You are on page 1of 28

शेतकरी उत्पादक कं पन्यांच्या संचालक आणि

भागधारकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण

M
प्रकरण:१ कें द्रीय कृ षी शेतकरी कल्याण
मंत्रालयाच्या योजना

कें द्रीय कृ षी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या योजनांमध्ये पीक विम्यापासून पीक कर्जापर्यंतच्या
विविध योजनांचा समावेश आहे
१)पीक विमा
-पंतप्रधान पीक विमा योजना (पी एम एफ बी वाय)

• योजनेची वैशिष्ट्ये:
• प्रत्यक्ष हफ्ता आणि देय असणारा विमा हफ्ता यामधील फरक कें द्र सरकार व राज्य सरकारद्वारे समान प्रमाणात भरला जातो.
• प्रतिकू ल हवामान / वातावरणामुळे पेरणी करणे शक्य झाले नाही तर संपूर्ण विमा संरक्षण रकमेचा दावा लागू के ला जातो.
• पेरणी किं वा लावणीमधील जोखीमेबाबत संरक्षण रकमेच्या 25% पर्यंतचा दावा लागू के ला जातो.
• पीक काढल्यानंतरच्या काळात संपूर्ण देशामध्ये चक्रीवादळ पाऊस आणि अवेळी पाऊस यामुळे पीक 14 दिवसांसाठी तसेच पडू न राहिल्यास काढणीपश्चात पीक
नुकसाणीचे मूल्यांकन करून विमा संरक्षण रक्कम निश्चित के ली जाते.
• नैसर्गिक आपत्ती / संकट, कीड आणि रोग हल्ला आणि प्रतिकू ल हवामान यासारख्या नैसर्गिक जोखमींविरोधात शेतकर्‍यांचे आर्थिकदृष्ट्या संरक्षण करण्यासाठी तीन
विमा योजना राबवल्या जातात, त्या म्हणजे;
• पंतप्रधान पीक विमा योजना (पी एम एफ बी वाय),
• हवामान आधारीत पीक विमा योजना (डब्ल्युबीसीआयएस) आणि
• पथदर्शी युनिफाईड पॅके ज पीक विमा योजना (युपीआयएस).

• अधिक माहितीसाठी संपर्क :


• क्षेत्रांसाठी अधिसूचित के लेल्या बॅंक / प्राथमिक कृ षी पत पुरवठा संस्था / सहकारी बॅंक / अनुशासित सामान्य विमा कं पनी यांचे जवळचे शाखा कार्यालय आणि
जिल्हा कृ षी अधिकारी / गट विकास अधिकारी यांना संपर्क साधता येईल किं वा www.agri-insurance.gov.in या संके तस्थळाला भेट द्या.
२) मृदा आरोग्य पत्रिका

मृदा संवर्धन आणि सूक्ष्म पोषणमूल्ये


• 19 फे ब्रुवारी 2015 रोजी मृदा आरोग्य पत्रिका योजना लागू करण्यात आली. या
योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतजमिनींसाठी दोन वर्षाच्या कालांतराने मृदा
आरोग्य पत्रिका दिली जात आहे. या पत्रिके च्या माध्यमातून पीक उत्पादनासाठी
पोषक तत्वे योग्य शिफारशित मात्रेत देणाबाबत शेतकरी सक्षम बनतो आणि
त्याद्वारे मातीचे आरोग्य आणि सकसता सुधारण्यास चालना मिळत आहे.
• संपर्क :
• जिल्हा कृ षी अधिकारी / जिल्हा फलोत्पादन अधिकारी / प्रकल्प संचालक-
आत्मा
३) सिंचन
पंतप्रधान कृ षी सिंचन योजना (पीएमएसके वाय)

• 2015-16 ते 2019-20 या पाच वर्षांच्या काळासाठी या योजनेअंतर्गत 50,000 कोटी


रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान कृ षी सिंचन योजनेचा प्रमुख उद्देश
देशातील सर्व शेतीला संरक्षित पाणी उपलब्ध करून पाणी वापर कार्यक्षमता सुधारणे हा आहे. या
योजनेच्या माध्यमातून जिल्हा / राज्य स्तरावरील सर्वंकष नियोजन प्रक्रीयेच्या आधारे सिंचन
पुरवठा साखळीतील सर्वंकष सेवा देण्यावर धोरण राबवले जात आहे, उदा. जलस्त्रोत, वितरण
प्रणाली, कार्यक्षम शेतस्तरीय वापर, नवीन तंत्रज्ञानावरील विस्तार सेवा आणि माहिती इत्यादी.
• संपर्क :
• जिल्हा कृ षी अधिकारी / जिल्हा मृदा संवर्धन अधिकारी / प्रकल्प संचालक- आत्मा / जिल्हा
फलोत्पादन अधिकारी /
४) कृ षी विपणन
राष्ट्रीय कृ षी बाजार (ई- नाम)

• कृ षी विपणन क्षेत्रातील सुधारणांना चालना देऊन आणि देशातील कृ षी उत्पादनांच्या ऑनलाईन मार्के टींगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकर्‍
यांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी शासनाने 2015 मध्ये राष्ट्रीय कृ षी बाजार (नाम) लागू करण्यासाठी योजना मंजूर के ली या योजनेअंतर्गत
देशभरातील निवडक 250 नियंत्रित बाजारांमध्ये वेब आधारीत प्लॅटफार्म विकसीत करण्यात आला आहे. याद्वारे ऑनलाईन व्यापार, बाजारपेठेच्या
संपूर्ण कार्याचे डिजिटायझेशन, शेतीमाल प्रवेश गट (गेट एन्ट्री लॉट) विकास, ई-विक्री करार आणि ई-पेमेंट प्रणाली इत्यादी सुविधा सादर करण्यात
आल्या आहेत. शेतीमाल बाजारातील माहितीचा असमतोल दूर करणे, शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि
देशभरातील बाजारांमध्ये प्रवेश सुलभ करणे हे या योजनेचे प्रमुख उद्देश आहेत. यामुळे शेतकर्‍यांना प्रत्यक्ष बाजार संधी व लाभ मिळू शकतील.
www.agmarknet.nic.in किं वा किसान कॉल सेंटर किं वा www.farmer.gov.in/buysell.htm या खरेदीदार-विक्रे ता
पोर्टलद्वारे शेतकरी विविध शेतीमालाच्या बाजारभावाची माहिती प्राप्त करू शकतात.
• संपर्क :
• व्यावसायिक बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बॅंक, राज्य सहकारी बॅंक इत्यादी; सहकारी प्रकल्पांसाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी);
एकात्मिक कृ षी विपणन योजना (आयएएसएम) विषयक विस्तृत कार्य नियमावली वेबसाईटवर उपलब्ध आहे. या योजनेचा अधिक तपशील
www.enam.gov.in या संके तस्थळावर उपलब्ध आहे.
५) सेंद्रिय शेती
परंपरागत कृ षी विकास योजना (पीके व्हीआय)
• पर्यावणपूरक, कमी खर्चातील तंत्रज्ञानाचा अवलंब करून रसायने आणि कीटकनाशकांच्या अवशेषांपासून मुक्त कृ षी उत्पादन
घेणे म्हणजे सेंद्रिय शेती होय. ही योजना राष्ट्रीय शाश्वत कृ षी अभियानामधील मृदा आरोग्य व्यवस्थापन चा विस्तार भाग
आहे. या योजनेअंतर्गत सेंद्रिय शेतीद्वारे क्लस्टर पद्धतीने सेंद्रिय ग्राम विकास आनि सहभागात्मक हमी प्रणाली (पीजीएस)
प्रमाणिकरणाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन दिले जात आहे.
• सेंद्रिय शेतीसाठी निवडले जाणारे क्लस्टर हे किमान 50 एकर क्षेत्र असलेले आणि शक्य तितक्या जवळजवळचे
शेतजमिनीच्या तुकड्यांनी बनलेले असावे. या योजनेअंतर्गत एका शेतकर्‍यांसाठी कमाल 1 हेक्टरसाठी आणि एकू ण 50
एकरच्या क्लस्टरसाठी शेतकरी सदस्यांना कमाल 10 लाख रुपये इतके अनुदान दिले जाते. शेतकरी संघटन करणे व
पीजीएस प्रमाणिकरण यासाठी 4.95 लाख रुपयांचे साह्य दिले जाते. या क्लस्टरमधील एकू न शेतकरी सद्स्यांपैकी किमान
65% शेतकरी हे लघु, अल्प-भूधारक श्रेणीतील असावेत.
• संपर्क :
• राज्य स्तर: संचालक (फलोत्पादन / कृ षी) ईशान्य भारतातील राज्ये
• जिल्हा स्तर: जिल्हा कृ षी अधिकारी / जिल्हा मृदा संवर्धन अधिकारी / प्रकल्प संचालक- आत्मा / जिल्हा फलोत्पादन
अधिकारी
६)कृ षी पत पुरवठा

• सावकारांपासून शेतकर्‍यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने शेतीसाठी वित्त पुरवठा योजना राबवल्या
जात असून, शेतकरी बॅंकाकडू न कर्ज सुविधांचा लाभ घेऊ शकतात. देशातील वाणिज्यिक बॅंका,
विभागीय ग्रामीण बॅंका (आरआरबी‌), आणि सहकारी पत संस्था यांच्या व्यापक जाळ्याच्या
माध्यमातून शेतकर्‍यांना त्यांच्या विविध शेती गरजांसाठी पीक कर्ज, मुदत कर्ज सुविधा उपलब्ध
के ल्या जातात.

• संपर्क :
• सह-सचिव (सहकार), कें द्रीय कृ षी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, कृ षी भवन.
• राज्यांच्या राजधानी शहरातील नाफे ड आणि एसएफएसी ची विभागीय कार्यालये, जिल्हास्तरीय
सहकार पणन / शेतीमाल महासंघाची कार्यालये, तालुका स्तरावरील पणन सहकारी संस्था आणि
शेत्करी उत्पादक संस्था / कं पनी
प्रकरण -२ कें द्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजना

कें द्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या (एमओएफपीआय) च्या महत्वाच्या


योजनांमध्ये खालील योजनांचा समावेश आहे.
मेगा फू ड पार्क योजना

• मेगा फू ड पार्क योजनेचा उद्देश शेतकरी, प्रक्रियादार आणि किरकोळ विक्रे ते यांना एकत्र आणत कृ षी उत्पादन आणि बाजार यांना जोडण्यासाठी एक यंत्रणा
उपलब्ध करून देणे, मूल्य वर्धन करणे, शेतीमालाची नासाडी कमी करणे, शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे आणि ग्रामीण भागात रोजगार संधी निर्माण करणे हा
आहे.
• अर्थसाह्य स्वरूप: या योजनेमध्ये सामान्य प्रदेशामध्ये, पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% आणि डोंगराळ / आयटीडीपी व दुर्गम प्रदेशामध्ये पात्र प्रकल्प खर्चाच्या
50% आणि कमाल 1.5 दशलक्ष अमेरेकी डॉलरच्या मर्यादेत अनुदान- अर्थसाह्य दिले जाते.
• पात्रता निकष:
• प्रवर्तक / अंमलबजावणी यंत्रणा- संस्था (आयए) यांचे एकत्रित निव्वळ मूल्य (नेट वर्थ) अनुदान रकमेच्या 1.5 पटीपेक्षा कमी नसावे.
• अंमलबजावणी संस्थेने एकू ण प्रकल्प खर्चाच्या किमान 20 टक्के (सामान्य प्रदेश) किं वा 10 टक्के (डोंगराळ / दुर्गम प्रदेश) रक्कम भागभांडवलाच्या
माध्यमातून जमवणे आवश्यक आहे.
• किमान जमिन क्षेत्र- 10 एकर, एकू ण 25 कोटी गुंतवणूकीचे किमान 5 प्रक्रिया प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव.
• अपात्र खर्च घटक:
• पात्र प्रकल्प खर्चामध्ये जमिनीची किं मत, उत्पादन-पूर्व खर्च आणि खेळत्या भांडवलासाठीची सीमांत रक्कम ग्राह्य धरली जात नाही.
• मेगा फू ड पार्क चे प्रवर्तक पात्र ठरणार नाहीत.
• पात्र संस्था:
• शासनाच्या सर्व कार्यान्वयन यंत्रणा / संस्था / सार्वजनिक संस्था / संयुक्त उपक्रम / स्वयंसेवी संस्था / सहकारी संस्था / स्वयंसहाय्यता गट / खासगी
क्षेत्र / वैयक्तिक व्यावसायिक इत्यादी संस्था पात्र असतील.
शीतसाखळी, मूल्य वर्धन आणि साठवणूक सुविधांसाठीची योजना
• शीतसाखळी, मूल्य वर्धन आणि संवर्धन साधनसुविधा योजनेचा उद्देश शेती प्रदेश ते ग्राहक अशी एकात्मिक शीतसाखळी आणि साठवणूक सुविधांचा विकास करणे हा आहे. यामध्ये फलोत्पादन, सेंद्रीय शेतीमाल, मत्स्य
उत्पादने, डेअरी, मांस उत्पादने आणि पोल्ट्री उत्पादन प्रदेशाजवळ प्रि- कु लिंग सुविधा, मोबाईल कु लिंग संच तसेच प्रक्रीया / मल्टी लाईन प्रक्रिया / संकलन कें द्रे अशी मूल्य वर्धन कें द्रे उभारण्यास प्रोत्साहन दिले जाते.
• अर्थसाह्य स्वरूप:
• या योजनेमध्ये एकू ण प्रकल्प आणि यंत्रसामुग्री खर्च तसेच तांत्रिक बांधकाम खर्च याबाबत, सामान्य प्रदेशासाठी प्रकल्प खर्चाच्या 35%; आणि ईशान्य भारत / दुर्गम प्रदेशासाठी प्रकल्प खर्चातील साठवणूक सुविधांसाठी
50% आणि प्रक्रिया सुविधांसाठी 75%; कमाल 1.5 दशलक्ष अमेरेकी डॉलरच्या मर्यादेत अनुदान- अर्थसाह्य दिले जाते.
• पात्रता निकष:
• अर्जदाराचे निव्वळ मूल्य (नेट वर्थ) अनुदान रकमेच्या 1.5 पटीपेक्षा कमी नसावे.
• प्रकल्प खर्चाच्या किमान 20 टक्के अर्थसाह्य बॅंक किं वा वित्तिय सस्थेकडू न मुदत कर्ज स्वरूपात घेणे आवश्यक.
• व्यावसायिक उत्पादन प्रारंभाची तारीख हि अर्ज सादर करण्याच्या तारखेच्या आधीची नसावी.
• पात्र घटक:
• प्रस्ताव मान्यतेसाठी खालील यादीतील किमान दोन घटकांचा प्रकल्पामध्ये समावेश असणे आव्शय्क आहे. इरॅडिएशन सुविधेचा स्वतंत्र प्रकल्प म्हणून विचार के ला जाईल.
• एमपीसी / शेतस्तरीय सुविधा:
• वजन, वर्गीकरण, प्रतवारी, वॅक्सिंग, पॅकिं ग, प्रि-कु लिंग सुविधा.
• नियंत्रित वातावरणातील (सीए) / सुधारीत वातावरणातील (एमए) शीतगृह.
• सामान्य साठवण सुविधा.
• इंडिव्हिज्युअल क्विक फ्रिजिंग (आयक्युएफ).
• रेफर वाहतूक
• मोबाईल प्रि- कु लिंग ट्रक आणि रेफर ट्रक जे नाशवंत कृ षी उत्पादन / फलोत्पादन पिके / दुग्धजन्य पदार्थ / मांस उत्पादने वाहतुकीसाठी उपयुक्त आहेत.
• वितरण कें द्र
• मल्टि प्रॉडक्ट्स आणि मल्टी सीए / एम ए चेंबर / शीतगृह / व्हेरिएबल चेंबर
• पॅकिं ग सुविधा
• क्लिनिंग इन प्रोसेस (सीआयपी) फॉग ट्रिट्मेंट
• इंडिव्हिज्युअल क्विक फ्रिजिंग (आयक्युएफ).
• ब्लास्ट फ्रिजिंग
• अपात्र खर्च घटक: जमिनीची किं मत, उत्पादन-पूर्व खर्च आणि खेळत्या भांडवलासाठीची सीमांत रक्कम आणि आपात्कालीन खर्च
• पात्र संस्था: शासनाच्या सर्व कार्यान्वयन यंत्रणा / संस्था / सार्वजनिक संस्था / संयुक्त उपक्रम / स्वयंसेवी संस्था / सहकारी संस्था / स्वयंसहाय्यता गट / खासगी क्षेत्र / वैयक्तिक व्यावसायिक इत्यादी संस्था पात्र
असतील.
शेतीमाल उत्पादन आणि पुरवठा साखळी विकास योजना
• शेतीमाल उत्पादन आणि पुरवठा साखळी विकास योजनेचा उद्देश अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पुरवठा साखळीतील त्रुटी कमी करत कच्चा माल सुलभपणे उपलब्ध करण्यासाठी सर्व घटकांना जोडणे आणि प्रक्रियायुक्त मालासाठी
बाजार जोडणी करणे हा आहे. या योजनेअंतर्गत, शेती उत्पादन प्रदेशात प्राथमिक प्रक्रिया कें द्रे, संकलन कें द्रांची उभारणी आणि आधुनिक रिटेल दालनांची उभारणी करून या दोन्ही टोकांना उष्णतारोधक / शीतकरण
सुविधांनी युक्त वाहतूक यंत्रणेने जोडण्यास अर्थसाह्य दिले जाते.
• अर्थसाह्य स्वरूप:
• या योजनेमध्ये प्रत्येक प्रकल्पास, सामान्य प्रदेशासाठी प्रकल्प खर्चाच्या 35%; तर ईशान्य भारत, हिमालयीन राज्ये, आयटीडीपी प्रदेश आणि द्वीपप्रदेशासाठी 50% इतके पण कमाल 5 कोटी रुपयांच्या मर्यादेत अनुदान
दिले जाते. शेतकरी उत्पादक संस्थांसाठी, सामान्य प्रदेश आणि दुर्गम भागांसाठी अनुक्रमे 35% आणि 50% अनुदान दिले जाते.
• पात्र घटक: खालील घटकांना अर्थसाह्याचा लाभ मिळू शकतो:
• उत्पादन साखळी:
• एकात्मिक पॅक हाऊस (यांत्रिकी वर्गीकरण आणि प्रतवारी लाईन / पॅके जिंग लाईन / वॅक्सिंग सुविधा / स्टेजिंग शीतगृहे इत्यादी)
• दूध शीतकरण कें द्रे / बल्क मिल्क कु लर
• प्रि-कु लिंग प्रकल्प
• मोबाईल प्रि-कु लिंग व्हॅन
• रेफर बोट
• पुरवठा साखळी
• पिकवण कक्ष
• फ्रोझन स्टोअरेज / रेफ्रिजरेटेड डिस्प्ले कॅ बिनेट / कोल्ड रूम या सुविधांसह मत्स्य उत्पादन अशा नाशवंत उत्पादनांसाठी रिटेल दालनांची साखळी
• रिटेल रेफ्रिजरेटेड कार्ट, नियंत्रित तापमान सौर-उर्जा आधारीत रिटेल कार्ट
• वाहतुक: रेफ्रिजरेटेड इंसुलेटेडवाहतूक सुविधा / रेफर व्हॅन
• पात्र संस्था:
• कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे प्रवर्तक.
• अन्न प्रक्रिया प्रकल्पाशी संबंधित सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था / कं पन्या, स्वयंसहायता गट (एसएचजी) इत्यादी उत्पादक गट
• प्रक्रियाकृ त अन्न विक्रे ते
• लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार
• वरील श्रेणीतील अर्जदारांची वर्गवारी कें द्रीय आणि सार्वजनिक उपक्रम / संयुक्त उपक्रम / शेतकरी उत्पादक संस्था / एनजीओ / सहकारी संस्था / स्वयंसहायता गट (एसएचजी) / सार्वजनिक आणि खासगी कं पन्या /
मर्यादीत दायित्व भागीदारी, कॉर्पोरेट संस्था / स्वामित्व कं पन्या / भागीदारी संस्था इत्यादी प्रकारे के ली जाते.
अन्नप्रक्रिया आणि साठवण सुविधा क्षमता निर्मिती / विस्तार योजना

• अन्नप्रक्रिया आणि साठवण सुविधा क्षमता निर्मिती / विस्तार योजनेअंतर्गत उद्योगांना प्रक्रियास्तरावरील सुधारणांनुसार आधुनिकीकरण / विस्तार करणे, मूल्यवर्धनातून नुकसान-नासाडी कमी
करणे यास प्रोत्साहन दिले जाते. नवीन प्रकल्पाची स्थापना करणे आणि विद्यमान प्रकल्पांचे आधुनिकीकरण / विस्तार करणे या योजनेअंतर्गत समाविष्ट आहे. प्रक्रिया उद्योग प्रकल्पात विविध
प्रक्रिया राबवल्या जातात आणि त्या माध्यमातून उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि/किं वा त्याच्या टिकवण कालावधीमध्ये वाढ के ली जाते.
• अर्थसाह्य स्वरूप:
• सामान्य प्रदेशासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35%, कमाल 0.75 दशलक्ष डॉलरच्या मर्यादेत.
• सिक्कीम, हिमालयीन राज्ये, बेट क्षेत्र आणि आयटीडीपी प्रदेशासह ईशान्य भारतातील राज्यांसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 50%, कमाल 0.75 दशलक्ष डॉलरच्या मर्यादेत.
• पात्रता निकष:
• अर्जदाराचे / प्रवर्तकाचे भांडवल / भागभांडवल गुंतवणूक प्रकल्प खर्चाच्या 20% पेक्षा कमी नसावे (शासकीय संस्थांच्या प्रकल्पांसाठी लागू नाही)
• प्रकल्पातील पात्र घटकावरील खर्च 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावा.
• व्यावसायिक उत्पादन प्रारंभाची तारीख ही अर्ज सादर करण्याच्या तारखेच्या आधीची नसावी.
• बॅंक / वित्त संस्थेद्वारे मुदत कर्ज मंजूर असलेल्या प्रकल्पांचेच प्रस्ताव या योजनेसाठी पात्र ठरतील.
• पात्र संस्था:
• शासनाच्या सर्व कार्यान्वयन यंत्रणा / संस्था / सार्वजनिक संस्था / संयुक्त उपक्रम / स्वयंसेवी संस्था / सहकारी संस्था / स्वयंसहाय्यता गट / खासगी क्षेत्र / वैयक्तिक व्यावसायिक इत्यादी
संस्था ज्यांचे प्रकल्प कार्यरत आहेत अशा घटकांना अन्नप्रक्रिया आणि साठवण सुविधा क्षमता निर्मिती / विस्तार योजनेअंतर्गत लाभ मिळू शके ल.
• पूर्व आणि ईशान्य भारत प्रदेशातील के वळ राइस मिल प्रकल्प पात्र ठरतील.
• प्रस्तावांना प्राधान्य:
• राज्यनिहाय कोट्यानुसार, अन्न प्रक्रिया प्रकल्पांची योजना लाभासाठी निवड के ली जाईल.
• मेगा फू ड पार्क मधील, मंत्रालयाद्वारे साह्य लाभलेले अन्नप्रक्रिया आणि साठवण सुविधा क्षमता निर्मिती / विस्तार योजनेअंतर्गत, अन्नप्रक्रिया आणि साठवण सुविधा प्रकल्पांना कोट्यासाठी प्राधान्य
दिले जाईल.
कृ षी-प्रक्रिया क्लस्टरसाठी साधनसुविधा योजना
• कृ षी-प्रक्रिया क्लस्टर योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देत उद्योजक, व्यावसायिकांच्या
समूहाला क्लस्टर आधारीत अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारणीस प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेअंतर्गत, प्रभावी उत्पादन आणि पुरवठा साखळी
विकसित करून उत्पादक / शेतकरी गटांना, प्रक्रियादार व बाजारांना जोडलेल्या सुसज्ज पुरवठा साखळीद्वारे जोडले जाते. यामध्ये शेतीमाल
उत्पादन क्षेत्राजवळच आधुनिक प्रक्रिया सुविधा, एकात्मिक / सर्वंकष साठवण सुविधा उभ्या करून शेतकरी ते ग्राहक यांना जोडले जाते.

• अर्थसाह्य स्वरूप: या योजनेमध्ये सामान्य प्रदेशामध्ये, पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% आणि डोंगराळ / आयटीडीपी व दुर्गम प्रदेशामध्ये पात्र
प्रकल्प खर्चाच्या 50% आणि कमाल 1.5 दशलक्ष अमेरेकी डॉलरच्या मर्यादेत अनुदान- अर्थसाह्य दिले जाते.
• प्रवर्तक / अंमलबजावणी यंत्रणा- संस्था (आयए) यांचे एकत्रित निव्वळ मूल्य (नेट वर्थ) अनुदान रकमेच्या 1.5 पटीपेक्षा कमी नसावे.
• अंमलबजावणी संस्थेने एकू ण प्रकल्प खर्चाच्या किमान 20 टक्के (सामान्य प्रदेश) किं वा 10 टक्के (डोंगराळ / दुर्गम प्रदेश) रक्कम
भागभांडवलाच्या माध्यमातून जमवणे आवश्यक आहे.
• किमान जमिन क्षेत्र- 10 एकर, एकू ण 25 कोटी गुंतवणूकीचे किमान 5 प्रक्रिया प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव.

• अपात्र खर्च घटक:


• पात्र प्रकल्प खर्चामध्ये जमिनीची किं मत, उत्पादन-पूर्व खर्च आणि खेळत्या भांडवलासाठीची सीमांत रक्कम ग्राह्य धरली जात नाही.
• मेगा फू ड पार्क चे प्रवर्तक पात्र ठरणार नाहीत.
• पात्र संस्था:
• शासनाच्या सर्व कार्यान्वयन यंत्रणा / संस्था / सार्वजनिक संस्था / संयुक्त उपक्रम / स्वयंसेवी संस्था / सहकारी संस्था / स्वयंसहाय्यता
गट / खासगी क्षेत्र / वैयक्तिक व्यावसायिक इत्यादी संस्था पात्र असतील.
प्रकरण -३ भारत सरकारच्या इतर योजना

• वर उल्लेखित योजनांव्यतिरीक्त, भारत सरकारच्या इतरही अनेक योजना


आहेत. त्यापैकी काही योजनांची माहीती येथे दिली आहे.
पंतप्रधान रोजगार निर्मीती प्रकल्प (पीएमईजीपी)

• ओळख
• भारत सरकारने पंतप्रधान रोजगार निर्मीती (पीएमईजी) नावाचा एक नवीन क्रे डिट-लिंक्ड अनुदान कार्यक्रम सुरू करण्यास मंजूरी दिली आहे.
पंतप्रधान रोजगार योजना (पीडीआरवाय) आणि ग्रामीण रोजगार निर्मीती योजना (आरईजीपी) या दोन योजनांचे 31 मार्च 2018 रोजी
एकत्रीकरण करून ही नवी योजना विकसित करण्यात आली आहे. नवीन स्वयंरोजगार उपक्रम / प्रकल्प /सूक्ष्म उद्योग स्थापित करून देशाच्या
ग्रामीण तसेच शहरी भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारा
संचालित ही एक कें द्रीय योजना आहे.
• उद्देश:
• नवीन स्वयंरोजगार उपक्रम / प्रकल्प /सूक्ष्म उद्योग स्थापित करून देशाच्या ग्रामीण तसेच शहरी भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे.
• पारंपारीक कारागीर / ग्रामीण आणि शहरी बेरोजगार युवकांना एकत्र आणणे आणि त्यांना शक्य त्या प्रकारे स्वयंरोजगाराचे संधी देणे.
• पारंपारीक आणि संभाव्य कारागीर आणि देशातील ग्रामीण आणि शहरी बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणावर निरंतर आणि स्थायी रोजगार उपलब्ध
करवून, ग्रामीण युवकांचे शहरी भागाकडे होणार्‍या स्थलांतराचे प्रमाण कमी करण्यास मदत करणे.
• कारागिरांच्या वेतन कमावण्याच्या क्षमतेत वाढ करणे आणि ग्रामीण व नागरी रोजगारवाढीच्या दरात वाढ करणे.
आर्थिक साह्याचे स्वरूप आणि प्रमाण

• पीएमईजीपी अंतर्गत निधी स्तर


• पीएमईजीपी अंतर्गत लाभार्थी श्रेणी
• लाभार्थी योगदान (प्रकल्प खर्चामधील)
• अनुदान दर (प्रकल्प खर्चावर आधारित)
• प्रदेश (प्रकल्प स्थळ)

टीप:
• उत्पादन क्षेत्रासाठी प्रकल्पाची कमाल किं मत 25 लाख रुपये.
• व्यवसाय / सेवा क्षेत्राअंतर्गत प्रकल्पाची कमाल किं मत 10 लाख रुपये.
• प्रकल्प खर्चातील उर्वरीत रक्कम बॅंके द्वारे मुदत कर्जाच्या रूपात प्रदान के ले जाईल.
• संपर्क :
• राज्य संचालक, खादी ग्रामोद्योग महामंडळ
• पत्ता: http://www.kviconline.gov.in या संके तस्थळावर उपलब्ध आहे.
• उप- मुख्य कार्यकारी अधिकारी (पीएमईजीपी), के व्हीआयसी, मुंबई
• संपर्क क्रमांक: 022- 26714370
• ईमेल: dyceoksr@gmail.com
• अधिक माहितीसाठी संपर्क : http://www.kviconline.gov.in
शेतकरी उत्पादक कं पनीसाठी कृ षी व्यवसायातील बिझनेस प्लानिंग व आर्थिक नियोजन

• मुख्य मुद्दे
• बिझनेस प्लान
– काय आहे?
– शेतकरी उत्पादक कं पनीसाठी महत्त्व
• आर्थिक नियोजन
– काय आहे?
– शेतकरी उत्पादक कं पनीसाठी महत्त्व
बिझनेस प्लान

• काय आहे?
– एखाद्या व्यवसायाच्या उद्दिष्टे, धोरणे आणि अंमलबजावणीची योजना.
– कं पनीच्या यशासाठी एक मार्गदर्शक तत्त्व.
• शेतकरी उत्पादक कं पनीसाठी महत्त्व
– कं पनीच्या उद्दिष्टांचे स्पष्टीकरण करणे.
– कं पनीच्या धोरणांचे मार्गदर्शन करणे.
– कं पनीच्या आर्थिक नियोजनासाठी आधार प्रदान करणे.
आर्थिक नियोजन

• काय आहे?
– कं पनीच्या आर्थिक उद्दिष्टे आणि धोरणे साध्य करण्यासाठी निधीचे व्यवस्थापन.
• शेतकरी उत्पादक कं पनीसाठी महत्त्व
– कं पनीच्या आर्थिक स्थिरतेचे संरक्षण करणे.
– कं पनीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे.
– कं पनीच्या जोखमीचे व्यवस्थापन करणे.
शेतकरी उत्पादक कं पनीसाठी बिझनेस प्लान आणि आर्थिक नियोजन
बिझनेस प्लान
– कं पनीच्या उद्दिष्टे, धोरणे आणि अंमलबजावणीची योजना समाविष्ट करावी.
– कं पनीच्या विशिष्ट लक्ष्यांची आणि उद्दिष्टांची यादी करावी.
– कं पनीच्या बाजारपेठेतील संधी आणि धोक्यांचे विश्लेषण करावे.
– कं पनीच्या वित्तीय नियोजनाची माहिती समाविष्ट करावी.
• आर्थिक नियोजन
– कं पनीच्या आर्थिक उद्दिष्टे आणि धोरणे समाविष्ट करावी.
– कं पनीच्या विशिष्ट आर्थिक लक्ष्यांची आणि उद्दिष्टांची यादी करावी.
– कं पनीच्या आर्थिक संसाधनांची आणि जबाबदाऱ्यांची यादी करावी.
– कं पनीच्या आर्थिक जोखमींचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना करावी.
शेतकरी उत्पादक कं पनीसाठी बिझनेस प्लान आणि आर्थिक नियोजनाच्या
महत्त्वपूर्ण बाबी
• शेतकरी उत्पादक कं पन्यांनी त्यांच्या बिझनेस प्लान आणि आर्थिक नियोजनामध्ये
खालील बाबींचा समावेश के ला पाहिजे:
– कं पनीच्या उद्दिष्टे आणि धोरणे
– बाजारपेठेतील संधी आणि धोके
– वित्तीय नियोजन
– आर्थिक लक्ष्य आणि उद्दिष्टे
– आर्थिक संसाधने आणि जबाबदाऱ्या
– आर्थिक जोखीम व्यवस्थापन
• शेतकरी उत्पादक कं पन्यांनी त्यांच्या बिझनेस प्लान आणि आर्थिक नियोजनांचे
नियमितपणे पुनरावलोकन के ले पाहिजे जेणेकरून ते बदलत्या परिस्थितीशी जुळवून
घेऊ शकतील.
निष्कर्ष

• बिझनेस प्लान आणि आर्थिक नियोजन ही शेतकरी उत्पादक कं पन्यांसाठी


यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची बाबी आहेत. या दोन बाबींमुळे कं पनीच्या
उद्दिष्टांचे स्पष्टीकरण होते, कं पनीच्या धोरणांचे मार्गदर्शन होते आणि
कं पनीच्या आर्थिक स्थिरतेचे संरक्षण होते.
शेतकरी उत्पादक कं पनीसाठी कृ षी व्यवसाय मार्के टिंग

• मुख्य मुद्दे
• मार्के टिंग
– काय आहे?
– शेतकरी उत्पादक कं पनीसाठी महत्त्व
• शेतकरी उत्पादक कं पनीसाठी मार्के टिंगचे घटक
– उत्पादन
– किं मत
– जाहिरात
– विपणन
• शेतकरी उत्पादक कं पनीसाठी मार्के टिंगचे धोरण
मार्के टिंग

• काय आहे?
– ग्राहकांच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि सेवांचे
नियोजन, मूल्य निर्धारण, प्रोत्साहन आणि वितरणाशी संबंधित क्रियाकलापांचा
एक संच.
• शेतकरी उत्पादक कं पनीसाठी महत्त्व
– शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणे.
– शेतकऱ्यांना बाजारपेठेतील स्पर्धेत स्पर्धा करण्यास मदत करणे.
– शेतकऱ्यांना नवीन संधी निर्माण करणे.
शेतकरी उत्पादक कं पनीसाठी मार्के टिंगचे घटक
• उत्पादन
– शेतीमालाची गुणवत्ता आणि पोषण मूल्य सुनिश्चित करणे.
– शेतीमालाला नवीन आकार, रूप, किं वा वापर देणे.
– शेतीमालाला नवीन बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार करणे.
• किं मत
– शेतीमालाला योग्य किं मत मिळवून देणे.
– शेतीमालाची किं मत स्पर्धात्मक ठेवणे.
– शेतीमालाची किं मत ग्राहकांच्या गरजा आणि बजेटमध्ये बसवणे.
• जाहिरात
– ग्राहकांना शेतीमालाच्या गुणवत्ता आणि फायद्यांबद्दल माहिती देणे.
– ग्राहकांना शेतीमालाची जाणीव करून देणे.
– ग्राहकांना शेतीमाल खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे.
• विपणन
– शेतीमाल ग्राहकांना पोहोचवण्याची प्रक्रिया.
– शेतीमालाची विक्री आणि वितरणाची व्यवस्था करणे.
– शेतीमाल ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून देणे.
शेतकरी उत्पादक कं पनीसाठी मार्के टिंगचे धोरण

• शेतकरी उत्पादक कं पन्यांनी त्यांच्या मार्के टिंग धोरणामध्ये खालील


बाबींचा समावेश के ला पाहिजे:
– कं पनीच्या उद्दिष्टे आणि लक्ष्य
– बाजारपेठेतील संधी आणि धोके
– कं पनीचे उत्पादन आणि सेवा
– कं पनीचे ग्राहक
– कं पनीचे विपणन संसाधने
• शेतकरी उत्पादक कं पन्यांनी त्यांच्या मार्के टिंग धोरणांचे नियमितपणे पुनरावलोकन के ले पाहिजे
जेणेकरून ते बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतील.

• शेतकरी उत्पादक कं पन्यांसाठी मार्के टिंगच्या काही टिपा

• शेतकरी उत्पादक कं पन्यांनी त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि पोषण मूल्य सुनिश्चित के ले
पाहिजे.
• शेतकरी उत्पादक कं पन्यांनी त्यांच्या उत्पादनाला नवीन आकार, रूप, किं वा वापर देऊन त्याची
वैशिष्ट्ये निर्माण के ली पाहिजेत.
• शेतकरी उत्पादक कं पन्यांनी त्यांच्या उत्पादनाची जाणीव करून देण्यासाठी आणि ग्राहकांना
त्याची विक्री करण्यासाठी प्रभावी जाहिरात आणि विपणन मोहिमांचा अवलंब के ला पाहिजे.
• शेतकरी उत्पादक कं पन्यांनी त्यांच्या उत्पादनाची विक्री आणि वितरणाची व्यवस्था करण्यासाठी
प्रभावी विपणन चॅनेलचा अवलंब के ला पाहिजे.

You might also like