You are on page 1of 2

।। हरे कृ ष्ण ।।

श्रील प्रभुपादजी - आपल्या चरणाशी निवेदन


आदरणीय परमगुरूदेव श्रील प्रभुपादजी, आपल्या चरणाशी जडभरत दास चा साष्टांग दंडवत
प्रणाम.
आपण अतीशय कष्ट घेऊन आपल्या गुरूं ची आज्ञा पुर्तीसाठी अतीशय खडतर परिश्रम
घेतले व आम्हास भगवंतांच्या व आपल्या चरणाचा आश्रय प्रदान के लात. त्याबद्दल आपले
ऋण आम्ही जन्मोजन्मी फे डू शकत नाही.

आपली तीव्र इच्छा व तळमळ होती की Back To Godhead ( जाऊ देवाचिया गावा /
भगवद्दर्शन ) या मासिकाचे लाखोंच्या मात्रेमध्ये वितरण व्हावे. तसेच आपण एकदा म्हटला
होता की आपण असे प्रयत्न करावेत की सर्वकाही आपणावरच निर्भर आहे. आपल्या या
विधानाप्रमाणे खरेतर ही १ लाख संख्या हे मी एकट्यानेच के ले पाहीजे. परंतु हे माझे मोठे
दुर्देव आहे की आपल्या इच्छा व तळमळीस माझ्याकडून पूर्ण शक्तिने प्रतीसाद दिला जात
नाही.

इस्कॉन, श्री गोविंद धाम येथील अनेक भक्त अनेक वर्षांपासून आपल्या या प्रिय सेवेच्या
माध्यमातून प्रचारामध्ये संलग्न आहेत. म्हणून आत्तापर्यंत आम्ही सर्वांनी मिळुन के लेली
२५०० ते ३००० पर्यंत सभासद संख्या होती. परंतु सध्या सभासद संख्या १००० पर्यंत
आल्याने आपले प्रिय मासिक बंद करण्याच्या परिस्थितीमध्ये आले होते.

आपल्या व भगवंतांच्या कृ पेने आम्ही १ लाखही करू शकु . परंतु सध्या आम्ही सर्व भक्त
मिळुन के वळ - १० हजार सभासद संख्या करण्याचे उद्धिष्ट ठेऊन एप्रिल - २०२२ साठी
मराठी : ९०००, हिंदी : ६०० इंग्रजी : ३५० व इतर भाषा ५० अशी एकु ण १० हजार
मासिकाची ऑर्डर पाठवित आहे.

सध्या १००० सभासद नोंदणी झाली आहे. वेळ कमी आहे व मोठी जोखीम घेऊन ही
ऑर्डर पाठवित आहे. आपल्या आशिर्वादानेच हे ध्येय व कार्य सफल होईल.

आपल्या चरणाशी विनम्र निवेदन :


1) आपल्या प्रिय या सेवेमध्ये संलग्न होणाऱ्या सर्व भक्तांना शक्ती, बुद्धी व आशिर्वाद प्रदान
करावेत.
2) सर्वांकडून भरपूर प्रमाणात सभासद नोंदणी व प्रचार घडून हजारो जीव भगवंतांच्या
चरणाशी येवोत.
3) तसेच या सेवेत जे भक्त सलग्न होतील त्यांना आपण भगवदधामी व आपल्या चरणाशी
प्राप्त होण्याचा आशिर्वाद प्रदान करावा ही विनंती.

आपला सेवक - जडभरत दास व


समस्त गोविंद धाम भक्त परिवार

हरे कृ ष्ण हरे कृ ष्ण कृ ष्ण कृ ष्ण हरे हरे ।


हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।

!! श्री श्री राधा गोविंद देव की जय !! !! श्री श्री गौर निताई की जय !! !! श्रील
प्रभुपाद की जय !!

You might also like