You are on page 1of 1

ढोबळमानाने मेंदूचे ‘डावा मेंदू’ व ‘उजवा मेंदू’ असे दोन भाग मानण्यात येतात.

प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात जरी हे दोन्ही भाग सापडत असले तरी


बर्‍याचदा त्या व्यक्तीचा एक भाग म्हणजेच डावा किं वा उजवा दुसर्‍याहून जास्त प्रभावी असतो. त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, अर्थातच या प्रभावी
भागाप्रमाणेच चालते. डावा मेंदू जास्त प्रभावी असणारी व्यक्ती आणि उजवा मेंदू प्रभावी असणारी व्यक्ती एकच अभ्यासक्रम, एखादे पुस्तक किं वा एखादा विषय
संपूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासू शकतो. म्हणूनच आपणही अभ्यास करताना आपला कु ठला ‘मेंदू’ जास्त प्रभावी आहे ते ओळखू शकतो तर त्याचा वापर
करून आपला अभ्यास अधिक सुसंघटित, प्रभावी आणि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला अधिक जवळ जाणारा असा बनवू शकतो!

*डाव्या मेंदूची माणसं*

डावा मेंदू अधिक प्रभावी असणारी माणसं 'Left Brained individuals' म्हणून ओळखली जातात. तुम्ही पण त्यांच्यासारखे आहात का?
हे ओळखण्यासाठी आपण प्रथम डाव्या मेंदूच्या माणसांचे गुणधर्म, स्वभावविशेष पाहू. त्यानंतर उजव्या मेंदूच्या व्यक्तींचेही पाहू. तुम्हाला त्यात स्वत:च्या जवळ
जाणार्‍या व्यक्ती ज्या गटात सापडतील तो तुमचा मेंदूगट! अर्थात हे लक्षात ठेवायचं की कु णीच संपूर्णपणे १००टक्के डाव्या किं वा उजव्या मेंदूचा बनलेला नसणार
आहे! मात्र ६०-४०, ७५-२५ असं एक जास्त प्रभावी आणि कमी प्रभावी असं गुणोत्तर मात्र निश्‍चितच असणार! तर डाव्या मेंदूने जास्त विचार करणारी
माणसं म्हणजे ‘लॉजिकल’ माणसं अशी माणसं म्हणजे गणितात प्रवीण. गणितात असणारी स्थिर. पॅटर्नवजा मांडणी त्यांना आवडते. तुकडे करून भाग पाडू न
ते एखादी गोष्ट पटकन शिकतात. कु ठलाही मोबाईल नंबर. गाडीचा नंबर यांना तोंडपाठ असतो. विश्‍लेषणात यांचा हात कोणीच धरू शकत नाही. अगदी साधा
क्रिके टचा सामना पाहत असताना पुढच्या प्रत्येक ओव्हरमधला रनरेट काढण्यासाठी यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. कु ठे, कु ठली वस्तू कमी किमतीत
मिळेल, कु ठल्या गुंतवणुकीवर कमी काळात जास्तीत जास्त व्याज मिळेल हे ते धडाधड सांगू शकतात.

अशा व्यक्ती जितक्या हिशेबाच्या पक्क्या, तितक्याच घड्याळाच्याही. वेळ पाळणं भयंकर आवडतं यांना. ध्येय गाठण्यासाठी अचूक नियोजन करतात. अगदी
कागदावर स्टेप-बाय-स्टेप ‘प्लानिंग’ करून. नियोजन म्हणजे यांचा कणाच! टप्प्याटप्प्याने आपल्या ध्येयाकडे हे मार्गक्रमणा करतात. घिसाडघाई नाही,
अतिउत्साह नाही. अभ्यासातही तसंच. अ कडू न ब कडे आणि ब कडू न क कडे अशी त्यांची विचारांची जोडसाखळी असते.अ कडू न क कडे हनुमान उडी
घेणार नाहीत! अक्षर, चिन्ह, सांके तिक भाषा यावरचे कू टप्रश्‍न यांना सोडवायला प्रचंड आवडतात, म्हणूनच बुद्धिमत्ता चाचणी हे यांचे बलस्थान!

अशा व्यक्ती एखाद्या माणसाला भेटल्या तर त्याचं नाव लक्षात ठेवतात, विसरत नाहीत. नियोजन असल्याने आयुष्यात भौतिक अर्थाने यशस्वी पण ठरतात.
अतिशय सूक्ष्म निरीक्षण असतं यांचं. फारसं सुटत नाही नजरेतून.

सांख्यिकीय क्षमता, डेटाचा वापर करणार्‍या स्पर्धात्मक परीक्षांत अशा स्वरूपाच्या व्यक्ती सहज यशस्वी होतात. यांचे त्यांच्या भावनांवर बर्‍यापैकी नियंत्रण असते.
साहजिकच निर्णय हे भावनाविवश न होता, विचारांवर आधारित घेतात.

डाव्या मेंदूच्या व्यक्ती इंजिनीअर्स, संख्याशास्त्रातली करीयर्स, बँकिं ग यात प्रचंड यशस्वी असतात.

*उजव्या मेंदूची माणसं*

ही म्हणजे भावनाविवश, बरीचशी कलाप्रवृत्तीची माणसं. यांना पॅटर्नऐवजी चित्र भावतं. एखादी व्यक्ती भेटली तर हे तिचा चेहरा लक्षात ठेवतील. नाव लक्षात
ठेवतीलच असं मात्र नाही, अशा व्यक्तींना विश्‍लेषणापेक्षा सारग्रहणात जास्त रस असतो म्हणूनच इतिहासासारख्या विषयात या व्यक्ती रमतात. तुकड्यातुकड्यात
अभ्यास करण्याऐवजी अशा व्यक्तींना संपूर्ण एकत्रित संरचना लक्षात ठेवणं जास्त भावतं.

अशा व्यक्तींना नियोजनाचं वावडं असतं. वेळापत्रक अतिशय नावडीचं! अभ्यासाची पद्धतही अशीच. वाटलं तर वाटलं तेव्हा वाटलंं तसं! अंतर्ज्ञानावर त्यांचं ज्ञान
आधारलेलं असतं. आतून वाटतं तेव्हाच त्यांना ‘कळतं’. रंग, चित्र यांचा त्यांना प्रचंड सोस असतो. वृत्ती खेळकर. कलाकार प्रवृत्तीची असते.
'Intuition' 'sixth sense' अतिशय तीव्र असतात.

अशा व्यक्ती भावनाविवश असतात. या भावना त्या शब्दातही सहज पकडू शकतात म्हणून निबंधात्मक उत्तरात या व्यक्ती कधीही हार जाणार नाहीत. इतरांना
समजून घेणे, चेहरे वाचून स्वभाव ओळखणे यात अतिशय पटाईत! फोनवर तासन्तास बोलत राहतील (दुसर्‍या दिवशी परीक्षा असली तरी!)

या व्यक्ती कवी मनाच्या म्हणूनच थोड्या ‘अनपेक्षित’ वागणार्‍या लहरी असतात. फोनवर बोलताना, इतरांशी बोलताना प्रचंड हातवारे करीत बोलतील. नवी
वस्तू घेतील आणि त्याचं ‘इन्स्ट्रक्शन मॅन्युअल’ न वाचताच ते वापरतील! नियम यांना पटत नाहीत आणि नियमानुसार वागतही नाहीत! 'Creative
Approch' ने उत्तरं शोधतील. सलग, पायर्‍या पायर्‍यांनी शिकणं यांना कं टाळवाणं वाटतं. संगीत, चित्रकला, नाट्य यात मात्र पारंगत!

निष्कर्षाकडे...

एकू ण तुम्ही प्रामुख्याने डावे की उजवे, हे तुम्हाला थोडंफार ओळखता आलं असेलच! तुम्ही म्हणाल, याचा आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या यशाचा संबंध काय?
तर मी म्हणेन, आहे. तुमच्यात असलेला डावा (गणिती) आणि उजवा (कलाकार) यामधला जो अधिक बलवान आहे, तो अर्थातच तुमचं शक्तिस्थान
आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासात जर त्याचा वापर करायला मिळाला तर तुमची यशोनिश्‍चिती नैसर्गिकच! पण असा विचार करा की, दुर्दैवाने तुमची कच्ची
बाजूच तुम्हाला परीक्षेत वापरायची आहे तर? उदा. डाव्या मेंदूच्या व्यक्तीला निबंध लिहायचे आहेत किं वा उजव्या मेंदूच्या व्यक्तीला ‘गणितं’ सोडवायची आहेत
तर होणार ना पंचाईत? अशावेळेला आपलं स्वत्त्व’ न सोडता इतर क्षेत्र पण आपल्याला ‘काबिज’ करणं जमलं पाहिजे.

You might also like