You are on page 1of 1

धनगर व ‘मार्के टिंग कन्सल्टन्ट’

उल्हास हरी जोशी

एक ‘मार्के टिंग कन्सल्टन्ट’ होता. तो बराच नावाजलेला होता व अनेक मोठ्या मोठ्या कं न्यांना, सरकारी संस्थांना व सरकारी कं पन्यांना तो कन्सल्टन्सी देत
असे. आपल्या या पोझीशनचा त्याला नुसताच अभिमान नव्हता तर थोडासा गर्व पण होता.

त्याला ग्रामीण भागात फिरायची फार हौस होती. एकदा तो असाच आपल्या कारमधून ग्रामीण भागात फे रफटका मारायला निघाला. त्याला वाटेत एक धनगर
दिसला. त्याच्याकडे 200 मेंढ्यांचा कळप होता. या मेंढ्या आरामात रस्त्याच्या कडेला चरत होत्या तर तो धनगर आरामात झाडाखाली पावा वाजवत बसला
होता. त्या धनगराकडे एक कु त्रे होते व ते मेंढ्यांवर पाळत ठेवण्याचे काम करत होते. एखादी मेंढी जरा आजुबाजुला झाली की ते कु त्रे भुंकु न भुंकु न त्या
मेंढीला जागेवर आणत होते. एक छोटेसे कु त्रे 200 मेंढ्यांना कं ट्रोल करते आहे हे बघुन त्या कन्सल्टन्टला आश्चर्य तर वाटलेच व कौतुक पण वाटले.

त्याने आपली कार थांबली, त्या धनगराकडे गेला व ते कु त्रे विकत घेण्याची ईच्छा व्यक्त के ली. आधी तो धनगर काही के ल्या कु त्रे विकायला तयार होईना!
मग त्या कन्सल्टन्टने बरेच समजाऊन सांगीतल्यावर तो धनगर एकदाचे कु त्रे विकायला तयार झाला. 200 डॉलर्स किं मत ठरली. त्या कन्सल्टन्टने पैसे दिले
व कु त्रे उचलून चालायला सुरवात के ली. धनगराने त्याला हाक मारून परत बोलावले.

‘तुम्ही मार्के टींगमधे काम करता कां?’ त्या धनगराने विचारले. त्याचा प्रश्न ऐकु न तो कन्सल्टन्ट चाटच पडला. या अशिक्षीत मुंडासेवाल्या धनगराला कसे
कळले की मी मार्के टिंग मॅन आहे म्हणून?

‘होय अगदी बरोबर! पण तुम्ही कसे ओळखलेत?’ त्या कन्सल्टन्टने आश्चर्याने विचारले.

‘त्यात काय मोठे? मला कु त्रा विकायचा नव्हता पण तुम्ही मला कु त्रे विकायला उद्युक्त के लेत! हे काम मार्के टिंगशीवाय कोण करू शकतो? लोकांना ज्या गोष्टी
करायच्या नसतात त्या करण्यासाठी त्यांना कसे उद्युक्त करावे हे तुम्हा मार्के टिंगच्या लोकांकडू न शिकावे!’ धनगर म्हणाला.

एका अशिक्षीत धनगराकडू न आपली स्तुती ऐकु न तो कन्सल्टन्ट फार खुष झाला. ‘होय! मी मार्के टिंग कन्सल्टन्ट आहे!’ त्याने मोठ्या झोकात उत्तर दिले

‘तुम्ही मोठमोठ्या कं पन्यांना किं वा सरकारी संस्थांना कन्सल्टन्सी देता का?’ त्या धनगराने विचारले. आता खरोखरच त्या कन्सल्टन्टवर उडायची पाळी आली.
हे या धनगराने कसे ओळखले?

‘होय अगदी बरोबर!’ तो कन्सल्टन्ट खुष होऊन म्हणाला. आता या धनगराला माझी खरी किं मत कळली तर!

‘याचा अर्थ तुम्ही अशा प्रॉडक्ट किं वा सर्व्हिसेस साठी मार्के टींग कन्सल्टन्सी देता की ती प्रॉडक्टस तुम्ही कधी प्रत्यक्षात पाहिलेली नाहीत, वापरलेली नाहीत.
अशा सर्व्हिसेस ज्या कधी तुम्ही प्रत्यक्षात वापरेल्या नाहीत. यासाठी भरपूर फी पण उकळत असाल?’ धनगर म्हणाला.

कन्सल्टन्टला क्षणभर त्या धनगराचा राग आला ‘असे कशावरून म्हणता?’ त्याने रागाने विचारले.

‘कारण तुम्ही मला कु त्रा विकत घेण्याचे पैसे दिलेत पण प्रत्यक्षात मेंढी घेऊन चाललात. तुम्हाला अजुनही कु त्रा आणि मेंढीमधला फरक ठाऊक नाही. तेव्हाच
मी ओळखले की तुम्ही मोठ्या किं वा सरकारी कं न्यांचे मार्के टिंग कन्सल्टन्ट असणार!’ तो धनगर कु त्सीतपणे म्हणाला.

बिचारा ‘मार्के टिंग कन्सल्टन्ट’ काय बोलणार?

‘कन्सल्टन्ट’ म्हणजेच ‘सल्लागार’! सुप्रसिद्ध मराठी लेखक न. चिं. के ळकर यांनी ‘सल्लागार’ या शब्दाची फार गंमतीदार व्याख्या के ली आहे. ज्यांचा
‘सल्ला’ ऐकु न लोक ‘गार’ पडतात ते ‘सल्लागार’.

हल्ली ही जमात आपल्या समाजात फार बोकाळत चालली आहे. पुर्वी कांही ठरावीक क्षेत्रात कन्सल्टन्ट असायचे. आता गल्लो-गल्ली कन्सल्टन्ट म्हणजे
‘सल्लागार’ निर्माण व्हायला लागले आहेत. यातील अनेक सल्लागार हे अर्ध्या हळकुं डाने पिवळे झालेले पण आपल्याला त्या क्षेत्रातले ‘फार मोठे तज्ञ’ समजणारे
असतात. आज मार्के टिंग, सेल्स, फायनान्स, ईन्व्हेस्टमेन्ट, शेअर मार्के ट, फिटनेस, आरोग्य, ऍक्टींग पासून ते खावे कसे, झोपावे कसे इथपर्यंतचे
क्न्सल्टन्ट निर्माण झाले आहेत. हे लोक भरपूर फी उकळता पण प्रत्यक्ष पदरात काय पडते भगवान जाणे. हे कन्सल्टन्ट गंमतीदार असतात व त्यांनी
सुचवलेले उपाय ते कधीच आचरणात आणत नसतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध खलनायक प्राण हे एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘ आजपर्यंत
पडद्यावर जेवढे बलात्कार मी के ले आहेत तेवढे दुसर्या कोठल्याही खलनायकाने के ले नसतील. पण प्रत्यक्षात मी एक अगदी साधा, सरळ, पापभीरू व धर्माचे
पालन करणारा माणूस आहे. माझी पत्नि सोडल्यास इतर सर्व महिला मला आईसमान किं वा बहीणीसमान आहेत. पडद्यावरील बलात्काराचा सीन परिणामकारक
करण्यासाठी तुम्ही खरोखरच बलात्कार के ला पाहीजे किं वा तुम्ही यात एक्सपर्ट असायला पाहीजे असे नाही.’ बहुतेक ‘सल्लागारांनी’ प्राणसाहेबांचा ‘सल्ला’
मानायचे ठरवलेले दिसते. कारण ‘माझा सल्ला हा तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही.’ असे त्यांचे तत्व असते. उंटावरून शेळ्या हाकणार्याच या
सल्लागारांना ‘मेंढी व कु त्रा’ यातला फरक समजत नसतो व त्यामुळे त्यांचा ‘सल्ला’ काय लायकीचा असु शके ल हे तुम्हीच ठरवायचे.

पण याचा अर्थ सर्वच सल्लागार असे असतात असा होत नाही. अनेक क्षेत्रामधे प्रामाणीकपणे, अभ्यासुपणाने, ग्राहकांचे हीत डोळ्यांसमोर ठेऊन, पोटतिडकीने व
मनापासून काम करणारे , तसेच उत्तम व व्यवहार्य सल्ला देणारे सल्लागार पण आहेत. त्यांना सुद्धा याच कॅ टेगरीत आणले तर तो त्यांचेवर अन्याय होईल.

थोडक्यात ‘सल्लागार’ हा पारखून घ्यावा व त्याला ‘मेंढी आणि कु त्रा’ यातील फरक ठाऊक आहे की नाही हे तपासून पहावे!

You might also like