You are on page 1of 3

निखिलेश चित्रे

कथा

विरुपाक्ष कटावकर बेपत्ता झाला,त्याची कुणी दखलही घेतली नाही.चॅनल्सवर तर


सोडाच,पण तो जिथे राहायचा,तिथल्या "भाईंदर टाईम्स"मधेही त्याच्या नाहीसं होण्याची चार
ओळींची बातमी छापनू आली नाही.
अर्थात,त्यात प्रसारमाध्यमांना दोष दे ण्यात अर्थ नाही.विरुपाक्षच्या मोठे पणाची जाणीव
असलेले फार थोडे लोक आहे त.कारण विरुपाक्ष आयुष्यभर प्रसिद्धी टाळत आला.मराठी
साहित्याला जागतिक पातळीवर नेतील,अशा तीन कादंबऱ्या त्यानं लिहिल्या.मात्र त्यातल्या
दोनच प्रकाशित झाल्या.त्यासुद्धा विरारच्या एका छोट्या प्रकाशनातर्फे .म्हणजे प्रकाशक
माझ्यासारखाच विरुपाक्षचा मित्र होता.खरं तर तो प्रकाशक वगैरे काही नव्हताच.त्याची
सॉफ्टवेअवर कंपनी होती.पण साहित्यावर प्रचंड प्रेम आणि विरुपाक्षच्या विद्वत्तेबद्दल नितांत
आदर.त्यानं विरुपाक्षला प्रेमळ धमकीच दिली की तू जे लिहीशील ते मीच छापणार.विरुपाक्ष
प्रकाशन वगैरे गोष्टींबाबत मुळातच निरुत्साही.त्यातच लिहिलेलं छापलंच पाहिजे असं त्याला
कधीच वाटलं नाही.त्यानं मुकाट्यानं दोन कादंबऱ्यांची हस्तलिखितं मित्राच्या हातात
ठे वली.ती हस्तलिखितंही कशी, तर काही मळकट ए फोर आकाराच्या जाड कागदांच्या
तावांवर लिहिलेली,काही छोट्या चौकोनी वह््यांवर लिहिलेली,तर काही पिवळ्या
हँडबिलांवरची.सगळ्यावर पाठपोट लिहिलेलं मोठं अक्षर.सुवाच्य म्हणता येणार नाही,पण
प्रत्येक कानामात्रावेलांटीला निश्चित व्यक्तिमत्व.त्यांच्या उगमस्थानाशी असलेली प्रखर
बुद्धीमत्ता आणि व्यक्तिमत्वातला पीळ अक्षरातन ू सहज दिसायचा.त्या अक्षरात एखाद्या गुप्त
लिपीचा गढ ू पणाही होता.
तर विरुपाक्षनं कादंबऱ्या छापायला दे ताना एकच अट घातली.प्रकाशन समारं भ करायचा
नाही.कादंबऱ्यांची जाहीरात करायची नाही.खरा वाचक कसाही,कुठूनही त्याच्या
पुस्तकापर्यंत पोहचतोच.पुस्तकही त्याच्या वाचकाला बरोबर शोधत येतं.आपण त्यांच्यामधे
येऊ नये.प्रकाशकानं ते ऐकलं.कादंबऱ्या छापल्या.दोन्ही कादंबऱ्या एका महिन्याच्या अंतरानं
बाजारात आल्या.बाजारात म्हणजे काय,तर प्रकाशकानं स्वतः मुंबई,पुणे,नाशिक,नागपरू
अशा शहरांमधल्या प्रमुख दुकानदारांकडे पुस्तकं ठे वली.खपली तर पैसे द्यायच्या बोलीवर.ती
किती खपली ते दुकानदार आणि प्रकाशकच जाणोत.मात्र त्यांना जे महत्व मिळायला हवं
होतं ते मिळालं नाही.त्या कादंबऱ्यांच्या अनोख्या संरचनेचं,त्यातल्या आशयाच्या अनेक
पातळ्यांचं,आशयानुरुप सहज बदलत जाणाऱ्या विरुपाक्षच्या भाषेचं कौतुक तर
सोडाच त्यावर कुठे चार ओळीही लिहू न आल्या नाहीत.अर्थात मराठी साहित्याच्या या
बेदखलीचा विरुपाक्षवर कणभरही परिणाम झाला नाही.या कादंबऱ्याना मराठी समीक्षक
डोक्यावर घेऊन नाचले असते,तरी झाला नसता."इतरांच्या विचारांपासन ू स्वतःला मुक्त
करणं ही अध्यात्माची पहिली पायरी" असं तो नेहमी म्हणायचा.मला ते पटायचं.पण ते
जगण्यात उतरवण्याची साधना करणं काही जमायचं नाही.त्यावरुन आठवलं,अध्यात्मात
विरुपाक्षला प्रचंड रस.त्याच्या एकूण व्यक्तिमत्वावरुन आणि वागण्यावरुन त्यानं अध्यात्मात
बरीच प्रगती केली असावी,असं मानायला बऱ्यापैकी जागा होती.त्याविषयी पुढे येईलच.
विरुपाक्षची पहिली कादंबरी आकारानं तशी छोटी.म्हणजे छापील एकशेवीस पानांची.पण ती
दुसऱ्या कादंबरीच्या नंतर छापली गेली.त्याला कारणही विरुपाक्षच.या पहिल्या कादंबरीचं
हस्तलिखित अर्धवट होतं.त्यातली मधली पन्नासेक पानं विरुपाक्षला सापडत
नव्हती.त्यामुळे दुसरी कादंबरी त्याच्या मित्रानं आधी छापली.मग ती गहाळ झालेली पानं
अचानक मिळाली.कुठे विचारलं तर विरुपाक्षनं उडवाउडवीची उत्तरं दिली.मला संशय
आला.यानं मुद्दामच ती पानं लपवली की काय?पण त्यानं तसं करण्याचं कारण काय ते मात्र
त्याच्या आयुष्यातल्या इतर अनेक गोष्टींप्रमाणे रहस्यच राहीलं.आता या रहस्यांचा पेटारा
कायमचा बंद झालाय.त्याची चावी फक्त विरुपाक्षकडे आहे .पण विरुपाक्ष कुठे आहे ?
विरुपाक्षच्या कादंबऱ्यांची समीक्षा करण्याचा माझा उद्दे श नाही.कारण लोक मला समीक्षक
म्हणनू ओळखत असले तरी मी काही समीक्षक नाही.शिवाय आज मराठीत जे स्वतःला
समीक्षक म्हणवन ू घेणारे लोक आहे त ते विरुपाक्षच्या कादंबऱ्यांच्या कधी वाटेला जातील असं
मला वाटत नाही.कोणत्याही साहित्यकृतीचा खरा समीक्षक काळ असतो.हे विधान तुम्हाला
भाबडं आणि जुनाट वाटेल पण त्यातलं सत्य तुम्ही नाकारु शकणार नाही.त्यामुळे
विरुपाक्षच्या कादंबऱ्यांची चिकित्सक चिरफाड न करता मी फक्त त्यांचा परिचय करुन
दे णार आहे .
विरुपाक्षनं तीन कादंबऱ्या लिहिल्याचं मगाशी सांगितलं.या तीन कादंबऱ्या म्हणजे त्याची
त्रिसत्र
ू ी आहे .किंवा त्रिवेणी म्हणा हवं तर.मागे कुणीतरी "ट्रिलाॅजी" या इंग्रजी शब्दासाठी
“त्रिपुटी” असा भंपक शब्दही चालवन ू पाहिला.पण सुदवै ानं तो टिकला नाही.असो.तर
विरुपाक्षच्या तीन कादंबऱ्या एकमे कींशी निगडीत आहे त.म्हणजे पहिल्या दोन तरी
आहे त.तिसरी कादंबरी अप्रकाशित आहे .तिचं हस्तलिखितही मी वाचलेलं नाही.ते कदाचित
विरुपाक्षसहित बेपत्ता झालं असावं.पण विरुपाक्षनं ही तिसरी कादंबरी लिहिल्याचं मला स्पष्ट
सांगितलं होतं.ती पहिल्या दोन कादंबऱ्याशी जोडलेली असल्याचंही सांगितलं होतं.मात्र ती
वाचायला मागितल्यावर तो गढ ू हसला आणि त्यानं विषयच बदलला.ही त्याची नेहमीची
सवय.तो एखाद्या विषयावर अत्यंत तन्मय होऊन बोलायचा.ऐकणारा त्यात रं गन ू जायचा
आणि विरुपाक्ष फटकन विषय बदलन ू भलत्याच विषयाकडे जायचा.त्याला पहिल्या विषयाची
आठवण करुन दिली तर तिथे धर्तू पणे दुर्ल क्ष करायचा.थोडक्यात काय,तर ती तिसरी
कादंबरी कशी आहे आणि कुठे आहे हे कुणालाच माहित नाही.विरुपाक्षनं या कादंबऱ्यांना
दिलेली नावंही अजब आहे त.इथे “अजब” हा शब्द मी विशेषण म्हणन ू नव्हे ,तर विशेषनाम
म्हणनू वापरतोय.म्हणजे पहिल्या कादंबरीचं नाव“अ”,दुसरीचं”ज”आणि तिसरीचं
“ब”.विरुपाक्षनं ही नावं मला पहिल्यांदा सांगितली तेव्हा मी बुचकळ्यात पडलो.आता दोन
कादंबऱ्या वाचल्यावर या नावांचा थोडा उलगडा झाल्यासारखा वाटतोय.
पहिल्या कादंबरीचा नायक एक लेखक आहे .त्याचं नाव वाचकाला कधीच कळत नाही.हा
लेखक एका ध्यासानं पछाडलेला आहे .त्याला गुणाढ्यानं सातव्या शतकाच्या आसपास
लिहिलेल्या पैशाची भाषेतला बढ्ढकहा किंवा बहृ त्कथा हा लुप्त ग्रंथ शोधन
ू काढायचा आहे .या
वेडानं पछाडून हा लेखक मुंबईपासनू काश्मीरपर्यंत भटकतो.

You might also like