You are on page 1of 2

थरारपट आणि भयपटांसाठी प्रसिद्ध असेलेल्या दिग्दर्शक जॉन कारपेरन्टरचा

Someone’s Watching Me (1978) हा काहीसा दर्ल


ु क्षित असा सुरुवातीचा सिनेमा. या

सिनेमाचा तोंडवळा थरारपटाचा आहे . नवं आयष्ु य सरु


ु करण्यासाठी लॉस

एन्जेलिसमध्ये भाड्याने फ्लॅ ट घेऊन एकटी रहायला आलेली बाई आणि


तिच्यावर सतत पाळत ठे वणारा, तिला फोन करणारा अज्ञात इसम- ही तशी

नेहमीची वाटणारी कथा. सिनेमात ती उत्कंठापर्ण


ू रितीनं येतेच. पण हा सिनेमा

केवळ तात्परु त्या थरारापरु ता मर्यादित न राहता त्यापलीकडे विस्तारत जातो.

दिग्दर्शक थराराचा वापर साध्य म्हणून न करता साधन म्हणून करतो. उं च

इमारतीनी आकारलेल्या महानगरी अवकाशात अनेकांना भेडसावणारं समह


ू ातलं
एकटे पण, एकाच सामाजिक आणि भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तींमधली

संवादहीनता – अशा एकमेकांत गुंतलेल्या अनेक आशयासूत्रांना व्यक्त


करण्यासाठी दिग्दर्शकानं उत्कंठे चा साधन म्हणन
ू अतिशय कौशल्याने वापर
केलेला आहे .

संपर्ण
ू सिनेमा नायिकेच्या दृष्टीकोनातन
ू घडतो. तिला जेवढं दिसतं आणि ऐकू

येतं, तेवढं च प्रेक्षकाला कळतं. नायिकेचं एकटे पण ठळक करण्यासाठी या मर्यादित

दृष्टीकोनाचा दिग्दर्शक खुबीने वापर करतो. नेमक्या ठिकाणी वापरलेले POV

शॉटस ्, नायिकेची स्वतःशी बोलण्याची सवय, फ्लॅ टमधल्या रिकाम्या जागा- या

घटकांमळ
ु े काँक्रीटच्या अरण्यातलं एकटे पण परिणामकारतेनं व्यक्त होतं.

हा कथानकातले ठळक टप्पे मुद्दाम लांबवणारा ठाय लयीतला सिनेमा आहे .

त्यामुळे प्रेक्षक अधिक सजग राहतो. ‘पुढे काय होणार?’ या उत्सुकतेबरोबरच

नायिकेचं दै नंदिन आयष्ु य, तिच्या आसपासचे अवकाश, त्यात तिचं वावरणं

यातही प्रेक्षकाला रस वाटायला लागतो. थरारपटांमध्ये पात्रांच्या भावनांचा महत्व


नसेल, तर प्रेक्षक त्यांच्याशी भावनिक पातळीवर तादात्म्य पावत नाही, हे नेमकं

ओळखन
ू दिग्दर्शक आणि पटकथाकार जॉन कारपेन्टरनं सरु
ु वातीपासन
ू च याचं
भान राखलेलं आहे .

रॉबर्ट हाउझर (Robert Houser) ची सिनेमॅटोग्राफी कल्पक आणि आशयला परू क

आहे . चोरटं दृष्टीसुख (Voyeurism) ही सिनेमाच्या आशयातली महत्वाची

संकल्पना. सिनेमात सुरुवातीला येणारा टे लिस्कोपचा संथ लयीतला ट्रॉली शॉट ती

कल्पकतेनं व्यक्त करतो. त्यातन


ू सतत पाळत ठे वली जाण्याची आणि त्यातन

येणाऱ्या अस्वस्थतेची जाणीव अधोरे खित होते. एकीकडे एकटे पण आणि दस


ु रीकडे

पाळत ठे वल्याच्या जाणीवेमुळे उध्वस्त होत जाणारा खाजगीपणा अशी


गंत
ु ागंत
ु ीची अवस्था व्यक्त करणारे अनेक शॉटस ् आणि कॅमेऱ्याच्या जागा
सिनेमात आहे त. त्यांना स्वतंत्रपणे ‘सुंदर शॉट’ म्हणून महत्व नाही, तर

सिनेमाच्या एकूण आशयाला सहाय्यक असण्यामळ


ु े ते अर्थपूर्ण आहे त.

ध्वनीरचनाही आशयाला पूरक अशीच. सिनेमात फोनच्या घंटीचा आवाज

एखाद्या ध्रुवपदासारखा वापरलेला आहे . सुरुवातीला सामान्य वाटणारा हा आवाज

क्रमशः नायिकेच्या भीतीचं प्रतीक बनत जातो. नायिकेच्या आयष्ु यावर हळूहळू

नियंत्रण मिळवणाऱ्या बिनचेहऱ्याच्या व्यक्तीची ओळखही याच फोनच्या


आवाजाशी जोडली जाते.

मोजकी पात्रं आणि मर्यादित अवकाशांचा वापर करुन कमी पैशांत उत्कृष्ट
थरारपट कसा बनवता येतो, हे ‘Someone’s Watching Me’ पाहिल्यावर लक्षात येतं.

You might also like