You are on page 1of 4

बर्फाळ अनुभव भारतातला!

रूपाली भुसारी
Monday, February 07, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: tanishka,  snowfall

बर्फातील पर्यटन हा एक अनोखा अनुभव, वेगळा थरार दे णारा. तुमच्यासाठी हा खास पर्यटन विभाग. दे श, परदे शातील
विविध ठिकाणांबरोबरच कुठे आहे त बर्फाची हॉटे ल्स,स्नो पार्क . कुठले खेळ खेळले जातात बर्फात, कसे आहे त मिलिंद
गुणाजी व शीतल महाजनचे रोमांचकारी अनुभव हे सांगणारा. 

काश्‍मीर
वळणावळणांचे घाटातले रस्ते... एकीकडे खोल खोल दऱ्या आणि एकीकडे पर्वतांचे सुळके... अंगाला झोंबणारा गारवा...
हळूहळू उं चावर पांढऱ्या शुभ्र बर्फाने स्वागत व्हायला लागतं. पांढरी हिमशिखरं आणि त्यामागचं गडद निळं आकाश डोळ्यांचं
पारणं फेडायला लागतात. एका वेगळ्या वातावरणात प्रवेश होत असल्याचं जाणवू लागतं. हवेतला हा गारवा आणि नीरव
शांतता आपल्याला इतकी भुरळ घालू लागते की आपल्याला स्वत:चं अस्तित्वही विसरायला होतं. तासन ्‌तास शांत बसून
समोरच्या हिमशिखरांना न्याहाळत बसावं अशी मोहिनी ही हिमशिखरं घालतात. बर्फातल्या पर्यटनातला हा अनुभव असतो.
दरू दरू पर्यंत पसरलेला बर्फ आणि त्या वातावरणात तादात्म्य पावणारं आपलं मन हे सर्व काही सुखद असतं. 

जम्मू-काश्‍मीर :
बर्फ म्हटला की पर्यटनासाठी जम्मू-काश्‍मीरचं नाव आजही पहिल्या पसंतीने घेतलं जातं, आणि जम्मू-काश्‍मीर म्हटलं की
"गुलमर्ग' हे अग्रक्रमाने येतं. गुलमर्ग म्हणजेच "फुलांचं मैदान'. गुलमर्ग हे बारामुल्ला जिल्ह्यात असून श्रीनगरपासून अंदाजे
साधारणपणे 52 कि.मी.वर आहे . साधारणपणे 8825 फुटांवर ते वसलेलं आहे . हिवाळी खेळही इथे होतात. इथे "गल
ु मर्ग
गंडोला' म्हणजेच उं च केबल कारही आहे त. जगात सर्वाधिक उं चीवर चालणाऱ्या ह्या केबल कार आहे त. त्या 3,979
मीटरवर चालतात. हे पर्यटकांचं आकर्षण आहे . स्किइंगसाठी ही जागा प्रसिद्ध आहे . रोप-वेच्या साहाय्याने 12,959 फूट
उं चीवर कोंगदरू ी पर्वतांवर ह्याद्वारे पोहोचता येतं. स्किइंग साधारणपणे डिसेंबरअखेर ते एप्रिलमध्यापर्यंत चालतं.
बर्फातल्या पर्यटनासाठी सहकुटुंब जाण्यासाठी गल
ु मर्ग उत्तम "चॉइस' आहे . राहण्या-खाण्याची सोय करणारी भरपरू हॉटे ल्सही
इथे उपलब्ध आहे त. सर्व सोयींनी यक्
ु त असं पर्यटन करता येणं अलीकडच्या काळात शक्‍य झालंय. विशेषत: कुटुंबासह
आणि "सीनियर सिटिझन्स' ह्यांच्यासहसद्ध
ु ा काही ठिकाणी जाता येऊ शकतं. मात्र, उं च ठिकाणी जाण्यासाठी फिटनेसच
महत्त्वाचा ठरतो.

स्किइंग
उत्तराखंडच्या पर्वतीय भागात वसलेलं औली! बद्रिनाथला जाताना जोशीमठापासून 16 कि.मी.वर असणारं "औली' हे
बर्फाच्छादित ठिकाण आहे . औलीवरून थेट हिमालयाची नंदादे वी, कॉमेट, माना पर्वत आणि दौनगिरी ही शिखरं पाहायला
मिळतात. औलीला पर्यटकांसाठी खरं आकर्षण म्हणजे स्किइंग.

औली :
उत्तराखंडच्या पर्वतीय भागात वसलेलं औली! बद्रिनाथला जाताना जोशीमठापासून 16 कि.मी.वर असणारं "औली' हे
बर्फाच्छादित ठिकाण आहे . औलीवरून थेट हिमालयाची नंदादे वी, कॉमेट, माना पर्वत आणि दौनगिरी ही शिखरं पाहायला
मिळतात. औलीला पर्यटकांसाठी खरं आकर्षण म्हणजे स्किइंग. इथे बर्फाच्छादित डोंगरउतार आहे त आणि डोंगररांगांच्या
दस
ु ऱ्या बाजूला जंगल आहे . स्किइंगसाठी हे ठिकाण म्हणूनच उत्तम आहे . साधारण फेब्रुवारी आणि मार्चमध्ये "नॅशनल
विंटर गेम्स' औली इथे भरवल्या जातात. साधारण नोव्हें बरअखेर ते मार्चअखेर हा काळ औलीला जाण्यासाठी उत्तम ठरतो.
डिसेंबर ते मार्चदरम्यान गढवाल मंडल विकास निगम सात आणि पंधरा दिवसांची शिबिरं नवशिक्‍यांसाठी आयोजित करते.
ह्यात स्किइंगसारखे हिमखेळही शिकता येऊ शकतात. औलीचा 3 कि.मी. लांबीचा उतार स्किइंगचं खरं आकर्षण आहे .
2519 मीटर ते 3049 मीटर एवढ्या उं चीवर पोहोचण्यासाठी रोप-वे किं वा स्कायलिफ्ट आहे त. स्किइंगसाठीचं साहित्यसुद्धा
गढवाल मंडल विकास निगमकडे उपलब्ध होऊ शकतं. फक्त गेम्ससाठीच नाही तर निसर्गाचा अद्‌भुत आविष्कार
अनुभवायलाही "औली' हे विलक्षण ठिकाण आहे . 
 
उत्तराखंड : 
उत्तराखंडचे दोन भाग पडतात. एक म्हणजे कुमाऊँ आणि दस
ु रा गढवाल. कुमाऊँमध्ये नैनीताल, कौसानी, बिनसर, चौकोरी
आणि मुन्सियारी ही पर्यटकांची खास आकर्षणं आहे त. विशेषत: बिनसर, चौकोरी आणि मुन्सियारीला बर्फ चांगला पडतो.
कौसानीला तर "भारतातील स्वित्झर्लंड' म्हटलं जातं. गढवालमध्ये चारही धाम, हरिद्वार तसंच ऋषिकेश या धार्मिक
पर्यटनस्थळांचा समावेश होतो.

कुमाऊँ :
येथील निसर्गसौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे . पिंडारी ग्लेशियर, कुमाऊँ मंडल त्यापैकीच. कुमाऊँ मंडल विकास
निगमद्वारे अनेक सोयी उपलब्ध असल्याने पिंडारी ग्लेशियरचा ट्रे कही आहे . पिंडारी हे अलमोडा जिल्ह्यात आहे . पिंडारी
ग्लेशियर 3 कि.मी. लांब आणि 2.5 कि.मी. रुं द असन ू पर्यटक ट्रे किंगला इथे येतात. दिल्लीपासनू काठगोदामपर्यंत येऊन
तिथन ं
ू सॉग (Saung) पर्यंत बसने येता येतं. सौंग ते पिंडारी ग्लेशियर हा 45 कि.मी.चा ट्रे क लोकप्रिय आहे .
शिवाय, मन्सि
ु यारी हे गोरीगंगा नदीकाठी वसलेलं आणखीन एक पर्यटनस्थळ. बर्फाच्छादित पर्वतमाथ्यांनी वेढलेल्या
मन्सि
ु ू खालिया टॉपपर्यंत ट्रे किंग करता येतं. हिवाळ्यात इथे बर्फ पडतो. पावसाळ्यात मात्र ह्या ठिकाणी जाऊ
यारीपासन
नये. 

लडाख :
निसर्गाचा स्तिमित करणारा आणि वारं वार मोहात पाडणारा अनुभव येतो तो लडाखलाच. संपूर्ण वेगळी संस्कृती आणि
निसर्गातल्या गडद रं गांची उधळण हे लडाखचं वैशिष्ट्य. लडाखला मोनेस्ट्री पाहता येतात. त्यात हे मीस, टिकते आणि शिय
ही लेहमध्ये असणारी मोनेस्ट्री पाहण्यासारखी आहे . सिंधू नदीतलं राफ्टिं ग हा थरारक अनुभव असतो. सिंधू नदीचं
सांस्कृतिक महत्त्व आणि प्रत्यक्षात आपण सिंधू नदीकाठी आहोत, ही भावनाच विलक्षण सुखावणारी असते. तसंच
झान्सकर नदीही आहे . त्यावर "चारद-ट्रे क' करतात. खार्डुंगला हा जगातील सर्वाधिक उं चीवरचा "मोटरे बल रोड' हे लडाखचं
वैशिष्ट्य आहे . 18000 फुटांपेक्षा जास्त उं चावरचा हा रस्ता म्हणजे खरोखरच एक "आश्‍चर्य' आहे . 
काही पर्यटकांना जरा "ऑफबीट डेस्टिनेशन्स' आवडतात. अर्थात ह्यासाठी किं मतही जरा जास्त मोजावी लागते. मात्र, ह्या
जागांचा अनुभव हा "लाइफटाइम' असतो. इथे अनुभवलेलं निसर्गाचं रूप हे एकमेवाद्वितीयच असतं.
बर्फातल्या पर्यटनासाठी एक आकर्षक भाग म्हणजे लडाख. हिमालय आणि काराकोरम रांगांमध्ये 9000 फूट उं चावरचं
"लडाख' हे दे शातील सर्वांत उं च पठार आहे . लडाखमध्ये ट्रे किंगलाही खूप पर्यटक जातात. मरखा व्हॅ लीचा ट्रे क, लामायुऊ-
पदम
ु ट्रे क, तसंच स्टोक-खांग्री राऊंड ट्रे क यासारखे ट्रे क आहे त. मात्र, लडाखसारख्या भागात पर्यटनासाठी जाताना योग्य
ु म भाग असून ट्रे किंगच्या मार्गावर तुरळक वस्ती असते.
एजंट, गाइड यांचा सल्ला नक्कीच घ्यावा. लडाख हा तसा दर्ग
शिवाय, मोठी हॉटे ल्स वगैरे नाहीत. मोठ्या ट्रे कसाठी अन्न शिजवण्यासाठी इंधनही स्वत:बरोबर न्यावं लागतं. ट्रे किंगची
साधनं लेहला जम्मू-काश्‍मीर टूरिझमच्या साहाय्याने मिळू शकतात. लडाखमधील "चादर ट्रे क' लोकप्रिय होतो आहे . चादर
ट्रे क म्हणजे गोठलेल्या झान्सकर नदीवर ट्रे किंग करणं. नदी गोठलेली असल्याने त्या बर्फाला "चादर' असं म्हटलं जातं.
त्यावरून चालत जाण्याची ही स्पर्धा खूप कठीण असते. कारण तापमान "उणे' असतं आणि वातावरण अतिशय प्रतिकूल
असतं. लडाखमध्ये लेह, द्रास व्हॅ ली, झान्सकर, मरखा व्हॅ ली, चादर आइस ट्रे क, मनाली ते लेह ट्रे क ह्यासारखे बरे च ट्रे क
आहे त. पर्यटक आपल्या सोयीनुसार आणि "बजेट'नुसार ट्रे किंग करू शकतात. लडाखमध्ये अतिउं चावरचं "लेक' डोळ्यांचं
पारणं फेडतं. त्सोमोरीरी आणि त्सो हे "थ्री-इडियट्‌स'फेम लेकही इथे आहे . "लडाख फेस्टिव्हल 1 ते 15 सप्टें बरपर्यंत
असतो. तो अनुभवणंही सुखद असतं.

हिमाचल प्रदे श
स्वत:च्या नावातच "हिम' असणारा हा हिमाचल बर्फातल्या पर्यटनासाठी सततच सज्ज असतो. हिमाचल प्रदे शातील सिमला,
मनाली तसंच धरमशाला ही ठिकाणं पर्यटकांची पहिली पसंती आहे तच. याशिवाय काही खास ठिकाणंसद्ध
ु ा आता लोकप्रिय
होत आहे त. लाहौल-स्पिती ही त्यापैकीच आहे त. बर्फाच्छादित हिमशिखरं आणि आल्हाददायी वातावरण ह्यामळ
ु े लाहौल-
स्पितीला पर्यटकांची गर्दी वाढते आहे . लाहौल व्हॅ ली समद्र
ु सपाटीपासन
ू 2,745 मीटर उं चीवर आहे .
जन
ू , जल
ु ै, ऑगस्ट आणि सप्टें बर या महिन्यांत लाहौल-स्पिती इथे जायला वाहनं मिळू शकतात. रोहतांग पास मात्र चालू
असला पाहिजे. कारण त्यामार्गेच वाहनं ये-जा करतात. स्पितीचं वातावरण, निसर्गसंपदा बरीचशी तिबेटसारखी असल्याने
स्पितीला "लहान तिबेट'सुद्धा म्हणतात.

अरुणाचल प्रदे शातील तवांग हे सुद्धा गूढ सौंदर्याने सजलेलं अप्रतिम ठिकाण आहे . अरुणाचलमधील 10,000 फूट उं चीवरचं हे
ठिकाण म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे . तवांगच्या उत्तरे ला तिबेट आहे . तवांगचं सौंदर्य मन मोहवणारं आहे . नद्या,
तळी, धबधबे, निसर्गाची हिरवाई आणि निळं आकाश ह्या सर्वांमध्ये जाणवणारी एक प्रकारची गढ
ू अशी शांतता तिथे
जाणवते. तवांगला भेट दे ण्यासाठी सप्टें बर ते नोव्हें बर हा काळ चांगला आहे . बर्फ अनभ
ु वायचा असेल तर मात्र डिसेंबर ते
मार्च हा काळ उत्तम ठरतो. याशिवाय सेला पास हा अक्षरश: अप्रतिम अनभ
ु व ठरतो. सेला पास हे 13,714 फूट उं चीवरचं
ठिकाण पर्ण
ू पणे बर्फाने आच्छादलेलं असतं. तवांग वॉर मेमोरियल हे 1962 च्या भारत-चीन यद्ध
ु ातल्या शहीद भारतीय
जवानांची आठवण करून दे तं. तवांगला बरीच "लेक्‍स' म्हणजेच "त्सो' आहे त. ती अति उं चावर आणि बर्फाच्छादित
शिखरांनी वेढलेली आहे त. पी.टी.सी., शोंगत्सेर लेक, बंगा जंग लेक ही काही प्रसिद्ध तळी आहे त. 
अरुणाचलच्या चांगलांग जिल्ह्यातील (भारत-ब्रह्मदे शच्या सीमेजवळ) महत्त्वाचं आकर्षण म्हणजे नामडाफा नॅशनल पार्क .
ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे संपर्ण
ू जगातील हे एकमेव नॅशनल पार्क असं आहे की जिथे वाघ, बिबट्या, स्नो लेपर्ड आणि
क्‍लाउडेड लेपर्ड ह्या चार प्रजाती पाहायला मिळू शकतात. 

सिक्कीम :
दे शाचा स्वर्ग म्हणता येईल असं सिक्कीममधील लाचुंग हे ठिकाण. "लाचुंग'चा शब्दश: अर्थ आहे "लहान पर्वत'. 1855 च्या
"दि हिमालयन जर्नल'मध्ये जोसेफ साल्टन हूकर यांनी लाचुंगचा उल्लेख "मोस्ट पिक्‍चर्स्क व्हिलेज ऑफ सिक्कीम' असा
केलाय. बर्फाच्छादित पर्वत, लहान-मोठे झरे यांनी नटलेलं लाचुंग हे मोहात पाडल्याशिवाय राहत नाही. युमथांग व्हॅ ली ही
लाचुंगपासून 25 किमीवर आहे . लाचुंग हे सिक्कीमचं उत्तर भागातील सर्वांत शेवटचं गाव आहे . शिवाय, शिंगबा,
ऱ्होडोडेनड्रोन अभयारण्य हे सुद्धा इथे आहे . "ट्राऊट फिशिंग'चा अनुभव तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता. 
उत्तर सिक्कीम हायवेवर 8,838 फूट उं चावर वसलेलं लहानसं गाव म्हणजे लाचेन. गावही नाही...एक लहानशी वस्ती
म्हटलं तरी चालेल, असं हे एक "ऑफबीट' डेस्टिनेशन आहे . वस्ती कमी असली तरी पर्यटकांसाठी सर्व सोयी इथे
व्यवस्थित उपलब्ध आहे त. ग्रीन लेक आणि कांचनगंगा नॅशनल पार्क ह्याकडे लाचेनपासूनच जावं लागतं. लाचेनपासून
ट्रे किंगने चोप्ता व्हॅ ली आणि गुरुडोंगमार लेकपर्यंत जाता येतं. बुमथांग हा भूतानमधील एक जिल्हा म्हणजेच झोंगखाग
आहे . "सिक्कीम' हे आता बर्फातील भटकंतीसाठी पर्यटकांना खेचून घेत आहे . दरू चा प्रवास, शांतता आणि बर्फाच्छादित
निसर्गसौंदर्य ह्यांना भुलणारे पर्यटक "सिक्कीम' पाहिल्याशिवाय राहत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे इथली लोकसंस्कृतीही
भुरळ घालणारी आहे .
लाचुंग, लाचेन आणि बुमथांग (भूतानमध्ये) ह्या जागा काहीशा "ऑफबीट'आहे त. लाचुंग, लाचेन, संदकफू, झोंग्री आणि
भूतानमधील बुमथांग ह्या ठिकाणी साधारणपणे डिसेंबरपासून बर्फ पडायला सुरुवात होते. तो साधारण एप्रिल-मेपर्यंत
असतो. लाचेनपासून गुरुडोंगरमार लेकला काही वेळा अति हिमवष्ृ टीमुळे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जाता येत
नाही.
बर्फातल्या पर्यटनासाठी नेहमीच "काही तरी वेगळं ' अनुभवण्याची मानसिकता असते. शहरात मिळणाऱ्या सुखसोईंची अपेक्षा
मनात ठे वून इथे जाता येतं नाही. साधारणपणे, एवढ्या उं चीवर काही "बेसिक' सुविधा मिळू शकतात. त्यामुळे पर्यटनासाठी
ह्या "ऑफबीट' डेस्टिनेशनला जाताना "निसर्ग अनुभवणे' हा हे तू मुख्यत: मनात ठे वून गेल्यास उत्तम.

सुखद आणि थरारक 


जम्मू-काश्‍मीर, उत्तराखंड, हिमाचल, अरुणाचल, सिक्कीम असा बर्फातलं पर्यटन "एन्जॉय' करू दे णारा आपल्या दे शाचा हा
निसर्गरम्य भाग आहे . पर्यटन करताना सख
ु वणारे आणि थरारक अनभ
ु वही येत असतात. घरी परतताना हे अनभ
ु व हुरहूर
लावन
ू जातात. 

You might also like