Class: 10 मराठी (State) Subject : भूमिती Total Marks: 20
Date: Time:
10th भूमिती 20 Marks
प्र. क्र.1) A) खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा [02]
1) खालीलपैकी कोणत्या तारखेची संख्या हे पायथागोरसचे त्रिकू ट आहे?
a) 15/08/17 b) 16/08/16 c) 03/05/17 d) 04/09/15
2) एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेमी व 9 सेमी लांबीचे दोन भाग होतात तर त्या
शिरोलंबाची लांबी किती?
a) 9 सेमी b) 4 सेमी c) 6 सेमी d) 18 सेमी
प्र. क्र.1) B) खालील उपप्रश्न सोडवा [01]
1) ∆XYZ मध्ये, ∠Y = 90⁰, ∠Z = a⁰, ∠X = (a+30)⁰. तर ∠X = ?
प्र. क्र.2) A) खालीलपैकी कोणतीही एक कृ ती पूर्ण करा [02]
1) दिलेल्या आकृ तीचे निरीक्षण करून रिकाम्या चौकटी भरा :
2) एका समभुज त्रिकोणाची उंची 2√3 सेमी आहे तर त्या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी व परिमिती काढा.
प्र. क्र.2) B) खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा [02]
1) दिलेल्या आकृ तीवरून, RP आणि PS ची लांबी काढा.
2) समभुज त्रिकोणाची बाजू 2a असेल तर त्याची उंची काढा.
प्र. क्र.3) A) खालीलपैकी कोणतीही एक कृ ती पूर्ण करा [03]
1) आकृ तीमध्ये, रे ख PS ही मध्यगा आहे आणि PT ꓕ QR तर सिद्ध करा : a) PR² = PS² + QR × ST + (QR/2)²
b) PQ² = PS² - QR × ST + (QR/2)²
2) रूपाली आणि विवेक एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाली. तीन तासानंतर
त्यांच्यामधील अंतर 21√2 किमी असेल तर त्यांचा ताशी वेग काढा?
प्र. क्र.3) B) खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा [03]
1) रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक
रस्त्यावर ठे वले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत पोहोचते, त्याच
ठिकाणी ठे वून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळविल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या
खिडकीपर्यंत येते तर रस्त्याची रुं दी काढा.
2) ΔABC मध्ये, ∠C हा लघुकोन आहे, रे ख AD ꓕ रे ख BC, B – D – C, तर सिद्ध करा, AB² = BC² + AC² - 2BC ×
BD
प्र. क्र.4) खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा [04]
1) आकृ तीमध्ये दाखविल्यानुसार, T हा बिंदू आयत PQRS च्या अंतर्भागात आहे तर सिद्ध करा, TS² + TQ² = TP² +
TR²
2) ΔABC मध्ये, रे ख AD ꓕ रे ख BC, DB = 2 CD. तर सिद्ध करा, 2AB² = 2AC² + BC²
प्र. क्र.5) खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा [03]
1) सिद्ध करा की, समभुज चौकोनाच्या कर्णाच्या वर्गांची बेरीज ही त्याच्या बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढी असते.
2) मीना तिच्या घरापासून उत्तरे ला 12 मीटर, नंतर 73 मीटर पश्चिमेस तिथून 67 मीटर दक्षिणेस आणि शेवटी 25 मीटर
पूर्वेस गेली असता ती टीना च्या घरापर्यंत पोहोचते तर मीना आणि टीना यांच्या घरामधील अंतर काढा.