You are on page 1of 6

गंमत भाषेची !

“मनापासून” या लेखमालेतील पाचवा लेख आपल्या भाषेववषयी..

मूल जन्माला आलं की लगेच भाषेची गंमत सुरु होते..! त्यातही आपली मराठी भाषा शब्ांच्या दृष्टीने
फार समद्
ृ ध आहे . हे जे मूल जन्माला येतं ना, त्याला इतर प्राणयांच्या पपल्लासारखं लगेच काही करता
येत नाही. अनेक द्वस ते परावलंबीच असतं. मात्र त्याने बोलायला सरु
ु वात करायच्या आधी लोक जणू
आपणच आता जन्मलोय अशा थाटात “बोबडं” बोलायला सुरुवात करतात. एखा्ी मावशी, आत्या लगेच
सुरूच करते..

“शोनल
ु माजं ते..अ लो लो लो..ललू नको ले..काय पायजे माज्या लाजाला...” जर त्या बाळाला त्या क्षणी
बोलता आलं असतं तर ते ननश्चचत म्हणलं असतंच,

“ मावशे, अगं बाळ मी आहे का तू? जरा मोठ्या मानसावानी बोल की..”

पण माणसे आपल्या आपल्या पद्धतीने बोलत राहतात. आपल्या ्े शात तर भाषा ्र ३०-४० ककमीवर
ब्लते. कोकणातली बोली वेगळी असली तरी त्यातही “बाणकोटी, चचपळूणी, संगमेचवरी, आगरी, मालवणी,
कारवार-गोव्याची कोकणी, कोळी-मुसलमानांची उ्ू ममचित बोली, चचत्पावन ब्राह्मणी बोली” असे अनेक
सुक्ष्मभे् आहे त. कोल्हापुरी, सातारी, वऱ्हाडी, खान्े शी, पुणेरी, पंढरपुरी, नागपूर कडील पव्भी भाषा,
बेळगावी कन्नड-ममचित मराठी, असे आपल्या मराठीचे अनेक अनेक प्रकार. जन्
ु या ग्रंथातील भाषा,
बखरीची भाषा हे आणण काही वेगळे प्रकार. हे सगळे प्रकार ऐकायला पवलक्षण सुं्र आहे त. प्रत्येक
बोलीचा ठसका अस्सल..! आणण शब्ांचे सामर्थयू तर केवढे ..आणण एका शब्ाचे ककती अथू..! एक
उ्ाहरणच पाहूया ना.

एखाद्या घरात सकाळी एखादा खडूस म्हातारा पूजेला बसलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की चंदनाचं
“खोड” एकदम झिजून गेलय
ं . तो म्हणतो,

“सुनबाई, जरा चंदनाचे नवे खोड दे गं बाई. हे जुने खोड उगाळता येत नाही आता..”

सुनबाई आपल्या कामात. मुलांचे डबे, स्वैपाक, या सगळ्यात आधीच उशीर िाल्याने “करवदलेली”. धाड-
धाड जात ती कपाटातले “खोड” काढून त्या सासऱ्यापुढे दे ते. जाताजाता हळूच पुटपुटते.. “ ही जुनी “खोडं”
कधी संपणार कुणास ठाऊक...”

दरू ततथे खोबरं खवणत बसलेल्या सासूबाईंना कमी ऐकू येत असूनही हे मात्र नेमकं ऐकू येतं.. त्या ततथून
पुटपुटतात,
“हहला आम्ही नकोसेच िालोय. काय हे वागणे हहचे. नाहीतरी मी म्हणालेवते चंद्याला, या मुलीत
काहीतरी “खोड” काढून हहला नापसंत करूया..पण तो रुपाला भाळला होता नं तेंव्हा...!”

तेवढ्यात परसबागेत काम करत असलेला चंद्या घरात येतो, म्हणतो, “ अगं आई, आपल्या त्या जुन्या
आंब्याचं काही बघायला पाहहजे. खोडाला वाळवी लागलीय आता..”

या छोट्याशा पररच्छे ्ातील मराठी ही “पुस्तकी सवूसामान्य मराठी” आहे . तरीसुद्धा एक “खोड” हा शब्
ककती प्रकारे वापरता येतो आणण त्यामळ
ु े अथू कसे कसे ब्लत जातात हे जाणवले की आपल्या भाषेच्या
ताक्ीचे कौतुक वाटते.

अशीच एक्ा मी गंमत अनभ


ु वली कोल्हापरु ात.

सुट्टीत भावाकडे गेलो होतो. अंबाबाईच्या ्शूनाला गेलो. नतथे नेमकी त्या द्वशी ही ग्ी. लोकांनी रांगा
लावलेल्या. मी महाद्वारातून नमस्कार करून परत कफरणार इतक्यात एक काका म्हणाले,

“आवो, जाता कशापाई..या इथं पाळीत उभारायला.. १५-२० ममन्टात पोचतोय की आत..” पाळी हा शब्
“वेगळ्या” अथाूने माहीत. त्यामुळे “पाळीत” उभं कसं राहायचं ? असं क्षणभर वाटून गेलं..!! त्यातही
रात्रपाळी, कानाची पाळी हे अजूनही वेगळे अथू.

ओटीत घेणे, ओटीवर घेणे याचेही वेगळे अथू. एखाद्या “ओटीत घेणे” म्हणजे जवळ घेणे, ्त्तक घेणे असा
अथू. बायकांच्यात “ओटी भरणे” हा अजून वेगळा अथू सांगणारा शब्. तर जन्
ु याकाळी पवमशष्ट लोकांनाच
घराच्या “ओटीवर” घेतलं जाई. बाकीच्यांना बाहे र पायरीशी तरी बसावे लागे ककं वा पडवीत तरी.

पडवी, ओटी, माजघर, शेजघर, स्वैपाकघर, न्हाणीघर अशा भागात तेंव्हा घर पवभागलं जात असे.
आताच्या वन – टू बीएच-के च्या जमान्यात तशी मोठी घर पाहायला ममळणं शहरी लोकांच्या मात्र
नमशबात नाही आणण ते शब् ही क्ाचचत नामशेष होऊन जातील...!

अशीच मजा “सुपारी” या शब्ाची. लग्नाची सुपारी, खायची सुपारी, एखाद्याला “मारायची” सुपारी असे
ककती अथू..!

मारणे हा शब् सुद्धा आपण ककती प्रकारे वापरतो. एखा्ा नव्यानं “मराठी भाषा” मशकणारा ननश्चचत
गोंधळून जाईल अशीच पररश्स्थती.
एखाद्याच्या कानफटात मारणे, तोंडात तंबाखच
ू ा बार मारणे, थापा ककं वा बाता मारणे, मस्का मारणे,
गाडीला ककक मारणे, झक मारणे, फोन मारणे (एखा्ा वेळेवर आला नाही, की पव
ू ी लोकं पट्कन म्हणत,
त्याला एक फोन मारून बघ..कुठं झोपलाय कुणास ठाऊक..! हल्ली सगळे “कॉल” करतात / मारतात.)
“मूठ मारणे” हा शब्प्रयोग सुद्धा ्ोन अथी वापरला जातो...!

तर काही काही शब् असे असतात की ते उच्चारले, ऐकले की मनात एक चचत्र पट्कन उभं राहतंच.
बुळबुळीत, कुळकुळीत, झळझळीत, झुळझुळीत, सुळसळ
ु ीत, गुळमुळीत, खळखळत, मळमळत, ककं चाळत,
कळवळत, फळफळत असे सगळे “ळ” चा प्रभाव असणारे शब् नुसते उच्चारून पहा. तुम्हाला खात्रीच
पटे ल त्यांच्या प्रभावाची. “बळ
ु बुळीत शेंबूड”, झळझळीत सूयप्र
ू काश, गुळमुळीत उत्तरं , सुळसुळीत साडी हे
शब्प्रयोग क्षणात आपल्या समोर खणखणीत चचत्रं उभी करतात.

तर आपल्या भाषेतील काही शब् असतातच भार्स्त (हाही शब् त्यातलाच एक). लफ्फे्ार, तजेल्ार,
रुबाब्ार, तडफ्ार, अहं मन्य, उद्पवग्न, पवद्वत्तापण
ू ,ू अभ्यासपूण,ू भग्नावशेष, कारुणयगभू, आनं्ोत्सव,
वर्हस्त, शुभामशवाू्, सौभाग्यवती, राजमान्य, लोकमान्य, प्रज्ञावंत, िीमंत, पवद्यापवभूपषत इ.. एखाद्या
वाक्यात त्यांचा वापर केला तरी ते वाक्य वजन्ार होऊन जातं. तशीच मजा काही कियाप्ांची.

स्टोव्हचे फरफरणे, कुत्र्याचे गुरगुरणे, गरीबाचे थरथरणे, पाय लटपटणे, फोड टरटरुन फुगणे, तापाने
फणफणणे, सापाचे सरपटणे, गाईचे हं बरणे, नवरा-बायकोचे एकमेकांवर खेकसणे, अचधकाऱ्याचे ्रडावणे,
घोड्याचे णखंकाळणे अशी शेकडो कियाप्ांची या्ी सांगता येईल. मात्र पवपवध प्रातांत ही कियाप् अशीच
वापरतील याची मात्र खात्री नाही हं ..!

उ्ाहरणाथू एखा्ा मुलगा जर आपल्या ग्रुपमध्ये हसत असेल तर कोल्हापूरच्या मंगळवार-बुधवार पेठेतला
एखा्ा ्ोस्त पट्कन म्हणन
ू जातो, “का रं , लई णखंकाळायलाईस...” तर एखा्ा वऱ्हाडी- वै्भी माणूस
्स
ु ऱ्याला म्हणन
ू जातो, “काहून हासन
ू रादहलाय वो...”

या भाषेला अजन
ू लज्जत येते ती बोली भाषेतील वेगळे पणामळ
ु े . लोक बोलत असताना अनेक्ा मलंग,
वचन या सगळ्या सगळ्यांची उलटापालट होते, मशव्यांची झणझणीत फोडणी बसते, एकच “काला” होतो,
पण जे काही ऐकायला ममळते ते माझ्यासारख्या शब्प्रेमी माणसाला सुखावते.

एखाद्या कोकणी घरात संध्याकाळी गजाली रं गलेल्या असतात. चार सहा ननरुद्योगी सहजच नतथं एकत्र
असतात आणण नसलेल्याचे झकास उखाळे -पाखाळे काढले जातात.
गावभर उचापत्या करणाऱ्या, सगळीकडे कामात स्वतः सहभागी होणाऱ्या कुणा “अनंतासाठी” एखा्ा तात्या,
बोलन
ू जातो,
“तो फोदरीचा अंत्या, च्यायिो कुठे िक मारायला जात असतो कुणास ठाऊक. आपली बायको नाय
सांभाळता येत धड आझण चाललाय दस
ु ऱ्याची लग्नं लावायला..! परवा आलीवती ती तक्रार घेऊन
माझ्याकडे. म्हणाली, तात्या तुम्ही तरी सांगा हो त्यांना, जरा घरात लक्ष द्या म्हणून..! ततथं त्याच्या
घराचं लाईट कनेक्शन तोडलंन त्या एमेससबी वाल्यानं, आझण हा आपला बािवत फफरतोय गावोगावी..!”

अत्यंत घाणेरड्या मशव्या असूनही ना ऐकणाऱ्याला त्यात काही वाईट वाटतं ना बोलणाऱ्याला...! खरं
म्हणजे मशव्या हे एक वेगळा आणण स्वतंत्र पवषय. मात्र गमतीची गोष्ट म्हणजे पवपवध भाषेतल्या मशव्या
“ठरापवक लैंचगकतेशी” येऊनच थांबतात. बहु्ा आई-बदहणीवरून मशवी द्ली की माणूस जास्त ते मनाला
लाऊन घेतो, म्हणनू जगभरातील सगळ्या भाषेतील मशव्या नतथेच येऊन पोचतात. एखा्ा कोकणी माणस ू
“रांडेच्या” म्हणतो, तर घाटावर “रांड्या, रांडलेका” असं म्हणतात. आणण इंग्रजीत ते थेट “bastard” होऊन
जातं. एखा्ा मालवणी माणूस “मायझव्या” म्हणतो तर ्स
ु रा “मा्रचो्” तेच इंग्रजीत “mother-fucker”
होऊन जातं.

अनेक घाणेरड्या म्हणी, वाक्यप्रयोग, शब्प्रयोग हे शेकडो वषाूपासून समाजात प्रचमलत आहे त. तर ज्या
शब्ांना “घाणेरडेपण” चचकटायला हवे असे “गभूगळीत, हतवीयू, गलथान” इ. शब् समाजात सराूस वापरले
जातात.

मुंबईमध्ये भाषेची तऱ्हा अजूनच ननराळी. नतथे एकच अपाटू मेंटमध्ये कोकणी, वै्भी, खान्े शी, गुजराती,
मसंधी, तममळ असे सगळे च एकत्र. त्यामुळे भाषेची प्रचंड सरममसळ. त्यातही इंग्रजीचं प्रस्थ भयंकर.
ककं बहुना इंग्रजी शब् अधन
ू मधन
ू पेरणे हे “प्रनतश्ष्ठतपणाचे” लक्षणच...! मग मल
ु ांच्या प्ले- एररया जवळ
बायकांच्या गप्पा रं गतात,

“ अय्या ररतू, नवीन ड्रेस आहे गं हा. सो ब्युटीफुल. कसली क्युट हदसतेयस गं..! आझण काल नाही
हदसलीस ती असशिताच्या बथिडे पाटीला ?”

मग ती दस
ु री म्हणते, “नाय गं. मी काल एअरपोटि वर गेली होती. स्स्मतु (म्हणजे ततचा नवरा अस्स्मत)
लंडनला गेला नं बबिनेस ट्रीपला. त्याला नं मुळीच करमत नाही माझ्यासशवाय..म्हणाला मी प्लेनमध्ये
बसेपयंत तू जवळ हवीस, पण नाही नं जाऊ दे त ततथपयंत.. म्हणून मग फकमान त्याला “सी-ऑफ” करून
आले.”

तर त्याचवेळी लोकलमधून धक्के ्े त चढलेला “त्या पदहलीचा नवरा” ्स


ु ऱ्या धक्के ्े त चढणाऱ्यावर
ओरडत असतो,

“हदखता नाय क्या? पाय के उपर पाय दे के धक्का क्यू मारताय? एक तो खडा रय्नेको जागा नई उपरसे
तुम धक्का मारता है ? हमभी डोंबबवली तक ही जायेगा, इधर डब्बा पयलेसे भरे ला है ..!”
एखाद्या पण
ु ेरी, ब्राह्मणी शद्
ु ध बोलणाऱ्या कुटुंबात, संध्याकाळची वेळ. मैत्रत्रणींबरोबर आईस्िीम खायला
मुलगी बाहे र गेलेली. अजून परतलेली नाही. द्वसभर नोकरी करून घरी परतलेल्या बापाचा त्रागा सुरु
होतो. तो आपल्याच बायकोवर जाळ काढू लागतो,

“जा म्हणावं रात्र रात्र बाहे र. तुमचे लाड सगळे . एकदा तोंड काळे करून आली की समजेल. इथे आम्ही
रक्त आटवून मर मर मरतोय, तुम्हाला काय त्याचं. बघावं तें व्हा बाहे र जायचं आझण खावा आईस्क्रीमं..!
कोणास ठाऊक मैबत्रणीबरोबर जातेय का कुणा मवाल्याचा हात धरून फफरतेय..”

रोज मुलाची अशीच बडबड ऐकताना चचडलेल्या त्या गह


ृ स्थाचा म्हातारा बाप मात्र बेळगावी थाटात,
ू जातो, “कशाला उगाच बडबडून सोड्लायास रे . ती काय कुठे न सांगता नाही न
पवमशष्ट हे ल काढत बोलन
गेली? आझण तू तरी कुठं लक्ष दे ऊन वाग्तोय्स म्हणतो मी? जरा घराकडं बगायचं सांगावं कशाला लागतंय
रे तुला? लग्न तूच मनानं करून बसलायस न्हवं ? आपल्याच बायको-पोरांशी प्रेमानं बोलायला काय पैशे
पडतात काय रे मग? बगाव तें वा तोंड-गांड एक करून आपलं भडाभडाभडा बोलायचं म्हं जे बरं न्हवं बग..!”

कोल्हापूरकडे तर “नपुसकमलंग” जास्त वापरलं जातं. नेमानं नतथे मटनपाट्ूया होतात त्यांना “रस्सा मंडळ”
म्हटलं जातं. एखाद्या द्वशी एखा्ा मभडू द्सत नाही. मग पाटलाचा अरणया (अरुण पाटील) म्हणून
जातो, “ते रावल्या कुट गेलय रं ? कदी कुट टायमाला पोचनार नाय बग ते..! हहतं आमी कवापास्न वाट
बघा लागलोय, अतन ते बसलं आसल कुठतरी शेण खात..”

ते आलंय, ते गेलंय, ते बोलालंय, चालालंय, असं सगळं बोलणं. ऐन पेठेतली बाई सद्
ु धा शेजारणीला
म्हणते, “आमचं ह्यांनी जेवा लागलेत गं, तर मन्या हगा लागलंय बग..त्यांचं आवरलं की येते मग
बोलायला.”
त्याच वेळी गावाबाहे र एका झोपडीत तीन ्गडांच्या चल
ु ीवर तव्यावर भाकरी टाकली जाते. बाजूच्या
गोणपाटावर नवरा अपराधीपणे मुकाट बसलेला. जगणयाच्या लढाईत थकून गेल्यानं, सगळं पवसरायला ्ारू
पपऊन आलेला. डोळ्याला प्र लाऊन बसलेल्या त्या माउलीचे शब् मग तडतडत जातात..

“कशापायी ह्ये दारूचं लावून घेतलं मागं? हदसामाजी कायबाय समलत होतं तेबी सगलं जाया लागलंय
यापाई. पदरात दोन पोरं हायती, ती म्हातारी ततकडं मराया टे कलीया, त्याचा तरी इचार करावा म्हन्ते
मी...दोन येलची भाकरी बी समलल याचा भरोसा नाय, अतन तुमी बसलाय दारूची संगत धरून...कसं
जगावं आमी?”

माणसाला बोलणयाचं वर्ान ममळालं आणण भाषा ही आपल्या जीवनाचा भाग बनन
ू गेली. मलदहणया-
वाचाणयापेक्षाही बोलणयातून भाषा अंगी मभनते. आपली भाषा मागच्या शेकडो पपढयांनी घडवली, दटकवली,
आपल्या परीने समध्
ृ ् केली. ते बोलत रादहले आपल्या भाषेत, म्हणूनच ती आपल्यापयंत पोचली. आपण
भाषा अचधक समद्
ृ ध नाही करू शकलो, तरी आपली भाषा पुढच्या पपढीकडे ककमान तशीच तरी पोचवायला
हवी ना? तुम्हाला काय वाटतं?

- सध
ु ांशु नाईक (nsudha19@gmail.com)

You might also like