You are on page 1of 2

सोहराब सेपहरी (Sohrab Sepehri) या इराणी कवीच्या ‘मन नमी दानम (‫ ’)من نمی دانم‬या इराणी

कवितेचा मराठी तर्जुमा करण्याचा प्रयत्न

मला नाही माहित

लोक घोड्यांना का म्हणतात ऐटबाज आणि कबुतरांना सुंदर

आणि गिधाडांना का ठेवत नाहीत पिंजऱ्यात

आणि लाल ट्यूलिपच्या फु लापेक्षा का कमी लेखतात

गवतफु लाला

डोळे धुवायला हवे स्वच्छ

जगाकडे पहायला हवं

वेगळ्या नजरेनं

धुवून काढले पाहिजेत शब्द

शब्दच झाले पाहिजेत वारा

शब्दच पाऊस

मिटू न ठेवायला हव्यात छत्र्या

आणि भिजायला हवं थेट पावसात

भिजताना आपलं मन आणि आठवणीही व्हायला हव्यात ओल्यागार

अनुभवायला हवा पाऊस

शहरातल्या प्रत्येकाने प्रत्येकासह

सापडायला हवेत मित्र

शोधायला हवं प्रेम

पावसाखाली

करायला हवा संग


आणि खेळायला हवे खेळ पावसाखाली

लिहायला हवं वस्तूंबद्दल

उच्चारायला हवेत शब्द

लावायला हवं रोप

आयुष्य म्हणजे सतत संपृक्त होत जाणं

आयुष्य म्हणजे सतत पोहत राहणं

या क्षणाच्या तळ्यात

चला उतरवून ठेऊ कपडे

पाणी आहे फक्त एका पावलाच्या अंतरावर

चला चाखून पाहू प्रकाशाची चव.

- सोहराब सेपेहरी

You might also like