You are on page 1of 1

संस्कृ त आणि तमिळसंबंधी काही प्रश्न.

१.भारतात संस्कृ त ही भाषा साधारण कधी आली?या विषयाची बहुतांश 'मान्यताप्राप्त इतिहास संशोधन संस्थांनी' मान्य के लेली थेअरी कोणती?

२. संस्कृ त भारतात येण्याआधी संपूर्ण भारतात द्रविड कु ळातल्या भाषाच बोलल्या जात होत्या का?की अजून कोणते कु ळ होते?कोणत्या प्रदेशात?

३. संस्कृ त ही नियमबद्ध,ठरवून घडवल्यासारखी भाषा आहे.संस्कृ त ही सुरुवातीला सर्वांसाठी नव्हती.मग जर ती के वळ विद्वानांसाठी असेल; म्हणजेच छोट्या
जनसमुहाची ज्ञानवर्धनाची चर्चा करण्याची भाषा असेल तर त्याच संस्कृ तचा भारताच्या जवळपास सर्व भाषांवर इतका प्रभाव का बरं पडावा?बहुजनांचा,कष्टकर्‍यांचा
संस्कृ तशी कितीसा संबंध हा त्या काळी येत असावा?

४. की कोशकार श्रीधर व्यंकटेश के तकर यांनी म्हटल्याप्रमाणे संस्कृ त ही इथल्याच देशी भाषांवर 'संस्कार करून बनवली गेली' म्हणून तिला संस्कृ त असे
नाव दिले गेले हे खरे आहे?

५. भारतातल्या बर्‍याच भाषांवर संस्कृ तचा चांगला प्रभाव आहे.पण सर्वात कमी प्रभाव आहे तो तमिळ भाषेवर. इतका की जर तमिळ लोकांनी 'ठरवलं तर'
ते एक ही संस्कृ त शब्द न वापरता के वळ १००% तमिळ शब्द वापरुन संवाद साधू शकतात.सध्याचा तमिळ भाषिक प्रदेश बघितला तर तो साधारण बाकीच्या
राज्यांइतपतच आहे. मग हा एवढाच प्रदेश संस्कृ तला प्रखर विरोध कसा काय करू शकला? त्या काळी आणि अजूनही तामिळनाडू ने संस्कृ तचा प्रभाव कसा
काय रोखला असावा? शेजारचे कन्नड,तेलुगू ,मल्याळम या भाषा बोलले जाणारे प्रदेश संस्कृ तच्या आक्रमणाला जितके शरण गेले तितके तमिळभाषिक शरण गेले
नाहीत.ही के वळ आधुनिक काळची म्हणजे द्रविड पक्ष आल्यानंतरची गोष्ट नाहीये तर शेकडो वर्षांपासून तमिळ भाषिक विशेषत: ब्राह्मणेतर हे संस्कृ तला विरोध
करत आलेले आहेत.आता आधुनिक काळात जरी तमिळ भाषेतल्या आधीपासून असलेल्या संस्कृ त शब्दांना पूर्वीइतका विरोध होत नसला तरी अजून नव्याने
येणार्‍या संस्कृ त शब्दांना टाळण्याचे प्रयत्न मात्र आवर्जून होतायत.हा इतका कट्टरपणा कशामुळे येत असेल?शेजारच्या अन्य दक्षिणी राज्यांनी मात्र संस्कृ तपुढे नांगी
टाकण्याचे कारण काय?

You might also like