You are on page 1of 4

1.

सध
ु ारित बियाणे : आणि जन्ु या बियाणांवर बीजप्रक्रिया सध
ु ारित बियाणे
आणि जुन्या बियाणांवर बीज प्रक्रिया करून कृषी उत्पन्न दप्ु पट करणे .
सध
ु ारित बियाणे खरे दी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात धन
एकत्रित करणे आवश्यक होते . यासाठी बचत गटांची स्थापना करण्यात
आली . प्रत्येक कुटुंबाने जानेवारी ते जन
ू २०० ९ पर्यंत एक हजार रुपये जमा
करून या गटांच्या माध्यमातून सुधारित बियाणांची खरे दी करण्यात आली .
नगदी खरे दी असल्यामळ
ु े त्यांना २० ते ३० टक्के सूट दे खील मिळाली .
यासोबतच गोमय ( शेण ) चा उपयोग करून जुन्या बियाणांवर प्रक्रिया करून
त्यांचा दे खील उपयोग केला . प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक वर्षी २५ ते ३० टक्के
नवे बियाणे घेतले आणि शेष जुन्या बियाणांवर प्रक्रिया केली . यामळ
ु े त्यांचे
उत्पन्न दप्ु पट झाले
2. जैविक खत : रासायनिक खतांमळ
ु े जमीन निकस होत होती आणि पाणी
जास्त मात्रेत लागत होते . मनुष्यांवर दे खील दष्ु परिणाम होत होते .
यापासून वाचायचे असेल तर सेंद्रिय कृषी पद्धत अवलंबणे आवश्यक होते .
यासाठी कम्पोस्ट तसेच गांडूळ कम्पोस्ट खताचे प्रशिक्षण दे ण्यात आले .
पहिल्या वर्षी एक खड्डा तीन कुटुंबांनी वापरावा , अशी योजना तयार केली .
दस
ु ऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येक कुटुंबाने स्वतःच्या शेतात हे खत तयार
करण्यासाठी स्वतःच खड्डे तयार केले . या कम्पोस्ट खतात गोमयचा
उपयोग करून सेंद्रिय कर्ब ( ऑरगॅनिक कार्बन ) १५ ते २० टक्के ठे वण्याचे
प्रशिक्षण दे ण्यात आले . हा सेंद्रिय कर्ब झाडांना हवेतून नायट्रोजन दे णाऱ्या
जीवाणच
ूं ी संख्या वाढवतो , फलस्वरूप जमिनीच्या क्षमतेत वद्ध
ृ ी होते .
म्हणून जमिनीत २ टक्के सेंद्रिय कर्ब कसा आवश्यक आहे , याचे दे खील
प्रशिक्षण दे ण्यात आले .
३. जैविक कीट : नियंत्रक गोमत्र
ू आणि गोमय यांचा उपयोग करून
दशपर्णी अर्क यासारख्या औषधी तयार करण्याचे तंत्र शेतकऱ्यांना शिकविणे
आणि त्याचा वापर रोग येण्यापर्वी
ू करणे . रोगप्रतिकारक शक्ती चांगली
झाल्यामुळे पिकांवरील रोगांचे प्रमाण कमी झाले . यामुळे अतिशय कमी
खर्चात जमीन व पिकांमध्ये होणारे विषवर्धक दष्ु परिणाम समाप्त होऊ लागले
. हे औषध कीट नियंत्रक आहे , कीट नाशक नाही .
४. जलसंधारण आणि जल व्यवस्थापन : रबी पिकासाठी जास्त पाणी
लागते . म्हणन
ू मोसमी पाऊस येण्यापर्वी
ू शेतात विहिरी , शेततळी ,
फेरोक्रिट बांध , छोटे - छोटे बांध क्षेत्र तयार ठे वण्याचे तंत्र शेतकऱ्यांना 1
शिकविण्यात आले . पाण्याच्या या सुनियोजित व्यवस्थेमळ
ु े शेतकऱ्यांना
भाजीपाला तसेच गळिताची व डाळवर्गीय पिके दोनदा घेणे शक्य झाले .
यामळ
ु े या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात बरीच वाढ झाली . एक एकर उपजाऊ
आणि एक एकर कमी उपजाऊ जमिनीत आधी वार्षिक उत्पन्न फक्त १० ते
१२ हजार रुपये येत होते , तिथे या सुव्यवस्थेनंतर ५० ते ७० हजार रुपयांचे
उत्पन्न मिळू लागले .
५. फळझाडे : वनवासी भागात पंडित व डोंगराळ जमीन बरीच असते .
तिथे फळझाडे लावल्यास २ ते ५ वर्षांत चांगले उत्पन्न मिळू शकते . म्हणून
स्वतःच्या जमिनीत नैसर्गिक स्थितीनुसार फळझाडे लावणे शिकविण्यात आले
. कमी उपजाऊ जमिनीत हवामानानुसार फळझाडे लावल्यामुळे पाच वर्षांनंतर
एक एकरातून वार्षिक २० ते ४० हजार रुपयांहून जास्त उत्पन्न मिळू लागले
६. गोखाद्य : भारतीय गोवंशापासून प्राप्त होणारे गोमय आणि गोमूत्र
यापासन
ू शेतीत चांगला विकास होतो . परं तु या गोवंशासाठी चांगले खाद्य
आवश्यक असते . त्यासाठी नेपियर गवतासारखे पीक घेण्याचा कार्यक्रम हाती
घेण्यात आला . नेपियर गवताची लागवड गायरानासारख्या क्षेत्रात केल्याने
वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होऊ लागला . हा चारा जनावरांच्या तब्येतीच्या
दृष्टीने पौष्टिक व रुचकर असतो . एका एकरात सिंचन न करता ४० टन
आणि सिंचन करून ८० टन गोखाद्याची निर्मिती होऊ शकते .
७. कृषी शाळा : शाळे तून तसेच महाविद्यालयांतून शिक्षण घेतल्यावर
आजकालच्या तरुणांना शेतीत काम करण्याची अजीबात इच्छा नसते . उलट
, त्यांना त्याची लाज वाटू लागते . ही स्थिती बदलावी म्हणून आम्हाला
शाळा व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात कृषी साक्षरता जोडणे आवश्यक
आहे . त्याचाच एक भाग म्हणून सुयश ट्रस्ट द्वारा सुट्यांमध्ये कृषी शाळा
सुरू करण्यात आल्या . कृषी तंत्रज्ञान समजल्यावर त्याचा उपयोग करून
विद्यार्थ्यांनी उत्साहाने शेतीत नवनवे प्रयोग करून दाखविलेत . हे नवे कृषी
तंत्र शिकण्यासाठी सय
ु श ट्रस्टने सेंद्रिय शेतीवर एक सी.डी. तयार केली आहे
. ८. खत परीक्षण व प्रमाणीकरण : जैविक खत तयार करणे
शिकविल्यावर त्यात जैविक कर्ब ( कार्बन ) ची मात्रा वाढविणे आणि त्याचे
मोजमाप करणे , याचे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दे ण्यात आले . यासाठी सुयश
ट्रस्टतर्फे माती परीक्षण किट दे ण्यात आली . कम्पोस्ट गांडूळ खतात
गोमयचा उपयोग करून सेंद्रिय कर्बाची मात्रा १६ ते २० टक्के राखणे दे खील
शिकविण्यात आले . सेंद्रिय कृषी उत्पन्नाचे प्रमाणीकरण करण्याची पद्धत
आणि तंत्र शिकविण्यात आले.
९. बायोगॅस : गोवंशापासून प्राप्त होणाऱ्या शेणापासून ( गोमय )
बायोगॅससोबत चांगले जैविक खत दे खील प्राप्त होते . बायोगॅस संयंत्राला
शौचालय जोडण्याने खतासोबतच घाण व रोगराईवर नियंत्रण दे खील मिळते .
बायोगॅस संयंत्रातून ५५ ते ७५ टक्के ज्वलनशील मिथेन वायू तयार होतो .
सहा व्यक्तींच्या कुटुंबाजवळ चार जनावरे असतील तर त्यांना यापासून
पर्याप्त इंधन मिळते . एक संयंत्रापासन
ू निघणारी स्लरी ३ एकर जमिनीसाठी
परु े से खत होते . हे खत ताबडतोब वापरू शकतो . या खतात जैविक कर्ब १८
ते २० टक्के असतो .
१०. प्रक्रिया उद्योग कार्यक्षेत्रानुसार कृषी उत्पन्नावर प्रक्रिया उद्योग
निर्माण करण्यासाठी शेतकरी तसेच महिला बचत गट आणि कार्यकर्त्यांना
मार्गदर्शन करण्यात आले . पापड , कांदे पावडर , नागली तसेच इतर
धान्याचे पीठ करणे , डाळ मिल , हळद , काजू प्रक्रिया , धान मिल ,
मधमाशी पालन इत्यादी प्रक्रिया उद्योगातन
ू उत्पादने तयार करणे . एवढे च
नव्हे तर जैविक कृषी औषधी निर्माण करून त्याची विक्री , भाजीपाल्यांवर
प्रक्रिया उद्योग उभारण्यात आले . त्यामुळे शेतमालाला उचित मूल्य मिळू
लागले . फक्त पीक बाजारात विकले तर कमी किंमत मिळते . या प्रक्रिया
उद्योगांना कच्चा माल भरपूर प्रमाणात लागतो . त्यामळ
ु े बचतगटाचे सदस्य
एकत्र येऊन गटाच्या माध्यमातून हे उद्योग सहजपणे करू शकतात . सुयश
ट्रस्टने असे अनेक उद्योग ठिकठिकाणी सरू
ु केले आहे त .

You might also like