You are on page 1of 1

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाले यांनी बडा सय्यिद याला ठार मारले हे शिवभारत आणि इतर

काही साधनांन मध्ये आले आहे . प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरं ग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे
महाबळे श्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले. ते जातीने न्हावी असून सध्या त्यांनी “सकपाळ” असे
उपनाव धारण केले आहे . त्यांच्याकडून मिळालेली 3 पत्रे श्री.पटवर्धन यांनी BISM च्या पाचव्या संमेलनात प्रस्तत

केली. यानंतर श्री.द.व.पोतदार यांना निगडे येथील रायरीकर जोशी यांच्याकडे एक पत्र आणि जिवा महालेची वंशावळ
मिळाली. ती दिन्ही पत्र ऐतिहासीक साहित्य खंड 3 मध्ये प्रकाशित केली. अफजल प्रसंगी जिवा महालेचे वय 25 च्या
घरात असावे असा कयास काढण्यात येतो.

वंशावळ – जिवा महालेचा मोठा भाऊ हा तान(तानाजी) महाले असावा. जिवा महालेचा मुलगा सीताराम; सीतारामचा
मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी व काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी. अशी
माहिती त्या वंशावळीत आहे . हरी आणि सुभानजी हे जिवा महालेचे खापरपणतु.
.
छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी यांनी 15 डिसें 1702 मध्ये लिहील्या एका पत्रात “संताजी माहाला
यांनी हुजरू येऊन विदित केले की मौजे जोर व गोळे गाव व गळ
ु ंु ब, तर्फ मजकूर...” असा उल्लेख आला आहे .

छत्रपती शाहु महाराजांनी 7 डिसें 1709 मध्ये लिहीलेल्या पत्रात “तान महाले आणि जिवा महाले मर्दने हे पुरातन
येकनिष्ट , स्वामिसनिध येकनिष्टपणे सेवा केली याकरीता खेडब
े ारे तरफेतील निगडे हे गाव त्यांना इनाम दिले आहे ,
ते त्यांच्याकडे वंशपरं परे ने चालवावे” असा हुकूम दिला आहे .

1732 मध्ये शाहू महाराजांचे पत्र मल्हारजी बीन सुभानजी व सीताराम बीन जिवा महाले यांना दिलेले इनामपत्र. यात
सुभाजी मयण पावला म्हणून इनाम गाव मल्हारजीकडे चालू राहिल असे नमूद केले आहे .
.
संदर्भ – श्री राजा शिव छत्रपती, श्री गजानन मेहेंदळे , खंड 1 , भाग 2, पुस्तक दस
ु रे .

You might also like