You are on page 1of 12

वर्णन

स्थानिक नाव : झिंगा, घोड झिंगा.

इंग्रजी नाव : फ्ऱे श वॉटर प्रॉन.

शास्त्रीय नाव : मॅक्रोब्रॅकियम रोजेनबरगी.

सर्वसाधारण गोड्या पाण्यातील कोळं बी प्रजातींपैकी आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाची

माहिती : प्रजाती.नदीमुख, खाडी, ई. येथे आढऴतो. खाडीच्या उतारक्षेत्रात प्रजननासाठी

स्थलांतर करते. लहान पिले पुढील वाढीसाठी पुन्हा नदीकडे प्रयाण करतात. ३० ते ३२

सेंमी. पर्यंत वाढु शकते. गोड्या पाण्यात व कमी लवणतेच्या पाण्यात जलदगतीने

वाढत असल्याने, तसेच सर्वआहारी, व जगणुकीसाठी चिवट असल्याने संवर्धनासाठी

प्रथम पसंती.
वर्णन

स्थानिक नाव : कटला.

इंग्रजी नाव : कटला.

शास्त्रीय नाव : कटला कटला.

सर्वसाधारण भारतीय प्रमख


ु कार्पपैकी महत्वाचा व जलद गतीने वाढणारा मासा. रोहु व मग
ृ ळ कार्प

माहिती : सोबत संवर्धनासाठी उपयुक्त. योग्य पोषक वातावरणात वाढविल्यास ३ वर्षात १२०

सेंमी.पर्यत वाढू शकतो.पावसाळी वातावरणात शासकीय मत्स्यबीज केंद्रात कृत्रिम

संप्रेकांद्वारे प्रजनन करण्यात येते. शासकीय मत्स्यबीजकेंद्रावर पावसाळ्यात

मत्स्यबीज उपलब्ध असते.

वर्णन

स्थानिक नाव : रोहु.

इंग्रजी नाव : रोहु.

शास्त्रीय नाव : लेबीओ रोहिता.

सर्वसाधारण भारतीय प्रमख


ु कार्पपैकी एक. ९० सें.मी. पर्यंत वाढू शकतो.ईतर कार्पसोबत
माहिती : संवर्धनासाठी उपयक्
ु त.पावसाळी वातावरणात शासकीय मत्स्यबीज केंद्रात कृत्रिम

संप्रेकांद्वारे प्रजनन करण्यात येते. शासकीय मत्स्यबीजकेंद्रावर पावसाळ्यात

मत्स्यबीज उपलब्ध असते.

वर्णन

स्थानिक नाव : मग
ृ ळ.

इंग्रजी नाव : मग
ृ ल.

शास्त्रीय नाव : सिरहीनस म्रीगल.

सर्वसाधारण भारतीय प्रमख


ु कार्पपैकी एक. १०० सें.मी. पर्यंत वाढू शकतो.ईतर कार्पसोबत

माहिती : संवर्धनासाठी उपयुक्त.पावसाळी वातावरणात शासकीय मत्स्यबीज केंद्रात कृत्रिम

संप्रेकांद्वारे प्रजनन करण्यात येते. शासकीय मत्स्यबीजकेंद्रावर पावसाळ्यात

मत्स्यबीज उपलब्ध असते.

वर्णन

स्थानिक नाव : कोंबडा.

इंग्रजी नाव : कॉमन कार्प.

शास्त्रीय नाव : सायप्रिनस कार्पिओ.

सर्वसाधारण प्रामुख्याने मध्य आशियातील प्रजाती असून भारतासह अनेक दे शात संवर्धनासाठी

माहिती : आयात करण्यात आला. .ईतर कार्पसोबत संवर्धनासाठी उपयक्


ु त. हिवाळी

वातावरणात शासकीय मत्स्यबीज केंद्रात क é त्रिम संप्रेकांद्वारे प्रजनन करण्यात

येते. शासकीय मत्स्यबीजकेंद्रावर हिवाळ्यात व शिल्लक राहिल्यास

हिवाळ्यानंतरच्या काही कालावधीसाठी मत्स्यबीज उपलब्ध असते.


वर्णन

स्थानिक नाव : गवत्या.

इंग्रजी नाव : ग्रास कार्प.

शास्त्रीय नाव : टीनोफ़ॅरींगोडॉन ईडेल्ला.

सर्वसाधारण गवत, केळीची पाने व काही पाण वनस्पती हे मुख्य अन्नघटक आहे त. यामुळेच याला

माहिती : “पाण्यातील बकरी/गाय” संबोधले जाते.

वर्णन

स्थानिक नाव : चंदेरा.

इंग्रजी नाव : सिल्वर कार्प.

शास्त्रीय नाव : हायपोथॅलमिकथीस मॉलिट्रीक्स.

सर्वसाधारण प्रामुख्याने दक्षिण व मध्य चीन दे शातील नदीत आढऴणारा मासा. संवर्धनासाठी

माहिती : भारतासह अनेक दे शात आयात करण्यात आला. प्रमुख कार्पप्रमाणेच संप्रेरकाद्वारे

प्रजनन करण्यात येते.साधारणपणे १०० सें.मी. लांबी व १० कि.ग्रॅ पर्यंत वाढतो.

गोड्या पाण्यातील कोळं बी संवर्धन

महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती आणि कोळं बी संवर्धन:

विदर्भ आणि मराठवाडा भागात गोदावरी व कृष्णा या मोठ्या नद्या व त्यांच्या उपनद्या वाहतात .

त्यामुळे या भागात ब-याच ठिकाणी कोळं बी संवर्धनाला आवश्यक असणा-या पाण्याची मुबलकता आहे .

शिवाय जमिनही सुपीक आणि पाणी धरुन ठे वणारी अशी आहे . उत्तर कोकणात म्हणजे रागयड आणि
ठाणे जिल्ह्यात , नद्याना साधरणत: वर्षभर पाणी असते . तसेच या भागात गोड्या पाण्याची अनेक तळी

, तलाव इ. अस्तित्वात आहे त . या भागात सपाट प्रदे शही जास्त आहे . त्यामुळेच येथे मोठ्या प्रमाणावर

मस्त्य शेती व आता कोळं बी शेता सरु


ु झालेली आहे .

महाराष्ट्र राज्यातील सनि


ु योजीत कोळं बी संवर्धनाची मह
ु ू र्तमेढ भंडारा जिल्ह्यातील मत्स्य संवर्धकांनी

रोवली आहे . कोळं बी संवर्धन प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी पैसा उपलब्ध असणे अतिशय महत्वाचे

आहे . महाराष्ट्र राज्य सरकारी बॅकेने नाबाडच्या मार्गदर्नाखाली नविन उद्योजकांना अर्थसाहाय्य दे ऊ केले

व कोळं बी संवर्धनाला चालना दिली. परीणामी विदर्भातील एकट्या भंडारा जिल्ह्यात सध्या ६० हे क्टर क्षेत्र

कोळं बी संवर्धनाखाली आहे व ५० लाभार्थी कोळं बी संवर्धन करीत आहे त . या भागात कोळं बीचे सरासरी

उत्पादन ८५० कि.ग्रॅ. / हे क्टर /वर्ष एवढे मिळाले आहे , तर जास्तीत जास्त उत्पादन १९०० कि.ग्रॅ. / हे क्टर

/वर्ष मिळालेले आहे .

संवर्धनापर्वी
ू ची पर्व
ू तयारी:

पेरणीपूर्वी शेतकरी ज्याप्रमाणे शेतीची मशागत करुन शेत तयार करतो , त्याचप्रमाणे कोळं बी संवर्धनापूर्वी

तलावाची तयारी करणे जरुरी असते . यासाठी

§ तलाव कोरडा असतांना त्यात १५ से. मी. खोल नांगरावे , खोलगट भागांचा उपयोग

कोळं बीला निवारा म्हणून होतो .

§ तलावाच्या कडेने निरुपयोगी पाईपचे तक


ु डे , नळे , सक
ु लेल्या झाडांच्या फांद्या इ. निवारा

म्हणून ठे वाव्यात . या निवा-यांचा उपयोग कोळं बी लपण्याकरीता करते आणि कोळं बीच्या

जगणकि
ू चे प्रमाण वाढते .

§ तलावात सैंद्रिय , शिवाडा , मागरु , मरळ यांसारखे मांसाहारी मासे असणार नाहीत याची काळजी

घ्यावी , असल्यास ते काढून टाकावे. तलावात संथ असा प्राण्यांचा प्रवाह असावा .

गोड्या पाण्यातील कोळं बी संवर्धनाचे महत्व:


निर्यात व्यापारातीस कोळं बीच्या वाढत्या मागणीमुळे गोड्या पाण्यातील कोळं बी संवर्धनाकडे लक्ष दे णे

क्रमप्राप्त बनले आहे . साधारण: मागील दहा वर्षापुर्वीपर्यत गोड्या पाण्यातील कोळं बीचे उत्पादन हे

मख्
ु यत: मासेमारीव्दारे होणारे होते . पण त्यानंतर परिस्थिती बदलली आणि या कोळं बीचे संलर्धनाव्दारे

उत्पादन घेतले जाऊ लागले . कोळं बी संवर्धनाला चालना प्राप्त होण्याची प्रमुख कारणे म्हणजे

कोळं बीसाठी वाढती मागणी कोळं बीचे बीज उपलब्ध होणे आणि संवर्धनाबाबतचे तंत्रज्ञान पर्ण
ू पणे अवगत

होणे ही होत.

कोळं बी संवर्धन:

गोड्या पाण्यातील माशांचे म्हणजे कटला , रोहू व मग


ृ ळ माशांचे संवर्धन आपल्याकडे ब-याच पर्वी
ु पासन

करणायात येते , पण गोड्या पाण्यातील कोळं बी संवर्धन ही संकल्पना मात्र आपल्या राज्यात नविन आहे

महाराष्ट्रापरु ते बघावयाचे झाल्यास , संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय योग्य अशी गोड्या पाण्यातील

कोळं बीची जात म्हणजे जंबो कोळं बी , जिला शास्त्रीय परीभाषेत मॅक्रोब्रॅकियम रोझनबर्गी तर घाटावर याच

कोळं बीला "झिंगा" या नावाने ओळखतात . आठ ते नऊ महिन्यात ८० ते १०० ग्रॅमपर्यंत वजन होणारी ही

कोळं बी , जागतीक बाजारपेठेत " स्कॅम्पी " या नावाने ओळखली जाते . अशा या गोड्या पाण्यातील

कोळं बीचे संवर्धन किफायतशीर होऊ शकते पण त्याकरीता योग्य जागा निवड , शास्त्रशुद्ध पद्धतीने संवर्धन

व काटे कोर नियोजन या तीन बाबींची आवश्यकता आहे . उपलब्ध जलसंपत्तीच्या दृष्टीकोनातुन पाहाता

कोळं बी संवर्धनाचे तीन प्रकार आहे .

कोळं बी संवर्धनाचे प्रकार:

गोड्या पाण्यातील कोळं बीचे संवर्धन खालील तीन प्रकारांनी करता येणे शक्य आहे .

1. सध्या अस्तित्वात असलेल्या गोड्या पाण्याच्या तलावात कटला व रोहू माशांबरोबर संवर्धन

म्हणजे मिश्र संवर्धन .


2. सध्या अस्तित्वात असलेल्या किंवा नविन तलाव खोदन
ू , गोड्या
़ पाण्याच्या तलावात केवळ

कोळं बीचे संवर्धन म्हणजे एक जातीय संवर्धन .

3. मचूळ पाण्यात ( क्षारता – ४ ते ५ भाग प्रति हजारी ) कोळं बीचे संवर्धन .

संवर्धन तलाव कसे तयार कराल ?

गोड्या पाण्यातील कोळं बीचे संवर्धनासाठी तलाव विशिष्ठ प्रकारे बांधल्यास कोळं बीचे उत्पादन भरपूर

मिळते प्रथमत: तलाव बांधण्याकरीता योग्य जागा निवडावी , योग्य जागा म्हणजे जेथील माती , पाणी

चांगल्या प्रकारे धरून ठे वते , जेथील माती , पाण्याचा पिएच ् ७ ते ८ च्या दरम्यान आहे व जेथे वर्षातील १०

महीने तरी मुबलक पाणी उपलब्ध आहे , अशी जागा योग्य होय . कोळं बीकरीता तलाव बांधतांना तो

आयताकृती असावा . तलावाचे पाण्याची खोली १ ते २ मिटर एवढी . संवर्धन क्षेत्रापर्यंत वाहने जाऊ

शकतील इतपत रस्ता असावा .

मत्स्यशेती (तलावामध्ये माशांची पैदास करणे)


व्यावसायिक कार्प-माशांचे प्रकार
कार्पस ्-मासे हा भारतातील शेती-संवर्धनाचा मख्
ु ‍य आधार आहे व तीन प्रकारचे भारतीय कार्प (कटला, रोहू,
मग
ृ ळ) तसेच तीन प्रकारचे परदे शी मासे चंदेरी, गवती आणि सामान्य असे मिळून दे शातील मत्स्यशेती
उत्पादनाचा 85% पेक्षा ही अधिक वाटा उचलतात.
गेल्या तीन दशकांत झालेल्या तंत्रशास्‍त्रीय प्रगतीमळ
ु े तळी आणि तलावांतील सरासरी राष्ट्रीय उत्पादनाची
पातळी सम
ु ारे 600 कि.ग्रा./हे क्‍टरहून 2000 कि.ग्रा./हे क्‍टरपेक्षाही अधिक उं चीवर पोहोचली आहे . आंध्रप्रदे श,
पश्चिम बंगाल, पंजाब आणि हरियाणा यांसारख्या राज्यांतील अनेक शेतकरी आणि उद्योजकांनी तर 6-8
टन/हे /वर्ष इतकी उच्च उत्पादन पातळी गाठली आहे . माशांच्या प्रजाती, पाण्याचे स्त्रोत, खतांची
उपलब्धता, चा-याचे स्त्रोत, इत्‍यादि आणि शेतकर्‍यांची गुंतवणूक करण्याची क्षमता यांना सोयीस्कर अशा
नवनवीन पद्धतीही दे शात विकसित झालेल्या आहे त. मत्स्यशेती ही शेतीच्या इतर पद्धतींशी खूपच सुसंगत
आहे आणि त्यामध्ये जैविक कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्चक्रन करण्याचीही प्रचंड क्षमता आहे .
माशांचे बहुसंस्करण
भारतातील माशांच्या बहुसंस्करणामध्ये शेण किंवा पोल्ट्रीमधील विष्ठा यांसारख्या जैविक कचर्‍याचा
मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि जैविक आणि अजैविक अशा दोन्ही खतांच्या साहाय्याने
त्यातून दरवर्षी दरहे क्टरी 1-3 टन उत्पादन मिळविता येते. चारा दिल्यामुळे माशांच्या पैदाशीचे प्रमाण
लक्षणीयरित्या वाढते आणि चारा व खते यांच्‍या संयोजनाच्‍या योग्य वापराद्वारे दरवर्षी दरहे क्टरी 4-8 टन
उत्पादन मिळते.
संशोधन संस्थेत तयार केलेल्‍या पद्धतींचा वापर दे शाच्या विविध भागांतील 0.04-10.0 हे क्टर
क्षेत्रफळाच्या आणि 1-4 मी. खोल तलावांत करण्यात आला, त्यामध्ये उत्पादनाच्‍या दरांत विविधता
आढळली. लहान आणि उथळ स्थिर पाण्याच्या तलावात अशा अनेक समस्या आढळून आल्या
ज्यामळ
ु े माशांच्या वाढीवर परिणाम झाला तर आकाराने मोठे आणि खोल तलावाचे अनप
ु ालन
करणे कठीण ठरते. 0.4-1.0 हे क्टर आकाराचे आणि 2-3 मी. खोल पाण्याचे तलाव योग्य
व्यवस्थापनासाठी सर्वोत्कृष्ट मानले जातात. माशांच्या बहुसंस्करणाच्या व्यवस्थापन पद्धतींमध्ये
पर्यावरणीय आणि जीवशास्त्रीय पद्धतींचा समावेश होतो ज्यांचे विभाजन सर्वसाधारणतः
साठवणीपूर्वीच्‍या, साठवणीच्या आणि साठवणीनंतरच्या अशा तीन प्रकारच्या क्रियांमध्ये करण्‍यात
येते.
साठवणीपूर्वीची तलावाची तयारी
तलावाच्‍या तयारीमध्‍ये तलावास पाण्यातील तण आणि भक्षक यांच्यापासून मुक्त करणे आणि जगणार्‍या
माशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आणि त्यांच्या योग्य संवर्धनासाठी पुरेसा नैसर्गिक चारा
उपलब्ध करणे ह्याचा समावेश होतो. पाण्यातील तणांचे नियंत्रण, अनावश्यक वनस्पतींचे उच्चाटन करणे
आणि माती व पाण्याची गुणवत्ता वाढविणे ह्या व्यवस्थापनाच्या या टप्प्यातील काही महत्त्वाच्या बाबी
आहे त. भक्षक मासे आणि तण यांचे नियंत्रण कसे करावे याची चर्चा नर्सरी व्यवस्थापनामध्ये तपशीलवार
करण्यात आलेली आहे .
तलावांची साठवणी
माशांच्या योग्य आकाराच्या बियाण्‍यांना त्यांनी नवीन वातावरणाशी जळ
ु वून घेतल्यानंतर तलावामध्ये
साठविण्‍यात येते. त्यापूर्वी तलावामध्ये खत घालून तो तयार करण्‍यात येतो. उच्च उत्पादन
मिळविण्यासाठी माशांचा आकार आणि घनता दोन्ही योग्य असणे गरजेचे आहे . 100 मि.मी.पेक्षा मोठ्या
आकाराच्या बोट्या संवर्धन संस्करणासाठी तलावात साठवण्यायोग्य असतात. लहान आकाराचे मासे
साठविल्यास त्यांच्यामध्ये सुरूवातीच्या काही महिन्यांत मत्ृ युदराचे प्रमाण जास्त आणि वाढीचा वेग कमी
असू शकतो. सघन बहुसंस्करण तलावांमध्ये, माशांचा जगण्याचा दर 90% पेक्षा जास्त आणि उत्तम वाढ
मिळविण्यासाठी 50-100 मि.मी. आकाराच्या फिं गरलिंग्‍स ् (बोट्या) वापरणे फायदे शीर ठरते. साधारणतः,
5000 बोट्यांची घनता हा बहुसंस्करण पद्धतीमध्ये वार्षिक 3-5 टन/हे क्टर उत्पन्न मिळविण्यासाठी
दरहे क्टरी मासे साठवणीचा प्रमाणित दर मानला जातो. 8000-10000 दरहे क्टर घनता असलेल्या
फिं गरलिगचा वापर वार्षिक 5-7 टन/ हे क्टर उत्पन्न मिळविण्यासाठी केला जातो. वार्षिक 5-7 टन/हे क्टर
उत्पन्न मिळविण्यासाठी 15000-25000 दरहे क्टर घनता असलेल्या फिं गरलिगचा वापर करतात.
माशांच्या बहुसंस्करणामध्ये तलावातील विविध भागांमधील खाणे मिळविण्यासाठी होणारी स्वप्रजातीय
आणि आंतरप्रजातीय स्पर्धा कमी करण्यासाठी प्रजातींचे एकमेकांशी गण
ु ोत्तर ठरवन
ू दे ण्‍यात आलेले
आहे . तलावात विविध विभागांत असणार्‍या खाद्याचा योग्य वापर व्हावा यासाठी विभिन्न कोपर्‍यांमध्ये
वस्ती करून असणार्‍या दोन किंवा अधिक प्रजातींचा वापर करता येईल. कटला, चंदेरी, रोहू, गवती मासा,
मग
ृ ळ आणि सामान्य मासा या सहा माशांचा गट यासाठी आदर्श मानतात. भारतात माशांची निवड
मख्
ु यत्वे बियाणांची उपलब्धता आणि बाजारपेठेतील मागणी यावर ठरते. यापैकी कटला आणि चंदेरी हे
पाण्याच्या वरच्या भागात राहतात, रोहू मधल्या भागात, गवती मासा मोठ्या वनस्पती असलेल्या भागांत
तर मग
ृ ळ आणि सामान्य मासे पाण्याच्या तळाशी राहतात. पाण्याच्या वरच्या भागात राहणारे मासे 30-
40% (कटला आणि चंदेरी), मधल्या भागातील 30-35% (रोहू आणि गवती मासा) आणि 30-40% तळाशी
राहणारे मासे (सामान्य आणि मग
ृ ळ) हे प्रमाण सर्वसामान्यपणे तलावाच्या उत्पादनक्षमतेच्या आधारे
स्वीकारले जाते.

तलावाचे साठवणीनंतरचे व्यवस्थापन


खते: मातीच्या थरामध्ये असणार्‍या पोषणद्रव्यांच्या आधारे तलावांचे वर्गीकरण तीन गटांत करण्‍यात येते.
मत्स्य उत्पादनासाठी खतांचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे . जैविक खतांच्या एकूण प्रमाणाच्या 20-25%
खत साठवणीच्या 15 दिवस आधी पायाभूत मात्रा म्हणून दिले जाते तर उर्वरीत खत दोन-दोन
महिन्यांच्या अंतराने समान हप्त्यांत दे तात. सर्वसामान्यपणे वापरल्या जाणार्‍या इतर जैविक खतांमध्ये
पोल्ट्रीची विष्ठा, डुकरांची विष्ठा, बदकांची विष्ठा, घरगुती सांडपाणी इत्यादींचा समावेश उपलब्‍धतेवर
अवलंबून होतो. पाण्यातील नायट्रोजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करणारी अझोला ही वनस्पतीदे खील
जैविक खत म्हणन
ू 40 टन/हे क्टर/वर्ष या दराने वापरतात. यामळ
ु े सघन मत्स्यशेतीसाठी आवश्यक
असणारी सर्व पोषणद्रव्ये मिळतात (100 किलो नायट्रोजन, 25 किलो फॉस्फरस, 90 किलो पोटॅ शियम
आणि 1500 किलो जैविक घटक). तलावामध्ये वापरलेल्या पदार्थांचे विघटन होऊन मागे जो काही पदार्थ
उरतो त्याचा वापर मासे आणि कोळं बीसाठी पौष्टिक खाद्य म्हणन
ु केला जाऊ शकतो. जैवप्रक्रिया केलेले
जैविक खत, बायोगॅसमधील उरलेला अवक्षेप हे दे खील मत्स्यशेतीसाठी उत्तम खत (30-45 टन/हे ./वर्ष)
मानले जाते. हे पदार्थ कमी ऑक्सीजन शोषतात आणि लवकर पोषण परु वतात.

मध्यम उत्पादक उच्च उत्पादक


पोषकतत्त्व निम्‍न
उत्पाद

जैविक कार्बन (%) 0.5-1.5 1.5 >2.5

उपलब्ध नायट्रोजन (मि.ग्रा./100 25-50 50-75 >75


ग्रा. माती)
उपलब्ध फॉस्फरस (मि.ग्रा./100 <3 3-6 >6
ग्रा. माती)
       
खत दे ण्यासाठी प्रस्तावित वेळापत्रक

शेण (दरवर्षी दरहे क्टरी टन) 20 15    10

नायट्रोजन (दरवर्षी दरहे क्टरी 150 N (322 100 N (218 50 N (104 यूरिया)
यूरिया) यूरिया)
कि.ग्रा.)

फॉस्फरस (दरवर्षी दरहे क्टरी 75 P (470 SSP) 50 P (310 SSP) 25 P (235 SSP)
कि.ग्रा.)

पुरवणी खाद्य:
मत्स्य बहुसंस्करणामध्ये पुरवणी खाद्य हे शक्यतो शेंगदाणा/मोहरीच्या तेलाची मळी आणि तांदळाची
पें ड यांच्या मिश्रणापुरतेच मर्यादित आहे . मात्र हळूहळू सघन मत्स्यशेतीकडे लोकांचा कल वाढत असल्याने
वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रथिनांमधील घटकदे खील यात समाविष्ट करण्‍यात येत आहे त. या सर्व
घटकांना खाद्यामध्ये एकत्र ठे वण्यासाठी पेलेटायझेशन केले जाते ज्यामुळे ते पाण्यात स्थिर राहते आणि
वाया जाण्याचे प्रमाण घटते. गवती माशांना मुख्यत्वे तलावाच्या निवडक कोपर्‍यांत भांड्यांत ठे वलेल्या
पाणवनस्पतींचेच खाद्य दिले जाते (हायड्रिला, नजास, सेराटोफायलम, इ). थोड्या-थोड्या अंतरावर
लावलेल्या वनस्पती, जमिनीवरील गवत आणि इतर चारा, केळ्याची पाने आणि टाकून दिलेल्या
भाज्यादे खील यासाठी वापरतात.
चार्‍याची विभागणी करताना चार्‍याचे मिश्रण भिजविलेल्‍या कणकेच्‍या स्वरूपात ट्रे मध्ये किंवा गनी
बॅग्जमध्ये घालून त्या तलावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोंबत ठे वाव्यात. दिवसातून दोनदा चारा घालणे
उत्तम. चार्‍याचे प्रमाणदे खील महत्त्वाचे आहे कारण खाद्य कमी मिळाल्यास माशांची वाढ खालावते तर
जास्त प्रमाणात चारा घातल्यास तो वाया जातो. पहिल्या महिन्यात सर्व माशांच्या सरू
ु वातीच्या जैविक
वजनाच्या 5% चारा द्यावा आणि नंतर पढ
ु ील महिन्यांत दर महिन्याच्या माशांच्या जैविक वजनाच्या 3-
1% एवढे कमी-कमी करावे.

वायव
ू ीजन आणि पाणी बदलणे:

तलावातील पाण्यात विरघळलेल्या ऑक्सीजनचे प्रमाण वाढवण्यासाठी यांत्रिक वायूवीजन वापरले जाऊ
शकते. ऑक्सीजनचे प्रमाण वाढविणे हे मोठ्या प्रमाणात मासे असणार्‍या सघन मत्स्यशेतीसाठी खूप
महत्वाचे असते. पॅडलची चाके असणारे वायूवीजक, ऍस्पिरे टर वायूवीजक आणि तलावात विरघळू
शकणारे वायूवीजक यामध्ये सामान्यतः वापरले जातात. सघन पाण्याच्या शेतीमध्ये ऑक्सीजनची
मागणी पूर्ण करण्यासाठी पाण्यात दरहे क्टरी 4-6 वायूवीजक वापरण्‍याची गरज असते.
पाणी बदलणे ही सघन मत्स्यशेतीमधील आणखी एक महत्त्वाची क्रिया आहे . पाचकक्रियेमध्ये तयार
झालेले पदार्थ आणि न वापरलेला चारा तलावात साठल्यामुळे तलावातील पाण्याचा दर्जा खूपच खालावतो.
त्यामुळे माशांच्या प्रजातींची वाढ खालावते आणि त्यांच्यात एखाद्या आजाराची साथ पसरण्याचा धोकाही
वाढतो. म्हणूनच ठराविक आकारमानाचे पाणी नियमित अंतराने बदलणे आवश्यक आहे , विशेषत: सघन
शेतीमध्ये नंतरच्या टप्प्यात.

आरोग्य व्यवस्थापन: : साठवणीपूर्वी माशांच्या बियाण्‍यांना 3-5% पोटॅ शिअम परमॅंग्नेटमध्ये 15 सेकंद
आंघोळ घातली पाहिजे. जास्त घनतेने मासे साठवलेले असल्यास त्यांच्यात आजार पसरण्याचे प्रमाणही
जास्त असते. व्यवस्थित व्यवस्थापन असणार्‍या तलावांत अशा मत्ृ यूंचे प्रमाण क्वचितच आढळते तरीही
परजीवींची लागण झाल्यास माशांच्या वाढीवर त्याचा फार प्रतिकूल परिणाम होतो.
उत्पादन गोळा करणे (सुगी)
माशांची सुगी साधारणतः 10 महिने ते एक वर्षाच्या संस्करण कालावधीनंतर करण्‍यात येते. मात्र बाजारात
विकण्यायोग्य आकार झालेल्या माशांची वेळोवेळी सुगी करून तलावावर असणारा ताण कमी करता येतो
आणि इतर माशांच्या वाढीसाठीही जागा उपलब्ध करून दे ता येते.

माशांच्या बहुसंस्करणाचे अर्थशास्त्र


अनु.क्र. विषयवस ् किंमत (रूपयांमध्ये)

I. खर्च  

A. अस्थिर किंमत  
1. तलाव लीज खर्च 10,000

2. ब्लीचिंग पावडर (10 ppm क्लोरिन)/इतर विषाक्‍त पदार्थ 2,500


3. बोट्या (8000) 4,000

4. खते आणि उर्वरके 6,000


5. पुरवणी खाद्य (भाताची पेंड आणि शेंगदाण्याची मळी यांचे 42,000
मिश्रण 7000 रु. टन दराने 6 टन)
6. कामगारखर्च (150 माणसे दररोज माणशी रु. 50 या दराने) 7500

7. इतर खर्च 2000


  एकूण खर्च 74,000

     
B. एकूण किंमत  
1. अस्थिर किंमत 74,000

2. वार्षिक 15% दराने सहा महिन्यांसाठी आवत्ृ ती खर्चावरील व्याज 5,550


  संपूर्ण बेरीज 79,550
» 80,000
     
II. निव्वळ उत्पन्न  

  4 टन मासे विकून (रु.30/किलो या दराने) 1,20,000

III. एकूण उत्पन्न (निव्वळ परतावा-एकूण किंमत) 40,450

You might also like

  • JANGAL
    JANGAL
    Document8 pages
    JANGAL
    Nilesh Harishchandre
    No ratings yet
  • BHUKAMP
    BHUKAMP
    Document22 pages
    BHUKAMP
    Nilesh Harishchandre
    No ratings yet
  • FATAKE
    FATAKE
    Document14 pages
    FATAKE
    Nilesh Harishchandre
    No ratings yet
  • EMU
    EMU
    Document8 pages
    EMU
    Nilesh Harishchandre
    No ratings yet
  • ABHAYAARANYA
    ABHAYAARANYA
    Document20 pages
    ABHAYAARANYA
    Nilesh Harishchandre
    No ratings yet
  • Bio Gas
    Bio Gas
    Document7 pages
    Bio Gas
    Nilesh Harishchandre
    No ratings yet