You are on page 1of 9

बायोगॅस

CONTENTS

बायोगॅस म्हणजे काय?

बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया

बायोगॅस निर्मितीसाठी कच्चा माल

बायोगॅस उत्पादनाचे फायदे

बायोगॅस निर्मिती संयंत्राचे घटक

बायोगॅस संयंत्र तयार करताना विचारात घेण्याचे मुद्दे

उपयुक्त स्रोत

पुन्हा-पुन्हा वापरता येण्याजोग्या (नवीनीकरणीय) उर्जास्रोतांपैकी एक म्हणजे बायोगॅस. ह्या जैविक वायूचा उपयोग
घरगुती तसेच शेतीच्‍या कामांसाठी होतो.

बायोगॅस म्हणजे काय?

ह्यामध्ये मुख्यतः हायड्रोकार्बन्स असतात, ते ज्वलनशील असल्याने जळताना उष्णता आणि उर्जा उत्पन्न करतात.
एका जैव-रासायनिक क्रियेमधन
ू हा वायू उत्पन्न होतो. ह्या प्रक्रियेच्‍या दरम्यान काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू
म्हणजे बॅक्टे रिया जैविक कचर्‍याचे रूपांतर उपयुक्त अशा बायोगॅसमध्ये करतात. जैविक प्रक्रियेमुळे हा वायू उत्पन्न
होत असल्याने ह्याला बायोगॅस असे म्हणतात. मिथेन हा वायू बायोगॅसचा मुख्य घटक असतो.

बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया

बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया अनएरोबिक प्रकारची असते आणि ती दोन चरणांत घडून येते – ती दोन चरणे म्‍हणजे
आम्लनिर्मिती (अ‍
ॅसिड फॉर्मेशन) आणि मिथेन वायच
ू ी निर्मिती. आम्लनिर्मितीमध्ये, कचर्‍यामधील जैव-
विघटनयोग्य जटिल सेंद्रीय संयुगांवर आम्ल तयार करणारे जीवाणू आपले काम सुरू करतात. हे जीवाणू कचर्‍यातील
विष्ठे मध्ये राहतात. ह्या पातळीवर सेंद्रीय आम्ले हाच मुख्य घटक असल्याने तिला आम्लनिर्मितीची पातळी असे
म्हणतात. दस
ु र्‍या चरणात, मिथॅनोजेनिक प्रकारचे जीवाणू सेंद्रीय आम्लांवर क्रिया करून मिथेन वायू बनवतात.
बायोगॅस निर्मितीसाठी कच्चा माल

बायोगॅस संयंत्रांसाठीचा मुख्य कच्चा माल म्हणजे गाईगुरांचे शेण. तरी ही, शेणाखेरीज कुक्कुटपालना मधील कचरा,
शेतांमधील वाया जाणारा माल, नाइट-सॉइल (रात्री वाहून नेला जाणारा मैला) ह्यांचा ही वापर कच्चा माल म्हणन

करता येतो.

बायोगॅस उत्पादनाचे फायदे

हे पर्यावरण मित्रत्‍वपूर्ण इंधन आहे . बायोगॅस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खेड्यापाड्यांमधून मोठ्या
प्रमाणात उपलब्ध आहे . ह्या प्रक्रियेत बायोगॅसखेरीज द्रवस्‍
वरूप स्लरीदे खील निर्माण होते. तिच्यामध्ये पोषणमूल्ये
भरपरू असल्याने तिचा खत म्हणन
ू ही वापर केला जातो. शेणाच्या गोवर्‍या आणि लाकडे जाळून चल
ू पेटवताना
निर्माण होणारा धूर आरोग्यास घातक असतो. बायोगॅसपासून असा काही धोका नाही. बायोगॅसच्या वापराने
वातावरण स्वच्छ राहाते कारण ह्या प्रक्रियेमुळे माशा आणि इतर जंतूंना आकर्षित करणारे कचर्‍याचे उघडे ढीग
साचन
ू राहात नाहीत. बायोगॅसच्या वापराने सरपण जाळण्याचे प्रमाण कमी होऊन झाडे तोडली जाण्यापासन
ू बचाव
होतो.

बायोगॅस निर्मिती संयंत्राचे घटक

मुख्यतः दोन प्रारूपे (मॉडेल्स) असतात -फिक्स्ड डोम म्हणजे स्थिर घुमटाकार आणि फ्लोटिंग ड्रम म्हणजे तरं गते
पिंप असलेले.

दोन्ही मॉडेल्सचे प्रमुख घटक ह्या प्रमाणे आहे त-

(i)डायजेस्टर -ही वस्तू कुजवण्याची टाकी आहे . ही जमिनीत अर्धी किं वा पूर्णपणे परू
ु न तयार करतात. विटा आणि
सिमें टने बांधलेली ही टाकी साधारणपणे दं डगोलाकार आकाराची असते.

(ii)गॅस होल्डर -डायजेस्टरमधून बाहे र पडणारा वायू ह्या घटकामध्ये साठवतात. हा फिक्‍सड डोम किं वा फ्लोटिंग ड्रम
असू शकतो.ह्यानुसारच संयंत्रांचे ढोबळ वर्गीकरण केले आहे . ह्याच्या वरील भागामधून गॅस बर्नर किं वा पुढच्या
पाइपलाइनशी जोडणी करतात.
(iii)स्लरी मिश्रण टाकी - ह्या टाकीत शेण आणि पाण्याचे मिश्रण करून ते एका इनलेट पाइपमार्फ त डायजेस्टरमध्ये
सोडले जाते.

(iv)आउटलेट टाकी आणि स्लरीसाठी खड्डा पिट-आउटलेट टाकी साधारणपणे घुमट प्रकारच्या संयंत्रात असते.
ह्यामधन
ू स्लरी थेट शेतातील खड्ड्यात सोडली जाते. तरं गत्या पिपाच्या संयंत्रामध्ये ही स्लरी एकतर वाळवतात
किं वा थेट शेतात सोडतात.

बायोगॅस संयंत्र तयार करताना विचारात घेण्याचे मुद्दे

जागेची निवड -जागा निवडताना खालील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे -पाणी साठून राहू नये म्‍हणून जागा
सपाट आणि आसपासच्या जमिनीपेक्षा थोडी उं चावर असावी. तेथील माती अगदीच ढिली-मोकळी नसावी.
तिच्यामध्ये 2 किलोग्राम/सेंमी2 इतकी धारणा-शक्ती (बेअरिंग स्‍ट्रेंथ) असावी.

वायूचा प्रत्यक्ष वापर ज्या ठिकाणी होणार असेल (घर किं वा शेत) त्यापासून ती जवळ असावी. कच्चा माल सहजपणे
हाताळता यावा ह्यासाठी अशी जागा गोठा/तबेला ह्याजवळ असावी. पाणी पातळी (वॉटर-टे बल) फार उथळ नसावे.
संयंत्र असलेल्‍या स्‍थळी पाण्याचा पुरेसा परु वठा असावा. दिवसभरातील बहुतेक काळ संयंत्राला नितळ सूर्यप्रकाश
मिळायला हवा. संयंत्र स्‍थळावर वायुवीजन चांगले हवे. संयंत्र आणि जवळची भिंत किं वा पाया ह्यांमधील अंतर
किमान 1.5 मीटर असावे.संयंत्र झाडांपासन
ू दरू असावे म्हणजे मळ
ु ांचा अडथळा होणार नाही. पिण्याच्या पाण्याच्या
कोणत्या ही विहिरीपासून हे संयंत्र किमान 15 मीटर दरू असावे.

कच्च्या मालाची उपलब्धता-कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरच बायोगॅस संयंत्राचा आकार ठरवता येतो.साधारणपणे
दर रोज 10 किलो शेण मिळे ल असे मानले तर ताज्या शेणापासून सुमारे 40 लिटर/किलो वायू मिळू शकतो. म्हणजेच
3 घनमीटर बायोगॅस तयार करण्यासाठी सुमारे 75 किलो शेण लागेल (3/0.04). म्‍हणून, गरजेपरु ते शेण
मिळवण्यासाठी किमान 4 गरु ांची गरज असते.

उपयुक्त स्त्रोत
संयंत्रामध्ये तापमान-नियंत्रक व्यवस्था नसेल तर दर किलो ताज्‍या शेणापासून सुमारे 40 लिटर वायू मिळे ल असे
माना. एक हजार लिटर म्हणजे 1 घनमीटर वायू होय.
बायोगॅस संयंत्राची कार्यपद्धती-
सेंद्रिय पदार्थाचे जिवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार
करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात.

यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो.

बायोमास गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच
स्वयंपाकासाठी दे खील वापरला जातो.

बायोमास गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असन


ू गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो.

बायोगॅस वायूमध्ये मिथेन 55 ते 70 टक्के, कार्बन-डाय- ऑक्‍साईड 30 ते 40 टक्के अल्प प्रमाणात नायट्रोजन व
हायड्रोजन सल्फाईड या वायंच
ू ा समावेश असतो.

यातील मिथेन हा वायू ज्वलनशील आहे . कोणत्याही प्रकारचे टाकाऊ पदार्थ, जे कुजतात त्यांच्यापासन
ू बायोगॅस
तयार होतो. उदा. शेण, घरातील खरकटे अन्न, निरुपयोगी भाजीपाला, पशुविष्ठा, मानवी विष्ठा, इ. पदार्थांचे मिश्रण
पाण्याबरोबर करून बायोगॅस संयंत्राच्या प्रवेश कक्षामध्ये पाचक यंत्रामध्ये सोडण्यात येते.

पाचक यंत्रामध्ये कालांतराने कार्यक्षम जिवाणू तयार होतात व ऍसिटिक ऍसिड तयार होऊन पाच विभिन्न प्रकारचे
जिवाणू तयार होऊन मिथेन व कार्बन-डाय- ऑक्साईड हे वायू तयार होतात.

बायोगॅस संयंत्राची रचना करताना त्यामध्ये हवाबंद, बंदिस्त पोकळी तयार करावी लागते. त्या पोकळीत सेंद्रिय
पदार्थ टाकण्याची सोय करावी लागते, तसेच सेंद्रिय पदार्थांपासून तयार होणारा गॅस व खत बाहे र येण्याची व
साठविण्याची सोय करावी लागते.

बायोगॅससाठी आवश्यक बाबी :

कच्च्या मालाची उपलब्धता-कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरच बायोगॅस संयंत्राचा आकार ठरवता येतो.

साधारणपणे दर रोज 10 किलो शेण मिळे ल असे मानले तर ताज्या शेणापासन


ू सम
ु ारे 40 लिटर/किलो वायू मिळू
शकतो.

म्हणजेच 3 घनमीटर बायोगॅस तयार करण्यासाठी सम


ु ारे 75 किलो शेण लागेल (3/0.04). म्‍हणन
ू , गरजेपरु ते शेण
मिळवण्यासाठी किमान 4 गुरांची गरज असते.
संशोधन पद्धती

बायोगॅस निर्मितीच्या डायजेस्टरमध्ये जैविक घटक टाकण्याच्या वेळा व वारं वारितेमध्ये बदल केल्यास ऊर्जा
निर्मितीचा कालावधी वाढतो. पर्यायाने अधिक बायोगॅस उपलब्ध होत असल्याचे जर्मनी, अमेरीका आणि इंग्लंड
येथील संशोधकांनी एकत्रितरीत्या केलेल्या संशोधनात दिसून आले. हे संशोधन ऍप्लाईड ऍण्ड एन्व्हायर्नमें टल
मायक्रोबायोलॉजी जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे .

अपारं परीक उर्जेमध्ये बायोगॅस हा अत्त्यंत महत्त्वाचा आहे . हा स्रोत पवन ऊर्जा किं वा सौर उर्जेच्या तुलनेमध्ये
अधिक काळ ऊर्जा पुरवू शकतो. मात्र, असे असले तरी आपली एकूण ऊर्जा गरज या स्रोतातून भागू शकेल का, या
विषयी आंतरराष्ट्रीय संशोधक गटाने अभ्यास केला आहे . त्यामध्ये हे ल्महोल्टझ सेंटर फॉर एन्व्हायर्नमें टल रिसर्च,
आर्हास विद्यापीठ येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी लवचिक जैवऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न केले. डायजेस्टरमधील
सूक्ष्मजीवांना खाद्य पुरविण्याच्या वेळा व वारं वारितेमध्ये वाढ केल्यास अधिक बायोगॅस मिळत असल्याचे दिसून
आले.

शेणखत आणि पिकांच्या अवशेषांच्या माध्यमातन


ू ग्रामीण भागामध्ये ऊर्जा मिळविण्यासाठी बायोगॅस अत्यंत
महत्त्वाचा आहे . त्यातून चांगल्या प्रकारचे खतही उपलब्ध होत असल्याने त्याचा शेतकऱ्यांना दह
ु े री फायदा होतो.
जर्मनीमध्ये सुमारे ८ हजार बायोगॅस प्रकल्प उभारणी करण्यात आली असून, एकूण सुमारे ४५०० मेगावॉट विद्यूत
ऊर्जा मिळविण्यात येत आहे . जर्मनीतील हे ल्महोल्टझ सेंटर फॉर एन्व्हायर्नमें टल रिसर्च आणि डेन्मार्क येथील
आर्हास विद्यापीठ यांनी एकत्रित प्रयत्न करीत, मिथेन वायू मिळविण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी संशोधन केले आहे .
या प्रयोगामध्ये प्रयोगशाळे तील वातावऱणामध्ये १४ टक्के वाढ मिळविण्यात आली आहे . डायजेस्टर टाकीमध्ये एक
किं वा दोन तासाच्या अंतराने टाकावू घटक टाकले जातात. त्याऐवजी ते एक किं वा दोन दिवसापर्यंत वाढविण्यात
आले. त्याचा फायदा त्वरीत दिसून आला. कमी प्रमाणामध्ये भरणा करू त्यातून अधिक वायू मिळत असल्याचे डॉ.
मार्के ल निकोलझ यांनी सांगितले.

असा झाला प्रयोग


- समान स्थितीतील १५ लिटर क्षमतेच्या दोन रिऍक्टरमध्ये वाळलेली धान्ये आणि विद्राव्य घटक (DDGS-
जैवइथेनॉल निर्मितीतील उपघटक) टाकण्यात आले. एकामध्ये पारं परीक पद्धतीप्रमाणे प्रति दोन तासाने, तर
दस
ु ऱ्यामध्ये दिवसातून फक्त एकदा असे त्याचे प्रमाण होते. दस
ु ऱ्या प्रयोगामध्ये एक दिवसाआड असे प्रमाण ठे वले.

- या दोन्ही प्रयोगाचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते. दिवसातन


ू एकदा दे ण्यात येणाऱ्या रिऍक्टरमधन
ू एकूण वायू १६
टक्के, तर १४ टक्के मिथेनवायू अधिक मिळाला. एक दिवसाआड घटक भरलेल्या रिऍक्टरमधून बाहे र पडणाऱ्या
वायूंचे प्रमाण १८ टक्के होते, व त्यातील मिथेनचे प्रमाण १३ टक्केने वाढल्याचे दिसून आले.

प्रासंगिकता

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेची सुरुवात दे शामध्ये सन 1982-83 पासून झालेली असून ही योजना केंद्र शासनाच्या
वीस कलमी कार्यक्रमामध्ये समाविष्ठ आहे .

योजनेची उद्दिष्टे :-

1) स्वयंपाकासाठी व इतर घरगुती उपयोगासाठी बायोगॅस चा वापर करणे.

2. ग्रामिण भागातील स्त्रीयांचे धुरापासून संरक्षण करणे व सरपणासाठी पडणाऱ्या कष्टापासन


ू सुटका करणे.

3. सरपणासाठी आवश्यक असलेली लाकुडतोड थांबवन


ु वनांचे संरक्षण करणे.

4. बायोगॅस प्रकल्पा पासुन निर्माण होणाऱ्या शेणखतांचा वापर शेतीसाठी करुन रासायनिक खतांचा वापर कमी
करणे

5. शौचालयाची जोडणी बायोगॅस सयंत्रास करून गाव व परिसर स्वच्छ करणे.

6. बायोगॅस चा वापर गॅस चलित इंजिन व रे फ्रिजरे टर मध्ये करुण डिझेल व पेट्रोलचा वापर कमी करणे

You might also like