाचे पंज्याची ठे वणही वेगळी असते. वाघांची पारं पारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. वाघाचा पंजा हा
वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो.
जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात.शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा
जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी
तसेच भक्ष्याला पकडून ठे वणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात
असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहे त, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच
असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे . वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात
तासन तास डुबुंन स्वता:ला थंड ठे वतात.
प्रजोत्पादन
समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या
कालावधीनंतर ३-४ बछड्यांना जन्म दे ते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक व अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात
पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. पिल्ले अतिशय भराभर
वाढतात. परं तु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. पिल्ले आई व भावंडांसोबत दोन ते अडिच
वर्षे व्यतीत करतात. वाघाची पिल्ले लहानपणी अतिशय खेळकर असतात. पिल्ले जसजशी मोठी होतात तशी त्यांची
आई त्यांना शिकार साधण्यात पारं गत करते. सरु
ु वातीस अर्धमेली शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत
ु वाढीनंतर पिल्ले स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई पिल्लांना
सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पर्ण
सोडून निघन
ू जाते. नर पिल्लांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात
फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. वाघांचे
बंदीवासातही वीण चांगली होते.
क्षेत्रफळ स्वामित ्व
वाघ हा एकटा रहाणारा प्राणी असून तो आपले क्षेत्रफळ राखून ठे वतो. नर वाघाचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी असते.
नर वाघ आपल्या क्षेत्रफळात अनेक वाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २०
चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात दस
ु र्या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसे केल्यास होणारे भांडण हे
जीवघेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडांवर मत्र
ु ाचे फवारे मारून आखन
ू घेतात. नर वाघ आपल्या पिल्लांचे दे खील
अतिक्रमण सहन करत नाही. परं तु काही वेळा नर वाघ पित्याची भमि
ू का दे खील बजावल्याचे आढळले आहे . जॉर्ज
शेल्लरने तसेच वाल्मिक थापर <[ ]. यांनी अश्या नोंदी नोंदवल्या आहे त.
५
आहार व शिकारपद्धत
वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे इत्यादी साठी होतो.
वाघ हा पर्ण
ु त: मासांहारी प्राणी आहे तसेच वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे . पर्ण
ु वाढ झालेला हत्ती सोडला तर
वाघ कोणत्याही जमीनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे . वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या
आकाराचे प्राणी आहे त. सांबर हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे . तसेच इतर प्राणी उदा: रानगवा, चितळ, भेकर व
इतर हरणे, रानडुक्कर, नीलगाय, रानम्है स इत्यादी आहे त. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार
बदलते. पुर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गें ड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहे त. परं तु साधारणपणे सामना
टाळण्याचा कल असतो. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहे त
तसेच पिल्ले आपल्या वाढत्या काळात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित पण शिकार करतात.
वाघांची शिकारीचे तंत्र हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हे रतात व दबा धरून सावजाला न कळता जास्ती
जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एक दोन ढांगेच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ
चाल करून जातो. पर्ण
ु वाढलेला वाघही साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करुन जाऊ शकतो. तसेच
वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू
शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नये
यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाई पर्यंत धरून ठे वतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ
सरळ मानेचा लचका तोडतो यात सावज लगेचच मरुन जाते. एकदम छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजाचा एक दणका
सावजाची कवटी फ़ुटायला परु े सा असतो.
केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार
वेळा शिकार साधतात. शिकार्यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे .
शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरून आतडी पुर्णपणे बाहे र काढतो व लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार
खाण्यास सुरु करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.
उपप्रजाती
भारतीय वाघ
ब्रिटीश सर्वात प्रथम भारतात बंगालमध्येच स्थायिक झाल्याने त्यांनी भारतीय वाघाचे बंगाली वाघ असेच
नामकरण केले. भारतीय उपजात ही भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादे श व ब्रम्हदे शात आढळते. भारतातील
विविध प्रकारच्या जंगलात त्याचे अस्तित्व आहे . हा आकाराने मध्यम वाघ असून त्याचे २०५ ते २२७ किलो
पर्यंत वजन भरते. मादीचे साधारणपणे १४० किलोपर्यंत वजन असते. उत्तर भारतातील वाघांचे वजन
़
दक्षिणेतील वाघांच्या तुलनेत जास्त असते. सध्यस्थितीत भारतात २००० पेक्षाही कमी वाघ आहे त.सध्याच्या
गणनेनुसार भारतात १,४११ वाघ आहे त जे २००२ मधील गणनेपेक्षा ७० टक्यांपेक्षाही कमी आहे त. २००२ मध्ये
भारतात ३,६४२ वाघ होते [ ]व ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे . १९७२ मध्ये वाघांना कायद्यानुसार सरक्षंण
८
मिळाले व अनेक व्याघ्रप्रकल्पांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार साधारणपणे १९९० पर्यंत चांगले यश
मिळाले ४५०० पर्यंत वाघांची संख्या पोहोचण्यास मदत झाली.[ ] परं तु आंतराष्ट्रीय माफ़ियांनी भारतीय वाघांना
९
लक्ष्य केले व चोरट्या शिकारीत वाढ ज़ाली. चोरट्या शिकारीमुळे सरिस्का सारख्या एकेकाळी बरे च वाघ
असणाऱ्य व्याघ्रप्रकल्पातन
ू आज वाघ नाहिसे झाले आहे त.[
१०]
ही वाघाची उपप्रजाती ईशान्य अशिया मध्ये दिसून येते. यात कंबोडिया, मलेशिया, ब्रम्हदे श, थायलंड,
व्हिएतनाम, इत्यादी दे शात आढळते. ही जात भारतीय वाघापेक्षा गडद रं गाची असून आकार लहान असतो व
नराचे वजन १५० ते १९० किलो पर्यंत भरते. माद्यांचे वजन ११० ते १४० किलोपर्यंत असते. साधारणपणे एकून
१००० ते १८०० वाघ वन्य अवस्थेत असल्याचा अंदाज आहे . यांचे सर्वात जास्त आढ्ळ मलेशिया मध्ये असन
ू ते
चोरट्या शिकारीवरील कडक नियंत्रणामळ
ु े च शक्य झाले आहे . व्हिएतनाममध्ये या प्रजातीची मोठ्या
प्रमाणावर चीनी औषधांसाठी शिकार झाल्याचे कळते.
मलेशियन वाघ-(Panthera tigris malayensis) [[हे फ़क्त मलेशियातील द्विपकल्पात दक्षिण भागात
आढळून येतात. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ही प्रजाती कोर्बेटी पेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले आहे .
आजमितीला साधारणपणे ६०० ते ८०० वाघ असण्याची शक्यता आहे . हा वाघ मलेशियाचे राष्ट्रीय चिन्हावर
विराजमान आहे .
सुमात्रन वाघ
), हा वाघ इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढ्ळून येतो व अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून याची गणना
झाली आहे . हा वाघ आकाराने अतिशय लहान असतो. नराचे वजन १०० ते १३० किलो भरते तर मादीचे केवळ
७० ते ९० किलो. त्यांचा लहान आकार हा या बेटावरील अतिशय घनदाट जंगलात रहाण्यास सरावला आहे .
जंगली सुमात्रन वाघांची संख्या आजमितीला ४०० ते ५०० असण्याची शक्यता आहे . सुमात्रामधील जंगलांचा
-हास हे या वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे .
यबेरीयन वाघ
ही प्रजाती पर्व
ु रशियात आढळून येतेह्, याला अमरू , मंचरि
ु यन, कोरियन वाघ, अथवा उत्तर् चीनी वाघ असेही
म्हणतात. पर्वी
ु मोठ्या भभ
ू ागावर वास्तव्य असलेल्या ह्या वाघाचे आज अमरू ऊशरु ी या पर्व
ु सायबेरीयातील
प्रांतातच वास्तव्य मर्यादीत राहिले आहे . रशियन सरकारने याच्या संरक्षणाचे मोठे प्रयत्न चालू केले आहे त.
सध्या यांची संख्या ४५० ते ५०० आहे व केवळ एकाच मोठ्या जंगलात आहे त्यामळ
ु े अमरु ला सर्वाधिक
वाघांच्या संख्येचा मान मिळाला आहे . सायबेरीयन वाघ आकाराने वाघांमध्ये सर्वात मोठा असतो. त्याची फ़र
ही खूप जाड असते व रं गाने थोडा हलका असतो.
दक्षिण चीनी वाघ-(Panthera tigris amoyensis) ही वाघांमधील सर्वात चिंताजनक प्रजाती आहे व वन्य
अवस्थेत जवळपास नामशेषच झालेली आहे . १९८३ ते २००७ मध्ये एकही चीनी वाघ दृष्टीस पडला नाही. २००७
मध्ये एका शेतक-याने वाघ दिसल्याचे सांगितले[ ]. माओंच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच चीनी औषधांसाठी
११
ह्या वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली. १९७७ मध्ये चीनी सरकारने या वाघाच्या शिकारीवर
बंदी आणली पण तोवर खप
ू उशीर झाला होता. सध्या हे वाघ फ़क्त संग्रहालयात आहे त.
पांढरा वाघ - ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रं गाचे वाघ आहे त. जसे काही माणसांना कोड
येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे
पांढरे होणे हे दे खील अनुवांशिक् आहे . आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदे शातील रे वा येथे सापडलेल्या पांढ-या वाघाचे
वंशज आहे त[ ]. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पर्ण
१२
ु त: प्राणी संग्रहालयातच जन्मलेले आहे त.
बालि वाघ
वाघ-मानव संघर्ष
वाघांची शिकार
भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आली आहे . वाघाची शिकार हे शौर्याचे प्रतिक मानले जायचे. आपल्या
दिवाणखाण्यात वाघाची कातडी असणे मानाचे लक्षण होते. वाघाच्या कातडी बरोबरच वाघनखे गळ्यात असणे
प्रतिष्ठे चे होते. वाघाच्या शिकारी साठी् मोठे मोठे हाकारे दिले जायचे व वाघाला चहुबाजूने वेढा दे उन त्याची शिकार
केली जात असे. यात बरे च लोक सामिल होत तसेच बरे च हत्ती,घोडे असा ताफ़्याचा समावेश असे. त्यामुळे वाघाची
शिकार हा फक्त राजे लोकांपुरते मर्यादीत होता. ब्रिटीश काळात वाघांच्या शिकारीत अमल
ू ाग्र बदल झाला. बंदक
ू ीसारखे
शस्त्र माणसाच्या हातात पडल्यामुळे दरु
ू नही वाघांना टिपता येउ लागले व वाघांच्या शिकारीचा काळ सुरु झाला. ब्रिटीश
काळात खास वाघाच्या शिकारी साठी अभयारण्ये स्थापली गेली. अनेक (so called) महान शिकारी या काळात उदयास
आले. वाघाची शिकार झाडाखाली एखादे सावज बांधून वर मचाणवर बसून करत अथवा हाकारे दे उन ् साधत. वाघाची
शिकार करणे हे धाडस न बनता एक खेळ बनला( इंग्रजीत गेम म्हणजे खेळ असाच अर्थ आहे ). अनेक शिका-यांच्या
कथनामध्ये काही काळानंतर त्यांना शिकार करणे हे व्यसनासारखेच जडले होते अशी कबुली दे तात. वाघांचे नैसर्गिक
वसतीस्थानावर मानवाचे बहुतांशी अतिक्रमण झाले आहे . जेथे वाघ एकेकाळी सुखेनैव नांदत त्याजागी, शेती,
औद्योगिकरण, रस्ते, घरणे, गावे वसली. यामध्ये वाघांच्या वसती स्थानाबरोबरच भक्ष्यही नाहीसे झाले व अनेक
ठिकाणी वाघांचे पाळिव प्रांण्यांवरील हल्ले वाढले. वाघ पाळिव प्राणी खातात म्हणून वाघ नको असा व्याघ्रप्रकल्पांच्या
अजब
ू ाजच्
ू या गावात अजन
ू ही सरू असतो. ब्रिटीशपर्व
ू काळात वाघांची शिकार बहुतकरून याच कारणासाठी होत असे.
वाघांच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर ह्या वाघद्वेष्ट्यांनी वाघाने मारलेल्या भक्ष्यामध्ये विष घालन
ू वाघांची शिकार
करण्याचा सपाटा लावला होता. २० व्या शतकाच्या सरु
ु वातीस भारतात एक लाख वाघ होते असे काहींचे म्हणणे आहे .
भारतात शेकडो शिकारी आहे त/ होते ज्यांनी शंभराहून अधिक वाघ मारले होते. त्यामळ
ु े हा आकडा खरा असण्याची
शक्यता नाकारता येत नाही. वाघांच्या शिकारीचा इतिहास वाघांच्या दृष्टीने रक्तरं जीत असला तरी त्यातील काही
शिकारी हे आजचे टोकाचे वाघांचे रक्षक बनले आहे त. चोरटी शिकार आजही चालू असली तरी भारतात एकेकाळी
मोठ्या प्रमाणात शौकीसाठी चालणारी वाघांची शिकार आज जवळपास इतिहास झाला आहे ही समाधानाची बाब आहे .
तरीही अधन
ू मधन
ू संजय दत्त, सलमान खान सारखी प्रकरणे बाहे र येत असतात.
नरभक्षक वाघ
जो वाघ माणसांनाच आपले नेहेमीचे भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक
भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकुन एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला
नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे . जो वारं वार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो असाच वाघ
नरभक्षक होय. नरभक्षक वाघांचे अनेक किस्से आजही घडतात. खासकरून सुंदरबनच्या जंगलात. फ़क्त तेथिलच वाघ
असे का? हा प्रश्ण ब-याच काळापासून सतावत आहे . सुंदरबनातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व
खार्यापाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत असा अंदाज आहे . [ ]. स्वातंत्र्यपूर्व काळात
१३
उत्तरांचल राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर जिम कोर्बेट यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे .
१९४० च्या दशकात पण्
ु याजवळील भीमाशंकरच्या जंगलात १०० च्या वर माणसे एका वाघाने मारली होती[ ]. वाघ
१४
नरभक्षक बनण्याची अनेक कारणे आहे त. वद्ध ु े इतर शिकार साधता येण्यात येणारे अपयश किंवा काही
ृ पणा, जखमांमळ
पर्वा
ु नभ ु व इत्यादी. कोर्बेट यांच्या मते उत्तरांचल मध्ये मानवी मत
ृ दे हांना नदीत वाहून अत्यंसंस्कार करण्याची प्रथा
होती असे वाहणारे आयते भक्ष्यामळ
ु े तेथील वाघ नरभक्षक बनत असा अंदाज होता[ ].
१५
चीनी औषधे
चीनमध्ये अनेकांचा असा समज आहे की वाघांचे काही भाग हे औषधी असतात व त्यांचा चांगला उपयोग होतो असे
वाटते. परं तु यात काहीही शास्त्रीय तथ्य नाही.[
१६]
वाघाच्या मांडीची हाडे, इतर हाडे, सुळे, वाघनख्यांना खासकरून
मागणी असते.वाघाचे शिश्न हे नपुंसकतेसाठी औषध असल्याचे मानतात. चीन मध्ये कायद्याने वाघांचे शरीराचे
भागांची खरे दी विक्री कायद्याने बंदी आहे व दोषींना दे हदं डाची शिक्षा आहे . परं तु आजवरच्या अनुभवावरून चीन
सरकारचे प्रयत्न कमी आहे त असे वाटते. चीनमध्ये काही ठिकाणी रस्त्यावर वाघांच्या शरीरांच्या भागाची तसेच
कातडीची विक्री होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे .[
१७]
भारत, मलेशिया, ब्रम्हदे श, थायलंडमधील वाघांची चोरटी शिकार ही बहुत करून चीनी गि-हाईकांच्या साठी होते. बंदी
असणे गरजेचे असले तरी त्याहीपेक्षा महत्वाचे आहे , अश्या औषधांविरुद्ध प्रबोधन होणे. औषधांमुळे वाघांच्या हाडांना व
इतर भागांना मागणी निर्माण होते व कितीही बंदी असली तरी पैश्याच्या मोहामुळे लोभी लोक चोरट्या शिकारीचा मार्ग
धरणारच, जर मागणीच नसेल तर अशी चोरटी शिकार कमी होईल अशी आशा आहे .
भारतीय संस्कृतीत
वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे . लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख
करून दे तात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडप
े णा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतिक आहे .
म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्याला पार्वतीचा अवतार असलेली दे वी महिषासूर मर्दिनीचे व तिच्या अनेक रुपांचे वाहन
बनवले आहे . वाघ व आदिवासी जमांतींचा सहस्त्रावधी वर्षांचा संबध असल्याने ते वाघाचा कोप होउ नये यासाठी ते
वाघाला दे वताच मानतात व त्याची पज
ू ा करतात. वाघ असलेल्या जंगलामध्ये वाघांना समर्पित एखादे छोटे से दे ऊळ
असतेच. वाघ हे शौर्य साहस व राजबिंडप
े णाचे प्रतिक असल्याने अनेक ठिकाणी वाघाला प्रतिकात्मक स्थान आहे .
महाराष्ट्रातील राजकिय पक्ष शिवसेनेचे प्रतिकात्मक चिन्ह वाघ आहे . अनेक संस्थानिकांच्या मानचिन्हांवर वाघ
विराजमान आहे . वाघांबद्द्ल असलेल्या भीतीमळ
ु े वाघांबद्दल अनेक विनोदही होत असतात.
संरक्षण उपायोजना
भारतासकट जगातील सर्वच भागातून वाघांची संख्या कमी होते आहे व आतातर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे .
वाघांच्या संरक्षणासाठी विविध दे शांनी प्रयत्न आरं भले आहे त. संरक्षण उपायोजनात कोणत्याही प्रकारच्या (हौशी
अथवा चोरटी) शिकारींविरुद्ध कडक नियंत्रण अत्यंत गरजेचे असले तरी वाघांच्या संख्यावाढीच्या दृष्टीनेही इतर
गोष्टींची अंमलबजावणी महत्त्वाची आहे . वाघांच्या संख्यावाढीत त्यांच्या वसतीस्थांना विकास तसेच वाघांच्या
संख्येत वाढ होणे गरजेचे आहे . भारतातील कान्हा राष्ट्रीय उद्यानातील प्रयत्न हे आदर्श उपाययोजना मानल्या
जातात. यामध्ये वाघांच्या वसतीस्थानातून मनुष्यवस्ती पूर्णपणे हलवणे. जेणेकरून मनुष्य व वाघांचा संघर्ष कमी
होईल. जंगलांमध्ये कुरणांचा विकास करून हरीणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करणे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ
सातत्याने वाढवणे.उन्हाळ्याच्या दिवसात उपासमार व पाण्याच्या दर्भि
ु क्ष्यापासन
ू जंगलातील प्राण्यांना वाचवणे.
यासाठी जंगलातील पाणवठ्यांवर टँ करने पाणीपरु वठा करणे. तसेच पावसाळ्यात परु ापासन
ू संरक्षण व्हावे यासाठी
चौथरे किंवा उं चावरील जांगांची निर्मिती करणे. वाघांची संख्या एखाद्या जंगलात जास्त झाल्यास वाघ नसलेल्या
जंगलात पन
ु र्वसन करणे इत्यादी.
वाघाचे महत्व
वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे . वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात
त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात
मुख्यत्वे तण
ृ भक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तण
ृ भक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे
निसर्गात सर्वात महत्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठे वणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या
अनियंत्रित प्रमाणात वाढे ल व इतर निसर्गसंपदे वर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्ग चक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात
असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे . वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर
अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत
नाही असा आजवरचा अनभ
ु व आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दष्ु परिणाम आज आपण जागतिक
तापमानवाढीने पहातच आहोत.