You are on page 1of 5

आपण जगलो किं वा आपण जगतोय म्हणजे नक्की काय करतोय ?

दररोज उठणे, office ला


जाणे, Computer समोर बसून कधी काम करणे, कधी कामाचे नाटक करणे, कधी फालतुश्या sites
surf करणे, Social Media च्या आभासी जगात स्वतःला गुंतवन
ू टाकणे किं वा twisted news वाचून
निरर्थक चर्चेत वेळ घालवणे, हाच दिनक्रम म्हणजे आयष्ु य जगणे का?
जगण्याच्या चक्रात किती असे प्रसंग येतात जे आपल्या हृदयाचे ठोके चुकवतात, डोळ्यात पानी
येऊ पर्यंत हसवून जातात, हृद्य पिळवटून टाकेल असे दःु ख दे ऊन जातात, असे क्षण थोडकेच. पण
असा अनुभवच जीवन जगल्याची खरी पावती असतो.
कोणी नावाडी संथ पाण्यात होडी चालवण्यात धन्यता मानतो, कोणी सतत वादळातून वाट
काढत पुढे जाण्यात थ्रिल अनुभवतो, तर कोणी वादळाची काळजी करत किनाऱ्यावरच घुटमळत
राहणे पसंत करतो, हा ज्याचा त्याचा choice पण जर का स्थिरता हा स्थायी स्वभाव बनला तर
नवे पाडावांचा शोध अशक्यच.
माझ्या हि जगण्यात काही प्रसंग आले, हे प्रसंग लहान असतील हि, पण नक्कीच त्यातून
कुठल्याही शाळे त न मिळणारे धडे मिळाले, अश्याच आठवणीना उजाळा दे ण्यासाठी “दनि
ु यादारी”
नावाचे एक सदर घेऊन येतोय. तुमच्या पैकी काही लोक ह्या प्रसंगांचे साक्षीदार हि असतील, पण
हे प्रसंग पूर्णतः माझ्या Angel ने मांडण्याचा हा एक नवा प्रयत्न करतोय, परत भूतकाळात
डोकावण्यासाठीचा.

दनि
ु यादारी- भाग

माझी शाळा, हा एक निबंधाचा विषय, शाळे त असताना हा विषय bore वाटायचा, शाळा सुटली,
दिवसामागून दिवस सरू लागले आणि सरनाऱ्या दिवसागणिक हा विषय हृदयाच्या close होऊ
लागला. शाळे तील कोणी जुना सोबती भेटला तर फक्त शाळे तल्याच गप्पा रं गतात, मग वाटते
खरच यार शाळे तच काय ती मजा केली. वय जस जसे वाढत जाते तशी ह्या मजेची Defination
बदलत जाते असो.
भूतकाळ खरच नशीबवान असतो, भविष्या सारखी काळजी, हुरहूर कधीच तो लावत नाही,
भूतकाळात मिळते ते फक्त समाधान, कधी जगलेल्या आनंदाचे तर कधी सरलेल्या दःु खाचे. असाच
माझा mostly सुखद भूतकाळ म्हणजे माझी शाळा “मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुन नगर”.
1995-2001 हा खरतर माज्यासाठीचा खूप खडतर काळ पण ह्याच वेळी सर्वात जास्त protected
वातावरण मिळाले ते माझ्या शाळे तल्या दोस्तांसोबत, सहा वर्षात आमचा असा काही group जमला
होता, नुस्ता दं गा, शाळे ला जाने कधी borech झाले नाही. रम्या, सच्या, मह्या, दिन्या, मन्या, सुरज्या,
रावल्या,विन्या, विशल्या अजून हि बरे चजन. काही लोकांची नावे may be नसतील हि ह्यात पण
त्या सर्वांच्या शिवाय ह्या आठवणी रं जक बनूच शकल्या नसत्या.

रमेश पटे ल उर्फ रम्या, ह्या पोराशी ओळख झाली ती मारामारीतन


ू , पहिलीत असताना, वर्गात
रोब दाखवण्या साठी त्याने पर्ण
ू पटे ल group आणला होता बाजच्
ू या शाळे तन
ू , पण मी आणि मन्या
दोघांनी असा काही हिसका दाखवला सगळे गार, मग तिथन
ू मात्र लोणचे चपाती खाणार हा पोरगा
आयष्ु यात असकाही घस
ु ला एकदम जिवाभावाचा मैतर झाला. सच्या उर्फ सचिन पाटील, पाटील
नावाला शोभणारे व्यक्तिमत्व, एकदम dashing पण काहीसा मितभाषी, सोबत लक्ष्मणा प्रमाणे
असणारा त्याचा चल
ु त भाऊ संदीप, खप
ू अप्रप
ू वाटायचं ह्या जोडीचे. मन्या उर्फ मनोज जाधव, हा
पहिली पासन
ू माझ्या सोबत, क्रिकेट हा आमच्या दोघांच्या जिवाभावाचा विषय, वर्गात आलो कि
पहिला मन्याला गाठायचो post match analysis व्हायचे, अजन
ू हि तसे Discussion मी miss करतो,
जसे आठवीत आलो तसे क्रिकेट ची जागा त्याच्या Love Story ने घेतली “डब्यात डब्बा डब्यात
cake मेरी *** लाखोमे एक”. अभ्यासात एवडा मन लावला असता तर बर झाले असते. सरु ज्या-
दिन्या हे दोघे माझे खंदे प्रशंसक मित्र. नंतर त्यात भरती झाली ती अन्या उर्फ अनिल चौगल
ु े
ह्याची. ह्या तिघांना एक ठाम विश्वास मान्त्या (म्हणजे मी) म्हणतो तेच परीक्षेत येत, काही
प्रमाणात तथ्य हि होते म्हणा त्यात, मग मी माज्या परीने imp द्यायचो, पास होण्याची सोय
व्हायची सर्वांची. मह्या उर्फ महें द्र पटे ल, पटे ल त्रिमर्ति
ू मधील एक, माझा nearly 5 वर्ष्याचा bench
partner होता तो. मी सच्या आणि मह्या तिघे एकाच bench वर बसायचो, हे लेकाचे तास चालू
असताना हसवायचे आणि माझी एक सवय हसतना हुंदका फुटायचा त्यामुळे माझाच आवाज
वर्गात यायचा, त्यामुळे शिक्षकांची बोलणी मलाच बसायची!!!
रावल्या उर्फ राहुल शिंदे, निपानीतल्या एका मोठ्या political कुटुंबातून होता हा पण त्याच्या
वागण्यात कधीही तसे जाणवले नाही, एकदम down to earth, सर्वाना एकदम शांत वाटायचा, पण
फक्त मला आणि विश्ल्याला माहित रावल्या काय चीज आहे , ह्या भाई चे हि एक “दिलसे”
प्रकरण होते पण कधीही बिचाऱ्याने धाडस केले नाही. विन्या उर्फ विनायक कंु भार, 8 वी नंतर हा
आला होता आमच्या शाळे त, आमच्या group मधला lover boy, बिनधास्त कुठल्या हि पोरी बरोबर
बोलायचा, पोरगी म्हं टले कि आमची फाटायची अजून हि स्थिती तशीच आहे पण ह्याचे सर्व उलटे ,
अक्षर एकदम फाडू, त्यात हा हुशार, बोलायला कधीच कुणाला ऐकायचा नाही, पण नेहमी अधून
मधून शाळे ला दांड्या मारायचा, कारणे पण जबरदस्त दे त असे. नेहमी गणपती रं गवाय जायचा,
किती गणपती रं गवले दे व जाने. विशल्या उर्फ विशाल पाटील, विशल्या म्हणजे आमच्या group
मधला दगडू, ह्याचा पण SANPADA झालेला, शालेय जीवनात जेवढ्या काय out of the box गोष्टी
केल्या त्या ह्या पोरामुळे, खप
ू थ्रिल्लिंग होते ते सर्व.

शाळे च्या सहा पैकी चार वर्षात captain म्हणन


ू निवडून आलो होतो ते ह्याच group मळ
ु े,
निवडणक
ू कधी हरली नव्हतो, may be ते एक प्रकारचे रे कॉर्डच असेल, पाचवीत captain नव्हतो
कारण निवडणक
ु ीला उभारण्याचे धाडस केले नाही आणि नववीत नव्हतो कारण त्यावेळी मी गेलो
होतो यल्लमा ला. हि दनि
ु यादारी त्या न लढलेल्या Election नेच आली. आमच्या शाळे त एक न
मांडलेला rule होता “क” तक
ु डीत फक्त कोडणी गावाची पोर असणार निपाणी वाले “अ” आणि “ब”
मध्ये, तशी काहीशी परं पराच होती, त्याला break लावला आम्ही, जाणन
ू बज
ु न
ू नाही, पण मला हिंदी
विषयी आवड त्यापेक्षा संस्कृत विषयी भीती जास्त होती. “अ” आणि “ब” मध्ये जायचे म्हणजे
संस्कृत घ्यावं लागणार, संस्कृत घेतला कि शाळा सरु
ु व्ह्याचाय आधी १५ मिनिटे येऊन
सभ
ु ाषितांची घोकंपट्टी करावी लागणार, आणि त्यासाठी माझ्या शाळा सरु
ु व्हायच्या आधीच्या
cricket matches बड
ु णार होत्या. जरी संस्कृत scoring विषय असला तरी मला cricket मधला score
important होता, म्हणन
ू सरळ “क” तक
ु डीत प्रवेश घेतला. संस्कृत घेतल्याने माझे काही विशेष
नक
ु सान नाही झाले कारण लोकांना जेवडे संस्कृत मध्ये मार्क नाही पडत तेवढे मी हिंदीत पाडले,
१०० पैकी ८६ .हिंदी मळ
ु े अजन
ू एक गोष्ट मिळाली ते म्हणजे वाळवे madam सारख्या बज
ु र्ग

शिक्षिका, आणि हरिवंश राय बच्चन, मन्
ु शी प्रेमचंद,महादे वी वर्मा, काका कालेलकर यांचे धडे.

माझे “क” मध्ये येणे काही पोरांना रुचले नाही, कारण मी एकटा नव्हतो आलो, पूर्ण माझा
group “क” मध्ये आला, माझ्या येण्याने काही पोरांच्या captain होण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला
होता, वर्गाचा Captain असणे म्हणजे एकदम मानाचे मानले जाई. प्रत्येकाला captain होणे
आवडणारे च होते. पण आमचा group जोवर एकसंध आहे तोवर ते अश्याक्यचं होते, मग सुरु झाले
आमचा group फोडण्याचे प्रयत्न, कोणी सच्या ला माज्या against उभे करण्याचा प्रयत्न केला तर
कधी माझ्यात आणि रम्यात फुट पाडण्याचा प्रयत्न केला गेला, पण हा group असा बांधला गेला
होता तो फोडणे तर अशक्यच होते, जोवर मी असे पर्यंत तरी, आठवी चे Election झाले, ठरल्या
प्रमाणे, मी जिंकलो, खप
ू प्रयत्न करून हि प्रवीण दाभोळे पडला, त्याने तर लगेचच तुकडी बदलली
आणि नंतर दहावी मध्ये माझ्या support ने दहावीत तो GS झाला.
Election झाले, आठवी सुरु झाली, मग परत आमचेच राज्य, गप्पा, दं गा, मस्ती, भांडणे सर्व एकदम
मनसोक्त. काका पाटील विरुद्ध सुभाष जोशी आमदारकी Election च्या वेळी च्या आमच्या चर्चा
एका मुरब्बी राजकीय समीक्षकांना लाजवतील अश्याच होत्या, 1999 world cup post match चर्चा,
सगळे च thrilling होते. आता माझ्याकडे नवीन cycle होती, त्यावरून शाळा सुटल्या नंतर होणारी
भटकंती, आंबा,चिंचा, ऊस चोरून खाण्यातील मजाच काही और होती, वर्ग सजावट हा तर आमच्या
साठी मोठा सणच होता, स्वतःचे घर कधी एवढे सजवले नव्हते तेवढे effort आम्ही एक दिलाने
वर्ग सजावटीत टाकत होतो. दिवसामागून दिवस जात होते, अधून मधून परीक्षा हि यायच्या, त्या
यायच्या तश्या जायच्या, group ला imp सांगून पास करणे माझी जबाबदारी होती, सर्व कसे
एकमेकांवर बिनधास्त विसंबून होते, काही छोट्या मोठ्या कुरबुरी असायच्या, कधी निपाणी विरुद्ध
खेडे गावाची पोरे ,तरी कधी काही दस
ु रीच कारणे पण सर्व manage होत होते. Sports सुरु झाले,
ठरलेली cricket team घेऊन थेट सेमी final गाठली, दोन्ही matches शेवटच्या ball पर्यंत गेल्या
होत्या. 8 वी “ड” विरुद्ध last विकेट चा (अमरदीप शिंदे) घेतलेला catch मी आयष्ु य भर विसरू नाही
शकणार, next match आठवी “अ” सोबत सच्या च्या bowling मुळे जिंकलो. Semifinal मध्ये १० वी
“ब” सोबत हरलो पण fight दे ऊन, cricket ने fight दे णे शिकवलं, खेळ हे च शिकवतो जिंको तोवर
fight करा हरला तर बेहत्तर, खचून जावू नका, next match साठी परत नव्या जोमाने ready, खूप
मोठा धडा आहे हा.
नववी सुरु झाली, Election ची चर्चा पुन्हा रं गली, सर्वानुमते पुन्हा मीच Election ला उभारायचे
ठरले, Election हे अचानक व्हायचे, जुलै चा शेवटचा आठवडा किं वा ऑगस्ट चा पहिला आठवडा,
आधी notice अशी काही निघायची नाही. दोन्ही आठवडे गेले, Election काही झालेच नाही, तोवर
इकडे माझ्या घरच्यांनी डोंगराला “यलाम्मादे वी” ला जायचा plan केला, यलाम्मा ला सहसा शुक्रवारी
जातात, आणि शनिवारी संध्याकाळी परत येतात. आणि आमचे Election नेहमी शनिवारीच होते.
समजतच नव्हते जावे कि न जावे, मी गेलो आणि Election झाले तर, न येण्याचे काय कारण दे ऊ
हे पण समजत नव्हते कारण माझ्या साठीच आई ने कसलासा नवस बोलला होता तो फेडाय
जायचे होते, माझे जाने भागच होते. मी नसलो तर group फुटणार याची भीतीहि होती कारण काही
दिवसांपासून काही मुले सच्या आणि रम्या मध्ये भांडण लावत होती, captain होणे हे प्रत्येकासाठी
हवहवे से होते, ह्या आठवड्यात Election होणार नाही याची खात्री केली आणि मी यल्लमा ला
जायला तयार झालो.
डोंगराला जावन
ू आलो तोच रविवारी कळाले Election झाले सचिन पाटील captain आणि रमेश
पटे ल vice captain झाला, माझाच group एकमेका विरुद्ध उभा ठाकला होता, सोमवारचा दिवस
उजाडला काहीसे awkward वातावरण वर्गात जाणवत होते, मी दप्तर बाकावर वर ठे वलं, वर्गात जसा
मी आलो तशी काही पोरांत चुळबुळ सुरु झाली होती, सच्या पण नव्हता आणि रम्या पण.
तेवढ्यात सुरज्या आणि मन्या आले, दोघांना घेऊन तडक मी बाहे र निघून गेलो, त्यांनी दोघांनी
घडलेली हकीकत सांगितली, Election च्या दिवशी रम्या आणि सच्या दोघेही ऐकायच्या मूड मध्ये
नव्हते, दोघांनाहि captain व्हायचे होते. गैर काहीच नव्हते. शेवटी प्रत्येकाला महत्वाकांक्षा असतात,
अहं कार असतोच, मग Election अटळ होते आणि ते झालेही, result काही हि आला असला तरी
थोडीशी कटुता group मध्ये आली होती. सच्या भेटला, रम्या भेटला, दोघांनी हि आपले version
सांगितले, दोघांच्या version मध्ये एकमेकच villain बनले होते. वातावरण नीट लवकर करावे
लागणार याची जाणीव झाली, अजून ह्या matter ला हवा दिली गेली तर हे प्रकरण हे खूप
चिघळले असते, एवढ्या विश्वासाने बनलेला group फुटण्याची भीती होती. किशोर मन होते ते,
काहीसे बंडखोरच, दोघांशी बोललो, समजावले, Election मध्ये व्हयाचे ते होऊन गेले विसरा ते, group
मध्ये फाटाफूट होता कामा नये, दोघांनीही ऐकले, दोघेही समजूतदार, मन्या विशाल्याच्या jokes नि
दिलजमाई झाली परत group एक झाला.

प्रत्येक मैत्रीत असेच असते, एकदा का अहं कार शिरला कि होत्याचे नव्हते होते कधी आपण
एवढे टोकाचे वागतो, आपल्याला भानच राहत नाही कि ह्याच मित्रां सोबत किती आनंदात वेळ
घालवला, वेळीच विषय मिटवलेले बरे असतात, जसा time जाऊ दे तो तसा मैत्री तन
ू पर्वी
ू सारखा तो
पण निघन
ू जातो, अश्याच काहीश्या प्रसंगांनी दनि
ु यादारी शिकवली, पण काही वेळा ह्या दनि
ु यादारी
चा विसर हि पडला, शेवटी हाडामासाची माणसाच आपण, चक
ु ा होणारच, पण चक
ु ा उमजन
ू दरु
ु स्ती
करण्याचे शहाणपण दे व सर्वाना दे वो. हा पर्यंत अश्याच दरु ावलेल्या मित्रांना एकमेकांपर्यंत
पोहचण्याच शहाणपण सच
ु ण्यासाठी.....

You might also like