You are on page 1of 20

अभयारण्य

अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने

जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सरु क्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा

समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे .

उद्देश

अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दर्मि


ु ळ होत जाणाऱ्या जैवसंपदे चे संरक्षण करणे आहे . आज काही जातींचे

किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत (उदा. डायनोसॉर किंवा भीमसरट, स्मायलोडॉन किंवा कट्यारदं ती

ू ी मॅमथ किंवा केसाळ हत्ती, डोडो पक्षी, वगैरे). यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण
वाघ, वल

पर्ण
ू पणे नैसर्गिक होते पण डोडो पक्षी मात्र पर्ण
ू पणे मानवी लोभामळ
ु े नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच

उदाहरण नाही तर रोज २० प्राण्यांच्या जाती, ८ पक्ष्यांच्या जाती, ३३ झाडांच्या जाती तर अंदाज

वर्तविण्याच्या बाहे र इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहे त. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणाऱ्या

जीवांच्या जाती अभयारण्यांचा माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि तो बऱ्याच

प्रमाणात यशस्वीही होत आहे . दर्मि


ु ळ जैवसंपदे ची अधिक माहिती दर्मि
ु ळ जैवसंपदा या लेखामध्ये तसेच

लुप्त झालेल्या जैवसंपदे ची अधिक माहिती लुप्त जैवसंपदा या लेखामध्ये मिळे ल.

अरुणाचल प्रदे श
 नामदफा अभयारण्य

आसाम
 काझीरं गा अभयारण्य
कर्नाटक
 कबीनी अभयारण्य

केरळ
 चिन्नार पशु-अभयारण्य

 अरलम पश-ू अभयारण्य

 इडुक्की पशु-अभयारण्य

छत्तीसगड
 रायपूर अभयारण्य

महाराष्ट् (विभागवार)
कोकण

 कर्नाळा अभयारण्य

 चांदोली अभयारण्य

 तानसा अभयारण्य

 फणसाड अभयारण्य

 बोरीवली राष्ट्रीय उद्यान

 मालवण समद्र
ु ी अभयारण्य

 माहीम अभयारण्य

पश्चिम महाराष्ट्र

 कोयना अभयारण्य

 दाजीपूर अभयारण्यन

 नांदरू मधमेश्वर अभयारण्य

 नान्नज अभयारण्य

 भीमाशंकर अभयारण्य

 मुळा-मुठा अभयारण्य

 सागरे श्वर अभयारण्य


 रे हेकुरी अभयारण्य

 सुपे अभयारण्य

 हरिश्चंद्रगड-कळसब
ू ाई अभयारण्य

विदर्भ

 अंधारी अभयारण्य

 अंबाबरवा अभयारण्य

 काटे पर्णा
ू अभयारण्य

 कारं जा-सोहोळ अभयारण्य

 टिपेश्वर अभयारण्य

 ढाकणा-कोलकाज अभयारण्य

 ताडोबा राष्ट्रीय उद्यान

 नरनाळा अभयारण्य

 नवेगाव राष्ट्रीय उद्यान

 नागझिरा अभयारण्य

 पें च राष्ट्रीय उद्यान

 किनवट अभयारण्य

 बोर अभयारण्य

 भामरागड अभयारण्य

 मेळघाट व्याघ्र प्रकल्प

 लोणार अभयारण्य

 वान अभयारण्य

 ज्ञानगंगा अभयारण्य

उत्तर महाराष्ट्र

 अनेर धरण अभयारण्य

 पाल-यावल अभयारण्य

मराठवाडा

 किनवट अभयारण्य

 गौताळा अभयारण्य
 जायकवाडी अभयारण्य

 नायगाव अभयारण्य

 येडशी अभयारण्य

काझीरं गा राष्ट्रीय उद्यान


प्रमाणवेळ भाप्रवे (यट
ू ीसी+५:३०)
क्षेत्रफळ ४३० km² (१६६ sq mi)
• उं ची • ८० m (२६२ ft)
जवळचे शहर गोलाघाट
स्थापना १९७४
पर्यटक ५,२२८[१] (२००५-०६)
संचालक भारत सरकार, आसाम सरकार

काझीरं गा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आसाम राज्यातील गोलाघाट व नागांव जिल्ह्यातील राष्ट्रीय

उद्यान आहे . याचा समावेश जागतिक वारसा स्थानात केलेला असून, जगात सापडणाऱ्या भारतीय

ं ी गें ड्यांपैकी दोन-तति


एकशिग ृ यांश गें डे या अभयारण्यात सापडतात.[१] काझीरं गा मध्ये अनेक वाघ असन

२००६ मध्ये याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या जंगलात अनेक हत्ती, पाणम्हशी

तसेच हरणे आढळतात. काझीरं गा अभयारण्यामध्ये अनेक दर्मि


ु ळ पक्षी आढळतात. काझीरं गा हे

भारतातील सर्वात जास्त सुरक्षित अभयारण्य मानले जाते.

काझीरं गा मध्ये चार प्रमुख नद्या आहे त. यापैकी मुख्य म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी होय. तसेच अनेक छोटे -

मोठे पाण्याचे तलाव सुद्धा आढळतात. काझीरं गाला १९०५ मध्ये संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला

नावाची व्युत्पत्ती

काझीरं गा नावाच्या व्युत्पत्ती बद्दल अनेक आख्यायिका आहे त. एका आख्यायिके प्रमाणे, रं गा नावाची

एक मुलगी, जवळच्या कार्बी अँगलाँग जिल्ह्यातील काझी नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. पण त्यांच्या
घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. म्हणून ते दोघे कायमसाठी जंगलात पळून गेले. त्यांच्या नावांवरूनच

या भागाला काझीरं गा असे नाव पडले.[२] दस


ु ऱ्या आख्यायिके प्रमाणे १६ व्या शतकातील वैष्णव संत

श्रीमंत शंकरदे व यांनी एका निपत्रि


ु क दांपत्त्यावर (काझी व रं गा) कृपा केली व त्यांना त्या भागात एक मोठे

तळे तयार करण्यास सांगितले. काझीरं गा नावाचे उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतात. १७ व्या

शतकातील ऍहम राजा प्रताप सिंह जेव्हा या भागातन


ू जात होता, तेव्हा त्याने खाल्लेले मासे हे

काझीरं गातून आणल्याचे त्याला सांगण्यात आले होते.[३]

तरीही, काही स्थानिक लोकांच्या मते काझीरं गा हे नाव कार्बी भाषेतील काझीर-ए-रं ग या शब्दातून तयार

झाले. याचा अर्थ "काझीरांचे गाव" असा आहे . कार्बी लोकांमध्ये "काझीर" हे मुलीचे नाव अतिशय जास्त

प्रमाणात वापरले जाते,[४] व असे म्हणतात की पूर्वी "काझीर" नावाच्या एका स्त्रीने या भागावर राज्य

केले. या भागात सापडणाऱ्या काही अवशेषांमुळे या तर्काला पुष्टी मिळते.

काझीरं गाचा अजून एक अर्थ लाल बकर्‍यांचे (हरणांचे) क्षेत्र असाही होऊ शकतो. कारण कार्बी भाषेमध्ये

"काझी" चा अर्थ "बकरी" तर "रं गाई" चा अर्थ "लाल" असा आहे .[३]

इतिहास

१९०४ साली तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या पत्नीने (मेरी व्हिक्टोरिया लैटर) या भागाला भेट

दिली.[५] जेव्हा त्यांना एकही गें डा दिसला नाही तेव्हा तिने आपल्या पतीकडे गें ड्यांचे संरक्षण करण्याची

मागणी केली.[६] जन
ू ११ १९०५ रोजी सम
ु ारे २३२ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असणारा भाग प्रस्तावित संरक्षित

वनक्षेत्र म्हणून राखून ठे वण्यात आला.[७] त्यानंतरच्या तीन वर्षात ब्रह्मपत्र


ु ा नदीच्या काठावरील सुमारे

१५२ वर्ग कि.मी. भाग या क्षेत्राला जोडण्यात आला.[८] इ.स. १९०८ मध्ये काझीरं गाला संरक्षित वनक्षेत्राचा

दर्जा मिळाला. १९१६ मध्ये याचे रुपांतर काझीरं गा संरक्षित शिकार (Game Reserve) वनक्षेत्रामध्ये

करण्यात आले व शेवटी १९३८ मध्ये या जंगलात शिकारींवर बंदी घालण्यात आली.[८]

१९५० साली पी.डी. स्ट्रसी यांनी या जंगलाचे नाव बदलून काझीरं गा अभयारण्य असे ठे वले.[८] इ.स. १९५४

मध्ये तत्कालीन आसाम राज्य सरकारने एक कायदा केला, ज्याद्वारे गें ड्यांच्या शिकारीसाठी मोठ्या
दं डाची तरतूद केली गेली.[८] त्यानंतर १४ वर्षांनी (म्हणजेच १९६८ साली) राज्य सरकारने आसाम राष्ट्रीय

उद्यान कायदा - १९६८ संमत केला, ज्याद्वारे काझीरं गा अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला.

[८] फेब्रव
ु ारी ११ १९७४ रोजी केंद्र सरकारने या ४३० वर्ग कि.मी. च्या जंगलाला राष्ट्रीय उद्यान म्हणन

अधिकृत मान्यता दिली. युनेस्कोने १९८५ साली या उद्यानाचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश

केला.[९]

अलीकडील काळामध्ये काझीरं गावर अनेक नैसर्गिक तसेच मानवनिर्मित संकटे आली. ब्रह्मपत्र
ु ा नदीत

येणाऱ्या पुरांमुळे इथल्या प्राणीजगतावर बरे च परिणाम झाले.[१०] जंगलपट्टय


् ातील मानवी आक्रमणांमुळे

प्राण्यांच्या नैसर्गिक वसतीस्थळांना धोका पोचत आहे .[११] आसाममधील उल्फा अतिरे क्यांनी जरी

आसामच्या आर्थिक स्थितीवर परिणाम केलेला असला,[१२] तरीही काझीरं गावर या कारवाईंचा काहीही

परिणाम झालेला नाही. उलट १९८० सालापासून अतिरे क्यांनी केलेल्या शिकार्‍यांच्या हत्यांच्या नोंदी

आढळतात.[६]

या उद्यानाने आपला शताब्दी महोत्सव २००५ साली मोठ्या प्रमाणावर साजरा केला. यामध्ये लॉर्ड

कर्झनच्या वंशजांना सुद्धा आमंत्रण दे ण्यात आले होते.[६] २००७ सालाच्या सुरुवातीला दोन गें डे व एक

हत्ती यांचे मानस राष्ट्रीय उद्यानात पन


ु र्वसन करण्यात आले. हा भारतातील पहिलाच हत्तींच्या

पुनर्वसनाचा प्रयत्न होता.[१३]

कर्नाळा अभयारण्य

पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्याआसपासचा परिसर पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे व या

परिसराची कर्नाळा अभयारण्य म्हणून सरं क्षित आहे .

कर्नाळयाला एका वर्षात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे ४ चौरस कि. मी. च्या परिसरात

पक्षी अभयारण्य उभारले आहे . मुंबईपासून ६२ कि. मी. अंतरावर पाताळगंगेच्या खोर्यात आपटे -कल्हाया,

रानसई -चिंचवण गावाच्या पंचक्रोशीत अभयारण्य वसलेले आहे . या ठिकाणी आपण केव्हाही गेलात तरी

पाचपन्नास निरनिराळे पक्षी आढळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर, भोरडया, तांबट,
कोतवाल, पांढर्या पाठीची गिधाडं, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात.

अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, बावडिंग, कारवी अशी झुडपे आहे त.

मध्य भागात पांगारा, बहावा, तामण, यांचे प्रमाण जास्त आहे तर उं चावरच्या भागात जांभळ
ू , साग, आंबा,

आईन हे वक्ष
ृ आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे , रानमांजर, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आढळतात.

हे अभयारण्य रायगड जिल्हयात पनवेल तालुक्या असून ते मुंबईपासून ६० कि.मी. अंतरावर आहे . हे

महाराष्ट्र्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे . कर्नाळा येथे निरनिराळया प्रकारचे वक्ष
ृ असन
ू येथे १५०

जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बल


ु बुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी,

कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात. येथील कर्नाळा किल्ला प्रसिद्ध आहे .

मुंबई व ठाणे येथील पर्यटक येथे नेहमी येतात.

मेळघाट अभयारण्य

महाराष्ट्राच्या प्रमुख अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे

पर्वी
ू चे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे

मोठ्या प्रमाणावर आहे त.

अमरावती जिल्ह्याच्या उत्तरे कडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरे कडे मध्य प्रदे श राज्य

आहे . चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच

ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे . या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून

इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे . मेळघाट हा

महाराष्ट्रातील एकमेव व्य़ाघ्रप्रकल्प आहे . ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे . इथे पट्टे वाले आणि बिबळे

ं े, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे ,


वाघ, रानगवे, सांबरे , भेकरे , रानडुकरे , वानरे , चितळ, नीलगायी, चौशिग

कृष्णमग
ृ , उडत्या खारी, तरस, कोल्हे , लांडगे, ससे असे पष्ु कळ प्राणी आहे त. तसेच इथे मोर, रानकोंबड्या,

राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहे त. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट,

सग
ु रण, पारवे, बल
ु बल
ु , सत
ु ार, मैना असे रानपक्षीही आहे त.
मेळघाट

मेळघाट मध्य भारताच्या द्शीण सातप


ु ुडा पर्वत रागांमध्ये वसलेले आहे . ह्या पर्वत रागांना गाविलगड

पर्वत रं ग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्ध सपाटीपासून ११७८ मीटर उं च आहे . मेळघाटातून

खंडू , खापर , सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्याच्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदिला

मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भंडार आहे . घनदाट जगलात माखला , चिखलदरा

, चीलादारी , पातल्
ु डा आणि गग
ु माळ ही अनीशाय दर्ग
ु म ठिकाणे आहे त. मेळघाट हा प्रदे श १९७४ साली

राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. सध्यास्थितीत प्रकाल्पा अंतर्गत 676.93 वर्ग किलोमीटर भूमी

राखीव आहे .

पैनगंगा अभयारण्य

पैनगंगा अभयारण्य यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा यांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही

बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे . तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य

असावे. पैनगंगा अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५

चौ.कि.मी. इतके आहे . अभयारण्यात साग हा प्रमुख वक्ष


ृ आहे . या अभयारण्यावर उपवनसंरक्षक

(वन्यजीव) अकोला यांची दे खरे ख व थेट नियंत्रण आहे .

पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळहून सुमारे १५० किलोमीटरवर आहे . यवतमाळ-उमरखेडमार्गे किंवा

यवतमाळ-महागाव-ढाणकी-बिटरगावमार्गे पैनगंगा अभयारण्यास पोहोचता येते. या दोन्ही मार्गांवर

एस.टी. बसेस मिळतात. उमरखेड किंवा ढाणकी बिटरगावहून खाजगी वाहने आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध

असतात. श्यामा कोलामचीची टे कडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा दे वस्थान, वाघ भय
ु ार, एक

शिवालय आणि सोनधाबी आणि सहस्रकंु ड नावाचे धबधबे अशी येथील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी

आहे त. मात्र, रस्ते, वाहने, वाटाडे वगैरे सोयी नसल्याने पर्यटकांना सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही.

१००० ते १५०० मिलिमीटर पर्जन्यमान आणि आजूबाजूला पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या अभयारण्य

परिसरातील अर्जुन, आवळा, ऐन, कदं ब, गुळवेल, चारोळी, चिंच, तिवसा, धामणवेल, धावडा, बेहडा, मोईन,
मोहा, साग, साजड, सूर्या, हलद ू इत्यादी अनेक वक्ष
ृ आहे त.

अभयारण्यात वनौषधींच्याही सम
ु ारे २०० जाती आहे त.

कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल, यांसारखे गवत उगवत असल्याने अस्वल, कोल्हा, खवलेमांजर,

चिंकारा, चितळ, चौसिंगा, तरस, नीलगाय, भेकड, मसण्या ऊद, रानमांजर, हरीण, इत्यादी अनेक तण
ृ भक्षी

वन्यप्राणी अभयारण्यात मोठ्या संख्येत असतात, असे सांगितले जाते. ह्या प्राण्यांची शिकार करूनच

बिबटे , रानकुत्रे इत्यादी श्वापदे ही इथे राहत असावेत.

साप : या अभयारण्यात अजगर, घोणस, घोरपड, धामण, फुरसे, लाल तोंडाचा सरडा, वगैरे साप आहे त.

पैनगंगा अभयारण्यातले पक्षी :- अडई, पांढऱ्या मानेचा करकोचा, कूट, कोतवाल, घनवर किंवा हळदी

कंु कू(स्पॉटबिल बदक), जकाना, पाँड, पाणकावळा, पाणपिपुली, पारवा, भोरी, शिक्रा, शिखा सर्प गरुड, हे रॉन

इत्यादी.

पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगह


ृ आहे . किनवट शहरात

अनेक चांगली हॉटे ल्स आहे त. उनकेश्वर येथेही एक विश्रामगह


ृ आहे .

किनवट अभयारण्य

यवतमाळ आणि नादे ड या जिल्ह्यांना समाईक, पण बहुतांशी नांदेड जिल्ह्यात असलेले किनवट

अभयारण्य नावाचे आणखी एक अभयारण्य आहे . हे ही अभयारण्य पैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहे . त्याचे

आकारमान दोन्ही जिल्ह्यांत मिळून २१९ चौरस किलोमीटर इतके आहे . जवळचे रे ल्वे स्टे शन, मुदखेड-

आदिलाबाद लोहमार्गावरील किनवट हे असन


ू रे ल्वे स्टे शनपासन
ू अभयारण्याचे अंतर ५ किलोमीटर आहे .

रस्तामार्गाने हे अभयारण्य नांदेडपासून १३८ किलोमीटरवर आहे . यवतमाळ व नांदेडहून नियमित बससेवा

असते. जंगलात बाराही महिने पिण्याचे पाणी मिळते.


हे एक शुष्क पानझडीचे अरण्य आहे . त्यात साग, सलई, हलद,ू कुलू, सावर, मोई, ऐन इत्यादी वक्ष
ृ आणि

वाघ, बिबटे , नीलगाय, अस्वल,सांबर, चितळ, चिंकारा, रानडुक्कर व भेकर इत्यादी वन्य पशू आहे त.

पक्षीजीवनही समद्ध
ृ आहे .

रहाण्याची सोय :

 पी.डब्ल्य.ू डी रे स्ट हाउस, किनवट

 फॉरे स्ट रे स्ट हाउसेस : खारबी, कोराट, मोरचदी, सोनदाबी व चिखली

ताडोबा राष्ट्रीय उद्यान

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर

जिल्हयात आहे . याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे .

उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सस


ु री आणि गवा हे इथले मख्
ु य वैशिष्ट्य आहे .

अलीकडेच याचे व अंधारी अभयारण्याचे संयक्


ु तीकरण होउन त्याचे नाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे . अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी.

इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे .

आजमितीस(सप्टें बर २०११) अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे . गवे आणि मगरी-सस
ु री

येथील प्रमुख आकर्षण आहे तच, त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांचे आकर्षणही वाढले आहे . आजच्या

घडीला उद्यानात ५० वाघ आहे त. त्याबरोबर बिबट्या , अस्वल , जंगली कुत्री अथवा कोळसून , तरस ,

उदमांजर आणि विविध प्रकारच्या रानमांजरी. हरणांच्या जातीत, नीलगाय , सांबर , चितळ , भेकर,

ं ा, ससे व खास विदर्भात आढळणारी पिसुरी नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे
कोल्हे , चौशिग

आढळून येते

इथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाहता येतात. मच्छिमार, गरुड, करकोचे, बगळे , ससाणे, रानकोंबड्या,

धनेश, भंग
ृ राज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, मोर हे त्यापैकी काही.
ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. साग, बांबू, ऐन, हलई, धावडा,

बिबळा, तें द,ू मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वक्ष


ृ ांची या अरण्यात दाटी दिसते.[१].

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

मंब
ु ई महानगरपालिकेच्या बाहे र (पण मंब
ु ईच्या पंचक्रोशीत) हे राष्ट्रीय उद्यान आहे . याचे क्षेत्रफळ १०४

वर्ग किमी आहे .येथील कान्हे री लेण्यांमुळे(कृष्णगिरी) म्हणजे ‘काळा पहाड’ ब्रिटिश आपदानीत

वनविभागाची स्थापना झाल्यावर या वनविभागाचे सर्वेक्षण होऊन २०.२६ चौ. कि.मी. चे "कृष्णगिरी

राष्ट्रीय उद्यान" निर्माण झाले. १९७४साली त्याचे नामकरण 'बोरिवली राष्ट्रीय उद्यान' असे झाले. १९८१

मध्ये नावाचे बदल करून 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' असे त्याचे नामकरण झाले.

जैव विविधता

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे ,

विविध रं ग, आकारांचे २५० प्रकारचे पक्षी, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारचे उभयचर आहे त.

या उद्यानात बिबट्या हा या वन साम्राज्यातला सर्वात मोठा भक्षक येथे वावरतो. तसेच मुंगस
ू , उदमांजर,

रानमांजर, अस्वल, लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वक्ष
ृ आहे त.

त्यात मुख्यतः करं ज, साग, शिसव, बाभळ


ू , बोर, निवडुग
ं , बांबूची बेटं आढळतात.

सुविधा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परीक्षेत दर्शनाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असते. येथे

प्रवेशासाठी प्रौढांना रु. २०/- तर लहान मुलांना रु. १०/- प्रवेशशुल्क आहे . पर्यटकांच्या वाहन थांब्यासाठी

शुल्क आकारले जाते. सिंहविहार आणि वनराणी मिनी टॉय ट्रे न सफारीचे आकारले जाते. उद्यानात

वननिवासाची सोय असन


ू त्याकरिता विश्रामगह
ृ आणि कुटीर पद्धतीची निवास व्यवस्था आहे .
कोयना अभयारण्य

कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून सातारा जिल्ह्यात आहे . पश्चिम महाराष्ट्रातील

सर्वाधिक घनदाट जंगलांमध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो. हे अभयारण्य कोयना धरणाच्या

भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे . इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून

प्रसिद्ध आहे . अभयारण्याचे याचे एकूण क्षेत्रफळ ४२६ चौ.किमी असून याला १९८५ मध्ये अभयारण्याचा

दर्जा मिळाला.[१].या अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जाही मिळावा म्हणून राज्य सरकार प्रयत्‍नशील

आहे .[२][३]

भौगोलिक

वर नमद
ू केल्याप्रमाणे हे अभयारण्य कोयना जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे . कोयना नगर ते

महाबळे श्वरच्या जवळील तापोळा या ६०-७० किमी अंतरापर्यंत नदीच्या कडेकडेने हे जंगल आहे .

ढोबळमानाने अभयारण्याचे तीन मुख्य विभाग पडतात महारखोरे , वासोटा व मेट इंदवली. त्यामध्ये

इंदवळी, कुसावळी, सिंधी, बलवण, मोरवी, म्हाळुंग, वाघावळे , कुसापूर, तापोळा, कांदाटकी खोरे अशा

गावांच्या वनक्षेत्रांचा समावेश होतो. शिवसागर तलावाची नैसर्गिक तटबंदी या अभयारण्याला लाभली आहे .

धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर येथील जंगल पाण्याखाली गेले. जलाशयाच्या पश्चिमेकडील

बाजूसच अभयारण्याचा बहुतांशी भाग येतो जो अतिशय घनदाट आहे . अभयारण्याच्या पश्चिमेकडे

नदीच्या एका बाजल


ू ा सह्याद्रीची मख्
ु य रांग आहे व दस
ु ऱ्या बाजस
ू सह्याद्रीची उपरांग आहे . या दोन्ही

रागांमधोमध कोयना नदी वाहते. मुख्य रांगेचा उतार नदीच्या बाजूला सौम्य आहे तर पश्चिम बाजूला ९०

अंशाचा कडा आहे . महाराष्ट्रातील दस


ु ऱ्या क्रमांकाचा उं च कडा जो बाबू कडा नावाने ओळखला जातो, तो

येथे आहे . अभयारण्यातील सर्वोच्च ठिकाण वासोटा किल्ला आहे उं ची साधारणपणे ११०० मीटर.

एकाबाजूला नैसर्गिक कडा व दस


ु ऱ्या बाजूला मानवनिर्मित जलाशय, यामुळे येथील जंगलाला एक प्रकारचे

जंगलतोडीपासून अभय मिळाले आहे . कोयनेबरोबरच सोळशी व कांदाटी याही नद्या अभयारण्यात
वाहतात. जून ते सप्टें बर या महिन्यात प्रचंड पाऊस पडतो. एका वर्षाची पावसाची सरासरी अंदाजे ५०००

मिमी इतकी आहे .[४]

जंगलाचा प्रकार

येथील जंगलाचा समावेश दमट विषववत्ृ तीय सदाहरित जंगलात होतो. महाराष्ट्रात असे जंगल इतरत्र

केवळ महाबळे श्वर येथे आहे . जंगलतोड कमी असल्याने महाराष्ट्रात इतरत्र न आढळणारे वक्ष
ृ कोयना

जंगलात दिसून येतात. प्रचंड वक्ष


ृ , त्याखाली मध्यम उं चीच्या वनस्पती (कारवी, वाकटी या सारख्या),

त्याखाली नेच्यासारख्या वनस्पती व त्याखाली गवतासारख्या वनस्पती असे एकाच जागी ४ स्तरातील

वनस्पतींनी येथील जंगल घनदाट केले आहे . तसेच विविध प्रकारच्या लहान, मोठ्या आणि अजस्र वेलींनी

दे खील येथील इंच न ्‌इंच व्यापला आहे . अंजनी, जांभळ


ू , हिरडा, आवळा, ऐन, आंबा, भोमा, काटक, उं बर,

जांभा, बिब्बा शिकेकाई, गारं बी, करवंदे, रानमिरी, तोरण, धायटी, कडीलिंब, मुरुडशेंग या येथे आढळणाऱ्या

वनस्पती आहे त.[५]


प्राणिजीवन

पश्चिम महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची सर्वाधिक घनता या अभयारण्यात आहे . जंगल अतिशय घनदाट व

दर्ग
ु म असल्याने वन्यप्राण्यांची गणती करणे येथे अवघड आहे . हरिणांमध्ये सांबर, भेकर व पिसोरी

आढळतात. इतर प्राण्यांमध्ये माकडे, वानरे ,तरस, कोल्हे , खोकड,ऊदमांजर, साळिंदर तसेच रात्रीच्या

वेळात रानससे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात, ट्रे कर्सना येथे अस्वल नेहेमी दृष्टीस पडते व

आमनासामना होतो. वन्यप्राण्यांच्या भयापोटी पर्वी


ू बरे चसे ट्रे कर्स फटाके वाजवत फिरत, परं तु आता

अभयारण्यात फटाके उडवण्यास बंदी आहे . बिबट्याचेही दर्शन नशीबवंताना होते. ठश्यांवरून व रात्रीच्या

डरकाळ्यांच्या आवाजावरून या अभयारण्यात वाघ आहे त हे सिद्ध होते परं तु ते सहसा दिसत नाहीत. अजन

येथील खास वैशिट्य म्हणजे येथील राक्षसी खारी. त्यांना मराठीत शेकरू म्हणतात. येथील शेकरू

भीमाशंकर येथे आढळणाऱ्या शेकरूपेक्षा थोडीशी वेगळी आहे व गडद रं गात आहे . पक्ष्यांमध्ये येथे स्वर्गीय

नर्तक, धनेश व इतर अनेक प्रकार आहे त.

सापांच्या अनेक प्रजातीत नाग, फुरसे घोणस व मण्यार या चारही महत्त्वाच्या विषारी जाती येथे

आढळतात. त्याच बरोबर चापडा ज्याला इंग्रजीत बांबू पिट वायपर म्हणतात तोही आढळतो. विनविषारी

सापांमध्ये अजगर, धामण इत्यादी आढळतात.[४]

ट्रे किंग व पर्यटन

अभयारण्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून जंगलाचा अनुभव घ्यायला तसेच ट्रे किंग करायला अनेक

हौशी ट्रे कर्स या अभयारण्याला भेट दे त असतात. काही ट्रे कर्स नुसतेच अभयारण्यातील जलाशयाच्या

कडेकडेने वन्यजीवांच्या शोधात वाटा शोधत ट्रे किंग करत असतात.अभयारण्यातील ट्रे किंग करण्याजोगे

किल्ले :

 वासोटा

 जंगली जयगड
 मधुमकरं दगड

ट्रे कर्स साठी सूचना

 ट्रे किंग साठी येणाऱ्या पर्यटकांकडून अभयारण्यात प्रवेशासाठी माणशी २० रुपये प्रवेश शुल्क घेतले

जाते. अभयारण्यात जाण्यासाठी बोटीचाच वापर करावा लागतो (बोटीचे शुल्क साधारणपणे ४००

रुपये). अभयारण्यात मुक्काम करायचा असल्यास तंबूचे भाडे द्यावे लागते.

 अभयारण्यात फटाके उडवण्यास व शस्त्रे घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे .

 अभयारण्यात जळवांचा खूप त्रास होतो. जरुरी औषधे घेऊन जावीत.

 अनियमित वाटांवर ट्रे किंग करणार असल्यास वॉकी-टॉकी चा संच घेऊन जावा,. जेणेकरून त्याचा

संकटसमयी उपयोग होईल.

ु ट्याने ट्रे किंग करू नये, त्याचप्रमाणे मोठ्या गटाने ट्रे किंग
 सरु क्षिततेच्या दृष्टीने एकट्या दक

टाळावे, म्हणजे वन्यप्राण्यांच्या दै नंदिन जीवनात बाधा येणार नाही. ५ ते १५ जणांचा गट असणे

उत्तम.

 शक्यतो अभयारण्यात जेवण बनवणे टाळावे. जर बनवावेच लागले तर नंतर आग पूर्णपणे

विझवावी. तसेच मासांहारी जेवण बरोबर नेणे किंवा बनवणे टाळणे. मासांहारी जेवण हिंस्र

वन्यजीवांना आकर्षित करते.

 अभयारण्यात ट्रे किंग करण्यास सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रव


ु ारी

नागझिरा अभयारण्य

संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही आहे . फार पर्वी
ू या जंगलात हत्तींचे वास्तव्य जास्त

असावे व त्यावरूनच 'नागझिरा' असे नाव या अभयारण्यास पडले असावे. तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध

असलेल्या भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा यांच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य १५२.८१
चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले आहे . या अभयारण्याची विशेषता म्हणजे यात विद्युत पुरवठा अजिबात

नाही, हे जंगल नैसर्गिकच राखले गेलेले आहे .

यात सुमारे २०० च्या जवळपास पक्षांची नोंद करण्यात आली आहे . इतर अभयारण्यांच्या मानाने छोट्या

ं ा,
अशा अभयारण्यात वाघासमवेतच बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिग

नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, ऊदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्प गरुड, मत्स्य गरुड,

टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरं ग, कोतवाल इत्यादी अनेक प्राणी व पक्षांची नोंद निसर्गप्रेमींनी घेतली

आहे .[१]

या सोबतच नजीक असलेली स्थळे कोसमतोंडी, चोरखमारा,अंधारबन, नागदे व पहाडी इत्यादी प्रेक्षणीय

आहे त. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या भंडारा शहरापासून सुमारे ४० कि. मी. अंतारावरील साकोली

गावापासून अंदाजे २२ कि. मी. अंतरावर एकीकडे नागझिरा अभयारण्य असून दस


ु रीकडे सुमारे ३० कि. मी.

अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे .

नागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी 'पिटे झरी' व 'चोरखमारा' अशी २ गेटे आहे त. अभयारण्यात

प्रवेश करताच रस्त्याच्या दत


ु र्फा अनेक हरणेण गवतामध्ये शांतपणे चरताना दिसतात.. पावलागणित

दिसणारी हरिणे आणि त्यांच्या आजूबाजूला हुंदडणारी माकडे हे दृश्य मन मोहून टाकते. येथे ऐन, साग,

बांब,ू आवळा, बिब्बा, धावडा, तिवस, सप्तपर्णी यांसारखे असंख्य वक्ष


ृ आहे त. अभयारण्यात गवताळ कुरणे

मुबलक प्रमाणात असल्याने नीलगाय तसेच सांबर, चितळ, भेकर आणि गव्यांसारखे शेकडो तण
ृ भक्षी

आढळतात. येथे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, हळद्या, नीलपंखी, स्वर्गीय नर्तक, नवरं गी, तसेच

तुरेवाला सर्पगरुड, मत्स्यगरुड, व्हाईट आईड बझार्ड सारखे शिकारी पक्षी अणि अनेक प्रकारची फुलपाखरे

तसेच ठिकठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे कोळी दिसून येतात. येथे हिंस्रक पशूंची संख्यादे खील काही कमी

नाही. पट्टे री वाघाचा नैसर्गिक अधिवास येथे उत्तम आहे . तेथील मार्गदर्शकांच्या सांगण्यानुसार तेथे सुमारे

८-१० वाघ, २०-२२ बिबट्या, जवळपास ५० अस्वले आणि रानकुत्रे मुक्तसंचार करीत असतात.

येथील नागझिरा तलाव अतिशय प्रसिद्ध तितकाच जंगलासाठी महत्वाचा आहे . या जंगलात पूर्वी हत्तींचे

वास्तव्य असे. संस्कृतमधील नाग या शब्दाचा अर्थ हत्ती आणि तेथील लोक पाण्याच्या झऱ्याला झिरा
असे म्हणत. हत्तींचे आवडते ठिकाण म्हणजे पाणी.. म्हणून या तलावास (नाग~हत्ती आणि झिरा~झरा)

'नागझिरा तलाव' असे नाव पडले. व्यंकटे श माडगळ


ु कर यांनी ज्या झाडाखाली बसून त्या काळी लिखाण

केले तो कुसम
ु वक्ष
ृ आजही आपणास तेथे पहावयास मिळतो. या अभयारण्यातील रस्ते पर्ण
ू पणे नैसर्गिक

स्वरूपाचे आहे त. येथे वाहन चालवण्याचे नियम अतिशय कडक आहे त. हॉर्न वाजवणे, रस्ता अडेल असे

दहु े री पार्किं ग करणे तेथे चालत नाही. अभयारण्याच्या गेट बंद होण्याच्या वेळा अगदी काटे कोरपणे

पाळल्या जातात. लंगूर (माकडे) व हरणांचे अलार्म कॉल्स ओळखून वाघाचा माग काढण्यात येथील

मार्गदर्शक अतिशय तरबेज आहे त. हे लोक याच परिसरातील गोंड आदिवासी आहे त. पूर्वी हे च लोक विविध

शस्त्रांचा वापर करून प्राण्यांची शिकार करत. तेव्हा हे वन्यजीवच आपल्या उपजीविकेचे साधन आहे , असे

त्यांना वाटे . परं तु आज हे च वनवासी 'वाल्याचे वाल्मिकी' झाले आहे त. या लोकांमध्ये प्रचंड एकीचे बळ

दिसून येते.

येथील मार्गदर्शक व वाहन चालक अतिशय चलाख आहे त.. त्यांची तीव्र निरीक्षण शक्ती, पावलांच्या

ठशांवरून घेण्यात येणाऱ्या नोंदी, समयसूचकता ह्या त्यांच्या गुणांमुळे अभयारण्यास भेट दे णाऱ्या

लोकांना सहजतेने समद्ध


ृ वनसष्ृ टीचे दर्शन घडते.अशा या जैवविविधतेने नटलेल्या नागझिरा जंगलाला दि.

३ जून १९७० रोजी 'नागझिरा वन्यजीव अभयारण्य' म्हणून घोषित केले गेले. उष्ण पानगळीचे हे

अभयारण्य सध्या १५३ चौ.किमी. क्षेत्रावर वसलेले आहे . येत्या काही वर्षांतच जंगलाचा ६०० चौ.किमी.

पर्यंत विस्तार करण्याचा तेथील वनविभागाचा मानस आहे .

You might also like

  • JANGAL
    JANGAL
    Document8 pages
    JANGAL
    Nilesh Harishchandre
    No ratings yet
  • BHUKAMP
    BHUKAMP
    Document22 pages
    BHUKAMP
    Nilesh Harishchandre
    No ratings yet
  • EMU
    EMU
    Document8 pages
    EMU
    Nilesh Harishchandre
    No ratings yet
  • FATAKE
    FATAKE
    Document14 pages
    FATAKE
    Nilesh Harishchandre
    No ratings yet
  • Bio Gas
    Bio Gas
    Document7 pages
    Bio Gas
    Nilesh Harishchandre
    No ratings yet