हॉट्रीनेट ट्रेसेबिलीटी सिस्टीम अंतर्गत मँगोनेट

You might also like

You are on page 1of 27

हॉट्रीनेट ट्रेसेबिलीटी सिस्टीम अंतर्गत

मँगोनेट
हॉट्रीनेट ट्रेसेबिलीटी ‍सिस्टम अंतर्गत उपक्रम

1) मँगोनेट

2) ग्रेपनेट

3) अनारनेट

4) व्हेजनेट
मँगोनेट का ???

 फळमाशी (FruitFly) वाढल्यामुळे एप्रिल 2014 मध्ये युरोपियन युनियन ने घातलेली बंदी.

 जागतीक बाजारपेठेच्या स्वच्छतेविषयक व पिक स्वच्छतेविषयक (Sanitory & Phytosanitory) निकशांची हमी

देणे.

 उत्पादक ते अंतीम ग्राहक परिपुर्ण ट्रेसेबिलीटीची हमी देणे.


मँगोनेट उद्द‍िष्ट्ये

 आंतरराष्ट्रीय निकशानुसार गुणवत्तापुर्ण आंबा उत्पादन.

 ‍किड व रोग मुक्त आंबा उत्पादन.

 किडनाशक उर्वरीत अंश विरहीत आंबा उत्पादनाची हमी देणे.


सहभागी संस्था

 अपेडा
 आंबा उत्पादक
 राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था
 राज्य शासन कृ षि विभाग
 कृ षि विदयापिठे
 निर्यातदार
 नोंदणीकृ त पॅकहाउस
 सुविधा पुरवठादार
 उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा
 आयसीएआर/एनआरसी
सहभागी संस्थांची कर्तव्ये व जबाबदा-या - अपेडा

 सर्व सहभागी संस्थांमध्ये समन्वय ठेवणे.

 आंबा बाग नोंदणीची ऑनलाइन प्रणाली विकसीत करणे.

 नोदणीकृ त बागा / शेतक-यांची माहिती ठेवणे.

 निर्यात पुर्व शृंखला (Backward Linkage) सशक्तीकरण करण्यासाठी निर्यातदार, शेतकरी व इतर सहभागी भागिदार
संस्थांची क्षमता विकसित करणे.
सहभागी संस्थांची कर्तव्ये व जबाबदा-या
राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था
 निर्यात होणारा आंबा किडरोगमुक्त असल्या बाबत हमी देणे.

 क्षेत्रीय स्तरावर युरोपियन युनियनच्या निकषानुसार कीड / रोगांच्या एकात्मीक व्यवस्थापना करीता मार्गदर्शन करणे.

 युरोपियन युनियनला आंबा निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या उष्णजल प्रक्रिया / बाष्प प्रक्रिया इ. सुविधांना मान्यता देणे.

 उष्णजल प्रक्रिया / उष्णबाष्प प्रक्रियेचे निकष ठरवीणे.


सहभागी संस्थांची कर्तव्ये व जबाबदा-या
कृ षि विदयापीठे

 शेतकरी व निर्यातदार यांच्या क्षमता वाढ कार्यक्रमामध्ये तांत्रिक मार्गदर्शन करणे.

 आंबा पिकासाठी पॅके ज ऑफ प्रॅक्टीसेस तयार करणे.

 आंबा पिकासाठी स्प्रेईंग शेडयुल (फवारणीचे वेळापत्रक) तयार करणे.


सहभागी संस्थांची कर्तव्ये व जबाबदा-या
निर्यातदार

 फक्त नोंदणीकृ त शेतक-याकडू नच आंबा घेणे.

 अपेडा नोंदणीकृ त पॅकहाउस मधुनच आंब्याची निर्यात करणे.

 किड व रोगमुक्त आंबा निर्यातीसाठी आवश्यक ग्रेडींग / प्रतवारी/ उष्णजल प्रक्रिया करणे.

 निर्यातीसाठी किड व रोगमुक्त आंबा उत्पादनासाठी शेतक-यांना तांत्रिक सहाय्य पुरविणे.


सहभागी संस्थांची कर्तव्ये व जबाबदा-या
आंबा बागायतदार

 आंबा निर्यात करावयाच्या बागांची कृ षि विभागाकडे नोंदणी करणे.

 निर्यात करावयाच्या बागेतील उत्पादन कीड व रोगमुक्त ठेवण्यासाठी आवश्यक उपाय योजना.

 नोदणीपासून आंबा काढणीपर्यंत वेगवेगळया टप्‍प्यावर पिक व्यवस्थापनाचा अभिलेख ठेवणे.

 आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेल्या औषधांचा वापर न करणे.


सहभागी संस्थांची कर्तव्ये व जबाबदा-या
नोंदणीकृ त पॅकहाउस

 उष्णजल प्रक्रिया सुविधा निर्माण करणे व राष्ट्रीय पिक संरक्षण संस्था व अपेडाकडू न प्रमाणीत करून घेणे.

 के वळ कृ षी विभागाने नोंदणी के लेल्या बागांमधीलच आंबा निर्यातीसाठी स्विकारावा.

 निर्यात करावयाच्या आंब्यासाठी शेतक-यांचे नाव, आवक माल, के लेली प्रक्रिया व निर्यातीसाठी पाठवलेल्या मालाचा तपशिल

याबाबत अभिलेख ठेवणे.

 पॅकहाउस मध्ये स्वच्छता (Hygenic Condition) ठेवणे.


सहभागी संस्थांची कर्तव्ये व जबाबदा-या
कीडनाशक उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा

 नोदणीकृ त बागांमधुन नमुने घेवून तपासणी करणे.

 तपासणी अंती कीडनाशकांचे उर्वरीत अंश मर्यादा विचारात घेउन निर्यातीसाठी अहवाल देणे.

 तपासणी के लेल्या आंबा नमुन्यांचे अभिलेख ठेवणे.


सहभागी संस्थांची कर्तव्ये व जबाबदा-या
कृ षी विभाग

 निर्यातक्षम बागांची नोंदणी करणे.

 नोंदणीकृ त आंबा बागायतदारांना किड/रोग नियंत्रणासाठी मार्गदर्शन करणे.

 किड/रोगमुक्त गुणवत्तापुर्ण आंबा उत्पादनासाठी शेतक-यांना प्रशिक्षण देणे.

 फायटोसॅनिटरी सर्टिफिके ट देणे.


युरोपियन व इतर देशांना आंबा निर्यातीकरीता अनुसरावयाची गुणवत्ता
व कार्यपध्दती निकष
आंबा निर्यातीचे मुख्य निकष

 फळाची गुणवत्ता

 कीड व रोगमुक्त आंबा.

 मँगोनेट प्रमाणपत्र धारक आंबा.


फळाची गुणवत्ता

 आकार- 200 ते 800 ग्रेम (आकारमानानुसार प्रतवारी आवश्यक) व अंडाकृ ती.

पक्वता- 85%

 आंब्या मधील एकु ण विद्राव्य घटक (TSS)- 8 ते 10%

 रंग- पिवळा किं वा तांबुस लालसर.

 पक्वता- फळाची पुर्ण वाढ झालेली असावी.

 चव- टरपेंटाइन चव ‍विरहित.


फळाच्या आकारानुसार वर्गवारी

आकार गट वजन ग्रेम मध्ये जास्तीत जास्त वजनातील फरक

अ 200 ते 300 75

ब 351 ते 550 100

क 551 ते 800 125


मध्यपुर्व देशांना आंबा निर्यातीसाठी आवश्यक निकष

 वजन- 200 ते 250 ग्रेम.

 पॅकिं ग- 1 डझन (2.5 कि.ग्रे किं वा त्या पेक्षा जास्त)

 साठवणुक तापमान- 12 अंश से.

 निर्यात मार्ग- जहाज मार्ग


नेदरलँड / जर्मनी देशांना आंबा निर्यातीसाठी आवश्यक निकष

 वजन- 200 ते 300 ग्रॅम

 पॅकिं ग- 1 डझन (2.5 कि. ग्रॅम)

 साठवणुक तापमान- 13 अंश से.

 निर्यात मार्ग- विमान मार्ग


इंग्लंड देशाला आंबा निर्यातीसाठी आवश्यक निकष

 वजन- 200 ते 250 ग्रॅम

 पॅकिं ग- 1 डझन (2.5 कि. ग्रॅम)

 साठवणुक तापमान- 13 अंश से.

 निर्यात मार्ग- विमान मार्ग / जहाज मार्ग


अमेरीका देशाला आंबा निर्यातीसाठी आवश्यक निकष

 वजन- 200 ते 250 ग्रॅम

 पॅकिं ग- 1 डझन (2.5 कि. ग्रॅम)

 साठवणुक तापमान- 25 अंश से.

 निर्यात मार्ग- विमान मार्ग

 प्रक्रिया- विकीरिकरण (Irradiation)


जपान देशाला आंबा निर्यातिसाठी आवश्यक निकष

 वजन- 200 ते 250 ग्रॅम

 पॅकिं ग- 1 डझन (2.5 कि. ग्रॅम)

 साठवणुक तापमान- 24 अंश से.

 निर्यात मार्ग- विमान मार्ग / जहाज मार्ग

 प्रक्रिया- उष्णबाष्प प्रक्रिया (Vapour Heat Treatment) 48⁰ C 20 मिनीटे.


ऑस्ट्रेलिया देशाला आंबा निर्यातीसाठी आवश्यक निकष

 वजन- 200 ते 250 ग्रॅम

 पॅकिं ग- 1 डझन (2.5 कि. ग्रॅम)

 साठवणुक तापमान- 13 अंश से.

 निर्यात मार्ग- विमान मार्ग / जहाज मार्ग

 प्रक्रिया- विकिरण प्रक्रिया


निर्यात के लेला कृ षिमाल नाकारला जाण्याची सर्वसाधारण कारणे

 कृ षि मालाचे फायटो सॅनिटरी प्रमाणीकरण नसणे.

 किडनाशकाचा उर्वरीत अंश मर्यादेपेक्षा अधिक असणे.

 कृ षिमालाबरोबर किडींचा आढळ असणे.

 कृ षि मालामध्ये रोगाचे जंतु आढळणे.

 तणाचे बी आढळणे.

 मालामधील अस्वच्छता/माती आढळणे.

 पॅकिं ग व लेबल मधील त्रुटी.

 मालाची गुणवत्ता कमी असणे.

 मालाला दूर्गंधीयुक्त वास येणे.


फायटोसॅनिटरी प्रमाणीकरणाची आदर्श कार्यपध्दती (एसओपी)

(फॉरवर्ड व बॅकवर्ड लिंके ज)


फायटोसॅनिटरी प्रमाणीकरणाची आदर्श कार्यपध्दती (एसओपी)

 युरोपिय युनियन मधिल देशांना निर्यातिसाठी अपेडा व एनपीपीओ यांनी मान्यता दिलेल्या पॅकहाउस स्तरावरुन फायटोसॅनिटरी तपासणी व
निर्यात प्रमाणिकरण करणे दि. 1 एप्रिल, 2014 पासुन बंधनकारक.

 पॅकहाउस स्तरावर स्वतंत्र क्वरंटाइन कक्ष उभारणे बंधनकारक.

 क्वारंटाइन कक्ष किड निदान करण्यासाठी आवश्यक असणा-या उपकरणे सुविधा तसेच संगणक सुविधायुक्त असणे आवश्यक.

 निर्यातीसाठी पॅकहाउस स्तरावर आणलेल्या कृ षिमालाचे पॅकिं ग, ग्रेडींग करण्यापुर्वि किडींबाबत पूर्ण तपासणे बंधनकारक.

 पॅकहाउस स्तरावर येणा-या मालाचे अभिलेख ठेवणे बंधनकारक.

 पॅकहाउसवर येण-या मालाची बॅकवर्ड लिंके ज असणे बंधनकारक.


धन्यवाद

You might also like