You are on page 1of 1

*भाषेमधे सार्वत्रिकता महत्वाची असते.

* विशिष्ट अशी एक भाषा बोलणार्‍या त्या सर्वांना शब्दांचे आकलन पटकन होण्यासाठी प्रमाणभाषा महत्वाची असते.म्हणूनच
शाळेत सर्व विषय प्रमाण भाषेत शिकवतात.विदर्भात गाडीला बंडी/वंडी म्हणतात.विदर्भातला माणूस पुण्यातल्या बसस्टॉपवर पुणेरी माणसाला "वंडी किती वाजता
येणार?" असं म्हणाला तर त्या पुणेरी माणसाला ते कळणारंच नाही.गाडी म्हटलं तरंच कळणार.
पुण्याच्या माणसांनी बंडी शब्द स्विकारावा हा उलटा प्रकार यशस्वी होणार नाही कारण मराठीवरचे संस्कार त्याची शुद्ध,अशुद्धता यावर पुणे या परिसरात खूप
पूर्वीपासून बरंच काम झालेलं आहे.पुण्यातले लोक शक्य तितकी शुद्ध मराठी वापरायचा प्रयत्न करतात.विदर्भात हे होतं का? गोंदिया हा जिल्हा आता पूर्णपणे
हिंदीभाषिक झालाय.नागपूरातही हिंदीच आहे.मूळ विदर्भातले लोकच बरीचशी हिंदी बोलतात.मग कु ठल्या अधिकाराने पुण्यातल्या माणसाला बंडी स्विकारा गाडी
टाकू न द्या म्हणून सांगणार?
तामिळच्या सिंगापूरी,लंकन,भारतीय,मलेशियन अशा चार बोली आहेत.शिवाय तामिळनाडू तल्या वेगवेगळ्या ठिकाणांचे वेगवेगळे हेल आहेत. *पण शिकवणारे
शिक्षक मग तो कोणत्याही देशातला असो शिकवताना मदुराई परिसरातली तामिळच शिकवतो.कारण ती प्रमाण भाषा आहे.*

You might also like