You are on page 1of 4

पितछ

ृ त्र

सकाळ पासूनच घरी सांगलीला जायची तयारी सुरु होती, गडबडीत नाष्टा आटोपला, निपाणी-
कोल्हापूर-सांगली असा प्रवास करत ९ वाजता मी आणि आणि पप्पा सांगलीला पोहचलो.
दवाखाण्यात अजून लगबग जाणवत नव्हती, phenyl च्या वासाने सभोतालचे वातावरण अजूनच
आजारी बनले होते. मी “डॉक्टर कधी येतील”, Receptionist “येतील हो बसा जरा, एक surgery आहे
आज, मग IPD, अन मग OPD”, मी “अहो मला तर १० ची appointment दिलीय ना तुम्ही, म्हणून
तर आलो लवकर”, Receptionist “साळंु खे ना, तुमचा पहिला number आहे , 12-1 ला येईल number ”
मी वैतागन
ू “अहो सांगायचे ना तसे, घरूनच त्याच वेळी आलो असतो”.

जवळच हॉटे लमध्ये पप्पांच्या आवडीचा दावणगिरी डोसा खाल्ला, अश्यातच मला त्याच्या
आवडीनिवडी समजाय लागल्या होत्या, नाही, आधी पण माहितच होत्या पण त्या वेळी ना कळत
उलटे वागायचो.
“साळंु खे कोण आहे ?” जोरात Receptionist ने आवाज दिला, घाई गडबडीत निपाणीच्या डॉक्टर ने
दिलेली files सांभाळत आत गेलो, Dr. परु ोहित “या बसा, काय झालाय?”. पप्पा ”घसा दख
ु तोय” Dr.
“कधी पासन
ू ”, पप्पा ”2 महिने झाले”, आज पर्यंत पप्पा सर्वाना हे च सांगायचे मासा खाताना काटा
गळ्यात अडकला त्यामळ
ु े साद बसलाय आणि कधी कधी दख
ु ते. डॉक्टरांनी दर्बि
ु णीने घश्याची
तपासणी केली, Dr. परु ोहित ”Biopsy करावी लागेल, मगच काय ते सांगता येईल”. काही तर
कागदावर डॉक्टर ने खरडले आणि एका Diagnostic Center चा number दिला. टे स्ट झाली गावी
आलो, माझा मित्र Dr. जोतीबा ला फोन केला आणि सर्व सांगितले, त्याच्या आवाजावरूनच जाणीव
झाली काही तरी गंभीर आहे , पण मनाला समजावत मी आणि पप्पा दस
ु ऱ्या दिवशी दवाखान्यात
पोहचलो, डॉक्टरांनी report पहिले. Dr. परु ोहित “स्वरयंत्रावर malignant tissues ची growth झालीय,
operation करून काढावे लागेल, आवाज पण जावू शकतो, पण स्वर यंत्र बसवन
ू बोलता येईल”, एका
फटक्यात मनातली भीती डॉक्टरांच्या तोंडातन
ू बाहे र आली. काय करावे काहीच सच
ु त नव्हते मी
”माझ्या मामाशी बोलतो आणि परत भेटाय येतो”. तडकन दवाखान्यातन
ू बाहे र पडलो

सांगली – निपाणी चा तो परतीचा प्रवास कधीहि विसरता येणार नाही, बाहे र पाऊस पडत होता, ST
भरधाव आवाज करत पुढे जात होती, मी आणि पप्पा दोघेही सुन्न, तोंडातून शब्द हि फुटत
नव्हता, अंग सर्व भीती ने गरम झाले होते, एका मागन
ू एक क्षण पटापट उलघडत होते, पप्पा,
त्यांनी आमच्या साठी खालालेल्या खस्ता, आई वडिलांचा अधूनमधून होणारे वाद, त्यातून झालेले
आम्हा भावंडांचे कलुषित मन, सर्व काही आठवत होते सर्वकाही, चूक बरोबर ह्याच्या वरचे जे
विचार असतात त्यांनी माती गुंग केली होती. निपाणी आली, घरी पोहताच Report जोतीबा ला
whattsapp केला, तो लग्गेच भेटाय आला, त्याच्याशी चर्चा करून एवढे च कळले कि Cancer माज्या
कंु डलीत परत आला.

जोतीबा ने Dr. सुरज पवारांचा reference दिला, second ओपिनिओन घायचे ठरले, लगोलग मामाशी
बोलणी झाली, आज घश्याखाली घास उतरत नव्हता, कसेबसे जेवण आटोपले, बाहे रच खोलीत जावून
बसलो, पप्पा “काय झाले रे ?” मी “काही नाही.” पप्पा “लई tension घेतो बाबा तू, मला मरायचे
असते तर मी Heart Attack आला तें व्हाच गेलो असतो”. ह्या वाक्यावर कसे react करावे समजतच
नव्हतं, मी “अहो, मी जोवर आहे तोवर असे काही नाही होणार”, दोघे हि खोटे हसत हसत, पप्पा
“यव
ु राज बघ झाला की नाही recover मी हि होईल, पण मला ते घश्याला machine तेवढे लावू
नकोस, कसा हि असला तरी माझा आवाज माझा आहे ”. मी तोंड दस
ु रे कडे करून, डोळ्यातील
पाण्याला अडवण्याची माझी कला परत एकदा पणाला लावली आणि वेळ मारून नेली.

परत एक दवाखाना, बाहे र डॉक्टरांनी Cancer field मध्ये गाजवलेल्या कर्तुत्वाची वर्तमानपत्रातील
कात्रणे लावली होती, staff पण खप
ू सौज्ण्याण्याने वागत होता, दवाखान्या मध्ये मिळणारा हा सुखद
धक्काच होता, आमचा number आला. Dr. पवार “काय झालेय बाबांना” मी File त्यांच्या हातात
दिली, पवारांनी Biopsy report न्याहाळले, पप्पांना check केले, त्यांनी पप्पांना जरा वेळ बाहे र जाय
सांगितले, Dr. पवार “महांतेश second stage आहे , आपण Operate हि करू शकतो पण Quality of life
नसेल, Chemotherapy आणि Rediation ने Better treatment दे ता येईल आणि life span वाढवता
येईल” मी “ह्यातून पप्पा बरे होतील ना?” Dr. पवार ”पूर्ण बरे होतील असे सांगता येत नाही पण
त्यांना Relief लवकर मिळे ल आणि प्रत्येकाची immune System असते त्या वरूनच recovery
कळे ल”, अजून काही प्रश्न विचारायच्या condition मध्ये मी नव्हतो “OK डॉक्टर मी विचार करतो
आणि परत येतो भेटाय” Dr. पवार “वेळ घालवू नकोस, लवकर निर्णय घे”

मी, पप्पा, मामा आणि मामाचा doctor मित्र घरात काय चर्चा करत होतो पुढे काय करायचे?, आई
बहि‍णींना काहीच माहिती दिली नव्हती काय झालाय ते, पण may be आईला पुसटशी कल्पना
आली होती पण बिचारी बोलू नाही शकत होती, पप्पा “बंड्या तुला काय वाटते ते आपण करू ,
जास्त लोकांचे ऐकत बसू नकोस पण ते sound machine नको”, पप्पांच्या च्या ह्या वाक्याने
अजूनच जास्त जबाबदारी माझ्यावर आली, जन्मदात्याच्या जीवनाची जबाबदारी, निर्णय घ्यायचाच
होता आणि तोही लवकर, डॉक्टरांचे बोलणे आश्वासक वाटत होते, ठरले कोल्हापरु ात Dr. पवारांकडे
treatment सरु
ु करायची

एक लढाई सुरु झाली, हा काळ माझ्यासाठी एकदम Emotional turmoil चा होता, त्यात माझ्या
परिवाराने खूप साथ दिली, काही गोष्टी मी लपवल्या कारण त्या स्पष्ट सांगू शकत नव्हतो,
treatment च्या time चे जास्त वर्णन करता नाही यायचे कारण ते खूप वैयक्तिक स्वरूपाचे आहे ,
ती अशी एक जखम आहे जी कधी भरूच शकत नाही, कधीच नाही, ह्याच काळात लोक कळाले,
त्यांचे चेहरे कळाले, आलेले अनुभव हे feel good दनि
ु ये पासून दरू नेणारे होते, पण कुणाला हि बोल
न लावता पुढे चालायचे ठरवले, लढाई सुरु झाली, cancer शी, Chemo Radiation झाले, हुबळी चे
Homeopathic औषध सुरु केले. फरक वाटला, Follow-up biopsy झाली १००% cancer पेशी नष्ट हाच
medical report आला होता. जिंकल्याचा हुरप आला, समर्था शिवाय हे शक्य नव्हते, तडक
अक्कलकोट गाठले. स्वामी महाराज्यांच्या सानिध्यात जो अध्यात्मिक अनुभव आला त्याला तोड
नाही, त्या दोन दिवसांनी जन्माच्या आठवणी दिल्या.

वलसाड चे आयर्वे
ु दिक उपचार सरु
ु झाले, फरक दिसत होता, आवाज पर्व
ू वत झाला होता पप्पांचा,
पण तब्ब्येत थोडी weak झाली होती, पण routine checkup मल
ु े सगळे under control वाटत होते.
अश्याच एका शनिवारी थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने कोल्हापरू ला admit केले, KCC मध्ये डॉक्टर
नव्हते म्हणन
ू साई cardiac ला शिफ्ट केले. ICU बाहे र मी होतो, छोट्याच्या वेळी पण मी हे खप

जवळून पहिले होते, डॉक्टरांची गडबड चालू होती, माझी एका document सही घेतली आणि ICU चे
दार बंद झाले, बराच वेळ बाहे र तसाच उभा होतो, कुठल्याश्या machin चा सततचा आवाज डोके
गंग
ु ारून टाकत होता, माझे विचार machin च्या तालावर चौखरू उधळत होते, तेवढ्यात आशु आली,
खप
ू आवघड होते हे सर्व, तिला धीर दे णे, ICU मध्ये तिला घेऊन गेलो, थोड्याच वेळात डॉक्टरांनी
बाहे र जायला सांगितले, आशु “दादा, पप्पांनी मला पहिले का रे , मी आल्याचे?” माझ्या तोंडातन
ू शब्द
फुटत नव्हते कशीबशी तिची समजत
ू कडून तिला निपाणी ला पाठवले.

परत वातावरणाचा ताबा machine ने घेतला, सर्व झोपले होते रात्रीचे १२.३० झाले होते, कुणी तरी
ICU बाहे र आले मामाच्या कानात कुजबुजले, मामला रडू आवरे ना “बंड्या तुमचे पप्पा गेले” आता
पर्यंत भावनांना लावलेला बांध फुटला.............

एकदम डोकावारचे छप्पर उडाल्याचा चा भास होत होता, सर्व बाजूला अंधार, जगात एकटे च
असल्याची जाणीव, त्यावेळी कळाले वडील गेल्यावर पितछ
ृ त्र हरपले असे का म्हणतात ते. ह्या
जगात माझे असे कोणी नव्हते मी एकटाच, एकदम unprotected, अनाथ.

डॉक्टरांनी कारण दिले होते म्रुत्यु चे, Low Blood pressure, माझ्या वडिलांनी cancer ला हरवले,
पण....

आजही दप
ु ारी निपाणीच्या घरी, बाहे रच्या खोलीत बसले आणि बाहे र चप्पलांचा चा आवाज आला
कि वाटते अरे पप्पा आले, हरभरा, द्राक्षे घेऊन आले........
हा लेख माझ्या वडिलांच्या आठवणीना उजाळा दे ण्याचा एक प्रयत्न, त्याच्या छप्पर हरवलेल्या
मुलाचा, त्यांच्या छप्पर बनलेल्या मुलाचा.......

You might also like