You are on page 1of 4

कणकवली ( मालवण ) पासुन सुमारे ३२

किलोमीटर अंतरावर चिंदर म्हणून गाव आहे .


तेथे प्रत्येक ३ वर्षांनी डिसेंबर महिन्यात
एक विचित्र घटना होते. त्या घटनेला लोक
गाव पळ असे म्हणतात.जेव्हा गाव पळ
असते तेव्हा गावातले सगळे लोक स्वताच
गाव सोडून जातात ३ दिवसा साठी. ३
दिवस
गाव पर्ण
ू ओसाड असत कोणीही राहत
नाही गावात एवढाच काय तर त्या ३
दिवसात गावात एस . टि बस सध
ु ा येत
नाही.
कणकवली बस डेपोत आधीच
सूचना दिलेली असते कि ३ दिवस चिंदर
मध्ये एस.टि सेवा बंद आहे .
हे ऐकून मला कुतूहल वाटले म्हणून
मी विचारले कि मग ३ दिवस काय होत कोण
राहत तिथे आणि गाव सोडून सगळे
का पळतात . तेव्हा त्या म्हणाल्या हे गाव
त्या ३ दिवसात भूतानी झपाटलेल असत . ३
दिवस या गावावर फक्त भूतांच राज्य
असत. मग मला अजून जाणून
घेण्याची इच्छा झाली. त्यांनी पुढे
सांगायला सुरवात केली .
त्याचं घर गावातील लब्दे वाडीत आहे . गाव
खप
ू संद
ु र आहे घरापासन
ू २
मिनटांच्या अंतरावर एक नदी सध
ु ा आहे .
जेव्हा गाव पळ असते तेव्हा वाडीतले सगळे
लोक नदीच्या पलीकडे जाऊन
छोट्या छोट्या झोपड्या बांधून राहतात.
गावात फक्त सकाळी ८ ते १२ या वेळेत न
आवाज करता काही पुरुष मंडळी जी धीट
आहे त तीच पिण्यासाठी लागणार
पाणी किवा इतर वस्तू
आणायला जातात.आणि १ २
वाजण्याच्या आत पुन्हा परत येतात .
आता मुख्य गोष्टीला सुरवात करतो. तर
झाल अस कि गाव पळ होती सकाळचे १०
वाजले होते काही लोक जेवण बनवत होते.
त्यातल्या काही तरुण हौशी मुंबई वरून खास
त्या सोहळ्य
साठी आलेली मंडळी होती त्यांनी मटण
बनवायचे ठरवले. पण
त्या साठी लागणारा मसाला वाटण्याचे
साधन त्यांच्या कडे नव्हते. मग त्यातले
दोघे आणि एक गावकरी माणूस असे ३ लोक
छोट्या होडीने पलीकडे आले गावात एक दम
स्मशान शांतता पसरली होती. त्यांना सतत
असा वाटत होत कि कोणीतरी त्यांच्यावर
लांबून लक्ष ठे वत आहे .
जो गावकरी होता त्याने
त्या दोघांना घरात
जाऊन
मसाला वाटायचा पाटा आणि वरवंटा आणायला सांगितला तो पर्यंत
मी पाणी भरून घेतो असे बोलून तो विहरी वर
गेला. हे दोघ घरात आले. पण
त्यांना पाटा आणि वरवंटा काही केल्या सापडेना.
तेवड्यात एकाला समोरच ठे वलेला मिक्सर
दिसला त्याने दस
ु र्या मित्राला सांगितले
कि अरे हे बघ आता तर आपल कामच झाल
२ मिनटात मसाला वाटूया आणि इथून निघून
जावूया. त्याने पण होकार दिला आणि हे
लोक हे विसरले कि गावात आवाज
करायचा नसतो म्हणून आणि यांनी मिक्सर
सुरु केला तशी मिक्सर च्या आवाजाने ने
ती समशान शांतता भंग झाली. आवाज ऐकून
जो माणूस
पाणी भरण्यासाठी गेला होता तो धावत
घर
जवळ आला आणि त्याने जे पहिले ते
भयानक होते. त्याने पहिले
कि समोरच्या टे कडी वरून ३ विद्रप

म्हातार्या बायका किं चाळत धावत
त्याच्या दिशेने येत होत्या. त्याला कळून
चक
ु ल कि हे काही तरी भलताच आहे त्याने
लगेच
दरवाजा ठोठावला आणि त्यांना बाहे र
यायला सांगितले. ते सुधा घाबरले
आणि बाहे र आले तेवढ्यात
त्या बायका अजून जवळ
आल्या त्यांची उं ची सुमारे ८ ते १० फूट
होती एक विचित्र वास पसरला होता. हे
तिघे
हि जीवाच्या आकांताने पळू लागले
नदी बाजूलाच असल्या कारणाने लगेच
त्यात बसून ते पलीकडे जाऊ लागले.
नदी जवळ येवून
त्या बायका थांबल्या आणि किं चाळू
लागल्या त्यांचा आवाज
इतका होता कि पलीकडे बसलेल्या पर्ण

गावाला तो ऐकू आला आणि थोड्याच
वेळात
त्या ज्या टे कडीवरून धावत येत होत्या तेथे
आग लागली धुराचे लोट उठले.
या तिघांनी पलीकडे येवून
झालेली सगळी हकीकत गावातील
लोकांना सांगितली तेव्हा त्यांनी दे वी कडे
धावा केला आणि झालेल्या प्रकारची क्षमा मागितली तेव्हा अचानक
ती आग शांत झाली आणि परत
कोणी त्या गावात गेले नाही ३ दिवस।
तर मंडळी अस होत या गावात ३ दिवस ते
गाव भुताच्या छाये खाली असते ३
दिवसानंतर दे वीला कौल
लावला जातो आणि दे वीने कौल
दिल्या नंतरच गावात प्रवेश करतात
आणि जत्रेला सरु वात सध
ु ा होते .
या डिसेंबर महिन्यात
पन्
ु हा ती पर्वणी येणार आहे .

29/11/2014

You might also like