You are on page 1of 4

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुशास्त्र, व्यवस्थापन या व्यावसायिक

अभ्यासक्रमांची महाविद्यालये १ ऑगस्टपासन


ू सरू
ु होणार असन
ू त्यांची प्रवेश प्रक्रिया
सरू
ु झाली आहे . या वर्षी राज्य शासनानेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-
सीईटी घेतल्याने तसेच केंद्र शासनाच्या कौशल्य शिक्षण, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप
इंडिया या योजनांचाही सकारात्मक प्रभाव विद्यार्थ्यांवर पडल्यामुळे अभियांत्रिकी अथवा
फार्मसी क्षेत्रात पुढे चांगल्या संधी उपलब्ध होतील, या आशेने ३७६००० विदयार्थ्यांनी
परीक्षा दिली. २८४२३९ विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स तर
२७४००० विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री बायोलॉजी ह्या विषयांमध्ये परीक्षा दिली.
ह्यापैकी फक्त ९% विद्यार्थ्यांना १००च्या वर गण
ु मिळाले आहे त तर फक्त १%
विद्यार्थ्यांना १५०च्या वर गुण मिळाले आहे त. पीसीएम मध्ये १००च्या वर गुण
मिळवणारे २३००० विद्यार्थी तर पीसीबी ह्या विषयांमध्ये १२७०० विद्यार्थी आहे त.

गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीच्या सुमारे ५७ हजार जागा रिक्त राहिल्या. एकीकडे शैक्षणिक
दर्जामळ
ु े जागा रिकाम्या राहत असताना दस
ु रीकडे बहुतेक महाविद्यालयांमध्ये
‘एआयसीटीई’च्या निकषांचे पालन होत नसल्याचे एआयसीटीई व डीटीईच्याच चौकशीत
आढळून आले आहे . राज्यातील महाविद्यालयांमध्ये अपरु ी जागा, भोगवटा प्रमाणपत्र नसणे,
प्रयोगशाळा नसणे अथवा कमतरता असणे, नियमाप्रमाणे शिक्षकांचे केडर न नेमणे, नवीन,
अननुभवी कंत्राटी शिक्षक नेमून कामचलाऊ शिक्षण दे णे, शिक्षकांना सेवेत सामील न
करण्यासाठी वेगवेगळ्या क्लप्ृ त्या करणे, वेगवेगळे मस्टर बनवून सर्व नियामकांच्या डोळ्यात
धळ
ू फेकणे, महाविद्यालयात प्रवेश व्हावे यासाठी शिक्षकांना तणावात ठे वणे, शिक्षक-
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानस
ु ार पगार न दे णे अथवा नियमानस
ु ार पगार दे ऊन तो
शिक्षकाकडून जबरदस्तीने परत घेणे, तरीही कॉलेज नियमानस
ु ार पगार दे ते आहे असे
कागदोपत्री दाखवून शिक्षण शुल्क समितीकडून वाढीव शिक्षण शुल्क मंजूर करून त्याची
आकारणी विद्यार्थ्यांकडून करणे, पदवी व पदविका महाविद्यालये फक्त कागदोपत्री दस
ु ऱ्या
पाळीत चालवीत असल्याचे दाखवून एकाच पाळीत कारभार हाकून कोटय़वधी रुपयांची माया
गोळा करणे, असे अनेक गैरव्यवहार राज्यात नित्यनियमाने दिसून येत आहे त. ह्या
गैरव्यवहारांना आळा घालण्यास राज्यपातळीवर विविध विद्यापीठांना व डीटीइला व राष्ट्रीय
पातळीवर एआयसीटीइला संपर्ण
ू अपयश आल्याने खोटी माहिती दे ऊन फीपोटी शासनाच्या
तिजोरीवर कोटय़वधी रुपयांचा डल्ला मारणारे संस्थाचालक व प्राचार्य मोकाटच असल्याचे
विदारक चित्र राज्यात दिसत आहे .
युती सरकारने ‘महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व
शल्
ु क यांचे विनियमन) अधिनियम-२०१५’ आणले. या अधिनियमांच्या अनष
ु ंगाने राज्यातील
व्यावसायिक उच्च शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया गण
ु वंत विद्यार्थी आणि प्रामाणिक उत्पन्नस्रोत
असणाऱ्या पालकांच्या फायद्यासाठी कमालीची आधनि
ु क, विद्यार्थिकेंद्रित व पारदर्शी होत
असताना या प्रवेश प्रक्रियेतून उच्च व्यावसायिक शिक्षणाच्या नावाजलेल्या काही सरकारी
व सरकारी अनद
ु ानित संस्थात एम.एच.टी.सी.इ.टी मध्ये १५०च्या वर गुण मिळवणारे
विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करतील व उरलेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची दर्दु शा वारं वार ज्या व्यवस्थेमळ
ु े झाली त्याच व्यवस्थेत कार्यरत
असलेल्या विनाअनद
ु ानित उच्च शिक्षणाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे ,
अश्या वेळी विद्यार्थ्यांनी राज्यातील विनानुदानित उच्च शिक्षणाच्या
महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चिती करण्याआधी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे
ह्या बद्दल मार्गदर्शन करण्याचा ह्या लेखाचा हे तू आहे

प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या पालकांना किमान पढ


ु ील खरी माहिती असणे अत्यावश्यक
आहे

विनांनद
ु ानित कॉलेजकडे ऑक्यप
ु न्सी सर्टिफिकेट आहे का ह्याची चौकशी करणे अत्यंत
आवश्यक आहे . कारण AICTE नियमाप्रमाणे जागा व महाविद्यालयाची इमारत
बांधली नसल्याने विनांनुदानित कॉलेजेस ऑक्युपन्सी सर्टिफिकिट्स मिळवण्यास
अयशस्वी ठरली आहे त. जिथे मुळापासून घोळ आहे त तिथे पाल्याचे भविष्य कसे
घडणार हा प्रश्न पालकांनी स्वतःलाच विचारायला हवा

फार्मसी कॉलेजकडे PCI ची अंतिम मान्यता आहे कि कोर्स ऑफ कंडक्ट ची मान्यता


आहे ?फार्मसी कॉलेजकडे PCI ची कोर्स ऑफ कंडक्ट ची मान्यता आहे मग PCI ची
अंतिम मान्यता का मिळालेली नाही? फार्मसी कॉलेज ने AICTE कडून एक्स्टें शन
ऑफ अप्रूव्हल पदरात पाडून घेताना AICTE ला जो स्टाफ दाखवला आहे तोच स्टाफ
PCI व विद्यापीठाला ला दाखवला आहे का?

सध्या सर्व व्यावसायिक कोर्सेस सेमिस्टर क्रेडिट सिस्टीम ने चालवले जातात. क्रेडिट
सिस्टीम चे फायदे होण्यासाठी कॉलेजकडे विद्यापीठाच्या मान्यतेचे शिक्षकांचे केडर
असणे जरुरी असते. कॉलेजमध्ये AICTE / PCI नॉर्म्स नस
ु ार शिक्षकांचे केडर में टेन
केले गेले आहे का? कॉलेजचे प्राचार्यांना व कॉलेजमधील किमान 50% शिक्षकांना
विद्यापीठाचे अप्रव्ू हल आहे का? कॉलेजच्या सलग्नीकरणात काही बाधा आहे का?
नवोदित, होतकरू, एड हॉक वर असलेले शिक्षक मोठ्या संख्येने कॉलेजेस मध्ये
असल्यास कॉलेज चा कल व्यावसायिक आहे असे नाईलाजाने समजावे.

कॉलेजची फी शिक्षणशल्
ु क समितीने मंजूर केलेली आहे का? असल्यास शिक्षणशल्
ु क
समितीने मंजूर केलेली मंजूर फी कॉलेजने वेब साईट व नोटीस बोर्ड वर लावली आहे
का? कॉलेजचे AICTE ला दिलेले मँडट
े री डिक्लयरे शन, PCI चा SIF कॉलेजने
वेबसाईट वर लावला आहे का ह्याची खात्री करा.

कॉलेजच्या शैक्षणिक कामगिरी हि कॉलेजच्या प्राचार्यांच्या शैक्षणिक सहभागावर


अवलंबन
ू असते. कॉलेजचे प्राचार्य नियमानस
ु ार वर्क लोड घेतात का? ते पर्ण
ू वेळ
कॉलेजमध्ये असतात कि कामाच्या निमित्याने इकडे तिकडे फिरतात? ज्या कॉलेजेस
च्या प्राचार्यांना नियमाप्रमाणे शैक्षणिक वर्क लोड घ्यायला वेळ नाही ते तुमच्या
पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे कसे लक्ष दे णार? कॉलेजच्या प्राचार्यांशी/ शिक्षकांशी
इंग्रजीत बोला, व्यावसायिक उच्च शिक्षण इंग्रजी भाषेत दिले जाते. महाविद्यालयात
शिकवणारा कोर्स चे माध्यम ज्या भाषेत आहे त्या भाषेतन
ू प्राथमिक बोलणे ज्यांना
जमत नसले तेच जर व्यावसायिक कोर्स ४ वर्ष विद्यार्थ्यांना बोली भाषेत शिकवत
असले तर पुढे काय वाढून ठे वले आहे ह्याचा तुम्हीच अंदाज घ्या

कॉलेजमध्ये शिक्षकांना नियमानुसार वेळच्या वेळी पगार होतो का? कॉलेजमध्ये


नियमाप्रमाणे नॉन टिचिंग स्टाफ आहे का? त्यांना पगार मिळतो का? महिनोन्महिने
वेतनच मिळाले नाही तर जगायचे कसे, असा मूळ प्रश्न ज्या शिक्षकांना भेडसावतो
आहे , त्या शिक्षकांच्या आधाराने प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांचे भविष्य नक्की कसे घडणार
आहे , याचे उत्तर कुणाकडेच नाही.

सरकारी उच्च दर्जाच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यास अपयशी ठरलेला विद्यार्थी


कॉलेज ‘शंभर टक्के प्लेसमें ट्स’बाबत करीत असलेल्या दाव्यांना भल
ु न
ू त्या कॉलेजच्या
हाती आपले भविष्य व पैसा सोपवतात. शिक्षण संस्था करीत असलेले प्लेसमें ट्सचे
ऊरबडवे दावे खोटे असल्याचे एआयसीटीईला संस्थांनी दिलेल्या माहितीतूनच सिद्ध झाले
आहे . गेल्या वर्षी अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या राज्यातील अवघ्या ३२ टक्के
विद्यार्थ्यांना, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अवघ्या ९ टक्के आणि पदव्युत्तर
अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १३ टक्केच विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकला आहे .
फार्मसीबद्दल तर माहिती समोरच आणली जात नाही.

कॉलेजला कार्यरत होउन ४ वर्ष होउन गेले असतील तर कॉलेजने अक्रेडीटे शन करून
घेतले आहे का? नसल्यास काय कारण आहे ?

कॉलेजने समोर आणलेल्या सिनिअर्स ना टाळून पुढे जाउन इतर सिनिअर्स ना भेटा.
कॉलेजमध्ये डोळस पद्धतीने फेरफटका मारा, कॉलेजच्या प्रयोगशाळा, वर्ग, बॉईज,
गर्ल्स कॉमन रूम्स, ऑडिटोरियम हॉल, कॉम्प्युटर्स डिपार्टमें ट व लायब्ररी बघा
कॉलेजमध्ये सक्षम विद्यापीठाची मान्यता मिळाला लायबीरियन आहे का ते बघा.
कॉलेजने २० एम बी पी एस इंटरनेट कनेक्टिव्हीटी व इ -जर्नल्स विद्यार्थ्यांना
उपलब्ध केली आहे का?

विद्यार्थीभिमुख प्रवेशप्रक्रिया राबवून आपले कर्त्यव्य पार पडले असे काहीसे सरकारला
वाटत आहे पण व्यावसायिक तंत्रशिक्षण नक्की कोणासाठी? विद्यार्थ्यांसाठी की
विनाअनद
ु ानित महाविद्यालयात पायाभूत सुविधांचा अभाव असूनही एआयसीटीईला
खोटी माहिती दे ऊन महाविद्यालयांना मान्यता मिळवण्यात निर्ढावलेल्या
संस्थाचालकांसाठी? या प्रश्नाचे उत्तर कोणतेही नियामक मंडळ दे त नसल्याने
विद्यार्थ्यांना स्वतःच्या भविष्याच्या दृष्टीने अवघड प्रश्न विचारायलाच हवे

You might also like