You are on page 1of 1

हॉवर्ड हॉक्स (Howard Hawks) दिग्दर्शित स्कारफेस( Scarface-1932) हा सिनेमा आज सत्त्याऐंशी वर्षांनंतरही

जन
ु ा झालेला नाही. एका महत्वाकांक्षी तरुणाचा गन्
ु हे गारी जगातला क्रमशः होणारा उत्कर्ष आणि अटळ विनाश या
सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे . हा प्रवास साकारताना दिग्दर्शकानं सिनेमाच्या इतिहासातला एक अभिजात अनुभव
निर्माण केलेला आहे . नायकाचं व्यक्तिमत्व अतिशय गुंतागत
ुं ीचं आहे . सत्तेची, पैशांची लालसा, अहं गड
ं , बहिणीशी
असेलेलं मालकी हक्काचं प्रेम आणि या सगळ्याला व्यापून राहिलेलं आत्मनाशी वत्ृ ती – असे अनेक पैलू असलेला
हा माणूस पॉल म्युनी याच्याकडून दिग्दर्शक हॉक्सनं कौशल्यानं अभिनित करुन घेतला आहे . या त्रस्त समंधाच्या
व्यक्तिमत्वातला निरागसपणा सिनेमाच्या अनेक स्तरांमध्ये भर घालतो . एका प्रसंगात नायकाच्या हातात
पहिल्यांदा मशीनगन आल्यावर त्याचं लहान मल
ु ाला खेळणं मिळाल्यासारखं हरखन
ू जाणं आणि बेछूट गोळीबार
करणं किं वा रे स्तराँमध्ये त्याच्यावर गोळीबार होताना आडवं पडून गप्पा मारणं अशा प्रसंगांतून साहजिकता
(Obviousness) सहज टाळली जाते.

सिनेमातल्या हिंसाचाराचं मंचन अतिशय अस्सल आणि कल्पक असल्यामळ


ु े अंगावर येतं. काही प्रसंगांत हिंसा
आणि विनोद यांचं अनोखं मिश्रण सिनेमाच्या ताजेपणात भर घालतं. वर उल्लेख केलेल्या रे स्तराँमधल्या
गोळीबाराच्या प्रसंगात गोळीबार सुरु व्हायच्या आधी नायकाला कुणाचा तरी फोन येतो . नायक कायम त्याच्या
बरोबर असणाऱ्या त्याच्या नवनियक्
ु त मठ्ठ सेक्रेटरीला फोन घ्यायला सांगतो. तो फोन घेतो तेव्हा गोळीबार सुरु
होतो. मात्र गोळ्यांच्या वर्षावातही हा माणूस चिकाटीने फोनवर बोलत पलिकडच्या माणसाचा निरोप नोंदवण्याचं
काम करत राहतो. हिंसेचे प्रसंग बऱ्याचदा थेट न दाखवता हिंसेच्या तात्काळ परिणामांतन
ू दिसतात . नायक
बहिणीच्या नवऱ्यावर गोळी झाडतो तेव्हा गोळीच्या आवाजाच्या पार्श्वभम
ू ीवर त्याच्या हातातला गळून पडणारा
सिगार दिसतो. नायकाचा मित्र त्याच्या सांगण्यावरुन बॉसला गोळ्या घालतो तेव्हा नायकाच्या बाहे र जाणाऱ्या
पाठमोऱ्या आकृतीवर केवळ गोळ्यांचे आवाज ऐकवून परिणाम साधला जातो.

दृश्यपातळीवर सिनेमा आकार आणि हालचालींचा वाद्यमेळासारखा वापर करतो. नायक विरोधी गँगमधल्या
माणसांना रांगेत उभं करुन गोळ्या घालतो, तेव्हा त्या सगळ्यांच्या फक्त सावल्याच भिंतीवर उमटलेल्या दिसतात
आणि गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. महत्वाच्या प्रसंगांमध्ये वापरलेली काळ्या-पांढऱ्या रं गांतला विरोध ठळक
करणारी, सावल्यांचं प्राबल्य असलेली प्रकाशयोजना नायकाच्या गडद, अस्वस्थ मनःस्थितीचं प्रतिनिधित्व करते.

ब्रायन द पामाने 1983 मध्ये या सिनेमाचा अधिकृत रिमेक केला. स्कारफेसमधल्या मध्यवर्ती घटकांचा
परिणामकारक वापर महे श भट्टच्या ‘साथी’ (1991) आणि काही महिन्यांपूर्वीच्या ‘मुळशी पॅटर्न’मध्येही आढळतो.

You might also like