You are on page 1of 1

शोध- प्रसंगमालिका

1. अमित मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह आहे. तो डॉक्टरला भेटतो आणि त्याची प्रॉडक्टस् प्रमोट करतो.
त्याचा मॅनेजर श्रीकांत मांजरेकर त्याच्या बरोबर असतो.
2. अमित काम संपवून बाईकवरुन घरी चाललेला असतो. वाटेत तो निमिषाला पिकअप करतो. ते
एकत्र फिरतात. जेवतात. गप्पा मारतात. ते साधारण दोन-तीन महिन्यांपासून एकत्र आहेत, असं
त्यांच्या गप्पांवरुन लक्षात येतं.
3. अमित ऑफिसमध्ये आहे. तिथे त्याची मीटिंग असते. ट्रेनिंगसाठी औरंगाबादला जावं लागणार
असल्याचं कळतं. तिथेच श्रियाचं पात्र पहिल्यांदा दिसतं.
4. अमित निमिषाला फोन करतो. दुसऱ्या दिवशी ते भेटायचं ठरवतात.
5. अमित त्याच्या ऑफिसातल्या मित्रांबरोबर गप्पा मारत बसलाय. ते त्याला श्रियावरुन चिडवतात.
6. अमित आणि श्रिया भेटलेत. ते गप्पा मारतातयत. अमित दुसऱ्या दिवशी चार दिवसांसाठी

औरंगाबादला जाणार असल्याचं श्रियाला सांगतो. ती जाण्याआधी काहीतरी गिफ्ट देण्यासाठी म्हणून
जाते. अमित तिची वाट बघतो. पण बराच वेळ झाला तरी ती येत नाही. तिचा फोनही बंद असतो.

You might also like