You are on page 1of 149

Marathi Yuvakbharati Digest class 11 -

Maharashtra Board Guide


Shri Navneet

Freely Distributable Material


This notice describes the copyright ownership, if any, and any legal
restrictions on the use of this Bookshare digital material which govern
your lawful use of it. Bookshare believes in good faith that this digital
material is freely distributable, and is either in the Public Domain or
available under a license that allows free distribution (such as a
Creative Commons license).
Title: Marathi Yuvakbharati Digest class 11 - Maharashtra Board Guide
Author: Shri Navneet
Copyright 2019 by Navneet Education Limited
This notice is not part of the work, which begins below after the
phrase "Begin Content".

For Works Listed as in the Public Domain


Bookshare and Benetech make no representations or warranties that
this material is, in fact, in the Public Domain. However, Bookshare
reasonably believes that this material is out of copyright, and thereby
in the Public Domain and available for free distribution and copying on
a Worldwide basis. On that basis, it makes it freely available to all
persons, wherever located, for downloading, further copying, and
personal and commercial use.

For Works Listed as Freely Distributable under


License
Bookshare and Benetech make no representations or warranties that
this material is, in fact, freely distributable under license. However,
Bookshare reasonably believes that this material is available under
such a license, which is contained as part of the work. On that basis, it
makes it freely available to all persons, wherever located, for
downloading and use pursuant to the applicable license. Please refer
to the licensing terms contained in the work below.
If you have reason to believe that this material is not in the Public
Domain or available under a license permitting free distribution, or you
wish to assert a claim to ownership of it on behalf of a copyright
owner, please immediately send an email describing the nature of the
claim and all related information to abuse@bookshare.org, and we will
make every reasonable effort to address your concerns. Together we
can ensure that the rights of copyright holders are protected within
the limits of the law.

Limitation of Liability; Indemnity by User


By your act of downloading, copying and using this material, you agree
that neither Bookshare, Benetech, nor the original authors or
publishers of the materials shall be financially responsible for any loss
or damage to you or any third parties caused by the failure or
malfunction of the Bookshare Web Site (www.bookshare.org) or
because of any inaccuracy or lack of completeness of any content that
you download from the Web Site, including this material, nor for the
assumption that the material is, in fact, in the Public Domain or freely
distributable under license. Similarly, neither Bookshare nor the
original authors and publishers of the content make any
representations as to the accuracy, completeness, etc., of the
materials available on the Web Site.
The original authors and publishers have no editorial control over this
Web Site. Bookshare has used reasonable care in selecting and
preparing this material for use on its Web Site, but has not edited nor
intentionally modified the materials from the source they were
obtained from. There may be license restrictions imposed by the
original source, in which case, they will be reproduced below, and you
may be bound by them. It is your responsibility to ascertain any
restrictions on the use of the materials and any limitations on the use
of them.
BOOKSHARE, BENETECH, AND THE ORIGINAL AUTHORS, PUBLISHERS
AND COPYRIGHT OWNERS OF THE MATERIALS, SHALL NOT IN ANY
CASE BE LIABLE FOR DIRECT, INDIRECT, SPECIAL, INCIDENTAL OR
CONSEQUENTIAL DAMAGES, WHETHER BASED ON CONTRACT, TORT
OR ANY OTHER LEGAL THEORY, IN CONNECTION WITH OR ARISING
OUT OF THE FURNISHING OF CONTENT, THE FUNCTIONING OF THE
WEB SITE, OR ANY OTHER ASPECT OF YOUR USE OF THE WEB SITE
AND THE CONTENTS PROVIDED HEREUNDER.
Book Quality
Bookshare is interested in improving book quality over time, if you can
help us by providing any book quality feedback, we'll work hard to
make those changes and republish the books.

Begin Content
अभ्यासक्रमावर आधारित
JUNIOR COLLEGE
नवनीत मराठी युवकभारती निबंध व लेखन
इयत्ता ११ वी-१२ वी
ठळक वैशिष्ट्ये
• निबंधलेखन
• कवितांचे रसग्रहण
• पत्रलेखन
• संवादलेखन
• उताऱ्याचे आकलन व सारांशलेखन
• भाषांतर
• मुलाखतीसाठी प्रश्नावलीलेखन
• जाहिरातलेखन
• वृत्तलेखन
उपयोजित लेखनाचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव पुस्तक
हे पुस्तक सर्व पुस्तक-विक्रे त्यांकडे उपलब्ध आहे.
NAVNEET
नवनीत एज्युके शन लिमिटेड
EW12nb

नवीन अभ्यासक्रम व नवीन पाठ्यपुस्तक यांवर आधारित

मराठी युवकभारती
नवनीत
इयत्ता अकरावी
कृ ती आधारित
• ठळक वैशिष्ट्ये:
१. नवीन अभ्यासक्रम व नवीन पाठ्यपुस्तक यांवर आधारित अद्ययावत परिपूर्ण रचना.
२. गद्य पाठांतील मजकु राचे योग्य प्रमाणात उतारे करून त्यावर कृ तिपत्रिके च्या आराखड्यानुसार अनेक अपेक्षित कृ ती आणि त्यांची अचूक व समर्पक
उत्तरे.
३. विशेष साहित्यप्रकार नाटक ––
यावर आधारित कृ ति-स्वाध्यायांचे सादयंत समर्पक खुलासेवार विश्लेषण.
४. स्वमत, अभिव्यक्ती, भाषासौंदर्य, उपयोजन यांवर विविधांगी कृ ती.
५. सर्व पाठांतील कठीण शब्दांचे सुबोध अर्थ आणि माहितीपर, स्पष्टीकरणात्मक सविस्तर टिपा.
६. गद्य अपठित उताऱ्यांचा स्वतंत्र विभाग आणि त्यावर बोर्डाच्या अपेक्षेप्रमाणे उत्तमोत्तम कृ ती.
७. सर्व कवितांचा सोप्या भाषेत भावार्थ.
८. व्याकरणावर कल्पक, काटेकोर व सुव्यवस्थित कृ ती व उत्तरे.
९. उपयोजित लेखन विभागातील सर्व घटकांबाबत कृ तींसह सविस्तर मार्गदर्शन.
नवनीत मार्गदर्शक म्हणजे
सुनियोजित अभ्यास, उज्ज्वल यश हमखास
लेखक :
श्री. नवनीत
पहिली आवृत्ती : २०१९\mathbf{२०१९}
Balbharati Registration
No. 2018MH0014
NAVNEET
किं मत : Rs १४०.००
E0271
नवनीत एज्युके शन लिमिटेड
नवनीत −\mathbf{-}
शैक्षणिक क्षेत्रातील देदीप्यमान यशाची ६० वर्षे !
सन १९५९ मध्ये रुजवलेल्या नवनीत एज्युके शन लिमिटेड या रोपट्याचे आता ६० व्या वर्षी डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे. तब्बल साठ वर्षांच्या
या यशस्वी वाटचालीत नवनीतने प्रकाशन आणि स्टेशनरी व्यवसायात भारतातच नव्हे, तर परदेशांतही अढळ स्थान मिळवले आहे. शैक्षणिक
पुस्तके , वह्या, स्टेशनरी आणि पुढे जाऊन काळानुरूप ई-लर्निंग क्षेत्रामध्येही नवनीतने चांगलाच जम बसवला आहे. 'शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारी
परिपूर्ण संस्था' हे अभिमानाचे बिरुद मिरवत षष्ट्यब्दिपूर्ती आनंदाने साजरी करताना आम्ही कृ तकृ त्य आहोत.
असं म्हणतात की, गुणवत्ता हा अपघात नसून ती बुद्धिमान व्यक्तींच्या प्रयत्नांची फलश्रुती असते. नवनीतच्या गुणवत्तेचे श्रेयही निर्विवादपणे
नवनीतच्या संस्थापकांचे आहे. त्यांनी दिलेल्या ध्येयधोरणांशी बांधील राहून, त्यांचा वारसा पुढे चालवण्याचे प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत.
सुजाण आणि दक्ष विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक साहित्य विक्रे ते ही आमची खरी ताकद आहे. त्यांचा
गुणवत्तेविषयीचा आग्रही दृष्टिकोन आम्हांला अतिशय मोलाचा वाटतो. त्यांचे सहकार्य आणि सदिच्छा घेऊनच आम्ही यशाचे अधिक उच्चांक प्रस्थापित
करू इच्छितो.
'उत्तम गुणवत्तेची खात्री म्हणजे नवनीत,' असा नवनीतचा ठसा उमटवण्यात आमच्या ६० वर्षांच्या या प्रदीर्घ वाटचालीत आमचे सर्व हितचिंतक आणि
कर्मचारीवृंद या सर्वांचे योगदान अमूल्य आहे. म्हणूनच आम्ही या सर्वांविषयी कृ तज्ञता व्यक्त करतो.
- नवनीत एज्युके शन लिमिटेड
NAVNEET
नवनीत एज्युके शन लिमिटेड
मुंबई : नवनीत भवन, भवानीशंकर रोड, दादर (प.), मुंबई-४०० ०२८. (फोन : ६६६२ ६५६५) www.navneet.com
e-mail: publications@navneet.com
पुणे : नवनीत भवन, १३०२, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, सणस प्लाझाजवळ, पुणे-४११ ००२. (फोन : २४४३ १००७)
नागपूर : ६३, शिवाजी सायन्स कॉलेजसमोर, काँग्रेसनगर, नागपूर -४४० ०१२. (फोन : २४२ १५२२)
नाशिक : निर्माण इन्स्पायर, दुसरा मजला, कान्हेरे वाडी, जुन्या सीबीएसच्या समोर, नाशिक-४२२ ००१.
(फोन : २५९ ६९५०)
© All rights reserved. No part of this book may be copied, adapted,
abridged or translated, stored in any retrieval system, computer
system, photographic or other system or transmitted in any form or by
any means without a prior written permission of the copyright holders,
M/s. Navneet Education Limited. Any breach will entail legal action and
prosecution without further notice.
Published by : Navneet Education Limited, Dantali, Gujarat.
Printed by : Navneet Education Limited, Dantali, Gujarat.

मनोगत
शैक्षणिक वर्ष २०१९−२०२०१९ - २०
पासून शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावीच्या भाषाविषयाच्या आराखड्यात आमूलाग्र बदल के ला आहे. त्यानुसार योजलेल्या नवीन पाठ्यपुस्तकाचा
सखोल अभ्यास करून कृ ति-स्वाध्याय व त्यांची अचूक व समर्पक उत्तरे यासंबंधीचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे मराठी युवकभारती नवनीत : इयत्ता
अकरावी हे मार्गदर्शक पुस्तक विद्यार्थ्यांसाठी सादर करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे.
पाठ्यपुस्तक व मार्गदर्शकाची रचना वैशिष्ट्ये
विभाग - १ व २ (गद्य व पद्य)
(१) गद्य : भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी गाभाघटक – नैतिक मूल्ये व जीवनकौशल्ये यांचा जाणीवपूर्वक विचार करून पाठ्यपुस्तकात गद्य
विभाग नेमलेला आहे. यात विद्यार्थ्यांना विविध साहित्यप्रकारांचा परिचय करून दिला आहे.
मार्गदर्शकात प्रत्येक गद्यपाठाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात लेखक/लेखिका यांचा परिचय – लेखनवैशिष्ट्ये - ग्रंथसंपदा यांचा उल्लेख करून पुढे
पाठाचा परिचय – शब्दार्थ – टिपा – वाक्प्रचार व अर्थ - कृ ति - स्वाध्याय व त्यांची समर्पक उत्तरे या क्रमाने पाठाचा सुसंगतवार अभ्यास करून
दिला आहे.
(२) पद्य : 'स्वतंत्रतेचे स्तोत्र' हे राष्ट्रभक्तीपर काव्य काव्यानंदासाठी नेमून इतर पद्यपाठांमध्ये निसर्ग, प्रेम, संतकाव्य, स्त्रीवादी व विद्रोही कविता
अभ्यासाला लावून विद्यार्थ्यांची काव्यगत जाण समृद्ध करण्याचे उद्दिष्ट राखले आहे. पद्य विभागात या वेळी रसग्रहणाचाही समावेश के ला आहे.
मार्गदर्शकात प्रत्येक पद्यपाठाच्या सुरुवातीला कवी/कवयित्री यांचा परिचय - काव्यवैशिष्ट्ये - ग्रंथसंपदा यांची माहिती देऊन पुढे कवितेची मध्यवर्ती
कल्पना - शब्दार्थ – टिपा - कवितेचा सुबोध भावार्थ – कृ ति-स्वाध्याय व त्यांची अचूक उत्तरे - काव्यसौंदर्य – स्वमत व अभिव्यक्ती यांचे परिपूर्ण
मार्गदर्शन या क्रमाने कवितांचा सखोल अभ्यास करून दिला आहे. प्रत्येक कवितेचे काव्यवैशिष्ट्यांसह यथायोग्य रसग्रहण के ले आहे. या विभागानंतर
अपठित गद्य व पद्य उताऱ्यांचे कृ ति-स्वाध्याय व त्यांची समर्पक उत्तरे विश्लेषणासह दिली आहेत.
विभाग - ३ (विशेष साहित्यप्रकार - नाटक)
या नवीन पाठ्यपुस्तकात या वेळी 'नाटक' हा विशेष साहित्यप्रकार स्वतंत्रपणे अंतर्भूत के ला आहे. यामध्ये तीन नाट्यउतारे व त्यांवरील आकलन –
स्वमत – अभिव्यक्ती असे कृ ति-स्वाध्याय दिले आहेत.
मार्गदर्शकात समूहकला असलेल्या नाटकाच्या प्रमुख घटकांचा ऊहापोह करून त्याचे स्वरूप सुबोध भाषेत उलगडू न दाखवले आहे आणि प्रत्येक
नाट्यउताऱ्यावरील कृ ति-स्वाध्याय अचूक व समर्पक पद्धतीने सोडवून दिले आहेत.
विभाग - ४ (उपयोजित लेखन)
व्यावसायिक क्षेत्रातील भाषिक कौशल्ये प्रगत करण्यासाठी प्रात्यक्षिक – सादरीकरण – प्रकल्प यांच्या माध्यमांतून व्यक्त होण्याची संधी विद्यार्थ्यांना
प्राप्त व्हावी म्हणून या वेळी पाठ्यपुस्तकात (१) सूत्रसंचालन (२) मुद्रितशोधन (३) अनुवाद (४) अनुदिनी (ब्लॉग) (५) रेडिओजॉकी या नवीन
भाषिक उपयोजित घटकांचा समावेश के ला आहे.
मार्गदर्शकात उपरोक्त प्रत्येक घटकांची सादयंत विश्लेषणात्मक माहिती दिली आहे; तसेच त्यावरील कृ ति-स्वाध्यायांची अचूक उत्तरे देऊन
विद्यार्थ्यांना सुलभ मार्गदर्शन के ले आहे.
विभाग - ५ (कार्यात्मक व्याकरण)
भाषा व भाषिक कौशल्ये यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होऊन भाषा - समृद्धीकडे विद्यार्थ्यांचा कल व्हावा, म्हणून या वेळी (१) शब्दशक्ती (२) काव्यगुण
(३) वाक्यसंश्लेषण (४) काळाचे उपप्रकार (५) शब्दभेद या नवीन कार्यात्मक व्याकरणिक घटकांचा समावेश के ला आहे.
मार्गदर्शकात उपरोक्त प्रत्येक कार्यात्मक व्याकरण घटकाचा यथायोग्य परामर्श घेऊन, सुबोध भाषेत समजावून देऊन प्रत्येक घटकासाठी दिलेल्या
कृ ति-स्वाध्यायाची अचूक व समर्पक उत्तरे दिली आहेत.
शिवाय प्रत्येक गद्य व पद्य पाठाच्या शेवटी (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृ ती (आ) भाषिक घटकांवर आधारित कृ ती यांवरील कृ ति-स्वाध्याय
देऊन, त्यांची योग्य व अचूक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचा व्याकरणाचा अभ्यास दृढमूल करण्याचा उपक्रम के ला आहे.
अशा प्रकारे सर्वांगीण व मूलभूत मार्गदर्शन करून विद्यार्थी-शिक्षक व पालक यांना उपयुक्त ठरून, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढू न त्यांचे यश उज्ज्वल होईल,
याची आम्हांला पक्की खात्री आहे.
प्रस्तुत पुस्तकाची उपयुक्तता आणखी वाढवण्याच्या दृष्टीने येणाऱ्या योग्य सूचनांचे आम्ही स्वागत करू.
- प्रकाशक

अनुक्रमणिका

भाग - १ : गद्य व पद्य


स्वतंत्रतेचे स्तोत्र
- वि. दा. सावरकर
[ही कविता फक्त काव्यानंदासाठी आहे.]
• कवींचे नाव : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (विनायक दामोदर सावरकर).
• व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये : कवी, कादंबरीकार, आत्मचरित्रकार, नाटककार, विचारवंत, निबंधकार.
• ग्रंथसंपदा : 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र; 'गोमांतक', 'कमला', 'महासागर', 'विरहोच्छ्वास' ही खंडकाव्ये; 'स्वतंत्रतेचे स्तोत्र',
'जगन्नाथाचा रथ', 'सप्तर्षी', 'तारकांस पाहून' इत्यादी कविता प्रसिद्ध.
• काव्याची वैशिष्ट्ये : ओज, भव्यता, उदात्तता, तरल व कोमल भावनाविष्कार, तत्त्वचिंतनात्मक वृत्ती ही कवितेची वैशिष्ट्ये आहेत.
क्रांतिकारकत्व, प्रखर विज्ञाननिष्ठा व बुद्धिवादी विचारसरणी या गुणांमुळे लेखन प्रभावी. साहित्यातून जाज्वल्य राष्ट्रभक्तीची प्रखर भावना
प्रकट होते.

कवितेची मध्यवर्ती कल्पना


हे देशभक्तीपर गीत आहे. यात कवीने स्वातंत्र्यदेवीचे गौरवस्तोत्र गायले आहे. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचे चैतन्य आहे. स्वातंत्र्यासाठी जगणे व समर्पण
करणे हीच देशवासीयांची कृ तार्थता आहे. राष्ट्रहित जपण्याचा व राष्ट्रसेवेचा संदेश या कवितेतून दिला आहे.

शब्दार्थ
स्तोत्र - प्रार्थना. जयोऽस्तु - जयजयकार असो. महन्मंगले - महापवित्र. शिवास्पदे - शिवाचे (नीतीचे) घर. शुभदे - शुभदायी. भगवती - देवी,
देवता. त्वामहं - तुला मी. यशोयुतां - यश चिंतितो. वंदे - वंदन करतो. चैतन्य - ऊर्जा, शक्ती. मूर्त - प्रत्यक्ष. संपदा - वैभव, संपत्ती. श्रीमती
- प्रज्ञावंत. राज्ञी - राणी. परवशता - पारतंत्र्य. नभ - आकाश. कु सुमी - फु लांमध्ये. विलसतसे - शोभते, चमकते. तेज - प्रकाश. उदधी -
समुद्र. गांभीर्य – गंभीरता, गाढ शांतता. अन्यथा - दुसरे. ग्रहण - अंधाराने ग्रासणे. नष्ट - नाश. मोक्ष - मुक्ती. वेदांती - वेदांमध्ये. योगिजन -
साधू. परब्रह्म - विधाता. वदती - बोलतात, म्हणतात. उत्तम - सर्वोत्कृ ष्ट. उदात्त - भव्य. उन्नत - प्रगतिशील. महन्मधुर – खूप गोड. तव -
तुझे. सहचारी - सहकारी, सोबती. अधम - दुर्जन, दुष्ट. रक्त-रंजिते – रक्ताने माखलेली. सुजन - सज्जन. जनन - जगणे. सकल - सर्व.
चराचर – सृष्टी. दृढालिंगन - घट्ट मिठी. वरदे - आशीर्वाद देणारी.

कवितेचा (गीताचा) भावार्थ


स्वतंत्रतेचे (मातृभूमीचे) गौरवगीत गाताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात
हे महापवित्र, शिवाचे सदन असलेल्या, शुभदायी स्वतंत्रतादेवी, तुझा जयजयकार असो. यशाने मंडित असलेल्या स्वातंत्र्यदेवी, तुला मी वंदन
करतो. ।।धृ.।।
तू राष्ट्राचे प्रकट चैतन्य आहेस. तू नीतीची संपत्ती आहेस. हे स्वातंत्र्यदेवी, तू या सर्वांची प्रज्ञावंत महाराणी आहेस.
हे स्वातंत्र्यदेवता, मुळात तू चमचम करणारी लखलखीत चांदणी आहेस. पण पारतंत्र्याच्या आकाशात तू आमच्यापासून दूर झाकोळली गेली होतीस.
हे स्वतंत्रतेदेवी, जनमानसांच्या गालांवरच्या फु लांत किं वा फु लांच्या कोमल गालांवर जी उत्साहाची लाली विलसत आहे, ती तूच आहेस !
तू सूर्याचे प्रखर तेज आहेस. समुद्राची धीरगंभीरता तूच आहे. हे स्वतंत्रतेदेवी, तू नसतीस तर पारतंत्र्याचे हे अमानुष ग्रहण नष्ट झाले नसते.
(पारतंत्र्याच्या या ग्रहणात तू सूर्यासारखी तळपलीस.)
हे स्वतंत्रतेदेवी, वेदांतामध्ये वर्णिलेली आणि योगिजनांनी मान्य के लेली मोक्ष व मुक्ती यांची मूर्त रूपे तूच आहेस.
या सृष्टीत उत्तम, उदात्त, प्रगतिशील, महामधुर जी जी तत्त्वे आहेत, हे स्वातंत्र्यदेवी, ती सर्व तुझ्या ठायी, तुझ्या सोबतीला आहेत.
दुर्जनांचे रक्त शोषणारी, त्यांचे निर्दालन करणारी आणि सज्जनांचा कै वार घेणारी, पूजा करणारी, हे स्वतंत्रतादेवते, तुझ्यासाठी प्राणार्पण करणे हेच
जीवन आहे. तुझ्याशिवाय जगणे म्हणजे मरण आहे. तुला सर्व चराचर शरण आहे. (तुझ्या पायाशी सर्व सृष्टी नमते आहे.)
हे स्वतंत्रतादेवी, हे वरदायी, माझ्या भारतभूमीला तू कधी घट्ट मिठी मारशील? (भारतभूमीवर तू कधी निवास करशील?) हे देवते, मी तुला
मनोभावे यशस्वी होण्यासाठी नतमस्तक होऊन वंदन करतो.

१. मामू
- शिवाजी सावंत
लेखक परिचय
शिवाजी सावंत
सुप्रसिद्ध कादंबरीकार. 'मृत्युंजय' ही कादंबरी हा त्यांचा मानबिंदू. 'मृत्युंजय' ही कर्णाच्या जीवनावर आधारलेली कादंबरी अमाप गाजली. तिची
अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली. त्यांच्या अन्य काही कादंबऱ्या : 'छावा', 'युगंधर', 'लढत'. इतिहास-पुराणातील लोकोत्तर व्यक्ती या
त्यांच्या कादंबऱ्यांचे नायक. व्यक्तिचित्रणात्मक लेखसंग्रह : 'अशी मने असे नमुने', 'मोरावळा', 'लाल माती रंगीत मने'. अनेक पुरस्कारांनी
सन्मानित.

पाठ परिचय
हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ. मामू हा पाठाचा नायक. शाळेतील शिपाई या पदावर नेमणूक. सामान्य स्तरावरील जीवन लाभलेले असताना स्वत:च्या
व्यक्तित्वातील उदात्त गुणांमुळे त्याने संपूर्ण व्यक्तिमत्त्वालाच उच्च, उदात्त पातळीवर नेले. मुख्यतः सेवाभावी वृत्ती. कधीही कोणालाही मदत करण्यास
तत्पर. समोर आलेले कोणतेही काम मनापासून, निष्ठापूर्वक व आनंदाने करण्याची वृत्ती असल्याने काम करता करता अनेक गुण आत्मसात के ले.
त्यामुळे व्यक्तिमत्त्व बहुआयामी बनले. त्याच्याविषयी लहानथोरांच्या मनात आदर, आपुलकी व सन्मानाची भावना.

शब्दार्थ
थोराड - मोठी, बळकट. कोंब - अंकु र. चर्येनं - चेहेऱ्याने, मुद्रेने. अनघड - न घडलेला, अजाण. रेलून - आधाराला टेकू न. चुनेवाणाची -
चुन्यासारखी. पायपीट करणे - थके पर्यंत चालणे. फाटेचं - पहाटेचे. चौवाटा – चहूवाटांनी. डु ईला - डोईला. पंपशू - चपलेचा एक प्रकार.
पारखत - तपासून पाहत. मासला - नमुना. अल्लाला प्यारी झाली - मरण पावली. आब - प्रतिष्ठा, इज्जत. निकोप - निर्दोष. अंग धरीसारकं -
अंग भरल्यासारखे. कवळिकीच्या - कोवळ्या.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) चौवाटा पांगणे : चहूबाजूंना विखुरणे.
(२) कं ठ दाटू न येणे : गहिवरणे.
(३) हरवलेला काळ मुठीत पकडणे : भूतकाळातील आठवणी जागृत होणे.

कृ ति-स्वाध्याय आणि उत्तरे


उतारा क्र. १
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कोण ते लिहा :
(१) चैतन्याचे छोटे कोंब ___
(२) सफे द दाढीतील के सांएवढ्या आठवणी असणारा ___
(३) शाळेबाहेरचा बहुरूपी ___
(४) अनघड, कोवळे कं ठ ___
(५) मामूच्या मुखड्यावर उतरणारी ___
(६) भल्या पहाटे चौदा मैलांची पायपीट करणारा ___
(७) चहूवाटांनी पांगणारा ___
(८) लेखकांच्या हाताखाली शिकलेला मामूचा मुलगा ___
(२) कृ ती करा :
(१) लेखकांनी विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्दसमूह
(१) ___
(२) ___
(३) ___
(४) ___
(२) मामूची शालाबाह्य रूपे
(१) ___
(२) ___
(३) ___
वि. सू. : पाठ्यपुस्तकातील कृ ती (प्रश्न) * या चिन्हांनी दाखवल्या आहेत.
(३) गृहप्रवेशाच्या वेळी मामूच्या घरी आलेले पाहणे
(१) ___
(२) ___
(३) ___
(४) ___
(५) ___
(३) पुढील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा :
(१) मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो –
(२) एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते –
(३) एक ना दोन नाना त-हेचे उद्योग मामू करतो –
(४) मामूएवढा मासला मला काही बघायला मिळाला नाही –
(४) पुढील शब्दसमूहांचा अर्थ लिहा :
(१) थोराड घंटा
(२) अभिमानाची झालर
(३) कष्टमय चाकरीचं फळ
(४) शेवटचा शब्द.
उतारा क्र. १ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २ व ३)
'घण घण घण्ऽऽ!' थोराड घंटेचे टोलांवर टोल पडत राहतात. चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थनामंदिराकडं एकवटू लागतात.
समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो.
रांगा धरून उभे राहिलेले अनघड, कोवळे कं ठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात.
मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुनेवाणाची सफे द दाढी कु रवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं.
प्रार्थना संपते. 'जनगणमन'ची इशारत मिळते. खांबाला रेललेला मामू पाय जोडू न सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो.
या शाळेचा मामू एक अवयव झालाय. गेली चाळीस वर्षे तो आपल्या अलिबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत, असे चैतन्याचे कोंब नाचवत आलाय.
कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे. त्यानं दोन राज्यं बघितली. संस्थानाचं आणि लोकशाहीचं.
कोल्हापूरकरांच्या कै क पिढ्या बघितल्या.
मामूच्या सफे द दाढीत जेवढे के स आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील! खूप बघितलंय आणि भोगलंय त्यानं. महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर
पडला तर मामूला भल्या पहाटे उठू न साथीदारांसह चौदा मैलांची पायपीट करावी लागलीय; पण ही आठवण सांगताना कु ठं वेदनेची कळ त्याच्या
दाढीधारी चर्येवर तरळत नाही. उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते. डोळे किलकिले करत,
भुवया आक्रसून त्याच्या बुढ्या देहातील उमदं मन बोलून जातं, 'सर, फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं. आता वाटतं पर न्हाई
झेपत.'
संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग चौवाटा पांगला. त्यातच मामू या शाळेत रुजू झाला. एक शिपाई म्हणून.
डु ईला अबोली रंगाचा फे टा, अंगात नेहरू शर्टावर गर्द निळं जाकीट, जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉके ट वॉच, खाली घेराची
आणि घोट्याजवळ चुण्या असलेली तुमान, पायात जुनापुराणा पंपशू हा मामूचा पोशाख आहे.
शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कु ठं फळांच्या मार्के टमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याचं दुकान
चालव, तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलंसं कर; कु ठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चाबच्चीला उर्दूची शिकवण दे. एक ना दोन
नानात-हेचे उद्योग मामू करतो.
शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात. मौलवी, व्यापारी, उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता
येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय – मामू !
दहा वर्षांपूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलोय. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू
एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही.
मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूनं के लेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल;
पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालीत. पैसा कमावतात म्हणून माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे. तो कधी खाली पडत
नाही.
असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं 'शादी मुबारक' निघालं. ठरल्याप्रमाणं मामू मला आमंत्रण द्यायला आला. “सर, पोराचं
लग्न हाय. यायला पाहिजे."
"मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल? नक्की येईन.'' मी उत्तर दिलं.
एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसांनी भरला होता. मामूनं पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं.
त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बड़े व्यापारी होते, शिक्षक, प्राध्यापक होते. हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून के लेल्या
चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफे द दाढीभर पसरलं होतं. निका लागला. मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात
घेतला.
“आज माज्या मुलाच्या लग्नाला आमदारसाहेब आलेत, खासदारसाहेब आलेत, मृत्युंजयकार आलेत-माज्या गरिबाच्या___" मामूचा कं ठ दाटू न
आला. त्याला बोलता येईना. त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली. मामूनं कसेबसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला.
'धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे!' असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो.
मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला. चांगल्या गुणांनी एस. एस. सी. पास झाला. तो पास होताच मामूचं माझ्यामागं लकडं लागलं,
“सर, शाबूला कु ठंतरी चिकटवा.'
"मामू, हा शेवटचा बच्चा. तुमच्यात कु णीच पदवीधर नाही. याला शिकू द्या. याला नोकरीत अडकवलात, की हा संपला. जरा नेट धरा. काही
अडलं नडलं मला सांगा." मी मामूला दिलासा देत होतो.
नोंद : - प्रस्तुत पुस्तकातील हा पहिला कृ ति-स्वाध्याय आहे. त्यामुळे या पाठातील स्वाध्यायात संपूर्ण उतारा दिलेला आहे. यापुढे मात्र प्रत्येक
पाठातील स्वाध्यायांत संपूर्ण उतारा न देता उताऱ्याचे सुरुवातीचे काही शब्द व शेवटचे काही शब्द दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातून पूर्ण
उतारा वाचावा.
परीक्षेत १३० ते १५० शब्दांचा उतारा दिला जाईल. इथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी थोडा मोठा उतारा दिलेला आहे. कारण त्यामुळे अधिक कृ ती देता
येणे शक्य झाले आहे.
उत्तरे
(१) (१) चैतन्याचे छोटे कोंब : शाळेतील लहान मुले.
(२) सफे द दाढीतील के सांएवढ्या आठवणी असणारा : मामू.
(३) शाळेबाहेरचा बहुरूपी : मामू.
(४) अनघड, कोवळे कं ठ : शाळेतील लहान मुले.
(५) मामूच्या मुखड्यावर उतरणारी : अभिमानाची झालर.
(६) भल्या पहाटे चौदा मैलांची पायपीट करणारा : मामू.
(७) चहूवाटांनी पांगणारा : इमानी चाकरवर्ग.
(८) लेखकांच्या हाताखाली शिकलेला मामूचा मुलगा : शाबू.
(२) (१) लेखकांनी विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्दसमूह
(१) चैतन्याचे छोटे कोंब
(२) अनघड, कोवळे कं ठ
(३) रांगा धरून उभे राहिलेले
(४) भावपूर्ण सुरांत प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवणारे
(२) मामूची शालाबाह्य रूपे
(१) मौलवी
(२) व्यापारी
(३) उस्ताद
(३) गृहप्रवेशाच्या वेळी मामूच्या घरी आलेले पाहुणे
(१) आमदार
(२) शिक्षक
(३) खासदार
(४) प्राध्यापक
(५) बडे व्यापारी
(३) (१) मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. - देशभक्ती
(२) एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते. – स्वामिनिष्ठा
(३) एक ना दोन नाना त-हेचे उद्योग मामू करतो. - हरहुन्नरीपणा
(४) मामूएवढा मासला मला काही बघायला मिळाला - अष्टपैलूपणा
(४) (१) थोराड घंटा - दणकट, मोठी व वजनदार घंटा.
(२) अभिमानाची झालर - झालरीमुळे शोभा येते. मामूच्या चेहऱ्यावर अभिमानाचा भाव होता. त्या भावाला झालरीची उपमा दिली आहे. नाही.
(३) कष्टमय चाकरीचं फळ - प्रामाणिकपणे कष्ट के ल्यास मिळणारे चांगले फळ.
(४) शेवटचा शब्द - अंतिम निर्णय. आज्ञेसारखा शब्द. त्या शब्दाप्रमाणे वागण्याची अपेक्षा असते.
कृ ती २ : (स्वमत)
(१) 'शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे', या मामूसंबंधी के लेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : शाळेत एक शिपाई म्हणून मामू नोकरी करत होता. तो कष्टमय जीवन जगणारा एक कर्मचारी होता. अशा माणसाचे आयुष्य सामान्य
पातळीवरच राहते. पण मामूचे मात्र तसे नव्हते. अनेकांना अनेक बाबतींत तो तत्परतेने मदत करायला जाई. यामुळे त्याला अनेक गोष्टींचे आपोआपच
ज्ञान होत गेले.
लोकांना मदत करावी, ही त्याची वृत्तीच होती. कोणाच्या दुकानावर जाऊन बस. ती चालवायला मदत कर. कोणाच्या मुलांना उर्दू शिकवायला जा.
आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात तर त्याचा हातखंडा होता. कोणाला काही दुखले-खुपले तर तो आवर्जून औषधोपचार करी. लोकांना आत्मीयतेने
आरोग्यविषयक सल्ला देई. अशी समोर येतील ती कामे मामू करीत गेला. मनापासून करीत गेला. आपल्याला हे येणारच या आत्मविश्वासाने करीत
गेला. त्यातून अनेक कौशल्ये वाढत गेली. तो हरहुन्नरी बनला. जणू तो बहुरूपीच होता. तो नीतीने वागणारा होता. त्याला लोकांविषयी कळकळ
वाटत असे. कोणालाही तो तत्परतेने मदत करी. या सगळ्या गुणांमुळे समाजात त्याला खूप मान होता. आमदार, खासदार, बड़े व्यापारी, शिक्षक,
प्राध्यापक अशा वरच्या थरांतल्या लोकांशी त्याचे आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. त्या लोकांमध्ये त्याला मानाचे स्थान होते. अगदी
सामान्यांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तो सर्वत्र सामावून गेला होता म्हणून लेखकांनी त्याला बहुरूपी म्हटले आहे.
(२) मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : मामू हा कष्टमय जीवन जगणारा एक सामान्य माणूस होता. मात्र त्याचे मन संवेदनशील होते. एकदा राजाराम महाराजांचा मुक्काम
पन्हाळगडावर होता. मामूला पन्हाळ्यावर हजेरी लावावी लागली. त्या काळात सामान्य माणसाला वाहतुकीची कोणतीच साधने उपलब्ध नव्हती.
पन्हाळ्यावर जायचे म्हणजे दगडधोंड्यांतून, काट्याकु ट्यांतून, जंगलातून वाट काढत जायचे होते. बरे, महाराजांच्या सेवेसाठी जायचे असल्यामुळे
रमत-गमत जाणे शक्यच नव्हते. अशा या खडतर वाटेने चौदा मैलांची पायपीट के ल्यावर त्याचे शरीर दमले होते. पण त्याची याबद्दल जराही तक्रार
नव्हती. त्याचे मन मात्र ताजे, टवटवीत होते. तो निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत तिथे पोहोचला होता. आताही इतक्या वर्षांनंतर त्या प्रसंगाची
आठवण काढताना त्याच्या तोंडू न उद्गार येतात, "फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं." मामूची ही संवेदनशीलताच होय.
दुसरा प्रसंग म्हणजे मामूच्या मुलाच्या लग्नाचा प्रसंग. मामूच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याचे अनेकांशी आपुलकीचे
नाते निर्माण झाले होते. म्हणून या लग्नाला समाजातील अनेक मोठमोठी माणसे आली होती. आमदार, खासदार, बड़े व्यापारी, शिक्षक-प्राध्यापक
असे वेगवेगळ्या थरांतले लोक आत्मीयतेने जमले होते. ते पाहून त्याचे मन भरून आले. आपल्यासारख्या सामान्य, गरीब माणसाविषयी लोकांना
खूप आत्मीयता आहे, हे पाहून त्याचा कं ठ दाटू न आला. सर्वांचे आभार मानताना त्याच्या कं ठातून शब्दच फु टेनात. कसेबसे आभार मानून त्याने
माईक खाली ठेवला. या दोन्ही प्रसंगांतून मामूच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडते.
(३) मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा,
उत्तर : मामू आता वृद्धत्वाकडे झुकला होता. त्याची पांढरीशुभ्र लांब दाढी हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे एक ठळक वैशिष्ट्य होते. त्याने खूप अनुभवले
आहे; खूप भोगले आहे, याची साक्ष त्याची दाढी देत होती. तो सामान्य स्तरावरचा नोकरदार माणूस होता. पण त्याच्या चेहऱ्यावर कधीही
उदासीनता किं वा निराशा नसायची. त्याचे मन अजूनही उमदे होते. तो निष्ठेने वागणारा होता. अडीअडचणीला कोणालाही मदत करायचा आणि
आईच्या ममतेने सगळ्यांशी वागायचा. त्याचा पोशाखही तसा ठरलेलाच होता. डोक्याला अबोली रंगाचा फे टा, नेहरू शर्टावर गर्द निळे जाकीट,
जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचे एक जुने पॉके ट वॉच, खाली घेराची आणि घोट्याजवळ चुण्या असलेली तुमान, पायामध्ये जुनापुराणा पंपशू
हा असा मामूचा पोशाख होता. मामूचे नाव घेताच साधारणपणे हेच चित्र डोळ्यांसमोर उभे राहायचे.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) तुम्हांला जाणवलेले या उताऱ्याचे भाषिक वैशिष्ट्य सोदाहरण सांगा.
उत्तर : या उताऱ्यातून सर्वांत जास्त ठळकपणे जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे बोलीभाषेचा वापर. मामू हा शाळेत शिपाईपदावर काम करणारा एक
सामान्य माणूस होता. तो तिथल्या स्थानिक बोलीमध्येच संभाषण करीत असे. म्हणून त्याचे बोलणे बोलीभाषेत दिलेले आहे. उदाहरणार्थ, “फाटेचं
धुक्यातनं पन्हाळ्यावर चढनं लई गमतीचं." शिवाय संपूर्ण उताराभर 'त्याचं, लोकशाहीचं, जातं, वाटतं, एवढं, रूपं, डु ईला, बुढ्या, बच्चाबच्चीला,
मामूनं, कु ठं, लागलं' अशी शब्दांची बोलीभाषेतली कितीतरी रूपे आढळतात. या भाषाशैलीमुळे मामूचे सरळ, साधे, निष्कपट, निर्मळ मन
सहजपणे व्यक्त झाले आहे.
आणखी एक भाषिक वैशिष्ट्य नोंदवायला हवे. अल्लाची खैर, शादी मुबारक असे शब्द आणि मुसलमान अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दू शिकवणे ही कृ ती
यांसारख्या तुरळक उल्लेखांनी मामू हा मुसलमान होता, हे लक्षात येते. मामूच्या धर्माबद्दल थेट व स्पष्ट उल्लेख न करता लेखकांनी काही शब्दांच्या
तुरळक उल्लेखांनी त्याच्या धर्माची जाणीव करून दिली आहे. हे लेखकांचे भाषिक कौशल्यच होय.
(२) या उताऱ्यातून जाणवणारा मामूचा कोणता गुण तुम्हाला आवडला? स्पष्ट करा.
उत्तर : मामू हा एका सरकारी शाळेमध्ये शिपाईपदावर नोकरी करत होता. आपण सामान्य पदावरील नोकर आहोत, याची मामू खंत बाळगत बसला
नाही. त्याने अनेक कौशल्ये आत्मसात के ली होती. लोकांना मदत करावी, ही त्याची वृत्तीच होती. कोणाच्या दुकानावर जाऊन बस. ती
चालवायला मदत कर. कोणाच्या मुलांना उर्दू शिकवायला जा. अशी समोर येतील ती कामे मामू करीत गेला. मनापासून करीत गेला. आपल्याला हे
येणारच या आत्मविश्वासाने करीत गेला. त्यातून अनेक कौशल्ये वाढत गेली. तो हरहुन्नरी बनला. लोकांना त्याच्यात एकाच वेळी अनेक रूपे दिसत.
शाळेतील लोकांना तो शिपाई वाटत असे. शाळेबाहेरच्या लोकांना मात्र त्याची अनेक रूपे दिसत. कोणाला तो मौलवी वाटे. कोणाला व्यापारी वाटे.
तर कोणाला उस्ताद! पण त्याच्या कर्तबगारीचा त्याला गर्व झाला नाही. तो सतत विनम्रच राहिला. त्यामुळेच, मुलाच्या लग्नाला समाजातील मोठी
माणसे आली, या घटनेने तो गहिवरला. त्याचा कं ठ दाटू न आला. आपल्या मनाच्या या निर्मळपणामुळेच तो आपले बहुरूपेपण टिकवू शकला. मामूचे
हे बहुरूपेपण मला खूप आवडले.
उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कोण ते लिहा :
(१) अल्लाला प्यारी झालेली : ___
(२) मामूने कॉलेजात दाखल के लेला : ___
(३) जुन्या काळातील शिक्षकांपैकी एक भारी माणूस : ___
(४) पाखरागत हालचाली करणारा : ___
(२) कृ ती करा :
(१) परीक्षा कें द्रातील काही कामे
(१) ___
(२) ___
(३) ___
(२) मामूला ज्यांचे ज्ञान आहे असे दोन विषय
(१) ___
(२) ___
(३) पुढील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा :
(१) आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते.
(२) मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, “घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला."
(३) माझ्याकडं कु णी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डु लवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो.
(४) मामू एखाद्या कार्यक्रमात मुलांच्या समोर दहा-वीस मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो.
(५) काय पवार सर, काय ही तब्येत?
(४) पुढील शब्दसमूहांचा अर्थ लिहा :
(१) हरवलेल्या काळाला मुठीत पकडणे
(२) अंग धरणे
उतारा क्र. २ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३ ते ५)
बदलत्या काळाची पावलं ओळखून ___ ___ ___ विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा.
उत्तरे
(१) (१) अल्लाला प्यारी झालेली : मामूची आई.
(२) मामूने कॉलेजात दाखल के लेला : शाबू-मामूचा मुलगा.
(३) जुन्या काळातील शिक्षकांपैकी एक भारी माणूस : एम. आर. सर.
(४) पाखरागत हालचाली करणारा : मामू.
(२) (१) परीक्षा कें द्रातील काही कामे
(१) बाकांवर क्रमांक टाकणे
(२) बैठकीची व्यवस्था करणे
(३) परीक्षार्थ्यांना पाणी देणे
(२) मामला ज्यांचे ज्ञान आहे असे दोन विषय
(१) उर्दू
(२) वैद्यक
(३) (१) आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. - मातृप्रेम/भावनाशीलता
(२) मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, “घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला." - वात्सल्य
(३) माझ्याकडं कु णी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डु लवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. - हुशारी
(४) मामू एखाद्या कार्यक्रमात मुलांच्या समोर दहा-वीस मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. - अभ्यासू वृत्ती
(५) काय पवार सर, काय ही तब्येत? - आपुलकी
(४) (१) हरवलेल्या काळाला मुठीत पकडणे - भूतकाळातल्या आठवणींमध्ये रममाण होणे.
(२) अंग धरणे - शरीरयष्टी गुटगुटीत, व्यवस्थित होणे.
कृ ती २ : (स्वमत)
(१) मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : मामू हा शाळेत शिपाई होता. मात्र, तो कोरडेपणाने काम करणारा नव्हता. तो संवेदनशील होता. लोकांच्या भावभावनांशी, त्यांच्या
सुखदुःखांशी तो समरस होत असे. गरिबांबद्दल तर त्याच्या मनात खूप कळकळ होती. तो स्वतः गरीब होताच, पण त्याच्या भोवतालच्या परिसरातही
गरीब कु टुंबे राहत होती. त्यांना शक्य तेवढे साहाय्य करण्याचा तो नेहमी प्रयत्न करीत असे. तो ज्या शाळेत काम करीत होता, ती सरकारी शाळा
होती. त्यामुळे सर्व शासकीय परीक्षांसाठी ती शाळा कें द्र असायची. त्या परीक्षांसाठी बाके लावून बैठक व्यवस्था करणे, बाकांवर परीक्षा क्रमांक
लिहिणे, परीक्षा चालू असताना परीक्षार्थ्यांना पाणी देणे अशी नेहमीपेक्षा वेगळी कामे करावी लागत. त्या कामांसाठी सरकार पैसेही देत असे. अशा
वेळी मामू आपल्या परिसरातील गरीब घरांतील मुलांना ही कामे मिळवून द्यायचा. त्यामुळे त्या गरिबांना थोडे का होईना आर्थिक साहाय्य व्हायचे.
शाळेत मुले धावपळ करतातच. त्यात एखादे मूल पडते. कधी कधी एखाद्या मुलाला चक्कर येते. अशा वेळी मामू तत्परतेने त्या मुलाला रिक्षात घालून
डॉक्टरकडे नेई. डॉक्टरकडे नेताना त्याची आईप्रमाणे काळजी घेई. मुलाने धीर सोडू नये, तो मनाने खचू नये, म्हणून मामू त्याला दिलासा देण्याचा
प्रयत्न करी. आईप्रमाणे तो त्या मुलाला सांगायचा, “घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं नाही तुला." अशा शब्दांच्या माध्यमातून मामू त्या
मुलाला आजारातून सावरण्यासाठी शक्ती द्यायचा.
हे दोन्ही प्रसंग मामूच्या संवेदनशीलतेची साक्ष देतात.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) 'मामू' या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर : 'मामू' या पाठातील मामूचे व्यक्तिचित्रण अत्यंत प्रभावी व परिणामकारक झाले आहे. या पाठातील मामू वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो;
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लेखकाची चित्रदर्शी शैली. "दगडी खांबाला रेलून आपली चुनेवाणाची सफे द दाढी कु रवाळत मामू ती समूह प्रार्थना ऐकत
राहतो." "खांबाला रेललेला मामू पाय जोडू न सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो." "डोळे किलकिले करीत, भुवया आक्रसून तो बोलतो." या
अशा मोजक्या तपशिलांतून मामूच्या हालचाली, त्याचे हावभाव, चेहऱ्यावर तरळणाऱ्या भावभावना प्रत्ययकारक रितीने चित्रित होतात.
याच वर्णनाला उपमा-रूपकांची सुंदर जोड मिळते आणि मामूचे व्यक्तिमत्त्व वाचकांच्या डोळ्यांसमोर साकार होते. उदाहरणार्थ, "चैतन्याचे छोटे कोंब
उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडं एकवटू लागतात."
काही वेळा खूप कमी शब्दांमध्ये लेखक व्यापक आशय व्यक्त करतात. उदाहरणार्थ, एखाद्याच्या दुकानावर घटकाभर बसून त्याला दुकान चालवायला
मदत करणे आणि कोणाच्यातरी मुला-मुलीला उर्दू शिकवणे या दोन कृ तींच्या साहाय्याने लेखक मामूच्या नाना त-हेच्या उद्योगांचे वर्णन करतात.
सगळ्यात महत्त्वाचा विशेष म्हणजे या पाठात लेखकांनी बोलीभाषेचा अत्यंत समर्पक उपयोग के लेला आहे. मामूच्या तोंडी पूर्णपणे बोलीभाषा दिलेली
असल्यामळे त्याच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा. सरळपणा. प्रामाणिकपणा, त्याच्या मनाचा निर्मळपणा लेखक सहजपणे प्रकट करतात. पण फक्त
त्याच्या तोंडीच बोलीभाषा योजलेली आहे, असे नाही, तर लेखकाच्या निवेदनामध्येही बोलीमधील शब्दरूपे विपुलतेने आढळतात. उदाहरणार्थ,
सारं, कु णाकडं, इथलं, डु ई, कवळिकीच्या वगैरे. यामुळे पाठामधील सर्व निवेदन मामूच्या व्यक्तिमत्त्वाच्या खूप जवळ जाणारे बनते.
(२) मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा.
किं वा
मामूच्या व्यक्तिमत्त्वातले तुम्हांला जाणवलेले गुण स्पष्ट करा.
उत्तर : मामू हा खूप भावनाशील होता. तो निवृत्त व्हायला आलेला होता. त्याला नातवंडे होती. या वयातही आई गेल्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रू
आले. तो आईच्या आठवणींनी व्याकू ळ झाला.
राजाराम महाराजांचा पन्हाळगडावर मुक्काम असताना मामूला तिथे जावे लागले. त्या काळात वाहनांची सोय असणे अशक्य होते. दगडधोंड्यांतून,
जंगलातून पायपीट करीत त्याला चौदा मैल जावे लागले. या प्रवासाचा त्याला खूप त्रास झाला. पण तो इतका संवेदनशील होता
की, या शारीरिक कष्टांची जाणीव होण्याऐवजी त्याला धुक्यातून जाणवलेले पन्हाळगडाचे नैसर्गिक सौंदर्य भावले.
मामू हा परोपकारी होता. सेवाभावी होता. त्यामुळे तो कधीही, कोणालाही, कोणतीही मदत करायला तत्परतेने तयार असे. एखाद्याला दुकान
चालवण्यासाठी थोडा वेळ मदत करणे इथपासून ते उर्दू शिकवण्यासाठी शिक्षक होणे इथपर्यंतच्या सर्व प्रकारच्या भूमिका तो करत असे. कधी तो
मौलवी असे. कधी व्यापारी, तर कधी उस्ताद. विविध प्रकारची कामे करता करता त्याने अनेक प्रकारची कौशल्ये आत्मसात के ली. त्यामुळे त्याला
लेखकांनी बहुरूप्याची उपमा दिली आहे.
मामू सर्वांशी प्रेमाने, सेवाभावी वृत्तीने, नम्रपणाने, निगर्वीपणे वागत राहिला. साहजिकच समाजातल्या सर्व थरांतल्या अनेक लोकांशी त्याचे
आपुलकीचे नाते निर्माण झाले. म्हणून मुलाच्या लग्नाच्या वेळी आमदार, खासदार, व्यापारी, शिक्षक-प्राध्यापक अशी विविध क्षेत्रांतली माणसे हजर
होती. मात्र, या प्रसंगाने त्याच्या मनात गर्वाची भावना निर्माण झाली नाही. या क्षणीसुद्धा तो विनम्र होता.
शाळेत कोणत्याही कामासाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे काम तो तत्परतेने करून देई. शाळेतल्या मुलांची तो आईच्या मायेने काळजी घेई. शाळेत
होणारे कार्यक्रम, भाषणे, चर्चा तो मनापासून ऐकत असे. ऐकलेले मनात साठवून ठेवत असे. त्यामुळे अनेक विषयांचे ज्ञान त्याच्या डोक्यात
साठवलेले असे. सर्वांविषयी त्याला ममत्व वाटत असल्याने तो सगळ्यांची आपुलकीने चौकशी करी. सल्ले देई. आपले काम तो चोख व पद्धतशीरपणे
करीत असे
एकं दरीत, किती चांगले असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मामू होय.
(३) 'माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे', या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : माणूस हा सामाजिक प्राणी आहे. म्हणून तो गट करून राहतो. आणि असा गट करताना बहुतेक वेळा माणसे जातिधर्मांच्या साहाय्याने एकत्र
होतात. धर्मांवरून एकमेकांना ओळखतात. आपण वेगवेगळ्या धर्मांना वेगवेगळे गुण चिकटवून टाकले आहेत. विशिष्ट धर्माचे लोक विशिष्ट
स्वभावगुणांनी युक्त असतात, असे आपण ठरवून टाकले आहे. माणसांचे हे वर्तन शतकानुशतके चालू आहे. लेखकांना माणसांची ही वृत्ती माहीत
आहे.
या पाठातील मामूच्या सहवासाने समाजाची ही चूक ठळकपणे लेखकांच्या लक्षात येते. मामू हा धर्माने मुसलमान आहे. वाचकाला हे के वळ दोन-तीन
तपशिलांतूनच कळते. त्याच्या पलीकडे मामूच्या वर्णनात कु ठेही धर्माचा संबंध येत नाही. मामूचे संपूर्ण वागणेच धर्मनिरपेक्ष आहे. तो आणि इतर
माणसे या सगळ्यांचे वागणे सारखेच आहे. मामू भोवतालच्या समाजामध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. तो जाती-धर्माच्या पलीकडे गेला आहे. तो
सर्वांकडे माणूस म्हणूनच पाहतो.
लेखकांना मामूचा दहा वर्षे सहवास लाभला आहे. या दहा वर्षांत मामूचा साधेपणा, सरळपणा, निष्कपटपणा, सेवाभावी वृत्ती हे माणसामधले चांगले
गुणच लेखकांच्या प्रत्ययाला आले आहेत. म्हणजे मामू हा आरपार सज्जन माणूस आहे.
शाळेत शिपाई म्हणून काम करताना त्याच्या मनात कधीही धर्माची भावना निर्माण झाली नाही. कोणत्याही सच्च्या भारतीयाप्रमाणे त्याचीही देशभक्ती
प्रामाणिक आहे. शाळेतला मुलगा असो वा शिक्षक असो त्याच्याशी मामू धर्म न पाहता आत्मीयतेने वागतो. म्हणूनच जातधर्माच्या पलीकडे जाऊन
अनेक माणसांशी त्याचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहेत; हे त्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी सिद्ध होते. माणसाने किती चांगले असावे याचे
आदर्श उदाहरण म्हणजे मामू होय.
मामूच्या उदाहरणावरून लेखकांना धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे, ही जाणीव मनात ठसून जाते.

व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
तक्ता पूर्ण करा :
वाक्ये शब्दशक्ती
(१) मामू, शाळेत शिपाई आहे. - अभिधा
(२) या शाळेचा मामू एक अवयव झालाय. - व्यंजना
२. काव्यगुण :
पुढील ओळींतील काव्यगुण ओळखून लिहा : उत्तरे
(१) जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें ' स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते - माधुय
(२) हे अधम-रक्त-रंजिते ओज सुजन-पूजिते ! श्रीस्वतंत्रते - ओज
(३) गालावरच्या कु सुमी किं वा कु सुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती! तूच जी विलसतसे लाली - प्रसाद
३. वाक्यसंश्लेषण (वाक्याचे प्रकार) :
(१) पुढील वाक्यातील उद्देश्य - उद्देश्यविस्तार, विधेय - विधेयविस्तार ओळखून लिहा :
• महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला.
उद्देश्य →\rightarrow
मुक्काम
विधेय →\rightarrow
पडला
उद्देश्यविस्तार →\rightarrow
महाराजांचा
विधेयविस्तार →\rightarrow
पन्हाळ्यावर
(२) पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा : उत्तरे
(१) शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. - संयुक्त वाक्य
(२) मामूने आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. - के वल वाक्य
(३) शाळेत एखादा कार्यक्रम निघाला, की त्याची आखणी मामच्या हातात असते. - मिश्र वाक्य
४. काळ :
• पुढील वाक्यांचे काळ ओळखा : उत्तरे
(१) संस्थाने विलीन झाली. - भूतकाळ
(२) मामू बदलत्या काळाची पावले ओळखतो. - वर्तमानकाळ
(३) चैतन्याचे अगणित कोंब नाचत राहतील. - भविष्यकाळ
५. शब्दभेद :
(१) पुढील शब्दांतील भेद स्पष्ट करणारी वाक्ये लिहा :
शब्द वाक्ये
(१) राष्ट्रगीत →\rightarrow
'जण-गण-मन' हे आपले राष्ट्रगीत आहे.
(२) राष्ट्रीयगीत →\rightarrow
'वंदे मातरम्' हे आपले राष्ट्रीयगीत आहे.
(२) पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
(i) बाक - ___, ___
(ii) नाव - ___, ___
उत्तरे :
(i) बाक - बसण्याचे साधन, वक्रता
(ii) नाव - होडी, नाम
आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दसंपत्ती :
भाषाभ्यास : शब्दसिद्धी
(१) उपसर्गघटित शब्द :
• पुढील शब्द लक्षपूर्वक अभ्यासा :
(१) सु ++
विचार →\rightarrow
सुविचार (चांगला विचार)
(२) दर ++
रोज →\rightarrow
दररोज (प्रत्येक दिवस)
• 'विचार' या शब्दाआधी 'सु' हे अक्षर आले आहे.
• ‘रोज' या शब्दाआधी 'दर' हा शब्द आला आहे.
• शब्दाच्या आधी लागलेल्या शब्दांना उपसर्ग म्हणतात.
• शब्दांच्या आधी अक्षर किं वा शब्द लागून जे नवीन शब्द तयार होतात, त्यांना उपसर्गघटित शब्द म्हणतात.
• म्हणून, 'सुविचार' व 'दररोज' हे उपसर्गघटित शब्द आहेत.
काही उपसर्गघटित शब्द : अपमान, आजन्म, अनुक्रम, प्रतिबिंब, आडनाव, निरोगी, गैरहजर, बिनचूक, बेजबाबदार इत्यादी.
(२) प्रत्ययघटित शब्द :
• पुढील शब्द लक्षपूर्वक अभ्यासा :
(१) रस ++
इक →\rightarrow
रसिक
(२) झोप ++
आळू →\rightarrow
झोपाळू
• 'रस' या शब्दामागे ‘इक' हा शब्द लागला आहे.
• 'झोप' या शब्दामागे ‘आळू' हा शब्द लागला आहे.
• शब्दांच्या मागे लागलेल्या अक्षरांना किं वा शब्दांना प्रत्यय म्हणतात.
• शब्दांच्या मागे अक्षर किं वा शब्द लागून जे नवीन शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात.
• म्हणून, 'रसिक' व 'झोपाळू' हे प्रत्ययघटित शब्द आहेत.
काही प्रत्ययघटित शब्द :
लेखक, पथिक, कर्तव्य, शिलाई, पुजारी, लाजाळू, रेखीव, भांडखोर, शेतकरी, दळणावळ, हसरा इत्यादी.
(३) अभ्यस्त शब्द :
• अभ्यस्त म्हणजे पुनरावृत्ती (पुन्हा पुन्हा येणे) होय. जे शब्द दोनदा येतात किं वा पुनरावृत्त होतात व नवीन जोडशब्द तयार होतो, त्यास
अभ्यस्त शब्द म्हणतात.
• अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार आहेत :
(अ) पूर्णाभ्यस्त (आ) अंशाभ्यस्त (इ) अनुकरणवाचक.
(अ) पूर्णाभ्यस्त शब्द : एक शब्द पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो. उदा,. लाललाल, मधूनमधून, समोरासमोर इत्यादी.
(आ) अंशाभ्यस्त शब्द : एखादे अक्षर बदलून तोच शब्द पुन्हा येतो. उदा., नोकरीबिकरी, शेजारीपाजारी, गोडधोड इत्यादी.
(इ) अनुकरणवाचक शब्द : काही ध्वनिवाचक शब्द पुन्हा पुन्हा (पुनरावृत्त) होतात. उदा., गडगड, बडबड, किरकिर, कडकडाट इत्यादी.
(१) पुढील शब्दांचे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा :
(१) अनुमती (२) जुनापुराणा
(३) साथीदार (४) घटकाभर
(५) भरदिवसा (६) ओबडधोबड
(७) नानात हा (८) गुणवान
(९) अगणित (१०) अभिवाचन.
उत्तरे :

उपसर्गघटित प्रत्ययघटित अभ्यस्त

अनुमती घटकाभर जुनापुराणा

अभिवाचन गुणवान ओबडधोबड

भरदिवसा साथीदार नानातऱ्हा

अगणित

(२) पुढील शब्दांतील अक्षरे निवडू न अर्थपूर्ण शब्द तयार करा :


(१) इशारतीबरहुकू म (२) आमदारसाहेब (३) समाधान.
उत्तरे : (१) इशारतीबरहुकू म :
इशारती, रती, हुकू म, तीर, मर, बशा, बहु
(२) आमदारसाहेब :
आमदार, साहेब, आब, दार, दाब, सार, दाम, मदार, मर
(३) समाधान :
सन, मान, समान, नस, धान, मास, समास
(३) समानार्थी शब्द लिहा :
चर्या ==
___
गर्द ==
___
आठवण ==
___
शाळा ==
___
उत्तरे : चर्या ==
चेहरा
गर्द ==
दाट
आठवण ==
स्मरण
शाळा ==
विद्यालय
(४) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) मित्र ×\times
___
(२) अवाढव्य ×\times
___
(३) जुने ×\times
___
(४) पुढे ×\times
___
(५) चांगला ×\times
___
(६) ज्ञान ×\times
___
उत्तरे : (१) मित्र ×\times
शत्रू
(२) अवाढव्य ×\times
चिमुकले
(३) जुने ×\times
नवे
(४) पुढे ×\times
मागे
(५) चांगला ×\times
वाईट
(६) ज्ञान ×\times
अज्ञान.
(५) लिंग बदला :
(१) विद्यार्थी - ___
(२) शिक्षक - ___
(३) पाहुणा - ___
उत्तरे : (१) विद्यार्थी – विद्यार्थिनी
(२) शिक्षक - शिक्षिका
(३) पाहुणा - पाहुणी
(४) मित्र - मैत्रीण.
(६) विशेषणे-विशेष्ये यांच्या जोड्या लावा :
विशेषणे →\mathbf{\rightarrow}
छोटे, सफे द, निळे, समूह
विशेष्ये →\rightarrow
जाकीट, प्रार्थना, कोंब, दाढी
उत्तरे : (१) छोटे - कोंब
(२) सफे द - दाढी
(३) निळे - जाकीट
(४) समूह - प्रार्थना.
(७) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : उत्तरे
(१) भाषण करणारी व्यक्ती →\rightarrow
वक्ता
(२) भाषण ऐकणारी व्यक्ती →\rightarrow
श्रोता
२. लेखननियम :
• पुढील शब्दगटांतून अचूक शब्द निवडा : उत्तरे
(१) विलिन/विलीन/वीलिन/वीलीन - विलीन
(२) मुकाम/मुक्काम/मुक्काम/मूकाम - मुक्काम
(३) नीर्धार/निधार्र/निरधार/निर्धार - निर्धार
(४) परीक्षा/परिक्षा/परीक्शा/परिक्शा - परीक्षा.
३. विरामचिन्हे :
• चिन्हे लिहा :
(१) अपूर्ण विराम →\rightarrow
___
(२) अर्धविराम →\rightarrow
___
(३) पूर्णविराम →\rightarrow
___
(४) स्वल्पविराम →\rightarrow
___
उत्तरे : (१) अपूर्ण विराम →\rightarrow
:
(२) अर्धविराम →\rightarrow
;
(३) पूर्णविराम →\rightarrow
.
(४) स्वल्पविराम →\rightarrow
,
४. वाक्प्रचार :
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :
(१) चौवाटा पांगणे
(२) कं ठ दाटू न येणे
(३) हरवलेला काळ मुठीत पकडणे.
उत्तरे : (१) चौवाटा पांगणे - चहूबांजूना (चारी वाटांवर) विखुरणे, सर्वत्र पांगणे.
वाक्य : गावात दुष्काळ पडला नि गावकरी चौवाटा पांगले.
(२) कं ठ दाटू न येणे - गहिवरणे.
वाक्य : मुलीला सासरी पाठवताना यशोदाबाईंचा कं ठ दाटू न आला.
(३) हरवलेला काळ मुठीत पकडणे - भूतकाळातील आठवणी जागृत होणे.
वाक्य : कै क वर्षांनी शाळेला भेट देणाऱ्या बापूसाहेबांनी हरवलेला काळ मुठीत पकडला.
५. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Circular - परिपत्रक
(२) Jubilee - महोत्सव
(3) X-ray - क्ष-किरण
(४) Organisation - संघटना
(५) Nationalism - राष्ट्रवाद.
प्रकल्प
• तुमच्या परिसरातील ‘मामू'सारख्या बहुगुणी व्यक्तीचा शोध घ्या. त्याच्या व्यक्तिविशेषाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.

२. प्राणसई
- इंदिरा संत
• कवयित्रीचे नाव : इंदिरा संत.
• व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये : कवयित्री, कथाकार, ललित लेखिका.
• ग्रंथसंपदा : 'सहवास, शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम' इत्यादी कवितासंग्रह. 'श्यामली, चैतू' हे कथासंग्रह.
'मृद्गंध, मालनगाथा' हे ललित लेखसंग्रह.
• पुरस्कार : साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित.
• काव्यवैशिष्ट्ये : उत्कट, भावपूर्ण व प्रतिभासंपन्न काव्यशैली.
• प्रस्तुत कवितेचा छंद : अष्टाक्षरी छंद.

कवितेची मध्यवर्ती कल्पना


कडक उन्हाळा सरता सरता पावसाची आतुरतेने वाट पाहणारी पावसाळ्यापूर्वीची स्थिती या कवितेत वर्णन के ली आहे. कवितेतून मैत्रिणीच्या नात्याने
मेघमालेला आवाहन के ले आहे. ग्रामीण भागातील घराघरात व शेताशेतातील पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे यथोचित व भावपूर्ण वर्णन या कवितेत के ले
आहे.
मनामनातील आतुरता व भावगर्भता हा या कवितेचा स्थायिभाव आहे.

शब्दार्थ
प्राणसई - प्राणप्रिय सखी. कांडते - धान्य ठेचणे. कडाडते - कडक, कडाक्याचे. घनावळ - ढगांची माळ, मेघमाला. सांगावा - निरोप. धाडू न -
पाठवून. आळी - चवड, साठा. कोमेली - कोमेजली, हिरमुसली. झळा – (गरम) झोत. भिंग - आरसा. दौडत - धावत. घोळ - (लुगड्याचा)
झोळणा. वाकु डेपणा - विपरीत वागणे. भरारी - झेप.
टिपा
१. पडवळ-भोपळा- फळभाज्यांची नावे
२. हुडा - शेण थापून सुकवलेल्या गोवऱ्यांचा ढीग
३. शेणी - गोवऱ्या
४. ठाणबंदी - बैलांना गोठ्यात बांधून ठेवणे
५. शेला - अंगावरचे भारी वस्त्र
६. भाचे - भावा-बहिणीची मुले
७. आळे - वाफा
८. अष्टाक्षरी छंद - कवितेच्या या प्रकारात प्रत्येक चरणात (ओळीत) आठ अक्षरे असतात.

कवितेचा भावार्थ
कवयित्री पावसाळी ढगांना प्राणसखी म्हणते आणि मैत्रिणीच्या नात्याने तिला निरोप धाडताना म्हणते -
पांढरेधोप पीठ जसे राक्षसिणीने कांडावे तसे कडाक्याचे ऊन तळपते आहे. माझ्या प्राणप्रिय घनावळी सखी, तू कु ठे गुंतून पडली आहेस? (वेगाने
ये.)
पाखरांच्या हाती तुला मी निरोप धाडला आहे. आपली मैत्री आठवून तरी, हे मेघमाले, तू तातडीने ये ना !
घराघरात गोवऱ्यांचा ढीग मोडन पडवळ व भोपळा यांची आळी भाजण्यासाठी शेणी रचून ठेवल्या आहेत.
पाऊस येत नाही; त्यामुळे बैल गोठ्यातच बांधून ठेवले आहेत. त्यामुळे शेतकरी बेचैन झाले आहेत. उन्हाच्या तीव्र झळा लागून लहान बाळांची तोंडे
कोमेजली आहेत. बाळे हिरमुसली आहेत.
विहिरीतले पाणी आटले आहे. विहिरीच्या खोल तळाशी फक्त थोड्याशा पाण्याचा आरसा दिसतो आहे. मन घरामध्ये रमत नाही. तू कधी येशील ते
सांग. आम्ही आतुरतेने तुझी वाट पाहतो आहोत.
हे मेघमाले, तू धावत पळत आधी माझ्या शेतावर येऊन बरस. आणि शेतकऱ्यांनी उरापोटाशी बाळगलेल्या स्वप्नांवर हिरवी शाल पांघर.
(मालकाच्या मनातले हिरवे स्वप्न साकार कर.)
तशीच झुलत झुलत माझ्या घरापाशी ये. माझे भाचे तुझ्या घोळदार जरीच्या लुगड्याला मायेने बिलगतील.
तुझ्या बरसातीने वेलींचे वाफे भिजू देत. विहीर पाण्याने तुडुंब भरून जाऊ दे. माझे सर्व घरदार चिंब चिंब भिजून जाऊ दे.
मग मी दाराजवळ उभी राहून तुझ्याशी गप्पागोष्टी करीन नि माझा सखा शेतामध्ये कष्ट करण्यात कसा रमला आहे, ती गोष्ट तुला कौतुकाने सांगेन.
(त्याच्या कष्टाचे कौतुक मी तुझ्याकडे करीन.)
पण हे मेघमाले, तू का नाराज आहेस? तू विपरीत का वागत आहेस नि आमच्याकडे तू का पाठ फिरवली आहे? हे प्राणसई, वाऱ्यावर झेप घेत तू
लवकर ये.

कृ ती-स्वाध्याय आणि उत्तरे


प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) चौकटी पूर्ण करा :
(१) कवयित्रीने जिला विनंती के ली ती →\rightarrow
___
(२) कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा →\rightarrow
___
(३) कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी →\rightarrow
___
(४) शेतात रमणारी व्यक्ती →\rightarrow
___
(२) कारणे लिहा :
(१) बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण ___
(२) बाळांची तोंडे कोमेजली; कारण ___
(३) कृ ती करा :
कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त के लेल्या अपेक्षा
(१) ___
(२) ___
(३) ___
(४) ___
(४) पुढील काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा :
(१) ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर :
(२) तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशी :
(३) विहिरीच्या तळीं खोल दिसू लागले ग भिंग,
(५) पुढील तक्त्यात सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा :

प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी

प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या


ओळी

प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी

मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी

(६) काय ते लिहा :


(१) आळी ठेवली भाजून →\rightarrow
___, ___
(२) रचून ठेवलेल्या →\rightarrow
___
(७) कोण ते लिहा :
(१) ठाणबंद झालेले →\rightarrow
___
(२) तोंडे कोमेजली अशी →\rightarrow
___
(३) बेचैन झालेले →\rightarrow
___
(४) विहिरीच्या तळाला दिसणारे →\rightarrow
___
पीठ कांडते राक्षसी
तसे कडाडतें ऊन :
प्राणसई धनावळ
कु ठे राहिली गुंतून?
दिला पाखरांच्या हातीं
माझा सांगावा धाडू न :
ये ग ये ग घनावळी
मैत्रपणा आठवून___
पडवळा भोपळ्यांची
आळी ठेविलीं भाजून,
हुडा मोडू न घरांत
शेणी ठेविल्या रचून,
बैल झाले ठाणबंदी,
झाले मालक बेचैन,
तोंडे कोमेलीं बाळांची
झळा उन्हाच्या लागून,
विहिरीच्या तळी खोल
दिसूं लागले ग भिंग,
मन लागेना घरांत :
कधी येशील तू सांग?
ये ग दौडत धावत
आधी माझ्या शेतावर :
शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर
तशी झुलत झुलत
ये ग माझिया घराशी :
भाचे तुझे झोंबतील
तुझ्या जरीच्या घोळाशीं,
आळें वेलाचें भिजूं दे,
भर विहीर तुडुंब :
सारें घरदार माझें
भिजूं दे ग चिंब चिंब :
उभी राहून दारांत
तुझ्या संगती बोलेन :
सखा रमला शेतांत
त्याचे कौतुक सांगेन___
कां ग वाकु डेपणा हा,
कां ग अशी पाठमोरी?
ये ग ये ग प्राणसई
वाऱ्यावरून भरारी.
(समग्र इंदिरा संत)
उत्तरे
(१)
(१) कवयित्रीने जिला विनंती के ली ती →\rightarrow
प्राणसई घनावळ
(२) कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा →\rightarrow
पीठ कांडते राक्षसी
(३) कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी →\rightarrow
पाखरे
(४) शेतात रमणारी व्यक्ती →\rightarrow
सखा
(२) (१) बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहेत.
(२) बाळांची तोंडे कोमेजली; कारण त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागत आहेत.
(३) कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त के लेल्या अपेक्षा
(१) वेलाचे आळे भिजू दे.
(२) विहीर तुडुंब भरू दे:
(३) घरदार चिंब होऊ दे.
(४) दारात उभी राहून सख्याचे कौतुक सांगू दे.
(४) (१) ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर : उन्हाने शेते पोळली आहेत. त्यामुळे शेतकरी बेचैन आहेत. बैल ठाणबंद झाले आहेत. म्हणून
कवयित्री घनावळीला विनवते की, तू आधी धावतपळत लवकर माझ्या शेतावर ये.
(२) तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशी : उन्हाच्या झळांनी बाळांची तोंडे कोमेजली आहेत. त्या बाळांना आनंद वाटावा म्हणून कवयित्री
प्राणसई घनावळीला सांगते की, तू झुलत झुलत, रिमझिम करत माझ्या घरापाशी ये.
(३) विहिरीच्या तळी खोल दिसू लागलें ग भिंग : कडक उन्हामुळे विहिरीचे पाणी आटले आहे. विहिरीचा खोल गेलेला तळ दिसतो आहे. तिच्या
तळाशी जे थोडे पाणी आहे, ते उन्हाच्या तिरिपीमुळे चकाकते आहे. जणू विहिरीच्या तळाशी आरसा चकाकतो आहे.
(५)

प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी (१) ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
(२) तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशी
(३) ये ग ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी

प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या (१) तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून
ओळी
(२) मन लागेना घरात कधी येशील तू

प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी (१) ये ग ये ग घनावळी मैत्रपणा आठवून
(२) उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन

मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी (१) शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नांवर
(२) सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन

(६) (१) आळी ठेवली भाजून →\rightarrow


पडवळ , भोपळे
(२) रचून ठेवलेल्या →\rightarrow
शेणी
(७)
(१) ठाणबंद झालेले →\rightarrow
बैल
(२) तोंडे कोमेजली अशी →\rightarrow
बाळे
(३) बेचैन झालेले →\rightarrow
मालक
(४) विहिरीच्या तळाला दिसणारे →\rightarrow
भिंग
कृ ती २ : (काव्यसौंदर्य)
(१) ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा :
(i) 'का गं वाकु डेपणा हा
का गं अशी पाठमोरी
ये गं ये गं प्राणसई
वाऱ्यावरून भरारी.'
उत्तर : 'प्राणसई' या कवितेमध्ये कवयित्रीने प्राणसई घनावळीला मैत्रिणीच्या नात्याने बरसण्याची विनवणी के ली आहे.
कडक उन्हाळ्याचा दाह सगळे शेतकरी सहन करत आहेत. पाण्याअभावी विहिरी आटल्या आहेत. उन्हाच्या झळा लागून बाळांचे चेहरे कोमेजले
आहेत. घरातील मंडळींची मने उदास झाली आहेत. शेते उजाड झाली आहेत व शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा अवर्षणाच्या वेळी कवयित्री
पावसाळी ढगांची विनवणी करताना म्हणते की, हे प्राणप्रिय सखी, तू अशी विपरीत का वागत आहेस? आमच्याकडे तू पाठ का फिरवली आहेस?
वाऱ्यावरून झेप घेत तू लगबगीने खाली ये आणि थेंबांची बरसात कर.
भावपूर्ण शब्दांत काळजाची व्यथा या ओळींमधून प्रकर्षाने व प्रत्ययकारी रितीने व्यक्त झाली आहे.
(ii) 'शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर'
उत्तर : 'प्राणसई' या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी मेघमालेला 'प्राणसई' असे संबोधले आहे. कडक उन्हामुळे शेते उजाड झाली आहेत,
म्हणून कवयित्री मेघमालेला भावपूर्ण शब्दांत आर्जव करत आहेत.
कडक उन्हामुळे घरादारातील माणसे व्यथित आहेत. बाळांचे चेहरे हिरमुसले आहेत. कामाअभावी बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत. शेतकरी निराश
झाले आहेत. अशा भीषण परिस्थितीत कवयित्री पावसाळी ढगांना विनवते आहे की, आधी धावतपळत, लगबगीने माझ्या शेतावर बरस. माझ्या
धन्याच्या मनातली स्वप्ने कोमेजून गेली आहेत. धनधान्याने भरलेली हिरवी शेते त्याला पाहायची आहेत. म्हणून कवयित्री म्हणतात की, हे प्राणसई,
तू दौडतधावत ये आणि मालकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर हिरवा शेला पांघर. हिरवीगार शेती बहरू दे.
अतिशय भावविभोर शब्दांमध्ये कवयित्रींनी आपले मनोगत व्यक्त के ले आहे. हिरव्या शेतांना हिरव्या शेल्याचे योजलेले प्रतीक अनोखे व चपखल आहे.
(२) कवयित्रींनी उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.
उत्तर : कवयित्री इंदिरा संत यांनी 'प्राणसई' या कवितेमध्ये पाऊस येण्यापूर्वीची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मानसिक घालमेल भावपूर्ण शब्दांत
व्यक्त के ली आहे.
कडक उन्हाळ्यामुळे घरदार, शेते व परिसर यांची कशी वाताहत होते, याचे यथोचित वर्णन काही प्रतीकांमधून प्रत्ययकारी पद्धतीने के ले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना कवयित्रींनी 'राक्षशीण पीठ कांडते' हे प्रतीक वापरले आहे. एखादी राक्षसी जशी जात्यावर पांढरेधोप पीठ
काढते, त्याप्रमाणे कडाक्याचे ऊन भासते आहे. विहिरी आटल्या आहेत, हे सांगताना त्यांनी 'भिंगाचे' प्रतीक वापरले आहे. विहिरीमध्ये खोल
तळाशी थोडेसे पाणी उरले आहे. त्यावर उन्हाची तिरीप पडल्यामुळे जणू ते आरशासारखे चकाकते आहे. शेते उजाड झाली आहेत व शेतकरी
हवालदिल झाले आहेत, हे सांगताना कवयित्रींनी 'बैल ठाणबंद' झाले, असे सार्थ प्रतीक वापरले आहे. एखाद्या योद्ध्याला जसे जेरबंद करून ठेवावे,
तसे बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत.
अशा प्रकारे उन्हाळ्याच्या तीव्रतेचे भीषण वास्तव सार्थ प्रतीकांतून कवयित्रींनी मांडले आहे.
(३) 'कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे,' हे स्पष्ट करा.
उत्तर : प्राणसई घनावळीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मैत्रिणीची भावावस्था कवयित्री इंदिरा संत यांनी 'प्राणसई' या कवितेत भावपूर्ण शब्दकळेत
साकार के ली आहे.
कवयित्री पावसाळी ढगांना, म्हणजे मेघमालेला 'प्राणसखी' असे संबोधतात. ही घनावळ कोठे गुंतून पडली आहे, ती माझ्या सादेला प्रतिसाद का देत
नाही, म्हणून कवयित्री अस्वस्थ आहेत. मी पाखरांच्या हाती तुला निरोप धाडला आहे, आपली मैत्री आठवून तू धावत ये, अशी कळकळीची
विनवणी कवयित्री प्राणसईला करत आहेत. एखाद्या सखीला मनातले गूंज सांगावे, तसे पावसाअभावी झालेल्या परिसराचे व घरादाराचे वर्णन कवयित्री
घनावळीला करत आहेत. तू आलीस की दारात उभी राहून मी तुझ्याशी गुजगोष्टी करीन, माझ्या सख्याचे शेतामधल्या कष्टाचे कौतुक तुला सांगेन,
असे हळवे आश्वासन त्या प्राणसईला देत आहेत.
या सर्व वर्णनावरून कवयित्री व प्राणसई यांच्यातील प्रेममय ऋणानुबंध व मैत्रीचे नाते स्पष्ट होते.
कृ ती ३ : (स्वमत/अभिव्यक्ती)
(१) तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
नमुना उत्तर : आम्ही पर्जन्यछायेच्या प्रदेशात, म्हणजेच दुष्काळी भागात राहतो. आमची सारी उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. पाऊस पडला
नाही की आमची द्यनीय परिस्थिती होते.
पाऊस येण्यापूर्वी आमच्याकडे कडक उन्हाळा असतो. नदी, नाले, विहिरी आटू न रोडावतात. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पिण्यासही पाणी मिळत
नाही. गुराढोरांचे हाल होतात. त्यांना चारा मिळत नाही. झाडे सकतात. सर्वत्र पाचोळा होतो. पक्षी दिसेनासे होतात. डोंगर बोडके होतात. सर्वत्र
रखरखाट होतो. ऊन अंग जाळत जाते. डोळे नि मन थकू न . निराश होते. लहानग्या मुलांना अन्नाचा घास मिळत नाही. शेतजमीन तडकते. तिला
भेगा पडतात. डोहामध्ये खड्डे खणून जेमतेम पाणी मिळते. घशाला कोरड पडते. आकाश आग ओकीत राहते. पावसाच्या प्रतीक्षेत जो तो
आकाशाकडे डोळे लावून बसतो. काही शेतकरी स्थलांतर करतात. गाव भकास होते. जीवनेच्छा मालवून जाते.
(२) पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
नमुना उत्तर : पावसानंतर माझ्या परिसरातील सृष्टीचे रूप बदलून जाते. कडक उन्हात रखरखीत झालेल्या जमिनीवर हिरवळीची शाल अंथरली
आहे, असा भास होतो. बोडके डोंगर गवततुऱ्यांनी नटतात. त्यांतून धबधब्यांचे पाझर दुधाच्या पान्यासारखे खाली झेप घेतात. नदी, नाले, ओढे
खळखळ वाहत गाणे म्हणत हुंदडतात. पेरणी व लावणी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे कारंजे थुई थुई उडू लागते. झाडे अंघोळ
के ल्यासारखी स्वच्छ व तजेलदार होतात. गुरेढोरे आनंदाने बागडत पोटभर चारा खातात. पोरेटोरे उल्हासाने पाण्यामध्ये उड्या मारत खेळतात.
घरेदारे ताजी टवटवीत होऊन आनंदाचा हुंकार देतात. पाखरे मुक्तपणे आकाशात भरारी घेतात व मजेत विहार करतात.
पावसानंतर सर्व चराचराचा कायापालट होतो. माणसांची, पशु पक्ष्यांची तहान शमते. माझ्या गावाचे आनंदवनभुवन होते.
(३) पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो, ते लिहा.
उत्तर : मनासारखा पाऊस झाला की पहिला आनंद होतो, तो शेतकऱ्यांना! माती कसून, नांगरून, पेरणी करून त्यांनी अपार कष्ट के लेले असतात.
त्या कष्टांचे फळ पावसानंतर मिळेल, या आशेने
त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते व मन आनंदाने मोहरून जाते. पावसानंतर ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्वच माणसांना आनंद होतो; कारण
वर्षभराची पाण्याची चिंता मिटू न जाते. पावसानंतर ग्रामीण भागात दुष्काळ पडण्याचे भीषण संकट टळते. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या
गुराढोरांना, पशुपक्ष्यांना पावसानंतर मुबलक पाणी प्यायला मिळते. पशुपक्षी आनंदी होतात. पावसानंतर झाडांना नवीन लकाकी येते. डोंगरावर
हिरवळ उगवते. तृषार्त जमिनीची तहान शमते. सृष्टी पावसानंतर पालवते, हिरवीगार होते. पावसानंतर चराचरात उत्साह संचारतो. धरतीचा तो
पुनर्जन्म असतो.
रसग्रहण
'प्राणसई' या कवितेचे रसग्रहण करा.
• रसग्रहण म्हणजे काय?
• कोणत्याही कवितेतील शब्दयोजना, काव्यानुभव, छंद, लय, आघात (नाद), प्रतीके , प्रतिमा इत्यादी काव्यगत घटकांमुळे रसनिष्पत्ती
होते.
• या काव्यवैशिष्ट्यांच्या अनुषंगाने कवीला/कवयित्रीला काय सांगायचे आहे आणि कसे सांगितले आहे, याचे विद्यार्थ्यांनी स्वत:च्या
संवेदनशील मनाने विचारपूर्वक के लेले विवेचन म्हणजे रसग्रहण होय.
• रसग्रहण करावयाचे मुद्दे :
(१) कवितेचा विषय व मध्यवर्ती कल्पना.
(२) कवितेतील प्रतीके , प्रतिमा, अर्थालंकार, आंतरिक लय, अर्थाचे सौंदर्य.
(३) कवितेतून सूचित होणारे काव्यगुण, शब्दशक्ती, भाषाशैली -(संवादात्मक/निवेदनात्मक/चित्रदर्शीत्व इत्यादी.)
(४) कवितेतील शब्दालंकार, नाद, बाह्यलय, छंद, वृत्त इत्यादी.
(५) कवितेतून मिळणारा संदेश, मूल्ये आणि कविता आवडण्याची कारणे.
उत्तर :
प्राणसई-रसग्रहण
मराठीतील प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांनी पाऊस पडण्यापूर्वीची ग्रामीण मनाची सर्व अस्वस्थता 'प्राणसई' या कवितेमध्ये भावोत्कट शब्दांमध्ये
साकारली आहे. आभाळात दाटलेल्या काळ्या ढगांना त्यांनी प्राणप्रिय सखी मानून या प्राणसईशी त्यांनी हृदय-संवाद साधला आहे.
कडक उन्हाळ्यामळे झालेली घरादाराची व परिसराची वाताहत, शेतकऱ्याचे पावसासाठी व्याकु ळ होणे व आतुरलेल्या मनाची तडफड ही या कवितेची
वैशिष्ट्ये आहेत. कवयित्रींनी स्वत:ला मेघमालेची मैत्रीण मानले आहे व मैत्रीच्या नात्याने मेघमालेला मनापासून विनवणी के ली आहे.
अष्टाक्षरी छंदात गुंफलेली कविता ही यमकप्रधान असून, अत्यंत साध्या शब्दकळेत मनातील भाव साकार करण्याची किमया कवयित्रींनी सहजगत्या
साधली आहे.
स्थूलमानाने कवितेचे दोन भाग पडतात. पहिल्या पाच कडव्यांत पावसाअभावी झालेल्या दुर्दशेचे चित्र प्रत्ययकारी शब्दांत रंगवले आहे. नंतरच्या
कडव्यांतून 'प्राणसई' धरतीवर आल्यावर तिचे स्वागत कसे के ले जाईल, याचे वर्णन उत्फु ल्ल व प्रसन्न शब्दशैलीत साकारले आहे. उन्हाचा तडाका
सांगताना कवयित्रींनी 'विहिरीच्या तळीचे भिंग' ही सार्थ प्रतिमा वापरली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती 'ठाणबंद बैल' या प्रतिमेत
प्रत्ययकारी ठरली आहे. तसेच पावसाच्या आगमनाचे स्वागत करताना 'स्वप्नांवर पांघरलेला हिरवा शेला' ही समर्पक प्रतिमा योजली आहे. त्यातून
आर्तता आणि आनंद यांचा उत्तम मेळ साकारला आहे.
आर्तता, भावपूर्णता नि उत्कटता हे या कवितेचे स्थायीगुण आहेत. प्रसाद आणि माधुर्य हे काव्यगुण दिसून येतात. साध्या पण संपन्न शब्दकळेमुळे या
कवितेतील भाव रसिकांच्या काळजाला थेट भिडतो. म्हणून अष्टाक्षरी छंदातील ही नादमय कविता मला खूप आवडली आहे.
व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
पुढील ओळीतील शब्दशक्ती ओळखा :
वाक्ये शब्दशक्ती
(१) विहिरीच्या तळी खोल दिसू लागले गं भिंग →\rightarrow
व्यंजना
(२) पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन →\rightarrow
लक्षणा
(३) बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन →\rightarrow
अभिधा
२. काव्यगुण :
• पुढील ओळींतील काव्यगुण ओळखा : उत्तरे
(१) पडवळ-भोपळ्यांची आळी ठेविली भाजून - प्रसाद
(२) उभी राहून दारात, तुझ्या संगती बोलेन सखा रमला शेतांत त्याचे कौतुक सांगेन - माधुर्य
३. वाक्यसंश्लेषण :
(१) उन्हाच्या झळा लागल्या. बाळांची तोंडे कोमेजली.
(के वल वाक्य करा.)
(२) हुडा मोडू न घरात शेणी रचून ठेवल्या
(संयुक्त वाक्य करा.)
(३) तू आल्यावर तुझ्या जरीच्या घोळाशी भाचे झोंबतील
(मिश्र वाक्य करा.)
उत्तरे : (१) उन्हाच्या झळा लागून बाळांची तोंडे कोमेजली.
(२) हुडा मोडला आणि शेणी घरात रचून ठेवल्या.
(३) जेव्हा तू येशील, तेव्हा तुझ्या जरीच्या घोळाशी भाचे झोंबतील.
४. काळ :
• कं सांतील सूचनांप्रमाणे बदल करा :
(१) पाखरांच्या हाती सांगावा धाडला. (भविष्यकाळ करा.)
(२) ऊन कडाडत आहे. (भूतकाळ करा.)
(३) माझ्या सख्याचे कौतुक सांगेन. (वर्तमानकाळ करा.)
उत्तरे : (१) पाखरांच्या हाती सांगावा धाडेन.
(२) ऊन कडाडत होते.
(३) माझ्या सख्याचे कौतुक सांगते.
५. शब्दभेद :
• पुढील तक्ता पूर्ण करा :

शब्द अर्थ वाक्य

(१) घन ढग आभाळात घन दाटू न आले.


घन दाट कविता आशयघन आहे.

(२) तळी तलाव गावात खूप तळी आहेत.


तळी तळाला विहिरीच्या तळी पाणी नाही.

आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती


१. शब्दसंपत्ती :
(१) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द शोधून शब्दमनोरा पूर्ण करा :
उदा.,
वात – वारा, अनिल, समीरण
समुद्र – सिंधू, सागर, रत्नाकर
विदयुत – वीज, चपला, सौदामिनी
तलाव - तळे तडाग, सरोवर
चंद्र – शशी, हिमांशू, सुधाकर
अंधार – तम, काळोख, अंधकार
(२) विरुद्धार्थी शब्द लिहा :
ऊन ×\times
___
कोमेजणे ×\times
___
ये ×\times
___
स्वप्न ×\times
___
कौतुक ×\times
___
वाकडे ×\times
___
उत्तरे :
ऊन ×\times
सावली
कोमेजणे ×\times
फु लणे
ये ×\times
जा
स्वप्न ×\times
सत्य
कौतुक ×\times
निंदा वाकडे सरळ
(३) लिंग बदला :
(१) बैल - ___
(२) सखा - ___
(३) मालक - ___
(४) राक्षस - ___
उत्तरे : (१) बैल - गाय
(२) सखा – सखी
(३) मालक - मालकीण
(४) राक्षस - राक्षशीण.
(४) पुढील शब्दांचे वर्गीकरण करा :
मैत्रपणा, प्रतिबिंब, सुमन, घनावळ, बेचैन, आकं ठ, वाकु डेपणा, ठाणबंद

उपसर्गघटित प्रत्ययघटित

प्रतिबिंब मैत्रपणा
उपसर्गघटित प्रत्ययघटित

सुमन घनावळ

बेचैन वाकु डेपणा

आकं ठ ठाणबंद

(५) गटात न बसणारा शब्द लिहा : उत्तरे


(१) ढग, घन, जलद, त्वरित, मेघ. - त्वरित
(२) पक्षी, खग, विहर, विहग, पाखरू. - विहर
२. विरामचिन्हे :
चिन्हे ओळखा व नावे लिहा : उत्तरे
(१) ? →\rightarrow
प्रश्नचिन्ह
(२) ! →\rightarrow
उदगारचिन्ह
(३) - →\rightarrow
संयोगचिन्ह
(४) “_” →\rightarrow
दुहेरी अवतरणचिन्ह
३. लेखननियम :
पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा :
तूंडु ब - ___
वीहिर - ___
कोतूक - ___
पाटमोरि - ___
उत्तरे :
तूंडु ब - तुडुंब
वीहिर - विहीर
कोतूक - कौतुक
पाटमोरि - पाठमोरी
४. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Agenda - कार्यक्रमपत्रिका
(२) Director - संचालक
(३) File - संचिका
(४) Keyboard - कळफलक
(५) Herald - अग्रदूत.

३. अशी पुस्तक
- डॉ. निर्मलकु मार फडकु ले
लेखक परिचय
डॉ. निर्मलकु मार फडकु ले
डॉ. निर्मलकु मार फडकु ले हे प्रसिद्ध समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक.
प्रसिद्ध पुस्तके : 'कल्लोळ अमृताचे', 'चिंतनाच्या वाटा,' 'प्रिय आणि अप्रिय', 'सुखाचा परिमळ'.
संतसाहित्यविषयक पुस्तके : 'संतकवी तुकाराम : एक चिंतन', 'संत चोखा मेळा आणि समकालीन संतांच्या रचना', 'संतांचिया भेटी',
'संतवीणेचा झंकार', 'संत तुकारामांचा जीवनविचार'.
वाङ्मयविषयक पुस्तके : 'समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज', 'साहित्यातील प्रकाशधारा'.
'भैरू रतन दमाणी' या साहित्य पुरस्काराने सन्मानित.

पाठ परिचय
या पाठात लेखक पुस्तकांचे मानवी जीवनातील स्थान समजावून सांगतात. लेखक पुस्तक लिहितो. तो आपले जीवनाचे संचित त्या पुस्तकात
ओततो. वाचक पुस्तक वाचतो. पुस्तकातल्या आशयाने तो समृद्ध होतो. त्याच्या जीवनात बदल घडतो. बदललेल्या जीवनाचे प्रतिबिंब पुस्तकात
उमटते. पुन्हा पुस्तकाचा प्रभाव माणसांवर पडतो. माणूस व पुस्तक यांचे हे असे अतूट नाते. पुस्तक सतत माणसाला सोबत करते. पुस्तक
जीवनाचे दर्शन घडवते. तसेच, बरे-वाईट काय आहे, याचा निवाडा करायला शिकवते. चांगल्या जीवनाचा मार्ग दाखवते. त्यामुळे माणसाचा
जगण्यावरचा विश्वास वाढतो. पुस्तक माणसाला अंधारातून प्रकाशाकडे जायला शिकवते. माणसाला सत्य शिव-सुंदराकडे नेण्याचा पुस्तक प्रयत्न
करते. हेच या पाठात लेखकांनी लालित्यपूर्ण शैलीत मांडले आहे.

शब्दार्थ
मनात दरवळत राहणे - मन प्रसन्न, आनंदी राहणे. उत्तेजक - उत्साह निर्माण करणारे, हुरूप आणणारे. काव्यात्म – काव्य हाच आत्मा असलेले.
अर्थगर्भ - अर्थपूर्ण, खोलवरचा अर्थ असलेले. भावस्पर्शी - भावनेला स्पर्श करणारे. अनुभूती - अनुभव घेण्याची क्रिया (बहुतेक वेळा अनुभव व
अनुभूती एकाच अर्थाने वापरले जातात.) उत्कट - तीव्र, तीक्ष्ण. रंगाढंगांचं - स्वरूपाचे, युक्तीचे. विमनस्क - विषण्ण, उदासवाणा. बलदंड -
शक्तिमान, ताकदवान. मनसुबे - बेत, मनोगत, विचार. शोष - कोरड. घशाला कोरड पडण्याची स्थिती. बाणा – ब्रीद, शील, प्रतिज्ञा. कणखर
- घट्ट, मजबूत, दणकट. बुलंद - भव्य, थोर, टोलेजंग. वैफल्य - नैराश्य. उद्विग्नता - खिन्नता, कं टाळा, उबग. अवीट - अढळ, अतूट,
अक्षय्य, अमर. जिवापाड - जिवापलीकडे, जिवापेक्षाही जास्त. मुडपणे – दुमडणे. सासुरवास – त्रास, जाच, छळ.
टीप
• वज्र हे इंद्राचे आयुध. त्याने शत्रूवर प्रहार करता येतो व ते फे कू नही मारता येते. भारतीय पुराणकथांनुसार जगातील महान शक्तिमान ,
शस्त्रांपैकी वज्र हे एक शस्त्र आहे.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) संपुष्टात येणे : संपणे, नष्ट होणे.
(२) जिवापाड जपणे : पराकोटीची काळजी घेणे.
(३) माहेरी आल्यासारखे वाटणे : मायेचे वातावरण लाभणे, प्रेम लाभणे.
(४) सासुरवास होणे : जाच, छळ होणे.
(५) गिळंकृ त करणे : दुसऱ्याची संपत्ती बळकावणे.
(६) स्मशानासारखे वाटणे : चैतन्यहीन वाटणे.
(७) कानापर्यंत पोहोचणे : माहिती मिळणे.
(८) उजेडाची स्वप्ने दाखवणे : चांगल्या भावी स्थितीची आशा दाखवणे.
(९) (एखादे काम) हाती घेणे : काम सुरू करणे.
(१०) खिळवून ठेवणे : जखडू न टाकणे.
(११) हस्तगत होणे : आत्मसात होणे, प्राप्त होणे.
(१२) जिवाची शर्थ करणे : पराकोटीचे प्रयत्न करणे.
(१३) (एखाद्या भावनेची/विचाराची) ज्वाला पेटणे : (भावना इ.) तीव्रपणे जागृत करणे.
(१४) पायातले साखळदंड तोडणे : कोणत्याही प्रकारची गुलामगिरी नाहीशी करणे.
(१५) दंड थोपटणे : लढण्याचे आव्हान देणे, लढण्यास सिद्ध होणे.

कृ ती-स्वाध्याय आणि उत्तरे


उतारा क्र. १
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) आकृ त्या पूर्ण करा :
(१) उत्तम साहित्यकृ तीची वैशिष्ट्ये
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) उत्तम साहित्यकृ तीच्या वाचनाला दिलेली दोन विशेषणे
(i) ___
(ii) ___
(३) वाचकांच्या जीवनातील पुस्तकांचे योगदान
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) कोण ते लिहा :
(१) प्रत्येक वाचनाच्या उत्कट अनुभूती देत राहणारे :
(२) कालांतराने दुरावणारे
(३) ध्यानीमनी नसता हातातून नाहीसा होणारा
(४) कधीही विश्वासघात न करणारी
(५) पुस्तकांशी निर्दयी चाळा करणारे
(३) पुढील विधानांतून तुम्हांला जाणवणारे गुण लिहा :
(१) माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे. : ___
(२) वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदाने सहन करीन : ___
(३) भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं? : ___
(४) कृ ती करा :
पुस्तकप्रेमीच्या मते, पुस्तक काळजीपूर्वक वापरावे याचा अर्थ –
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(५) कारणे लिहा :
(१) ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना के लेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण ___
(२) 'प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,' असा पुस्तकप्रेमीने निश्चय के ला, कारण ___
(३) 'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे,' कारण ___
(४) पुस्तकशत्रूच्या मते, पुस्तक म्हणजे एक छापलेले चोपडे, कारण ___
(५) साहित्याचे रसिक विद्यार्थी/विद्यार्थिनी माना खाली घालून बसले होते, कारण - ___
(६) तुलना करा :

'पुस्तकरूपी' मित्र 'मानवी' मित्र

___ ___

___ ___

___ ___

___ ___

(७) अर्थ स्पष्ट करा :


(१) दुधाने तोंड पोळल्याने ताक कुं कू न पिणे - ___
(२) पुस्तकाला माहेरी आल्यासारखे वाटणे - ___
उतारा क्र. १ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ११ व १२)
काही पुस्तकं आपल्याला ___ ___ ___ आपण हे शब्द वापरतो."
उत्तरे
(१) (१) उत्तम साहित्यकृ तीची वैशिष्ट्ये
(i) अंत:करणात भावनांची खळबळ उडवून देतात.
(ii) दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे मनात दरवळत राहतात.
(iii) ही पुस्तके विसरता येत नाहीत.
(iv) झपाटू न टाकतात.
(२) उत्तम साहित्यकृ तीच्या वाचनाला दिलेली दोन विशेषणे
(i) उत्तेजक
(ii) आनंददायक
(३) वाचकांच्या जीवनातील पुस्तकांचे योगदान
(i) जन्मभर भावनिक सोबत करतात.
(ii) निराश मनाला प्रकाश दाखवतात.
(iii) जीवनशक्तीला चेतना देतात.
(iv) मनाला धीर देतात.
(२)
(१) प्रत्येक वाचनाच्या उत्कट अनुभूती देत राहणारे : मॅक्बेथ व किं ग लियर या नाटकांतील काही संवाद
(२) कालांतराने दुरावणारे : खूप जवळचे असलेले काही मित्र .
(३) ध्यानीमनी नसता हातातून नाहीसा होणारा : पैसा
(४) कधीही विश्वासघात न करणारी : पुस्तके
(५) पुस्तकांशी निर्दयी चाळा करणारे : पुस्तकशत्रू
(३) (१) माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे. : औदार्य.
(२) वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदाने सहन करीन. : पुस्तकप्रेम.
(३) भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं? : उपयुक्ततावादी दृष्टिकोन.
(४) पुस्तकप्रेमीच्या मते, पुस्तक काळजीपूर्वक वापरावे याचा अर्थ -
(i) दुसऱ्याच्या हाती देऊ नये.
(ii) पुस्तकाची पाने दुमडू नयेत.
(iii) पुस्तकावर काहीही लिहू नये.
(iv) पुस्तकाला घातलेले कव्हर काढू नये.
(५)
(१) ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना के लेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण लेखक स्वत: पुस्तकप्रेमी असल्याने त्यांना
ग्रंथप्रेमीच्या भावनांची जाणीव होती.
(२) 'प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही, असा पुस्तकप्रेमीने निश्चय के ला, कारण अनेकदा फु कटे वाचक नेलेले पुस्तक परत
देतच नाहीत.
(३) 'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण कलात्मक आनंद देणारे श्रेष्ठ साहित्य तरुणांना व वृद्धांना सारखाच
आनंद देते.
(४) पुस्तकशत्रूच्या मते, पुस्तक म्हणजे एक छापलेले चोपडे, कारण ते पुस्तकाकडे एक उपयुक्त वस्तू म्हणून पाहतात.
(५) साहित्याचे रसिक विद्यार्थी/विद्यार्थिनी माना खाली घालून बसले होते, कारण त्यांना जी. ए. कु लकर्णी या श्रेष्ठ कथालेखकाचे नावही माहीत
नव्हते.
(६)

'पुस्तकरूपी' मित्र 'मानवी'

मित्र पुस्तके आयुष्यभर सोबत करतात. जवळचे मित्र दुरावतात.

पुस्तके नेहमी सुगंधाप्रमाणे मनात दरवळत राहतात. ज्यांच्यावर प्रेम के ले ते वैरी बनतात.

पुस्तके कधीही विश्वासघात करीत नाहीत. माणसे काही वेळा विश्वास घात करतात.

पुस्तके स्वत:जवळचे सर्व भांडार मुक्तपणे बहाल करतात. माणसे उदार नसतात.

(७) (१) दुधाने तोंड पोळल्याने ताक फु कू न पिणे - एखाद्या गोष्टीमुळे आधी नुकसान झाले असेल तर पुढच्या वेळी सावधगिरी बाळगणे.
(२) पुस्तकाला माहेरी आल्यासारखे वाटणे - पुस्तकाला प्रेमाने सांभाळले जाणे.
कृ ती २ : (स्वमत)
• पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : लेखकांच्या मते, मानवी जीवनामध्ये पुस्तकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वाचकाला पुस्तकातून चांगले काय, वाईट काय याचे दर्शन
घडते. तो चांगले-वाईट ओळखायला शिकतो. वाईटाचा त्याग के ला पाहिजे आणि चांगले आत्मसात के ले पाहिजे ही दृष्टी त्याला मिळते. त्यानुसार
जीवन जगायला तो सुरुवात करतो. यावरून माणसाच्या आयुष्यातील पुस्तकाचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल.
उदाहरणार्थ, महात्मा फु ले यांचे साहित्य आपण वाचले की शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती, होणारा अन्याय आपल्या लक्षात येऊ लागतो. त्यामुळे
आपल्या अंत:करणात भावनांची मोठी खळबळ उडते. आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीचे आपण निरीक्षण करतो. त्यात चांगले काय आहे, वाईट
काय आहे, हे आपल्याला कळू लागते. म्हणून असे पुस्तक आपण कधी विसरू शकत नाही. उलट, असे पुस्तक आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो.
प्रत्येक वाचनाच्या वेळी आपल्याला नवीन दृष्टी मिळते. परिस्थितीचे अधिकाधिक चांगले ज्ञान मिळते. अशा परिस्थितीत काय के ले पाहिजे आणि
काय करता कामा नये यांचीही दृष्टी मिळते. मग आपण त्यानुसार जीवन जगायचा प्रयत्न करतो. म्हणजेच, पुस्तक आपल्याला चांगले जीवन
जगायला शिकवतात. हे पुस्तकाचे फार मोठे महत्त्व आहे.
पुस्तकाचे हे महत्त्व लेखक समजावून सांगत आहेत.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) 'उत्तम साहित्यकृ ती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात, ' हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर : उत्तम साहित्यकृ ती आपल्याला सदोदित भावनिक सोबत करतात, हे खरेच आहे. अशी पुस्तके आपल्याला उभारी देतात. मी दहावीची
परीक्षा दिली. सर्व पेपर काही चांगले गेले नव्हते. कमी गुण मिळणार याची मला मनोमन खात्री होती. निराश झालो होतो. काय करावे ते सुचत
नव्हते.
तेवढ्यात एक पुस्तक माझ्या हाती लागले - अच्युत गोडबोले या लेखकांचे 'मुसाफिर'. वाचायला सुरुवात के ली. मग पुढे वाचत गेलो, वाचत गेलो
आणि वाचतच गेलो. लेखकांनी स्वतःचे आत्मकथन त्यात मांडले आहे. लेखक स्वतः प्रचंड बुद्धिमान. आयआयटीसारख्या मातब्बर खप प्रतिष्ठित
अशा शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला होता. कोणत्या तरी कारणाने सामाजिक चळवळीकडे लक्ष गेले. देशातील अन्याय, अत्याचार यांचे दर्शन घडले.
जीवनाचा मार्ग ढळला. मग कसेबसे स्वतःला सावरले. झोकू न देऊन अभ्यास सुरू के ला. प्रचंड यश मिळत गेले. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर
गाजली. जगभर मोठमोठ्या कं पन्यांना मार्गदर्शन के ले. कित्येक कं पन्या स्वतः स्थापन के ल्या. अनेक कं पन्यांमध्ये भागीदारी मिळाली. हे सगळे
वाचल्यानंतर माझी दृष्टीच बदलली. आपणही प्रयत्न करून असे भव्यदिव्य यश मिळवू शकतो, असे मला वाटू लागले. माझी निराशा झटकली गेली.
आता जेव्हा जेव्हा कं टाळा येतो, तेव्हा तेव्हा ते पुस्तक मी घेतो. कु ठू नही वाचायला सुरुवात करतो. माझा कं टाळा निघून जातो आणि मन चैतन्याने
भरून जाते.
(२) 'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.
उत्तर : लेखकांच्या एका ग्रंथप्रेमी मित्रांनी लेखकांना पुस्तक वाचायला देताना खूप अटी घातल्या. त्यांचे सांगणे अपमानास्पद वाटेल असेच होते. पण
लेखकांना ते अपमानास्पद वाटले नाही. याचे कारण लेखक स्वतः ग्रंथप्रेमी होते. म्हणूनच त्यांना ग्रंथप्रेमी माणसाच्या शब्दांमागील भावना समजून
घेता आली. त्यांनी लेखकांना स्वतःची भूमिका समजावून सांगितली. एका कविमित्राने त्यांच्याकडू न घेतलेली दोन पुस्तके परत के लीच नाहीत. हे
त्या ग्रंथप्रेमी मित्रांना जिव्हारी लागले. त्यांनी निर्णय घेऊन टाकला की आता यापुढे कोणालाही पुस्तक द्यायचे नाही. याचे कारण त्यांची पुस्तके त्यांना
स्वतःच्या अपत्यासारखी वाटत होती. म्हणून पुस्तके नसली तर राजवाडाही स्मशानासारखा वाटेल आणि सोबत पुस्तके असतील तर
काळ्यापाण्याची शिक्षाही आनंदाने स्वीकारीन, असे ते ग्रंथप्रेमी लेखकांना सांगतात. यावरून त्यांची ग्रंथांवरची निष्ठा लक्षात येते. असे निष्ठावंत वाचक
लेखकांना हल्ली आढळतच नाहीत.
उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कृ ती करा :
(१) हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) कारणे लिहा :
(१) लेखक विमनस्क अवस्थेत होते; कारण ___
(२) हा कणखर म्हातारा खवळलेल्या समुद्रात पुढे पुढेच चालला होता; कारण ___
(३) पण म्हाताऱ्याला देवमासा मिळाल्याचे समाधान फार वेळ मिळाले नाही; कारण ___
(३) माहिती लिहा :
(१) लेखकांनी नियतीला दिलेली विशेषणे.
(२) लेखकांनी माणसाला दिलेली विशेषणे.
(३) नियती व माणूस यांच्यातील संघर्षाचे स्वरूप.
(४) हेमिंग्वेचा संदेश.
(५) हेमिंग्वेच्या कादंबरीचा लेखकांवर झालेला परिणाम.
उतारा क्र. २ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १२ ते १४)
मी एके दिवशी अत्यंत ___ ___ __ मस्त झंकारत राहते.
उत्तरे
(१) हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ -
(i) अतिबलाढ्य, निष्ठु र नियती आणि दुबळा, महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात लाखो वर्षांपासून
द्वंद्वयुद्ध चालू आहे.
(ii) नियती बलाढ्य आहे, पण दुबळ्या माणसातही अदम्य ईर्ष्या आहे.
(iii) विजय मिळवायचाच, या ईर्षेने माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे.
(iv) भविष्यात के व्हातरी माणूस नियतीवर विजय मिळवीलच.
(२) (१) लेखक विमनस्क अवस्थेत होते; कारण त्यांचा एक कलावंत मित्र अपघातात मरण पावला होता.
(२) हा कणखर म्हातारा खवळलेल्या समुद्रात पुढे पुढेच चालला होता; कारण त्याला आजवर कधीही न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज
मिळवायचाच होता.
(३) पण म्हाताऱ्याला देवमासा मिळाल्याचे समाधान फार वेळ मिळाले नाही; कारण देवमाशाचे बहुतेक मांस शार्क माशांनी मटकावले होते आणि
फक्त हाडे शिल्लक ठेवली होती.
(३) (१) लेखकांनी नियतीला दिलेली विशेषणे : अतिबलाढ्य, क्रू र, जबरदस्त, निष्ठु र.
(२) लेखकांनी माणसाला दिलेली विशेषणे : दुबळा, महत्त्वाकांक्षी, जयिष्णू.
(३) नियती व माणूस यांच्यातील संघर्षाचे स्वरूप : नियती महाबलाढ्य आहे. तिचे परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण आहे. माणसाच्या जीवनावरही
नियतीचा पूर्ण ताबा आहे. माणूस मात्र स्वतंत्रपणे, स्वतःच्या इच्छेने, हवे तसेच जगू पाहतो. नियती तसे करू देत नाही. ती त्याला खेळवते,
हुलकावण्यां देते. तरीही माणूस निराश न होता लाखो वर्षांपासून नियतीशी झगडत आहे.
(४) हेमिंग्वेचा संदेश : जगण्या-मरण्याचा खेळ अखंडपणे चालू आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडता कामा नये. नियती सतत आपल्याला
तिच्या जाळ्यात फसवू पाहते. नियतीने जाळे टाकले तरी ते तोडू न फे कू न द्यायचे आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा.
(५) हेमिंग्वेच्या कादंबरीचा लेखकांवर झालेला परिणाम : हेमिंग्वेच्या त्या छोट्या कादंबरीने लेखकांच्या मनातले वैफल्य आणि उद्वेग पार धुऊन
टाकले.
कृ ती २ : (स्वमत)
(१) वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
किं वा
एखाद्या वैचारिक किं वा ललित साहित्यातून मिळणारा अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : ललित आणि वैचारिक साहित्यातून विलक्षण अनुभव मिळतात. ते वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते वाचल्यावर वाचकांच्या मनावर काही ना काही
परिणाम होतोच. त्या पुस्तकातून भोवतालच्या परिस्थितीचे दर्शन घडते. त्यातल्या दुःखद घटनांनी वाचकांचे हृदय पिळवटू न जाते. त्या
परिस्थितीतील दुःखाची जाणीव होते. ही अशी स्थिती वाईट आहे. ती तशी असता कामा नये. ती बदलली पाहिजे. असे विचार मनात येतात. मग
माणसे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतात. नवीन चांगली स्थिती आणण्याच्या विचारांना पाठिंबा देतात.
उदाहरणार्थ, द्या पवार यांचे 'बलुतं' हे आत्मकथनात्मक पुस्तक पाहा. यात दलित समाजाचे अत्यंत हीनदीन अवस्थेतील चित्रण के लेले आहे. हे
वाचल्यावर वाचकाला दुःख होते. संतापही येतो. मग जातीयता, धर्मांधता या तत्त्वांविरुद्ध त्याच्या मनात तिडीक निर्माण होते. याचा अर्थ 'बलुतं' हे
पुस्तक माणुसकीची बाजू घेते. गुलामगिरीविरुद्ध, अन्यायाविरुद्ध ते पुस्तक माणसाला लढायला प्रवृत्त करते. म्हणजे अशी पुस्तके माणसाला चांगले
जग निर्माण करण्याची प्रेरणा देतात.
(२) हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : या पाठात लेखकाने हेमिंग्वेच्या 'द ओल्ड मॅन अँड द सी' या कादंबरीचा परिचय करून दिला आहे. कादंबरीचे कथानक तसे साधे आहे.
एका धाडसी म्हाताऱ्या कोळ्याला एके दिवशी प्रचंड ताकदीच्या देवमाशाची शिकार करायची होती. अखेरीस एक प्रचंड देवमासा या म्हाताऱ्या
कोळ्याच्या जाळ्यात सापडला. कोळ्याने जिवाच्या शर्थीने देवमाशाशी लढत दिली आणि त्याच्यावर विजय मिळवला. विजयाच्या आरोळ्या ठोकत
तो किनाऱ्याकडे निघाला. वाटेत त्या देवमाशावर शार्क माशांनी मोठा हल्ला के ला. देवमाशाला त्यांनी खाऊन टाकले.
जाळ्यामध्ये देवमाशाची फक्त हाडे शिल्लक राहिली. म्हणजे त्या कोळ्याला देवमासा मिळाला आणि मिळाला नाहीसुद्धा! यावर तो कोळी निराश झाला
नाही. हतबल झाला नाही. तो हसला आणि 'उद्या पुन्हा देवमाशाच्या शिकारीला जाऊ,' असा त्याने निश्चय के ला.
तो देवमासा आणि शार्क मासे महाप्रचंड शक्तिशाली नियतीचे प्रतीक होत. हा कोळी संपूर्ण मानवजातीचा प्रतीक होय. या कोळ्याची लढाई म्हणजे
संपूर्ण मानवजातीचीच लढाई होय. हजारो-लाखो वर्षांपूर्वीपासून माणूस नियतीशी झगडत आहे. प्रत्येक वेळी माणूस नियतीकडू न पराभूत होतो.
तरीही तो पुन्हा नियतीशी झगडायला सिद्ध होतो. जिंकण्याची इच्छा, त्याची विजिगीषु वृत्ती या लढाईतून दिसून येते. हेमिंग्वे आपला हाच दृष्टिकोन
या कादंबरीतून मांडत आहे.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
• त्या म्हाताऱ्या कोळ्याच्या देवमाशाला पकडण्याच्या कृ तीचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर : आज कोणत्याही परिस्थितीत देवमाशाला पकडायचे, अशा ईर्षेने त्या म्हाताऱ्या कोळ्याने आपली होडी समुद्रात ढकलली. देवमाशाला
पकडण्याचे धाडसी विचार मनात घोळवत घोळवत तो कित्येक मैल आत समुद्रात गेला. पोटात अन्न नव्हते. पोटात कावळे ओरडत होते. तहानेने
घशाला कोरड पडली होती. दमलेले शरीर एका बाजूने त्याला परत फिरण्याची विनंती करत होते. त्याचे मन मात्र मागे फिरायला तयारच नव्हते.
अजूनही खवळलेल्या लाटांशी झुंजण्याची त्याची इच्छा तीव्र होती. तो पुढे पुढेच जात राहिला. अचानक त्याच्या जाळ्यात देवमासा सापडला. तो
बुलंद देवमासा कोळ्याचे जाळे तोडू न सहज निसटू न जाऊ शकला असता. पण म्हाताऱ्याने प्रचंड ताकदीने झुंज देऊन देवमाशाला ठार के ले.
तेवढ्यात शार्क माशांच्या एका टोळीने देवमाशावर हल्ला के लाच. सर्व बाजूंनी त्यांनी देवमाशाचे लचके तोडले. त्यांच्याशी झुंज देऊन कोळ्याने
त्यांनाही पिटाळले. मग ते धूड त्याने होडीला बांधले आणि विजयाच्या आरोळ्या ठोकत किनाऱ्यावर आला. परंतु त्याचा आनंद फार वेळ टिकला
नाही. शार्क माशांनी देवमाशाचे सर्व मांस गिळंकृ त के ले होते; फक्त हाडे शिल्लक राहिली होती. देवमासा मिळाल्याचे समाधान कोळ्याला मिळाले
नाही. तरी तो निराश झाला नाही. उद्या पुन्हा प्रयत्न करू, असे ठरवून तो निघून गेला.

व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
• पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. →\rightarrow
लक्षणा
(२) पुस्तकं हीच माझी अपत्य. →\rightarrow
व्यंजना
(३) दंड थोपटू न उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं मी वाचली. →\rightarrow
व्यंजना
(४) मी ग्रंथप्रेमी आहे. →\rightarrow
अभिधा
२. वाक्यसंश्लेषण :
• पुढील वाक्ये कं सांतील सूचनांप्रमाणे बदला :
(१) दुधाने तोंड पोळल्यामुळे मी ताक कुं कू न पितो.
(मिश्र वाक्य करा.)
(२) माझ्या हाती पुस्तकं दिली आणि त्याने त्यावरून मायेने हात फिरवला.
(के वल वाक्य करा.)
(३) प्रत्यक्ष परमेश्वराला पुस्तक द्यायचे नाही.
(मिश्र वाक्य करा.) (४) मी कादंबरी वाचून संपवली.
(संयुक्त वाक्य करा.)
उत्तरे : (१) दुधाने तोंड पोळले की मी ताक कुं कू न पितो.
(२) माझ्या हाती पुस्तक देताना त्याने त्यावरून मायेने हात फिरवला.
(३) जरी प्रत्यक्ष परमेश्वर आला, तरी पुस्तक द्यायचे नाही.
(४) मी कादंबरी घेतली व वाचून संपवली.
३. काळ :
• पुढील वाक्यांचे रीती वर्तमानकाळात रूपांतर करा :
(१) मी पुस्तक वाचतो.
(२) त्याने मजकू र शाईने अधोरेखित के ला.
(३) श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही.
(४) त्याने छोटेखानी पुस्तकावरची धूळ झटकली.
उत्तरे : (१) मी पुस्तक वाचत असतो.
(२) तो मजकू र शाईने अधोरेखित करत असतो.
(३) श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नसते.
(४) तो छोटेखानी पुस्तकावरची धूळ झटकत असतो.
४. शब्दभेद :
• पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
अभंग →\rightarrow
___, ___
भाव →\rightarrow
___, ___
उत्तरे :
अभंग →\rightarrow
न भंगणारे, एक छंदवृत्त
भाव →\rightarrow
भावना, दर
आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दसंपत्ती :
(१) विशेषण-विशेष्ये यांच्या जोड्या लावा :

'अ' गट 'ब' गट

(१) महाप्रचंड म्हातारा


'अ' गट 'ब' गट

(२) क्रू र सुगंध

(३) अथांग देवमासा

(४) अवीट नियती

(५) आशावादी सागर

उत्तरे :
(१) महाप्रचंड - देवमासा
(२) क्रू र - नियती
(३) अथांग - सागर
(४) अवीट - सुगंध
(५) आशावादी - म्हातारा
(२) 'चवदार' सारखे शब्द लिहा.
उत्तर : दळदार, डेरेदार, वळणदार, रखवालदार.
(३) जसे विफलताचे →\rightarrow
वैफल्य
तसे - उत्तरे
(१) सफलता →\rightarrow
साफल्य
(२) कु शलता →\rightarrow
कौशल्य
(३) निपुणता →\rightarrow
नैपुण्य.
(४) शब्दाच्या शेवटी 'क' असलेले चार शब्द लिहाः
उदा., 'उत्तेजक' उत्तर : (१) लेखक (२) वाचक (३) रसिक (४) पथिक.
(५) या शब्दगटातील विशेषणे ओळखा :
काव्यात्म, अवस्था, साहित्यकृ ती, विमनस्क, प्रेरणा, संवाद, नव्या, उत्तम
उत्तरे
विशेषणे
काव्यात्म
विमनस्क
नव्या
उत्तम
(६) उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द लिहा :
रसमय, विस्मृती, सुगंध, निर्दय, निष्ठावंत, भावनिक, सुशिक्षित, कलावंत
उत्तर : उपसर्गघटित शब्द -
(१) विस्मृती (२) सुगंध (३) निर्दय (४) सुशिक्षित.
प्रत्ययघटित शब्द -
(१) रसमय (२) निष्ठावंत (३) भावनिक (४) कलावंत.
(७) शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : उत्तरे
(१) पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे - पाक्षिक
(२) ज्याला एकही शत्रू नाही असा - अजातशत्रू
(३) मंदिराचा आतील भाग - गाभारा
(४) गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा - अजानुबाहू
(५) के लेले उपकार न जाणणारा - कृ तघ्न
२. विरामचिन्हे :
(१) पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा :
ते म्हणाले, "गेले दोन दिवस 'मेघदूत' वाचत होतो."
(१) , →\rightarrow
___
(२) “ ” →\rightarrow
(३) ‘ ’ →\rightarrow
(४) . →\rightarrow
उत्तरे : (१) , →\rightarrow
स्वल्पविराम
(२) “ ” →\rightarrow
दुहेरी अवतरणचिन्ह
(३) ‘ ’ →\rightarrow
एके री अवतरणचिन्ह
(४) . →\rightarrow
पूर्णविराम
(२) पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा :
मी म्हणालो या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते
उत्तर : मी म्हणालो, “या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते?"
३. लेखननियम :
(१) पुढील शब्दगटांतील अचूक शब्द ओळखा : उत्तरे
(१) विद्यार्थि/वीद्यार्थी/वीयार्थि/विद्यार्थी - विद्यार्थी
(२) गृहस्थ/गृहस्त/ग्रुहस्थ/गृहस्त - गृहस्थ
(३) संर्घष/संघर्ष/संघर्श/संगघर्ष - संघर्ष
(४) सूशिक्षित/सुशीक्षित/सुशिक्षित/सुशिक्षीत - सुशिक्षित
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(१) उतम साहीत्यकृ ति आपल्याला भावनिक सोबत करतात.
(२) मी एके दीवशी अत्यंत वीमनस्क अवस्थेत होतो.
उत्तरे : (१) उत्तम साहित्यकृ ती आपल्याला भावनिक सोबत करतात.
(२) मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो.
४. वाक्प्रचार व म्हणी:
(१) पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा :
(१) हस्तगत होणे -
(अ) जुळवणे (आ) मिळवणे (इ) हरवणे
(२) कुं कू न टाकणे -
(अ) व्यर्थ दवडणे (आ) सार्थ होणे (इ) हवेवर उधळणे
(३) कानावर हात ठेवणे -
(अ) न ऐकणे (आ) बोल ऐकणे (इ) मान्य न करणे
(४) मनसुबे रचणे -
(अ) इच्छांचे इमले रचणे (आ) मन तयार करणे (इ) प्रभाव पाडणे
उत्तरे : (१) मिळवणे
(२) व्यर्थ दवडणे
(३) मान्य न करणे
(४) इच्छांचे इमले रचणे
(२) पुढील म्हणीचा अर्थ लिहा : .
दुधाने तोंड पोळले की ताक कुं कू न पिणे
अर्थ : एखाद्या कामात फटका बसला की दुसरी कामे सावधगिरीने करणे.
५. पारिभाषिक शब्द :
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Zone - परिमंडळ, विभाग
(२) Up-to-date - अद्ययावत
(३) Technician - तंत्रज्ञ
(४) Runway - धावपट्टी
(५) Procession - मिरवणूक
(६) Motto - ब्रीदवाक्य
प्रकल्प
• जी. ए. कु लकर्णी, भा. द. खेर, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर या साहित्यिकांची माहिती व यासंबंधीचे संदर्भसाहित्य
वाङ्मयकोशातून शोधून लिहा.

४. झाडांच्या मनात जाऊ


- नलेश पाटील
• कवीचे नाव : नलेश पाटील.
• कवितासंग्रहाचे नाव : हिरवं भान.
• कवीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये : चित्रकार व निसर्गकवी. 'कविताच्या गावा जावे' या लोकप्रिय काव्यगायनाच्या कार्यक्रमात सहभाग.
खुल्या स्वरात कवितांचे गायन.
• कवितांची वैशिष्ट्ये : 'शब्द, नाद, लय व अर्थ यांची चित्रमय मांडणी. तरल संवेदनांनी साकारलेले निसर्गचित्रण.
• कवितेतील संदेश : निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे.

कवितेची मध्यवर्ती कल्पना


रस-रूप-गंधाने नटलेला चैतन्यमय निसर्गसोहळा या कवितेत प्रत्ययास येतो. पानांचे रंग, फु लांचे गंध, भिरभिरणारी रंगीत फु लपाखरे, थुई थुई
नाचणारे पाणी, ऊन-पाऊस यांची गूढ नक्षी या वसंत ऋतूतील वैभवाचे चित्रदर्शी सौंदर्य तरल शब्दकळेने रेखाटले आहे. निसर्गातील या बहरलेल्या
तरल सौंदर्याचा आस्वाद खुल्या मनाने घेण्याचा अमोल संदेश ही कविता देते.

शब्दार्थ
स्पंदन - हालचाल. सावळा - श्यामल. पताका - रंगीत कागदी त्रिकोण. तोरण - दारावर लावायची माळ. करणी - कृ ती, क्रिया. उधाण -
भरती, उसळणे. खडक - मोठा दगड. तुषार - थेंब. मज - मला. डु चमळते - हिंदकळते. हंगाम - मोसम. साक्षी - डोळ्यांनी पाहणारे. काऊ –
कावळा. बाहू - हात.
टिपा
१. वसंत - (मराठी) सहा ऋतूंतील सृष्टीला बहर आणणारा ऋतू.
२. कोकीळ - वसंत ऋतूत कु हू कु हू गाणारा एक पक्षी.
३. फाया - अत्तर लावलेला कापसाचा बोळा.
४. रंगपंचमी - माघ शु. पंचमी, वसंत ऋतूचे आगमन, रंगांची उधळण सुरू होते.
५. ओटी भरणे - आशीर्वाद देण्यासाठी सौभाग्यवती स्त्रीच्या पदरात खण-नारळ टाकणे, ही एक प्रथा.

कवितेचा भावार्थ
निसर्गाचा घटक होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याची इच्छा सांगताना कवी म्हणतात -
चला, झाडांच्या मनात शिरूया, स्वत:च पानांचे विचार होऊया. नव्या कोवळ्या पालवीच्या पोपटी स्पंदनांसाठी स्वत:च कोकीळ पक्षी होऊन
गाऊया.
वसंत ऋतूच्या बहरात तो कोकिळाचा मधुर सावळा सूर ऐकत फु ले रंगून जातील नि फु लांच्या गाभ्यात अत्तर जन्माला येईल. चला, त्या गोड
सुराबरोबर अत्तराने भिजलेला फाया आपण कानात ठेवूया. (कोकीळचा सूर आणि फु लांचा गंध कानामनात साठवूया)
विविध रंगांची उधळण झाली आहे. या रंगपंचमीत सारी फु लपाखरे चिंब भिजली आहेत. फु लपाखरांचा बागडणारा तो रंगीत थवा जणू . फिरणारी
पताकाच भासते आहे. हे भिरभिरणारे फु लपाखरांचे रंगीत तोरण आपण दाराला लावूया.
ही कु णाची गूढ किमया आहे की झऱ्यातले निर्मळ पाणी माझ्या डोळ्यांतून वाहते आहे. चोहिकडे आलेली ही आनंदाची भरती म्हणजे देवलोकीची मधुर
गाणी आहेत. या गान ऋतूत चिंब भिजून त्यांच्यासवे खळाळत वाहून जाऊया.
ओढ्याच्या खळाळत्या पाण्यात उतरून माझे मन ओल्या खडकावर बसले आहे. आजूबाजूचे थुई थुई नाचणारे पाणी मला हसताना दिसत आहे. जणू
हे तुषाराचे रोप मला मायेने अंघोळ घालते आहे.
अलगदपणे, हलके च मी ओंजळीमध्ये जरासे आकाश झेलले आहे. ओंजळीतल्या आकाशाने मी साऱ्या पाण्याची ओटी भरली आहे. ओंजळीतल्या
पाण्यात आकाशीचे ऊन जेव्हा हिंदकळते तेव्हा त्यात सूर्यबिंब पोहते आहे, असे मला भासते.
फांदीवर ओळीने बसलेले ओले पक्षी हे या वसंत ऋतूच्या मोसमाचे साक्षीदार आहेत. झाडाच्या बुंध्याशी सावली उन्हाची नक्षी कोरते आहे. त्या
सावलीला पंख फु टले नि पाहा, त्या सावलीचेच उडणारे कावळे झाले आहेत.
मानवी स्पर्श न झालेले निर्जन हिरवेगर्द रान असावे, जिथे फक्त फु ले नि पाखरेच असतील. अशा निर्जन रानात, हे देवा, तू मला ने. त्या रानात मी
एखादे झाड होईन आणि सगळ्यांच्या स्वागताला माझे फांदयांचे हात पसरीन. (मला निसर्गाशी एकरूप होऊदे.)

कृ ती-स्वाध्याय आणि उत्तरे


कृ ती १ : (आकलन)
(१) योग्य पर्याय निवडू न वाक्ये पूर्ण करा :
(१) पोपटी स्पंदनासाठी म्हणजे ___
(अ) पोपटी पानात जाण्यासाठी.
(आ) उत्साहाने सळसळण्यासाठी.
(इ) पानांचे विचार घेण्यासाठी.
(२) जन्माला अत्तर घालत म्हणजे ___
(अ) दुसऱ्याला आनंद देत.
(आ) दुसऱ्याला उत्साही करत.
(इ) स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत.
(३) तो फाया कानी ठेवू___ म्हणजे ___
(अ) सुगंधी वृत्ती जोपासू.
(आ) अत्तराचा स्प्रे मारू.
(इ) कानात अत्तर ठेवू.
(४) भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू___ म्हणजे ___
(अ) दारांना तोरणाने सजवू.
(आ) दाराला हलतेफु लते तोरण लावू.
(इ) निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.
(५) मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू___ म्हणजे ___
(अ) निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन.
(आ) झाड होऊन फांद्या पसरीन.
(इ) झाड होऊन सावली देईन.
(२) पुढील कृ तींतून मिळणारा संदेश कवितेच्या आधारे लिहा :

निसर्गातील घटकांच्या सोबतीने के लेली संदेश

(१) कोकीळ होऊनी गाऊ ___ ___

(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू ___ ___

(३) पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा :


(१) झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.
(२) हातात ऊन डु चमळते नि सूर्य लागतो पोहू.
(४) पुढील तक्ता पूर्ण करा :

कवितेचा विषय

कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव

कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके

भाषिक सौंदर्यस्थळे
कवितेचा विषय

कवितेतून मिळणारा संदेश

(५) काय ते लिहा :


(१) देवाघरची गाणी →\rightarrow
___
(२) डोळ्यांत असणारे →\rightarrow
___
(३) तुषाराचे →\rightarrow
___
(४) सावळा असलेला →\rightarrow
___
(५) खडकावर बसलेले →\rightarrow
___
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ
पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ___
बहरात वसंतामधल्या, तो सूर सावळा ऐकत
जातील फु लेही रंगून, जन्माला अत्तर घालत
चल सुराबरोबर आपण, तो फाया कानी ठेवू___
खेळून रंगपंचमी, फु लपाखरे भिजली सारी
हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी
हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू___
ही कोणाची रे करणी डोळ्यांत झऱ्याचे पाणी
हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी
गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू___
पाण्यात उतरूनी माझे, मन खडकावर बसताना
थुई थुई नाचरे पाणी, मज दिसते रे हसताना
एक रोप तुषाराचे मज, मायेने घाली न्हाऊ___
ओंजळीमध्ये मी अलगद, आकाश जरासे धरता
आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता
हातात ऊन डु चमळते नि सूर्य लागतो पोहू___
हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी
झाडांच्या पायी काढी, सावली उन्हावर नक्षी
मग तिलाच फु टले पंख, नि त्यांचे झाले काऊ___
मानवी स्पर्श ना जेथे, असतील फु ले-पाखरे
रानात अशा तू मजला, ईश्वरा जरा टाक रे.
मी झाड होऊनी तेथे, पसरीन आपुले बाहू___
(हिरवं भान)
उत्तरे
(१) (१) पोपटी स्पंदनासाठी म्हणजे - उत्साहाने सळसळण्यासाठी.
(२) जन्माला अत्तर घालत म्हणजे - स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत.
(३) तो फाया कानी ठेवू___म्हणजे – सुगंधी वृत्ती जोपासू.
(४) भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू___म्हणजे – निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.
(५) मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू___म्हणजे - निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन.
(२)

निसर्गातील घटकांच्या सोबतीने के लेली कृ ती संदेश

(१) कोकीळ होऊनी गाऊ___ तुमच्या कं ठातून निसर्गाचे गाणे फु टू दे.

(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू___ निसर्गाने दिलेली गाणी पाणी होऊन एकरूपतेने गा.

(३) (१) निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याची कवींची मनोमन इच्छा आहे. म्हणून ते म्हणतात की आपण झाडाच्या मनात
शिरू आणि पाने जी विचार करतात, तसे आपणच पानांचे विचार होऊ. म्हणजे आपण स्वत:च झाड होऊ.
(२) कवी म्हणतात की माझ्या ओंजळीमधल्या पाण्यात आकाश उतरले आहे. त्यात जेव्हा ऊन मिसळून हिंदकळते, तेव्हा असे वाटते की जणू सूर्य
त्या हातातल्या पाण्यात पोहत आहे.
(४)

कवितेचा विषय निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे.

कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव निसर्गाशी एकरूपता.

कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके (१) भिरभिरणाऱ्या फु लपाखरांचा थवा म्हणजे रंगीत पताकांचे तोरण.
(२) सावलीला पंख फु टू न तिचे कावळे झाले.

भाषिक सौंदर्यस्थळे (१) फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी


कवितेचा विषय निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे.

(२) उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी

कवितेतून मिळणारा संदेश निसर्गातील बहरलेल्या सौंदर्याचा खुल्या मनाने आनंद लुटणे व आपणच
निसर्गाचा घटक होऊन निसर्गाशी एकरूप होणे.

(५)
(१) देवाघरची गाणी →\rightarrow
आनंदाचे उधाण
(२) डोळ्यांत असणारे →\rightarrow
झऱ्याचे पाणी
(३) तुषाराचे →\rightarrow
रोप
(४) सावळा असलेला →\rightarrow
सूर
(५) खडकावर बसलेले →\rightarrow
कवीचे मन
कृ ती २ : (काव्यसौंदर्य)
(१) 'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ दे___' या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर : 'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी उत्कटपणे वसंतातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांना
आवाहन के ले आहे.
वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो. झाडांना नवी पालवी फु टते. ती कोवळी लुसलुशीत पालवी पोपटी रंगाची असते.
अम्लान ताजेपणाची चमक पानांवर झळकते. सदाबहार वसंत ऋतूची चाहूल आधी कोकीळ पक्ष्याला लागते. तो वसंत ऋतूच्या आगमनाचा हर्ष कु हू
कु हू स्वरात गाऊन जगाला सांगतो.
कवी म्हणतात की, वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल तर आपण झाडांशी एकरूप व्हायला हवे. त्यांच्या मनात
शिरून पानांचा विचार आपणच व्हायला हवे. नवीन पानांमधील या पोपटी पालवीची स्पंदने अनुभवायची असतील, तर आपण स्वतः कोकीळ पक्षी
होऊन गायला हवे.
कोकीळ पक्ष्यांच्या स्वरांतून निसर्गाची एकरूप होण्याची उत्कट व भावपूर्ण अवस्था अतिशय विलोभनीय प्रतीकातून कवीने मांडली आहे.
(२) ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारा आशय कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर : कवी नलेश पाटील यांनी 'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेमधून वसंत ऋतूतील निसर्गसौंदर्याचे चित्रण उत्कट व भावविभोर शब्दकळेतून
साकारले आहे. स्वत: निसर्गाचे घटक होऊन निसर्गसौंदर्याचा कसा आस्वाद घ्यावा, हे सांगताना कवींनी वेगवेगळी व अनोखी प्रतीके वापरली
आहेत.
बहरलेल्या झाडाचे वर्णन करताना कवी म्हणतात की झाडाच्या फांदीवर ओळीने बसलेले पक्षी हे या वसंत ऋतूच्या बहरलेल्या मोसमांचे
साक्षीदार आहेत. झाडाच्या पायथ्याशी जी सावली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसली आहे. म्हणजे सूर्याची किरणे जेव्हा पानांतून झाडाखाली
झिरपतात त्या वेळी पायथ्याशी पसरलेल्या सावलीत त्याची नक्षीदार पखरण होते. मग नक्षीलाच जेव्हा पंख फु टतात तेव्हा सावल्यांचेच कावळे
आसमंतात उडताना दिसतात.
'ऊन-सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले काऊ' या प्रतिमेतील ऊन सावली ही प्रतीके सजग होतात. येथे चेतनगुणोक्ती अलंकाराचा लोभसवाणा
आविष्कार मनाला प्रसन्न करतो.
(३) 'डोळ्यांत झऱ्याचे पाणी' या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडू न दाखवा.
उत्तर : 'झाडाच्या मनात जाऊ' या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी वसंत ऋतूत फु ललेल्या निसर्गघटकांचे लोभसवाणे दर्शन नितांत सुंदर
प्रतिमांमधून उलगडू न दाखवले आहे. रंग व गंधाच्या या उत्सवात आपणही निसर्गाचा घटक होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊया असे ते सांगतात.
वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे सौंदर्याचे वैभव अनुभवताना कवींना या सौंदर्याची निर्मिती अनोखी व अपूर्व वाटते. या रंगपंचमीमध्ये सारी सृष्टी
न्हाऊन निघालेली आहे. हे सृष्टीचे अम्लान सौंदर्य मानवनिर्मित नसून ती ईश्वराचीच किमया असावी, असे कवी आत्मीयतेने सांगतात. अवतीभवती
आलेले हे आनंदाचे उधाण म्हणजे विधात्याची स्वत:ची गाणी आहेत. ही सर्व देवाजीची करणी आहे. हे अनोखे सौंदर्य पाहून कवींच्या डोळ्यांत
आनंदाश्रू येतात. ते म्हणतात की, या झऱ्यात वाहणारे पाणी आणि डोळ्यांत तरळलेले पाणी वेगळे नाही. ते एकच आहे. या झऱ्यातलेच पाणी माझ्या
डोळ्यांत तरळले आहे, अशी एकतानता नि अद्वैत घडले आहे.
'डोळ्यांत झऱ्याचे पाणी' या भावपूर्ण प्रतिमेतून कवींनी निसर्गाशी घडलेली एकरूपता सजीव साकार के ली आहे. मानव हा निसर्गाचेच अपत्य आहे,
याचे प्रत्यंतर या प्रतिमेतून दिसून येते.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) 'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
उत्तर : माझे झाडांवर नितांत प्रेम आहे. मला नेहमी झाडाच्या मनात शिरावेसे वाटते. एकदा मी खरेच झाडाच्या मनात शिरलो. मी त्याच्या मुळांपाशी
पोहोचलो. त्यांना विचारले की, तुम्ही सतत मातीखाली असता. वरती दिसत नाहीत. तुम्हाला तुमच्या वरच्या पिसाऱ्याविषयी काय वाटते? मुळे
म्हणाली - "मातीतच आमचा निवास! आम्ही खाली खोलवर जातो. जीवनरस घेतो आणि वरच्या अवयवांना पुरवतो. म्हणून तर फांद्या झुलतात,
पाने डु लतात नि फु ले फु लतात. आम्ही जरी मातीत असलो; तरी वरच्या अवयवांचे सर्व लाड आम्हीच पुरवतो.
मातीतला गंध आम्ही फु लात ओततो. पानांची झळाळी मातीमुळेच दिसते. हे आमचेच वंशज असल्यामुळे त्यांच्या सुखात आमचे सुख सामावलेले
आहे. सर्व ऋतूंत आमचे फु लणे, कोमेजणे सुरू राहते. आमची जीवनेच्छा दृढ आहे. त्यामुळे आम्ही कृ तार्थ आहोत.''
झाडांच्या मनात शिरून त्यांचे मनोगत मी जाणून घेतले नि मनोगताला शीर्षक दिले – 'मुळांची मुले!'
(२) निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.
उत्तर : मानवी जीवन निसर्गाच्या गर्भातच पोसले जाते. आपल्या आजूबाजूला अफाट निसर्ग पसरलेला आहे. निसर्गाचा व मानवी जीवनाचा अतूट
संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करीत असतो. रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो नि चंद्र शीतल चांदणे देतो.
डोंगरातून नदी उगम पावते नि काठावरच्या गावांची तहान भागवते. ही धरती मानवांसाठी अन्नाची निर्मिती करते. जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी
जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते. पशु-पक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात. वातावरणातील हवा मानवी
श्वास जगवते. सारा आसमंत मानवी जीवनासाठी नि:स्वार्थी वृत्तीने दातृत्व जोपासतो. या चराचरातील निसर्म मानवी जीवनाचे संवर्धन करतो. या
निसर्गाविषयी मानवी जीवन कृ तार्थ होऊन सदैव कृ तज्ञ राहिले आहे.
रसग्रहण
• 'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर : 'झाडांच्या मनात जाऊ' ही कवी नलेश पाटील यांची कविता 'हिरवं भान' या कवितासंग्रहातून घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या
चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवींनी रंगवला आहे.
झाडांच्या मनात शिरून त्याचे हृद्गत जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना
आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाणे दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे, याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके
व प्रतिमा यांतून दृग्गोचर के ले आहे.
'फु लपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यांत झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात
पोहणे, सावलीला पंख फु टू न त्यांचे झालेले काऊ' अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकांतून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे व कवितेत नितळ
सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. 'ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक' ही कवींची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे.
निसर्गचित्र रेखाटताना अम्लान शब्दकळेतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात
तादात्म्य पावून निसर्ग डोळ्यांत व हृदयात साठवतो आहोत, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवींचे शब्दसामर्थ्य अनोख्या व उल्हसित
पतिमांतून प्रकट झाले आहे.
ध्रुपद व अंतरा असलेली ही गीतरचना यमकप्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिली आहे. प्रासाद व माधुर्य याकाव्यगुणांनी मंडित
झालेली ही गीतरचना मला हृदयस्थ भावली.

व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
• पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) सावलीला पंख फु टू न तिचे कावळे झाले. →\rightarrow
व्यंजना
(२) हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी →\rightarrow
लक्षणा
(३) रंगपंचमी खेळून फु लपाखरे भिजली →\rightarrow
अभिधा
२. काव्यगुण :
• पुढील ओळींतील काव्यगुण ओळखा : उत्तरे
(१) झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ →\rightarrow
माधुर्य
(२) ही कोणाची रे करणी, डोळ्यांत झऱ्याचे पाणी हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी →\rightarrow
प्रसाद
(३) हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी झाडांच्या पायी काढी, सावली उन्हावर नक्षी →\rightarrow
प्रसाद
३. शब्दभेद :
• पुढील तक्ता पूर्ण करा :
शब्द अर्थ वाक्य

(१) सूर स्वर मितालीच्या गळ्यात चांगला सूर आहे.


सूर उडी (झेप) कु णालने नदीत सूर मारला.

(२) मजला मला तू मजला पाणी दे.


मजला माळा इमारतीला तीन मजले आहेत.

(३) झरे धबधबे पावसाळ्यात डोंगरांतून झरे फु टतात.


झरे पाझरणे डोळ्यांतून त्याच्या झरे पाणी.

आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती


१. शब्दसंपत्ती :
(१) दिलेल्या शब्दांतील एका वेळी कोणतेही एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. नवीन शब्दातील पुन्हा एक अक्षर बदलून नवीन
अर्थपूर्ण शब्द तयार करा. शेवटच्या टप्प्यापर्यंत कमीत कमी शब्दांत पोहोचा.
उदा., सुंदर - घायाळ
सुंदर – आदर – आदळ - आयाळ – घायाळ
(१) डोंगर - _____ अंबर
(२) शारदा - _____ पुराण
(३) परात - _____ कानात
(४) आदर - _____ पहाट
(५) साखर - _____ नगर
उत्तरे :
(१) डोंगर - रघू - घूस - सदर - अंबर
(२) शारदा - दास - ससा - सदरा - पुराण
(३) परात - परमेश्वर - तलवार - रानात - कानात
(४) आदर - दरवाजा - दहा - हार - पहाट
(५) साखर - साद - दसरा - नगारा - नगर.
(२) समानार्थी शब्द लिहा :
(१) झाड ==
___
(२) खडक ==
___
(३) सूर्य ==
___
(४) देव ==
___
(५) बाहू ==
___
(६) सावली ==
___
उत्तरे :
(१) झाड ==
वृक्ष
(२) खडक ==
दगड
(३) सूर्य ==
रवी
(४) देव ==
ईश्वर
(५) बाहू ==
हात
(६) सावली ==
छाया.
(३) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) जन्म ×\times
___
(२) ऊन ×\times
___
(३) देव ×\times
___
(४) मज ×\times
___
उत्तरे :
(१) जन्म ×\times
मरण
(२) ऊन ×\times
सावली
(३) देव ×\times \
दानव
(४) मज ×\times
तुज.
(४) गटात न बसणारा शब्द लिहा : उत्तरे
(१) आकाश, अंबर, तुंबर, नभ, गगन. - तुंबर
(२) पाखरे, झाडे, खेडे, झरे, राने. - खेडे
(५) विशेषणे-विशेष्ये जोड्या लावा :

विशेषणे विशेष्ये

नाचरे स्पर्श

सावळा स्पंदन

मानवी पाणी

रंगीत सूर

पोपटी पताका

उत्तरे :
नाचरे - पाणी
सावळा - सूर
मानवी - स्पर्श
रंगीत - पताका
पोपटी - स्पंदन
(६) वचन बदला:
(१) गाणी - ___
(२) सूर - ___
(३) रोप - ___
(४) पाखरे - ___
(५) कोकीळ - ___
(६) सावली - ___
उत्तरे :
(१) गाणी - गाणे
(२) सूर - सूर
(३) रोप - रोपे
(४) पाखरे - पाखरू
(५) कोकीळ - कोकीळ
(६) सावली - सावल्या.
२. लेखननियम :
• पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा :
वंसत - ___
आनंध - ___
ओजंळ - ___
स्पर्ष - ___
सुरर्य - ___
इष्वर - ___
उत्तरे :
वंसत - वसंत
आनंध - आनंद
ओळ - ओंजळ
स्पर्ष - स्पर्श
सुरर्य – सूर्य
इष्वर – ईश्वर
३. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द द्या : उत्तरे
(१) Dean - अधिष्ठाता
(२) Elected - निर्वाचित
(३) Layout - आखणी/मांडणी
(४) Iceberg - हिमनग
(५) Guest House - अतिथीगृह
(६) Vacancy - रिक्तपद
(७) Yard - आवार
(८) Rest House - विश्रामगृह.

५. परिमळ
- प्रल्हाद के शव अत्रे
लेखक परिचय
प्रल्हाद के शव अत्रे
महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सुप्रसिद्ध लेखक. वाङ्मय, नाटक, चित्रपट, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग
कामगिरी. या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी मानदंड निर्माण के ले.
ग्रंथसंपदा : ‘अशा गोष्टी अशा गमती', 'फु ले आणि मुले' इत्यादी कथासंग्रह.
'झेंडू ची फु ले' हा विडंबन कवितांचा संग्रह.
'क-हेचे पाणी' हे आत्मचरित्र.
'मी असा झालो', 'हशा आणि टाळ्या' वगैरे विविध लेखन प्रकारांमधील अनेक पुस्तके .
'साष्टांग नमस्कार', 'तो मी नव्हेच', 'कवडीचुंबक', 'ब्रहमचारी'. 'डॉक्टर लाग', 'मोरूची मावशी' वगैरे रंगभूमीवर इतिहास निर्माण करणारी
अनेक नाटके .
भारत सरकारचे सर्वोत्कृ ष्ट चित्रपटाला असलेले सुवर्णकमळ हे पारितोषिक सर्वप्रथम पटकावणारा 'श्यामची आई' हा त्यांचा चित्रपट. १९४२१९४२
साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा सन्मान त्यांना मिळाला.

पाठ परिचय
'बहिणाबाईंची गाणी' या काव्यसंग्रहाला अत्रे यांनी लिहिलेली प्रस्तावना म्हणजे हा पाठ होय. कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेतलेल्या,
लिहिता-वाचताही न येणाऱ्या, असामान्य प्रतिभाशक्ती असलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यप्रतिभेची ओळख या पाठात करून दिलेली आहे.
ग्रामीण जीवन व कृ षिजीवन यांचा बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम झालेला होता. त्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये त्या संस्कृ तीचे शेकडो
तपशील जिवंतपणे उभे राहतात. निसर्गाशी समरसता, परमेश्वरावरील व्यापक श्रद्धा, ग्रामीण समूहजीवनावरील विश्वास, माणुसकी इत्यादी
भावभावना त्यांच्या कवितांतून आविष्कृ त झालेल्या आहेत. अहिराणी बोलीमुळे त्यांच्या कवितांना अवीट असा गोडवा लाभला आहे.

शब्दार्थ
सोज्वळ - निष्पाप. माजघर - घराचा मध्यभाग. चतकोर - भाकरीचा पाव भाग, (येथे अर्थ - खूप लहान). येहेरित - विहिरीत. मोट - बैलांकडू न
किं वा रेड्यांकडू न विहिरीतील पाणी वर काढण्याचे एक साधन. जातीचा कवी - प्रतिभाशक्ती लाभलेला कवी. कपार - डोंगरातील खबदाड, दरड.
अपढिक - अशिक्षित. खेयता - खेळता. पर्गटले - प्रकटले. जोडीसन - जोडू न. करमाची - कर्माची, नशिबाची. पुशीसनी - पुसल्यावर. घरोटा -
जाते. व्होटी - ओठांत. धुक्कयेला – जळणाचा लाकू ड-फाटा, धुराने भरलेला. मियते - मिळते. फयं - फळे. झाडाले - झाडाला. निंबोयी -
निंबोळी. पिकिसनी - पिकल्यावर. अवघ्याले - अवघ्यांना. पात – रांग, ओळ. पुन्याई - पुण्याई. हिरीताचं - हृदयाचं. कारुणिक - करुणेने
भरलेले. येळी - वेडी. शिगोशीग - काठोकाठ,
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) मूग धरून बसणे - मौन पाळणे.
(२) तोंड पाहिलेले नसणे - अजिबात परिचय नसणे.
(३) धावा करणे - आळवणी करणे, विनवणी करणे.

कृ ती-स्वाध्याय आणि उत्तरे


प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कृ ती करा :
(१) लेखक प्र. के . अत्रे यांच्या मते कवयित्रीचे गुणविशेष
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) अमरकाव्ये जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) पुढील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा :

घटना परिणाम

(१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. ___

(२) प्राजक्ताची कळी उमलणे. ___

(३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे. ___

(३) पुढील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा :


• शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे.
(४) कोण ते लिहा :
(१) 'स्मृतिचित्रे' या पुस्तकाच्या लेखिका - ___
(२) बहिणाबाईंचे सुपुत्र - ___
(३) सोपानदेव चौधरी यांचे मित्र - ___
(४) सोपानदेव चौधरी यांची आई - ___
(५) कारणे लिहा :
(१) सोपानदेव चौधरी आपल्या आईच्या कवितांबाबत मौन बाळगून बसले; कारण -
(२) 'गावातील मंदिरे याच माझ्या शाळा,' असे बहिणाबाई म्हणत असत; कारण -
(६) पुढील वाक्यांतून तुम्हांला जाणवणारा गुण लिहा :
(१) त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढू न घेतली आणि अधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या.
(२) 'तानक्या सोपाना'ला हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच
त्यांच्याबरोबर.
उतारा क्र. १ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १९ ते २१)
एखाद्या शेतात मोहरांचा ___ ___ ___ पिकीसनी गोड झाली!
उत्तरे
(१) (१) लेखक प्र. के . अत्रे यांच्या मते कवयित्रीचे गुणविशेष
(i) लिहिता-वाचता न येणारी, अशिक्षित, कष्टाळू गृहिणी.
(ii) घरातले व शेतातले काम करता करता गाणी रचली.
(iii) माणसाचे खोटेनाटे व्यवहार, कृ तघ्नपणा आणि स्वार्थ पाहून निर्माण झालेली मनस्वी चीड.
(iv) मानवाच्या कल्याणाची कळकळ.
(२) अमरकाव्ये जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे
(i) प्रयत्नाने किं वा शिक्षणाने प्रतिभाशक्ती लाभत नाही.
(ii) सृष्टीतल्या सौंदर्याचा आणि जीवनातल्या संगीताचा कवितेत प्रत्यय येतो.
(iii) सहजता आणि उत्स्फू र्तता यांचे दर्शन घडते.
(iv) कवीच्या जिभेवर येणारा शब्दच मुळात नाचत येतो.
(२)

घटना परिणाम

(१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. आपोआप संगीत वाहू लागणे.

(२) प्राजक्ताची कळी उमलणे. सुगंधाचे निःश्वास टाकू लागणे.


घटना परिणाम

(३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे. कवीच्या जिभेवर येणारा शब्द नाचतच येणे.

(३) (१) पर्गटले दोन पानं


जसे हात जोडीसन
(२) हिरवे हिरवे पानं
लाल फयं जशी चोच
आलं वडाच्या झाडाले
जसं पीक पोपटाचं!
(३) कडू बोलता बोलता
पुढे कशी नरमली
कडू निंबोयी शेवटी
पिकीसनी गोड झाली!
(४) (१) 'स्मृतिचित्रे' या पुस्तकाच्या लेखिका - लक्ष्मीबाई टिळक
(२) बहिणाबाईंचे सुपुत्र - सोपानदेव चौधरी.
(३) सोपानदेव चौधरी यांचे मित्र - आचार्य प्र. के . अत्रे.
(४) सोपानदेव चौधरी यांची आई - बहिणाबाई चौधरी.
(५) (१) सोपानदेव चौधरी आपल्या आईच्या कवितांबाबत मौन बाळगून बसले; कारण - आईने लिहिलेल्या कविता ग्रामीण बोलीतील असल्यामुळे
संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक लोक त्या कितपत स्वीकारतील ही सोपानदेवांच्या मनात शंका होती.
(२) 'गावातील मंदिरे याच माझ्या शाळा,' असे बहिणाबाई म्हणत असत; कारण - त्या औपचारिक शिक्षण घेण्यासाठी शाळेत गेल्या नव्हत्या.
(६) (१) त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढू न घेतली आणि अधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या - काव्यप्रेम.
(२) 'तानक्या सोपाना'ला हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर
- काव्यनिर्मितीमधील सहजता.
कृ ती २ : (स्वमत)
(१) 'बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे, हे लेखकांचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कविता वाचल्या आणि ते प्रचंड प्रभावित झाले. 'स्मृतिचित्रे' या साहित्यकृ तीइतकी ती श्रेष्ठ साहित्यकृ ती आहे, असे
त्यांचे मत झाले. बहिणाबाईंची प्रतिभा त्यांच्या कवितेतल्या शब्दाशब्दांतून पाझरत राहते. इतके सोज्वळ, इतके निर्मळ काव्य मराठी साहित्यात
क्वचितच दिसते. असे त्यांनी स्पष्टपणे नमद के ले आहे.
बहिणाबाई या निरक्षर, अशिक्षित होत्या. मग त्यांना उत्तम काव्य लिहिता कसे येईल? असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. त्याचे उत्तर लेखकांनी
देऊन टाकले आहे. शिक्षण आणि प्रतिभाशक्ती यांचा काडीइतकाही संबंध नाही. बहिणाबाईंच्या काव्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते. त्या ग्रामीण
भागात राहत होत्या. घरकाम आणि शेतीकाम यांपलीकडे त्यांना काहीही येत नव्हते. तरीही त्यांनी श्रेष्ठ दर्जाचे काव्य निर्माण के ले.
बहिणाबाई अशिक्षित होत्या आणि त्यांना फक्त बोलीभाषाच येत होती, म्हणून त्यांचे काव्य जुन्यांच्या रांगेत बसवले तरी ते चमकू न उठते. बरे, त्यांचे
काव्य आधुनिकांच्या रांगेत ठेवले, तरी तेथेही ते झळाळून उठते; इतका त्यांच्या काव्याचा दर्जा उच्च आहे. त्यांना माणसांच्या साध्या कृ तींतून,
वागण्यातून माणसाच्या स्वभावातील, त्याच्या प्रवृत्तीतील विपरीतता दिसून येते. निसर्गातील साध्या साध्या घटकांच्या दर्शनातून त्यांना परमेश्वराचे
दर्शन घडते. त्यांच्या काव्याच्या या सामर्थ्यामुळे वाचकाला नैतिक मार्गदर्शन मिळते. म्हणूनच बहिणाबाईंचे काव्य नव्या जुन्या सर्व प्रकारच्या
काव्यांमध्ये स्वतःच्या तेजाने झळाळून उठते.
(२) 'बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर : बहिणाबाईंकडे असामान्य काव्यप्रतिभा होती. ग्रामीण जीवन व कृ षिजीवन यांच्याशी निगडित संस्कृ तीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार
झाले होते. त्यामुळे ग्रामीण भावजीवन आणि कृ षिजीवन यांचे अर्थपूर्ण व भावपूर्ण तपशील त्यांच्या कवितांत सहज आढळतात. या तपशिलांच्या
साहाय्याने त्या माणसाच्या अंतरंगातील विसंगत व विपरीत वृत्ती-प्रवृत्तींवर बोट ठेवतात. माणूस काय गमावत चालला आहे आणि त्याने काय कमावले
पाहिजे, हे त्या कळकळीने सांगतात.
बहिणाबाईंच्या काव्याचा सर्वप्रथम कोणता गुण जाणवत असेल, तर तो म्हणजे सहजता हा होय. कोकीळ पक्ष्याने तोंड उघडले की, आपोआपच
संगीत वाहू लागते. फु लांमधला सुगंध नैसर्गिक ऊर्मीतून सहज दरवळतो. बहिणाबाई या निसर्गाशी इतक्या समरस झाल्या आहेत
की, निसर्गाच्या सगळ्या प्रेरणा, ऊर्मी त्यांच्या शब्दाशब्दांतून सहज उचंबळून येतात. त्यांना काव्यलेखनासाठी वेगळी समाधी लावून बसावे लागत
नाही किं वा वेगळ्या मनःस्थितीची त्यांना गरज वाटत नाही. घरात किं वा शेतात त्या नित्याची कामे करत असतात तेव्हा, किं वा निसर्गाची विविध रूपे
सहज नजरेस पडतात तेव्हा त्यांच्या ओठांतून सहज कवितांच्या ओळी बाहेर पडतात. जात्यामधून धान्याचे पीठ जितके सहजगत्या बाहेर पडते,
तितके सहजगत्या त्यांच्या ओठांतून शब्द बाहेर पडतात. त्यांच्या कवितेला निसर्गाचीच लय आपसूक लाभलेली आहे. जितक्या सहजतेने आपण
श्वास घेतो इतक्या सहजतेने त्यांची कविता निर्माण होते. असे वाटते की काव्य जणू काही बहिणाबाईंच्या ओठातून बाहेर पडण्याची वाटच पाहत
असते. म्हणून लेखक म्हणतात की, बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेचे त्यांच्याबरोबर!
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
• प्र. के . अत्रे यांच्या प्रस्तावनालेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर : 'परिमळ' हा पाठ वाचल्यावर अत्रे यांच्या भाषेचा एक गुण प्रथमच ठळकपणे जाणवतो. तो म्हणजे त्यांची साधी, सोपी, सरळ भाषा. भाषेत
कठे कठीणपणा, खडबडीतपणा आढळणार नाही. ही अस्सल मराठी भाषा आहे. या पाठात कु ठेही एकही कठीण शब्द आढळणार नाही. त्यांचे
लेखन वाचताना कोणताही वाचक अडखळणार नाही. आपले लेखन प्रभावी व्हावे; भारदस्त, उच्च दर्जाचे वाटावे म्हणून त्यांनी कु ठेही भारदस्त बोजड
शब्दांचा वापर के लेला नाही. आपले लेखन लोकांना भारदस्त वाटावे, यापेक्षा आपले लेखन लोकांना कळले पाहिजे, ही त्यांची उत्कट इच्छा आहे.
त्यामुळे त्यांची भाषा सर्वसामान्य वाचकांना सहज कळेल अशी आहे. हे त्यांचे फार मोठे सामर्थ्य आहे.
अत्रे यांच्या लेखाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगितले पाहिजे; ते म्हणजे त्यांची भाषा ही लिहिल्यासारखी नाही, तर ती बोलल्यासारखी आहे.
ते वाचकांशी संवाद साधू पाहतात. वाचकांना काही तरी सांगायचे आहे, अशी त्यांची भावना असते. यामुळे वाचकांशी एक प्रकारची जवळीक निर्माण
होते. वाचकांशी संवाद साधायचा असल्याने त्यांची भाषा आपोआपच ओघवती बनते. बहिणाबाईंच्या कविता त्यांना प्रचंड आवडल्या आहेत. म्हणून
ते त्यांची मुक्तकं ठाने प्रशंसा करत आहेत.
प्र. के अत्रे यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी सोपानदेव चौधरी यांच्याबरोबर झालेली त्यांची भेट आठवून पाहा.
सोपानदेवांचा लाजाळूपणा, स्वतःच्या आईची कविता भीतभीतच वाचून दाखवणे, अत्रे यांनी कवितेची वही खसकन त्यांच्या हातातून काढू न घेणे,
त्यातल्या कविता अधाशीपणाने वाचणे, मग सोपानदेवांना ओरडू न सांगणे या सर्व कृ तींमधून एक प्रकारचा अनौपचारिकपणा दिसून येतो. त्यामुळे अत्रे
आत्मीयतेने बोलत आहेत, असे जाणवत राहते. त्यांनी बहिणाबाईंच्या कवितेचे मोठेपण जाणले आहे. पण ते त्यांनी कसे सांगितले आहे, ते मी येथे
नोंदवले आहे.
उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कृ ती करा :
(१) बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) बहिणाबाईंच्या काव्याचे स्वरूप
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) कारणे लिहा :
(१) बहिणाबाईंच्या मते, बोरीबाभळींच्या अंगावर काटे येतात; कारण –
(२) 'माणसा, माणसा, कधी होशील माणूस?' असे बहिणाबाई आर्तपणे विचारत आहेत; कारण -
(३) पुढील वाक्यांतून तुम्हांला जाणवणारे गुण लिहा :
(१) गाय अन् म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात :
(२) भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्यांच्या संसाराचे करुण काव्य गाण्यातून प्रकट झाले आहे :
(४) तुलना करा :

मुद्दे माणूस प्राणी

वर्तणूक

इमानीपणा

(५) कोण ते लिहा :


(१) ज्याच्या पायाच्या पुण्याईने माणसाला धान्य मिळते –
(२) आपला काव्यातला विचार सुभाषितांमधून सांगतात –
(३) ऊन, वारा आणि पाऊस खात शेतात उभी असतात –
(४) ज्यांच्या अंगावर काटे उगवतात त्या –
(६) पुढील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा :
बहिणाबाईंची प्राणिमात्रांविषयीची कृ तज्ञता :
उतारा क्र. २ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २१ व २२)
समोरून पंढरीच्या दिंडीतला ___ ___ ___ करून ठेवलेले आहे!
उत्तरे
(१) (१) बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष
(i) प्रत्येक कवितेत एक संपूर्ण घटना वा विचार.
(ii) तिचा प्रारंभ आणि शेवट नाट्यात्मक.
(iii) एखादी भावना अल्प शब्दांत जास्तीत जास्त प्रभावी करण्याचे कौशल्य.
(iv) रस व ध्वनी यांच्या दृष्टीने रसभंग न करणारे सोपे शब्द आणि अहिराणी भाषेमुळे गोडवा.
(२) बहिणाबाईंच्या काव्याचे स्वरूप
(i) शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य.
(ii) सरस व सोज्वळ काव्य.
(iii) सभाषितांमध्ये दिसणारी भाषेची। श्रीमंती.
(iv) विनोदाला सहानुभूतीचा व कारुण्याचा ओलावा.
(२) (१) बहिणाबाईंच्या मते, बोरीबाभळींच्या अंगावर काटे येतात; कारण - माणसांचे खोटेनाटे व्यवहार बघून त्यांना माणसांची शिसारी येते.
(२) 'माणसा, माणसा, कधी होशील माणूस?' असे बहिणाबाई आर्तपणे विचारत आहेत; कारण - आज माणसे पशू बनून एकमेकांशी झगडत
आहेत.
(३) (१) गाय अन् म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात. : गाय अन् म्हैस यांची कृ तज्ञता.
(२) भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्यांच्या संसाराचे करुण काव्य गाण्यातून प्रकट झाले आहे.: शेतकऱ्यांविषयीचा जिव्हाळा.
(४)

मुद्दे माणूस प्राणी

वर्तणूक कृ तघ्नतेने वागतो. कृ तज्ञतेने वागतात.

इमानीपणा मतलबासाठी मान डोलावतो. कु त्रा इमानीपणाने शेपटी हलवतो.

(5) (१) ज्याच्या पायाच्या पुण्याईने माणसाला धान्य मिळते. - बैल.


(२) आपला काव्यातला विचार सुभाषितांमधून सांगतात. - बहिणाबाई.
(३) ऊन, वारा आणि पाऊस खात शेतात उभी असतात. - पिके .
(४) ज्यांच्या अंगावर काटे उगवतात त्या. - बोरी-बाभळी.
(६) (१) पाय उचल रे बैला,
कर बापा आता घाई
चालू दे रे रगडनं
तुझ्या पायाची पुण्याई
(२) मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात.
कृ ती २ : (स्वमत)
• मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर : निसर्गात प्राणी-वनस्पती सहकार्याने राहतात. त्यांच्यामध्ये हाव दिसून येत नाही. हिंस्र म्हटले जाणारे वाघ-सिंहसुद्धा आपले एका वेळेचे पोट
भरण्यापुरतीच हिंसा करतात. पोट भरलेले असताना ते आजूबाजूला वावरणाऱ्या सशालासुद्धा हात लावत नाहीत. कधी एकदा आपण भुके लेल्या
लोकांच्या पोटात जातो, त्यांची भूक भागवतो, असे पिके , फळे यांना वाटत असते. माणूस मात्र याविरुद्ध वागताना दिसतो.
माणूस अतोनात स्वार्थी बनलेला आहे. पोट भरल्यानंतरही तो तृप्त होत नाही. त्याची हाव वाढतच जाते. स्वार्थीपणामुळे तो खोटेनाटे
व्यवहार करतो. आपल्याच लोकांशी लबाडीने वागतो. सरळपणाने व्यवहार करण्याऐवजी फसवणूक करण्याचा विचार करतो. या प्रवृत्तीमुळे जगभर
भांडणतंटे, मारामाऱ्या, युद्धे होत आहेत. जगातला सगळा चांगुलपणा नष्ट झाला आहे. माणसे दुःखाच्या खाईत लोटली गेली आहेत. लोक आनंद
उपभोगण्याऐवजी यातना भोगत आहेत.
लोकांनी चांगलेपणाने जगावे, तरच सर्व मानवी समाज सुखी-आनंदी होईल. साधी गाईगुरे खाल्लेल्या चाऱ्याबद्दल दूध देतात. माणसाचा वाईटपणा
पाहून बोरी-बाभळींच्या अंगावर काटे येतात. तरीही त्या माणसांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती कुं पणासारख्या उभ्या राहतात.
माणसाकडे मात्र अशी कृ तज्ञता नाही. खरेतर, पोट कितीही भरले, रोज रोज भरले, तरी ते रिकामे होतेच. ज्या देहाचे चोचले पुरवण्यासाठी आपण
दिवसरात्र धडपडतो, तो देहसुद्धा एक दिवस नष्ट होतो. मग उरते काय? हृदयांचे देणेघेणे. शुद्ध निःस्वार्थी प्रेमाखेरीज दुसरे चांगले, उदात्त असे या
जगात काही नाही. यातच माणूसपणा आहे. . पण माणूस ते विसरून गेला आहे. म्हणून बहिणाबाई माणसाला आर्तपणे विनवणी करत आहेत, “हे
माणसा, तुला जन्म माणसाचा मिळालेला आहे. पण तू खऱ्या अर्थाने माणूस कधी होणार?"
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर : बहिणाबाई या निरक्षर, अशिक्षित होत्या. त्यामुळे त्यांची गाणी, कविता या सामान्य दर्जाच्या, जुनाट वळणाच्या असतील, असे कोणाचे मत
होऊ शकते. पण त्या तशा नाहीत. त्यांच्या कविता रचनेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक आहेत. तसेच, त्या आशयाच्या दृष्टीनेसुद्धा अत्यंत आधुनिक
आहेत. त्यांचे विचार, कल्पना आधुनिक काळातल्याच आहेत. त्यांचे सर्व विचार आजच्या काळातही पूर्णपणे लागू पडतात.
बहिणाबाईंची प्रत्येक कविता परिपूर्ण आहे. प्रत्येक कवितेत एक संपूर्ण घटना किं वा विचार आहे. कवितेचा प्रारंभ आणि शेवट यांत नाट्यात्मकता
आहे. ही बाब आधुनिक आहे. कवितेच्या रचनेकडे त्यांचे खास लक्ष आहे, हे दिसून येते. कवितेतला विचार किं वा भावना फापटपसारा न लावता
सांगतात. कमीत कमी आणि नेमक्या शब्दांत आपला आशय मांडतात. यासाठी फार मोठे भाषिक आणि वैचारिक कौशल्य लागते. ते बहिणाबाईंकडे
पुरेपूर आहे.
आपली कविता लोकांना आवडावी; लोकांनी ती सतत गुणगुणत राहावी, यासाठी बहिणाबाई जाणीवपूर्वक कर्णमधुर शब्दांचा वापर करतात, असे
दिसत नाही. आशयाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा सोप्यासोप्या, छोट्याछोट्या व सुंदर शब्दांची योजना त्या करतात. हेही त्या मुद्दाम करतात
असे नव्हे. बहिणाबाई या निसर्गाशी व खेड्यातील समाजजीवनाशी निर्मळ मनाने समरस झाल्या आहेत. निसर्गाचे दर्शन घेत असताना, घरात,
शेतात काम करीत असताना त्या गुणगुणत कविता निर्माण करतात. त्यामुळे कामातली, निसर्गातली लय त्यांच्या कवितेला मिळते. म्हणूनच त्यांच्या
कवितेतले शब्द सहजगत्या अवतरतात. हे सर्व आधुनिक आहे.
अहिराणी भाषेचा उपयोग तर बहिणाबाईंच्या कवितेला एक वेगळेच अलंकार चढवतो. त्या भाषेतला सर्व गोडवा, सर्व सौंदर्य त्यांच्या कवितेला मिळते.
भाषा अपरिचित म्हणून कविता अपरिचित राहत नाही. त्यांची कविता वाचता वाचता आपोआप कळत जाते; हे त्यांच्या कवितेचे फार मोठे सामर्थ्य
आहे.
(२) माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
उत्तर : मी आता अकरावीत आहे. पण हा प्रसंग सांगत आहे, तो आहे मी नववीत असतानाचा. आम्ही पाच-सहा मित्र नेहमी एकमेकांच्या घरी
अभ्यास करायला जमायचो. कधी या मित्राकडे, कधी त्या मित्राकडे. हसतखेळत आमचा अभ्यास चालायचा. त्या दिवशीचा प्रसंग मात्र मी
आयुष्यभर विसरणार नाही.
एकदा आम्ही असेच आमच्या घरी अभ्यास करीत बसलो होतो. माझी आई स्वयंपाकघरात काम करीत होती. तेवढ्यात एक बाई आल्या. आल्या
त्या घरातच घुसल्या. घुसल्या आणि मोठमोठ्याने आरडाओरड़ करायला सुरुवात के ली.
"अहो, काय ऐकताय की नाही? तुम्हांला काहीच कसं वाटत नाही? वर्ष उलटू न गेलं. एक रुपया तुम्ही अजून परत के ला नाही. व्याजावर व्याज
चढत चाललं आहे. आणि तुम्हांला काहीच कसं वाटत नाही? दुसऱ्याचे पैसे ठेवून तुम्हांला अन्न गोड कसं लागतं? अहो, माझ्यासारखीने तर जीव
दिला असता! आम्ही उपाशी राहिलो असतो. पण दुसऱ्याचे पैसे आधी दिले असते. मगच दोन घास खाल्ले असते." त्या बाई असे काहीबाही
बडबडू न निघून गेल्या.
हे ऐकू न मी हादरूनच गेलो. पुरता गांगरून गेलो. काय करावे ते मला कळेना. आमची परिस्थिती गरिबीची होती. सतत कोणा ना कोणाकडू न पैसे
उसने घ्यावे लागत. सतत ओढाताण होई. पण आता मित्रांसमोर हे असे घडल्यामुळे मला लाजिरवाणे वाटले. मला मित्रांकडे बघण्याचा धीर होईना.
मी टेबलावर डोके टेकले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात माझा मित्र विवान जवळ आला. मला जवळ घेतले. तेव्हा मात्र माझा बांधच
फु टला. तेवढ्यात माझी आई बाहेर आली. म्हणाली, "बाळांनो, तुम्ही आता घरी जा. तुमचा अभ्यास होणार नाही.''
मित्र उठले. कष्टी मनाने बाहेर पडले. थोड्या वेळाने विवानची आई माझ्या घरी आली. तिने मला थोपटले. आत गेली. माझ्या आईची समजूत
काढली. सगळी माहिती घेतली आणि गेली. संध्याकाळी माझ्या मित्रांचे आईबाबा आमच्या घरी जमले. त्या सगळ्यांनी मिळून आमचे सगळे कर्ज
फे डायचे ठरवले होते. विवानची आई म्हणाली, “आपली ही मुलं गुणी आहेत. या सगळ्यांना आयुष्यभर एकमेकांचे मित्र म्हणून जगू द्या."

व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
• पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. - अभिधा
(२) कवीचे हृदय ताल धरून बसलेले असते. - लक्षणा
(३) गावातली मंदिरे ह्याच माझ्या शाळा. व्यंजना - प्रसाद
२. काव्यगुण :
• पुढील ओळीतील काव्यगुण लिहा : उत्तरे
(१) हिरवे हिरवे पानं
लाल फयं जशी चोच
आलं वडाच्या झाडाले
जसं पीक पोपटाचं! - माधुर्य
(२) मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
प्रसाद आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात - प्रसाद
३. वाक्यसंश्लेषण :
• कं सांतील सूचनांप्रमाणे बदल करा :
(१) त्यांना लिहिता येत नव्हते नि वाचताही येत नव्हते.
(के वल वाक्य करा.)
(२) चूल पेटेनाशी झाली आणि तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला.
(मिश्र वाक्य करा.)
(३) बहिणाबाई सोपानला निजवून हारा घेऊन शेतात गेल्या.
(संयक्त वाक्य करा.)
उत्तरे : (१) त्यांना लिहिता-वाचताही येत नव्हते.
(२) जेव्हा चूल पेटेनाशी झाली, तेव्हा तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला.
(३) बहिणाबाईंनी सोपानला निजवले आणि हारा घेऊन त्या शेतात गेल्या.
४. काळ :
• कं सांतील सूचनांप्रमाणे बदल करा :
(१) कोकीळ पक्ष्याने तोंड उघडले. (रीती भूतकाळ करा.)
(२) सोपानदेवांनी आईची कविता वाचून दाखवली. (साधा वर्तमानकाळ करा.)
(३) हे काव्य मराठी भाषेत झळके ल. (रीती भविष्यकाळ करा.)
(४) त्यांनी एक चतकोर चोपडी दिली. (साधा भविष्यकाळ करा.)
(५) बहिणाबाईंची गाणी मराठी वाङ्मयात अमर होतील. (रीती वर्तमानकाळ करा.)
उत्तरे :
(१) कोकीळ पक्षी तोंड उघडत असे.
(२) सोपानदेव आईची कविता वाचतात.
(३) हे काव्य मराठी भाषेत झळकत जाईल.
(४) ते एक चतकोर चोपडी देतील.
(५) बहिणाबाईंची गाणी मराठी वाङ्मयात अमर होत असतात.
५. शब्दभेद :
• पुढील तक्ता पूर्ण करा : (अक्षर फरकाने अर्थबदल)

शब्द अर्थ वाक्य

(१) पाठ शरीराचा अवयव काम करून आईची पाठ दुखू लागली.
पाट बसायचे साधन आईने गुरुजींना बसायला पाट दिला.

(२) पढिक शिकलेला पढिक लोकांनी अंधश्रद्धा बाळगू नये.


पडिक निरुपयोगी गावाच्या बाहेर आमची एक पडिक जमीन
आहे.

(३) इमान प्रामाणिकपणा महादूने नेहमी मालकांशी इमान राखले.


विमान वाहन विमान म्हणजे अतिवेगाने जाणारे वाहन होय.

आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती


१. शब्दसंपत्ती :
(१) प्रस्तुत पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा :
उत्तरे : (१) एक - कितीक
(२) नक्कल - अक्कल
(३) जीव - हीव
(४) थंडी - दिंडी
(५) घाई - पुन्याई
(२) पुढील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा :
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी.
(१) अर्थ - ___
(२) कृ पा- ___
(३) धर्म- ___
(४) बोध - ___
(५) गुण - ___
उत्तरे :
(१) अर्थ – अनर्थ, आर्थिक, अर्थपूर्ण, सार्थ.
(२) कृ पा - अवकृ पा, कृ पाळू, कृ पावंत, कृ पाकर.
(३) धर्म - अधर्म, प्रतिधर्म, धार्मिक, धर्मांध.
(४) बोध - सुबोध, अबोध, दुर्बोध, बोधपर.
(५) गुण - सगुण, निर्गुण, गुणवान, गुणवंत.
(३) तक्ता पूर्ण करा :
[खोटेनाटे, अपढिक, शेतकरी, भाविक, सुभाषित, ओढाताण, बुद्धिमान, शिगोशीग, लाडके पणा, प्रसिद्ध, नि:श्वास, देणेघेणे]

उपसर्गघटित शब्द प्रत्ययघटित शब्द अभ्यस्त शब्द

अपढिक शेतकरी खोटेनाटे

सुभाषित भाविक ओढाताण

प्रसिद्ध बुद्धिमान शिगोशीग

नि:श्वास लाडके पणा देणेघेणे

(४) समानार्थी शब्द लिहा :


(१) संसार ==
___
(२) मातोश्री ==
___
(३) समस्या ==
___
(४) मंदिर ==
___
(५) रहस्य ==
___
(६) घरोटे ==
___
उत्तरे :
(१) संसार ==
प्रपंच
(२) मातोश्री ==
आई
(३) समस्या ==
आपत्ती
(४) मंदिर ==
देऊळ
(५) रहस्य ==
गुपित
(६) घरोटे ==
जाते
(५) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) स्मृती ×\times
___
(२) निरक्षर ×\times
___
(३) अशिक्षित ×\times
___
(४) सुप्रसिद्ध ×\times
___
(५) आधी ×\times
___
(६) सामान्य ×\times
___
(७) पुढे ×\times
___
(८) स्पष्ट ×\times
___
(९) श्रीमंती ×\times
___
(१०) अमर ×\times
___
(११) लवकर ×\times
___
(१२) उपकार ×\times
___
(१३) शुद्ध ×\times
___
(१४) स्वार्थी ×\times
___
(१५) कृ तघ्न ×\times
___
(१६) सोपे ×\times
___
(१७) प्रारंभ ×\times
___
(१८) आधुनिक ×\times
___
उत्तरे :
(१) स्मृती ×\times
विस्मृती
(२) निरक्षर ×\times
साक्षर
(३) अशिक्षित ×\times
सुशिक्षित
(४) सुप्रसिद्ध ×\times
अप्रसिद्ध
(५) आधी ×\times
नंतर
(६) सामान्य ×\times
असामान्य
(७) पुढे ×\times
मागे
(८) स्पष्ट ×\times
अस्पष्ट
(९) श्रीमंती ×\times
गरिबी
(१०) अमर ×\times
मर्त्य
(११) लवकर ×\times
उशिरा
(१२) उपकार ×\times
अपकार
(१३) शुद्ध ×\times
अशुद्ध
(१४) स्वार्थी ×\times
नि:स्वार्थी
(१५) कृ तघ्न ×\times
कृ तज्ञ
(१६) सोपे ×\times
कठीण
(१७) प्रारंभ ×\times
अखेर
(१८) आधुनिक ×\times
पौराणिक.
(६) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा :
(१) माजघरात →\rightarrow
माघ, मात, रात, घरात
(२) चतकोर →\rightarrow
कोर, चर, तर, चकोर
(७) लिंग बदला :
(१) कु त्रा - ___ (२) म्हैस - ___
(३) कोकीळ - ___ (४) मातोश्री - ___
(५) गृहिणी - ___ (६) बालक - ___
उत्तरे :
(१) कु त्रा - कु त्री (२) म्हैस - रेडा
(३) कोकीळ - कोकिळा (४) मातोश्री - पिताश्री
(५) गृहिणी - गृहस्थ (६) बालक - बालिका.
(८) वरील जोड्यांमधील पहिल्या शब्दाचे वचन बदला :
(१) कु त्रा - ___ (२) म्हैस - ___
(३) कोकीळ - ___ (४) मातोश्री - ___
(५) गृहिणी - ___ (६) बालक - ___
उत्तरे :
(१) कु त्रा - कु त्रे (२) म्हैस - म्हशी
(३) कोकीळ - कोकीळ (४) मातोश्री- मातोश्री
(५) गृहिणी - गृहिणी (६) बालक - बालके .
२. विरामचिन्हे :
• योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा :
(१) मी म्हणालो अहो हे बावनकशी सोने आहे
(२) भोळ्या भाविक कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य गाण्यातून प्रकट होते
उत्तरे :
(१) मी म्हणालो, “अहो, हे बावनकशी सोने आहे!"
(२) भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य गाण्यातून प्रकट होते.
३. लेखननियम :
(१) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(१) प्रतीभा हे कविला लाभलेले नीर्सगाचे देणे आहे.
(२) प्राजकाची कळि उमलली की सुंगधाचे नी:श्वास टाकु लागते.
उत्तरे :
(१) प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे.
(२) प्राजक्ताची कळी उमलली की सुगंधाचे नि:श्वास टाकू लागते.
(२) अचूक शब्द निवडा : उत्तरे
(१) दिवाळि/दिवाळी/दीवाळी/दीवाळि. - दिवाळी
(२) गृहिणि/गृहीणी/गृहिणी/ग्रुहिणी. – गृहिणी
(३) वैधव्य/वेधव्य/वैदव्य/वेदव्य. - वैधव्य
(४) अविष्कार/आवीष्कार/अवीष्कार आविष्कार. - आविष्कार
४. वाक्प्रचार :
(१) शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा : उत्तरे
(१) बावनकशी सोने - अतिशय शुद्ध गोष्ट
(२) सोन्याची खाण - दुर्मीळ खजिना
(३) करमाची रेखा - भाग्यरेषा
(४) चतकोर चोपडी - लहानशी वही.
(२) पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :
(१) तोंडात बोटे घालणे -
अर्थ - आश्चर्य व्यक्त करणे.
वाक्य - माथेरानला सूर्योद्याचे अप्रतिम दृश्य पाहून सुमनने तोंडात बोटे घातली.
(२) तोंडात मूग धरून बसणे -
अर्थ - गप्प बसणे, काहीही न बोलणे.
वाक्य - शिक्षकांनी प्रश्न विचारताच श्रीधर तोंडात मूग धरून बसला.
५. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Criticism - समीक्षा
(२) Backlog - अनुशेष
(३) Geology - भूशास्त्र
(४) Honorary - मानद
(५) Validity - वैधता
(६) Thesis - प्रबंध
(७) Official - कार्यालयीन
(८) Senate - अधिसभा.
प्रकल्प
(१) 'बहिणाबाईंची गाणी' मिळवून निवेदनासह काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर करा.
(२) तुमच्या परिसरातील ओव्या/लोकगीते मिळवून संग्रह करा.

६. दवांत आलीस भल्या पहाटी


- बा. सी. मर्डेकर
• कवीचे नाव : बा. सी. मर्डेकर.
• कवीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये : कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्यमीमांसक, परिवर्तनवादी कवी, 'दुसरे के शवसुत' ही
बिरुदावली.
• ग्रंथसंपदा : 'शिशिरागम', 'कांही कविता', 'आणखी काही कविता' हे कवितासंग्रह; 'रात्रीचा दिवस', 'तांबडी माती', 'पाणी' या
कादंबऱ्या. 'सौंदर्य आणि साहित्य' हा समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध.
• कवितेची वैशिष्ट्ये : भावोत्कट तरीही चिंतनशील कविता, वर्तमान परिस्थितीवर जहाल भाष्य, अंतर्विरोधी प्रतिमा सृष्टी, आधुनिक
अनोखी प्रतीके यांचा वापर.

कवितेची मध्यवर्ती कल्पना


प्रेयसीच्या प्रत्यक्ष किं वा स्वप्नातील आगमनाच्या आठवणींचे भावरम्य वर्णन, प्रेयसीच्या विभ्रमांचे (अनेक पैलू) भावोत्कट वर्णन के ले आहे. प्रेयसीच्या
भेटीची आतुरता, उल्हास व व्याकू ळता या प्रेमातील परस्परविरोधी भावनांचे उत्कट रेखाटन प्रस्तुत कवितेत सौंदर्यपूर्ण शब्दशैलीत के ले आहे. यातून
कविमनाची तरल व हळवी भावावस्था प्रकट झाली आहे.

शब्दार्थ
भल्या पहाटीं - उत्तररात्रीनंतरची अरुणोद्याची वेळ. तोऱ्यात - ऐटीत, रुबाबात. पेरित - पखरण करत. तरल - उत्कट. लक्ष्य - वेध, ध्येय.
पिपासा - उत्कट तहान. बुजली - नाहीशी झाली, मिटली, दिसेनाशी झाली. तांबुस - लालसर. निर्मल - स्वच्छ, पवित्र. अभ्र - ढग, मेघ. गंध
- सुवास.
टिपा
१. दव - पहाटेच्या वेळी हवा गारठू न निर्माण झालेले पाण्याचे थेंब, दवबिंदू.
२. शुक्र - एक तेजस्वी ग्रह (तारा).
३. हिरवे धागे - (इथे अर्थ) प्रेमाचे कोमल संबंध, प्रेमपाश.
४. डोळ्यांमधली डाळिंबे - (इथे अर्थ) डोळ्यांमधली तरल चमक.
५. पारा - एक धातू (चिमटीत पकडता येत नाही.)
६. गतजन्म - पूर्वजन्माची कल्पना.

कवितेचा भावार्थ
शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात, शुक्राच्या ऐटीत, एकदा तू दवबिंदू पडण्याच्या भल्या पहाटेच्या प्रहरी आलीस; आणि आपल्या तरल पावलांच्या
कोमल शोभेची पखरण करत माझ्याजवळून दूर निघून गेलीस.
पुढे जाऊन थोडीशी थबकलीस, जरासे स्मित तुझ्या ओठांवर उमलले; पण तू मागे वळून मला पाहिले नाहीस. आपल्यामधील प्रेमभाव, प्रेमाचे पाश
तू विसरलीस का? (आपल्यामधील प्रेमसंबंध तू पार विसरलीस.)
तुझे डोळे कशाचा वेध घेत होते? प्रेमाची आकं ठ तहान तुला होती का? तुझ्या सौंदर्याची कोणती नेमकी खूण आहे? तुझ्या डोळ्यांत उमललेल्या
चंचल चमके मधला भाव पाऱ्यासारखा उमटू न निसटू न गेलेला मी पाहिला.
वर्तमानातील ताज्या, कोमल, ओल्या आठवणीच जर विरून गेल्या असतील, तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची ओळख मी तुला कशी
द्यावी, ते मला सांग.
तळहाताच्या नाजूक रेषा वाचून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कसे करावे? तुझ्या लालसर निर्मळ नखांवर शुभ्र चांदण्यांसारखे शुभशकु न कु णी गोंदावे?
भल्या पहाटेच्या वेळी, विरल सुंदर ढग अरुणोद्याच्या प्रतीक्षेत असताना तू एकदा आलीस आणि जवळून जाताना आपल्या प्रेमाच्या आठवणींचा मंद
ओलसर सुवास मनात पेरीत निघून गेलीस.

कृ ति-स्वाध्याय आणि उत्तरे


प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) योग्य पर्याय निवडू न वाक्ये पूर्ण करा :
(१) शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे – ___
(अ) शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात.
(आ) शुक्रताऱ्याच्या आकाशी आगमनात.
(इ) शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.
(ई) शुक्रताऱ्याच्या अहंकारीपणात.
(२) हिरवे धागे म्हणजे - ___
(अ) हिरव्या रंगाचे सूत.
(आ) हिरव्या रंगाचे कापड.
(इ) हिरव्या रंगाचे गवत.
(ई) ताजा प्रेमभाव.
(३) सांग धरावा कै सा पारा! म्हणजे - ___
(अ) पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.
(आ) हातातून निसटणारा पारा.
(इ) पाऱ्यासारखा चकाकणारा.
(ई) पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला.
(४) अभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजे – ___
(अ) आकाशात अल्पकाळात शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे
(आ) काळ्या मेघांप्रमाणे
(इ) आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे
(ई) आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे
(२) प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा:
(१) प्रेयसीचे नाव काय?
(२) ती वळून पाहणे का विसरली असावी?
(३) भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी?
(४) ती कु ठे राहते?
(५) तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
(६) तिने सुंदर वस्त्र परिधान के ले आहे का?
(७) तिचे डोळे कोणता इशारा देतात?
(८) तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?
(३) पुढील अर्थांच्या ओळी कवितेतून शोधा :
(१) वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील, तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी?
(२) तळहातावरील नाजूक रेषा तरी कु ठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्यकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल?
(३) विरल, सुंदर अभ्रे अरुणोद्याच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत
गेलीस.
(४) 'पहाटी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
(५) एका वाक्यात उत्तरे लिहा :
(१) कवीची प्रेयसी के व्हा आली?
(२) डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?
(३) कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?
(४) प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती?
(५) 'अनोळख्याने' हा शब्द कोणासाठी वापरला आहे?
(६) पुढील चौकटी पूर्ण करा :

कवितेचा विषय

कवितेची मध्यवर्ती कल्पना

कवितेतील तुम्हांला आवडलेले शब्दसमूह

कवितेतील छंद

(७) काय ते लिहा :


(१) शुक्राचा →\rightarrow
___
(२) सुंदरतेचा →\rightarrow
___
(३) डोळ्यांमधली →\rightarrow
___
(४) तळहाताच्या →\rightarrow
___
(५) तांबूस नखांवरल्या →\rightarrow
___
(६) प्रस्तुत कवितेच्या संग्रहाचे नाव →\rightarrow
___
दवांत आलिस भल्या पहाटीं
शुक्राच्या तोऱ्यांत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा.
अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस;
-मागे
वळनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?
लक्ष्य कु ठे अन् कु ठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कै सा पारा!
अनोळख्याने ओळख कै शी
गतजन्मींची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!
तळहाताच्या नाजुक रेषा
कु णिं वाचाव्या, कु णी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन्
शुभ्र चांदण्या कु णिं गोंदाव्या!
दवांत आलिस भल्या पहाटीं
अभ्रांच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.
- (मढेकरांची कविता)
उत्तरे
(१) (१) शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे – शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात.
(२) हिरवे धागे म्हणजे – ताजा प्रेमभाव.
(३) सांग धरावा कै सा पारा ! म्हणजे - पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.
(४) अभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजे – आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे.
(२) कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न →\rightarrow
(१) ती वळून पाहणे का विसरली असावी?
(२) भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी?
(३) तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?'
(४) तिचे डोळे कोणता इशारा देतात?
(५) तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?
(३) (१) अनोळख्याने ओळख कै शी
गतजन्मींची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!
(२) तळहाताच्या नाजुक रेषा
कु णिं वाचाव्या, कु णी पुसाव्या;
(३) दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्रांच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.
(४) प्रेयसी दवात कधी आली?
(५) (१) कवीची प्रेयसी भल्या पहाटी आली.
(२) कवीने डोळ्यांना 'डाळिंबांचा पारा' ही उपमा दिली.
(३) कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं तरल व मंद आहेत.
(४) प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत 'कोमल व ओल्या' ही दोन विशेषणे दिली आहेत.
(५) 'अनोळख्याने' हा शब्द कवीने स्वत:साठी वापरला आहे.
(६)

कवितेचा विषय प्रत्यक्षात किं वा स्वप्नात प्रेयसीचे येणे व जाणे.

कवितेची मध्यवर्ती कल्पना प्रेयसीच्या आठवणींचे भावोत्कट वर्णन. आतुरता, उल्हास व


व्याकु ळता या भावनांचे उत्कट प्रकटीकरण करणे.

कवितेतील तुम्हांला आवडलेले शब्दसमूह लक्ष्य कु ठे अन् कु ठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कै सा पारा!

कवितेतील छंद अनुष्टु भ' मात्राछंद.

(७) (१) तोरा (२) इशारा (३) डाळिंबे (४) नाजूक रेषा (५) शुभ्र चांदण्या (६) मढेकरांची कविता
कृ ती २ : (काव्यसौंदर्य)
(१) 'डोळ्यांमधल्या डाळिंबांचा, सांग धरावा कै सा पारा!' या काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर : ‘दवांत आलीस भल्या पहाटी' या कवितेत कवी बा. सी. मर्डेकर यांनी प्रेयसीच्या भेटीतील आतुरता व व्याकु ळता यांचे भावोत्कट वर्णन के ले
आहे. पहाटेच्या वेळी दवभारल्या प्रहरात घडलेली भेट ही प्रत्यक्ष होती की स्वप्नवत होती, यांतील संभ्रम मनोहारी प्रतिमांतून प्रकट के ला आहे.
शुक्राच्या तोऱ्यात आलेली प्रेयसी तरल पावलांमधली शोभा पेरीत अगदी जवळून गेली. पण तिला गतकाळातील प्रेमाच्या आठवणी स्मरत नाहीत. ती
वळूनही मागे पाहत नाही. तिच्या नजरेमध्ये सुंदरतेच्या खुणा उमटत नाहीत. तिच्या डोळ्यांत प्रेमाची आश्वासक चमक का नाही? हे सांगताना
कवीने 'डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा' ही तरल प्रतिमा वापरली आहे. पारा जसा चिमटीत ठरत नाही, पटकन निसटू न जातो. डाळिंबांच्या
दाण्यातला पांढरा गर चकाकत राहतो. तसे तिच्या डोळ्यांतील प्रेम तरळते व नाहीसे होते.
प्रेयसीच्या नजरेतील चंचलतेसाठी एक वेगळी, अनोखी व तरल प्रतिमा कवीने सार्थपणे या ओळीत योजिली आहे.
(२) 'जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा' या ओळींमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : कवी बा. सी. मर्डेकर यांनी 'दवांत आलीस भल्या पहाटी' या कवितेमध्ये स्वप्नवत येणारी प्रेयसी व गूढपणे तिचे निघून जाणे यांतील
कातरता व व्याकु ळता सहज पण तरल, संवेदनशील प्रतिमांमधून व्यक्त के ली आहे.
पहाटेच्या वेळी शुक्र ताऱ्याच्या तेजाने आसमंत उजळावा तशी आलेली प्रेयसी तरल पावलांमधील शोभा फु लवीत जवळून गेल्याचा भास होतो.
गतकाळातील प्रेमभाव तिच्या डोळ्यांत दिसत नाही. कोमल, ओल्या आठवणी तिला स्मरत नाहीत. तळहातावरील रेषा वाचता येत नाहीत. तिचा
सारा अनोळखी भाव कवीला व्याकू ळ करतो. पहाटेच्या विरळ व धूसर ढगांच्या शोभेत आलेली प्रेयसी जाताना मात्र तिच्या प्रेमाचा गंध मागे दरवळत
ठेवून निघून जाते.
अभ्रांच्या शोभेत प्रियेचे येणे व निघून जाणाऱ्या मंद पावलांमधला गंध मागे उरणे, यांतील हृदयस्थ कातर करणारा भाव कवीने उत्कटपणे व्यक्त के ला
आहे.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
• प्रस्तुत प्रेमकवितेचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.
उत्तर : बा. सी. मर्टेकर यांच्या बहुतांश कविता मानवी जीवनातील नगण्यता व वैफल्यग्रस्तता चितारीत करणाऱ्या आहेत. त्या भावोत्कट आहेतच
पण चिंतनशीलता हा त्यांचा स्थायीभाव आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत ‘दवांत आलीस भल्या पहाटी' ही कविता वेगळी ठरते.
प्रेमभावनेने ओथंबलेली ही कविता त्यातील व्याकू ळतेमुळे मनाला भिडते. प्रेयसीचे येणे व जाणे हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे, हा संभ्रम कवितेच्या
प्रत्येक कडव्यात तरळत राहतो. गतकाळातील प्रेमाची तिला विस्मृती झाली आहे की काय? प्रेमीजीवनात विरह प्रबळ ठरतो का? प्राक्तनाच्या रेषा
चुकीच्या असतात का? नजरेतील प्रेमभाव हरवून आठवणी बुजून जातात का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न या कवितेत निर्माण होतात व
प्रेमीजीवनातील हतबलता प्रकर्षाने काळजाला पोखरत नेते. शेवटी स्मरणगंध उराशी जपावा हेच कवीचे भागधेय (नशीब) ठरते.
समकालीन प्रेमकवितेतील आनंददायी उत्कट आविष्कार, प्रस्तुत कवितेत दिसून येत नाही. प्रेमभावनेचा वेगळा दृष्टिकोन या कवितेत प्रत्ययास येत
असल्यामुळे ही प्रेमकविता वेगळी व अनोखी ठरली आहे.
रसग्रहण
• 'दवांत आलीस भल्या पहाटी' या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर : प्रेयसीचे आगमन व निर्गमन हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत , आहे, याचे व तिच्या सौंदर्याच्या विभ्रमांचे भावोत्कट आलेखन करणे ही 'दवांत
आलीस भल्या पहाटी' या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. प्रेयसीच्या भेटीची आतुरता व त्यातील कातर व्याकू ळता हा या प्रेमकवितेचा स्थायिभाव
आहे.
शुक्राच्या तेजस्वी आभेमध्ये तोऱ्यात येणारी प्रेयसी विरळ, धूसर अभ्रांच्या शोभेत स्मरणगंध मागे ठेवून निघून जाते. या दरम्यानची मानसिक घालमेल
कवीने उत्कट व अनोख्या प्रतिमांमधून साकार के ली आहे. अनेक गूढरम्य भावनांचे जाळे या कवितेत कवीने विणले आहे. समकालीन प्रेमकवितेत
आढळून न येणाऱ्या वेगळ्या भावरम्य प्रतिमा कवीने या कवितेत मांडल्या आहेत. 'प्रेमभावनेचे हिरवे धागे', 'डोळ्यांमधील डाळिंबांचा पारा',
'आठवणींची रांग', 'तांबुस नखांवरील शुभ्र चांदण्या', 'पावलांचा गंध' इत्यादी भावगर्भ प्रतिमांतून प्रेमभावनेतील व्याकू ळता प्रत्ययकारी रीतीने प्रकट
झाली आहे. रसिकाला खिळवून ठेवणारी ही प्रतिसृष्टी के वळ अनोखी आहे.
प्रेमात बुडू न गेलेल्या जिवासाठी प्रेयसीचे अनोळखी वर्तन हृदयाला पीळ पाडणारे आहे. तसेच प्रेमातील हेच भागधेय आहे की काय? प्रेमाची परिणती
विरहात होते का? के वळ उराशी स्मृती व प्रेमगंध जपणे हीच प्रेमाची अपरिहार्यता असते का? इत्यादी चिंतनशील आशय या कवितेतून दृग्गोचर होत
राहतो.
अनुष्टु भ' छंदात बांधलेली ही यमकप्रधान रचना तिचा अंतर्गत नाद व लय यांमुळे रसिकाच्या ओठांत गुणगुणत राहते. त्यामुळे प्रेमातील कातरता
अधोरेखित करणारी ही बा. सी. मकर यांची अनोखी प्रेमकविता मला अत्यंत प्रिय आहे.

व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
पुढील ओळींमधली शब्दशक्ती ओळखा :
(१) डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कै सा पारा! →\rightarrow
व्यंजना
(२) दवांत आलीस भल्या पहाटे
अभ्रांच्या शोभेत एकदा →\rightarrow
अभिधा
२. काव्यगुण :
पुढील ओळींतील काव्यगुण ओळखा :
(१) अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस;
-मागे →\rightarrow
प्रसाद
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?
(२) अनोळख्याने ओळख कै शी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणीची
माधुर्य एथल्याच जर बुजली रांग! →\rightarrow
माधुर्य
३. शब्दभेद :
• पुढील तक्ता पूर्ण करा : (लेखनातील सूक्ष्म बदल व अर्थबदल)

शब्द अर्थ वाक्ये

(१) रांग ओळ मुलांनो, रांगेत चला.


राग क्रोध रमेशला जगनचा राग आला.

(२) लक्ष अवधान मुलांनो, इकडे लक्ष द्या.


लक्ष्य ध्येय डॉक्टर होणे हे माझे लक्ष्य आहे.

आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती


१. शब्दसंपत्ती :
(१) विरुद्धार्थी शब्द लिहा :
पुढे ×\times
___
सुंदर ×\times
___
ओळख ×\times
___
आठवण ×\times
___
कोमल ×\times
___
मंद ×\times
___
सुगंध ×\times
___
निर्मल ×\times
___
उत्तरे :
पुढे ×\times
मागे
सुंदर ×\times
कु रूप
ओळख ×\times
अनोळख
आठवण ×\times
विस्मरण
कोमल ×\times
राठ
मंद ×\times
जलद
सुगंध ×\times
दुर्गंध
निर्मल ×\times
घाणेरडे
(२) जसे →\mathbf{\rightarrow}
निः +\mathbf{+}
मल =\mathbf{=}
निर्मल; तसे →\mathbf{\rightarrow}
चार शब्द लिहा.
उत्तर : (१) निष्फळ (२) निर्बल (३) निर्दल (४) निष्काम.
(३) विशेषणे-विशेष्ये जोड्या लावा :
विशेषणे – कोमल, हिरवे, शुभ्र, मंद
विशेष्ये – धागे, आठवणी, पावले, चांदण्या
उत्तरे : (१) कोमल - आठवणी
(२) हिरवे - धागे
(३) शुभ्र – चांदण्या
(४) मंद - पावले
(४) 'गत' उपसर्ग असलेले दोन शब्द लिहा.
उत्तर : (१) गतजन्म (२) गतवैभव
(५) समानार्थी शब्द लिहा :
तोरा ==
___
हिरवा ==
___
रेषा ==
___
अभ्र ==
___
हात ==
___
ओळख ==
___
उत्तरे :
तोरा ==
ऐट
हिरवा ==
हरित
रेषा ==
रेघ
अभ्र ==
ढग
हात ==
हस्त
ओळख ==
परिचय

२. लेखननियम :
• पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा :
डाळींब -___
वीसरलिस -___
ताबूंस -___
नीमल -___
उत्तरे :
डाळींब - डाळिंब
वीसरलिस - विसरलीस
ताबूस – तांबुस
नीमल - निर्मल
३. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Journal - नियतकालिक
(२) Draft - मसुदा
(3) Foundation - प्रतिष्ठान
(४) Pedestrian - पादचारी
(५) Terminology - परिभाषा
(६) Verification - पडताळणी
(७) Symposium - परिसंवाद
(८) Xerox - नक्कल प्रत, छायाप्रत.
भाग - २ : गद्य व पद्य
७. 'माणूस' बांधूया!
- प्रवीण दवणे
लेखक परिचय
प्रवीण दवणे
प्रवीण दवणे हे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक आणि लोकप्रिय लेखक, कवी, गीतकार, पटकथालेखक, वक्ते म्हणून परिचित.
ग्रंथसंपदा
१. 'थेंबातलं आभाळ', 'अत्तराचे दिवस', 'सावर रे', 'गाणारे क्षण', 'मनातल्या घरात', 'हे जीवना' हे ललित लेखसंग्रह.
२. 'रंगमेघ', 'गंधखुणा', 'आर्ताचे लेणे', 'ध्यानस्थ', 'भूमीचे मार्दव' हे कवितासंग्रह.
३. 'प्रश्नपर्व' हा वैचारिक लेखसंग्रह.
४. 'दिलखुलास', 'थेंबातले आभाळ', 'सावर रे', 'लेखनाची आनंद्यात्रा', 'वय वादळ विजांचं' हे त्यांचे गाजलेले कार्यक्रम.

पाठ परिचय
'प्रश्नपर्व' या वैचारिक लेखसंग्रहातून हा पाठ घेतलेला आहे.
सध्याचे वातावरण हे आत्यंतिक उपयुक्ततावादी बनले आहे. आज भावनांना किं मत राहिलेली नाही. पैसा मिळवणे एवढा एकच हेतू मानवी जीवनाला
लाभला आहे. खरे पाहता माणसांमधील नाती ही आंतरिक जिव्हाळ्याने बांधलेली असली पाहिजेत. इतर प्राणी व माणूस यांच्यात हाच महत्त्वाचा
फरक आहे. सध्या माणसांच्या नात्यातला भावनांचा हळुवारपणा हरवला आहे. माणसांमधला नष्ट झालेला संवाद हेच यामागील कारण होय.
माणसांमध्ये भावपूर्ण, हृदय नाते आपण निर्माण करू शकलो नाही, तर सर्व माणसांना मानसिक आजारांनी ग्रासले जाईल. त्याबद्दलची खंत लेखक
या पाठात मांडत आहेत.

शब्दार्थ
मिथ्या – खोटे, असत्य, अवास्तव, भासमय. आरपार - वस्तूमधून वस्तूच्या पल्याड (पाहणे). आंतरिक दारिद्र्य - मनाचे दारिद्र्य. मार्के टिंग -
एखाद्या वस्तूला बाजारात विक्रीयोग्य बनवण्यासाठी के लेला यशस्वी प्रचार. खिन्न - दुःखी, कष्टी. क्रं दन - रडू , आक्रोश. पोटार्थी – पोटासाठी
जगणारे. आटापिटा - खूप कष्टपूर्वक के लेला प्रयत्न. यंत्रसंवाद - यंत्राच्या साहाय्याने साधलेला संवाद. अंमळ - अल्पसा वेळ. उमाळा - भावनेचा
कढ, तीव्र इच्छा. मनोरुग्णता - मानसिक आजार. झडझडू न - झटकन, लवकर, सर्व काही झिडकारून पटकन.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) भुईसपाट होणे : पूर्णपणे उद्ध्वस्त होणे.
(२) मन कातर होणे : भयभीत होणे.
(३) एकाकी पाडणे : आधार असलेले नातेसंबंध तोडणे.
(४) जागे होणे : वास्तवाची जाणीव होणे.

कृ ति-स्वाध्याय आणि उत्तरे


उतारा क्र. १
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कृ ती करा :
(१) बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानांवर पडणारी वाक्ये
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) 'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) परिणाम लिहा :
(१) कु टुंबाचा आर्थिक हव्यास वाढला.
(२) माणसा-माणसांतील संवाद हरवला.
(३) पाठाच्या आधारे कारणे लिहा :
(१) सत्तरपंच्याहत्तरीची मनं कातर झाली; कारण ___
(२) संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले; कारण ___
(४) पाठात आलेल्या शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा :
(१) आंतरिक दारिद्रय
(२) वात्सल्याचे उबदार घर
(३) धावणारी तरुण चाकं , थरथरणारे म्हातारे पाय
(४) संवेदनांचे निरोप समारंभ
उतारा क्र. १ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २९ व ३०)
न बोलताही संवाद ___ ___ ___ नसेल तर तो गोंगाटच!'
उत्तरे
(१) (१) बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानांवर पडणारी वाक्ये
(i) फी भरायला पैसे हवेत.
(ii) पुष्कळ दिवसांत चायनीज खाल्लं नाही.
(iii) गधड्या, इतके पैसे ओतलेत तरीही एटीनाईनच पर्सेट?
(iv) न्यूयॉर्क ची सीडी आणायचीय.
(२) 'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप
(i) शिक्षण पैशासाठीच होते.
(ii) सजणे-धजणे, प्रेम, कलानिर्मिती, श्रद्धा, भक्ती, मंदिरे यांची दुकाने होतात.
(iii) दुकानातली भाषा खरेदी-विक्रीची असते.
(iv) तिथे 'संवाद' नसतो.
(२) (१) कु टुंबाचा आर्थिक हव्यास वाढला- वात्सल्याचे उबदार घर झाले.
(२) माणसा-माणसांतील संवाद हरवला- ज्या पिढीने उत्कट नात्यांचे दुथडी भरलेले काठ अनुभवले, ती पिढी काठावरच फे कली गेली.
(३) (१) सत्तरपंच्याहत्तरीची मनं कातर झाली; कारण – समाजाची पडझड आणखी किती खाली खाली जाणार या विचाराचा भुंगा त्यांचे मन
पोखरत आहे.
(२) संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले; कारण - संवेदनांचे आदान-प्रदान करणारे संवादच नाहीसे होऊ लागले.
(४) (१) आंतरिक दारिद्र्य : मनाचे दारिद्र्य, आत्म्याचे दारिद्र्य. .
(२) वात्सल्याचे उबदार घर : आई-वडील आणि मुले यांच्यात असलेले प्रेमाचे नाते.
(३) धावणारी तरुण चाकं , थरथरणारे म्हातारे पाय : पैसे कमावण्याच्या मागे सुसाट चाललेले तरुण आणि त्यांचा आधार, त्यांचे प्रेम मिळत
नसल्यामुळे त्यांचे आई-वडील म्हणजेच अशी सगळी म्हातारी माणसे हतबल झालेली आहेत.
(४) संवेदनांचे निरोप समारंभ : संवेदनांचा त्याग के ला जात असल्याचे प्रसंग.
कृ ती २ : (स्वमत)
'पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे,' हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : मी आता अकरावीत आहे. जेथे जातो तिथे बारावीनंतर काय करणार? इंजिनीअर व्हायचंय की डॉक्टर व्हायचंय, हे प्रश्न पुढे येतात आणि
मग चर्चा सुरू होते. कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला की नंतर काय काय घडते, कु ठे नोकरी मिळते, कितीचे पॅके ज मिळते वगैरे . मुद्द्यांपर्यंत
चर्चा रंगते.
अनेकदा मलाही या चर्चेत आनंद मिळायचा. वाटायचे की, खूप खूप शिके न. मग काय अन्वयदादासारखा इंजिनीअर होईन. मोठा पगार मिळेल!
त्याच्यासारखी बाईक घेईन! विचार करता करता माझ्या डोळ्यांसमोर आजूबाजूचे नोकरी करू लागलेले चेहरे येऊ लागले आणि मला वेगळेच जाणवू
लागले.
अन्वयदादा सकाळी साडेसात वाजता घर सोडतो आणि रात्री साडेआठ-नऊ वाजता घरी येतो. आल्यानंतर पूर्ण थकू न गेलेला असतो. जेवण झाले
की लॅपटॉप काढतो. तास-दीड तास ऑफिसचे काम करतो आणि झोपी जातो. हेच अभिषेकचेही चालू आहे. तो तर कधी कधी उशीर झाल्यावर
ऑफिसमध्येच राहतो. विकासला नोकरी लागली, तीच बंगलोरच्या ऑफिसमध्ये. जवळजवळ सगळ्यांचीच ही गत झाली आहे. कोणालाही इतरांकडे
जाण्यासाठी वेळ नाही. बोलण्यासाठी वेळ नाही. समोरासमोर दिसल्यावर एकमेकाला फक्त 'हाय' करतात ; बाकी संवाद नाही. हे घरातही कोणाशी
बोलत नाहीत. यांना कामाचा ताण असणार, त्यांना अधिक त्रास व्हायला नको, म्हणून मग घरातले लोक त्यांना प्रश्न विचारत नाहीत. प्रत्येक घरात
आपापसांत फक्त शांतता आहे.
मला कधी कधी वाटते की, खूप अभ्यास करायचा, खूप शिकायचे ते यासाठीच का? जगायचे म्हणजे नेमके काय करायचे? फक्त पैसा मिळवायचा?
तो कशासाठी? कारण पैसा मिळवल्यानंतरसुद्धा माझ्या आजूबाजूचे लोक दुःखी कसे दिसतात? आपण लक्षात घेतले पाहिजे की, पैसा हे फक्त
साधन आहे. म्हणून ठरावीक टप्प्यानंतर पैशाची किं मत शून्य होते. आता आपला दृष्टिकोन बदलण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
'इथे माणूस 'दिसत' होता, पण 'जाणवत' नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती,' या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर : जागतिकीकरणाचे अनेक परिणाम घडत आहेत. त्यांतला एक परिणाम म्हणजे पराकोटीची स्पर्धा. माणसाला पैसा मिळवण्यासाठी जीवघेण्या
स्पर्धेत उतरावे लागत आहे. त्यातूनच, पैसा हेच एकमेव साध्य पैशाने मापल्या जाऊ लागल्या. पैशासाठी सगळ्या गोष्टी वापरल्या जाऊ लागल्या.
किं बहुना, पैसा मिळवणे हाच सर्व गोष्टींचा हेतू निश्चित होऊ लागला. हेसुद्धा इतके भरभर आणि धबधब्याप्रमाणे इतक्या जोराने येऊन आदळले की,
माणसांना विचार करायचीसुद्धा संधी मिळाली नाही.
शिक्षण हे आपल्याकडे अत्यंत पवित्र क्षेत्र मानले जात होते. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जे देते ते शिक्षण, अशी आपली समजूत होती. शिक्षणाचा हा
उदात्त हेतू संपुष्टात आला. शिक्षण हेसुद्धा पैशासाठी घ्यायचे असते, पैशाच्या साहाय्यानेच घ्यायचे असते, ही धारणा घट्ट झाली. शिक्षणाला बाजारी
रूप आले.
याचा सर्वव्यापी परिणाम घडू न आला. घर, आईवडील, माणसे यांच्यामधली नातीसुद्धा उपयुक्ततेच्या पातळीवर आली. जे उपयुक्त ते आणि तेवढेच
चांगले होय, हा दृष्टिकोन निर्माण झाला. घरांच्या ठिकाणी चकचकीत फ्लॅ ट आले. माणसामाणसांमधील मानवी संबंध नष्ट झाले. आईवडिलांनी
स्वत:चे सर्वस्व ओतून मुलांना वाढवले. पण त्याबद्दलची कोणतीही जाणीव मुलांमध्ये शिल्लक राहिली नाही. स्पर्धेने त्यांना इतके करकचून आवळून
टाकले की, ते आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांनासुद्धा वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्याशी आपुलकीने दोन शब्द बोलणेही अवघड झाले. यातून
पराकोटीची औपचारिकता आली. कृ त्रिमता निर्माण झाली. माणसे यांत्रिकपणे वावरू लागली. म्हणूनच लेखक म्हणतात की, माणूस ‘दिसतो' पण
'जाणवत' नाही. ओठ हलताना दिसतात, पण साद पोहोचत नाही.
उतारा क्र.२
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कृ ती करा :
(१) नवनिर्मितीच्या प्रेरणेची कार्ये
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) बिनचेहऱ्याची बडबड
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) परिणाम लिहा :
(१) माणसं बिनचेहऱ्याने बडबडत राहिली.
(२) नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली.
(३) पाठाच्या आधारे कारणे लिहा :
(१) यंत्रसंवाद करून चालणार नाही; कारण -
(२) मनासंबंधीचे प्रश्न धनाने सोडवता येणार नाहीत; कारण –
(४) पाठात आलेल्या शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा :
(१) बटनांचा खेळ
(२) रात्रीचा घट्ट दगड
(३) संवादशून्य एकाकीपण
उतारा क्र. २ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३०)
कृ त्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा ___ ___ ___ संवादातील जिव्हाळ्याने!
उत्तरे
(१) (१) नवनिर्मितीच्या प्रेरणेची कार्ये
(i) विचार करायला लावणे.
(ii) भूतकाळाशी धागा जोडणे.
(iii) भविष्याचे स्वप्न रंगवणे.
(iv) निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतणे.
(२) बिनचेहऱ्याची बडबड
(i) ई-मेल
(ii) चॅटिंग
(iii) एसएमएस
(iv) फोनवरून बोलणे
(२) (१) माणसं बिनचेहऱ्याने बडबडत राहिली - या बडबडीने सोबत मिळत नाही. फक्त एकाकीपण वाट्याला येते.
(२) नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली – मानसिक आजारांचे प्रश्न निर्माण झाले आणि ते पैशाने सोडवणे अशक्य
झाले.
(३) (१) यंत्रसंवाद करून चालणार नाही; कारण - यंत्रसंवादामुळे विनाश हाच विकास असा नियम निर्माण होईल.
(२) मनासंबंधीचे प्रश्न धनाने सोडवता येणार नाहीत; कारण - मनाचे प्रश्न माणूसपणाशी संबंधित आहेत. आणि माणूसपण पैशाने निर्माण करता
येत नाही.
(४) (१) बटनांचा खेळ : ई-मेल, चॅटिंग, एसएमएस ही साधने भावना निर्माण करू शकत नाहीत. म्हणून ई-मेल इत्यादींमार्फ त साधलेला संवाद
हा के वळ बटनांचा खेळ ठरतो.
(२) रात्रीचा घट्ट दगड : रात्रीच्या वेळी दाटू न येणारा एकाकीपणा.
(३) संवादशून्य एकाकीपण : माणसामाणसांमध्ये भावनाविहीन संबंध निर्माण झाल्यामुळे येणारे एकाकीपण.
कृ ती २ : (स्वमत)
• 'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर : जागतिकीकरणाच्या परिणामामुळे मानवी जीवनाच्या कें द्रस्थानी असलेला माणूस तिथून परिघावर फे कला गेला आहे. आता पैसा आणि पैशाने
मिळणारी सगळी सुखे जीवनाच्या कें द्रस्थानी आली आहेत. पैसा मिळाला की माणूस सुखी होतो. पैशामध्येच सगळी सुखे दडलेली आहेत. त्यामुळे
पैसा मिळवणे हेच सर्वोच्च ध्येय बनले आहे. माया, प्रेम, वात्सल्य या भावनांना आता स्थान राहिले नाही.
या परिस्थितीमुळे मानवी जीवनाला कोरडेपणा आला आहे. संवेदनशीलता संपली आहे. के वळ औपचारिकपणा, कृ त्रिमपणा यांनी भावनांची जागा
घेतली आहे. हे आता सर्वच क्षेत्रांत दिसू लागले आहे. यामुळे मानवी जीवनातला जिवंतपणा संपला आहे. ओलावा नाहीसा झाला आहे. माणसाचे
खरे जीवन हे या भावनेच्या ओलाव्यात असते. तेच संपले तर मग तो माणसाचा अंत ठरेल. माणूस पशुपातळीवर येईल.
याचे भीषण परिणाम वैयक्तिक जीवनावर, कौटुंबिक जीवनावर होत आहेत. सर्वत्र उपयुक्तता भरली आहे. जे जे उपयुक्त ते ते चांगले, सर्वश्रेष्ठ होय,
हीच आता सर्वांची धारणा झाली आहे. घरातली नाती संपली. वदध माणसे निरुपयोगी ठरली. तरुण आणि वदध एकमेकांना दुरावले. वृद्धांचा
आधार गेला. भावनिक आधारही उरला नाही. याचा कु टुंबसंस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. बालकांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे.
बालकांच्या गरजा फक्त पैशाने भागवल्या की कार्य संपले असे तरुणांना वाटू लागले आहे. आता मुलांना आई-बाबांचा उबदार स्पर्श मिळेनासा झाला
आहे. या परिस्थितीतून जी माणसे तयार होतील, ती माणसे नसतील. ती जनावरे असतील. आणि हा माणसाचा अंत असेल. यातून सावरायचे
असेल तर माणसांमध्ये संवाद पुन्हा प्रस्थापित व्हायला हवा. संवेदनशील संवादानेच मानवी मने पुन्हा जिवंत होतील. संवादाचे हे महत्त्व आपण
लक्षात घ्यायला हवे.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) 'नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही', लेखकांच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट
करा.
उत्तर : आमच्या शेजारी विलास नावाचा माझा एक मित्र आहे. तो इंजिनीअर झाला. त्याला इंग्रजी उत्तम येत होते. त्याला परीक्षा संपताच ताबडतोब
नोकरी मिळाली. पगारपण तुलनेने चांगला होता. त्याला ऑफिसला नेण्यासाठी रोज गाडी यायची आणि गाडीतून त्याला घरी पोहोचवले जायचे.
घरचे सगळे खूश होते. स्वतः विलाससुद्धा खूश होता. कमतरता फक्त एकाच गोष्टीची होती. त्याची नोकरी रात्रपाळीची होती. सुरुवातीला काही
दिवस आनंदात गेले. पण थोड्याच दिवसांत परिणाम दिसू लागले. तो दिवसभर झोपून राहू लागला. त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला. उठला की
कं टाळलेल्या, दुर्मुखलेल्या अवस्थेत नुसता बसून राहायचा. कोणत्याही प्रकारचे चैतन्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसेनासे झाले. त्यात आणखी एक
वेगळीच भर पडली. ऑफिसात रात्रीच्या पार्टी होऊ लागल्या. त्यामुळे त्याला दारू-सिगरेटचे व्यसन जडले. आईवडिलांच्या तोंडचे पाणीच पळाले.
नवीन प्रकारच्या कार्यालयीन सवयीने एक वेगळी जीवनशैली घडत होती. त्या वेगळ्या
जीवनशैलीचा एक नमुना झाला. असे विविध नमुने आजूबाजूला दिसत आहेत. आणि शेकडो तरुण या नव्या जीवनशैलीला बळी पडत आहेत. हे
चित्र निराशाजनक आणि अतिशयोक्तिपूर्ण वाटणे शक्य आहे. पण हे एका तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या अनुभवातून मांडलेले चित्र आहे.
अशी भीषण परिस्थिती पाहिली की वाटते आपण नेमके काय कमावले? हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. त्याचे अनेक फायदे असतील. नव्हे
आहेतच. पण दुसऱ्या बाजूने घडत असलेली ही पडझड संपूर्ण माणुसकीलाच नष्ट करणारी आहे. नव्या परिस्थितीतून एक वेगळीच मूल्यव्यवस्था
निर्माण होत आहे. यात के वळ पैशाला प्राधान्य आहे. पैसा श्रेष्ठ आहे. पैशानेच सर्व काही मिळते. पैसा नसेल तर आपण शून्य आहोत. या त-हेची
विचारसरणी आता सार्वत्रिक होत आहे.
माणसामाणसांमध्ये भावनांचे हृदय स्वरूप आता दिसेनासे होऊ लागले आहे. शेजारीपाजारी, मित्रमंडळी यांच्यातील नाते आता उपयोगापुरते शिल्लक
राहिले आहे. एक विचित्र गोष्ट घडत आहे. इथे . नोकरी करणाऱ्यांना नोकरी सोडण्याचे एवढे स्वातंत्र्य आहे की, वर्षभरात तरुण भराभर नोकरी
सोडतात. या परिस्थितीमुळे आपले काम, आपली कं पनी, आपली संस्था यांच्याबद्दल कोणतीही निष्ठा शिल्लक राहिलेली नाही. कोणत्याही मूल्यावर
निष्ठा राहिलेली नाही. माणसावर निष्ठा राहिलेली नाही. व्यवस्थेवरसुद्धा निष्ठा राहिलेली नाही. माणूस पालापाचोळ्यासारखा भिरभिरत आहे.
हे मानवी जीवन नव्हे. हा मानवी जीवनाचा -हास आहे. यातून निर्माण झालेल्या ताणांमुळे मानसिक आजार जडत आहेत. अखंड पिढीच्या पिढी जर
अशी आजारग्रस्त झाली तर भीषण अवस्था निर्माण होईल. म्हणून नव्या जीवनशैलीत काहीतरी बदल करणे आवश्यक आहे.
(२) संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे भाकीतं तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तर : संवादाचा अभाव निर्माण झाल्यामुळे मानवी समाज ज्या स्थितीकडे वाटचाल करीत आहे, त्या स्थितीचे विदारक चित्र लेखकांनी येथे सूचित
के ले आहे.
पोटासाठी माणसांना वणवण हिंडावे लागते, हे सत्य आहे. पण यातून निर्माण होऊ घातलेली परिस्थिती भीषण आहे. खूप शिकल्यावर माणूस
भव्यदिव्य स्वप्ने घेऊन देशांतर करतो. तो देश, तो परिसर, तिकडची जीवनशैली त्याला आवडतेसुद्धा. पण स्वतःची माणसे, स्वतःचा समाज
आणि स्वतःचा देश यांच्या आठवणींनी त्याचे मन पोखरले जाते. काही काळ ही माणसे कु ढत राहतात आणि हळूहळू आपल्या माणसांना दुरावतात.
एखादे वडील आठ-आठ, दहा-दहा महिने दौऱ्यावर असतात. आई कामावर जाते. मुले एकाकी वाढतात. काहींची फारच दुर्दैवी स्थिती असते.
नवरा एका देशात. बायको एका देशात. वर्षातून एक-दोनदा भेटतात. मूल एक तर आईकडे किं वा वडिलांकडे. किं वा भारतात आजी आजोबांकडे.
कशी जगत असतील ही माणसे? पण हे घडू लागले आहे. जीवघेण्या स्पर्धेत माणसे इतस्ततः फे कली जात आहेत.
या एकटेपणातून, एकाकीपणातून अनेकांना मानसिक आजार जडत आहेत. आत्ता आत्ता परिस्थिती अशी आहे की काही मुले एकल पालकांकडे
राहतात. म्हणजे एक तर आईकडे किं वा वडिलांकडे. यापुढे स्थिती अशी दिसत आहे की कु टुंबच मुळी एका माणसाचे बनणार आहे. ही
मानवजातीच्या अंताची धोकादायक घंटा आहे. संवादाच्या अभावामुळे ही अशी भयावह परिस्थिती येऊ घातली आहे.

व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) घर, शाळा, मंदिरे म्हणजे समाजाची आशास्थाने होती. - लक्षणा
(२) 'विनाश हाच विकास' हा नव्या जगाचा मंत्र होईल. - व्यंजना
(३) आत्म्याची साद असते, तोच संवाद! - अभिधा
(४) संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे. - लक्षणा
२. वाक्यसंश्लेषण :
• पुढील वाक्ये कं सांतील सूचनांनुसार बदला :
(१) आई कामावरून घरी येते. सिरियल बघण्यात मग्न होते.
(के वल वाक्य करा.)
(२) काही प्रश्न असे आहेत. धनाने सोडवता येणार नाहीत..
(मिश्र वाक्य करा.)
(३) नवनिर्मितीची प्रेरणा भूतकाळाशी धागा जोडते. ती भविष्यकाळाची स्वप्नं रंगवते.
(संयुक्त वाक्य करा.)
(४) सकाळ होते. पाय पाठीला लावून लोक पळत सुटतात.
(के वल वाक्य करा.)
उत्तरे :
(१) आई कामावरून घरी येताच सिरियल बघण्यात मग्न होते.
(२) काही प्रश्न असे आहेत, जे धनाने सोडवता येणार नाहीत.
(३) नवनिर्मितीची प्रेरणा भूतकाळाशी धागा जोडते आणि भविष्यकाळाची स्वप्नं रंगवते.
(४) सकाळ होताच पाय पाठीला लावून लोक पळत सुटतात.
३. काळ :
• पुढील वाक्ये रीती भूतकाळात लिहा :
(१) कृ त्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करतात.
(२) 'मनजागरण' करण्याचे कु णीतरी निमंत्रण देईल.
(३) माणूस भूतकाळाशी धागा जोडतो.
(४) नवनिर्मितीची प्रेरणा माणसाला विचार करायला लावते.
उत्तरे :
(१) कृ त्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करीत असत.
(२) 'मनजागरण' करण्याचे कु णीतरी निमंत्रण देत असे.
(३) माणूस भूतकाळाशी धागा जोडत असे.
(४) नवनिर्मितीची प्रेरणा माणसाला विचार करायला लावत असे.
४. शब्दभेद :
• पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
(१) काठ →\rightarrow
___, ___
(२) हवा →\rightarrow
___, ___
(३) मूल्य →\rightarrow
___, ___
(४) साथ →\rightarrow
___, ___
(५) पद →\rightarrow
___, ___
(६) माया →\rightarrow
___, ___
उत्तरे:
(१) काठ →\rightarrow
किनारा, लुगड्याचा पदर
(२) हवा →\rightarrow
वारा, क्रियापद
(३) मूल्य →\rightarrow
किं मत, तत्त्व
(४) साथ →\rightarrow
सोबत, रोगाची लागण
(५) पद →\rightarrow
पाय, हुद्दा
(६) माया →\rightarrow
प्रेम, पैसा
आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दसंपत्ती :
(१) समानार्थी शब्द लिहा : (प्रत्येकी दोन)
उत्तरे
(१) मन ==
चित्त अंत:करण
(२) मिथ्या ==
खोटे लटके
(३) आकाश ==
गगन आभाळ
(४) सूत्र ==
धागा सूत
(५) भुंगा ==
भ्रमर अली
(६) दगड ==
खडक पाषाण
(२) अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा :
(१) नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.
(२) माणसा-माणसांत संवाद हवा.
(३) मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.
उत्तरे :
(१) जुन्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत होती.
(२) माणसा-माणसांत विसंवाद नको.
(३) मनुष्य हा द्वेषाच्या आधारावर जगू शकत नाही.
(३) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) खरेदी ×\times
___
(२) अबोल ×\times
___
(३) सुख ×\times
___
(४) कृ त्रिम ×\times
___
(५) प्रगती ×\times
___
(६) लौकिक ×\times
___
(७) चिरंतन ×\times
___
(८) सत्य ×\times
___
(९) नैसर्गिक ×\times
___
उत्तरे : (१) खरेदी ×\times
विक्री
(२) अबोल ×\times
बोलका
(३) सुख ×\times
दुःख
(४) कृ त्रिम ×\times
अकृ त्रिम
(५) प्रगती ×\times
अधोगती
(६) लौकिक ×\times
अलौकिक
(७) चिरंतन ×\times
अशाश्वत
(८) सत्य ×\times
असत्य
(९) नैसर्गिक ×\times
अनैसर्गिक
(४) 'संवेदनशून्य' शब्दासारखे नकारार्थी भावदर्शक चार शब्द लिहा.
उत्तर : (१) भावशून्य (२) मूल्यहीन (३) अगतिक (४) अधिकारशून्य
(५) गटात न बसणारा शब्द शोधा : उत्तरे
(१) तो, मी, पी, हा →\rightarrow
पी
(२) खाणे, पिणे, शहाणे, जाणे →\rightarrow
शहाणे
(३) तापी, कृ ष्णा, नदी, यमुना →\rightarrow
नदी
(४) त्याला, तुला, मला, माणसाला →\rightarrow
माणसाला
(५) आनंदी, दुःखी, सौंदर्य, आळशी →\rightarrow
सौंदर्य
(६) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा : उत्तरे
(१) भुईसपाट →\rightarrow
भुई, पाट, सपाट, पास
(२) जीवनशैली →\rightarrow
जीवन, वन, नव, शैली
(७) पाठातील प्रत्येकी दोन शब्द लिहा : उत्तरे
(१) उपसर्गघटित शब्द →\rightarrow
सुसंवाद विनाश
(२) प्रत्ययघटित शब्द →\rightarrow
आंतरिक उबदार
(३) अभ्यस्त शब्द →\rightarrow
आरपार पडझड
२. विरामचिन्हे :
• पुढील वाक्यांत योग्य जागी योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
(१) घर शाळा मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती पण या काळात घर म्हणजे फक्त निवारा
(२) हे काय घडतंय माणसं असं का वागताहेत
उत्तरे : (१) घर, शाळा, मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती;
पण या काळात घर म्हणजे फक्त निवारा!
(२) हे काय घडतंय? माणसं असं का वागताहेत?
३. लेखननियम :
(१) अचूक शब्द निवडा :
(१) दारीद्रय/दारीद्र/दारिद्र्य/दरिद्र्य - दारिद्रय
(२) निष्कर्ष/नीष्कर्ष/निष्र्कष/नीश्कर्ष -निष्कर्ष
(३) उदेश/उद्देश/ऊद्देश/उद्देष - उद्देश
(४) नेसर्गीक/नैसर्गीक/नैशर्गिक नैसर्गिक - नैसर्गिक
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(१) संवेदनांचे नीरोप समारंभ साजरे होऊ लागले.
(२) हीच दूकानाची लागण बाहेरुन आत सरकली.
(३) संवाद हा माणुसपणाचा पायाभुत धर्म आहे.
(४) वीनाश हाच वीकास हा नव्या जगाचा मंत्र होईल.
उत्तरे : (१) संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले.
(२) हीच दुकानाची लागण बाहेरून आत सरकली.
(३) संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे.
(४) विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल.
४. वाक्प्रचार व म्हणी :
(१) पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :
(१) मन कातर होणे
(२) काळजात क्रं दन होणे.
उत्तरे : (१) मन कातर होणे - मन बेचैन होणे.
वाक्य : पुरात सदाशिवचे घर वाहून गेले हे कळताच माझे मन कातर झाले.
(२) काळजात क्रं दन होणे - हृदयात आक्रोश दाटणे.
वाक्य : दुष्काळाने गावाची वाताहत होते तेव्हा काळजात क्रं दन होते.
(२) पुढील म्हणी पूर्ण करा :
(१) नाचता येईना ___
(२) गरज सरो नि ___
(३) उथळ पाण्याला ___
(४) बुडत्याला ___
उत्तरे :
(१) नाचता येईना अंगण वाकडे.
(२) गरज सरो नि वैद्य मरो.
(३) उथळ पाण्याला खळखळाट फार.
(४) बुडत्याला काडीचा आधार.
५. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Academics - विद्याभ्यास
(२) Commissioner - आयुक्त
(३) Incentive -प्रोत्साहनपर
(४) Kindergarten - बालकमंदिर
(५) Waiting list - प्रतीक्षासूची
(६) Upgradation - उन्नयन
(७) Organic Farming - सेंद्रिय शेती
(८) Nervous System - चेतासंस्था
प्रकल्प
• लेखकाने पाठात व्यक्त के लेल्या संवादाचे बदलते स्वरूप समजून घेऊन, तुमच्या परिसरातील भिन्न-भिन्न आर्थिक, शैक्षणिक स्तरांतील
किमान पाच कु टुंबांचे सर्वेक्षण करा. नोंदींसाठी मुद्दे ठरवा. त्यानुसार नोंदी करा. तुमच्या अहवालाबाबत तुमच्या मित्रांशी चर्चा करा.
त्यानुसार तुमच्या प्रकल्प अहवालात सुधारणा करून तो वर्गात वाचून दाखवा.

८. ऐसी अक्षरे रसिकें


- संत ज्ञानेश्वर
• कवींचे नाव : संत ज्ञानेश्वर (ज्ञानेश्वर विठ्ठल कु लकर्णी)
• कवींच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये : श्रेष्ठ संत, प्रज्ञावंत तत्त्वज्ञ, प्रतिभावंत कवी, जगाला पसायदानरूपी विश्वप्रार्थना देणारे, सन्मार्गाचा
संदेश देणारे संतकवी, विनयशील वृत्ती, अतुलनीय गुरुभक्ती, असीम करुणा, अजोड रसिकता, मातृहृदयी वात्सल्य, 'माउली' असा
उल्लेख के ला जातो.
• ग्रंथसंपदा : 'भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, अभंगगाथा' हे सुप्रसिद्ध ग्रंथ.
• काव्याची वैशिष्ट्ये : तत्त्वचिंतन, भक्ती व काव्य यांचा अपूर्व संगम, आत्मानुभव, साक्षात्कार, काव्यसौंदर्य, कल्पनावैभव, दृष्टान्तप्रचुरता
व रसाळपणा ही काव्याची वैशिष्ट्ये. [प्रस्तुत ओव्या → ज्ञानेश्वरी, ६ वा अध्याय, क्र. १४ ते २४]
• कवितेचा छंद : प्राचीन 'ओवी' हा लोकछंद.

कवितेची मध्यवर्ती कल्पना


अमृतापेक्षा रसाळ असलेल्या मराठी भाषेची थोरवी या ओव्यांमध्ये अनेक दृष्टान्तांतून वर्णिली आहे. मराठी शब्दसामर्थ्यावर असलेला दृढ विश्वास येथे
प्रकर्षाने व्यक्त झाला आहे. मराठी शब्दसौंदर्याचे गुणगान के ले आहे. शब्दकळेला सूर्याची उपमा दिली आहे.

शब्दार्थ
ऐसी - अशी. रसिकें - रसाळ. बोलु - बोल, शब्द. परि - परंतु, पण. पैजा - शर्यत, होड, स्पर्धा. मेळवीन - निर्माण करीन. कोवळिके -
कोमलता, मार्दव. जिये - जिच्या. पांडे - पुढे. नादींचे - संगीताचे, नादाचे. वेधे - वेधणे. परिमळ - सुगंध. बीक मोडे - बळ मोडते, गर्व नाहीसा
होतो. जयाचेनि - जिच्यामुळे. लोभा - मोहाने. श्रवण - कान. इंद्रियां - अवयवांत. कळंभा - भांडण, कलह. विषो - विषय. रसना - जीभ.
घ्राण - नाक. भावो - भावना. जाय - जातो. देखता - बघता. धणी – तृप्ती. खाण - भांडार, साठा, संग्रह. रूपाची - सौंदर्याची. पद - शब्द.
उभारे - उभारतो, वर येतो. भुजा - हात, बाहू. आविष्करें - तयार होतात, सरसावतात. आलिंगावया - मिठी मारायला. झोंबती - बिलगतात.
सरिसेपणे - उत्तम प्रकारे, सरसपणे. बुझावी - समाधान करतो. चेववी - चेतवतो, उजळतो. सहस्रकरु - सूर्य. व्यापकपण - विस्तार,
अथांगपणा. असाधारण - असामान्य, उत्कृ ष्ट. भावज्ञां - जाणकार, ज्ञानी. फावती - भावतात, पसंत येतात. हे असोतु - हे असो, हे राहू दे.
भली - छान भरलेली. वोगरिलीं - वाढलेली. प्रतिपत्ती – मेजवानी. मियां – मी. आत्मप्रभा - स्वयंप्रकाश. नीच नवी - नित्य नवी. ठाणदिवी -
लाकडी समई. जेवी - आस्वाद घेणे. तयासीचि - त्यालाच. फावे - फावते, मिळते. पांगेंविण - अंगाशिवाय. निजांगे - स्वत:चे अंग. भोगिजे -
भोग घ्या, आत्मसात करा, आस्वादा.
टिपा
१. अमृत - अमर करणारे स्वर्गलोकीचे रसाळ पेय (काल्पनिक).
२. चिंतामणी - मनातील इच्छा पूर्ण करणारा अलौकिक मणी (काल्पनिक).
३. कै वल्यरस - पारमार्थिक सुख, आध्यात्मिक तत्त्व.
४. निष्काम - कार्याचा परिणाम किं वा मोबदला किं वा परिपाक न घेणे. नि:स्वार्थ बुद्धीने के लेले काम.
५. रेखेची वाहणी - शब्दनिर्मितीची प्रक्रिया. रेषा वाहते तसे शब्द तयार होतात.

कवितेचा भावार्थ
मराठी भाषेचा गौरव करताना व शब्दांची महती सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात
कौतुकास्पद असलेला माझा मराठीचा बोल (शब्द) अमृताशीही पैज जिंकणारा आहे. अशी रसाळ अक्षरे मी मराठीत निर्माण करीन. ।।१।।
या शब्दांची कोमलता इतकी आहे की त्यांच्यापुढे संगीताचे रंगही फिके पडतात. माझ्या शब्दांना इतका गंध आहे की त्यापुढे (फु लांच्या) सुगंधाचेही
बळ तोकडे पडते. सुगंधाचेही गर्वहरण होते.।।२।।
मराठी भाषेच्या रसाळपणाचा इतका मोह होतो की, कानांना जिभा फु टतात. श्रवणाला स्वाद येतो. शरीराचे सर्व अवयव (इंद्रिये) एकमेकांशी भांडू
लागतात. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा के वळ आपलीच आहे, असे वाटू लागते.।।३।।
खरे म्हणजे, शब्द हा श्रवणाचा (ऐकण्याचा) विषय आहे. परंतु जीभ म्हणते की, तो रस (शब्द) माझा आहे. मला आस्वादायचा आहे. नाकाला तर
शब्दांचा सुगंध येऊ लागतो. त्यामुळे नाक म्हणते शब्द हा माझा विषय आहे.।।४।।
या रेखेच्या वाहणीचे (शब्दांचे) नवल असे की हे शब्दचित्र पाहून डोळ्यांची तृप्ती होते. डोळ्यांचे पारणे फिटते. डोळे म्हणतात की आमच्यासाठीच हे
सौंदर्याचे भांडार खुले के ले आहे.।।५।।
जेव्हा संपूर्ण सार्थ शब्द उभा ठाकतो, तेव्हा मन त्याला आस्वादण्यासाठी शरीराबाहेर झेप घेते आणि हात त्याला मिठीत घ्यायला पुढे सरसावतात.
हातांना आलिंगन द्यावेसे वाटते.।।६।।
अशा प्रकारे सर्व इंद्रिये आपापल्या परीने शब्दाला बिलगतात आणि शब्दही उत्तम प्रकारे सर्व इंद्रियांचे समाधान करतो. ज्याप्रमाणे एकटा सूर्य
चराचराला उजळतो.।।७।।
त्याप्रमाणे माझ्या मराठी शब्दाचे असामान्य, अलौकिक असे व्यापकपण, विस्तार, अफाटपणा आहे. जाणकार रसिक लोकांना तर मराठी भाषा ही
हरएक इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणीसारखी भावते. पसंतीस येते.।।८।।
हे असो. तर मी या मराठी शब्दांची शिगोशीग ताटे भरली आहेत. त्यावर कै वल्यरस वाढला आहे. अशी निष्काम कर्मयोगाची मेजवानी मी तयार के ली
आहे.।।९।।
आता या नित्य नूतन आत्मप्रकाशाची समई (दीपज्योती) मी तेवत ठेवली आहे. मराठी भाषेची ही अक्षयसंपदा जो इंद्रियातीत, इंद्रियांच्या पलीकडे
जाऊन नि:संगपणे आस्वादेल, त्यालाच ती प्राप्त होईल.।।१०।।
आता श्रोतेहो एक गोष्ट करा, मी निरूपण करीत असलेली मराठी भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन मनाने आत्मरत होऊन आस्वादा. (हा
कै वलरसमोदक तुम्ही मनाने अनुभवा.)
।।११।।

कृ ति-स्वाध्याय आणि उत्तरे


प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कृ ती करा :
(१) संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची वैशिष्ट्ये
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) रसाळ बोलांचा विविध इंद्रियांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा :

इंद्रिये परिणाम

(१) कान ___

(२) जीभ ___

(३) नाक ___

(४) डोळे ___

इंद्रियेतर - ___

(१) मन ___

(२) भुजा ___

(१) कान ___

(३) 'रसाळ बोल' आणि 'सूर्य' यांच्या कार्याच्या माध्यमातून पुढील तक्ता पूर्ण करा :

रसाळ बोलांचे कार्य सूर्याचे कार्य

(१) ___ (१) ___

(२) ___ (२) ___

(४) अर्थ स्पष्ट करा :


(१) माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेही पैजा जिंके ।
(२) वेधे परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
(५) चौकटी पूर्ण करा :
(१) रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा ___
(२) रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम ___
(३) सर्व जगाला जागवणारा ___
(६) एका शब्दात लिहा :
(१) बीक मोडते →\rightarrow
___
(२) वाहणी असते →\rightarrow
___
(३) उघडलेली खाण →\rightarrow
___
(४) जगाला उजळतो →\rightarrow
___
(५) जाणकारांना गुण जाणवतात →\rightarrow
___
(६) ताटावर वाढलेला →\rightarrow
___
(७) ठाणदिवी के ली →\rightarrow
___
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिकें । मेळवीन ।। १ ।।
जिये कोंवळिके चेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे ।
वेधे परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।२।।
ऐका रसाळपणाचिया लोभा। की श्रवणींचि होति जिभा।
बोलें इंद्रियां लागे कळंभा। एकमेकां ।। ३ ।।
सहजें शब्द तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा ।
घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ।।४।।
नवल बोलतीये रेखेची वाहणी। देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी ।
ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ।।५।।
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें।
बोलु भुजाही आविष्करें। आलिंगावया ।।६।।
ऐशी इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी।
जैसा एकला जग चेववी । सहस्रकरु ।।७।।
तैसें शब्दाचे व्यापकपण । देखिजे असाधारण ।
पाहातयां भावज्ञां फावती गुण ! चिंतामणीचे ।। ८ ।।
हे असोतु या बोलांची ताटें भलीं। वरी कै वल्यरसें वोगरिलीं।
ही प्रतिपत्ति मियां के ली। निष्कामासी।।९।।
आतां आत्मप्रभा नीच नवी । तेचि करूनि ठाणदिवी। जो
इंद्रियांतें चोरूनि जेवी । तयासीचि फावे ।।१०।।
येथ श्रवणाचेनि पांगें-I वीण श्रोतयां होआवे लागे।
हे मनाचेनि निजांगें। भोगिजे गा ।। ११।।
(श्रीज्ञानेश्वरी, ६ वा अध्याय, ओवी क्र. १४ ते २४, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृ ती मंडळ प्रत)
उत्तरे
(१) संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची वैशिष्ट्ये
(१) अमृताशी पैजा जिंकणारी
(२) रसाळ
(३) कोवळिकता
(४) सुगंधित
(२)

इंद्रिये परिणाम

(१) कान जिभा होतात.

(२) जीभ आमचा रस आहे.

(३) नाक सुगंध येतो.

(४) डोळे पाहून तृप्ती लाभते.

इंद्रियेतर -

(१) मन बाहेर धावते.

(२) भुजा आलिंगन द्यायला सरसावतात.

(३)

रसाळ बोलांचे कार्य सूर्याचे कार्य

(१) व्यापकपण (१) सर्वत्र पसरतो.

(२) सर्व इंद्रियांचे उत्तम प्रकारे समाधान (२) चराचराला उजळतो.


रसाळ बोलांचे कार्य सूर्याचे कार्य

(४) (१) माझा मराठीचा बोल (शब्द) मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली, तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंके ल. कारण
अमृतापेक्षाही माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे.
(२) माझ्या मराठी शब्दांची इतकी कोमलता आहे की, त्यातून फु लासारखा सुगंध येतो. हा सुगंध असा आहे की, प्रत्यक्ष फु लातल्या सुगंधाचे बळ
त्याच्यापुढे तोकडे पडते. इतकी माझी मराठी भाषा गंधित आहे.
(५) (१) श्रवणाच्या जिभा होतात
(२) इंद्रियांत भांडण लागते
(३) सहस्त्रकर (सूर्य)
(६)(१) परिमळाचे
(२) रेखेची
(३) सहस्रकर (सूर्य)
(३) रूपाची
(४) सहस्रकर
(५) चिंतामणीचे
(६) कै वल्यरस
आत्मप्रभेची
कृ ती २ : (काव्यसौंदर्य)
• पुढील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा :
(१) ऐका रसाळपणाचिया लोभा। की श्रवणींचि होति जिभा।
बोलें इंद्रियां लागे कळंभा। एकमेकां ।।३।।
उत्तर : 'ऐसी अक्षरे रसिकें ' या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. मराठी भाषेचे सौंदर्य व गोडवा सांगताना ते
म्हणतात की मराठी भाषा ही अमृतापेक्षा गोड व मधुर आहे.
प्रस्तुत ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी भाष्य करायचे आहे. ते म्हणतात की, माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे की
तिच्या रसाळपणाच्या मोहाने कानालाही जिभा फटतात. म्हणजे कानाला ती जिभेप्रमाणे आस्वादावीशी वाटते. एवढेच नव्हे तर प्रत्येक इंद्रियाला
मराठी भाषा स्वतः आस्वादावीशी वाटते. यासाठी सर्व अवयवांमध्ये व पंचेंद्रियांमध्ये प्रेमळ भांडण जुंपले आहे. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा
आपलीशी वाटते.
प्रस्तुत ओवीमध्ये मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी पराकोटीची कल्पना करून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एकमेवाद्वितीय ठरवली आहे.
(२) "तैसें शब्दांचे व्यापकपण । देखिजे असाधारण ।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥२॥
उत्तर : संत ज्ञानेश्वर यांनी 'ऐसी अक्षरे रसिकें ' या ओव्यांमध्ये मराठी भाषेची थोरवी भावपूर्ण शब्दांत व्यक्त के ली आहे. सर्व इंद्रियांना हवीहवीशी
वाटणारी माझ्या मराठी भाषेची गोडी जाणकार रसज्ञांना कशी भावते, याचे यथोचित वर्णन उपरोक्त ओवीमध्ये त्यांनी के ले आहे.
संत ज्ञानेश्वर मराठी भाषेची महती सांगताना म्हणतात – सूर्य जसा चराचराला उजळून टाकतो तशी मराठी भाषेला बिलगणाऱ्या सर्व अवयवांना ती
उत्तम प्रकारे समाधान देते. असे मराठी शब्दांचे विस्तारलेपण, अथांगपण असामान्य असे आहे. चिंतामणी हे रत्न जसे सर्व माणसांची मनोइच्छा पूर्ण
करण्यास सक्षम आहे, तसे मराठी बोल हे सर्व रसिकज्ञांना व जाणकारांना मनोमन भावतात. भावज्ञांना मराठी भाषेत चिंतामणीचे सगुण सापडतात.
मराठी शब्दांच्या व्यापकपणाची व अर्थ सघनतेची यथोचित महती सांगताना संत ज्ञानेश्वरांचा मराठी भाषेविषयीचा दृढ व प्रगाढ आत्मविश्वास या
ओवीमध्ये प्रत्ययास येतो.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) मराठी भाषेची थोरवी तुमच्या भाषेत लिहा.
उत्तर : 'मराठी असे आमुची मायबोली.' माझी मातृभाषा 'मराठी' मराठी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिची थोरवी वर्णावी
तितकी थोडीच आहे ! मराठी भाषेच्या समृद्धीचा मी एक नम्र पाईक आहे.
संत ज्ञानेश्वरमाउली, संत तुकाराम, कवी के शवसुत, बा. सी. मर्डेकर, कु सुमाग्रज, बा. भ. बोरकर ते विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर इत्यादी
कवींनी तिला शब्दलेण्यांनी साकारलेली आहे. मराठी भाषेतील रसपूर्ण, भावपूर्ण, रसमय ललित साहित्य ही महाराष्ट्राची वाङ्मयीन पेठ आहे. संत,
पंत आणि तंत परंपरेने तिला नटवलेली आहे. इतर कलांनी तिला सजवलेली आहे. मराठीचे शब्दभांडार अभिजात आहे. मराठी बोलीभाषेचे
ठिकठिकाणच्या प्रदेशांतील झरे प्रमाण मराठीच्या नदीत मिसळन मराठी गंगा अविरत वाहते आहे व काठांवरील लोकसंस्कृ तीला जगवते आहे. मराठी
भाषेतील लोकगीते व बोधकथा ही मराठी संस्कृ तीची प्राचीन रसमय अमृताची ठेव जतन करण्याचे आमचे कर्तव्य आहे.
'माझा मराठीचा बोल
वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे
निळ्या अमृताची ओल'
या प्रा. अशोक बागवे यांनी लिहिलेल्या ओळींमधून मराठी भाषेचा सार्थ अभिमान अधोरेखित होतो.
(२) 'ऐसी अक्षरे रसिकें ' या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : (यासाठी 'कवितेचा भावार्थ' वाचा.)
रसग्रहण
• 'ऐसी अक्षरे रसिकें ' या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर : 'ऐसी अक्षरे रसिकें ' या ओव्यांमधून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे गौरवगीत गायिले आहे. मराठी भाषेचे शब्दसामर्थ्य, कोवळिकता,
रसमयता, सौंदर्यपूर्ण व भावपूर्ण अभिव्यक्ती मनोहारी दृष्टान्तातून साकार करणे, ही या रचनेची मध्यवर्ती कल्पना आहे. मराठी शब्दांचे व्यापकपण
सिद्ध करणे, हा या ओवीरचनेचा स्थायिभाव आहे.
अमृताहून गोड असलेली मराठी भाषा सर्व इंद्रियांचा आत्मीय, आस्वादक विषय ठरली आहे. ही सौंदर्याची खाण पाहताना डोळे दिपतात. सूर्याने सर्व
जग उजळावे, तशी मराठी भाषेची आत्मप्रभा अभिजात आहे. मराठी भाषा सामान्य जनांपासून जाणकार रसज्ञांपर्यंत मनाला थेट भावते. निष्काम
कर्मयोग्यांसाठी कै वल्यरसाने भरलेल्या ताटाची मेजवानी मी अर्पण के ली आहे, ती नि:संग मनाने आस्वादा, असा संदेश संत ज्ञानेश्वर रसिकांना
देतात.
संस्कृ तातील भगवद्गीतेचा मराठी भाषेत भाष्यानुवाद करताना 'ज्ञानेश्वरी'च्या सहाव्या अध्यायामध्ये प्राचीन ओवीछंदात मराठी भाषेचा सार्थ अभिमान
व्यक्त के ला आहे. प्रस्तुत ओव्यांमध्ये मराठी भाषेच्या शब्दसामर्थ्यावरचा दृढ विश्वास व्यक्त करताना येथे ज्ञानेश्वरांनी कमालीची भावोत्कटता
साकारली आहे. प्रसाद व माधुर्य हे काव्यगुण यांमध्ये प्रकर्षाने प्रकट झाले आहेत.
मराठी भाषेची ही आल्हाददायक रचना आस्वादताना आपला ऊर मराठीच्या नितांत प्रेमाने भारावून जातो, इतकी सोज्ज्वळ व रसमय अभिव्यक्ती संत
ज्ञानेश्वरमाउलींनी साकारली आहे. मराठी भाषेचे हे एक नितांत जपावे असे 'देशिकार लेणे' आहे.

व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती उत्तरे
१. शब्दशक्ती:
• पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) मराठीचे रसाळपण आस्वादताना कानाला जिभा फु टतात. →\rightarrow
व्यंजना
(२) मराठीच्या कोमलतेने सुगंधाचे गर्वहरण होते. →\rightarrow
व्यंजना
(३) मराठी भाषा म्हणजे रेखेची वाहणी! - अभिधा
२. काव्यगुण :
• पुढील ओळींमधील काव्यगुण ओळखा : उत्तरे
(१) माझा मराठाचि बोलु कौतुकें ।
परि अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिकें । मेळवीन ।। →\rightarrow
प्रसाद
(२) नवल बोलतीये रेखेची वाहणी ।
देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी।
ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ।। →\rightarrow
माधुर्य

३. शब्दभेद :
• पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
(१) पद →\rightarrow
___, ___
(२) बोल →\rightarrow
___, ___
(३) वर →\rightarrow
___, ___
(४) प्रभा →\rightarrow
___, ___
(५) कर →\rightarrow
___, ___
(६) परी →\rightarrow
___, ___
(७) रसना →\rightarrow
___, ___
उत्तरे :
(१) पद →\rightarrow
पाय, ओळ
(२) बोल →\rightarrow
शब्द, क्रियापद (बोलणे)
(३) वर →\rightarrow
नवरा, वरची बाजू
(४) प्रभा →\rightarrow
प्रकाश, मुलीचे नाव
(५) कर →\rightarrow
हात, सारा (टॅक्स)
(६) परी →\rightarrow
पण, पंख असलेली मुलगी
(७) रसना →\rightarrow
प्रभा, गोड पेय
आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दसंपत्ती :
(१) कवितेतील प्रत्येकी दोन शब्द लिहा : उत्तरे
(१) उपसर्गघटित →\rightarrow
संपूर्ण, निष्काम
(२) प्रत्ययघटित →\rightarrow
रसाळपणा, रसिक
(२) पुढील शब्दांचे एकवचन लिहा :
(१) अक्षरे - ___
(२) पैजा - ___
(३) डोळे - ___
(४) भुजा - ___
(५) इंद्रिये - ___
(६) श्रोते - ___
उत्तरे :
(१) अक्षरे - अक्षर
(२) पैजा - पैज
(३) डोळे – डोळा
(४) भुजा – भूज
(५) इंद्रिये - इंद्रिय
(६) श्रोते – श्रोता
(३) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा':
(१) परिमळ →\rightarrow
परि, पळ, मळ, रिळ
(२) कै वल्यरस →\rightarrow
कै वल्य, रस, वर, सरस
(४) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) संपूर्ण ×\times
___
(२) श्रोता ×\times
___
(३) रूप ×\times
___
(४) गुण ×\times
___
(५) जिंकणे ×\times
___
(६) बाहेर ×\times
___
उत्तरे :
(१) संपूर्ण ×\times
अपूर्ण
(२) श्रोता ×\times
वक्ता
(३) रूप ×\times
अरूप
(४) गुण ×\times
अवगुण
(५) जिंकणे ×\times
हरणे
(६) बाहेर ×\times
आत
(५) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : उत्तरे
(१) अक्षरओळख नसलेला →\rightarrow
निरक्षर
(२) लिहिता-वाचता येणारा →\rightarrow
साक्षर
(३) शिक्षण न घेतलेला →\rightarrow
अशिक्षित
(४) शिक्षण घेतलेला →\rightarrow
सुशिक्षित
२. लेखननियम :
• पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा :
(१) इंद्रीय - ___
(२) रसीक - ___
(३) परीमळ - ___
(४) आंलीगन - ___
(५) चीतामणि - ___
(६) अविश्कार - ___
उत्तरे :
(१) इंद्रीय - इंद्रिय
(२) रसीक - रसिक
(३) परीमळ - परिमळ
(४) आलीगन - आलिंगन
(५) चीतामणि - चिंतामणी
(६) अविश्कार - आविष्कार
३. म्हणी:
• पुढील म्हणी पूर्ण करा : उत्तरे
(१) ___ तसे उगवेल. पेराल तसे उगवेल.
(२) ___ तो वजीर. हाजीर तो वजीर.
(३) ___ कान पिळी. बळी तो कान पिळी.
(४) ___ तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे.
४. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Qualified →\rightarrow
अर्हताप्राप्त
(२) Recommendation →\rightarrow
शिफारस
(३) Superintendent →\rightarrow
अधीक्षक
(४) Zero Hour →\rightarrow
शून्यकाळ
(५) Barcode →\rightarrow
दंडसंके त
(६) Domicile →\rightarrow
अधिवास
(७) Gazette →\rightarrow
राजपत्र
(८) Landholder →\rightarrow
भूधारक

९. वहिनींचा 'सुसाट' सल्ला


- शोभा बोंद्रे
लेखक परिचय
शोभा बोंद्रे
कथाकार, कादंबरीकार, सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध. आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी यांवर अनेक गाजलेले कार्यक्रम सादर. माहेर, जत्रा, स्त्री,
किर्लोस्कर वगैरे नामवंत मासिकांमधून विपुल लेखन. विशेषतः विविध व्यावसायिकांच्या यशामागील कर्तबगारी उलगडू न दाखवणारे लेखन लोकप्रिय.
लेखन
'मुंबईचा अन्नदाता', 'नॉट ओन्ली पोटेल्स', 'एक मुठ्ठी आसमान', 'सहावं महाभूत आणि मी', 'एका फांदीवरची पाखरं' ही पुस्तके विशेष प्रसिद्ध.
'आभाळमाया', 'ऊनपाऊस', 'अर्धांगिनी', 'मानसी' इत्यादी दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध मालिकांसाठी संवादलेखन.
सन्मान : ‘सातासमुद्रापार' या कादंबरीला सर्वोत्कृ ष्ट कादंबरीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार.

पाठ परिचय
प्रस्तुत पाठ म्हणजे विनोदी अंगाने लिहिलेली एक हलकीफु लकी कथा आहे. काही गमतीदार योगायोग; कथेच्या ओघाला अचानक मिळणाऱ्या
कलाटण्या; व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यातील विरोधाभास आणि व्यक्तींच्या स्वभावाला पोषक असे प्रवाही, रुचकर, प्रसन्न संवाद यांमुळे कथा
वाचकांच्या मनाची पकड घेते. हलक्याफु लक्या पद्धतीने समाजातील स्त्री-पुरुष असमानतेवर बोट ठेवलेले आहे. समाजात स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे
स्थान मिळवायचे असेल, तर स्त्रीने स्वतःच्या कृ तीतून स्वतःचे महत्त्व पटवून दिले पाहिजे, असा संदेश या कथेतून मिळतो.

शब्दार्थ
विशी गाठली - वीस पूर्ण झाली (कार्यक्रम, पुस्तके , उपक्रम वगैरेंची वीस ही संख्या; वयाची वीस वर्षे इत्यादी.) नावलौकिक - प्रसिद्धी. पोकळ
बुडबुडे - वास्तवाला धरून नसलेले. अस्थिव्यंगतज्ज्ञ - मानवी देहातील हाडांबाबतचा तज्ज्ञ. अॅनेस्थेशिया - भूल; शरीराच्या विशिष्ट अवयवांना
किं वा संपूर्ण शरीराला औषध देऊन आणलेली बधिरता. बर्का - बरं का. नेत्रांजन - डोळ्यांत घालण्याचे औषध. कानातले - कानात घालण्याचे
विविध अलंकार. आतिथ्यशील - पाहुणचार करण्यात आनंद मानणारी. यजमान - पाहुणे ज्याच्या घरी जातात तो. भीड - आदर, मान, चाड,
लाज. कायापालट - आमूलाग्र बदल. पार्किं ग स्पेस - गाड्या तात्पुरत्या उभ्या करण्याची जागा. छेडछाड - टिंगलटवाळी.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) डोळ्यांसमोर काजवे चमकणे - अकल्पितपणे संकट उभे राहिल्याचे लक्षात येणे.
(२) प्रयत्नांची पराकाष्ठा करणे - खूप प्रयत्न करणे.
(३) सूत्रे हाती घेणे - (एखादा कार्यक्रम, उपक्रम, एखादे काम) पार . पाडण्याची जबाबदारी स्वीकारणे.
(४) डोळे लकाकणे - एखादी विलक्षण कल्पना वा विचार सुचणे.
(५) कायापालट होणे - आमूलाग्र बदल होणे.
(६) कीड मुळापासून उपटणे - मुख्य कारण (अडचण, समस्या) दूर करणे.
(७) शिखर गाठणे - सर्वोच्च पातळीवर जाणे.
(८) पुतळ्यासारखे खिळणे - स्तब्ध होणे.
टीप
• थेट प्रक्षेपण : दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम सादर करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीनुसार, स्टुडिओमध्ये किं वा बाहेर आधी
चित्रीकरण के ले जाते. त्यात हव्या त्या दुरुस्त्या के ल्या जातात. कार्यक्रमाचे आखीव-रेखीव रूप तयार के ले जाते. या प्रक्रियेला संपादन
असे म्हणतात. संपादन के ल्यानंतर तो कार्यक्रम प्रक्षेपित के ला जातो.
दुसऱ्या पद्धतीमध्ये, कार्यक्रम किं वा प्रसंग प्रत्यक्ष घडत असतानाच त्याचे चित्रीकरण के ले जाते व तेच चित्रीकरण त्याच क्षणी थेट प्रक्षेपित के ले जाते.
त्यामुळे कार्यक्रम किं वा प्रसंग प्रत्यक्ष घडत असतानाच प्रेक्षकांना पाहायला मिळतो. कार्यक्रम घडत असताना एखादी चूक झाल्यास ती चूक दुरुस्त
करण्याची कोणतीही संधी मिळत नाही झालेल्या चुकांचेही दर्शन प्रेक्षकांना त्या क्षणी घडते. या प्रकारे दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रक्षेपित करण्याच्या
पद्धतीला थेट प्रक्षेपण म्हणतात .

कृ ति-स्वाध्याय आणि उत्तरे


उतारा क्र. १
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कृ ती करा :
(१) उषावहिनींनी के लेले आरशामधले स्वत:चे निरीक्षण
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) या कार्यक्रमाचे कौतुक करण्यासाठी के लेली खास योजना
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(३) 'उषावहिनींचा सल्ला ' या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) कारणे लिहा :
(१) उषाताईंचा हा शेवटचा कार्यक्रम होता; कारण -
(२) उषावहिनी स्वतःच्या प्रतिबिंबावर खूश नव्हत्या; कारण –
(३) 'उषावहिनींचा सल्ला' हा कार्यक्रम आज शिवाजी मंदिरमध्ये ठेवला होता; कारण –
(४) उषावहिनींची अवस्था पाहून निशाने किं काळीच फोडली; कारण –
(५) प्रयत्न करूनही उषावहिनींचे शरीर पायांवर उभे राहायला तयार नव्हते; कारण –
(३) चौकटी पूर्ण करा :
(१) घरातल्या आठवणींची चव : ___
(२) त्यांच्या संदर्भातल्या आठवणींची चव : ___
(३) ब्युटी पार्लरमधून आलेल्या : ___
(४) अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉक्टरांचे नाव : ___
(५) वहिनींचा सल्ला सादर करणाऱ्या मूळ सादरकर्त्या : ___
(४) वैशिष्ट्य लिहा :
दूरदर्शनवरील 'वहिनींचा सल्ला' हा कार्यक्रम.
(५) पाठातील पुढील वाक्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा :
(१) काय मेलं हळूहळू चालते हे घड्याळ !
(२) (वीस वर्षांत उभारलेल्या या) रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
(३) कार्यक्रमात तुम्ही नुसत्या किं काळ्या फोडल्यात तर ते चालेल का तुमच्या प्रेक्षकांना?
(४) वाक्य संपले आणि त्यांचे डोळे लकाकले.
(५) 'आला प्रॉब्लेम समोर, की लाव त्याला चिकटपट्टी' हेच तर होतं, त्यांच्या कार्यक्रमाच्या यशस्वितेचे रहस्य.
(६) उषावहिनींच्या अपघाताच्या घटनेचा ओघतक्ता तयार करा :
पर्समध्ये रुमाल नव्हता.

दांडीवर दोन-तीन रुमाल वाळत होते.

_____

_____

_____

_____
उतारा क्र. १ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३६ ते ३८) .
उषावहिनींनी एकशेबावन्नाव्यांदा आरशात ___ ___ ___ तुझ्याच हातात आहे".
उत्तरे
(१) (१) उषावहिनींनी के लेले आरशामधले स्वत:चे निरीक्षण
(i) खूप वेळा आरशात पाहिले.
(ii) वळून वळून सर्व कोन साधून पाहिले.
(iii) चार पावले भराभरा मागे जाऊन पाहिले.
(iv) चार पावले भराभरा पुढे जाऊन पाहिले.
(२) या कार्यक्रमाचे कौतुक करण्यासाठी के लेली खास योजना
(i) कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार होते.
(ii) स्टुडिओमधून सादर न करता शिवाजी मंदिरमधून सादर करण्याचे ठरले.
(iii) समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्तींना आज निमंत्रित के ले होते.
(iv) उषावहिनींचा सत्कार ठेवला होता.
(३) 'उषावहिनींचा सल्ला ' या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
(i) मुंबईला दूरदर्शन सुरू झाले, त्यानंतर आजतागायत चालू असलेला एकमेव सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम.
(ii) 'वहिनींच्या सल्ल्याचा' हा शेवटचा कार्यक्रम.
(iii) उषावहिनींचा निवृत्तीचा दिवस.
(iv) कार्यक्रमाने विशी गाठली होती.
(२) (१) उषाताईंचा हा शेवटचा कार्यक्रम होता; कारण - त्या दिवशी त्या निवृत्त होणार होत्या.
(२) उषावहिनी स्वतःच्या प्रतिबिंबावर खूश नव्हत्या; कारण - कितीही मेकअप के ला तरी वय लपत नव्हते.
(३) 'उषावहिनींचा सल्ला' हा कार्यक्रम आज शिवाजी मंदिरमध्ये ठेवला होता; कारण - तो शेवटचा आणि खूप महत्त्वाचा कार्यक्रम होता.
(४) उषावहिनींची अवस्था पाहून निशाने किं काळीच फोडली; कारण - प्रयत्न करूनही स्वत:च्या पायांवर त्यांना उभे राहता न येण्याइतक्या त्या
जखमी झाल्या होत्या.
(५) प्रयत्न करूनही उषावहिनींचे शरीर पायांवर उभे राहायला तयार नव्हते; कारण – त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून वाकडा झाला होता.
(३) (१) घरातल्या आठवणींची चव : कडू
(२) त्यांच्या संदर्भातल्या आठवणींची चव : गोड
(३) ब्युटी पार्लरमधून आलेल्या : वनिता
(४) अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉक्टरांचे नाव : डॉ. बडवे
(५) वहिनींचा सल्ला सादर करणाऱ्या मूळ सादरकर्त्या: उषावहिनी
(४) दूरदर्शनवरील 'वहिनींचा सल्ला' हा कार्यक्रम : उषावहिनींचे व्यक्तिमत्त्व शांत व सौम्य असे होते. त्या समतोल असे सल्ले द्यायच्या. 'जोडा,
जुळवा, जमवून घ्या, इतरांच्या नजरेतून बघायला शिका' हेच सूत्र त्यांनी अवलंबिले होते.
(५) (१) कार्यक्रमाला जाण्यासाठी उषावहिनी अधीर झाल्या होत्या.
(२) दिलेले सल्ले निरर्थक होते; पण अत्यंत योग्य सल्ले दिल्याचा आभास निर्माण के ला होता.
(३) पायाची हाडे फ्रें क्चर झालेली असत दना झाल्या असत्या.
(४) आपल्याऐवजी निशा ही वहिनीचे काम नक्की करू शके ल, ही आशा त्यांच्या मनात निर्माण झाली.
(५) या कार्यक्रमामध्ये समोर आलेल्या समस्येवर के वळ वरवरचे निरर्थक उपाय सुचवले जायचे आणि त्या उपायांचा कोणालाच त्रास होत नसल्याने
सर्वांना ते आवडत असत.
पर्समध्ये रुमाल नव्हता.

दांडीवर दोन-तीन रुमाल वाळत होते.

हात उंचावून वहिनींनी उडी मारली.

उंच टाचांच्या चपलांसहित त्या स्टुलावर चढल्या.

हात उंचावून त्यांनी झटकन दांडीवरचा रुमाल खेचला.

पुढच्या क्षणातच तोल जाऊन त्या स्टुलासकट भुईसपाट झाल्या.
उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कृ ती करा :
(१) उषावहिनींच्या रूपात निशा अवतरल्यावर चारही बाजूंनी उसळलेला कल्लोळ व्यक्त करणारी
वाक्ये
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(२) उषावहिनींच्या साडीचा प्रेक्षक महिलांवर होणारा परिणाम
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(३) सुचरिताबाईंना नकली उषावहिनींनी दिलेला सल्ला ऐकू न प्रेक्षकांवर झालेला परिणाम
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(४) पाहुण्यांचा पाऊस झेलण्यामागील निलंजनाबाईंची कारणे
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(५) निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
(i) ___
(ii) ___
(iii) ___
(iv) ___
(२) कारणे लिहा :
(१) निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न के ला; कारण –
(२) उषावहिनींच्या थाटात निशाने भराभर सूत्रे हलवायला सुरुवात के ली; कारण –
(३) उषावहिनींच्या सहकाऱ्यांशी निशाची चांगली ओळख होती; कारण –
(४) महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली; कारण –
(५) निलंजनाबाईंच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा होतो; कारण –
(६) मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण -
(३) वैशिष्ट्ये लिहा :
(१) निशा नेसलेली साडी.
(२) निलंजनाबाईंकडे घरच्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन.
(३) निलंजनाबाईंचे व्यक्तिमत्त्व.
(४) 'शिवाजी मंदिर' येथील 'वहिनींचा सल्ला' हा कार्यक्रम.
(४) कोण ते लिहा :
(१) संसाररथाची दोन चाके :
(२) घरातल्या कामांकडे लक्ष न देणारा :
(३) 'असहकार' हे नेत्रांजन देणारी :
(४) पाहुण्यांविरुद्ध तक्रार करणाऱ्या :
(५) माहिती लिहा :
(१) सुचरिता नवरे यांची त्यांच्या पतीविषयीची तक्रार.
(२) नकली उषावहिनींनी सुचरिताबाईंना दिलेला सल्ला.
(३) 'शिवाजी मंदिर' येथील कार्यक्रमामध्ये 'वहिनींच्या सल्ल्या'साठी मांडण्यात आलेल्या समस्या.
(६) फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा :

उषावहिनींचा सल्ला निशावहिनींचा सल्ला

___ ___

___ ___

___ ___

___ ___

(७) पाठातील पुढील वाक्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा :


(१) मी माणसांना दुःखप्रूफ किं वा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.
(२) इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफिं ग के लेले असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
(३) 'कीड मुळापासून उपटू न काढली पाहिजे, तरच झाड जगेल.'
(४) तू मात्र आज लोकांना कडू क्विनाईनचा डोस देण्याचं धाडस के लंस.
कृ ती २ : (स्वमत)
• 'उषावहिनींना झालेला अपघात हा कथेला नाट्यपूर्ण वळण देणारा प्रसंग आहे,' या विधानावर तुमचे मत लिहा.
उत्तर : 'वहिनींचा सुसाट सल्ला' ही शोभा बोंद्रे यांची एक प्रसन्न कथा आहे. ही नुसती वाचायला गोड गोड अशी कथा नाही. ही कथा वाचकाला
वाचनाचा आनंद देते आणि त्याच वेळेला समाजात प्रचलित असलेल्या अन्यायकारक मूल्याचा परिचयसुद्धा घडवते. म्हणजे साखरेच्या पाकात
बुडवलेली ती एक कडू औषधाची गोळी आहे. लेखिकांनी हा परिणाम घडवण्यासाठी कथेला एक नाट्यपूर्ण वळण दिले आहे. उषावहिनींना झालेला
अपघात हा प्रसंग कथेला नाट्यपूर्ण वळण देण्याचे मोठे कार्य करतो.
उषावहिनींच्या अपघातामुळे फारच मोठा पेचप्रसंग निर्माण होतो. या अपघातामुळे पुढे काय घडेल याच्या अनेक शक्यता निर्माण झाल्या. कार्यक्रमच
रद्द करावा लागणे ही सर्वांत पहिली शक्यता होती. पण कार्यक्रम रद्द झाला असता, तर तिथेच कथा संपली असती. आणखी काय घडू शकले
असते?
कार्यक्रम पुढे ढकलता आला असता. पण किती पुढे? उषावहिनी पूर्ण बऱ्या होईपर्यंत किं वा इतका वेळ वाट न बघता त्यांच्या जागी योग्य व्यक्ती
मिळेपर्यंत कार्यक्रम पुढे ढकलायचा. योग्य व्यक्ती मिळवण्याबाबतसुद्धा अनेक शक्यता निर्माण होतात. नवीन व्यक्ती आणली तर नवीन व्यक्तीला
अनुसरून प्रश्नोत्तरांची रचना करावी लागेल. किं वा अन्य व्यक्तीचा शोध न घेता त्याच वेळी एखादा अन्य कार्यक्रम किं वा मूळ कार्यक्रमाच्या आशयाशी
जुळणारा एखादा अन्य कार्यक्रम घेता येऊ शकतो. किं वा मूळ कार्यक्रमाच्या यशाचे विश्लेषण करणारा चर्चात्मक कार्यक्रम घेता येऊ शकतो. या
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आणखी फाटे फु टू शकतात. कार्यक्रमात कोणताही बदल करायचा तर उच्चपदस्थांची परवानगी घ्यावी लागते.
उच्चपदस्थ आपल्या ओळखीच्या व्यक्तीची नेमणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यात अनेक उच्चपदस्थ आणि मंत्री गुंतलेले असतील तर त्यांची
आपापसात स्पर्धा होईल. एखाद्या वेळी एखादा कलाकार मंत्र्याची ओळख घेऊन स्वतः घुसण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे त्या स्पर्धेला धार
चढते. या स्पर्धेमध्ये मंत्री, उच्चपदस्थ, आणखी अन्य मंत्री तर त्यांचे स्वतःचे आपापसातले हेवेदावे तिथे बाहेर येतील. त्याने त्या कथेला आणखीच
बहार येईल. खरे म्हणजे वाट्टेल ते होऊ शकते. इतक्या अनेक शक्यता पोटात दडलेल्या असल्यामुळे वाचकाची उत्सुकता, त्याचे कु तूहल प्रचंड
वाढेल. यामुळे कथेची वाचनीयता वाढेल. वाचनीयता वाढणे म्हणजेच कथा यशस्वी होणे होय. यावरून हे सिद्ध होते की उषावहिनींना झालेला
अपघात हा कथेची नाट्यपूर्णता वाढवतो आणि कथेला चांगली कथा बनवतो.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
• या उताऱ्यातून तुम्हांला जाणवलेले मानवी स्वभावाचे काही विशेष तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तर : या कथेत माणसाच्या स्वभावाचे छान नमुने प्रसन्नपणे चित्रित के ले आहेत. कथेची सुरुवातच पाहा. उषावहिनींच्या हालचाली बारकाईने
टिपल्या आहेत! त्यामुळे उषावहिनी साक्षात डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यांच्या हालचालींतून, वागण्यातून स्त्री-स्वभावाचे काही विशेष कळतात.
चारचौघांत वावरताना कोणतीही मध्यमवर्गीय स्त्री स्वतःच्या दर्शनाविषयी जागरूक असते. आपले दर्शन प्रसन्न असावे; कोणत्याही परिस्थितीत आपण
हास्यास्पद दिसू नये, यावर तिचा कटाक्ष असतो. म्हणून उषावहिनी आरशासमोर उभ्या राहून स्वतःला हरत-हेने न्याहाळतात.
आजचा कार्यक्रम हा त्या मालिके तला शेवटचा कार्यक्रम होता. लोकप्रिय कार्यक्रमाचा शेवटचा भाग. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये अफाट उत्सुकता होती. थेट
प्रक्षेपण असल्यामुळे साध्या साध्या गोष्टींनीसुद्धा गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि कार्यक्रम कोसळू शकतो. यामुळे . उषावहिनींची स्वतःची प्रतिष्ठा
पणाला लागलेली होती. यशस्वी सादरकर्ती ही स्वतःची प्रतिमा बिघडू नये, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. हा कोणत्याही माणसाच्या ठिकाणी दिसून
येणारा स्वभावघटक आहे.
काही राहून तर जाणार नाही ना, घोटाळा तर होणार नाही ना अशा शंकांमुळे उषावहिनींमध्ये शेवटच्या घटके ची घालमेल दिसून येते. यामुळेच त्या
रुमाल शोधायला गेल्या, तेव्हा त्यांना अपघात झाला. हेही अक्षरश: मनुष्यस्वभावाला धरूनच आहे.
स्वतःला अपघात झाल्यावर मात्र त्या हतबल झाल्या. कार्यक्रम रद्द होणे, तो पुढे ढकलला जाणे किं वा आपल्या जागी दुसरी व्यक्ती येणे यांतली
कु ठलीच गोष्ट त्यांनी स्वीकारणे शक्य नव्हते. त्यामुळे निशाला, स्वतःच्या बहिणीला, त्या विनवणी करतात. स्वतःची बहीण असल्यामुळे आणि त्या
दोघींमधले खूपसे घटक जुळून येण्यासारखे असल्यामुळे त्यांना तर हा पर्याय विलक्षण योग्य वाटतो. त्यातच निशा ही त्यांची बहीणच असल्यामुळे
त्यांच्यात कोणतीच स्पर्धा नव्हती. हे सर्व कोणत्याही माणसाच्या ठिकाणी दिसून येऊ शकते. म्हणजे हा सर्वसाधारण मनुष्यस्वभावच आहे.
अशा त-हेने या कथेत मनुष्यस्वभावाचे अनेक घटक गुंफत गुंफत लेखिकांनी एक सुंदर कथा रचली आहे

उतारा क्र. २ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३८ ते ४१)


शिवाजी मंदिरच्या मागच्या ___ ___ ___ संपलं होतं. कायमचं!
उत्तरे
(१) (१) उषावहिनींच्या रूपात निशा अवतरल्यावर चारही बाजूंनी उसळलेला कल्लोळ व्यक्त करणारी वाक्ये
(i) 'वहिनी, सेट लाईट, माइक ओके करता?'
(ii) 'वहिनी, मेकअपला बसा.'
(iii) वहिनी, भाग घेणाऱ्या सर्व बायका आल्यात, बर्का !'
(२) उषावहिनींच्या साडीचा प्रेक्षक महिलांवर होणारा परिणाम
(i) साडीच्या आकर्षणाने दरवेळी महिलावर्गाकडू न वहिनींचा कार्यक्रम पाहिला जायचा.
(ii) प्रत्येक कार्यक्रमानंतर साडीवर चर्चा व्हायची.
(iii) अगदी तशीच साडी खरेदी करण्यासाठी महिलांच्या शोधयात्रा निघायच्या.
(३) सुचरिताबाईंना नकली उषावहिनींनी दिलेला सल्ला ऐकू न प्रेक्षकांवर झालेला परिणाम
(i) प्रेक्षकांमध्ये क्षणभर अवघडलेली शांतता निर्माण होते.
(ii) विजेच्या कडकडाटाने सगळ्यांची दिपल्यासारखी अवस्था होते.
(iii) प्रथम एका बाईने टाळी वाजवली. मग पाठोपाठ उरलेल्या स्त्रियांनी टाळ्या वाजवल्या.
(iv) शेवटी नाइलाजाने का होईना पुरुषांनीही टाळ्यांचा कड कडाट के ला.
(४) पाहुण्यांचा पाऊस झेलण्यामागील निलंजनाबाईंची कारणे
(i) थोडी भीड.
(ii) थोडा संकोच.
(iii) परंपरेचा धाक.
(iv) पाहुण्यांच्या प्रेमाचा पोकळ फु गा.
(५) निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
(i) प्रदीर्घ शांततेनंतर कोणीतरी एकीने टाळ्या वाजवल्या.
(ii) बाकीच्यांनीही टाळ्या वाजवून आपले सहमत दर्शवले.
(iii) एखादं थरार नाट्य पाहावे, तसे प्रेक्षक खुर्चीला खिळले होते.
(iv) श्वास रोधून आणि वृत्ती एकाग्र करून ते कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते.
(२) (१) निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न के ला; कारण – तिला वहिनींची भूमिका सराईतपणे करायची होती.
(२) उषावहिनींच्या थाटात निशाने भराभर सूत्रे हलवायला सुरुवात के ली; कारण – वहिनींच्या सहकाऱ्यांशी तिची चांगली ओळख झालेली होती.
(३) उषावहिनींच्या सहकाऱ्यांशी निशाची चांगली ओळख होती; कारण – उषाबरोबर ती दोन-तीन वेळा टीव्ही सेंटरवर रेकॉर्डिंग पाहायला गेली
होती.
(४) महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली; कारण – आजच्या कार्यक्रमाला उषावहिनी जन्मभर लक्षात राहील अशी साडी नेसून
येणार, अशी महिलांची अपेक्षा होती; परंतु त्या आज अगदी साधी, सुती साडी नेसून आल्या होत्या.
(५) निलंजनाबाईंच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा होतो; कारण - निलंजनाबाई नोकरीला जात नसल्यामुळे त्यांच्याकडू न चांगला पाहुणचार करून
मिळेल, अशी पाहुण्यांना आशा असायची. ।
(६) मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण – मुंबईत बऱ्याच स्त्रिया नोकरी करू लागल्यामुळे पाहुण्यांची सरबराई करायला घरात रिकामी
बाई नसते.
(३) (१) निशा नेसलेली साडी : साडी अगदीच साधीशी, सर्वसाधारण काठपदराची, मळखाऊ रंगाची सुती होती.
(२) निलंजनाबाईंकडे घरच्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन : घरात त्यांना गृहिणी म्हणून मानाचे स्थान होते. घरातल्या कामाचे महत्त्व सगळ्यांना
मान्य होते. आपल्या कामाची शंभर टक्के जबाबदारी त्या उचलायच्या. निलंजनाबाई सेवाभावी संस्थेत फावल्या वेळात जे काम करायच्या, या
कामाबद्दल सगळ्यांना त्यांच्याविषयी आदर वाटत होता.
(३) निलंजनाबाईंचे व्यक्तिमत्त्व : निलंजनाबाई स्वतःला कमी समजणाऱ्या वा मान खाली घालणाऱ्या नव्हत्या. घरातल्या आर्थिक व्यवहारांमध्ये
आपल्याला स्थान असले पाहिजे, याचे त्यांना भान होते. त्या फावल्या वेळात सेवाभावी संस्थेसाठी विनावेतन काम करीत होत्या. घरातल्या कामाची
शंभर टक्के जबाबदारी त्या उचलायच्या.
(४) 'शिवाजी मंदिर' येथील 'वहिनींचा सल्ला' हा कार्यक्रम : शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमामध्ये निशा ही वहिनींच्या जागी उभी होती. ती सडेतोड
विचारांची होती. तिला अन्याय खपत नसे. समानतेचा पुरस्कार करणारी होती. स्वतःच्या मनाचा कौल घ्या. स्वतःला स्वत:च महत्त्व द्या.
आत्मसन्मान जपा. तिचे विचार धक्कादायक होते, पण मनाला भिडणारे होते.
(४) (१) संसाररथाची दोन चाके : नवरा व बायको
(२) घरातल्या कामांकडे लक्ष न देणारा : नवरा
(३) 'असहकार' हे नेत्रांजन देणारी : निशा
(४) पाहुण्यांविरुद्ध तक्रार करणाऱ्या : निलंजनाबाई बॅनर्जी
(५)
(१) सुचरिता नवरे यांची त्यांच्या पतीविषयीची तक्रार : सुचरिताबाई करतात त्या कामांकडे पतीचे लक्ष नसते. पतीकडू न काही कामांची अपेक्षा के ली
तर त्याला ती कामे आपली वाटत नसत.
(२) नकली उषावहिनींनी सुचरिताबाईंना दिलेला सल्ला : सुचरिताबाईंनी स्वत:पुरते व मुलांपुरते जेवण तयार करावे आणि जेवूनही घ्यावे. त्यांनी
फक्त स्वतःच्याच कपड्यांना इस्त्री करावी. नवऱ्याचे चुरगळलेले कपडे तसेच ठेवून द्यावेत. नवऱ्याचे पेन, पाकीट, रुमाल शोधून जागच्या जागी
ठेवण्याची तसदी घेऊ नये.
(३) 'शिवाजी मंदिर' येथील कार्यक्रमामध्ये 'वहिनींच्या सल्ल्या'साठी मांडण्यात आलेल्या समस्या : सासू-सुनेची एकत्र नांदण्याची समस्या, वरिष्ठ
पदावर काम करणाऱ्या स्त्रीला पुरुष सहकाऱ्यांचा किं वा हाताखाली काम करणाऱ्या पुरुषांचा आलेला धक्कादायक अनुभव, महाविद्यालयीन तरुणीची
रस्त्यात किं वा महाविद्यालयाच्या आवारातही के ली जाणारी छेडछाड, नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे संसाराची होणारी वाताहत अशा अनेक समस्या
मांडल्या गेल्या.
(६)

उषावहिनींचा सल्ला निशावहिनींचा सल्ला

१. शांत, संयमी, समतोल सल्ले. १. स्वतःच्या मनाचा कौल घ्या.


उषावहिनींचा सल्ला निशावहिनींचा सल्ला

२. जोडा आणि जुळवून घ्या. २. स्वतःच स्वतःला महत्त्व द्या, आत्मसन्मान जपा.

३. इतरांच्या नजरेतून बघायला शिका, ही शिकवणूक. ३. समानतेचा आग्रह धरणारे, सडेतोड, म्हणून धक्कादायक, तरीही
मनाला भिडणारे विचार.

(७) (१) माणसांच्या दुःखाचे खरे कारण समजावून सांगणे हे माझे काम आहे, असे निशा समजावून सांगत आहे.
(२) नोकरी न करणारी बाई ही जणू रिकामटेकडी असते. त्यामुळे पाहुण्यांची सरबराई करायला ती जणू मोकळीच असते. घरकामाविषयी आत्यंतिक
चुकीचा दृष्टिकोन मनात बाळगल्यामुळे अशी धारणा निर्माण होते.
(३) घरकाम, पाहुण्यांची सरबराई ही जणू स्त्रियांचीच कामे होत, असा चुकीचा दृष्टिकोन प्रस्थापित झालेला होता. ही मूळ कीड आहे. तीच नष्ट
के ली पाहिजे. तर मग संघर्षाचे किं वा स्त्रियांना कमी लेखण्याचे, त्यांच्या कामाला किं मत न देण्याचे कृ त्य समाजाकडू न होणार नाही.
(४) उषावहिनी या गोड गोड शब्दांमध्ये फसवे विचार मांडत होत्या. निशाने सडेतोडपणे आपले विचार मांडले. ते स्त्री-पुरुष समानतेचे विचार होते.
आधुनिक जगात निशाचे विचारच आवश्यक आहेत, हे उषावहिनींना पटले.
कृ ती २ : (स्वमत)
(१) वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
उत्तर : ही कारणे लिहिण्यापूर्वी त्या वेळची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्या काळात घरातली सर्व कामे स्त्रियांनीच करायची, असा नियम होता.
पुरुष या कामांना हात लावत नसे. पुरुषाच्या पेन, पाकीट, रुमाल या साध्या वस्तूसुद्धा स्त्रीनेच नीट ठेवायच्या आणि पुरुषांना हव्या त्या वेळी
त्यांच्या हाती द्यायच्या. पाहुणेसुद्धा के व्हाही येत. घरातल्या स्त्रीने आलेल्या पाहुण्यांची सर्व सरबराई करावी, त्या वेळी स्वतःची सोय व गैरसोय पाहू
नये, असा रिवाज होता. घरातील स्त्री कोणत्या तरी कामासाठी बाहेर पडत असतानाच पाहुणे आले तर बाहेर जाणे रद्द के ले पाहिजे, असे सगळेजण
मानत होते. अशा वेळी त्या स्त्रीचे कितीही नुकसान झाले, तिला अडीअडचणी आल्या, ती काही सुखाला मुकली तरी तिने पाहुण्यांची सरबराई के ली
पाहिजे, असा दंडक होता.
या पार्श्वभूमीवर निशावहिनींचा सल्ला पाहिला पाहिजे. निशावहिनी सांगतात की, प्रत्येक माणूस स्वार्थी असतो. मग फक्त स्त्रीनेच का म्हणून इतरांच्या
सुखासाठी झटत राहावे? स्त्रीने स्वतःच स्वतःचे सुख पाहिले पाहिजे. स्वतःच्या गरजा पाहिल्या पाहिजेत. नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी जशी पत्नी
सांभाळते, तशा पत्नीच्या गोष्टी पतीने का सांभाळू नयेत? एखाद्या दिवशी पतीने स्वयंपाक करावा. पत्नीचे जेवणाचे ताट मांडावे. एखाद्या दिवशी
पतीने पत्नीच्या साडीला इस्त्री करावी. अचानक न सांगता पाहुणे घरी आले, तर आपली कामे बाजूला ठेवू नयेत. स्वतःची गैरसोय करून घेऊ नये.
म्हणजे हळूहळू पाहुण्यांनासुद्धा न कळवता अचानक कोणाहीकडे जाऊ नये, याची सवय होईल. निशावहिनींचे विचार त्या काळाच्या मानाने खूपच
बंडखोरीचे होते. अनेकांना ते पटत होते, पण स्वीकारणे जड जात होते. यामुळेच निशावहिनींचे विचार सुसाट वाटतात.
(२) 'पाहुण्यांचा पाऊस' यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हांला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर : निलंजनाबाईंनी पाहुण्यांना पावसाची उपमा दिली होती. पाऊस हा कधीही, न सांगता, अगदी नको त्या वेळीसुद्धा येतो. आपली अडचण
करतो. आपली कामे अडतात. पाहुणेसुद्धा असेच न सांगता के व्हाही टपकतात. ज्यांच्या घरी आपण जातो त्यांची गैरसोय होईल का, त्यांचे नुकसान
होईल का, याचा ते काहीही विचार करीत नाहीत. तसेच, पाऊस किती वेळ राहावा, तो किती प्रमाणात यावा, कशा स्वरूपाचा असावा यावर
आपले कोणतेही नियंत्रण नसते. त्याप्रमाणेच पाहुण्यांचेही होते. पाहुण्यांनी कधी यावे, किती जणांनी यावे, कोणत्या कामासाठी यावे यांवर घरातल्या
स्त्रीचे कोणतेही नियंत्रण नसते. ती काहीही सुचवू शकत नाही. तिला सगळा त्रास निमूटपणे सहन करावा लागतो. पाहुणे आणि पाऊस यांच्यातील हे
साम्य पाहून निलंजनाबाईंनी पाहुण्यांना पावसाची उपमा दिली. एवढेच नव्हे, तर तक्रार मांडताना त्यांनी पाहुण्यांचा उल्लेखच के ला नाही. फक्त
पावसाचा उल्लेख के ला.
निशावहिनींचा त्यामुळे गैरसमज झाला आणि सगळा घोटाळा झाला. त्यांनी पाऊस या शब्दाचा अर्थ शब्दश: घेतला. त्यामुळे ही काहीतरी
पावसाळ्यातील पाणी गळतीची समस्या असावी, असे निशावहिनींना वाटले. प्रत्युत्तर म्हणून आपण ताडपत्रीची एजन्सी घेतलेली नाही, किं वा आपला
वॉटर प्रूफिं गशीसुद्धा काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट के ले. त्यामुळे तेव्हा हास्य निर्माण होते. सडेतोड व तडाखेबाजपणे उत्तरे देणाऱ्या
निशावहिनीसुद्धा क्षणभर गडबडल्या. हा त्या विनोदाचा परिणाम होता.
(३) सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर : शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक समस्या मांडल्या. त्यांचे स्वरूप साधारणपणे असे होते : सर्व घरकाम स्त्रीच्या अंगावर
येऊन पडते. स्वत:साठी वेळ मिळत नाही. दिवसभर करीत असलेल्या कामाला कोणी किं मतही देत नाही. घरी के व्हाही, कधीही, कितीही पाहुणे
येतात. आपल्यामुळे यजमान घरातल्या लोकांची किती गैरसोय होत असेल, याचे भान पाहुणे बाळगत नाहीत. सासू-सुना यांच्यातील भांडणे,
कार्यालयात काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुष संहकाऱ्यांकडू न होणारा त्रास, महाविद्यालयात शिकायला जाणाऱ्या मुलींना होणारा छेडछाडीचा त्रास,
व्यसनी नवऱ्यांमुळे होणारी संसाराची वाताहत या स्वरूपाच्या बऱ्याच समस्या पुढे आल्या.
या समस्यांकडे पाहिल्यावर लक्षात येईल की, या सर्व समस्या स्त्रियांशी निगडित आहेत. या सर्व समस्या स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेल्या
आहेत. स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाचे स्थान मिळत नाही. घरातली कष्टांची व वेळखाऊ कामे स्त्रियांच्याच माथी लादलेली आहेत.
घरातली कामे महत्त्वाची असतातच. घरातल्या सगळ्यांनी ती पार पाडली पाहिजेत. त्या कामांबाबत सगळ्यांची समान जबाबदारी असली पाहिजे.
तसे होत नाही.
सून म्हणून घरात आलेल्या नवीन मुलीला सगळे वातावरणच नवीन असते. तिच्या मनावर दडपण येईल, मोकळेपणाने वावरणे अवघड होईल, असे
आपण वागता कामा नये. अजूनही अनेक सुशिक्षित लोकही स्त्रियांना कमी लेखतात. त्यामुळे उच्चपदस्थ स्त्रियांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.
छेडछाडीच्या प्रकारांबाबत तर बोलायलाच नको. यामुळे स्त्रिया सार्वजनिक वातावरणामध्ये मोकळेपणाने वावरू शकत नाहीत. याचा त्यांच्या
शिक्षणावर, त्यांच्या नोकरी-व्यवसायावर परिणाम होतो.
आपण सर्वांनी या समस्येकडे गंभीरपणे बघितले पाहिजे.
(४) खऱ्या उषावहिनींनी आपल्या 'बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी ' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
उत्तर : खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीचे, निशाचे, मनापासून कौतुक के ले – तेही जाहीरपणे. हे कौतुक करताना त्यांनी स्वत:मधील उणीवही
मान्य के ली. लोकांना बरे वाटावे, त्यांची मने दुखवू नयेत, म्हणून त्या गोड गोड बोलत राहिल्या. सामाजिकदृष्ट्या योग्य सल्ला त्यांनी दिला नाही.
समाजाचे वातावरण निकोप व्हावे, स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळावे, हे त्यांना ओळखता आले नाही. ही उणीव त्यांनी मान्य के ली, हा त्यांच्या
मनाचा मोठेपणा होय.
निशाने समाजाला क्विनाईनचा डोस दिला. क्विनाईन हे अत्यंत कडू असे औषध आहे. निशाचा सल्ला क्विनाईनसारखा होता. तिच्या सल्ल्यामध्ये
सामाजिक सुधारणा करण्याची मोठी शक्ती होती. सामाजिक सुधारणा कोणताही समाज सहजासहजी मान्य करीत नाही. किं बहुना खूप विरोध करतो.
अशा वेळी समाजाच्या विरुद्ध भूमिका घ्यायला फार मोठे धाडस लागते. या धाडसामुळे आपण समाजामध्ये अप्रिय होण्याची
शक्यता असते. आपली प्रतिमा अप्रिय करून घ्यायला बहुसंख्य लोक तयार नसतात. उषावहिनीसुद्धा असे धाडस दाखवू शकल्या नाहीत.
सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी बंडखोर स्वभावाची गरज असते. असा स्वभाव निशाकडे आहे. म्हणून तिने के वळ एका दिवसाची संधी
मिळताच त्या संधीचे सोने के ले. आपल्यालासुद्धा समाजात काही बदल करायचे असल्यास निशासारखी भूमिका घेतली पाहिजे आणि तीसुद्धा वेळ न
गमावता घेतली पाहिजे.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) वहिनींचा 'सुसाट' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
उत्तर : ही कथा खूपच चांगली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जराही कं टाळवाणी होत नाही. सुरुवातीलाच ती वाचकांच्या मनाची पकड घेते
आणि ही पकड शेवटपर्यंत घट्ट राहते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंगच मुळी उत्सुकता निर्माण करणारा आहे. तो अत्यंत चित्रदर्शी आहे. आपल्या
डोळ्यांसमोर तो घडत आहे असे वाटत राहते. स्त्रीची मानसिकता त्या प्रसंगातून चांगल्या रितीने व्यक्त होते. त्यात प्रसंगानंतर एक-एक घटना अशी
घडत जाते की, वाचकाची उत्सुकता वाढत जाते. आता पुढे काय घडेल, आता पुढे काय घडेल, असे कु तूहल त्याच्या मनात निर्माण होते. या
घटकामुळे कथेची वाचनीयता कायम राहते.
पुढे उषावहिनींना अपघात होतो, हा प्रसंग तर कु तूहल खूपच वाढवतो. या अपघाताने मोठा पेच उभा राहतो. या पेचातून सोडवणूक करून घेण्याचे
अनेक मार्ग दिसू लागतात. त्यांपैकी कथेत कोणता मार्ग निवडला आहे, त्या निवडीमुळे काय काय घडेल, कोणकोणत्या व्यक्तींवर कोणकोणते परिणाम
घडतील, मग त्या व्यक्ती कशा वागतील, असे कु तूहल वाढवणारे अनेक प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. कथेची रंगत वाढत जाते.
हलकीफु लकी प्रसन्न भाषा हे एक कथेचे सामर्थ्यस्थान आहे. कथेची भाषा अत्यंत प्रवाही आहे. या भाषेत कु ठेही बोजडपणा नाही. निलंजनाबाईंच्या
प्रसंगाच्या वेळी तर खेळकर विनोद अवतरतो आणि 'कथेवर हलके च प्रसन्नता पसरते.
या कथेतील सामाजिक आशय खूप महत्त्वाचा आहे. स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेली सामाजिक विषमता हा या कथेचा आत्मा आहे.
निशावहिनींनी या असमानतेवर नेमके बोट ठेवले आहे. या असमानतेतून स्त्रियांची मुक्तता करणे स्त्रियांच्याच हाती आहे, हे वास्तव निशावहिनी बोलून
दाखवतात. स्त्रियांनी आत्मसन्मान जपला पाहिजे. मग त्यांना स्वतःलाच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. या कथेतून वाचकाला असे
मार्गदर्शन घडते. त्यामुळे कथा वाचताना आनंद मिळतोच, शिवाय आपला दृष्टिकोन अधिक संपन्न झाला, याचे फार मोठे समाधान वाचकाला मिळते.
या कथेचे हे फार मोठे यश आहे. अशी कथा कोणालाही आवडेल.
(२) 'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
उत्तर : आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृ ती आहे. त्यामुळे अनेक शतके स्त्रियांवर अन्याय होत आहे. त्यांना समाजजीवनात सन्मानाचे स्थान दिले जात
नाही. या अन्यायाची सुरुवात स्त्रीच्या जन्मापासूनच होते. घरात मुलगा जन्माला आला की आनंदोत्सव साजरा के ला जातो. मुलगी जन्माला आली
की घरात निरुत्साह असतो. यात थोडी सुधारणा झाली आहे. नाही असे नाही. पण ती सुशिक्षितांच्या घरांत. अशिक्षितांच्या घरांत किं वा ग्रामीण
भागात अजूनही मुलगी जन्माला आल्याचा आनंद साजरा होत नाही. इथपासून सुरू झालेला हा अन्याय स्त्रीच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतो.
कोणत्याही समाजात स्त्रियांची संख्या जवळजवळ निम्मी असते. पुरुषप्रधानतेमुळे आपण अर्ध्या समाजावर अन्याय करीत असतो.
स्त्रियांविषयी चुकीच्या कल्पना रूढ झाल्याने हा अन्याय जोमाने चालू राहतो. स्त्रिया दुबळ्या असतात. त्यांच्यात शारीरिक क्षमता कमी असते. त्या
मनानेही दुबळ्या असतात. कठीण प्रसंगांत त्या कणखरपणे वागू शकत नाहीत. त्यांच्याकडे पुरुषांएवढी बुद्धिमत्ता नसते. त्यामुळे त्या बुद्धीच्या क्षेत्रांवर
प्रभाव टाकू शकत नाहीत. बुद्धीच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकत नाहीत. गुंतागुंतीची, किचकट कामे त्यांना झेपत नाहीत. वगैरे वगैरे
गैरसमज शतकानुशतके बाळगले जात आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सन्मानाचे स्थान मिळत नाही. ग्रामीण भागांत तर चारचौघांची बैठक
चालू असताना त्या बैठकीत स्त्रीने बोलू नये, आपले मत मांडू नये, असा दंडकच असतो. स्त्रीने फक्त घरकाम, धुणी-भांडी व मुलांचे संगोपन
एवढ्याच गोष्टी पाहाव्यात, अशी अपेक्षा असते. कोणत्याही बाबतीत तिचे मत विचारात घेतले जात नाही.
पूर्वी प्राधान्याने मुलग्यांनाच शाळेत पाठवले जाई. अलीकडे या परिस्थितीत थोडीशी सुधारणा झालेली आहे. दहावीपर्यंत तरी मुलींना आडकाठी के ली
जात नाही. पण अजूनही उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत मुलींच्या शिक्षणासाठी हात आखडता घेतला जातो. तिथे जर मुलगा असेल तर कर्ज काढू नही
शिक्षण देण्याची व्यवस्था के ली जाते. अशा प्रकारे स्त्रियांना विकासाच्या संधी नाकारल्या जातात. हा फार मोठा अन्याय आहे. अर्धा समाजच जर
आपण दुबळा ठेवला, तर पूर्ण समाजाचे नुकसान होते, हे आपण कधी लक्षात घेणार?
स्त्रियांवर जिथे जिथे अन्याय होतो, तिथे तिथे त्याला विरोध के ला पाहिजे. सर्व समाज सुधारायचा असेल तर स्त्रियांनी समान हक्क मिळवले पाहिजेत.
त्याला कोणताही पर्याय नाही.

व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
• पुढील वाक्यांतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) या वीस वर्षांत त्यांनी हंडाभर फे विकॉल, दोन-चार मैल लांबीच्या चिकटपट्ट्या, शंभर एक किलो डिंक आणि पाच-सात बरण्या च्युइंग गम
वापरलं असेल →\rightarrow
लक्षणा
(२) संसाररथाची दोन चाकं म्हणजे नवरा आणि बायको! →\rightarrow
व्यंजना
(३) मी माणसांना दुःखप्रूफ किं वा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.→\ \rightarrow
लक्षणा
(४) आज उषावहिनींचा सत्कार होणार होता. →\rightarrow
अभिधा
२. वाक्यसंश्लेषण :
के वल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.
उत्तर : के वल वाक्ये :
(१) हात उंचावून त्यांनी झटकन दांडीवरचा रुमाल खेचला.
(२) शेवटची नजर टाकू न त्यांनी पर्समध्ये सर्व गोष्टी आहेत ना ते पाहिलं.
मिश्र वाक्ये :
(१) सर संसाररथ नीट चालायला हवा असेल, तर दोन्ही चाकांची सारखीच शक्ती वापरात यायला हवी.
(२) एक चाक थोडंसं कु चकामी असेल, तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार द्यावा.
संयुक्त वाक्ये :
(१) निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न के ला आणि उषावहिनींच्या भूमिके त स्वत:ला सराईतपणे झोकू न दिलं.
(२) घरी जा आणि एक छान साडी नेस.
३. काळ :
• पुढील वाक्ये रीती भविष्यकाळात रूपांतरित करा :
(१) त्यांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.
(२) निशाने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली.
(३) शोफरने लवून अभिवादन के ले.
(४) हा प्रयोग लोकप्रिय नाट्यगृहात साजरा होत आहे.
उत्तरे : (१) त्यांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकत जातील.
(२) निशा सर्व सूत्रे आपल्या हातात घेत राहील.
(३) शोफर लवून अभिवादन करत जाईल.
(४) हा प्रयोग लोकप्रिय नाट्यगृहात साजरा होत जाईल.
४. शब्दभेद :
(१) पुढील वाक्यांचा अभ्यास करा. 'कर' या शब्दाची योग्य अर्थच्छटा कं सातील पर्यायांतून निवडा. ती वाक्यांसमोर कं सांत लिहा. उत्तरे
[टॅक्स, कृ त्य, हात, करणे (क्रियापद)]
(१) दाम करी काम वेड्या (करणे)
(२) कर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे (टॅक्स)
(३) कर हा करी धरिला शुभांगी (हात)
(४) कर नाही त्याला डर कशाला? (कृ त्य)
(२) पुढील तक्ता भरा : (शब्दांचा अचूक संदर्भ)

शब्द अर्थ वाक्य

(१) आयोजन कार्यक्रमाची सुसूत्र आखणी. आम्ही एक दिवसाच्या नाट्यशिबिराचे


आयोजन के ले.
संयोजन जोड, सांधा मिलाफ.
नाट्यशिबिराचे संयोजन आमच्या
महाविद्यालयाने के ले.

(२) उद्देश हेतू कार्याचा उद्देश स्पष्ट असावा.


उद्दिष्ट ध्येय, साध्य परीक्षेत उत्तम यश मिळवणे हे माझे उद्दिष्ट
आहे.

(३) कार्यक्रम कार्याचा क्रम स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला.


उपक्रम प्रकल्प वृक्ष संगोपनाचा उपक्रम महाविद्यालयाने हाती
घेतला.

आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती


१. शब्दसंपत्ती :
(१) विशेष्य-विशेषणांच्या जोड्या पाठाधारे जुळवा :
कडू गोड, थेट, अभूतपूर्व, जीवघेणी, अंजन, कळ, फावला, प्रक्षेपण, असहकार, आठवणी, पोकळ,
कार्यक्रम, वेळ, पुळका
उत्तरे :

विशेषणे विशेष्ये

(१) कडू गोड आठवणी

(२) थेट प्रक्षेपण

(३) अभूतपूर्व कार्यक्रम

(४) जीवघेणी कळ
विशेषणे विशेष्ये

(५) असहकार अंजन

(६) फावला वेळ

(७) पोकळ पुळका

(२) पुढील शब्दांचे वर्गीकरण करा :


वळूनवळून, रेनकोटबिनकोट, पुटपुट, अभिवाचन, सामाजिक
उत्तरे :

उपसर्गघटित शब्द अभिवाचन

प्रयत्यघटित शब्द सामाजिक

पूर्णाभ्यस्त शब्द वळूनवळून

अंशाभ्यस्त शब्द रेनकोटबिनकोट

अनुकरणवाचक शब्द पुटपुट

(३) विरुद्धार्थी शब्द लिहा :


(१) कडू ×\times
___
(२) यशस्वी ×\times
___
(३) दीर्घ ×\times
___
(४) प्रत्यक्ष ×\times
___
(५) सुदैव ×\times
___
(६) आंधळा ×\times
___
उत्तरे :
(१) कडू ×\times
गोड
(२) यशस्वी ×\times
अयशस्वी
(३) दीर्घ ×\times
हस्व
(४) प्रत्यक्ष ×\times
अप्रत्यक्ष
(५) सुदैव ×\times
दुर्दैव
(६) आंधळा ×\times
डोळस
(४) जोडशब्द पूर्ण करा.
[पाठो, छेड, साधी, धाव] :
(१) ___सुधी
(२) ___पळ
(३) ___पाठ
(४) ___छाड
उत्तरे :
(१) साधीसुधी (२) धावपळ (३) पाठोपाठ (४) छेडछाड.
(५) लिंग बदला :
(१) निवेदक - ___
(२) वहिनी - ___
(३) मैत्रीण - ___
(४) आंधळा - ___
(५) बहीण - ___
(६) धाकटी - ___
उत्तरे :
(१) निवेदक - निवेदिका
(२) वहिनी - दादा
(३) मैत्रीण - मित्र
(४) आंधळा - आंधळी
(५) बहीण - भाऊ
(६) धाकटी - धाकटा
२. विरामचिन्हे :
(१) पुढील विरामचिन्हांची नावे कं सातील यादीतून शोधून लिहा :
(अपूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, अपसारणचिन्ह, लोपचिन्ह)

विरामचिन्हे नावे

; अर्धविराम

..... लोपचिन्ह

_ अपसारणचिन्ह

: अपूर्णविराम

- संयोगचिन्ह

(२) पुढील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा :
(१) ड्रायव्हर चुकचुकला अर्रर्र अशा कशा पडल्या तुम्ही वहिनी
(२) जाऊ दे ना कशी पडलीस ते महत्त्वाचं नाही आता पुढे काय करायचं ते महत्त्वाचं
(३) तर मैत्रिणींना वहिनींचा सल्ला हा आजचा शेवटचा कार्यक्रम
उत्तरे : (१) ड्रायव्हर चुकचुकला, “अर्र! अशा कशा पडल्या तुम्ही वहिनी?"
(२) "जाऊ दे ना! कशी पडलीस ते महत्त्वाचं नाही, आता पुढे काय करायचं, ते महत्त्वाचं!"
(३) “तर 'मैत्रिणींना वहिनींचा सल्ला!' हा आजचा शेवटचा कार्यक्रम."
३. लेखननियम :
(१) अचूक शब्द निवडा : उत्तरे
(१) प्रतिबिंब/प्रतिबींब/प्रतीबिंब/प्रतीबींब - प्रतिबिंब
(२) कार्यक्रम/र्कायक्रम/कार्यक्रम/कायक्रम - कार्यक्रम
(३) व्यक्तीमत्त्व/व्यक्तिमत्त्व/व्यक्तिमत्व/ - व्यक्तिमत्त्व
(४) आतीथ्य/आतिथ्य/आतिथ/अतिथ्य -आतिथ्य
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(१) हा महत्वाचा कार्यक्रम दुरर्दशनच्या स्टू डीओमधून काढू न शिवाजीमंदीरमध्य ठेवला होता.
(२) वयोमानानूसार नीवृत व्हावेच लागणार.
(३) वहींनीचा सक्तार होणार होता.
(४) पायांतुन जीवघेणि कळ आलि.
उत्तरे :
(१) हा महत्त्वाचा कार्यक्रम दूरदर्शनच्या स्टुडिओमधून काढू न शिवाजीमंदिरमध्ये ठेवला होता.
(२) वयोमानानुसार निवृत्त व्हावेच लागणार.
(३) वहिनींचा सत्कार होणार होता.
(४) पायांतून जीवघेणी कळ आली.
४. वाक्प्रचार :
• पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :
(१) काजवे चमकणे
(२) डोळे लकाकणे
(३) कायापालट होणे
(४) कडेलोट होणे
उत्तरे :
(१) काजवे चमकणे -
अर्थ : डोळ्यांसमोर क्षणभर लख्ख प्रकाश चमकू न कळेनासे होणे.
वाक्य : रघूने पोहण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा विहिरीत उडी मारली, तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.
(२) डोळे लकाकणे -
अर्थ : पटकन एखादा विचार सुचणे.
वाक्य : सरांनी प्रश्न विचारताच मधूचे डोळे लकाकले.
(३) कायापालट होणे -
अर्थ : आमूलाग्र बदल होणे.
वाक्य : विपश्यनेहून परत आल्यावर माधवचा कायापालट झाला.
(४) कडेलोट होणे -
अर्थ : (भावनेने) उचंबळून टोकाचा विचार मनात येणे.
वाक्य : न के लेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते, असे समजताच गोपूचा कडेलोट झाला.
(२) जोड्या लावा :

वाक्प्रचार अर्थ

(१) जीवघेणी कळ येणे (अ) श्रम घेणे


वाक्प्रचार अर्थ

(२) नावलौकिक होणे (आ) पराकोटीची वेदना होणे

(३) तसदी घेणे (इ) दुर्दशा होणे

(४) वाताहत होणे (ई) प्रसिद्धी मिळणे

उत्तरे :
(१) जीवघेणी कळ येणे - पराकोटीची वेदना होणे
(२) नावलौकिक होणे - प्रसिद्धी मिळणे
(३) तसदी घेणे - श्रम घेणे
(४) वाताहत होणे - दुर्दशा होणे
५. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Working Capital →\rightarrow
खेळते भांडवल
(२) Utility →\rightarrow
उपयुक्तता
(३) Quorum →\rightarrow
गणसंख्या
(४) Share Certificate →\rightarrow
समभागपत्र
(५) Administration →\rightarrow
प्रशासन
(६) Enrolment →\rightarrow
नावनोंदणी
(७) Junction →\rightarrow
महास्थानक
(८) Guard of Honour →\rightarrow
मानवंदना

१०. शब्द
- यशवंत मनोहर
• कवींचे नाव : यशवंत मनोहर
• कवींच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये : कवी, समीक्षक, विचारवंत.
• ग्रंथसंपदा : 'उत्थानगुंफा, काव्यभीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब'
इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. 'दलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्यसमीक्षा, नवे
साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये' इत्यादी समीक्षाग्रंथ. 'रमाई, मी यशोधरा' इत्यादी कादंबऱ्या प्रकाशित.
• काव्याची वैशिष्ट्ये : समाजवास्तवावर प्रखर भाष्य, शोषणाचा तीव्र निषेध, मूल्यव्यवस्थेवर प्रहार करणारी उपरोधिक पण ओजस्वी
आक्रमक शब्दकळा हे कवींच्या काव्याचे विशेष आहेत.
• प्रस्तुत कवितेचा छंद : यमकप्रधान, चार ओळींचा सैल मुक्त बंध.

कवितेची मध्यवर्ती कल्पना


विषमतेने भरलेल्या मूल्यव्यवस्थेत जगत असताना जिवाची जी ससेहोलपट होते, त्या वेळी शब्दांनी (साहित्याने) कवीला आधार दिला. नकारांशी
सामना करणारी उमेद दिली. अशा प्रकारे शब्दांचे सामर्थ्य कवींनी आपल्या जगण्यातून कवितेत व्यक्त के ले आहे.

शब्दार्थ
आकान्त - आक्रोश, रुदन. निरुत्तर - अबोल. निखारे - अंगार. माउली - आई, माता. अंधारून - काळोखून. उजेड - प्रकाश. बिजली -
वीज. धारेत - प्रवाहात. निवारा - आश्रय, निवास. जहर - विष.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
१. पोटाशी घेणे - मायेने जवळ घेणे.
२. अंधारून येणे - (दुःखाने) पुढचा मार्ग न दिसणे.
३. हात देणे – मदत करणे, सहकार्य करणे.
४. सावली धरणे - आधार देणे.
५. तोल सावरणे - (मन) स्थिर ठेवणे.
६. धारेत सापडणे - (पुराच्या) प्रवाहात सापडणे.
७. पाठीवर हात ठेवणे - पाठिंबा देणे, आधार देणे.
८. उतराई होणे - उपकार फे डणे.
९. जहर पिणे – दुःख गिळणे.
कवितेचा भावार्थ
एकाकी जीवन जगत असताना, जेव्हा जेव्हा घोर संकटे आली व जीवन असाहाय्य झाले, तेव्हा तेव्हा शब्दांनी (साहित्याने) आपल्याला कसे
सावरले, याची हृदयद्रावक कहाणी वर्णन करताना कवी म्हणतात -
जेव्हा माझ्या दुःखांनी हंबरडा फोडला व आक्रोश करून शब्दांना हाका मारल्या, तेव्हा शब्दच माझ्या मदतीला धावून आले. मला असाहाय्य
करणाऱ्या निखाऱ्यांना म्हणजे बिकट संकटांना आई होऊन शब्दांनी पोटाशी घेतले. बिकट संकटात मला शब्दांनी मायेने जवळ घेतले व माझे सांत्वन
के ले. माझी संकटे शब्दांनी सुसह्य के ली.
दारिद्रय, दैन्य. द:ख यांच्या अंधारात जेव्हा मी चाचपडत होतो: डोळ्यांपुढे के वळ अंधार दाटला; पुढचा जीवनमार्ग दिसेनासा झाला; तेव्हा शब्दांनी
(साहित्याने) मला उजेड दाखवला. जीवनमार्ग प्रकाशित करण्यास शब्दांनी मदत के ली. जेव्हा एखादी जीवघेणी आठवण मला आगीने होरपळत
गेली; एखाद्या नकोशा आठवणीत माझ्या मनाची राख होऊ लागली; तेव्हा शब्दांनीच त्या धगधगत्या आगीवर प्रतिहल्ला के ला नि मला वाचवले.
जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात ऊन चिडू न सांडत होते, म्हणजे जेव्हा माझ्या आयुष्यात तापदायक प्रसंग आले, तेव्हा शब्दांनी माझ्यावर मायेची
सावली धरली. मला छत्र दिले. मला आधार व आश्रय दिला. जेव्हा दिवसाही अंधार दाटू न यायचा म्हणजे जेव्हा दुःखाचा अंधार गडद व्हायचा,
तेव्हा शब्दांनी हातात वीज दिली. दुःखाचा अंधार उजळण्याची उमेद दिली, हिंमत दिली.
पुढे चांगले आयुष्य जगण्यासाठी मागे झालेले अन्याय विसरायचे असतात. काही कटू प्रसंग भूतकाळातच गाडू न टाकायचे असतात. अशी जगणे
असह्य करणारी वेळ जेव्हा माझ्यावर आली, माझे पाय डगमगू
लागले, तोल जातोय असे जेव्हा वाटले, तेव्हा मला शब्दांनी सावरले व माझे मन स्थिर के ले. शब्दांनी माझा तोल सावरला. जीवन नकोसे होऊन मी
जेव्हा मरणाकडे ओढला गेलो, धारेत सापडलो, दुःखाच्या सागरात जेव्हा मी गटांगळ्या खाऊ लागलो. या तुफानातून बाहेर काढण्यासाठी शब्दांनी
मला किनारा दिला. मला सुखरूप पैलथडीला नेले.
मी कफल्लक होतो. माझ्यापाशी मला जगण्यासाठी काहीही नव्हते. फाटका होतो. दारिद्र्यात पिचत होतो. नगण्य झालो होतो. मला माझीच जेव्हा
भीती वाटत होती, तेव्हा शब्दांनीच माझ्या पाठीवर धीराचा हात ठेवला. मला धीर दिला. जगण्याची उमेद दिली. कधी सुखाच्या वाऱ्याने मला
टाळले. कधी मला कायमचा निवारा लाभला नाही. माझी ससेहोलपट झाली. मला आयुष्याने एके ठिकाणी स्थिर राहू दिले नाही, तेव्हा माझ्या
शब्दांनी (लेखनाने) मला निवारा दिला. आश्रय दिला.
मी निष्कांचन आहे. मी भिकारी आहे. मी शब्दांना काही देऊ शकत नाही. शब्दांचेच माझ्यावर ऋण आहे, कर्ज आहे. मी शब्दांचाच कर्जबाजारी
आहे. मी शब्दांचे देणे फे डू शकत नाही. मी शब्दांच्या उपकारांची परतफे ड करू शकत नाही. मीच शब्दांच्या अंतरंगात शिरलो आणि या निर्दय
दुनियेपासून स्वत:चा बचाव के ला. मी आयुष्यात दुःखाचे घोट प्यायलो. विष प्राशन के ले, पण ते माझ्याऐवजी माझ्या शब्दांनी पचवले. माझ्या
दुःखाचे विष पचवून शब्दांनी मला अमृतमय संजीवन दिले.

कृ ति-स्वाध्याय आणि उत्तरे


प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा :
कृ ती १ : (आकलन)
(१) कृ ती करा :
(१) कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका
(१) ___
(२) ___
(३) ___
(४) ___
(२) योग्य पर्याय निवडू न वाक्ये पूर्ण करा :
(१) बिकट संकटांना कवीने म्हटले - ___
(अ) पोटाशी घेणारे शब्द.
(आ) निरुत्तर निखारे.
(इ) धावून आलेले शब्द.
(२) शब्दांचा उजेड म्हणजे - ___
(अ) शब्दांचे मार्गदर्शन.
(आ) शब्दांची मदत.
(इ) शब्दांचा हल्ला.
(३) चिडू न सांडणारे ऊन म्हणजे - ___
(अ) कठीण प्रसंग.
(आ) झाडाची सावली.
(इ) तापदायक प्रसंग.
(३) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा :
(१) 'दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.'
(२) 'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'
(४) पुढील शब्द उत्तर येईल, असा प्रत्येकी एक प्रश्न तयार करा :
(१) आश्रय (२) शब्द.
(५) 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. किं बहुना शब्दांच्या उपकाराची फे ड करू शकत नाही,' या अर्थाच्या ओळी
शोधून लिहा.
(६) चौकटी पूर्ण करा :
(१) हाका घालणारा →\rightarrow
___
(२) निरुत्तर असणारे →\rightarrow
___
(३) आग घेऊन धावणारी →\rightarrow
___
(४) शब्दांनी कवीच्या हातात दिलेली →\rightarrow
___
(५) किनारा सरकवणारे →\rightarrow
___
(६) कवीला टाळणारे →\rightarrow
___, ___
(७) जहर पिणारा →\rightarrow
___
(८) प्रस्तुत कवितेचा संग्रह →\rightarrow
___
(९) कवीने स्वत:ला लावलेली बिरुदे . →\rightarrow
___, ___
आकान्ताने हाका घातल्या माझ्या
तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले,
माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना
माउलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले.
डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा
शब्दांच्याच उजेडाने हात दिला,
एखादी आठवण आग घेऊन धावली
तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला___
चिडू न चिडू न सांडत होते ऊन
तेव्हाही शब्दांनीच सावली धरली,
दिवसाही दाटायचा अंधार
तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली.
जगू न देणारे काही विसरायचे होते
तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला,
मरणाच्या धारेत सापडतो तेव्हा
शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.
काहीही नव्हते हाती, वाटे स्वत:चीच भीती
तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला,
कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले
तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला.
मी भिकारी : मी शब्दांना काय देऊ?
मी कर्जदार : शब्दांचा कसा उतराई होऊ?
मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचविले :
जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले.
(स्वप्नसंहिता)
उत्तरे
(१) (१) माउलीप्रमाणे कवीला पोटाशी धरले.
(२) कवीच्या तापदायक गोष्टींवर सावली धरली.
(३) कवीचा तोल सांभाळला.
(४) मरणापासून कवीचा बचाव के ला.
(२) (१) बिकट संकटांना कवीने म्हटले- निरुत्तर निखारे.
(२) शब्दांचा उजेड म्हणजे - शब्दांचे मार्गदर्शन.
(३) चिडू न सांडणारे ऊन म्हणजे- तापदायक प्रसंग.
(३) (१) दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या माणसाला कु णाचातरी आश्वासक उजेडाचा आधार लागतो. म्हणून कवी म्हणतात की, जेव्हा
जेव्हा दिवसाढवळ्या अंधार दाटू न आला, तेव्हा . शब्दांनीच हातात वीज दिली म्हणजे जगण्याचा आधार दिला.
(२) आत्यंतिक दुःखाच्या वेदना सहन करताना माणसाला मरण पत्करावे लागते. कवी म्हणतात, जेव्हा जेव्हा माझ्या मनात मरणाचा विचार आला.
मरण जवळ करावे, या विचाराच्या धारेत (प्रवाहात) अडकलो, तेव्हा शब्दांनीच या गर्तेतून मला बाहेर काढले. जणू तुफानात घेरलेल्या मला किनारा
दाखवला; बुडताना वाचवले.
(४) (१) आश्रय - निवारा नसताना कवीला शब्दांनी काय दिले?
(२) शब्द - कवीचा तोल कु णी सावरला?
(५) (१) मी भिकारी : मी शब्दांना काय देऊ?
(२) मी कर्जदार : शब्दांचा कसा उतराई होऊ?
(६) (१) आकांत (२) निखारे (३) आठवण
(४) बिजली (५) शब्द (६) वारा, निवारा
(७) कवी (८) स्वप्नसंहिता (९) भिकारी, कर्जदार
कृ ती २ : (काव्यसौंदर्य)
(१) 'एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला___' या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
उत्तर : 'शब्द' या कवितेत कवी यशवंत मनोहर यांनी त्यांच्या है अंधारमय जीवनात शब्दांनी कसा दिलासा दिला व त्यांचे जीवन सावरले, यांचे हृदय
शब्दांत वर्णन के ले आहे.
ते म्हणतात- शब्दांनी माझ्या जीवनातला आकांत शमवला. माझ्यावर मातेसारखी ममता के ली. जेव्हा जेव्हा मी दुःखाच्या अंधारात गाडला गेलो,
तेव्हा तेव्हा शब्दांनी मला प्रकाश दाखवला. गतकाळातली एखादी आठवण वैऱ्यासारखी छळत राहते व जीव अस्वस्थ करते. त्या आठवणीच्या
आगीत जिवाची लाही लाही होते. त्या आठवणीची धग नकोशी वाटते. अशी एखादी आठवण जेव्हा आगीसारखी माझ्या अंगावर धावत आली, तेव्हा
त्या होरपळणाऱ्या आगीचा हल्ला शब्दांनी स्वतः झेलला. मला त्यातून सुखरूप बाहेर काढले. हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्याचे सामर्थ्य मला शब्दांनीच
बहाल के ले.
'आठवणींची आग' या प्रतिमेतून आठवणीची दाहकता प्रकर्षाने जाणवते. 'हल्ला' या शब्दातून आवेग जाणवतो. या ओळीतून कवीने दु:खाची तीव्रता
व शब्दाची शक्ती प्रत्ययकारीरीत्या मांडली आहे.
(२) 'मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.' या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर : कवी यशवंत मनोहर यांनी 'शब्द' या कवितेमध्ये शब्दाला त्याच्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे आणि स्वतः आपण शब्दांच्या
आश्रयाला का आलो, याचे विवेचन आर्त व भावपूर्ण शब्दांत
मांडले आहे. त्याच वेळी 'साहित्य हे जीवनाला आधारभूत ठरते,' हा ठोस विचारही मांडला आहे.
कवी म्हणतात- शब्दांनी मला आयुष्यभर सावरले. जगण्याची उमेद दिली. आईच्या ममतेने आधार दिला. मी भिकारी आहे, मी शब्दांना काहीच
देऊ शकत नाही. मी कर्जबाजारी आहे, मी शब्दांचे ऋण कधीच फे डू शकत नाही. माझ्या अंधारमय आयुष्यात मी कै क वेळा शब्दांच्या कु शीत
शिरलो. स्वत:चा बचाव के ला. दुःखाचे विष मी प्यायलो, पण ते पचवले शब्दांनी! मी शब्दांविषयी कृ तज्ञ आहे.
'विष मी प्यालो नि शब्दांनी पचविले' या विधानातून कवींची शब्दांबद्दलची कृ तार्थता व्यक्त होते. 'शब्द आमुच्या जिवाचे जीवन !' ही संत
तुकारामांच्या उक्तीची आठवण व्हावी, असे सामर्थ्य या ओळीत आहे. आणि जीवनातील विष पचवण्याचे सामर्थ्य कमवायला हवे हा दृढ विचार व्यक्त
झाला आहे.
कृ ती ३ : (अभिव्यक्ती)
(१) आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त के ले आहेत, ते लिहा.
उत्तर : 'शब्द' या कवितेमध्ये कवी यशवंत मनोहर यांनी वाट्याला आलेल्या आपल्या खडतर व समस्याप्रधान आयुष्यात शब्दांनी कसे सावरले व
उमेदीत आयुष्य जगण्याचा कसा धीर दिला, याचे हृदयद्रावक वर्णन के ले आहे.
त्यांच्या आयुष्यात अनेक नकार वाट्याला आले. आयुष्यात आलेल्या बिकट संकटांना त्याने निरुत्तर निखारे असे म्हटले आहे. जीवनात न
सापडलेल्या योग्य दिशेला, त्यांनी डोळ्यांसमोर आलेला अंधार म्हटले आहे. गतकाळातील कटु आठवण त्यांना आगीसारखी होरपळून टाकणारी
वाटते. आयुष्यातील तापदायक प्रसंगांना ते चटके देणारे ऊन म्हणतात. असे जगू न देणारे नकार त्यांना मरणाच्या प्रवाहात ढकलतात. स्वतःच्या
अस्तित्वाचीच त्यांना भीती वाटू लागते.
अशा प्रकारच्या भयकारी नकार आणि बिकट दुःखदायी आयुष्यात कवीला फक्त साहित्याचा आधार वाटतो.
(२) 'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
उत्तर : कवी यशवंत मनोहर यांनी 'शब्द' या कवितेत दुःखाने भरलेल्या आयुष्यात शब्दांची समर्थ साथ आवश्यक असल्याचा ठाम विचार मांडला
आहे. संघर्षमय व खडतर आयुष्यात शब्दच धीर देतात व जगण्याची उमेद वाढवतात, असा संदेश त्यांनी दिला आहे.
कवींच्या दुःखद आक्रोशाच्या हाके ला शब्द तत्परतेने धावून आले. कवींच्या बिकट संकटांच्या वेळी शब्दांनी आईच्या ममतेने पोटाशी घेतले.
आगपाखड करणारी आठवणीची आग जेव्हा तुटू न पडली, तेव्हा शब्दांनी तो हल्ला झेलला. तापदायक प्रसंगात शब्दांनीच त्यांच्यावर सावली धरली.
दुःखाचा दाट अंधार भेदण्यासाठी कवींच्या हातात शब्दांनी लखलखीत वीज दिली. खडतर आयुष्याचा तोल शब्दांनीच सावरला. मरणप्राय यातनांच्या
प्रवाहातून शब्दांनी किनाऱ्याशी नेले. जेव्हा स्वत:वरचा व जगण्यावरचा कवींचा विश्वास उडाला, तेव्हा शब्दांनी पाठीवर हात ठेवून धीर दिला.
निराधार भटकत असताना शब्दांनीच त्यांना आश्रय दिला. कवींच्या आयुष्यातील कठोर प्रसंगांचे विष स्वतः शब्दांनी पचवले.
अशा प्रकारे जीवनातील प्रत्येक जीवघेण्या वळणावर कवींना शब्दांनीच सावरले. म्हणून शब्द म्हणजेच कवींचे जीवन जगण्याचे सामर्थ्य होते.
(३) 'मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व' तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : इतिहास, भूगोल, भाषा व साहित्य यांतून संस्कृ ती जन्माला येते. संस्कृ ती जीवनधारणेची मूल्ये जोपासते. यांत भाषा म्हणजे शब्द यांचे
महत्त्व अनन्यसाधारण आहे.
जन्माला आलेले मूल शब्द शिकत जाते व भाषेतून व्यक्तिमत्त्व संपन्न होते. म्हणून शब्द ही मानवजातीला लाभलेली अमूल्य देणगी आहे. शब्दांमधून
माणूस आपले विचार, भावना व कल्पना मांडतो. शब्द हे विचारविनिमयाचे अनोखे साधन आहे. शब्द हा माणसाचा उबंदार श्वास आहे. शब्दांनी
जगातील वेगवेगळ्या संस्कृ ती एकमेकांशी जोडल्या आहेत. शब्दांतून माणुसकीचे जतन व संवर्धन होते. आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे
शब्द हे समर्थ साधन आहे. जनावरे व आपण यांतला भेद शब्दांमुळे कळतो. नराचा नारायण करण्याची अमोघ शक्ती शब्दांमध्ये आहे. साहित्य,
शास्त्र, कला व विज्ञान यांचा मूलाधार शब्दच आहे. मानवी जीवनमूल्ये शब्दांमध्ये साठवलेली आहेत. शब्द हे एकाच वेळी शस्त्र व शास्त्रही आहे.
परंपरा आणि नवता या शब्दांमधून पिढीला आकळतात. असा हा अनन्यसाधारण शब्द मानवी जीवनाचे 'जीवन' आहे.
रसग्रहण
• 'शब्द' या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर : अतिशय खडतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शब्दांची साथ होती, शब्दांनीच माझ्या आयुष्याचा डळमळता डोलारा सांभाळला असा आशय
व्यक्त करणारी कवी यशवंत मनोहर यांची 'शब्द' ही कविता आपल्याला शब्दांच्या संगतीने सकारात्मक व समृद्ध जीवन जगण्याची प्रेरणा देते.
विषमतेने अंकित झालेल्या मूल्यव्यवस्थेमध्ये जिवाची काहिली करत जगताना शब्दांनी नकारांशी सामना करण्याची जिद्द दिली, ही या कवितेची
मध्यवर्ती कल्पना आहे. जगण्याला सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये व पर्यायाने साहित्यात असते, हा अनमोल संदेश देणारी ही कविता
आहे.
पदोपदी जगण्याला बळ देणारे शब्द किती मौल्यवान आहेत, ही जाणीव स्वानुभवातून कवींनी आत्मीय व भावपूर्ण शब्दांमध्ये साकारली आहे. त्यांच्या
या सुबोध पण काळजाला भिडणाऱ्या शब्दशैलीतून कवितेचा आशय सघन झाला आहे. शब्दांचे अपूर्व सामर्थ्य विशद करताना त्यांनी अनेक हृदय
प्रतिमा वापरलेल्या आहेत. 'निरुत्तर निखारे, शब्दांचा उजेड, आठवणींची आग, चिडके ऊन, शब्दांची बिजली, शब्दांनी दिलेला किनारा,' अशा
अनोख्या पण आशयघन प्रतिमांतून कवितेचा भावार्थ दृग्गोचर होतो.
चार-चार ओळींचा सैल यमकप्रमाध पदबंध असलेली ही कविता थेट विधानात्मक असल्यामुळे रसिकांच्या काळजाचा ठाव घेते. प्रासादिक असलेली
शब्दकळा विचारगर्भतेला पूरक ठरली आहे. ठोस व दृढ जीवनाशय देणारी 'शब्द' ही कविता मला अत्यंत आवडली.

व्याकरण व भाषाभ्यास
अ व्याकरण घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दशक्ती :
• पुढील ओळीतील शब्दशक्ती ओळखा : उत्तरे
(१) काहीही नव्हते हाती, वाटे स्वत:चीच भीती तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला.→\ \rightarrow
आभधा
(२) चिडू न चिडू न सांडत होते ऊन तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. →\rightarrow
व्यंजना
(३) मी भिकारी : मी शब्दांना काय देऊ?
मी कर्जदार : शब्दांचा कसा उतराई होऊ? →\rightarrow
लक्षणा
२. काव्यगुण :
• पुढील ओळींतील काव्यगुण ओळखा :
(१) माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माउलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. →\rightarrow
माधुर्य
(२) एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. →\rightarrow
ओज
(३) कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला.→\ \rightarrow
प्रसाद
३. काळ :
• कं सांतील सूचनांप्रमाणे बदल करा :
(१) मी जहर प्यालो. (अपूर्ण वर्तमानकाळ करा.)
(२) शब्दांनीच तोल सावरला. (अपूर्ण भूतकाळ करा.)
(३) शब्दांनी पाठीवर हात ठेवला. (अपूर्ण भविष्यकाळ करा.)
उत्तरे : (१) मी जहर पीत आहे.
(२) शब्द तोल सावरत होते.
(३) शब्द पाठीवर हात ठेवत असतील.
४. शब्दभेद :
• पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
(१) पाठ →\rightarrow
___, ___
(2) वात →\rightarrow
___, ___
उत्तरे :
(१) पाठ →\rightarrow
शरीराचा अवयव, पाठांतर
(२) वात →\rightarrow
वारा, ज्योत
आ भाषिक घटकांवर आधारित कृ ती
१. शब्दसंपत्ती :
(१) समानार्थी शब्द लिहा :
(१) माउली ==
___
(२) आग ==
___
(३) मरण ==
___
(४) किनारा ==
___
(५) निवारा ==
___
(६) जहर ==
___
उत्तरे :
(१) माउली ==
आई
(२) आग ==
वन्ही
(३) मरण ==
मृत्यू
(४) किनारा ==
काठ
(५) निवारा ==
निवास
(६) जहर ==
विष
(२) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) उजेड ×\times
___
(२) आठवण ×\times
___
(३) ऊन ×\times
___
उत्तरे :
(१) उजेड ×\times
अंधार
(२) आठवण ×\times
विस्मरण
(३) ऊन ×\times
सावली
(३) 'कर्जदार'सारखे चार शब्द लिहा.
उत्तर : (१) चौकीदार (२) रखवालदार
(३) दावेदार (४) हकदार.
(४) 'निरुत्तर'सारखे चार शब्द लिहा.
उत्तर : (१) निर्विकार (२) निर्लज्ज
(३) निर्मळ (४) निर्गुण.
(५) गटात न बसणारा शब्द लिहा : उत्तरे
(१) किनारा, काठ, थड, तीर, - किनार
(२) वारा, पवन, सदन, वात, - सदन
२. लेखननियम :
• पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा :
बीजली - ___
भीकारी - ___
दीवस - ___
नीवारा - ___
नीरूतर - ___
कीनारा - ___
उत्तरे :
बीजली - बिजली
भीकारी - भिकारी
दीवस - दिवस
नीवारा - निवारा
नीरूतर - निरुत्तर
कीनारा - किनारा
३. वाक्प्रचार :
जोड्या लावा :
वाक्प्रचार अर्थ

(१) उतराई होणे मायेने जवळ घेणे

(२) सावली धरणे सहकार्य करणे

(३) पोटाशी घेणे उपकार फे डणे

(४) हात देणे आधार देणे

उत्तरे :

वाक्प्रचार अर्थ

(१) उतराई होणे उपकार फे डणे

(२) सावली धरणे आधार देणे

(३) पोटाशी घेणे मायेने जवळ घेणे

(४) हात देणे सहकार्य करणे

४. पारिभाषिक शब्द :
• पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा : उत्तरे
(१) Encyclopedia →\rightarrow
विश्वकोश
(२) Hygiene →\rightarrow
आरोग्यशास्त्र
(३) Industrialization →\rightarrow
औद्योगिकीकरण
(४) Labour Welfare →\rightarrow
कामगार कल्याण
(4) Meteorology →\rightarrow
हवामानशास्त्र
(६) Minute Book →\rightarrow
कार्यवृत्त पुस्तक
(७) Notification →\rightarrow
अधिसूचना
(८) Personal Assistant →\rightarrow
स्वीय सहायक

११. वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार


- सुमती देवस्थळे
लेखक परिचय
सुमती देवस्थळे
सुमती देवस्थळे या एक ख्यातनाम लेखिका. खासकरून चरित्र लेखिका म्हणून प्रसिद्ध. लिओ टॉलस्टॉय, कार्ल मार्क्स यांसारख्या महान व्यक्तींची
चरित्रे लिहिली. त्या व्यक्तींविषयी आणि त्यांच्या विचारविश्वाविषयी विलक्षण जिव्हाळा. त्यामुळे अत्यंत आत्मीयतेने चरित्रलेखन के ले गेले. जिव्हाळा,
आत्मीयता आणि प्रवाही लेखनशैली यांमुळे त्यांनी लिहिलेली चरित्रे लोकप्रिय झाली. 'टॉलस्टॉय-एक माणूस' या चरित्रामुळे त्या प्रसिद्धीच्या उंच
शिखरावर गेल्या. चरित्रलेखनासाठी आवश्यक ती चिकाटी, चिकित्सक वृत्ती, तटस्थपणा आणि संशोधनासाठी प्रचंड कष्ट घेण्याची तयारी या
गुणांमुळे त्यांनी लिहिलेली चरित्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
लिओ टॉलस्टॉय
जगातील महान लेखकांपैकी एक लेखक. कादंबरी, कथा, नाटक, निबंध इत्यादी वाङ्मयप्रकारांमध्ये उच्च दर्जाचे लेखन. आई-वडील लहानपणीच
गेले. त्यांच्या आत्याने त्यांचे पालनपोषण के ले. घोडेस्वारी, शिकार, नृत्य, गायन इत्यादी कला-कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवले. दरम्यान तीन-चार
वर्षे युरोपचा दौरा के ला. तिथल्या शिक्षण पद्धतींचा अभ्यास के ला. त्यानंतर स्वतःच्या गावी परतल्यावर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू के ली.
या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे प्रचलित शिक्षण पद्धत आणि पास-नापास ठरविण्याची पद्धत या गोष्टी बाजूला सारलेल्या होत्या. 'वॉर अँड पीस'
आणि 'अॅना कॅ रॅनिना' या दोन कादंबऱ्यांनी त्यांना फार मोठ्या वाङ्मयीन उंचीवर नेऊन ठेवले.

शब्दार्थ
मातृविहीन - आई लहानपणीच मरण पावली आहे अशी व्यक्ती. न्यून - कमतरता, उणीव. तान्हेपण - आईच्या अंगावरचे दूध पीत असण्याचा काळ.
दाई - बाळाला सांभाळणारी मदतनीस स्त्री. काळाभोर - दाट काळा, आत्यंतिक काळा. संकलित - एकत्रित. दृक्प्रत्यय - डोळ्यांनी घेतलेला
अनुभव, दृश्य अनुभव. आत्म शोधन - स्वतःच्या आत्म्याचा/मनाचा शोध घेणे. अंतःस्रोत - स्वतःच्या मनात खोलवर असलेले उगमस्थान. पिंजण
– पिंजण्याची क्रिया. मूलस्रोत - उगमस्थान, मूळ प्रवाह. अगत्य – कळकळ, आत्मीयता, मनःपूर्वकता. मसलत - विचारविनिमय, चर्चा.
झपाझप – पटापट निढळाच्या - कपाळाच्या (निढळ = कपाळ). कालक्रमणा - जीवन जगणे, दिवस घालवणे. विस्मयावह - आश्चर्यकारक
(विस्मय = आश्चर्य). स्मृतिमंजूषा - आठवणींचा कोश, आठवणींचा साठा. परिष्करण - नवीन नवीन कल्पनांप्रमाणे, विचारांप्रमाणे के लेले बदल.
चोखंदळपणा - शुद्ध ते शोधण्याची वृत्ती. शब्दसंहती - शब्दांची रूपे, शब्दांचा संग्रह. चिताडणे - चितारणे, चित्ररूप देणे, चित्रित करणे.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) मनाची पाटी कोरी असणे - मनात कोणत्याही कल्पना, भावना किं वा विचार नसणे.
(२) अगत्याचे वाटणे - मनापासून वाटणे.
(३) रस घेणे - आवड वाटणे.
(४) दमछाक होणे - खूप थकू न जाणे.
(५) कालक्रमणा करणे - जीवन जगत राहणे.
(६) वाकवळणे घेणे - अडथळे, अडीअडचणी येणे.
(७) अवाक् होणे - थक्क होणे.
(८) स्मृतिकण वेचणे - आठवणी गोळा करणे.
(९) स्मृतिमंजूषेत साठवून ठेवणे - स्मरणात ठेवणे.
(१०) कृ तकृ त्य वाटणे - धन्य वाटणे.
टीप
• भूमिती श्रेणी : अंकगणिती श्रेणी व भूमिती श्रेणी या गणितातील दोन संकल्पना आहेत. हे उदाहरणांच्या साहाय्याने समजावून घेऊ.
(१) अंकगणिती श्रेणी :
१, २, ३, ४, ५, ६,___
४, ७, १०, १३, १६, १९,___
वर दोन संख्यामालिका दिल्या आहेत. त्यांपैकी पहिल्या संख्या मालिके तील प्रत्येक संख्या लगतच्या मागील संख्येपेक्षा एकने जास्त आहे.
दुसऱ्या संख्यामालिके तील प्रत्येक संख्या लगतच्या मागील संख्येपेक्षा तीनने जास्त आहे.
एखाद्या मालिके तील लगतच्या कोणत्याही दोन संख्यांमधील अंतर सारखेच असते. कितीही मोठी मालिका घेतली किं वा ती कितीही वाढवीत नेली,
तरी तेवढ्याच फरकाने पुढची संख्या वाढणार. म्हणजे वाढीचा वेग तोच राहतो. वेग कमी होत नाही किं वा जास्त होत नाही. एखाद्या गोष्टीच्या वाढीचा
वेग जेव्हा जास्त नसतो किं वा कमीही नसतो, तेव्हा त्या वाढीला अंकगणिती श्रेणीची उपमा देतात.
(२) भूमिती श्रेणी : (पुढील श्रेणी पाहा :)
२, ४, ८, १६, ३२, ६४, १२८, २५६,___
या श्रेणीमधील कोणतीही संख्या मागील संख्येच्या दुप्पट आहे. यामुळे लगेच या दोन संख्यांमधील फरक हा सारखा राहत नाही.
लगेच या दोन संख्यांमधील फरक पुढे पुढे वाढत जातो. वाढत जातो म्हणजे दुप्पट होत जातो. त्यामुळे पुढे येणारी प्रत्येक संख्या झपाट्याने वाढलेली
दिसते. यामुळे कोणतीही गोष्ट अशी झपाट्याने वाढत असली की तिच्या वाढीला भूमिती श्रेणीची उपमा देतात.

You might also like