You are on page 1of 1

जपानी दिग्दर्शक हिदे ओ नाकाता (Hideo Nakata) याचा ‘केऑस’( Chaos) हा सिनेमा थरारपटाची व्याख्या

विस्तारणारा आहे . या कथानकाच्या केंद्रस्थानी असलेला फसलेल्या अपहरणाचा विषय अनेक सिनेमांमध्ये अनेक
प्रकारे हाताळून झालेला असला,तरी. ‘केऑस’च्या पटकथेचं वैशिष्ट्यं हे ,की त्यात प्रत्येक पात्राचं आणि घटनेचं खरं
स्वरुप सारखं बदलत राहतं. पटकथेत काळाच्या विविध पातळ्या अतिशय चातुर्यानं गुंफलेल्या आहे त. प्रत्येक
पात्राविषयी प्रेक्षकाच्या मनात विशिष्ट धारणा निर्माण करुन त्या नंतर उध्वस्त करत गेल्यामुळे उत्कंठा वाढत
राहते. काळाच्या पातळ्यांमधले बदल सुचवण्यासाठी दिग्दर्शक कोणंतीही प्रचलित प्रचलित तंत्रं वापरत नाही.
त्यामुळे फ्लॅ शबॅक किं वा फ्लॅ शफॉरवर्ड सुरु झाला आहे हे कधीकधी पटकन कळत नाही . ते न कळणं हा
सिनेमाच्या व्यह
ू ाचा भाग आहे .

दोन पात्रांच्या दिसण्यातला सारखेपणा हा आधारबिंद ू वापरुन दिग्दर्शकानं या सिनेमात मानवी व्यक्तिमत्वाच्या
फसव्या स्वरुपाविषयी सूचक भाष्य केलेलं आहे . कथानकातले महत्वाचे टप्पे येताना ट्रॉली शॉटसच्या कल्पक
वापरातन
ू आवश्यक ती माहिती टप्प्याटप्प्यानं उघड करत नेणं ही हिदे ओ नाकाताची खासियत . त्याच्या
गाजलेल्या’रिंग’ या भयपटातही त्यानं ट्रॉली शॉटसचा असा वापर केला होता. या सिनेमात क्लायमॅक्सच्या
प्रसंगात प्रेक्षकाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा तपशील ट्रॉली शॉटमुळे किती परिणामकारकतेनं समोर येतो ते
पाहण्यासारखं आहे .

पार्श्वसंगीताचा नेमका आणि सूचक वापरही अभ्यसनीय. अगदी मोजक्या प्रसंगामध्ये वापरलेले ड्रमचे हलके
आवाज केवळ प्रसंगाची परिणामकारकता वाढवत नाहीत, तर त्यामुळे एकूण प्रसंगाच्या आशयाला एक वेगळी
मिती जोडली जाते. प्रसंगाचा भाव अधोरे खित करण्यासाठी प्रत्येक प्रसंग वरच्या पट्टीतल्या पार्श्वसंगीतानं बरबटून
टाकण्याची गरज दिग्दर्शकाला वाटत नाही. उलट अनेक प्रसंगांमधली शांतताच उत्कंठा वाढवत नेते. आपल्या
कल्पनाशक्तीला चालना दे ते. कारण आपण कान टवकारुन लहानसहान आवाज लक्षपर्व
ू क ऐकायला लागतो.

‘केऑस’ प्रेक्षकाला थरार अनुभवायला लावतोच.मात्र त्या पलिकडे जाऊन मानवी स्वभावातली अनाकलनीयता
समोर आणतो. असं करताना त्यात कोणताही ढोबळपणा येत नाही, हे महत्वाचं.

You might also like