You are on page 1of 1

मात्तेओ गारोने (Matteo Garrone) दिग्दर्शित ‘डॉगमॅन’(2018) हा इटालियन सिनेमा एक सघन उत्कट

सिनेमानभ
ु व दे तो. कुत्र्यांचा सांभाळ करणारा एक गरीब स्वभावाचा सहृदय माणस
ू आणि त्याचं आयष्ु य क्रमशः
झाकोळून टाकणारा त्याचा गुन्हे गार प्रवत्ृ तीचा क्रूर मित्र या दोघांचे बदलत जाणाऱे संबंध हा या सिनेमाचा गाभा .
हे गत
ुं ागुतींचं नातं उलगडताना सहृदय पात्राच्या निरागसतेचा अटळ अंत , छोट्या इटालियन शहरातलं नुक्कड,
तिथली एकमेकांच्या आधारे जगण्यातले आनंद शोधणाऱी पात्र, तिथल्या सामुदियकतेचे विविध पैलू- असे अनेक
धागे मूळ आशयाला येऊन मिळतात.

पहिल्याच प्रसंगात आक्रमक, क्रूर वाटणाऱ्या कुत्र्याला हळहळू मायेने शांत करुन आंघोळ घालणारा नायक दिसतो.
या प्रसंगातून मोजक्या शॉटसच्या आधारे दिग्दर्शकानं मख्
ु य पात्राचा स्वभाव आणि त्याचं दै नंदिन आयुष्य नेमकं
पकडलेलं आहे . ही भूमिका करणारा मार्चेल्लो फॉन्ते (Marcello Fonte) हा अभिनेता जबरदस्त प्रतिभेने पात्र
जिवंत करतो. त्याची शरीरयष्टी या भूमिकेसाठी चपखल असण्याचा अतिशय कल्पक वापर काही प्रसंगांमध्ये
केलेला आहे . त्याचा गन्
ु हे गार मित्र उं च धिप्पाड, आक्रमक आणि मार्चेल्लो काटकुळा, किं चित बट
ु का असल्यामळ
ु े
त्यांच्या नात्यातलं द्वंदव ् त्यांच्या दिसण्यातूनही जाणवतं.

दिग्दर्शकानं सिनेमात काही सूचक रुपकांचा अर्थपूर्ण वापर केला आहे . मार्चेल्लो पिंजऱ्यातल्या कुत्र्यांचा सांभाळ
करतो. कालांतराने त्याला न केलेल्या गन्
ु ह्यासाठी तरु
ु ं गात जावं लागतं. त्यावेळ सहजच पिंजऱ्यातल्या कुत्र्याची
आठवण होते. एका प्रसंगात मार्चेल्लोचा गुंड मित्र (सिमोने) जुन्या वस्तूंच्या दक
ु ानात एका माणसाला मारतो. तेव्हा
तो एका पुतळ्यावर आपटतो. तेव्हा मार लागलेला माणूस न दिसता, पत
ु ळ्याच्या चेहऱ्यावरुन संथ ठिबकणारं त्या
माणसाचं रक्त दिसतं.

डीओपी निकोलाय ् ब्रूएल (Nikolaj Bruel) यानं वाईट शॉटसमधली दृश्यरचना करताना फ्रेमच्या पुरोभूमी आणि
पष्ृ ठभूमीचा वेगवेगळी माहिती दे ण्यासाठी सुंदर वापर केलाय. हे वाईट शॉटस ् पात्रांचं त्यांच्या अवकाशाशी असलेलं
नातं तर व्यक्त करतातच, शिवाय अवकाशांचं स्वतंत्र व्यक्तिमत्वही उभं करतात. सिनेमाचं रं ग संयोजन अप्रतिम
आहे . पूर्वार्धात इतर रं ग फिकट करुन केवळ निळसर मातकट रं गच्छटे चं प्राबल्य राखलेलं दिसतं. उत्तरार्धात या
मातकटपणाचं करड्या रं गात रुपांतर होतं. मार्चेल्लोच्या आयष्ु यातल्या आणि व्यक्तिमत्वातल्या बदलाशी हा
रं गबदल अलगद जोडला जातो.

कथानकात नाट्य ठासून भरलेलं असतानाही दिग्दर्शक मात्तेओ गारोने त्याचा प्रेक्षकाला क्षणिक, स्वस्त थरार
दे ण्यासाठी संवग वापर करत नाही, तर ते नाट्य नियंत्रित करुन एक लवकर पस
ु ट न होणारा तीव्र अनभ
ु व दे तो.

You might also like