You are on page 1of 3

प्रजाहितदक्ष सम्राटांचे शिलाले ख

सम्राट अशोक यांचे वर्णन अने क अभ्यासकांनी एक मु त्सद्दी, प्रजाहितदक्ष, दरू दृष्टी, अतिमहत्त्वाकां शी,
तीक्ष्ण बु दधि ् मत्ता, इतिहासकार, प्रचं ड सामर्थ्य आणि प्रशासकीय पकड असले ला सम्राट म्हणून केली
आहे . त्याचबरोबर सम्राट अशोक हे अभ्यासू, चिं तनशील आणि प्रॅक्टिकल 'धम्मदायाद' होते . १९व्या
शतकापूर्वी, प्राचीन भारताचा इतिहास हा केवळ ऐकीव आणि काल्पनिक मिथकांचा आधारे मांडला गे ला
होता, मात्र जे व्हा सम्राटां च्या शिलाले खांचे वाचन झाले , त्यावे ळेस भारताचा प्राचीन इतिहास खऱ्या
अर्थाने उजे डात आला! दगडात कोरले ले हे शिलाले ख अने क अर्थाने महत्त्वाचे ठरले . भारताची सर्वात
प्राचीन बोलली जाणारी भाषा आणि तिची लिपी, सामाजिक सं स्कृती, त्याकाळातील राज्यांची व राजांची
नां वे, शे जारच्या राष्ट् रांची सीमारे षा व ते थील राजांची नां वे, प्रशासकीय किंवा सै न्याची, यु द्धाची तसे च
व्यापार, शे ती, आर्थिक उलाढालीची माहिती या शिलाले खांमुळे कळाली. सम्राट अशोकां च्या काळी
प्रस्तर कला भरभराटीला आली. सम्राट अशोकांनी दिले ल्या आदे शानु सार दगडात ले णीं कोरणे ,
शिलाले ख लिहिणे तसे च अने क स्तूप निर्मिती यांमुळे दगडात काम करणाऱ्या कारागिरांना मु बलक काम
मिळू लागले . शिलाले ख लिहिताना आधी दगड गु ळगु ळीत केला जायचा आणि मग त्याच्यावर
सम्राटाचा सं देश लिहिला जायचा. हे सर्व शिलाले ख सम्राट अशोक यां च्या राज्याच्या सीमे वर दगडां वर
किंवा स्तं भावर लिहिले गे ले आहे त. गे ल्या ५०-६० वर्षांत सम्राट अशोक यांचे अने क शिलाले ख सापडले
आहे त. दगडावर सं देश का कोरून ठे वले याचे स्पष्टीकरण दे ताना सम्राट अशोक यांनी दीर्घ स्तं भ ले ख
क् र.२ मध्ये लिहिले आहे कि "अठाये इयं धम्मलिपि लिखापिता हे वं अनु पटिपजं तु चिलं थितिका च होतु
तीति ये च हे वं सं पटिपजीसति सु कट कछती ति" म्हणजे च मी हे धम्मलिपी मध्ये लिहन ू ठे वले जे णेंकरून
लोक त्याचे अनु सरण करतील आणि (हे शिलाले ख) अनं त काळ टिकतील आणि लोक त्यांचे आयु ष्य सु कृत
करतील. म्हणजे च शिलाले ख कोरून घे णे हा सम्राट अशोक यांचा अत्यं त दरू दृष्टीपणा म्हणावा लागे ल.
स्वातं त्र्यपूर्व काळात शोधले ले सम्राट अशोक यां च्या शिलाले खात गे ल्या ६० वर्षांमध्ये नवीन भर पडली
आहे . आजमितीस त्यांचे दहा दीर्घ प्रस्तरले ख, बावीस लघु प्रस्तरले ख, सात दीर्घ स्तं भले ख, पाच लघु
स्तं भले ख आणि तीन ले णीं शिलाले ख सं शोधित असून त्यातून त्याकाळातील सामाजिक, राजकीय,
आर्थिक आणि धार्मिक इतिहास कळायला मदत होते . भारतातील सर्व शिलाले ख हे पालि प्राकृत भाषा
आणि धम्मलिपित लिहिले असून, पाकिस्तान ये थील मनशे रा शिलाले ख खरोष्ठी लिपित तर गां धार,
अफगाणिस्तान ये थील शिलाले ख ग्रीक आणि अरमायिक लिपि मध्ये लिहिले आहे त. सम्राट अशोक
यांचे १४ ले खांचा समूह असले ले दीर्घ प्रस्तरले ख दहा ठिकाणी कोरले ला असून त्यात गिरनार (गु जरात),
कालसी (उत्तराखं ड), धौली, जौगढ (उडीसा), सोपारा (महाराष्ट् र), ये र्रागु डी (आं धर् प्रदे श), सन्नती
(कर्नाटक), खं दाहर (अफगाणिस्तान) आणि शाहबाझगढी, मनशे रा (पाकिस्तान). लघु प्रस्तर ले ख वीस
ठिकाणी कोरण्यात आले असून त्यात ससाराम (बिहार), रुपनाथ, गु जर्रा, (मध्यप्रदे श), सारू मारू
(छत्तीगढ), ब्रह्मगिरी, सिद्धपूर, जटिन्ग रामे श्वर, मस्की, पालकीगु ं डा, गाविमठ, उद्दे गोळा, नित्तूर
(कर्नाटक), ये र्रागु डी, राजु ला मं डगीरी (आं धर् प्रदे श), भाब्रु (राजस्थान), बै राट (कलकत्ता), धौली, जौगढ
(उडीसा), बहापूर (दिल्ली), लाघमान (अफगाणिस्तान) आणि महास्थानगढ (बां गलादे श) या ठिकाणी
पाहायला मिळतात. सात ले खांचा समूह असले ले दीर्घ स्तं भले ख हे टोपरा, मे रठ (दिल्ली), अलाहाबाद
(उत्तरप्रदे श), लौरिया नं दनगढ, लौरिया अराराज, रामपूरवा (बिहार) आणि खं दाहर (अफगाणिस्तान) ये थे
आहे त तर लघु स्तं भले ख हे सारनाथ, अलाहाबाद (उत्तरप्रदे श), सांची (मध्यप्रदे श), रुम्मनदे ई, निगलवी
(ने पाळ) ये थे आहे त. या व्यतिरिक्त बराबर ले णीं समूहात तीन ठिकाणी शिलाले ख कोरले ले आहे त.
या सर्व शिलाले खाचा अभ्यास केला तर आपल्याला सम्राट अशोक यांची नीतिपर शिकवण वाचायला
मिळते . बु द्ध विचारांचा प्रभाव त्यां च्यावर आधीपासून होता, मात्र राज्याच्या प्राबल्यासाठी त्यांना यु द्ध
करणे दे खील गरजे चे होते म्हणून त्यांनी राज्याच्या सु रक्षिते साठी कलिं ग यु द्ध केले , मात्र यु द्धातील हानी
पाहिल्यानं तर, त्यांना बु द्धविचारांची प्रचं ड जाणीव झाली आणि इथून पु ढे 'प्रेम आणि मै तर् ीचे यु द्ध'
करायचे असा निश्चय त्यां च्या १३व्या शिलाले खात दिसतो. सण, उत्सव, मे ळा किंवा होम मध्ये प्राण्यांची
हिं सा करू नये असे सां गतानाच ते स्वतःचे उदाहरण दे तात आणि प्राणी हिं सा थांबविण्याचे आवाहन
करतात. लोकांनी प्राणी हिं सा थांबवावी म्हणून सम्राट अशोक टोपरा ये थील शिलाले खांत पूर्णिमा,
अमावस्या, अष्टमी आणि चतु र्दशी या दिवशी मांसाहार टाळण्याचे आवाहन करतात. प्राण्यांना
डागण्यात दे खील ये ऊ नये असे ते स्पष्ट करतात. याही पु ढे जाऊन दुसऱ्या दीर्घ प्रस्तर शिलाले खात ते
लिहितात कि राज्यातील तसे च सीमे लगतची सर्व राष्ट् रांमध्ये ते मनु ष्य आणि जनावरांसाठी दवाखाने ,
औषधालय, आरामगृ ह आणि पाणपोई सु रु केली आहे . विशे ष म्हणजे औषधांसाठी लागणाऱ्या झाडांची
लागवड प्रत्ये क ठिकाणी केली आहे . रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडी लावली आहे जे णेंकरून प्रवास
करताना मनु ष्य आणि जनावरांना त्रास होऊ नये ! सर्व मनु ष्यांना त्यांचे धर्म जोपासण्याचे स्वातं त्र्य आहे हे
मान्य करतानाच, इतर धर्माची तत्वे समजून घ्या, विचारांची आदान प्रदान करा, चर्चा करा, इतर धर्माची
चां गली मते स्वीकार, तसे च सर्व धर्माची लोके यांनी एकत्र राहणे असे दे खील सम्राट सु चवतात. यावरून
हे लक्षात घे तले पाहिजे कि अशोकांनी जरी बौद्ध धम्म स्वीकारला असला तरी त्यांनी इतर सं पर् दायावर
अन्याय केला नाही, उलट एकमे कांना समजून घ्यायला सां गितले हे त्यां च्या ५व्या, ७व्या आणि १२व्या
शिलाले खात वाचायला मिळते . लोकं सण, उत्सव, लग्न किंवा मे ळे ये थे वायफळ खर्च करतात, त्यापे क्षा
त्यांनी कमी खर्च करून, बचत करावी असा सल्ला ९व्या शिलाले खांत दे तात. लोकांनी वृ द्ध व्यक्तींप्रती
आदर राखावा, आईवडिलांची से वा करावी, से वकां शी योग्य वागावे , गु रूंबद्दल आदर असावा, प्राण्यांबद्दल
करुणा असावी असे ही सां गतात. ८व्या शिलाले खांत अशोक लिहितात कि पूर्वी राजे मृ गांची शिकार
करण्यासाठी वनविहार करीत, मात्र आता धम्मयात्रा करण्यासाठी राजा बाहे र पडतात. रुपनाथ आणि
सासाराम ये थील स्तं भले खात सम्राट लिहितात कि प्रजे चे प्रश्न सोडविण्यासाठी ते गे ली '२५६ रात्री'
राज्याच्या दौऱ्यावर आहे त!
बौद्ध धम्म स्वीकारल्याचे सम्राट खं दाहार ये थील शिलाले खात स्पष्ट करतात तसे च लोकांनी
मातापित्यांची से वा करावी, से वकां शी नीट वागावे , ब्राह्मण श्रमणांना दान द्यावे , प्राणी हिं सा करू नये
असे नीतिपर शिकवण दे तात. लोकांनी धम्म (शीलवान आचरण) करावे असे ही आवाहन १०व्या
शिलाले खांत दिसते तसे च धम्माचे पालन व कोणावर अन्याय होत नाही यासाठी सम्राट यु क्त, रज्जु का
आणि प्रादे शिक अधिकाऱ्यांची नियु क्ती करतात. तसे च त्यांनी दर पाच वर्षांनी त्यां च्या विभागाचा दौरा
करून लोकांचे प्रश्न सोडवावे असा आदे श दे तात. प्रजे च्या हितासाठी त्यांनी ने मले ले गु प्तचर, सम्राट
कुठे ही असताना, अगदी शयन कक्षे त असले तरीही, भे टण्याची परवानगी होती! सम्राट अशोक यांनी
पालि त्रिपिटकाचा दे खील अभ्यास केल्याचे दिसते . त्यां च्या बै राट ये थील शिलाले खांत मु निसु त्त,
राहुलोवाद सु त्त, अनागतभय, उपतिष्य प्रश्न, मौनीय सु त्त, विनय समु कसा, अरियवसा अशा सु त्तांचा
अभ्यास करण्यास भिक्खू भिक्खु णी सं घाला आणि लोकांना सां गतात. ये थेच ते बु द्ध, धम्म आणि सं घाप्रती
श्रद्धा दे खील व्यक्त करतात. भ.बु द्धांचे जन्मस्थळ शोधून काढीत, सम्राट रुम्मनदे ई (ने पाळ) ये थे स्तं भ
उभारतात आणि याच गावाला सं पर्ण ू करमु क्त करतात. सर्वांनी धम्माचे (नीती) पालन करावे असे आग्रह
करतानाच, माझी मु ले, नातवं डे, परतुं डे हे सर्व विचार पु ढे ने तील आणि ते अनं त काळ टिकावे म्हणून
दगडात कोरून ठे वल्याचे स्पष्ट करतात. धम्म म्हणजे शील असे स्पष्ट करीत सम्राट ४थ्या शिलाले खांत
लिहितात कि जे शीलाचे पालन करतील ते धम्माचे पालन करतील. अलाहाबाद ये थील स्तं भले खात (जो
पूर्वी कोशाम्बी ये थे होता) सम्राट लिहितात कि ज्या कैद्यांना दे हदं डाची शिक्षा झाली आहे , त्यांना शिक्षे
आधी तीन दिवसांची सवलत दिली जाईल, ज्यात ते आपल्या परिवाराला भे टू शकतील किंवा दं ड भरून
माफी मागू शकतील किंवा आपले निर्दोषत्व सिद्ध करू शकतील. रामपूरवा ये थील स्तं भले खात अशोक
आपल्या राज्याभिषे काच्या वर्धापनदिनी चां गली वागणूक असले ल्या अने क कैद्यांची सु टका करीत आणि
हे गे ली २६ वर्षे करीत असल्याचे नमूद करतात. ६व्या शिलाले खांत सम्राट लिहितात कि "मी कितीही
परिश्रम केले किंवा राजकार्य केले तरी माझे समाधान होत नाही....माझ्यावर जे प्रजे चे आणि प्राण्यांचे
ऋण आहे त्यासाठी मी कार्य करतो" तर धौली ये थील शिलाले खांत लिहितात "सर्व प्रजा माझी मु ले
आहे त आणि माझा प्रयत्न आहे कि माझी सर्व मु ले सु खी आणि समाधानी होवोत". राज्याभिषे काच्या
९व्या वर्षांपासून ते २७व्या वर्षांपर्यं त सम्राट अशोकांचे शिलाले ख आपल्याला पाहायला मिळतात.
त्यामधून प्राचीन भारताचा तसे च शे जारच्या राष्ट् रांचा सं पर्ण
ू इतिहास आपल्यासमोर मांडला आहे . एक
आदर्श राजा कसा असावा याचे मूर्तिमं त उदाहरण म्हणून सम्राट अशोक यां च्या शिलाले खांकडे पाहायला
हवे .

अतु ल मु रलीधर भोसे कर


९५४५२७७४१०

You might also like