You are on page 1of 1

*मासे पकडण्याची गोष्ट!

युरोपात फिरताना लहान - मोठ्या तळ्याकाठी किं वा नदीच्या वळणदार प्रवाहात गळ टाकू न बसलेले लोक पाहणं मजेशीर वाटतं . गोलसर टोपी , अंगात
जॅके ट , सुती ट्राउजर घातलेले पुरुष - स्त्रिया आणि त्यांच्या शेजारी ठेवलेल्या वेताच्या बास्के टमधनं डोकावणारे थर्मास , कु ठे नॅपकिन तर काही ठिकाणी
पॉपकॉर्नचे कोन . त्यांच्याकडे पाहून प्रश्न विचारावसं वाटायचं , हॅलो , मि . थॉर्नडाइक , मासे पकडायला नेमकी हीच जागा का निवडलीत ? त्या
पलीकडे थॉमसकाका नि काकू बसल्यात तिथे का नाही गळ टाकला ? ' ' प्रश्न विचारण्याची गरज नव्हती कारण उत्तर अपेक्षित होते . अर्थात इथे मासे
मिळतील म्हणून ! पण ही गोष्ट इथेच संपत नाही आणि गोष्ट सांगण्याचं ते प्रयोजनही नाही . म्हणजे हीच गोष्ट करिअरची शिडी चढणार्‍या तरुण -
तरुणींसाठी सांगावी लागते . म्हणजे असं पाहा , आपण कोर्स कोणता निवडतो ? जिथे झुंबड असते तिथे ! म्हणजे जिथे मासे मिळण्याची शक्यता सर्वात
अधिक तिथेच सगळे जमा होतात . त्यामुळे मासे मिळण्याची खात्री वाटत असली तरी स्पर्धा कायच्या काय वाढते ! अर्थात , तिकडे झुंबड लागते म्हणजे
तो कोर्स निवडण्यात कॉमनसेन्स आणि सिक्युरिटी जास्त . म्हणून त्याचा युनिकनेस अगदी नगण्य ! म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला येणारे मासे कमीच . बरं
आपल्याला आता लोक पकडायला येणार म्हणून माशांनी तिथे धाव घेतली , असं होण्याची शक्यता नाही . म्हणजे शिक्षण मिळालं तरी त्यानुसार इच्छित
नोकर्‍यांची संख्या वाढतेच असं नाही . मग काय करावं ? मासे पकडण्यासाठी अपस्ट्रीम जावं, नव्या जागा शोधाव्या , नवी ठिकाणं हुडकू न काढावी .
याचा अर्थ अपरिचित कोर्सचा शोध घ्यावा . म्हणजे ' आपलं वैशिष्ट्य टिकवता येईल . हो , पण त्यात रिस्क अधिक बरं , ते कॉमनसेन्सला पटेल
असं नाही . हो , पण म्हणून तिथे झुंबड नाही . अशा रीतीचे विचार के ले तर करिअरमध्ये आपलं यश निश्चित होईल . जरा हट के , वाटतं ना !
पण त्याशिवाय पुढचे दिवस नाइस कसे होतील ?

*डॉ.राजेंद्र बर्वे*

You might also like