You are on page 1of 29

हिमालयाच्या वाटे वर – भाग -1 - लेखांक -1

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू

लेखांक - 1 ला- अन्तःस्फूर्ती (हिमालयाची ओढ)

लिखाण करणं हा खरं तर माझा पिंड नव्हे . पण न राहवन ू असं ठरवलं की यावेळच्या उत्तराखंड ट्रिपचं वर्णन, आलेले
अनभ ु व, भेटलेल्या लोकांचं आणि भेट दिलेल्या वेग वेगळ्या ठिकाणांचं प्रत्यक्ष दर्शन हे शब्दात मांडावं. कारण या
भागात भेट द्यायची म्हणन ू निवडलेली बरीच ठिकाणं ही असामान्य, अज्ञात किंवा unexplored होती. अशा
पर्यटनस्थळ म्हणन ू प्रसिद्ध नसलेल्या आणि तिथे गेल्यावर वेगळी कथा सांगणाऱ्या जागा मला आवडतात.

त्या भागात असलेला प्रत्येक दगड न दगड, प्रत्येक झाड न झाड हे तिथे घडलेल्या ऐतिहासिक / पौराणिक
गोष्टींची साक्ष दे त असतात. आमच्या या ट्रीप मधली काही ठिकाणं अशी होती, जी फक्त पस् ु तकात वाचन ू आणि
नंतर गग ु ल वरून तिथली माहिती काढू न शोधायची ठरवली. ऑफ सिझन आणि कोरोना चा प्रभाव याम ळ
ु े तशीही
फार गर्दी आम्हाला लागणार नव्हतीच हे गह ृ ीत होतं. पण लॉकडाउन नंतरची मोठी ट्रिप असल्यामळ ु े ती
नियोजितंच असावी असा आग्रह होता.

उत्तराखंडात येण्यामागची प्रेरणा म्हणजे मी नकु तंच वाचलेलं ‘Autobiography of a yogi’ हे परमहं स योगानंद
यांनी लिहिलेलं पस्
ु तक, जे मला Ganesh Rasal याने वाढदिवसाला भेट दिलं होतं. त्याला फोन करून जेव्हा
सांगितलं मी इकडे चाललोय तेव्हा तो म्हणाला “मी प्रत्येक मित्राला वाढदिवसाला हे पस्
ु तक दे त असतो, तू असा
पहिला मित्र आहे स जो हे वाचन ू उत्तरखंडातल्या, हिमालयातल्या त्या ऐतिहासिक जागांना भेट द्यायला म्हणनू
चालला आहे स”. उगाचच भारी वाटून गेलं त्याचं हे बोलणं ऐकून, पण खरच प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे
पस्
ु तक आहे . जगातल्या सर्वोत्तम आठ अध्यात्मिक पस् ु तकांमध्ये याची गणती होते.

आता मळ ु तक या ट्रिप ची प्रेरणा होईल किंवा मी कधी उत्तराखंड ला ट्रिप करे न असं उभ्या जन्मात मला
ु ात हे पस्
कधी वाटलं नव्हतं. पण हे पस्
ु तक वाचल्यावर मात्र असं झालं की कोणी नाही आलं तरी चालेल एकटं जाऊन
explore करायचं.

खरतर हे अध्यात्म, योग, साधना, अतींद्रिय पराशक्ती, क्रिया योग, शक्तिपात कंु डलिनी योग, सिद्धयोग या
शब्दांशी माझी ओळख ही कै. डॉ. जी के प्रधान यांच्या 'साद दे ती हिमशिखरे ' या पस् ु तकातन ू जवळपास 10 वर्षांपर्वी

पहिल्यांदा झाली होती.. त्यानंतर जगन्नाथ कंु टे यांच्या ‘प्रकाशपत्रु ’, ‘साधनामस्त’, ‘कालिंदी’, आणि ‘नर्मदे हर’ ही
ु तकं किंवा स्वामी राम याचं ‘हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात’ हे पस्
पस् ु तक वाचल्यावर त्याबद्दल बरीच
माहिती मिळाली आणि तेव्हापासन ू च हिमालय आणि तेथ े अने क दशकां पासनू किंबहुना शतकांपासन
ू साधना
करणारे यती, साध,ू तपस्वी यांच्या बद्दल एक उत्कंठा निर्माण झाली होती.

तसं यापर्वी
ू आपलं अध्यात्म हे श्री दत्त उपहार गह ृ च्या खिचडी ने चालू होऊन नवनाथ रसवंती गह ृ च्या जम्बो
ग्लास ने संपायचं 😃 . पण हळू हळू मला या अशाच पस् ु तकांमध्ये कधी इंटरे स्ट वाटू लागला हे मलाच कळल
नाही. तसा मी फार धार्मिक वैगेरे कधी नव्हतो. अजन ू ही घरी दे वाची पज ू ा पण माझ्याकडून रोज होत नाही. बाबा ती
जबाबदारी घेत असल्यामळ ु े मी फार कधी लक्षही दिलं नाही. घरी दत्तभक्ती पिढ्यांपासनू होतीच त्यात बाबांची
आत्तापर्यंत असंख्य गरु
ु चरित्र आणि श्रीपाद वल्लभ चरीत्रामत ृ ाची पारायणं झाली आहे त, आईलाही ज्या ठिकाणांना
पौराणिक महत्व आहे अशा जागांना भेट दे ण्याची आवड आहे आणि लहानपणापासन ू च स्वामीसमर्थ सारामत ृ ,
नवनाथ भक्तीसार, शिवलीलामत ृ , रामायण, महाभारत या ग्रं
थ ां मधल्या गोष्टी ऐकण्याची सवय असल्याम ळ
ु े
कदाचित या अशा अध्यात्मरोचक पस् ु तकांची मला गोडी लागली. आणि त्यात मागच्या काही दिवसात हे पस् ु तक
वाचनात आलं
तर अगदी थोडक्यात सांगायचं तर ‘Autobiography of a yogi’ किंवा ‘योगी कथामत ृ ’ (अनव ु ादित) या
पस्ु तकातला Chapter 34 म्हणजे "Materializing a Palace in the Himalayas" मधे क्रियायोगाचे आद्य
प्रवर्तक महाअवतार बाबाजी यांनी शामाचारण लाहिरी महाशयांना क्रिया योगाची कलियग ु ातली पहिली दीक्षा
1861 साली हिमालयातील द्रोणाचल पर्वत रांगांमधील द्रोणागिरी पर्वतावर असलेल्या एका गह ु े त दिली.

लाहिरी महाशय हे बंगाल मध्ये British Army Headquarters मध्ये काम करत असताना त्यांना ट्रान्स्फर ऑर्डर
येते की त्यांची बदली उत्तराखंड येथील रानीखेत येथे झाली आहे . तिथे आल्यावर कामा व्यतिरिक्त चा वेळ ते
हिमालयातील वेग वेगळ्या पर्वत रांगांमध्ये भटकंती करण्यात घालवत.. अशाच एका सट ु ी च्या दिवशी ते फ़िरत
फिरत द्रोणागिरी पर्वतावर आले आणि आपल्या नावाने कोणीतरी हाक मारताय अशी चाहूल त्यांना लागली.. त्या
आवाजाच्या दिशेने पढ ु े चालत गेल्यावर त्यांना एक 25 वर्षाचा लांब सडक काळे भोर केस असलेला तरुण दिसला
जो त्यांना एका गह ु े त घेऊन गेला.. गोंधळात पडलेल्या लाहिरी महाशयांना हे काय घडतंय याचा काडीमात्र पत्ता
नव्हता. तो 25 वर्षांचा तरुण त्या गह ु े त लाहिरी महाशयांना एका आसनावर बसवतो आणि त्यांच्या पर्व ू
आयष्ु याबद्दल काही आठवतंय का असा प्रश्न करतो. आता हा माणस ू कोण? याला आपलं नाव कसं ठाऊक?
हिमालयातल्या द्रोणागिरी च्या घनदाट जंगलातल्या एका गह ु े त हा आपल्याला आणन ू हे असं का विचारतोय
अश्या अनेक प्रश्नांचं काहूर डोक्यात माजलेल्या लाहिरी महाशयांच्या मनात दस ु रा काहीच विचार येईना..
तेवढ्यात हा तरुण लाहीरींच्या भ्रम ू ध्यावर बोट ठे वतो आणि त्यांना पर्व ू जन्मीचं ज्ञान होतं ज्यात त्यांना कळतं ते
पर्व
ू जन्मात याच जागेवर साधना करत असत आणि हा 25 वर्षांचा तरुण म्हणजे त्यांचे जन्म जन्मांतरीचे गरू ु
महा अवतार बाबाजी चं होत.

हे ज्ञान झाल्यावर शामाचरण लाहीरींना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.. रानीखेत ला झालेली त्यांची
बदली हा योगायोग नव्हता तर ते विधिलिखित होतं. क्रिया योगाची दीक्षा दे ण्याआधी लाहीरीमहाशयांची
गतजन्मीची स्वर्णमहाल/ राजवाड्यातलं एखाद्या राजाला शोभेल असं विलासी जीवन जगण्याची वासना महावतार
बाबाजींना पर्ण
ू करायची होती.. बाबाजींनी त्यांच्या मनःशक्ती ने द्रोणागिरी वर सव ु र्ण महालाची निर्मिती केली
ज्याचं वर्णन पस्
ु तकात वाचल्यावर त म्
ु हाला महाभारतातल्या मयसभे च ी आठवण करून दे ईल.

रत्नखचित सिंहासनावर बसवन ू लाहीरींच्या या इच्छे ची पर्त


ू ता केल्यावर मनःशक्ती ने उभारलेला तो महाल
तत्क्षणी नाहीसा झाला आणि त्याच गफ ु े मध्ये लाहिरी महाशयां ना क्रियायोगाची दीक्षा दिली गेली. असं म्हणतात
या बाबाजींचं वय हे 2000 वर्षांहूनही जास्त आहे आणि अजन ू ही ते 25 वर्ष वयाचे दिसतात. येशू ख्रिस्त,रामकृष्ण
परमहं स, परमहं स योगानंद, यक् ु तेश्वर स्वामी, स्वामी विवेकानंद, एवढच नव्हे तर आत्ताच्या काळातील साऊथ
सपु र स्टार रजनीकांत असे काही या बाबाजींचे शिष्य होत..

शैव आणि शाक्त परं परे प्रमाणे क्रिया योगाची पहिली दीक्षा ही शंकराने पार्वती ला दिली, पार्वती ने मरुु गन
म्हणजेच कार्तिकेय ला दिली, कार्तिकेय ने ती अगस्ती ऋषींना दिली आणि अगस्ती ऋषीं नी पढ ु े ती महावतार
बाबाजींना दे ऊन पढ
ु े कलियगु ातली या दीक्षेची सरु वात ही बाबाजींनी लाहिरी महाशयांना दिली तेव्हा झाली..

पण वैष्णव परं परे प्रमाणे हि क्रियायोग दीक्षा कृष्णा ने अर्जुनाला, आणि पढ ु े जो वेदांमध्ये प्रथम परु ु ष म्हणनू
संबोधला जातो अश्या ‘मन’ू ला, ‘मन’ू कडून पढ ु े ‘जनक’ राजाला आणि पढ ु े अनेक ऋषी मन ु ींना दे ण्यात आली.
परमहं स योगानन्दांच्या मते कृष्णाकडून अर्जुनाकडे भगवत गीते मार्फ त आलेला क्रियायोग हा प्राचीन भारतात
प्रसिद्ध होता पण तो पढ ु े परु ोहित गप्ु तता आणि माणसांमध्ये कालानप ु रत्वे आलेली उदासीनता यामळ ु े लोप
पावला.
या योग पद्धति मध्ये प्राणायामाचे अनेक स्तर असतात जे अशा तंत्रज्ञानावर आधारित असतात ज्यांचा उद्दे श
अध्यात्मिक विकासाच्या प्रक्रियेला गती दे णे हा आहे . अशा प्रकारे क्रिया योग हा ईश्वरबोध, यथार्थ ज्ञान आणि
आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठीची वैज्ञानिक प्रणाली आहे .

वर नमद ू केलेली ही क्रिया, मानवी मन , बद्


ु धी , शरीर, आणि प्राणशक्ती यांची सांगड घालन
ू तांत्रिक पद्धतीने
होणे यालाच क्रिया योग असं म्हणतात.

पस्
ु तकातला हा भाग वाचल्यावर मला पहिल्यांदा असं झालं, ‘बॉस इथे जायला पाहिजे’. खरच हे सगळं घडलं असेल
का? काय गढ ू असेल या सगळ्यामागे? ज्या गोष्टी, अनभ
ु व, चमत्कार हे मर्त्य माणसाच्या बद्
ु धीला अतर्क्य
वाटतात त्या खऱ्या असतील का? आणि जर हे सगळ जसं लिहिलंय तसं घडलं असेल तर द्रोणागीरीचं ते जंगल
तिथले वक्ष
ृ , दगड आणि तिथली माती, या सगळ्या अतर्क्य चमत्कारांची साक्षीदार आहे . आणि तेव्हा ठरवलं
जायचंच..

ROC Annual Filing ची शेवटची तारीख ही पढ ु े गेल्यामळ


ु े client companies चं ते कामही पढु े गेलं होतं, ट्रिप
प्लॅ न करायची असेल तर ते काम मला वेळेत संपवण गरजेचं होतं.. रोजची कशीबशी 4 तास झोप घेऊन सगळं
काम ड्यू डेट च्या आत पर्ण
ू केलं आणि ट्रिप च प्लॅ निगं करायला सरु ु वात केली.. जनरल एक विचार आला केतन
ला विचारून बघ.ू . हो म्हणाला तर ठीक नाहीतर एकटा जीव सदाशिव.

निवेदिता उत्तराखंड ला आधी येऊन गेली असल्यामळ ु े आणि ती नक


ु तीच असीम च्या कामासाठी काश्मीर चा दौरा
करून आली असल्यामळ ु े तिच्या येण्याचा प्रश्न नव्हता. शिवाय तिथल्या अनेक ठरवलेल्या जागा या अज्ञात आणि
घनदाट अरण्यात असल्यामळ ु े जीव धोक्यात टाकून घरच्या कोणालातरी तिथे बरोबर घेऊन जाणं मला शक्य
नव्हतं. Cma Ketan Kari हा माझा ११ वी पासन ू चा हक्काचा मित्र. केतन ला फोन केला. त्याला तिथल्या
जागांची आणि वन्य पशच ंू ा धोका पत्करून त्या बघायच्या आहे त याबाबत आधीच कल्पना दिली. भाऊ एका
पायावर पढु चा मागचा विचार न करता तयार झाले. "तू आहे स ना मग टे न्शन नाही" ऐकलं आणि एकदम भारी
वाटून गेल.ं

15 दिवसाची टूर ठरवली. उत्तराखंड मध्ये 2 मळ ू क्षेत्र आहे त गढवाल आणि कुमाऊ आम्हाला दोन्ही शक्य तितकी
बघायची होती.. काही अज्ञात ठिकाणं बघायची असल्यामळ ु े त्यासंदर्भात अभ्यास सरुु केला काही ठिकाणं
पस्
ु तकात वाचलीच होती ती आम्ही नक्की केली. रुद्रपरू ला माझी मावस बहीण राहते.. तिचे मिस्टर Yogesh
Lamba कंपनी च्या कामानिमित्ताने इथे गेली ४ वर्ष आहे त, त्यांना फोन केला म्हटलं या तारखा आहे त, माहीत
असलेली ही अशी ठिकाणं बघायची आहे त बाकी तम् ु ही सांगा या 15 दिवसात काय आणि कसं करता येईल.. 2
दिवसांनी excel sheet सकट फोन आला त्यात नैनिताल, भीमताल, कैं ची धाम - निम करोली आश्रम, रानीखेत,
द्वारहाट, कुकुचिना, द्रोणागिरी, कौसानी, रुद्र्धारा, जागेश्वर, दारूकावन, मक् ु तेश्वर, हरिद्वार, ऋषिकेश, तपोवन,
हलद्वानी, राम नगर, काठगोदाम आणि जिम कोर्बेट असा प्लॅ न ठरला.

त्यांना विचारलं तिथे गाडी भाड्याने घेता येईल का?. म्हणाले त्याची गरज नाही माझी Baleno घेऊन जा..
स्वतःची गाडी आणि उत्तराखंड पासिंग असेल त्यामळ ु े तम्
ु हाला बरं पडेल.. आणि कोणी अडवणारही नाही. बास
बास.. याहून मोठा आनंद नव्हता.. 15 दिवसासाठी माझी कार घेऊन जा असं म्हणताना त्यांनी एकदाही पन् ु हा
विचार केला नाही. प्रामाणिकपणे मी जर त्यांच्या जागी असतो तर दहा वेळा विचार केला असता..

पण उत्तराखंड च्या रस्त्यांवरून ड्राईव्ह करत सगळीकडे फिरता येणार हा आनंद आईच्या बोलण्याने थोडा
मावळला.. ती तिच्या काही मैत्रिणींबरोबर मागच्या वर्षी इथे आली होती.. “रस्ते फार अवघड आहे त. आपल्याला
त्या रस्त्यांची सवय नाही. भयंकर सिंगल रोड, एक बाजल ू ा दरी, दरड कोसळण्याची भीती, वातावरणातल्या सतत
च्या बदलामळ ु े रस्त्यांवर होणारा परिणाम.. पहाडा मधल्या रस्त्यांचा आपल्याला अंदाज नाही, आपली शहरी
भागात चालवायची सवय तिकडच्या लोकांना पहाडी इलाख्यात गाडी चालवायची सवय त्यामळ ु े ट्रॅ फिक चा अंदाज
नाही लोकांच्या गाडी चालवण्याच्या तऱ्हा माहित नाहीत त्यात एवढा मोठा पल्ला ज्यात रात्रीचं ड्राइविंग पण करावं
लागू शकत आणि तेही जंगलातन ू . आणि त्यात तू एकटा आहे स गाडी चालवणारा त्यामळु े एकदा विचार कर..’

या 15 दिवसात जवळपास 1250 km कार ड्राईव्ह होणार होतं.. मी आईचं फक्त ऐकलं.. आता मला मौज यातच
होती की ड्राईव्ह करत जायला मिळणार.. उत्तराखंड कार ड्राईव्ह करत explore करण्याची हि संधी मी सोडली
असती तर माझ्यासारखा वेडा मीच होतो.. आईची काळजी रास्त होती कारण त्यांना त्यांच्या प्लॅ न मधली 3
ठिकाणं ही खराब हवामानामळ ु े आणि सिंगल रोड वर झालेल्या land slide मळ
ु े रद्द करवी लागली होती..
शिवाय आमच्या तिकीट बकि ु ं ग च्या एक महिना आधी इथे हिमनग फुटून वाहत आलेल्या जोरदार प्रवाहा मध्ये
जोशी मठ जवळचा बराचसा भाग तिथे काम करत असलेल्या माणसांसहित वाहून गेला होता. वास्तविक माझ्या
ओळखीत self-driven कार घेऊन या ठिकाणी गेलेलं कोणीच नव्हतं. सगळ्यांनीच खाजगी गाड्या आणि तेही
driver सकट बक ु केल्या होत्या..

आता माझी इच्छा आणि तिथली परिस्थिती यामध्ये इच्छे ने उचल खाल्ली आणि म्हटलं आता ड्राईव्ह करतच
जायचं. बकिु ं ग झालं दिल्ली पर्यत flight बकि
ु ं ग होतं. ऋषिकेश ला adventure sports मध्ये गंगा नदीतलं
राफ्टिं ग आणि बन्जी जम्पिंग याचंही इथन ू च बकिु ं ग झालं.. हॉटे ल्स मात्र आम्ही इथन
ू बक
ु केली नव्हती.
आयत्यावेळी जे चांगलं वाटे ल ते फायनल करू असा विचार होता. ऑफिस ची कामं संपली होतीच त्यामळ ु े त्याचा
ताण नव्हता.

जाण्याच्या आदल्या दिवशी पण् ु यातल्या वासद ु े व निवास मधे गेलो नमस्कार केला प्रवासाचा आढावा सांगितला,
“शभ
ु स्ते सन्त ु पं
थ ान:” तिथनू आशीर्वाद घे तला

तिथन ू तसाच शंकर महाराज मठात गेलो नमस्कार केला.. "परत आणा" एवढं च म्हणालो आणि घरी येऊन बॅग
भरायला लागलो. द्रोणागिरी पर्वत, रुद्र्धारा, दारुकावन आणि तपोवन ह्या ठिकाणांचा जंगल ट्रे क होता त्यामळ ु े
सगळ्या ट्रे क साठी लागणाऱ्या गोष्टी कपडे वैगेरे आणि 15 दिवसांची बॅग भरून तयार झाली.. पढ ु च्या दिवशी
दप
ु ारी 4.30 ची flight होती.. जाई जाई पर्यंत ऑफिस ची 2 वाढीव कामं लागली.. निवेदिता ला म्हं टल आता बघ
त.ू . लॅ पटॉप ऑन करायची ही इच्छा नव्हती. मी आधीच मनानी उत्तराखंड ला पोहोचलो होतो..

क्रमशः

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu

पण
ु े

Ph: 9881999034

© ALL RIGHTS RESERVED ©

Please visit - facebook profile - for watching related photos and videos

#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#Travelblog
#facebookblogger

हिमालयाच्या वाटे वर – भाग -1 - लेखांक 2

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू

लेखांक - २ रा – सती-अश्रच
ंु े ‘नैनिताल’

आम्ही 8.30 ला दिल्ली ला पोहोचलो. पढ ु ं ग करून ठे वलं होतं. सकाळी 6 ला


ु च्या दिवशीच्या शताब्दी चं बकि
निघनू ती आम्हाला 10 पर्यंत रुद्रपरू ला पोहोचवणार होती. रुद्रपरू ला योगेशजी स्टे शन वर घ्यायला आले. आम्ही
घरी पोहोचन
ू फ्रेश झालो, बॅग्स कारमधे टाकल्या, साधारण 2.30 वाजले असतील आम्ही निघालो नैनिताल ला
जायला.. नैनितालचा सरु वातीचा 30 किमी पर्यंत चा रस्ता नॉर्मल आहे . त्या रस्त्याने पढ ु े जाताना मधे राम नगर
आणि नंतर जिम कॉर्बेट चं टायगर रीझर्व लागतं.. जंगलातला रस्ता आहे .. तिथे driving ची मजा वेगळीच.
मोबाईलमधे, सिद श्रीराम, रे हमान, हरिहरन, शंकर एहसान लॉय, अजय अतल ु भरून ठे वले होतेच त्यात परत
साऊथ च्या यनि
ु क गाण्यांचा तेलग,ू तामिळ, मल्याळम.. तिन्ही भाषांमधला अल्बम होता. गाडीला ब्लु टूथ आणि
स्वतःच GPS होत त्यामळ ु े फोन मध्ये मॅप्स लावावे लागले नाहीत..

गाडीचा अंदाज घेतला. माझ्यासाठी हाताळायला baleno नवीन असल्यामळ ु े पहिला अर्धा तास गाडी हातात
बसवणे हा struggle होता.. जिम कॉर्बेट च्या रस्त्यावर नैनिताल च्या वाटे वर पहिला कमाल अनभ ु व म्हणजे
जंगलातल्या झाडीमधन ू रस्त्यावर काही कोल्हे आणि रानड ु करं हे पाळीव प्राणी असल्यासारखे इकड ू न तिकडे
बागडत होते .. केतन ला आधी ती साधी कुत्री आणि लोकल डुकरं वाटली.. 😊 गाडी थांबवन
ू नीट बघितल्यावर ते
कोल्हे चं आहे त याची खात्री झाली.

काही अंतर पार केल्यावर घाटाचा रस्ता. नैनिताल हे तिथलं हिल स्टे शन आहे त्यामळ ु े तिथले सगळे च रस्ते
घाटाचे. थोड पढ ु े गेल्यावर कळलं एक मोठा ट्रक बंद पडलाय. जेम तेम दोन गाड्या अगदी एकमेकांना घासन ू जाऊ
शकतील असा रोड. त्यात ट्रक बंद पडलेला आम्हाला वाटलं आता रात्र होतीये इथेच. थोड्याच वेळात बंद पडलेल्या
ट्रक च्या दिशेने एक आर्मी ची van येताना दिसली. डेरिग ं करून त्या Van च्या मागे गाडी घालनू बराच ट्रॅ फिक जॅम
ओलांडून पढ ु े आलो. चक ु ीचं होतच ते, पण पर्याय नव्हता पटकन गर्दीतन
ू गाडी काढली आणि गाडीने मोकळा श्वास
घेतला. जरा स्पीड वाढवला, एकंदरीत संपर्ण ू प्रवासात एक गोष्ट लक्षात आली, इथलं PWD काम करतं. काय
मक्खन रस्ते आहे त सगळे . आणि एकही टोल नाही. फक्त घाट वळणं जरा अवघड आहे त आणि रस्ते बऱ्याच
ठिकाणी अरुं द आहे त एवढं च. आम्ही साधारण संध्याकाळी 5 वाजता नैनिताल ला पोहोचलो. गाडी एका पेड
पार्किं ग स्लॉट मध्ये लावली आणि नैनिताल च्या मख् ु य तलावात कायाकिंग केलं.

नैनिताल हे मळ ु ात शक्तीपीठ आहे . आदिशक्ती सती मातेचे डोळे या ठिकाणी पडले अशी आख्यायिका आहे . त्या
डोळ्यामधल्या अश्रम ंू ळ
ु े इथे 9 तळ्यांची (ताल) उत्पत्ती झाली म्हणन
ू याचं नाव नैनिताल असं पडलं. नैनिताल मधे
प्रवाशांची प्रचंड वर्दळ होती. संध्याकाळी 7 वाजता नैनादे वी आणि शंकराची आरती इथल्या मंदिरात होते. आरती
म्हणजे एक प्रकारचा सोहळाच असतो तो. आरती करून आम्ही तिथल्या प्रसिद्ध मॉल रोड वर फिरत होतो. भरपरू
खरे दी केली. तिथे सगळीकडे पायीच हिंडावं लागतं, सगळी खरे दी घेऊन साधारण 9 वाजता गाडीजवळ आलो
dickey त समान टाकलं आणि लक्षात आलं हा पार्किं ग वाला मॅन पार्किं ग बंद करून साखळ्या लावन ू निघन

गेलाय. झालं. आता आली का पंचाईत.. तिथन ू गाडी काढणं शक्य नव्हतं. आम्ही तिथेच गाडी ठे ऊन जेवायला गेलो
आणि येता येता हॉटे ल बघू असं ठरवलं. बेक्कार थंडी आणि त्यात प्रवासामळ ु े पाय प्रचंड बोलायला लागलेले.
जेवण झाल्यावर पर्ण ू नैनिताल च्या रोड वर हॉटे ल शोधत फिरत होतो. सगळी हॉटे ल्स booked होती. आता मात्र
त्राण राहिले नव्हते. आम्हाला कोणीतरी सांगितलं बऱ्याच वरती काही हॉटे ल्समधे कदाचित तम् ु हाला रूम मिळू
शकतील. पण तिथेही चालतच जावं लागणार होतं करण गाडी काढणं शक्य नव्हतं. आम्ही गाडीजवळ आलो
गाडीत बसलो सीट आडवी केली आणि गाडीतच झोपायचं ठरवलं. त्यात प्रचंड दमलेले असल्यामळ ु े सगळ्यात
आधी ज्याला झोप लागेल तो नशीबवान होता कारण मग एकाच्या घोरण्यामळ ु े दसु ऱ्याला झोप नाही. यावेळी मी
unlucky होतो. केतन ला पडल्या पडल्या झोप लागली. संपलं 3 वाजेपर्यंत झोप नाही एक याच्या घोरण्यामळ ु े
आणि दस ु रं म्हणजे हा पार्किं ग बंद करून गेलेला माणस ू उद्या वेळेत आला नाही तर काय या tension ने. नंतर
उशिरा थोडा डोळा लागला. मग दोघांची घोरण्याची जग ु लबंदी सरु
ु झाली😄 . आम्हाला पढ ु च्या दिवशी सकाळी 6
ला निघणं गरजेचं होतं तरच आम्ही पढ ु च्या डेस्टिनेशन ला वेळेत पोहोचणार होतो. आता हा पार्किं गवाला पण 6
ला येतो की नाही याची शाश्वती नव्हती.. 6 चा अलार्म झाला. आडवं तिडव झोपन ू पाठ गेली होती.

गाडी बाहे र येऊन बघतो तर आमचं वेड पळालं . गाडी पढ ु े जो लोखंडी खांब साखळ्यांना धरून उभा होता तो
कोणीतरी उखडल्या सारखा खाली पडलेला दिसला. अक्षरशः चमत्कार, कारण हे सगळे खांब तिथल्या जमिनीत
व्यवस्थित सिमें ट ने फास्टन्ड केले होते. हा रातो रात असा कसा पडला.. बर आमच्या शेजारच्या गाड्या
तश्याच होत्या आणि त्यांच्या मागच्या गाड्या आमच्या गाड्या हल्ल्या शिवाय पढ ु े जाणं शक्य च नव्हतं. मी आणि
केतन पर्ण
ू बावचळलो. दोघांना अजन ू ही हे गढ
ू आहे की हे झालं तरी कसं? 15 मिनिटं आम्ही यावरच विचार
करण्यात घालवली, कारण आदल्यादिवशी तो खांब निघू शकतोय का हे पाहण्यासाठी शक्तीप्रयोग करून झाले
होते. पण त्याचा काहीच फरक पडला नव्हता. कुठला मोठा आवाज झाला नाही किंवा अगदी शेजारचे दोन्हीकडचे,
आजब ू ाजचू े खांब पण शाबत
ू होते. “आपल्या घोरण्याच्या आवाजामळ ु े पडला असेल रे खांब” अतिशय पांचट विनोद
मी मारला त्यावर अतिशय भावरहित चेहेरा करून केतन नं माझ्याकडे बघितलं 😄 . मनापासनू त्याच्या जिव्हारी
ते लागलं असावं ते. 😄 नंतर फार विचार न करता साखळ्या केतन न पायाखाली दाबल्या आणि मी गाडी काढली.

जवळच्या एका हॉटे ल मध्ये फ्रेश झालो आणि लगेच निघालो कैन्चीधाम ला जिथे निम करोली बाबां चा आश्रम
आहे . रस्त्यात एका टपरीवर कॉफी ला थांबलो. नैनिताल चा सर्यो ू दय होताना बघणं म्हणजे जन्नत. उगाच
उत्तराखंड ला दे वभम
ू ी म्हणत नसावे त. कॉफी सं
प वनू त्या दै वी रस्त्यां वरून पढ
ु े निम करोली आश्रमाच्या दिशेने
निघालो.

ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी- ‘निम करोली बाबा’ हे नाव त्यांच्या विदे शी भक्तांमळ
ु े जास्त लोकप्रिय आहे . हे
तिथले प्रख्यात संत, चमत्कारी सिद्ध योगी परुु ष आहे त जे हनम ु ानाचे अवतार समजले जातात.ज्याचं मळ ू नाव
‘लक्ष्मीनारायण शर्मा’ होतं. संसारात असताना या आश्रमाच्या ठिकाणी आल्यावर त्यांना वैराग्य आलं आणि ते
इथेच सगळं सोडून राहायला आले.

त्यांच्या शिष्यांपक
ै ी मोठी नावं सांगायची झाली तर Apple कंपनी चा स्टीव्ह जॉब्स. त्याला या बाबांच्या आश्रमात
enlightenment झाली. निम करोली बाबांना सफरचंद आवडत. तर प्रसाद म्हणन ू स्टीव्ह जॉब्स इथे सफरचंद
घेऊन आला आणि बाबांनी त्याचा एक घास चावन ू त्याला उरलेलं सफरचंद प्रसाद म्हणन ू दिलं त्यावरून स्टीव्ह
काकांना Apple चा लोगो सच ु ला असं इथले लोक म्हणतात. तिथ न
ू पढु े त्याची एवढी भरभराट झाली की apple
कंपनी अजन ू ही फोन्स आणि इतर electronic gadgets मधली एक leading कंपनी म्हणन ू ओळखली जाते..
फेसबक ू चा मालक Mark Zuckerberg जेव्हा social media platform चा विचार करत होता तेव्हा त्याच्या
मनात अनेक द्वंद्व होती. स्टीव्ह जॉब्स ने त्याला निम करोली कैन्चीधाम आश्रमात येण्याचा सल्ला दिला. इथे
येऊन 2 दिवस राहिल्यानंतर त्याला enlightenment झाली आणि Facebook चा शोध लागला. worldwide
people Connect ची कल्पना आणि अंमलबजावणी कशी असावी हे सगळं त्याला इथे सच ु लं.
जे लोक इंग्लिश म्यझि
ु क ऐकतात त्यांना ‘The beatles band’ नवीन नाही. या बँड मधल्या आर्टिस्ट ना इथे
आत्मज्ञान झालं आणि त्या ठिकाणी जवळच beatels ने त्यांचा आश्रम स्थापन केला. आणि ते जगभरात
नावारूपाला आले. कृष्णादास नावाचे एक विलायती संतही यांचे भक्त.. ज्यांची अनेक भजनं प्रसिद्ध आहे त.

आम्ही निम करोली आश्रमात साधारण सकाळी 8.15 वाजता पोहोचलो. फारशी गर्दी नव्हती. आश्रमात पाऊल
ठे वल्या ठे वल्या एक वेगळीच जागत ृ ावस्था जाणवली. त्या स्पन्दनांमध्ये प्रचंड सकारात्मकता होती. त्यांच्या
मर्ती
ू समोर बसन ू डोळे मिटल्यावर आपोआप ध्यान लागलं. हे उत्तराखंड च वैशिष्ठय आहे , इथे साधना करावी
लागत नाही, ती होते. म्हणजे इथे तम् ु ही ध्यान करत नाही तर ध्यान च तम् ु हाला खेचतं.. त्या अवस्थेत असताना,
मध्ये मला कोणीतरी उठवलं तिथल्या आरतीची वेळ होती. आरती झाली, हनम ु ान चालीसा , मारुती स्तोत्र म्हणन ू
झाली आणि परत डोळे मिटून बसलो. आणि ज्या अवस्थेत बसलो त्याच अवस्थेतन ू सम ु ारे 2 तासांनी जाग आली..
आता ही समाधी होती का काल रात्री झोप न झाल्यामळ ु े आले ल ी निद्रावस्था होती हे विश्वे श्वरालाच ठाऊक. पण
डोळे उघडल्यावर जे वाटलं ते शब्दात मांडता येणार नाही. ते अनभ ु वावं.. उठून उभं राहायचा प्रयत्न केला आणि
तसाच मटकन खाली बसलो, उठताच येईना, कमरे खालच्या शरीराचं भान अजन ू आलं नव्हतं, पाय आखडून इतके
बधीर झाले होते की मग्ंु या येऊनही नंतर पढ ु ची जी बधीर अवस्था असते ती आली होती. पार अगदी पायाचं
अस्तित्वच जाणवेना, इकडे तिकडे हाताचा आधार घेऊन उठून उभा राहायला १० मिनिटं गेली. केतन आता
कंटाळला होता. त्याला खण ु ेनेच सांगितलं निघू थोड्या वेळात.. आश्रमाच्या ऑफिस मध्ये निम करोली बाबांची
काही पस्ु तकं विकत घेतली, हनम ु ान मंदिरात नमस्कार करून निघालो.. रानीखेत आणि तिथन ू पढ
ु े द्रोणागिरी ला
जायला.. द्रोणागिरीच्या पर्वत रांगांमधल्या त्या अतर्क्य अनभ ु वांचे साक्षीदार व्हायला...

क्रमशः

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu

पण
ु े

Ph: 9881999034

© ALL RIGHTS RESERVED ©

Please visit - facebook profile - for watching related photos and videos

#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#Travelblog
#facebookblogger

हिमालयाच्या वाटे वर – भाग -1 - लेखांक 3 रा – द्रोणागिरीच्या जंगलात

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू

लेखांक - 3
आता दप ु ारचे 12 वाजले होते.. आम्ही रानीखेत च्या रस्त्यावर होतो.. कुमाऊ भागातलं रानीखेत हे दे खील टुरिस्ट
साठी एक प्रेक्षणीय स्थळ आहे . इथला निसर्ग, पहाड, सौंदर्य हे नैनिताल पेक्षा वेगळं आहे . स्टे प फार्मिंग साठी हे
ठिकाण प्रसिद्ध आहे .. रानीखेत ला पोहोचल्यावर आम्ही इथले टुरिस्ट स्पॉट्स, हे डाखान बाबा मंदिर, झल ु ा दे वी
मंदिर, वैगेरे बघन
ू आम्ही याच ठिकाणी या दिवशी मक् ु काम करायचा विचार केला कारण पढ ु च्या दिवशी सकाळी 6
ला आम्हाला द्रोणागिरीच्या पायथ्याशी पोहोचायचं होतं.

हाच तो द्रोणागिरी जो संजीवनी साठी मारुती लंके ला घेऊन गेला आणि त्यामळ ु े अजनू ही तिथे मारुतीची पज
ू ा होत
नाही. जिथे द्रोणाचार्यांनी तप केलं, जिथे द्रोणागिरी माता म्हणजेच वैष्णवी दे वी रुपातलं आदिशक्ती सती मातेचं
शक्तीपीठ आहे .. सती मातेची हाताची बोटं प्रस्थापित झाली आणि जिथे पांडव अज्ञातवासा मध्ये असताना काही
काळ राहिले होते. चामोली जिल्हा आणि द्वारहाट यांच्यामध्ये ही पर्वत रांग पसरलेली आहे .

झल ु ादे वी मंदिराजवळ एका गाडीचा ड्रायव्हर भेटला.. बोलता बोलता चौकशी केली द्रोणागिरी, पांडव खोली आणि
बाबाजी गफ ु ा.. त्याने आम्हाला रानीखेत ऐवजी द्वारहाट ला राहण्याचा सल्ला दिला. ठरलं. आम्ही संध्याकाळी
5.30 पर्यंत द्वारहाट ला पोहोचलो. तिथे एक उत्तम view असलेलं हॉटे ल मिळालं. जरा तिथे settle होतोय तोच
6.30 वाजता हॉटे ल चा मालक आला आणि म्हणाला तम् ु हाला कार मधन ू काही सामान काढायचं असेल तर आत्ताच
घेऊन या.. आम्ही म्हं टल आणू थोड्यावेळाने तसही रात्री जेवण झाल्यावर खाली जरा फर्लांग भर फेऱ्या मारायला
बाहे र पडूच तेव्हा घेतो.. तो हसला म्हं टला 7 नंतर आम्ही कोणालाही खाली उतरू दे त नाही. या खालच्या जंगलातन ू
वाघ/सिंह , बिबटे येतात आणि माणसांना किंवा पाळीव प्राण्यांना direct घेऊन जातात.. दर एक दिवसाआड
हॉटे ल च्या सी सी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये वाघ दिसतात.. आमची ते ऐकून complete लेव्हल झाली खाली येऊन
सामान काढून रूमवर आणलं, आज संध्याकाळ जरा निवांत मिळाल्यामळ ु े चहा आणि भजी चा बेत झाला. 7
वाजल्यापासन ू 9 वाजेपर्यंत बाहे र टक लावन ू तिथल्या gallery तन ू वाघ येईल या अपेक्षेने बसन ू राहिलो शेवटी
कंटाळून जेवन ू झोपलो. परत के तन ला आधी झोप.. पहाटे 3 वाजता मोठ्या आवाजाने जाग आली खिडकीतन ू
बघितलं तर ढगांचा प्रचंड गडगडाट.. बाहे र आलो तर त्या मिट्ट काळोखात पाऊस पडत असतांना चं चित्र विजेच्या
कडकडीत प्रकाशात 3 सेकंद दिसलं आणि नाहीस झालं.. भयाण फीलिंग होतं ते.. जंगल, आजब ू ाजलू ा द्रोणागिरी चे
पहाड वरून ढगांचे अक्राळ विक्राळ भयाण रं ग आणि आकार, गडगडाटाचा आवाज आणि यात कचकन वीज
चमकून ते भयाण दृश्य तम् ु हाला दाखवतीये.. आणि त्या gallery मध्ये तम् ु ही एकटे च आहात. शब्दशः फाटली..
आत आलो.. हा पाऊस जर आत्ता थांबला नाही तर द्रोणागिरी अवघड आहे असं मनात येऊन गेल.ं . करण तिथे
कोणतीही नैसर्गिक घटना ही extreme होते.. आमच्याकडे रे नकोट वैगेरे नव्हते आणि या पावसात माहीत
नसलेला पर्वत चढणं हे दरु ापास्त होतं.. 3.30 वाजता परत झोपलो, 6 ला जाग आली, नशिबानं पाऊस थांबला
होता. पट पट आवरून गाडी काढली . आधी दन ु ागिरी मातेचं मंदिर लागतं जे शक्तीपीठ आहे (इथले लोकल लोक
द्रोणागिरी ला दन ु ागिरी म्हणतात). इथे तिला वैष्णो दे वी असंही म्हणतात कारण इथे माता ही शाळंु का स्वरुपात
आहे . गाडी लावली जागा बघन ू आम्हाला वाटलं की 10 मिनिटात होईल दर्शन. पण विषय वेगळाच झाला आम्ही
पायऱ्या चढत होतो आणि मंदिराचा पत्ता च नाही जवळपास 500 पायऱ्या चढल्यावर मंदिर आलं.. बर तिथे आम्ही
दोघंच असल्यामळ ु े कोणाला विचारता ही येईना. झालं, इथेच आमची लेव्हल झाली होती अजन ू तर अख्खा
द्रोणागिरी चढून उतरून त्याच दिवशी अंधार पडायच्या आत आम्हाला कौसानी ला जायचं होतं.. म्हणजे ५००
पायऱ्या चढणं तसं अवघड नव्हतं पण जर मनामध्ये ५० पायऱ्या असतील असं योजन ू चालायला लागलो तर ५०
नंतरची प्रत्येक पायरी हि पायांना त्रास चं दे त.े . कारण तम ु च्या मनाने/ बद् ु धीने शारीरिक कष्टाचा threshold
ठरवलेला असतो. शेवटची पायरी चढलो आणि समोरचं दृश्य बघन ू निःशब्द झालो. प्रचंड मोठी तापोवाटिका,
आजब ू ाज ल
ू ा साल आणि दे वदार ची उं च उं च झाडी त्यामध न
ू जाणारी एक पायवाट, नक ु ताच पाऊस पडून गेल्यामळ ु े
हवेतला गारवा आणि जमिनीचा ओलावा,मधेच ऊन आणि ढग यांची शिवणापाणी आणि उं चावरच ते आदिमायेच
मंदिर. आम्ही दोघेच त्या मंदिरात होतो. काही वेळाने तिथे सेवा करणारे एक जण आले त्यांनी मंदिराचं कुलप ू
उघडलं आम्हाला दर्शन दिलं आणि माहिती सांगायला सरु ु वात केली.. द्रोणागिरी च दै वी दृश्य आम्हाला त्या
कड्यावरून बघायला मिळालं.
हिमालयातील बाकीच्या पर्वतरांगांची माहिती ते आम्हाला सांगत होते. “इथे औषधी वनस्पतींचं भांडार आहे . काही
जण म्हणतात अजन ू ही इथे मत
ृ संजीवनी आढळते पण ती कोणती ते समजणाऱ्यालाच समजते.. मळ ु ात संजीवनी
ही मेलेल्या व्यक्ती ला जिवंत करत नाही तर मर्छि ू तावस्थे त गे ल े ल्याला त्या अवस्थे तनू बाहे र निघण्यास मदत करू
शकते.. अर्थात अखंड काळासाठी coma मध्ये गेलेले रुग्ण या वनस्पतीच्या आधारे coma मधन ू बाहे र येऊ
शकतील असा अंदाज आहे . पतंजली योग सत्र ू ात जे मत ृ संजीवनी चं वर्णन आहे त्याचा आधार घेऊन त्या सदृश
दिसणाऱ्या इथे सापडलेल्या वनस्पतीचं हरिद्वार इथल्या रामदे वबाबांच्या पतंजली आश्रमात संशोधन चालू आहे .
त्याप्रमाणे ही वनस्पती मनोरुग्ण आणि कुठल्याही प्रकारची मर्छि ू तावस्था दरू करायला मदत करे ल असा अंदाज
आहे . एका hypothesis प्रमाणे.. लक्ष्मण हा इंद्रजिताची शक्ती लागन ू मर्च्छि
ू त झाला.. म्हणजेच तो coma मध्ये
गेला असावा आणि त्या अवस्थेतन ू बाहे र काढण्यासाठी हनम ु ानाने द्रोणागिरी लंकेत नेला.. बर नेला तसा परत
आणन ू ही ठे वला आता हनम ु ानासारख्या सर्वज्ञ दे वाला ती वनस्पती कोणती ते ओळखू आलं नाही तर मर्त्य
माणसाला ती कशी ओळखता येईल?.

पण त्याने हा पर्वत उचलन ू नेल्यामळ ु े ज्या जीवाचं नक


ु सान झालं ते कधीच भरून निघण्यासारख नव्हतं त्यामळ ु े
आजही या पर्वतावर किंवा इथल्या पायथ्याच्या कोणत्याही गावात हनम ु ानाची पजू ा के ली जात नाही. काही
श्रेष्ठींच्या मते संजीवनी ही दे वांसाठी बनली आणि कलियग ु ात ती लप्ु त झाली.. काही जण ती शोधल्याचा दावा
करतात.” अशी चर्चा चालू असताना त्या माणसाने आम्हाला त्या तापोवटीकेतील काही अतिप्रचंड वक्ष ृ ाखालची एक
जागा दाखवली जिथे लाहिरी महाशयांना दीक्षा मिळाल्यानंतर ते आणि महावतार बाबाजी त्या ठिकाणी साधना
करत असत. ती झाडं इथे घडलेल्या प्रत्येक गोष्टींची साक्षीदार होती, सत्ययग ु ातील अनेक ऋषी त्या तापोवटीकेत
साधना, तपस्या करत असत अशी एक आख्यायिका समजली. इथे हे सगळं होऊन गेलं असेल याची नक्कीच खात्री
पटली कारण त्या जागेची vibrations आणि cosmic energy चं तशी होती, काही जागा अशा असतात जिथन ू
तम ु चा पाय निघत नाही किंवा कधीतरी इथे आलोय असं ‘दे जाव’ू फिलिंग येतं तसं त्या वास्तू मध्ये येत होतं.

काही वेळ तिथे सकाळची साधना केली आणि लगेच उतरून गाडी काढून थेट द्रोणागिरी चा पायथा गाठला.. तिथे
‘जोशी गेस्ट हाउस’ नावाचं एकमेव हॉटे ल आहे .. साउथ सप ु र स्टार रजनीकांत हा वर्षातले 2 महिने द्रोणागिरी वर
बाबाजींच्या त्या गह ु े त साधने ल ा ये तो आणि याच हॉटे ल मध्ये मक्
ु काम करतो. आम्ही त्या जोशींशी गप्पा मारत
होतो. ते त्यांचे अनभ ु व सांगत होते. हा द्रोणागिरी किती जागत ृ आणि सकारात्मक दै वी कंपनांनी यक् ु त आहे सांगत
होते. थोड्यावेळ गप्पा झाल्या आणि बाबाजींच्या गफ ु े कडे जायला चालतच निघालो.. वास्तविक अजन ू 4 किमी
पढ ु े गाडी जाऊ शकत होती पण जोशी म्हणाले पाऊस पडू न गे लाय. परत पड ू शकतो चिखल झाला तर गाडी अडकून
जाईल तम ु ची. म्हं टल 8 किमी जास्त चालण झालं तरी चालेल. ते पढ ु चं लफडं नको.. बरं च अंतर पार केल्यावर गढ
चढायला सरु ु वात केली.. ठीक ठिकाणी गफ ु े कडे जाणारे बाण दर्शविले आहे त.. तिथेच एका वळणावर एक काळ भोर
केसाळ कुत्र आमच्या बरोबर यायला लागलं. आम्हाला जरा हायसं वाटलं. असच एकदा गिरनार पर्वत रात्रीचा चढत
असताना माझ्याबरोबर एक कुत्र आल होतं ज्याने अगदी गिरनार च्या १०,००० व्या पायरी पर्यंत त्या अंधारात
माझी साथ दिली होती. तो अनभ ु व असल्याने हा आता शेवटपर्यंत रस्ता दाखवेल असं आम्हाला वाटलं. थोडं अंतर
पार केल्यावर घनदाट जंगल लागलं आणि तिथन ू जाताना ते कुत्र पढ ु े कुठे गायब झालं आम्हालाच कळलं नाही
अगदी जाद ू झाल्यासारखं ते दिसेनासं झालं.. आम्ही त्या घनदाट जंगलातन ू पढ ु े निघालो अनेक चित्र विचित्र
रं गीबेरंगी सरडे, कीटक, पक्षी, साप आम्ही त्या रस्त्यात बघितले..

जोशींनी ताकीद आणि सच ू ना दे ऊन ठे वल्या होत्या, घनदाट अरण्य आहे वन्य पशश ंू ी गाठ पडू शकते, त्यात तम्ु ही
दोघेच आहात वन्य पशु एकदम समोर आल्यास काय करायचं या सच ू ना त्यां नी दिल्या. जोशी म्हणाले जवळपास
मागचे 8 महिने इथे कोणी tourist आला नाहीये.. ते योगदा संस्थेचे कार्यकर्ते ही गेली 4 महिने फिरकले नाहीयेत.
सांभाळून जा.. वन्य श्वापदांचं भय आहे . हे सगळं डोक्यात चालू असतानाच त्या घनदाट द्रोणागिरीच्या चढ्या
जंगलात आम्ही कधी वाट चक ु लो ते आम्हालाच कळलं नाही. त्यात ढग भरून आल्यामळ ु े अंधारून आलं होतं.
आता आम्ही हळू हळू ऑफ द ट्रॅ क जायला लागलो होतो कारण पायवाट कुठे दिसत नव्हती. आता वाळलेली झाडं,
त्यांची मळ
ु ं , फांद्या, बध
ंु े आणि मोठे दगड यांचा आधार घेऊन चालायची वेळ आली होती कारण तिथली जमीन
पाऊस पडून गेल्याने निसरडी झाली होती.

आम्ही दिशाहीन कुठे तरी वर चाललो होतो. बरं gps लावायला जावं तर range नव्हती. पानांची सर सर प्रत्येक
वेळी कुठल्यातरी वन्य श्वापदांच्या चाहूल द्यायची. वेग वेगळ्या जातीची माकडं तर भरपरू होते, आणि त्या चढ्या
जंगलात झाडाच्या वाळक्या बन् ु ध्यांचा आणि मोठ्या दगडांचा आधार घेऊन वर जात असताना एकदम पाऊस
सरू
ु झाला आणि वातावरणात कमालीचा गारवा आला.. तिथन ू पढु े जायला रस्ता नाही हे आम्हाला दिसत होते
आणि आम्हाला मागे फिरावे लागणार होते हे आमच्या लक्षात आलं, तेही खोड, बध ंु े आणि दगड याचा आधार
घेऊन. खडा पहाड आणि त्यात पाऊस पडायला लागल्याने निसरडा रस्ता असं दोन्ही सांभाळत आम्ही हळू हळू वर
चढत ट्रॅ क वर येण्याचा प्रयत्न करत होतो..

रातकिड्यांचे आवाज चालू झाले.. क्षणभर वाटलं उगाच आलो.. कोणीतरी माहितगार माणस ू बरोबर असता तर बरं
झालं असतं.. असाच चक ु लेल्या वाटे वरून अंदाज घेत वाट शोधत काही दगड एकमेकांवर मांडलेला मोठा patch
दिसला त्यावरून चढून पढु े जावं अस ठरवलं एका वाळक्या झाडाच्या बध् ंु याचा आधार आणि त्या ढिगावर पाय
दे ताच तिथली खालची जमीन निसरडी झाल्याने पाय सटकला तो बन् ु धाही वाळका असल्यामळ ु े तट
ु ू न हातात आला
आणि फर्लांगभर फरफटत मी त्या उतारावरून गडगडत खाली आलो.. डाव्या हाताचा अंगठा फाटला.. जबसदस्त
रक्ताची धार लागली डाव्या हातांच्या तळव्याला आणि कोपराला जखमा.. तिथे असलेले टोकदार दगड आधार
घ्यायच्या नादात दिसले नाही आणि तेच घस ु ले.. करं गळी ला मक
ु ामार, डाव्या हाताची स्किन सोलवाटून परत
त्याच ठिकाणी मकु ामार लागला आणि पडलोही असा की तिथे उभा राहून परत कशाचा आधार घेण्याची सोयही
नाही आणि त्राण ही नाही. एका फांदीला धरल्यामळ ु े अजन
ू खाली गडगडत गेलो नाही..

पावसाने आता जोर धरला.. हवेतला गारवा वाढल्यामळ ु े त्या जखमा आणखीनच ठणकत होत्या.. केतन चा चेहेरा
एकदम जरा गंभीर झाला कारण त्यालाही आता भीती वाटायला लागली होती, वातावरण हलकं करायला द्रोणागिरी
ला अक्षरशः रक्ताचा अभिषेक वैगेरे dialogue मी मारायला लागलो त्याचा केतन वर काहीच परिणाम झाला
नव्हता. माझा रुमाल बॅगेत होता आणि उतारावर तिरका अडकून पडल्यामळ ु े पाठीवरून बॅग काढून तो लावंतही
येईना.. नशिबानं केतन च्या खिशात रुमाल होता त्याने तो माझ्या दिशेने फेकला .. त्याच अवस्थेत मी तो
जखमांवर दाबन ू धरला आणि फाटलेल्या अंगठ्याला बांधला.. आता एक हात जेरबंद असल्यामळ ु े दस
ु ऱ्या हाताने
आणि दगडाच्या खोबणीत पाय ठे ऊन मी कसा बसा त्या अडकलेल्या ठिकाणाहून वर आलो.. सहज मनात विचार
आला .. “कदाचित जिथे पोहोचायचं होतं ती शक्ती आमची परीक्षा घेत असावी” स्वामी समर्थ आठवले.. मनात
नकळत तारक मंत्र सरु ु झाला . तसंच वर चढत डाव्या बाजल ू ा एक झाडाजवळ मोबाईल ला एक कांडी रें ज दिसली
आणि gps लावन ू बघितलं.. आम्ही पर्ण
ू उलट्या दिशेला दरीतल्या जंगलात अडकलेले दिसलो आणि बरच वरच्या
बाजलु ा उलट्या दिशेला आम्हाला जायचंय हे त्या map वरून कळलं, पण पर्याय नव्हता इथे आलोय तर महा
अवतार बाबाजी गफ ु ा आणि पांडव खोली करूनच जायचं..

मनानी निश्चय केला.. परत वर चढत एकमेकांना आधार दे त आम्ही उं च सखल भागात आलो आणि दरू उं च वर
आम्हाला गफु ा सदृश काहीतरी दिसू लागलं त्यावेळेला आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.. येस फायनली
आम्ही तिथे पोहोचणार होतो पस् ु तकामध्ये वाचन
ू ज्या प्रेरणेने मी इथे येण्याचं ठरवलं ते समोर दिसल्यावर
एकदम खतरनाक फिलिंग होतं वर गेल्यावर त्या गफ ु े त व्यवस्थित जखम बांधली आसन घातलं आणि ध्यानाला
बसलो.. अक्षरशः त्या क्षणी डोळ्यांना घळाघळा पाणी..

हे मला बऱ्याच वेळा होतं.. अष्टसात्विक भाव जागत ृ होणं म्हणतात याला.. सद्गरूु जग्गी वासद ु े व त्याला ‘The
ultimate bliss’ असं म्हणतात, पर्ण
ू त्वाची अनभ
ु त
ू ी.. तम
ु च्या डोळ्यात पाणी का येतय
ं हे तम्
ु हाला कळत नाही.
कुठलाही आनंद नाही कुठलही दःु ख नाही. निर्विकारपणे तम ु च्या मनाच्या आंतरिक सायज्
ु जतेतन ू कोणत्यातरी
वेगळ्याच मिती (Dimension) मधे असलेल्या त्या पराशक्तीशी / अद्वैताशी तम
ु चं मन, प्राणशक्ती आणि बद्
ु धी
एकत्रित पणे एकरूप होते तेव्हा ही अवस्था येत.े .

मला हा भाव मी कुरवपरू च्या माझ्या solo trip ला पहाटे ४ वाजता ब्राम्ह मह ु ू र्तावर वासद ु े वानंद सरस्वती टें बे
स्वामींच्या गह ु े त मेणबत्त्यांच्या प्रकाशात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामत ृ चं पारायण करताना आला होता. हाच भाव
मला गिरनार पर्वतावर कमंडलू कंु डातली द्त्तस्वरूप प्रज्वलित धन ु ी बघताना आला होता, आणि वद् ृ धेश्वर ला
शंकराच्या पिंडीसमोर डोळे मिटून बसल्यावर आला होता. एका क्षणात मी हातांना झालेल्या जखमांच दःु ख विसरून
ध्यानामध्ये कधी हरवलो कळलं नाही. नक्कीच त्या जागेत काहीतरी आहे .. ज्या ठिकाणी क्रिया योगाच्या आद्य
प्रवर्तकांनी लाहिरी महाशयांना दीक्षा दिली ती जागा दै वी स्पंदानानी यक् ु त अशी असणारच होती.. आता मला फक्त
तिथन ू घ्यायचं होतं.. एक कमालीची शांतता होती त्या जागेत.. थोड्यावेळाने डोळ्यातन ू पाणी येणं बंद झालं आणि
ध्यान स्थिर झालं.. आपोआप नजर दोन भव ु यां म ध्ये स्थिर झाली.. शरीरात होणाऱ्या क्रिया आपोआप घडत
होत्या.. भस्त्रिका, ओंकार झाले भ्रमारी झाली.. आणि निर्भयत्वाकडे मनाची वाटचाल चालू झाली.. मनाच्या गतीला
अंत नव्हता.. शरीराचं अस्तित्व जाणवत नव्हतं त्या अवस्थेत कुठे जाऊन आलो माझं मलाच कळलं नाही. एक
तासानी डोळे आपोआप उघडले. गायत्री झाली, परु ु षसक् ु तानी अभिषेक झाला. तिथन ू हालावसं वाटत नव्हतं.तंद्री
लावन ू बसलो.. दै वी शांतता आणि पन् ु हा एकदा तीच अवस्था....डोळ्यांना घळाघळा पाणी..

क्रमशः

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu

पण
ु े

Ph: 9881999034

© ALL RIGHTS RESERVED ©

Please visit - facebook profile - for watching related photos and videos

#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#Travelblog
#facebookblogger

हिमालयाच्या वाटे वर – भाग 1 - लेखांक 4 था

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू

लेखांक - 4 – क्रीयायोगी महात्म्यांच्या सहवासात

मी तिथेच त्या गह
ु े च्या शेजारी असलेल्या झाडाच्या पारावर हिमालयाच्या पर्वत रांगा बघत बसलो होतो. आता
केतन ला सवय झाली होती की अश्या ठिकाणी आलं की एवढा वेळ लागतोच. त्या दिवशी गरु ु वार होता. त्याचं
future/options चं मार्के ट होतं तो म्हणाला तझ
ु ं होऊदे , इथे रें ज ये तीये तोपर्यंत एखादा ट्रे ड लावता येतोय का
बघतो.. त्याने मोबाईल वर ट्रे ड platform उघडला आणि काय झालं काय माहित तत्क्षणी तो बंद केला.. त्याची ते
करायची इच्छाच मेली. या एवढ्या जागत ृ ठिकाणी येऊन काय करतोय हे आठवन ू त्याचं त्यालाच हसू आलं आणि
तोही शांत एकटक समोरच्या पर्वताच्या हिमाच्छादीत रांगा आणि आजब ू ाज च
ू ा निसर्ग याकडे पहात हरवन ू गेला..
मला जरा आश्चर्य वाटलं.. कारण माझ्यासाठी हा वेगळा केतन होता. तो हा विचार करून हे बंद करे ल मला वाटलं
नव्हतं. त्याच्यात झालेलं हे परिवर्तन मला आवडलं.

आता बराच वेळ झाला होता. पाय निघत नसला तरी पण पढ ु े पांडव गफ
ु ा बघायची होती सम
ु ारे अडीच तासांनी
तिथन ू निघताना एक notice झालं.. एक ‘संत्र’ त्या गफ ु े च्या दरवाज्याच्या इथे ठे वलेलं होतं. सहज मनात विचार
आला जर गेले 4 महिने इथे योगदा ट्रस्ट चं दे खील कोणी आलं नाहीये तर एवढं ताजं संत्र इथे आलं तरी कसं.. मी
ते प्रसाद म्हणन
ू माझ्या बरोबर घेतलं आणि आम्ही पढ ु े पांडू खोली कडे निघालो. पांडव अज्ञात वासात इथे राहिले
होते. वर एक मोठं पठार आहे तिथन ू पढु े पां डवां नी स्थापन केलेलं शिवलिंग आणि 5 पांडवांची प्रतीकं म्हणनू 5
शिळा आहे त आणि एक गफ ु ा आहे .

ते पठार ‘भीम की गद्दी’ म्हणन ू प्रसिद्ध आहे .. भीम त्या प्रचंड मोठ्या पठारावर त्याची गादी टाकून झोपत असे
अशी आख्यायिका आहे . अज्ञात वासात धोब्याचं काम भीम करायचा आणि सगळ्यांचे कपडे गाद्या भीमताल ला
धव ु न
ू आणन ू पन्
ु हा वापरायचा अशी कथा इथे प्रचलित आहे .. भीम ज्या जागेवर झोपायचा तिथे योगदा ट्रस्ट आता
हे लिपॅड बांधतय. भीमाच्या आकारमानाचा यातन ू अंदाज येतो. परमहं स योगानंदानी पाश्चिमात्य दे शात
क्रीयायोगाचा प्रसार केल्याने बाबाजींचे अनेक भक्त हे अमेरिकेतही आहे त. या भक्तांच्या येण्याजाण्यासाठी ही
हे लिपॅड ची व्यवस्था.

पांडू खोली च्या काही किलोमीटर अंतरावर द्रोणागिरीवरच कुकुचिना नावाचं ठाणे आहे .. असं म्हणतात कि पांडव
मद्
ु दाम कोणाला संशय येऊ नये म्हणन ू अज्ञात वासात द्रोणाचार्यांच्या द्रोणागीरीत येऊन काही काळ राहिले. पढ ु े
कौरव, पांडवांना शोधत या कुकुचिना ठिकाणापर्यंत आले, पण कृष्णलिलेमळ ु े ते भ्रमिष्ट झाले आणि पढ ु े येऊ
शकले नाहीत. आणि म्हणन ू या जागेला ‘कौरवछिना’ ज्याचा अपभ्रंश पढ ु े कुकुचिना असा झाला असं म्हणतात.
छिना म्हणजे पडाव/पाडा किंवा ठाणे. तिथे जवळच भरत मन ु ीं ची गह
ु ा आहे जिथे भरत मन ु ी तपस्या करत असत. हे
भरत मन ु ी म्हणजे तेच ज्यांचं नाट्यशास्त्र प्रसिद्ध आहे .. इथे आम्हाला भरतमन ु ीं बद्दल अजन ू एक कथा
समजली ..

मळु ात द्रोणागिरी पर्वत हा आत्ता जिथे आहे तिथनू तो बराच पढ ु े हिमालय आणि शिवालिक पर्वत रांगांमधे कुठे तरी
होता. हनम ु ान जेव्हा तो लंकेवरून परत आणत होता तेव्हा आसमंत हनम ु ानाच्या भभ
ू क्
ु काराने दणाणन ू गेला..
तेव्हा तिथेच साधनेला बसलेल्या भरत मन ु ींना कोणी राक्षस भभू क्
ु कार करत हवाई मार्गाने तिथे साधनेला
बसलेल्या ऋषीमन ु ींवर आक्रमण करायला चाललाय असं वाटलं आणि न बघताच भरत मन ु ींनी त्या दिशेने बाण
मारला आणि त्या आघाताने त्याच्या हातातली द्रोणाचल पर्वतरांग ही तिथेच खाली पडली आणि द्वारहाट ते
चामोली या हिमालयातल्या पहाडी इलाक्यामध्ये प्रस्थापित झाली. अशी ती कथा...

तिथलं दर्शन घेऊन झाल्यावर पन् ु हा पायथ्याला जोशी गेस्ट हाउस ला आलो. चहा घेत जोशींबरोबर गप्पा चालू
होत्या तेवढ्यात एक सन्यासी ‘यती’ तेथे आले. जोशींनी त्यांचे अभिवादन केले आणि त्यांना बसायला सांगन ू चहा
दिला. चेहेऱ्यावर शांत भाव.. लांब काळे भोर केस, भगवी वस्त्र, हालचालींमध्ये कमालीची स्थितप्रज्ञता, येणारे
जाणारे लोकल लोक त्यांना अभिवादन करत होते.. त्यांची आणि माझी 2 वेळा नजरा नजर झाली.. एकंदरीत हे
इथले कोणीतरी मोठे यती होते हे समजलं. न राहवन ू मी संभाषण चालू केलंच. आपणहून बोलल्या मळ ु े ते दे खील
खलु न
ू बोलू लागले..’ मनसादे वी वाले बाबाजी’ असे इथले लोक संबोधतात यांना.. हे क्रियायोगी आहे त.
जंगलातल्या मनसा दे वी मंदिरात जिथे कोणी दर्शनार्थी त्या मंदिराची माहिती नसल्यामळ ु े फारसा येतही नाही
तिथे सेवा आणि जंगलात असलेल्या आपल्या कुटी त साधना करतात, गेली 20 वर्ष द्रोणागिरी च्या जंगलात
एकटे च राहतात.. ते लहानपणी नैनिताल जवळच्या एका गावात राहत होते..आम्ही त्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल
विचारलं.. त्यांनी विषय टाळला..पढ
ु े व्यवहार, अध्यात्म, धार्मिकता, धर्म, कर्मकांड, वासना, प्राप्त सिद्धी, मक्
ु ती,
द्वैत, अद्वैत, व्यक्त,अव्यक्त अशा विषयांवर चर्चा सरू ु झाल्या..

सरु वातीचा काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या त्यात ते व्यवस्थित इंग्लिश मधे ही अधनू मधन ू बोलत
होते.. इतक्या वर्षांची त्यांची क्रिया योगाची प्रॅक्टिस ऐकल्यावर माझ्या मनात साहजिकच अनेक प्रश्न आले.
जरा ice break झाल्यावर मी त्यांना ते विचारायला चालू केले

“क्रिया योगीना अनेक सिद्धी प्राप्त असतात यात कितपत तथ्य आहे ".. ?

प्रश्न ऐकल्यावर त्यांनी मला नखशीखांत न्याहाळलं नंतर काही वेळ ते फक्त माझ्याकडे बघत होते, मला जरा
awkward झालं मला वाटलं मी चक ु ीचं काहीतरी विचारलं बहुतक
े लगेच विषय बदलावा म्हणनू मीच त्यांना म्हं टल
कि तम् ु ही या प्रश्नाचं उत्तर द्यावं असा आग्रह नाही पण मी याबद्दल वाचलय म्हणन ू कुतहू लापोटी तम्
ु हाला
विचारलं.

ते हसले कदाचित मला ते पारखत असावेत कि मी त्यांची उगाच परीक्षा वैगेरे घेण्यासाठी किंवा या सिद्धींचा किंवा
अतिन्द्रीय पराशाक्तींची चेष्टा करून त्यामागचा खरे खोटे पणा किंवा भोंदप
ू णा याबद्दल काही बोलणार आहे , असा
त्यांचा समज क्षणभर झाला असावा. ते बोलले तेव्हा समजलं त्यांचा तो समज बरोबर होता आणि कदाचित तेव्हा
ते मला वाचत असावेत. ते माझं बोलण ऐकल्यावर हसले आणि बोलू लागले –

" खरतर सिद्धींसाठी कधी कोणी क्रियायोग मार्गावर येत नाही.. कारण सिद्धी हे या साधनेचं byproduct आहे ,
उसाच्या रसापासन ू गळ ू बनत असताना तयार होणारी उसाची मळी हि जशी टाकाऊ आणि मोहात पाडणारी अशी
दोन्ही असते तश्या असतात या ‘सिद्धी’. मळ ु ात सिद्धी प्राप्त होण्याचा उद्दे श ठे ऊन एखादा क्रिया योग साधना
करत असेल तर साधने मधे तो कधी उच्चस्तरावर जाऊ शकत नाही. फक्त सिद्धींसाठी, तंत्र विद्या किंवा तांत्रिक
साधना काही लोक करतात ते या साधनेपेक्षा पर्ण ू वेगळं आहे .. तंत्र साधना करणारे अघोरी, नागा हे फक्त सिद्धी
प्राप्तीसाठी त्या मार्गाचा अवलंब करतात म्हणजे तो मार्ग चक ु ीचा आहे असंही नाही अर्थात तोपर्यंतच जोपर्यंत त्या
तंत्र सिद्धींचा ते एखाद्याचं चांगलं करण्यासाठी उपयोग करतील. पण जिथे एखाद्याचं वाईट व्हावं या विचाराने
वापरलेल्या तंत्र सिद्धी या त्याच्या तसा वापर करणाऱ्याला सद् ु धा तेवढाच त्रास दे तात..पण योग साधनेमध्ये
जेव्हा सिद्धी प्राप्त व्हाव्यात अशी वासना/ कामना असते.. तो पर्यंत या योग मार्गावरचं मार्गक्रमण आणि गती
अतिशय संथ होते.. पण हो क्रिया योगीना सिद्धी प्राप्त होतात..

याबद्दल ज्यांना या गोष्टीचं ज्ञान नाही अशा लोकांबरोबर चर्चा करण्याची आम्हाला परवानगी नसते.. कारण
सामान्य माणसू अनेक तर्क्य वितर्क्य काढून ते कसं खोट आहे किंवा भोंदगि ू री आहे हे सिद्ध करण्याच्या मागे
असतात. मळ ु ात या सिद्धी कि ं वा अतिन्द्रीय शक्ती या तमु च्या physics च्या नियमांमध्ये बसत नसल्यामळ ु े
समाजा समोर सिद्ध करता येत नाहीत. पण म्हणन ू त्या नाहीयेत असंही नाही. ज्याने त्याने ज्याचा त्याचा
वैयक्तिक अनभ ु व घ्यावा या सिद्धींच्या बाबतीत.. "

" आता मी चंद्रावर जाऊन आलोय असं जर तम् ु हाला सांगितलं तर तम्ु ही मला वेड्यात काढाल. तम ु च्या मनात
असंख्य शंका, प्रश्न, संशय निर्माण होतील आणि हे कसं ते तम् ु ही मला विचारत राहाल आणि मी त्याचं उत्तर दे ऊ
शकणार नाही.. कारण जे अद्वैत आहे ते अव्यक्त आहे आणि जर ते अव्यक्त आहे तर ते मी तम ु च्यासमोर
व्यक्तस्वरुपात कसं मांडू शकेन? तो प्रत्येकाने ज्याचा त्याचा घ्यायचा अनभ ु व आहे .. म्हणन
ू ते नाही असं होत
नाही तर ते तू अनभ ु वलेलं नाहीस. म्हणन ू च तर या अद्वैताला तम् ु ही Spiritual Science किंवा Holy Science
अशी संज्ञा दिली, जे भौतिक शास्त्रालाही अजन ू उलगडलेलं नाही. "
साधनेमधे मनःशक्ती इतकी super conscious असते, त्या cosmic energy शी इतकी तादात्म्य पावलेली
असते की तम ु च्या नकळत त्या सिद्धी प्राप्त होतात आणि तम् ु हाला ते कधी कधी लक्षातही येत नाही. आता हा
प्रश्न तम्
ु ही मला विचारल्यामळु े तम्
ु हाला मी उत्तर नक्की दे ई न पण हे उत्तर ‘मी’ दे त नाहीये हे लक्षात घ्या कारण
जेव्हा मी म्हणतो कि ‘मी’ हे माझ्या सिद्धी किंवा माझे अनभ ु व तम्
ु हाला सांगतोय म्हणजे माझा ‘अहं ’ मधे आला

आणि जिथे ‘मी’ येतो किवा ‘अहं ’ येतो तिथे आमची योग मार्गावरची गती खट ंु ते, त्यामळ
ु े तम्
ु ही आधी हे समजन ू
घ्या कि ‘मी’ हे तम्
ु हाला सांगत नाहीये..”

ते फार कोड्यात बोलत होते आमच्या अल्प बद्


ु धीला ते समजायला बराच वेळ लागला. त्यांनी पढ
ु े बोलायला
सरु वात केली.

“सगळ्यात आधी वाचासिद्धी प्राप्त होते मग तम् ु ही मनोवेगाने कुठे ही प्रवास करू शकता, म्हणजे फक्त विचारांनी
नव्हे तर कृतींनी, मनानी, बद् ु धिनी, शरीरानी आणि प्राणशक्तिनी सद् ु धा. शरीर सोडून बाहे र प्रवास करून येऊ
शकता, द्विशरीर प्रावर्तन करू शकता (म्हणजे एकाच वेळी 2 वेगळ्या ठिकाणी शरीर रुपात अविर्भाव साधू शकता)
समोरच्याचे विचार तरं ग टिपन ू मनातलं ऐकू शकता. ज्याला मनःपर्याय किंवा telepathy म्हणतात त्याप्रमाणे
एका जागेवर बसन ू ब्राम्हं डातल्या कुठल्याही सर्य
ू मालेतल्या जीवसष्ृ टी असलेल्या कोणत्याही ग्रहावरच्या जीवाशी
मन तरं गानि संवाद साधू शकता.. मक ु ी जनावरे , प्राणी, वनस्पती एवढच नाही तर दगड माती यांच्या भावना समजू
शकता त्यांची भाषा समजू शकता आणि तम ु च्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता, अंतर्दृष्टी, अंतर्ज्ञान,
परकायाप्रवेश, अणु रे णू च्या पलीकडे दृष्टी भेद ू शकता आणि अंगष्ु ठमात्र परु ु षाच्या सहाय्याने या ब्राम्हांडात
कुठल्याही सर्य
ू मालेतल्या कोणत्याही ग्रहावर प्रवास करू शकता... एवढच नाही तर ‘Time Travel’ ही करू शकता
पण कुठल्याही काळात जाऊन काही बदल करू शकत नाही फक्त तिथे जाऊन त्या त्या काळात घडलेल्या घटना
witness करू शकता.. अर्थात ही काळ क्रमणाची सिद्धी प्राप्त व्हायला अनेक शे वर्षांची साधना लागते "

याहून पढ ु च्या बऱ्याच सिद्धी त्यांनी आम्हाला सांगितल्या असत्या पण आमची आ वासलेली तोंडं बघन ू त्यांनी
विषय थांबवला, ते पढ ु े म्हणाले “पण माझ्या अनभ ु वात मी ज्या सिद्धीचा अनभ ु व म्हणन
ू घ्यायचा ठरवला त्या
सगळ्या सिद्धींचा अनभ ु व मात्र फार विचित्र आणि नकारात्मक vibe दे णारा होता.. नको वाटतो तो विलक्षण
खेदजनक आणि भकास अनभ ु व, एक प्रकारचं भय उत्पन्न करणारा.. वासनेच्या गर्तेत लोटणारा.. उत्सकु ते पोटी
त्यांना पढ
ु े विचारलं,

“कोणत्या सिद्धी प्राप्त आहे त तम्


ु हाला?”

त्यांनी बोलायला सरु ु वात केली.. “क्रिया योगातली प्रगती आणि मार्गक्रमण याचं विश्लेषण आपली प्राणशक्ती
व्यवस्थित करू शकते.. प्राणशक्ती म्हणजे मानवी शरीरातील अशी शक्ती जी मानवी शरीरातील आंतरक्रिया
आपोआप करीत असते उदा. श्वास घेणे, अन्न पचवणे, शरीरात प्रवेश केलेल्या virus, bacteria विरुद्ध लढणे
वैगेरे वैगेरे.. तर क्रिया योगी हा शरीरातील प्राणशक्ती ला एका certain attainment नंतर कंट्रोल करू शकतो तो
तिला शरीरातन ू बाहे र काढून या ब्रह्मांडात कुठे ही जागतृ अवस्थेत नेऊन आणू शकतो, द्विशरीर धारण करू
शकतो, एकाच वेळेला 2 वेगळ्या ठिकाणी स्थल ू शरीर रुपात येऊ शकतो वैगेरे वैगेरे.. याचाच पढ
ु े अनभ ु व सांगताना
त्यानीं सांगितलं “असच एकदा साधनेत असताना प्राणशक्ती च्या मक् ु त विहाराला गती मिळाली आणि
मनोवेगाने चंद्रावर जाऊन आलो.. प्रचंड निगेटिव्ह अनभ ु व होता तो.. मला कधी त्या चंद्राच्या पष्ृ ठ भागावरून परत
निघतो असं झालं.. या सिद्धी नाकोश्या वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे या सिद्धींचे दष्ु परिणाम, मानवी
मन आणि शरीरावर होतात.. जे तम् ु हाला साधनेपासन ू भरकटत मोहाच्या क्षणांकडे नेतात.”

ते जे सांगत होते ते मानवी बद्


ु धीला पटण्यासारखं नव्हतं.. पण या सिद्धी बद्दल मी वाचलं होतं..
पण्
ु याचे डॉ प. वि वर्तक याच सिद्धी च्या साहाय्याने मंगळावर आणि गरू ु वर जाऊन आले आहे त असं त्यांच्याच
पस्
ु तकात वाचलं होतं.. NASA चं पाहिलं voyager जे व्हा मं
ग ळावर land होणार होतं त्याआधी मंगळाच्या
वातावरणचं, भग ू र्भाचं, भग
ू ोलाच, हवामानाचं अगदी व्यवस्थित वर्णन करून त्यांनी NASA ला एका report मधे
पाठवलं. जेव्हा ते रोव्हर लँ ड झालं त्यानंतर काही दिवसांनी जी माहिती त्या रोव्हर ने पाठवली ती माहिती डॉ प. वि
वर्तकांच्या माहितीशी तंतोतंत जळ ु त होती. NASA ने त्यांना Certificate of Appreciation आणि फेलोशिप दे ऊन
त्यांचा सत्कार केला. आणि spiritual sicence अशी दे खील एक गोष्ट आहे जी मर्त्य मानवाच्या बद् ु धी पलीकडची
आहे याच्यावर त्यांचा विश्वास बसला. एवढं च नव्हे तर NASA चं पाहिलं मार्स मिशन हे कसं फेल झालं हे दे खील
त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं प. वी वर्तकांच्या ‘ASTRAL TRAVEL TO MARS’ या पस् ु तकात याबद्दल
ते म्हणतात

"Here also my Vijnanamaya Kosha had gone to the Mars. On the 12th of Sept 1976, the docking
did not take place. There was no news either. Then I read news that the program is postponed.
Then the news came that the program is cancelled. Everything happened as I had foreseen. It
was a grand success of spiritual science.

क्रमशः

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu

पण
ु े

Ph: 9881999034

© ALL RIGHTS RESERVED ©

Please visit - facebook profile - for watching related photos and videos

#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#Travelblog
#facebookblogger

हिमालयाच्या वाटे वर - भाग -1 – लेखांक 5 वा

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू

लेखांक 5 – क्रीयायोग - तंत्रज्ञान आणि विश्लेषण

त्यांची या सिद्धी बाबतची गोष्ट ऐकल्यावर मला एक सहज प्रश्न पडला की हे जे अद्वैत आहे ज्याचा अजन ू
science ला शोध लागला नाही या गोष्टी भौतिक शास्त्राच्या नियमांच्या बाहे र आहे त तर मग physics आणि
spiritual science ला कसं differentiate कराल ?

त्यांनी व्यवस्थित फोड करून याच उत्तर दिलं. " भौतिक शास्त्र तेच की जे डोळ्यांना दिसतं किंवा प्रयोगाने
अनभ ु वता येतं किंवा सिद्ध करता येतं आणि दसु रं अध्यात्म शास्त्र जे भौतिक शास्त्रासाठी अद्वैत स्वरूपाचं आहे
आणि भौतिक शास्त्राला काही मर्यादा असल्यामळ ु त असं किंवा खोट पण वाटू
ु े त्यांना ते अतिन्द्रीय शक्तींनी यक्
शकतं.. कारण ते अध्यात्म शास्त्र चार चौघांमध्ये सिद्ध करता येईलच असं नाही. ते प्रत्येकाच्या अध्यात्मिक
उन्नती वर अवलंबन ू आहे आणि ते अनभ ु व व्यक्तिसापेक्ष आहे त.. त्यामळ ु ं भौतिक शास्त्राचे नियम आणि
अध्यात्म शास्त्राचे नियम हे वेगळे आहे त..

भौतिक शास्त्राचे नियमही कोणी शोधले? माणसानेच ना? त्यात तर्क होते, शक्यता (Hypothesis) होत्या.. नंतर
ते काही अंशी सिद्ध झाले तर काही अंशी नाही... Spiritual science चे नियम चं वेगळे त्यामध्येही वेगळं
जीवशास्त्र, रसायन शास्त्र आणि भौतिक शास्त्र समाविष्ट आहे .

“500 वर्षांपर्वी
ू जर तू इथल्या समाजाला सांगितलं असतस की हे एक ‘मोबाईल’ नावाचं यंत्र आहे ज्याने एक नंबर
फिरवला की जगाच्या दस ु ऱ्या टोकावर असलेल्या माणसाशी तम् ु ही बिनतारी संवाद साधू शकता.. तर एकतर त्या
लोकांनी तल ु ा वेड्यात काढलं असतं किंवा जर तू ते तसं सिद्ध केलं असतस तर तल ु ा ते दे व समजले असते..
ज्यांना चमत्काराची भीती आहे ते तल ु ा जाद ू टोणा करणारा मांत्रिक समजले असते आणि बंडखोर समाजामध्ये
जर तझ ु ा जन्म असता तर त ल
ु ा म त्
ृ यू लाही सामोरं जावं लागलं असतं.. तेव्हा कोणी विचार केला होता का भौतिक
शास्त्रामधे मध्ये एवढी प्रगती होऊ शकते की उपग्रहाच्या माध्यमातन ू किंवा ध्वनी तरं गांनी वा चब ंु कीय विद्यत

लहरींनी आपण जगाच्या दस ु ऱ्या टोकावर बोलू शकू.. ? जस तझ ु ं भौतिक शास्त्र या लहरींबाबत सांगतं तसं
अध्यात्म शास्त्र हे मनाच्या / प्राणशक्ती च्या लहरी आणि त्यांच्या अतर्क्य शक्ती बद्दल भाष्य करतं.. आता मी
जो तल ु ा अनभ ु व सांगितला त्यावर तू हसशील, माझ्यावर विश्वास ठे वणार नाहीस, मी भोंद ू आहे आणि लोकांना
काहीही सांगन ू वश मध्ये करतो वेडा बनवतो असं म्हणशील.. पण जेव्हा मी घेतलेला अनभ ु व तू घेशील तेव्हा माझं
म्हणणं तल ु ा पटे ल.. ”

ज्या ज्या शास्त्रज्ञांनी किंवा तत्ववेत्त्यांनी त्यांना आलेले अनभ ु व हे शोधाच्या माध्यमातन ु े आणण्याचा किंवा
ू पढ
दे वाच्या / अद्वैताच्या बाबतीत काही वेगळी विधानं करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या वाट्याला त्या त्या वेळच्या
समाजाकडून मत्ृ यू लाच समोर जावं लागलं. Jesus Christ मत्ृ यच ू कारणही हा समाजच होता जो नवीन गोष्ट
पटकन मान्य न करता जिथे त्यांच्या भावना गत ंु ल्या आहे त तिथे विरोध होऊन त्या दख
ु ावल्या गेल्या तर बंडखोर
होतात.. मग चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार ते करत नाहीत..

तर थोडक्यात सांगायचं तर जे तझ् ु याकडे आहे ते आत्मज्ञानाने / अद्वैत स्वरुपात ओळखणे इथन ू अध्यात्म
शास्त्राची सरुु वात होते आणि तेच द्वैत स्वरुपात मर्त ू रुपात निसर्गामध्ये असलेल्या साधनांनी प्रत्यक्षात
आणण्याचा प्रयत्न करणे इथन ू भौतिक शास्त्राची सरु वात होते. पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायाने ते आत्मज्ञानाने
ओळखता येऊ शकते पण त्यासाठी साधनेची गरज आहे .
मी पढ ु चा प्रश्न त्यांना विचारला.. “आता हे योगी / यती एक एक दोन दोन दिवस/आठवडे/महिने/वर्ष सलग जागचे
न हलता साधनेला बसतात, ही पातळी केव्हा येत? े म्हणजे शरीर धर्म, शरीर वेदना रहित अवस्था कशी येऊ
शकते? कारण सामान्य माणसाला ध्यानाला बसल्यावर शरीर मर्यादांमळ ु े एका जागेवर फार काळ बसता येत नाही.

त्यांनी एक वाक्यात याचं उत्तर दिलं.. “साधनावस्थेत जेव्हा साधनेतल्या अनभ


ु वांचं सख
ु हे शारीरिक वेदनांपेक्षा
पेक्षा जास्त असतं तेव्हा आपोआप शरीराचा विसर पडतो.. ती पातळी येण्यासाठी बराच काळ लोटावा लागतो. ”

“मळु ात डोळे मिटून स्वस्थ बसणं हे साधन नव्हे . तू एक तास बसलास त्यात productive साधना किती झाली हे
सांगणं कठीण आहे म्हणजे सगळ्यात आधी डोळे मिटून बसल्यावर काल काय झालं? मग उद्या मी कुठे जाणार?
माझं भविष्य कसं असेल? वैगेरे असंख्य विचार येऊन जातात.. अर्थात ते स्वाभाविक आहे .. कारण तू रिकामा
बसला आहे स मग क्षणात हे असंख्य विचार येणं साहजिक आहे .. म्हणन ू कोणत्याही योगात आपल्या श्वासावर
लक्ष केंद्रित करा असं सांगतात.. म्हणजे या असंख्य विचारांना जरा diversion मिळे ल.. तम्
ु ही श्वास जसा
चाललंय तसा चालू दे ता.. पाऊण तासांनी कुठे तम
ु च्या मनातले हे असंख्य विचार कमी होऊन तम ु च्या श्वासाला
एकसंधता येत.े आता यापढ ु ची अवस्था अनभु वणे आणि त्याची मजा घेणे हे होण्याआधी तमु च्या पायाला मग्ंु या
येतात आणि तम् ु ही म्हणता आता बास एक तास बसलो आज.. पण productive साधन किती झालं हे
आपल्यालाच माहीत असतं.”

निर्विकार आणि निर्विचारी मन बनण्यासाठी मळ ु ात आपल्या insecurities (असरु क्षितता) , भय आणि


वासनांपासनू मक् ु ती मिळायला हवी.. या वेळी साधन आपल्याला खेचतं. ते करण्यासाठी मांडी घालन ू डोळे मिटून
बसावं लागत नाही.. ते आपोआप शारीरिक क्रिया घडवतं, कधी कधी झोपेतही साधना होते. प्रत्येकाचा साधना
प्रवासच ज्याला त्याला हा अनभ
ु व दे तो.. प्रत्येकाचा तो वेगळा असल्याने असं ठोस प्रमाण सांगता येणार नाही..
कोणी असाही असतो जो प्रचंड साधनेचे baggage (संचित) मागच्या अनेक जन्मातन ू घेऊन आलाय त्याला डोळे
मिटल्या मिटल्या साधनेतल्या उच्चांक पातळी चा अनभ ु व ये तो.. कारण अने क जन्मापास न
ू तो ही अवस्था
येण्यासाठी प्रयत्न करत असतो..

मनध ु र्मप्रमाणे प्रत्येक जन्मात त्याला याची स्मत


ृ ी नसेलही कदाचित, पण त्याच्या आजब
ू ाजच
ू ं वातावरण, आणि
त्याला या नवीन जन्मात भेटणारी माणसं ही अशीच भेटतात जी त्याची साधना मार्गात उन्नती करतील.. आणि
मागच्या जन्मातला हा प्रवास या जन्मात चालू ठे वतील. प्रत्येक भेटीचा योगायोग ठरलेला, जो आपल्या मर्त्य
बद्
ु धीला न समजणारा..”

मला त्यांचं हे बोलणं ऐकताना जगन्नाथ कंु टे यांच्या ‘प्रकाशपत्र


ु ’ या पस्
ु तकाची आठवण झाली त्यातही कराड
मधल्या एका खेडग े ावात कृष्णा काठच्या एका गरीब घरात जन्मलेल्या रघन ु ाथ ला शंकर महाराजांच्या
आदे शावरून जगन्नाथ कंु टे साधना मार्गावर आणतात.. अनेक जन्माचं baggage म्हणन ू आधीच साधना मार्गात
संपन्न असलेला रघन ु ाथ त्याच्या वयाच्या लहान वयापास न
ू च 3/3 दिवस सलग साधने त राहू लागतो आणि शंकर
महाराज, जगन्नाथ कंु टे यांच्या माध्यमातन ू रघनु ाथला कुरवपरू , बंगाल, काशी, वाराणसी असे तीर्थाटन घडवन ू
शेवटी ऋषिकेश मधल्या एक आश्रमात त्याला त्याच्या पर्व ू जन्मीच्या गरू ु ं ची भेट घडवनू दे तात ज्यांच्या प्रेरणेने हा
पढ
ु े साधने ला हिमालयात जातो..

काही योग ् असल्याशिवाय कोणी जवळ येत नाही.. ऋणानब ु ध


ं नसतील तर साधं कुत्र ही तम ु च्या जवळ येत नाही..
आणि तम ु च्या आयष्
ु यात घडणाऱ्या प्रत्ये क घटना या कोणत्यातरी कारणाने घडत आहे त याचा तम्
ु हाला विश्वास
बसायला लागतो.. ती लिंक असते.. एक प्रकारचं वायरलेस कनेक्शन असतं, तम ु चं आणि तम ु च्या गरु
ु ं च जे अनेक
जन्म तम ु ची पाठ सोडत नाहीत.. कुठल्या ना कुठल्या योगा योगाने ते तम् ु हाला भेटतात. ज्या मार्गावर तम ु ची
प्राणशक्ती मागच्या जन्मी होती त्या मार्गावर अलगद बोट धरून आणन ू सोडतात आणि तम् ु हाला याची कल्पना ही
नसते..

आयष्ु यात घडणाऱ्या वाईट, दःु खद, त्रासदायक घटनांचे सद् ु धा काही नियम आहे त.. एकतर तम ु च्या प्राणशक्ती ने
तो त्रास कुठल्या तरी जन्मात किंवा याच जन्मात दस ु ऱ्या प्राणशक्ती ला दिलेला असतो.. त्याची परतफेड म्हणन ू
तो तसच किंवा काही वेगळा त्रास तम् ु हाला भोगावा लागतो. कधी कधी प्राक्तनातलं मोठं दःु ख त म
ु चे ग रू

थोडक्यावर धकावतात.. त्यामळ ु े काही कारण नसताना उगाच उद्भवलेले त्रास, मनस्ताप, शारीरिक वा मानसिक
त्रास, आधीभौतिक त्रास हे आपले गरू ु किंवा ती परशक्ती आपल्याला दे ऊन आपले भोग आणि मोठे त्रास संपवत
आहे अशी भावना असावी.

प्रारब्ध, प्राक्तन आणि संचित हे तिन्ही शब्द वर वर सारखेच वाटत असले तरी प्रत्येकाचा अर्थ आणि भावना
यामध्ये फरक आहे .. आयष्ु यात जे चांगलं होतं ते, पर्व ू कर्म आणि प्रारब्धातल्या ठरलेल्या गोष्टी यांवर अवलंबन ू
असतं. पण जे प्रारब्धात नाही ते दे णं हे फक्त गरू
ु ं ना जमू शकतं. त्यामळ ु े सद्गरू
ु ं च स्थान हे दे वापेक्षा श्रेष्ठ मानलं
जातं. प्राक्तन हे तमु चे भोग आहे त जे त म्
ु हाला सं पव न
ू च पढु े जायचय आणि संचि त हे तम
ु च्या गण ु दोषांच आणि
कृती कर्मांच baggage आहे . ते ओझं तम ु ची प्राणशक्ती गेली अनेक जन्म आणि कदाचित पढु चे अनेक जन्म
वाहात आलीये आणि कदाचित पढ ु े ही नेणार आहे , साधनेने हे ओझं आपल्याला कमी करायचय.

त्या बाबांच्या मते क्रिया योग ् हा सद्


ु धा एक भ्रम आहे . मनावर ताबा ठे वायचा हा एक मार्ग आहे . धार्मिकता हाही
एक भ्रम च आहे . “एखादा दे व कसा दिसत असेल ही मानवी कल्पना आहे . आणि जे मनाच्या आणि कल्पनांच्या
पलीकडे आहे ते अव्यक्त आहे , निर्गुण आहे .. आणि त्या निर्गुणाला ओळखणे त्यासाठी साधना करणे हे अध्यात्म
आहे .. अध्यात्म कुठल्याही धर्मात कधीच वर्गीलेलं नाही.. अव्यक्त ला व्यक्त कधीच करता येत नाही पण त्याचा
अनभ ु व मात्र घेता येतो जो प्रत्येक प्राणशक्तीचा वेग वेगळा आहे . अव्यक्तवस्थेत ‘स्व’ ला शोधणे ही साधना आहे ..
डोळे मिटून बसणे ही फक्त कृती झाली.

आपल्या शरीरात आपण त्या प्राणशक्तीला कैद केलंय आपल्या भावनांमध्ये, कामनांमध्ये वासनांमध्ये, तिला
आपल्याला मक्
ु त करायचंय या सगळ्यातनू कारण ते चैतन्य हे तेच आहे ज्याने हे विश्व निर्माण झालं. तर त्या
energy शी आपली energy match होणे या आधी आपल्याला ती प्राणशक्ती वासनामक् ु त करायला हवी..

आपण कित्येक जन्मापासन


ू आपली एक रील बनवलीये एखाद्या चित्रपटप्रमाणे आता त्याच रील ला आपल्याला
साफ करायचंय अनेक जन्मांच्या चांगल्या वाईट कर्मांचं करून ठे वलेलं baggage हे first in first out या मेथड
ने बाहे र काढायचं..

साधना हीच आहे जे हे तम ु चं baggage पस ु न


ू टाकेल.. प्रत्येक प्राणशक्तीला मनष्ु य जन्म काही करणासाठी
मिळालाय ते कारण जर आयश्ु यात समजलं तर आपोआप त्या मार्गावर जगणं होतं आणि मनष्ु य जन्माचं सार्थक
होतं.. आता प्रत्येक व्यक्ती त्या साध्यापर्यंत पोहोचेलच असं नाही कारण अनेक व्यक्ती या आयष्ु याचं खरं साध्य
काय आहे हे समजन ू न घेता पशस ु मान आयष्ु य जगत असतात.. त्यांना ते तसं आयष्ु य जगण्याची बद् ु धी ही ती
पराशाक्तीच दे त.े पण एक पाउल जर आपण त्या साध्याच्या शोधासाठी टाकलं तर तीच पराशक्ती शंभर पावलं पढ ु े
येऊन तम्ु हाला तम ु च्या साध्यापार्यंत पोहोचायला मदतही करते. प्रत्येक व्यक्ती कळतं न कळतं कुठला ना कुठला
योग मार्गच तर अवलंबत असतात, बद् ु धियोग, सन्यासयोग, राजयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, धर्म योग, क्रिया योग,
भक्तियोग हे च तर आपण जगतोय.. जो मनष्ु य नास्तिक आहे तो पण योगीच आहे कारण तो बद् ु धी योग आणि
कर्म योगावर विश्वास ठे वणारा आहे ..

ईश्वराचा खरा अनभ ु व म्हणजे कालमानाप्रमाणे स्वतः मध्ये झालेले बदल आहे त . 10 वर्षांपर्वी
ू आपण काय आणि
कसे होतो आणि आता कसे आहोत हाच तर ईश्वरी अनभ ु व आहे . आपलं शरीर, मन, प्राणशक्ती हे सगळं एकत्रित
पणे एक मशीन आहे असं मानलं तर त्याच्या बटनावर, पार्टस वर लागलेला गंज काढण्याचं काम साधना करते
आणि आतन ू बाहे रून शद्
ु ध करते मग अपोआप च आपल्या आतलं spiritual science ऍक्टिव्ह होऊन ज्या गोष्टी
बाह्य यंत्रांनी होतात त्या आपण अध्यात्म मार्गाने आतन ू च करू शकतो.. आणि यालाच तर सिद्धी म्हणतात..
म्हणजे telepathy connection असो, एखाद्याच्या मनातले भाव ओळखणं असो वा मनोवेगाने विहार असो.
मत्ृ यलू ोकात ज्या गोष्टींना चमत्कार म्हं टल जाईल त्या गोष्टी मानवाला सहज शक्य आहे त. बऱ्याचदा उघड्या
डोळ्यांनी पाहिलेल्या आणि वर्तमानात अनभ ु व घेतलेल्या गोष्टी या अनेक अविस्मरणीय अनभ ु व दे ऊन जातात..
पण आपण भत ू काळात किंवा भविष्य काळात जास्त जगत असल्यामळ ु धीत किंवा मनानी
ु े वर्तमानात शद्
जागत ृ ावस्थेत नसतो आणि हे च कारण आहे की आपण आपल्या खऱ्या क्षमता ओळखू शकत नाही .”

क्रमशः

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu

पण
ु े
Ph: 9881999034

© ALL RIGHTS RESERVED ©

Please visit - facebook profile - for watching related photos and videos

#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#Travelblog
#facebookblogger

हिमालयाच्या वाटे वर – लेखांक 6 वा – अद्वैताचे गढ


द्वैत आणि अद्वैताचं कोडं सोडवताना ते यती म्हणाले की “कुठल्याही कार्यात 'मी' आला तर ते द्वैत झालं.
म्हणजे ती ‘पराशक्ती’ आणि ‘मी’ अश्या अर्थाने हे दोन्ही जिथे एकत्र मिळून एखादं कार्य करतात ते झालं ‘द्वैत’
पण जिथे ‘मी’ मरतो तिथे अद्वैताचा प्रवास सरु
ु होतो..

अद्वैतात कुठलीही इच्छा नाही आणि म्हणन ू च खरा आनंद आणि समाधान आहे . कुठल्याही इच्छे विना मन
स्थिर, जिथे मन स्थिर तिथे श्वास स्थिर आणि जिथे श्वास स्थिर तिथे शरीर स्थिर. आणि स्थिर शरीराला समाधी
अवस्था साधायला वेळ लागत नाही कारण तिथे शारीरिक क्लेश आणि शरीरधर्म माणस ू विसरून जातो.

अनेक वर्ष श्वास नं घेता, अन्न पाणी न घेताही साधनेत जागत ृ ावस्थेत किंवा जिवंत राहू शकणारे यती ही आहे त.
हे यती शरीर जिवंत ठे वण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीही स्वतःच उत्पन्न करू शकतात. शब्दशः प्रकाशसंश्लेषण
किंवा Photosynthesis जी क्रिया वनस्पतींमध्ये होते ती स्वतःच्या शरीरामध्ये घडवन ू आणू शकतात, आणि
अन्य काही योगिक क्रियांनी आपल्या पडजिभेतन ू असे रस उत्पन्न करू शकतात जे साधने त तम
ु च्या शरीराला
पोषण दे ऊन अगदी कुठल्याही वातावरणात तग धरून, टिकवन ू ठे ऊ शकतील.

आता या सगळ्याचं मळ
ू म्हणजे ‘इच्छा’ ही मनामळ ु े बनते जी पर्ण
ू करण्याच्या नादात बद्
ु धी ही भ्रष्ट होऊ शकते..
पण जिथे इच्छा उरत नाही तिथे.. अद्वैताचा मार्ग सरु
ु होतो.

आता मत्ृ यल ू ोकात जन्माला आलेल्या काही जीवांना जन्मतःच वाचासिद्धी किंवा ज्याला आपण sixth sense
म्हणतो तो असतो. किंवा काही असामान्य गोष्टी करण्याची क्षमता असते किंवा काहींचा बध् ु यांक इतका प्रचंड
असतो की ते माणसांमधल्या असामन्य वर्गात मोडतात. काहींच्या शारीरिक क्षमता असामन्य असतात, हे
कशामळ ु े ? तर अर्थातच त्यांच्या पर्व
ू जन्मातल्या योगिक संचीतामळ
ु े . मग तो अनक्र
ु मे बद्
ु धियोग, ज्ञानयोग
कर्मयोग,भक्तीयोग, हटयोग कोणताही योग असो.

ते पढ ु े म्हणाले “सगळ्यात जास्त परीक्षा त्यांची असते जे त्या अद्वैताचा किंवा सोप्या भाषेत दे वाच्या किंवा
दे वत्वाच्या अगदी जवळ येऊन पोहोचले आहे त.. त्यांचा संघर्ष वेगळाच आहे . आणि त्यांच्या फसण्याच्या शक्यता
जास्त आहे त. मायेत प्रचंड आकर्षण आहे त्यामळ ु े एका अत्त्यच्
ु च पातळीला जर त्या यतींचा तोल ढळला तर पन् ु हा
पहिल्यापासन ू गाडी रुळावर आणावी लागते..
उदाहरणार्थ - रावण आणि हनम ु ान हे अद्वैताच्या किंवा दे वत्वाच्या 9 व्या शिडी पर्यंत आले होते. भगवान शंकराने
त्याचं आत्मलिंग रावणाला दे ऊन लवकरच तू दे वत्वास पात्र होशील असा आशीर्वाद दिला 10 व्या शिडीला
दे वत्वासाठी ची शेवटची परीक्षा होती त्याला साजेल अशी शक्ती, भक्ती, बद् ु धी, साधना आणि दे वत्व
साधण्यासाठीचे सगळे गण ु दोघांमध्ये सारखेच होते.. फरक एवढाच होता की हनम ु ान हा रामाला पर्ण
ू पणे समर्पित
होता. एखादी गोष्ट रामाने सांगितल्याशिवाय तो करायचा नाही किवा हनम ं ु ानाला तझ् ु याकडे एवढी शक्ती आहे
याची आठवण रामाला किंवा जाम्बव ु न्ताला करून द्यावी लागायची कारण भक्ती योगात हनम ु ान सगळ्यांच्या पढु े
होता.. तो कधीच स्वतः ला सर्वश्रेष्ठ म्हणवन ू घेत नसे. आणि आपोआप च त्याच्या 'मी' चा त्याग झाला आणि
तिथे राम हा त्याचा अद्वैत होता.. रावणाच्या बाबतीत असं झालं नाही.. तो अहं कारी होता.. शंकराचा सर्वश्रेष्ठ
भक्त असन ू ही त्याने त्याची मनमानी केली आणि स्वतः ला दे व समजन ू कैलास लंके ला न्यायचं आणि नवग्रह
वेठीस धरायचं दःु साहस करू लागला आणि दे वत्वाच्या नवव्या शिडीवरून पढ ु े जाऊ शकला नाही.. तात्पर्य एवढं च
की त्या अद्वैतापर्यंत पोहोचण्याचे अतोनात कष्ट करूनही काही योगींना ते जमू शकलं नाही.. त्यामळ ु े एखाद्या
अद्वैत शक्तीच्या बाबतीत समर्पित भाव आणि आयष्ु यात तू एखादी अवघड गोष्ट ही साध्य करू शकशील असं
विश्वासाने सांगणारा एकतरी जवळचा माणस ू अस्तित्वात असेल तर एखाद्या क्षुल्लक मानवालाही काही अशक्य
नाही.

त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही logical होती त्यामळ ु े जरी ते अतर्क्य काही बोलत असले तरी त्यांना आम्हाला
कुठे च counter करता येत नव्हतं. त्यांना असलेल्या सिद्धींबद्दल ते फार बोलत नव्हते द्विशरीर धारण करणे
आणि मनोवेगाने ब्रम्हांडात विहार करणे यापढ ु े फार ते त्यांच्या बाबतीत बोलले नाहीत.. ‘बहुत बेकार चीझ है ये
सिद्धीया.. फसने के मौके आते है .. सिद्धींचा उपयोग करून बघितल्यावर पहिला अनभ ु व खऱ्या योगी ला येतो ते
म्हणजे हे सिद्धी वैगेरे बेकार आहे त्यात अडकायला होतं. बोलता बोलता पढ ु े ते म्हणाले “इस दन ु ागिरी मे बहुत
बडा रहस्य छुपा है .. पांडव आये होंगे तो कही न काही कृष्ण भगवान का संपर्क रहा होगा.. और कलियग ु मे बाबाजी
ने भी यही स्थान चन ु ा साधना क े लिये .. तो अध्यात्म मे ये सबसे महान जगह मानी जाती है ..” म त
ृ सं
ज ीवनी चा
विषय काढल्यावर म्हणाले स्वतः हनम ु ानाला ती सापडली नाही म्हणन ू तो अक्खा पर्वत उचलन ू नेला तर मर्त्य
माणसाला काय समजणार..

माझा पढ
ु चा प्रश्न हा जरा वेगळा होता, त्यांना विचारलं –

“एखाद्याने ध्यान केलं, साधना केली, आत्मोन्नती झाली, एकाग्र मनाला वासनामक्
ु त गती मिळाली, सिद्धींच्या
मोहांवर मात केली, अचेतन मनाला त्या पराश्क्तीची मदत मिळून सद्गती मिळून समाधी अवस्था आली पण मग
पढ
ु े काय? म्हणजे हे कशासाठी, याचा शेवट कुठे ? त्याचं फलित काय? यातन
ू मिळणारा आनंद कसा वर्णन कराल?
किंवा जर तो अद्वैत आहे अव्यक्त आहे आणि वैयक्तिक आहे तर तो मोजणार कसा..”

मला थोडक्यात त्यांना विचारायचं होतं सगळ्या चेतन मनाच्या इच्छा, आकांक्षा, कामना, वासना ज्या कायम
आपल्याला हव्या हव्याश्या वाटतात त्या सोडून एखादा माणस ू सख ु ी कसा होऊ शकेल म्हणजे त्या साधना
अवस्थेत किंवा समाधी अवस्थेत साधकाला काय असं मिळतं ज्यासाठी शरीराच्या सगळ्या सख ु ांचा परित्याग
करण्याची बद्
ु धी त्याला होते ? शारीरिक, मानसिक वे गवे गळ्या प्रकारच्या सखु ां ना त्यागन
ू असं कोणतं परमसख ु
आहे जे या सगळ्या सख ु ांहून वरचढ आहे ? .

त्यांचं उत्तर : “ आता पन्


ु हा हे अव्यक्त आणि अद्वैत आहे त्यामळ ु े स्पष्टीकरण दे ता येण अवघड आहे पण
स्वानभ ु वावरून सांगतो तझ् ु या पर्यंत पोहोचलं तर ठीक, कुठल्या ही भौतिक सख ु ात मानवी में द ू मध्ये एक
विशिष्ठ प्रकारचा स्त्राव स्त्रवतो ज्यामळु े त्या तात्परु त्या सख
ु ाची अनभ ु तू ी आपल्या में दल
ू ा, पर्यायाने मनाला आणि
शरीराला होते. एखाद्या गोड नात्यातलं संभाषण असो, एखादा आवडीचा पदार्थ आपण खात असो, एखाद्या
आवडीच्या व्यक्तीला आपण भेटत असो, एखाद्या भौतिक गोष्टीचं आकर्षण असो, आपल्या वैयक्तिक आयष्ु यात
छोट्या पासन ू मोठ्यापर्यंत मिळालेलं कोणतही यश असो, शारीरिक संबध ं ातन
ू उत्पन्न झालेलं सख ु असो किंवा
एखादं आवडीचं कर्म करून मिळालेलं समाधान असो. एखाद्या कामासाठी लोकांची मिळालेली वाहवा असो किंवा
दसु ऱ्याला मदत करताना मिळणारं समाधान असो या प्रत्येक घटने मधे मानवी में दत ू ला एक विशिष्ठ प्रकारचा
स्त्राव स्त्रवतो ज्याला आपण (dopamine secretion) म्हणतो. ते सख ु मानवी में द ल
ू ा तेवढ्यापरु तं प्राप्त होतं जे
तल ु ा पंचेन्द्रीयानी अनभ ु वता येत.ं
तर हे झालं तात्परु तं सख ु जे कालांतराने विरून जातं.. आता त्यात समाधान हि संज्ञा वैयक्तिक आहे . ते सख ु ी
माणसाला मिळे लच याची शाश्वती नाही.. सख ु ी माणसाला अजन ू काही मिळण्याची कामना असली तर तो
समाधानी होऊ शकत नाही. मग विचार कर ते तात्परु तं secret होणारं dopamine जर सतत में दम ू ध्ये स्त्रवायला
लागलं तर काय होईल? ती अवस्था समाधीत असते. म्हणजे वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टीत सख ु आहे कारण
तझ ु ा में द ू तिथे dopamine secret करून तो स्त्राव तल ु ा त्या सखु ाची तात्परु ती प्राप्ती करून दे तोय जे व्हायला
तल ु ा कुठल्या तरी बाह्य वस्तच ू ी किंवा व्यक्तीची किंवा खाद्यपदार्थाची गरज पडतीये.. तल ु ा एखादी गोष्ट आवडते
त्याचं direct connection हे तझ् ु या में दशू ी आहे . हि सतत ची अवस्था तलु ा साधने त मिळते . म्हणजे मर्त्य
माणसाला त्याच्या शारीरिक धर्म आणि शारीरिक गरजा मधन ू जे सखु मिळते ते किंवा त्याहून अत्त्यच् ु च प्रतीच
सख ु हे त्याची प्राणशक्ती साधना अवस्थेत वा समाधी अवस्थेत अनभ ु वत असते. जे विश्वास ठे वण्याच्या बाहे र
आहे किंवा आपल्या में दच् ू या क ु वतीच्या वा आपल्या विचारां च्याही बाहे रचं आहे कारण हा अनभ ु व अद्वैताचा आहे
जो अव्यक्त आहे आणि जो ज्याचा त्याने अनभ ु वावा तो सांगता येत नाही.

अनेक वर्षाच्या साधने नंतर जेव्हा 1 मिनिट सलग श्वास नं घेताही तझ ु ं शरीर तग धरतं आणि विशेष म्हणजे
तझ्
ु या शरीराला मनाला आणि प्राण शक्तीला ही जाणीव ही नसते कि सलग एक मिनिट तू श्वास न घेता साधनेत
होतास तेव्हा तो परमोच्च सखु ाचा स्त्राव में दम
ू ध्ये चालू होतो आणि तो इतका खरा असतो की तो साधकाला सतत
हवाहवासा वाटतो..”

“म्हणनू मग आता साधनेचा मोह हा सद् ु धा साधनेला घातक असा प्रश्न पढ ु े तम्
ु हाला पडू शकतो, जी गोष्ट हवी
हवीशी वाटते ती इच्छा आहे आणि ती जोपर्यंत पर्ण
ू होत नाही तोपर्यंत माणस ू अतप्ृ त, मग ती इच्छा समाधी
अवस्थेतलं सखु मिळवण्यासाठी ची असो किंवा स्थल ू शरीराची वासनापर्ती ू असो.. असं तम् ु हाला वाटे ल पण तसं
नाहीये. कारण, मागणी करणारं स्थलू शरीर हे द्वै
त अवस्थे त इच्छां मध्ये अडकलं आहे म्हणजे जिथे तम ु च्यातला
‘मी’ आणि ती पराशक्ती या दोन्हीचा समावेश आहे , इथे तमु चा ‘मी’ अजन ू मेला नाहीये.

आता समाधी अवस्थेतलं शरीर हे दे खील पर्ण ू त्वाच्या किंवा समाधी अवस्था मिळण्याच्या इच्छांमध्ये अडकलेलं
असलं तरी ती इच्छा तमु ची नसन ू किंवा तम
ु च्यातल्या ‘मी’ ची नसनू तम ु च्यातल्या त्या पराशाक्तीची आहे
म्हणजेच अद्वैताची आहे .. इथे तम ु चा मी मेला आहे , थोडक्यात त्या अवस्थेतली सख ु ाची समाधानाची demand
किंवा इच्छा किंवा आकांक्षा, कामना, वासना ही तझ ु ी नसनू तझ्
ु यातल्या त्या पराशाक्तीची आहे .

मी आणि केतन निःशब्द होतो.. आम्हाला कळतही होतं, पटतही होतं पण बरं च समजायला जड जात होतं. काही
काळ शांतता पसरली.

पढ
ु े ते म्हणाले काही लोकं म्हणतात तासनतास ध्यान करण्यापेक्षा 5 मिनटं केलेलं ध्यान पष्ु कळ आहे पण त्यांना
काय माहीत तासनतास बसल्यावर कुठे 5 मिनिटांचं उत्पादक ध्यान होईल. ..

“कोई केहता है भरे पेट ध्यान नही करना चाहीये, खाते वक्त ध्यान नही करना चाहीये, तो अगर वो ध्यान हमे खिच
रहा है .. तो वो कभी भी खिच सकता है .. कोई नियम नही है .. यही अव्यक्त और निःशब्द भाव है .. कई दफा खल
ु ी
आंखे और बात करते हुए भी ध्यान हो सकता है । तो उसको क्या गलत कहें गे आप? .. अगर आपको ध्यान हो राहा
है और मझ ु े समझ नाही आ रहा तो उसको क्या कहें गे आप? तो इसलीये इसे अव्यक्त कहा गया है ..
ते सांगत होते हिमालयात असेही योगी आहे त ज्यांची श्वासरहित अवस्था म्हणजेच निर्विकल्प समाधी लागलीये..
म्हणजे ते जिवंत आहे त पण श्वास घेत नाहीत.त्या योग्यांची चेतना इतकी विकसित होते की ते थेट सर्या
ू कडून
उर्जा घेऊन विना अन्न पाणी आणि श्वास राहू शकतात..

मनःशक्ती च्या बाबतीत बोलताना त्यांनी फार छान उदाहरण दिलं-

“ये द्रोणागिरी हनम


ु ान जी ने कैसे उठया? ..मानलो ये 5 किलो का वजन है । ये आपके मन ने मान लिया आपके
लिये ये कठीण है । तो हो ही नही पायेगा आपसे. अब हनम ु ानजी ने ये सोचा होता की मै ये नही उठा सकता तो नही
हो पाता.. तो ये सब मन की शक्ती का कमाल है जो हनम ु ानजी ने श्रीराम को समर्पित कि थी. जो परु ी शरणागत
भाव से थी जिसमे ‘अहं ’ नाही था, अद्वैत (श्रीराम) था, भक्तियोग था जो सबसे श्रेष्ठ माना गया है । तो ये सब
इच्छा शक्ती का तो कमाल है । ये समझीये बात, कोई चीझ आप मान लेते है तो भारी लागता है और नही मानते
तो हलका लागता है ।”

अगदी मोजक्या शब्दात आयष्ु य जगण्याचं गह् ु य सांगन


ू गेले ते यती. दृष्टिभ्रम ओळखन ू , वास्तवादातही
मनःशक्ती व इच्छाशक्ती च्या जोरावर माणस ू अशक्य ते शक्य करू शकतो असा विश्वास त्यांनी दिला. क्रीयायोगी
लाहिरी महाशय यांचे शिष्य श्री यक् ु तेश्वर महाराज यांच्या ‘Holy Science’ नावाच्या पस् ु तकाचा संदर्भ दे त त्यांनी
उदाहरण दिलं कि त्या पस् ु तकाप्रमाणे हे ब्लॅ क होल्स / वर्म होल्स म्हणजे वेद शास्त्रानस
ु ार विष्णचू ी नाभी आहे ..
त्याच्या चारही बाजन
ू े ब्रम्हांड फिरतय..

“जिस सर्य
ू माला कि जो पथ् ृ वी उस नाभी के निकट रहती है वह पथ् ृ वी पे सत्ययग
ु । उससे थोडा दरू हुए किसी
अलग आयाम कि अलग सौरमंडळ कि पथ् ृ वी पे त्रेता यगु । ऊससे थोडा और दरू जाओ तो द्वापार और थोडा दरू
हो तो कलियग ु ।. तो नाभी के जो निकट है जहाँ समय रुक जाता है वहा जो यती साधना कर रहे है उनकी तो उमर
ही नही बढती.. ब्रह्मांड मे अनेक सौरमंडल है । अगर आज मै ये पथ् ृ वी पे हुं और मैने यहा अच्छे कर्म किये साधना
की तो मै वो नाभी के निकट वाले सौरमंडल मे स्थित पथ् ृ वी पे पैदा हो सकता हुं। जहाँ सत्ययग ु कि वजह से बहुत
प्रगत चेतना होती है जिससे मै वहा विष्णनु ाभी मे शायाद समा जाऊ ।”

“जब श्वास शरीर और मन तिनो का संबध ं तट ू गया वही तो ईश्वर है .. जहाँ कुछ नही है वही सबकुछ है ”
असं शेवटचं कोड्यात टाकणारं वाक्य म्हणन ू त्यांनी आमचा निरोप घेतला.. आम्ही बराच वेळ सन् ु न होतो
द्रोणागिरी च्या पायथ्याशी असं काही बोधामत ृ मिळे ल याची कल्पनाच नव्हती कधी त्यांच्याशी गप्पा मारताना 2
तास कसे निघन ू गेले कळलंच नाही.. ते बोललेला शब्दनशब्द विसरूच शकत नाही. त्यांनी त्यांचा फोटो मात्र
आम्हाला घ्यायची परवानगी दिली नाही. इच्छा नसतानाही अचानक आम्हाला अधिभौतिकात यावं लागलं. कारण
आम्हाला आता उशीर झाला होता.. अंधार पडायच्या आत कौसानी ला पोहोचणं शक्य नव्हतं पण तरीही जेवढं
लवकर पोहोचू तेव्हडं आमच्यासाठी चांगलं होतं. आम्ही लगेच जोशींचा निरोप घेऊन कौसानीच्या वाटे वर निघालो.

क्रमशः

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu

पण
ु े

Ph: 9881999034

© ALL RIGHTS RESERVED ©


Please visit - facebook profile - for watching related photos and videos

#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#Travelblog
#facebookblogger

हिमालयाच्या वाटे वर –भाग -1


लेखांक 7 वा – साद दे ती हिमंशिखरे ...

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू

त्या महात्म्यांशी गप्पा मारण्याच्या ओघात आता एवढा उशीर झाला, की पोहोचे पर्यंत रात्र होणार हे निश्चितच
होतं. त्यांचं एवढं जड तत्वज्ञान ऐकून डोक्याला अक्षरशः मग्ंु या आल्या होत्या..कारण ते जे बोलत होते ते आमच्या
आकलनाच्या बाहे रचं होतं..केतन चा तर विषय एव्हाना संपलाच होता.. complete level.. गाडीतला एकमेव तोच
DJ असल्यामळ ु े त्याने मोठ्या आवाजात दं ग्याची तेलगू गाणी लावायला सरु वात केली 😄. बरं च अंतर पार
केल्यावर आता आम्ही कौसानी च्या घाटात जाऊन पोहोचलो. किर्रर्र झाडी, डावीकडे पहाड.. उजवीकडे झाडीतन ू
डोकावणारी प्रचंड मोठी दरी, सिंगल रोड आणि त्यात पावसाळी वातावरण. शेवटी रात्री 8.15 वाजता आम्ही
कौसानी ला पोहोचलो.. इथे येण्याचं मख् ु य कारण म्हणजे इथन ू सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसणाऱ्या
हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वत रांगा. अंदाज घेऊन तसं हॉटे ल book केलं.

कौसानी ला ‘स्टारगेट’ नावाची sky gazing observatory आहे जिथन ू आम्ही अनेक ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करू
शकणार होतो. पण दर्दैु वाने आकाश क्लिअर नसल्यामळ ु े हा योग नाही असं आम्हाला वाटलं. observatory मध्ये
फोन केला.. आकाश मोकळं झालं तर कॉल करतो ते म्हणाले आणि अगदी पढ ु च्या अर्ध्या तासात आकाश मोकळं
झालं.. इतकं मोकळं की याआधी एवढं क्लिअर आकाश कौसानीतन ु direct सहा महिन्यापर्वी ू दिसलं होतं असा
त्या observatory चा दावा होता. इथे एवढं स्वच्छ आकाश कधी बघायला मिळालं तर उघड्या डोळ्यांनी आपल्या
आकाशगंगेचा पट्टा दिसतो.

त्यांचा फोन आला, आम्ही निघालो. जरा आकाशाबद्दल जज ु बी माहिती घेतल्यावर टे लिस्कोप जवळ गेलो
clusters, nebulas, Orion, mars, ghost of Jupiter, Jupiter, Neptune, वेगवेगळ्या राशी आणि नक्षत्र यांची
मेजवानी झाली.. असीम फौंडेशन च्या लेह मधल्या शे village मधल्या science पार्क च्या stargazing आणि
Astro Tourism workshop ची माहिती त्यांना दिली.. त्यावर त्यांनी एकत्र काम करायला आवडेल अशी इच्छा ही
दर्शवली.

तिथे उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या milkyway या आपल्या आकाशगंगेच्या पट्ट्याचा नजारा बघन ू तर आम्ही
वेडच
े व्हायचे राहिलो होतो. बराच वेळ गप्पा मारून त्यांचा निरोप घेतला आणि रूम वर येऊन लगेच पडी
टाकली.. रात्री 2 वाजता केतन नं मला उठवलं.. "कमी घोर जरा, झोप मोडली माझी" 😀
“karma is a bitch.” 😀 मी त्याला झोपेतच उत्तर दिलं. कारण याआधी दर वेळी त्याला आधी झोप लागायची
आणि याच्या घोरण्यामळ ु े मी टक्क जागा..

😀
त्या रात्री व्यवस्थित झोप झाली (माझी) . सकाळी 6 ला जाग आली आणि आन्हिके आटपन ू 6.30 ला आम्ही
सर्यो
ू दयाच्या प्रतीक्षे त वर कॅ फे टे रिया च्या टे रे स वर ये ऊन बसलो काही वे ळाने उगवतीच्या स र्या
ू चा हलकासा तांबस

रं ग हा समोरच्या हिमालयाच्या हिम शिखरांवर पसरला.. तो view अखेर दिसला.. एका क्षणात सगळ्या जगाचा
विसर पडला.. मनष्ु य जन्माला येऊन सार्थक झाल्याची भावना होती. जसा सर्य ू वर येत होता तशी ती पर्वतरांग
अजन ू च स्पष्ट दिसायला लागली. के तन नं कृ ष्णादास चा Bob Marley ने recreate केलेला ओम नमः शिवाय
चा trance लावला.. तिथे सगळं संपलं.. जवळ जवळ दोन तास तो ट्रॅ क loop वर ऐकत आम्ही काहीच एकमेकांशी
न बोलता तिथे बसलो होतो. टक लावन ू निसर्गाचं ते दै वी सौन्दर्य डोळ्यात साठवंत. चौखंबा, नंदा घट ंु ी, त्रिशल
ू , नंदा
दे वी, नंदा खाट, नंदा कोट आणि पंचचल ु ी ही शिखरं त्या कोवळ्या सर्य ू प्रकाशात अक्षरशः स्वर्णकिरणांनी न्हाऊन
निघाली होती. ती सोन्याने मढलेली हिमालयाची पर्वत शिखरं मला तिथन ू निघच ू दे ईनात. पण आजचा पल्ला
खप ू मोठा होता, रुद्रधारा जटाशंकर आणि जागेश्वर धाम करून संध्याकाळ च्या आत मक् ु तेश्वर ला पोहोचायचं
होतं.. जवळ जवळ 9 तासांच driving होतं.. न राहवन ू उठलो बॅग भरून checkout केलं..जाता जाता कौसानी चं
प्रसिद्ध टी इस्टे ट (चहाचे मळे ) बघितले आणि रुद्रधारा ला निघालो. हाताची जखम नाजक ू झाली होती.. ड्राईव्ह
करताना तर ती सपशेल स्टे रिग ं ला धडकायची. पढ ु चा 9 तासां चा प्रवास दिसत होता.. नं
त र म्हं टल वेळ गेला तरी
चालेल आलोय तर रुद्र्धारा बघन ू च जायचं .

रुद्र्धारा ला जवळ जवळ 5 किलोमीटर चा जंगल ट्रे क आहे .. तिथे रुद्रधारी धबधबा आहे ,शिवमंदिर आणि
शंकराची तपस्वी गफ ु ाही आहे .. शंकराने वीरभद्र अवतारावेळी सतीदाहा च्या रागात इथे जटा अपटल्या आणि
तिथन ू वीरभद्र चं अवतरण झालं आणि तिथन ू गंगेच्या एका प्रवाहाचंही अवतरण झालं तिला रुद्र्धारा असं नाव
पडलं अशी गोष्ट..

आम्ही पोहोचलो, गाडी लावली. एक लोकल मनष्ु य जवळ आला.. “साब गाईड? म्हं टल धबधबा बघायला गाईड
कशाला पाहिजे.. नही चाहीये" एकदम हवा करत म्हं टल.. त्याने स्मित हास्य केलं.. पायवाटे ने जंगलात शिरलो
धबधब्याचा किंवा वाहत्या पाण्याचा आवाज जिथन ू येत होता त्या दिशेने जाऊ लागलो.. बरच पढ ु े , वाहत आलेल्या
पाण्याची डबकी बरीच दिसली.. “इथेच असेल रे पढ
ु े मी म्हणालो.. जवळ जवळ 3 किलोमीटर अं त र पार केल्यावर
घनदाट जंगल लागलं जिथे पायवाट पण दिसेना.. तिथे परत आमच्या लक्षात आलं कि आपण चक ु लोय..

कोणी ‘काल’ सिनेमा पहिला असेल तर तिथलं Gate no 3 चं घनदाट जंगल आठवा तसंच काहीसं भयाण दृश्य
आणि त्या झाडांच्या मिट्ट काळोखात आम्ही दोघंच.. आता तर धबधब्याचा मागमस ू ही नव्हता इथे.. तो गाईड का
हसला हे आत्ता लक्षात आलं.. आगाऊ पणा करून गाईड नं घेता आला आहे स ना आता निस्तर हे आपलं मनात
चालू झालं.. आजब ू ाजल
ू ा सर्रास कोल्हे कुइ आणि वेगवेगळे प्राणी पक्षांचे आवाज येत होते.. जरा वाळलेल्या पानांची
सर सर ऐकू आली की धडकी भरायची. complete फाटली होती. विचार केला आता उलटं फिरुया.. जिथन ू सरु
ु वात
केली तिथे येऊ म्हणजे परत 3 किमी अंतर चालत जायचं होतं परत येताना वाटे त जी पाण्याने भरलेली डबकी
दिसली तिथे आता काही पहाडी लहान मल ु ं खेळत होती..

आत्ता जस्ट काही वेळापर्वी


ू आम्ही तिथन ू गेलो.. माणसू काय माणसाचं नख ही नव्हतं.. आणि हे अचानक एकदम
असे इथे कुठे आले? आणि त्यांच्या अविर्भावावरून ते बराच वेळ इथे होते असं जाणवत होतं.. आता हा विचार फार
करण्यापेक्षा त्या घनदाट जंगलात बऱ्याच वेळानी माणस ू दिसल्यामळु े हायस वाटलं.. त्यांना लांबनू च हाक
टाकली.. रुद्रधारा? त्या लहान मल ु ां बरोबर एक माण स
ू होता तो तिथल्या पाण्याचा प्रवाह ओलां डू आमच्या जवळ

आला.. म्हं टल दे वासारखे भेटलात अगदी, रुद्रधारी ला घेऊन चलाल का.. तो मनष्ु य म्हणाला "साब आप 3 किमी
उलटी दिशा मै आये है .. रुद्रधारी तो जंगल के ऊस बाजू है ..” झालं.. आम्ही अजन ू च खच्ची झालो.. त्याला म्हं टल
आमचा गाईड हो आता.. येतो बरोबर म्हणाला..

तो जसा जसा आणि ज्या रस्त्यांनी आम्हाला घेऊन गेला ते बघता आम्ही आमचे जाऊन बाप जन्मात कधी
रुद्रधारी पर्यंत पोहोचू शकलो नसतो. हळू हळू रुद्रधारी दृष्टीक्षेपात आलं प्रचंड मोठी शिळा जिथन ू धबधबा वाहत
होता.. पाऊस आणि बर्फ वष्ृ टी यावर्षी कमी असल्याने त्याला फारसं पाणी नव्हतं. आजब ू ाजलू ा वडाच्या पारं ब्या
शब्दशः शंकराच्या जटांचा फील दे त होत्या.. आणि खाली उजव्याबाजल ू ा शंक राची प्राचीन पिंडी आणि तिथेच
शेजारी शंकराची तपस्वी गफ ु ा..एक वेगळीच जागत ृ ावस्था.. खाली आलो.. प्रचंड शांत जागा आहे .. धबधब्याच्या
पाण्याचा आणि पक्षांचा हलका आवाज सोडल्यास कसलाही आवाज नाही.. दर्शन घेतलं.. त्या गह ु े त काही काळ
बसलो.. उत्तराखंड मध्ये ज्या ज्या ठिकाणी ऋषींची साधना झालीये त्या ठिकाणची कॉस्मिक एनर्जी शरीराला
आणि मनाला जाणवते.. विचारांचं काहूर आपोआप शांत होतं.. आणि ध्यान लागतं. काही वेळानंतर त्या
धबधब्याजवळच्या खडकांवर बसलो.. घड्याळ बघितलं 1 वाजला होता.. मनात आलं मक् ु तेश्वर ला पोहोचायला
आता रात्रीचे 12 वाजणार..

जिथे जिथे म्हणन ू रात्रीचं driving टाळूया असा विचार मनात आला तिथे तिथे रात्रीचंच ड्राइविंग वाट्याला येत
होतं.. योगेशजी निघताना म्हणाले होते शक्यतो रात्रीचं driving टाळा, कारण रात्रीत दरड कोसळतीये हे पटकन
लक्षात येत नाही. आता पर्याय नव्हता, आमच्याकडे दिवस कमी आणि ठिकाणं जास्त होती.. तिथन ू
निघालो.गाडीजवळ आल्यावर त्या गाईड चे आभार मानले त्याला पैसे दिले आणि तडक जागेश्वर साठी निघालो..
आजही जेवायला थांबता येणार नव्हतं कारण वेळ महत्वाची होती.. निवेदिता ने निघताना प्रोटीन बार दिले होते ते
आत्ता कामी येणार होते.. पायातले जोडे काढले, बाह्या वर केल्या आणि गाडी सस ु ाट पळवली.. Complete ST
ड्रायव्हर चा फील आला. जागेश्वर तसं लांब होतं.. ते आणि दारुकावन बघन ू आम्हाला त्याचं दिवशी मक्ु तेश्वर ला
पोहोचायचं होतं.

क्रमशः

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu

पण
ु े

Ph: 9881999034

© ALL RIGHTS RESERVED ©

Please visit - facebook profile - for watching related photos and videos

#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#Travelblog
#facebookblogger

हिमालयाच्या वाटे वर - भाग 1 – लेखांक 8 वा

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू

लेखांक - 8 –'जागेशं दारुकावने'

जागेश्वर हे सत्ययग
ु ापासन
ू अस्तित्वात असलेलं सगळ्यात प्राचीन स्थान, जे उत्तराखंडात कुमाऊ प्रदे शातल्या
अलमोडा जिल्ह्यातल्या दारुकावनामध्ये स्थित आहे . एका पौराणिक कथेनस ु ार जेव्हा दक्ष प्रजापतींच्या यज्ञात
उडी घेतलेल्या माता सती च्या शरीरदाहामळु े दःु खी भगवान शं
क र शरीराला भस्म लावन ू दारुका वनांच्या
जंगलामध्ये बराच काळ तप करत होते. म्हणन
ू या जागेला शंकराची तपस्थली असेही म्हणतात. याच जंगलामधे
वसिष्ठ आदि सप्तॠषि आपल्या पत्नींसोबत कुटी स्थापन
ू तप करीत असत.

एकदा भगवान शंकर दिगंबरवस्थेमध्ये तप करत असताना जंगलात लाकडं आणि कंदमळ ू गोळा करायला
आलेल्या सप्तऋषी पत्नींची नजर दिगंबर अवस्थेतल्या शंकरावर पडली आणि भगवान शंकराच्या त्या अवस्थेवर
आणि तपोबलावर मोहित झाल्या. शंकर भगवान आपल्या तपस्ये मध्ये लीन होते. सर्व ऋषीपत्नी ते शिवा चं रूप
बघन
ू तिथेच मर्च्छि
ू त होऊन पडल्या.

काही काळाने सप्तऋषि त्या ठिकाणी आले आणि ते तिथलं दृश्य बघन ू सप्तर्षींचा असा समज झाला कि भगवान
शंकराने त्यांच्या पत्नींबरोबर व्याभिचार केला आहे . आणि या संशयामळ ु े ते भगवान शंकराला शाप दे तात की तझ
ु े
लिंग याक्षणी तझ्ु या शरीरापास न
ू विलग होईल आणि दोन भागात विभाग न
ू दोन वे गळ्या दिशां ना पडे
ल .

भगवान शिव डोळे उघडत म्हणाले तम् ु ही मला या अवस्थे मध्ये बघनू अज्ञानातन
ू मला शाप दिलात म्हणन ू या
शापचा मी विरोध करणार नाही. माझ्या लिंगाचे दोन्ही भाग या ठिकाणी जागेश्वर आणि दं डश्े वर या नावाने
प्रसिद्ध होतील. जागत
ृ ावस्थेतील ऊर्ध्व भाग हा जागेशवर महादे व आणि उर्वरित भाग दं डश्े वर महादे व म्हणनू
स्थापित होईल आणि तम ु च्या या अज्ञानाची शिक्षा म्हणन
ू तम्
ु ही सप्तॠषि सात ताऱ्यांच्या स्वरूपात अंतराळात
अनंत काळासाठी लटकून राहाल"

लिंग शंकरपासन ू विलग झाल्यावर ब्रम्हांडात प्रलय आला आणि ब्रह्मदे वाने या प्रकोपा पासन
ू वाचण्यासाठी सप्त
ऋषींना आदिशक्ती ची उपासना करायला सांगितले. ब्रह्मदे व जाणत होते की शिवाच्या या तेजा ला आदिशक्ती च
धारण करू शकते आणि आदिशक्ती ने योनी रुपात प्रकट होऊन जागेश्वर शिवलिंग धारण केले.. या शिवलिंगाला
योगेश्वर किंवा नागेश्वर शिवलिंग म्हणन
ू ही ओळखले जाते.

सत्ययगु , द्वापार आणि त्रेता तिन्ही यग ु ांमध्ये या दारूका वनांचा उल्लेख आहे .. असं म्हणतात सर्व दे वांची आणि
बाराही ज्योतिर्लिंगांची व्यत्ू पत्ती ही जागेश्वर धाम दारुका वन येथन ू झाली.. व्यत्ू पत्ती म्हणजे पथ्
ृ वीवर दे वांचा आणि
ज्योतिर्लिंगांचा अविर्भाव या ठिकाणी झाला. इथल्या दं डश्े वर महादे वाचं शिवलिंग हे ओबडधोबड अश्या खडबडीत
शिळा अवस्थेत आहे .. दं ड मिळाल्यामळ ु े ते दं डश्े वर म्हणन ृ धेश्वर किंवा
ू प्रसिद्ध आहे . महाराष्ट्रातल्या वद्
महाबळे श्वर शिवलिंग सदृश हे लिंग आहे .

या लोकांसाठी हे ज्योतिर्लिंगचं आहे कारण हे पथ् ृ वी वरचं पहिलं असं मंदिर आहे जिथे शिवाची लिंगस्वरूपात
पज
ू ा करण्याची परं परा सरू
ु झाली.. रुद्र संहिते मधे ‘दारुकावने नागेश’ं असा उल्लेख आढळतो.

दारूका वन हे नाव त्या अरण्याला दारूक आणि दारूका नावाच्या राक्षस आणि राक्षसी मळ ु े मिळालं. त्यातल्या
दारूक राक्षसाचा वध हा शिवाचा परम भक्त सप्रि ु य याच्या हातन
ू स्वतः शिवाने दिलेल्या पशप ु ातास्त्राने
झाला.तेव्हा दारूका नामक राक्षसी पार्वती ला शरण गेली आणि पार्वती मातेने तिला दे वी चा दर्जा दिला. दारूका वन
हे इथल्या अतिप्रचंड अश्या दे वदार वक्ष
ृ ांमळ
ु े प्रसिद्ध आहे .

अशी एक मान्यता आहे की जागेश्वर इथलं प्राचीन मत्ृ यज ंु य मंदिर पथ्


ृ वीवरील बारा ज्योतिर्लिंगांच उगम स्थान
आहे .. इथे दे वदार चं अतिप्रचंड असं झाड आहे जे यग
ु ानयु ु गे इथे आहे आणि जिथे शंकर पार्वती यगु लु स्वरूपात
वास करतात..

इथल्या मंदिरांच्या समह ू ामध्ये सर्वात मोठं मंदिर महामत्ृ यज


ंु य महादे व या नावाने विख्यात आहे . दारूकावनात
जवळपास छोटी मोठी 250 मंदिरं आहे त. त्यात जागेश्वर धाम मधे 124 मंदिरांचा एक समह ू आहे , जो अति
प्राचीन आहे . प्राचीनतम महामत्ृ यजंु य शिव मंदिर, भैरव, माता पार्वती,केदारनाथ, हनम ु ान, जागेश्वर महादे व,
माता दर्गा
ु , कुबेर,शनिदे व अशी अनेक मंदिरे ही शिवलिंग रुपात आहे त जे प्रतीकात्मक असं दर्शवतात की सर्व दे व हे
शंकराशी तादात्म्य पावलेले आहे त. यात 108 मंदिरं भगवान शिव आणि 16 मंदिरं बाकी दे वी-दे वता ना समर्पित
आहे त. महामत्ृ यज
ंु य, जागनाथ, पष्टि
ु दे वी व कुबेर या मंदिरांना मख्
ु य मंदिर मानलं जातं.

स्कंद परु ाण, लिंग परु ाण, मार्क ण्डेय आदि परु ाणांमध्ये जागेश्वर चा उल्लेख आहे . ही पण मान्यता आहे की
मर्यादा परुु षोत्तम भगवान रामाची मल ु ं लव-कुश यांनी भगवान रामाच्या सेनेबरोबर यद् ु ध केलं, आणि राजा
झाल्याबरोबर, केलेल्या यध् ु दाचे प्रायश्चित्त घ्यायला.. ते इथे आले. काही परु णांप्रमाणे लव-कुश यांनी सर्वप्रथम या
मंदिरांची स्थापना केली असा उल्लेख आहे . त्याचं ते यज्ञ कंु ड आजही तिथे विद्यमान आहे , रावण, पांडव आणि
मार्क ण्डेय ऋषि यांनी जागेश्वर धाम इथे शिवपज ू न केलं असा उल्लेख आहे .

अज्ञात वासात पांडव ही काही काळ इथे राहिले आहे त अशी मकू साक्ष ही मंदिरं दे तात. जागेश्वर च्या या मंदिराचा
जीर्णोद्धार राजा शालिवाहन याने 7 व्या ते 14व्या शतकात आपल्या शासन काळात केला आणि पौराणिक
काळात भारतातल्या कौशल, मिथिला, पांचाल, मस्त्य, मगध, अंग आणि वंग नामक अनेक राज्यांचा या ठिकाणी
उल्लेख सापडतो .

आम्ही तिथे पोहोचलो गाडी लावन ू गाईड घेतला.. सगळी मंदिरं दर्शन घ्यायला किमान 2 तास लागले.. मंदिरांची
बांधणी अतिशय वेगळी आहे तिथेही एक जटा गंगा आहे , ब्रम्ह कंु ड आहे जे जिथे मत्ृ यू लोकात ब्रम्हदे व स्नान
करीत असत. तसच लव कुश यांनी स्थापिलेलं कमलकंु ड आपल्याला इथे बघायला मिळतं.. जागेश्वर आणि
दं डश्े वर मंदिरांची दर्शनं घेऊन आम्ही 5 वाजता मक्
ु तेश्वर ला जायला निघालो.. दारुका वनामधन
ू जाणारा घनदाट
जंगल असलेला रस्ता हा कमाल आणि तेवढाच भीतीदायक दिसत होता..

मक्ु तेश्वर हे हिल स्टे शन आहे . जे नैनिताल जिल्ह्यात मोडतं जिथे अती प्राचीन असं शिवमंदिर आहे .. जे
‘मक्ति
ु दाता मक्
ु तेश्वर’ या संज्ञेने प्रसिद्ध आहे . पांडव या शेवटच्या शिवलिंगाची स्थापना करून पढ ु े स्वर्गारोहिणी
मार्गे सदे ह स्वर्गात जायला निघाले अशी आख्यायिका आहे . तसंच हे मक् ु तेश्वर स्वामींचं तपस्थल आहे ..
साल, दे वदार च्या जंगलामध्ये वसलेलं उं च शिखरावरचं शिवाचं प्राचीन मंदिर आणि मंदिराच्या मागच्या
कड्यावरून दिसणाऱ्या हिमालयन रें जेस या अक्षरशः वेड लावतात..

आता आम्हाला उशीर झाला होता.. घाट रस्ता, त्यात सिंगल रोड आणि तोही अरुं द.. आणि गाडीचाच जो काही तो
उजेड.. जरा स्टे रिग ं एखाद्या वळणावर चक ु ीचं वळलं तर डायरे क्ट दरीत आजब ू ाजल
ू ा पर्ण
ू अंधार. परत एक नजर
वर डाव्याबाजलू ा ठे वणंही गरजेचं होतं कारण Land slide होण्याची भीती आणि अश्या परिस्थिती चक ु ू न समोरून
गाडी आलीच तर रिव्हर्स घेऊन कोपरा पकडून मगच गाड्या जागच्या हलणार.. अशी परिस्थिती.. इथे रात्री 8
वाजता सगळे गड ु ू प होतात. त्या भयावह रस्त्याने ड्राईव्ह करताना मधेच एक माणस ू दरू वरून आम्हाला लिफ्ट
मागताना दिसला.. आमची तंतरली म्हं टल या अश्या रस्त्यांवर अंधारात एकट्या अनोळखी माणसाला लिफ्ट
म्हणजे टफ प्रकार व्हायचा.. त्यात तो माणस ू च असेल ना का भत ू असेल वैगेरे अश्या आमच्यात चर्चा 😀
. म्हणजे
तिथेच आपलं काम व्हायची पाळी.. 😀
त्या माणसाच्या जवळ थांबलो काच खाली केली.. “ये जरा आगे के गाव तक छोड दें गे”? मी आणि केतन नं
त्याच्याकडे बघितलं त्याच्या बरोबर बरच सामान होतं आणि त्याला पायी बराच पल्ला गाठायचा होता.. त्याला
बसवलं गाडीत.. त्याचं सामान dicky त टाकलं " अच्छा हुआ आप मिल गये वरना इस रोड पे रात को पैदल
चालना मतलब मौत को दावत दे ना है | और गाडी भी इस समय मश्ु कील से मिलती है यहा"

का? मी विचारलं.. रात को 8 बजेसे यह कोई पैदल नाही चलता.. ये नीचे के जंगलो से शेर आकर ले जाता है ..
बहुतसें किस्से हुये है ऐसे यहापर.."
"तो इतने रात को आप कैसे जा राहे थे याहन से" म्हं टला "मैं ये बाजू के पहाड के गाव मै गया था.. हम सब पहाडी
लोग पैदल ही जाते है जहाँ जाना होता है .. मै ये जंगलो मै जो जडीबटु ी तथा जो औषधी फल या फूल मिलते है
उनका रस निकालनेका काम करता हूँ.. हम पहाडी लोग ये करके यहा के आयर्वे ु द रसशाला मै बेचते है .. आज वहा
से निकलेने मे दे री हो गयी इसलीये रात को भी पैदल आना पडा नाहीतो वैसे 6 बजे तक पहुच जाता. माणस ू खरा
वाटला.. त्यांच्या रोजच्या रुटीन बद्दल सांगायला लागला रोज जवळपास 30 ते 40 किमी पहाडी रस्त्यांवरून
चालत हे लोक कामाला जातात.. त्यात स्त्रियाही असतात जंगलात जाऊन वेगवेगळ्या वनस्पती औषधी फुलं
आणि फळं शोधतात आणि थोडीफार शेती करतात, बाकी यांच्याकडे उत्पन्नाचं विशेष काही साधन नाही.. काही
वेळानी त्याच्या गावाची वेस आली.. तो उतरला dicky तन ु त्याचं सामान काढून दिलं आणि त्याचा निरोप घेतला.

आता 8.30 वाजले होते.. मक् ु तेश्वर चा शेवटचा घाट अजन ू पार करायचाच होता आम्ही निघालो.. हॉटे ल आधी बकु
केलं नसल्यामळ ु े जाता जाता बरं view असले ल ं हॉटे ल जे दिसे ल तिथे चौकशी करणे .. 10 वाजता आम्हाला एक
हॉटे ल मिळालं. जेऊन लगेच झोपलो सम ु ारे 9 तासांच ड्राइविंग आणि रुद्रधारी ला 14 किमी ची जंगलातली पायपीट
यामळ ु े बेक्कार दमलो होतो..

सकाळी 6 चा अलार्म झाला. आवरून मक् ु तेश्वर मंदिराकडे निघालो.. तिथे गाईड घेतला त्याने मक्
ु तेश्वर मंदिराची
जंगल परिक्रमा घडवली पांडवकालीन शिवलिंगाबद्दल माहिती सांगितली, जंगलातली झाडं, रानटी फुलं, फळं
आणि त्यांचा औषधी उपयोग या बद्दल माहिती दिली, मक् ु तेश्वर महाराज आणि त्यांचे शिष्य यांबद्दल सांगितलं..
मक्
ु तेश्वर महाराजांनी 2004 साली दे ह ठे वला.. त्याआधी अनेक वर्ष ते इथे साधना करत होते.

मंदिराच्या आवारात भैरव यज्ञ चालू होता आम्ही दर्शन घेऊन काही वेळ यज्ञकंु डाजवळ ध्यान लावन
ू बसलो..
आवारात शिव मंदिरव्यतिरिक्त मारुती, भैरव, आणि आदिशक्ती अशी मंदिरं आहे त दर्शन घेऊन आम्ही निघालो
आजचा पल्ला पण बराच मोठा होता.. आज मायानगरी हरिद्वार ला पोहोचायचं होतं. जवळपास 8 तासांच driving
आजही होणार होतं..

तिथल्या जंगलामध्ये ब्रज ू /बरु ान्झ नावाची काही जंगली औषधी फुलं मिळतात ज्याचा अर्क रोज अनशापोटी कोमट
पाण्यात घेतल्यास अस्थमा, रक्तदाब, मधम ु ेह असलेल्या व्यक्तींना फायदा होतो. काही ओळखीच्या लोकांसाठी
त्या बाटल्यांची खरे दी झाली आणि साधारण 11 वाजता तिथन ू निघालो... हरिद्वार महाकंु भ च्या रस्त्यावर.

क्रमशः

लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu

पण
ु े

Ph: 9881999034

© ALL RIGHTS RESERVED ©

Please visit - facebook profile - for watching related photos and videos

#himalayachyavatevar
#abhishekshalu
#travelblogger
#seriesofarticles
#Travelblog
#facebookblogger

You might also like