You are on page 1of 3

जॉर्ज फ्लॉइड - मिनेसोटा, मिनिआपोलीस अमेरिका.

रस्त्यावरील चौकात जॉर्ज फ्लॉइड नावाच्या ४६ वर्षीय आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीला त्याच्या गाडीतून
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर एका पोलिसाने त्याला जमिनीवर पाडून त्याच्या मानेवर ९ मिनिटे एवढा वेळ
आपला गढ
ु गा दाबन
ू ठे वला होता. या दरम्यान जॉर्ज मरण पावला.

२५ मे २०२० रोजी झालेल्या अटकेच्या फुटे जमध्ये एक श्वेतवर्णीय पोलिस अधिकारी, डेरेक चौविन यांनी
फ्लॉइडच्या मानेवर गड
ु घे दाबन
ू त्याला जमिनीवर उपडे पडून ठे वल्याचं दिसतंय.या 44 वर्षीय पोलीस श्री.
चौविनवर खुनाचा आरोप ठे वण्यात आलेला आहे .

फ्लॉइडच्या मत्ृ यूला कारणीभूत ठरणाऱ्या महत्त्वाच्या घटना केवळ 30 मिनिटांत घडल्या. साक्षीदारांच्या
जबानीनुसार आणि व्हिडिओ फुटे जच्या आधारे जे समोर आलाय त्याने संपूर्ण अमेरिकेत आणि जगभर
जनक्षोभाचा आगडोंब उसळलाय. या प्रकरणाची सुरुवात 20 डॉलरची बनावट नोट दिल्याच्या तक्रारीने झाली.
कप फूड्स या दक
ु ानात नेहमी येणाऱ्या मिस्टर फ्लॉयड यांनी २० डॉलर्सची एक खोटी नोट दे ऊन सिगरे टचा पॅक
विकत घेतला अशी पोलिसांकडे तक्रार आली.

जॉर्ज फ्लोईड मूळ टे क्सासचा रहिवासी असून ह्युस्टनहून तेथे गेल्यानंतर बर्‍याच वर्षांपासून
उत्तरअमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये राहत होता. अलीकडेच तो बाउन्सर म्हणून काम करत होता परं तु इतर
कोट्यावधी अमेरिकन लोकांप्रमाणेच तोही कोरोनव्हायरस साथीमळ
ु े बेरोजगार झाला होता. तो या दक
ु ानाचा
नियमित ग्राहक होता पण त्यादिवशी ओळखीचे दक
ु ानमालक जागेवर नव्हते. पोरगेल्या काउं टर क्लार्क ने नोट
खोटी असल्याचा संशय आल्यावरून पोलिसांना फोन केला. फोनवर म्हटलं आहे तो माणूस नशेत आहे आणि
स्वत:च्या नियंत्रणाखाली नाही असं दिसतंय. दरम्यान जॉर्ज फ्लोईड दक
ु ानासमोरील चौकात गाडी बाजूला
लावून गाडीत बसलेला होता. कुठे ही पळून गेलेला नव्हता. त्याच्या गाडीत एक महिला आणि अजून एक पुरुष
होता.

तक्रारीच्या कॉलनंतर काही वेळातच पोलीस गाडीतून दोन पोलिस अधिकारी आले. फ्लॉइडच्या गाडी जवळ
आल्यावर थॉमस लेन या पोलिसाने आपली बंदक
ू बाहे र काढली आणि फ्लोईडला आपले हात वर करण्यास
सांगितले. त्याला गाडीतन
ू बाहे र खेचण्यात आलं. हातकड्या अडकवन
ू घ्यायला फ्लॉइडने विरोध केला. पण
एकदा हातकडी लावल्यावर फ्लॉइडचा विरोध मावळला. पोलीस थॉमस लेन यांनी, बनावट नोटा वापरल्याबद्दल
त्याला अटक केली जात असल्याचे स्पष्ट केले. जेव्हा पोलिसाने फ्लॉईडला पोलिसांच्या गाडीत बसवण्याचा
प्रयत्न केला तेव्हा परत झटापट झाली. फ्लोईडचे आंग ताठर झाले आणि तो जमिनीवर पडला, त्याने पोलिसाला
सांगितले की त्याला बंदिस्तपणाची भीती वाटण्याचा आजार आहे . यावेळी दस
ु रे पोलीस श्री चौविन घटनास्थळी
दाखल झाले. आणि फ्लोईडला पोलिसांच्या गाडीत टाकण्याच्या दोघे पोलीस प्रयत करू लागले. या दरम्यान
चौव्हिन या पोलिसाने फ्लॉईडला मागील सीटवरून बाहे र खेचले ज्यामुळे पाठीमागे हातकड्यात आणि तोंड
खाली अशा अवस्थेत गाडीच्या बाहे र रस्त्यावर खाली पडला.
फ्लोईडला बाकीचे पोलीस पकडत असतांना चौविन या पोलिसाने त्याचा डावा गुडघा, फ्लॉईडचे डोके आणि मान
यांच्या मध्ये रुतवून धरला. मला श्वास घेता येत नाहीये, सोडा मला असे फ्लॉईड वारं वार सांगत होता. या
अवस्थेत आठ मिनिटे सेहेचाळीस सेकंद एवढा वेळ चौविन या पोलिसाने फ्लॉईडच्या मानेवर डावा गुडघा दाबन

धरला होता. त्या कालावधीत सुमारे सहा मिनिटांनंतर फ्लॉईड प्रतिसाद दे ईनासा झाला. आजूबाजूचे बघणारे
लोक मध्ये पडून पोलिसांना त्याला सोडण्याची विनंती करत होते पण पोलिसांनीही लोकांना जुमानले नाही. जे.
कुएंग या पोलिसाने फ्लॉईडची नाडी तपासली तर लागली नाही. तरीही मानेवरील दाबन
ू धरलेला गढ
ु गा काढला
गेला नाहीच.

20:27 वाजता, चौविन याने फ्लोईडच्या मानेवरून गुडघा काढला. हालचाल न करणाऱ्या फ्लॉइडला चाकांच्या
स्ट्रे चरवर चढवून ऍम्बुलन्समधून हे न्नेपिन काउं टी मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. सुमारे एक तासानंतर
त्याला मत
ृ घोषित करण्यात आले. मत्ृ यूच्या आदल्या रात्री फ्लोईडने त्याच्या जवळच्या मित्राला नोकरीबद्दल
विचारले होते, खोट्या नोटांच्या व्यवहारात तो असेल याची शक्यातच नाही.

सरकारने केवळ एका, प्रत्यक्ष गढ


ु गा दाबन
ू धरणाऱ्या चौवीन या पोलिसाविरुद्ध, आपल्याकडच्या कलाम ३०४
नुसार सदोष मनुष्यवध या प्रकारचा, थर्ड डिग्री मर्डरचा २५ वर्षे तुरुंगवास असलेला गुन्हा नोंदवला आहे . पण
फक्त एका पोलिसावर गुन्हा नोंदवाणेही चुकीचे आहे . सगळीकडचे पोलीस आणि कायदा प्रशासन प्रसंगी क्रूर
आणि प्रसंगी कातडीबचाऊ असते मग ती अमेरिका असो व भारत. बाकीच्या उपस्थित पोलिसांची काहीच
जबाबदारी नाही? ते एका माणसाचा जीव जाताना केवळ बघत राहिले? का त्यांनी आपल्या सहकाऱ्याला वेळेत
बाजूला केले नाही? त्यामुळे उपस्थित सर्व पोलीस अधिकारी हे या गुन्ह्यातील सहआरोपी असायलाच हवेत.

या प्रकरणामुळे कोविड-१९ रोगाच्या साथीची भीती आणि संकट असतांनांहि अमेरिकेत प्रचंड जनक्षोभ
उसळलाय. सगळ्या रं गाचे आणि वंशाचे लोक पोलिसांच्या अत्याचारामुळे पेटून उठले आणि रस्त्यावर उतरले
आहे त आणि एक आठवडा झाला तरी निदर्शने आणि जाळपोळ थांबली नाहीये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे
आगीत तेल ओतणारे व्हिडीओ समोर आल्यामुळे लोक अजूनच चिडले आणि चक्क व्हाईट हाऊसवर धावन

गेले. त्यामुळे ट्रम्पला तळघरात आसरा घ्यावा लागला. अमेरिकेच्या बाहे र सुद्धा यूरोपीय दे श, जपान,
ऑस्ट्रे लिया असा सगळीकडे या प्रकारचा निषेध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे .

ज्या प्रकारे फ्लोईडचा मत्ृ यू झाला होता तो प्रकार बेजबदारपणाचा होता. फ्लोईडने आपल्या जीवाची भीक
मागितली, व्यवस्थेवर विश्वास ठे वला आणि पोलिसांच्या स्वाधीन झाला यात त्याचा जीव गेला. जगभरातले
सगळे पोलीस आणि सत्ताधारी मिळालेल्या अधिकारामुळे माणूस असल्याचे विसरून वागू लागतात. काम
करतांना एखादी चूक झाली तरी ती मान्य न करता त्याचे समर्थन करण्यासाठी अजून अजून चुका करत
राहातात. पोलीसांना बळाचा वापर करण्या बरोबर थोडे डोके वापरायचेही प्रशिक्षण दिले तर असा गढ
ु गा वापरला
जाणार नाही. पाठीमागे हातकडीत हात अडकवलेल्या स्थितीत जॉर्ज फ्लॉईड कडून असा कोणता धोका चार –
चार पोलिसांना होता म्हणून त्याला ठार मारण्याऐवढा बलप्रयोग केला? गोऱ्या कातडीच्या पोलिसांच्या
अंतर्मनात काळ्या आरोपी बद्दल असलेलं घण
ृ ा, तिरस्कार, स्वतःची वर्चस्वाची भावना हे सगळं उफाळून आलं.
त्याचे सहकारी थांबवू शकत होते पण ते ही गोरे च. जगात कुठे ही जा, राज्यव्यवस्था ही दब
ु ळ्या माणसाच्या
विरोधातच असते. केवळ गुढग्यावर येऊन पोलिसांनी दिलगिरी व्यक्त केली हे परु े से नसून यापुढे वर्तनात स्पष्ट
बदल दिसला तरच अशा फोटोपोजेसला अर्थ असेल.

Sandeep Mangala Narayan

You might also like