You are on page 1of 20

पशस

ु ंवर्धन पायाभत

सवि
ु धा विकास

निधी

अंमलबजावणी मार्गदर्शक तत्वे

भारत सरकार

मत्स्यपालन पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय, मंत्रालय

पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय विभाग

अनु विषय पान क्र


क्र
१ प्रस्तावना १
२ कार्यक्षेत्र: १
३ उदिष्टे १
४ पात्र घटक २
५ अंमलबजवणी यंत्रणा २
६ लाभ घेण्यासठी पात्र उपक्रम २-३
७ कार्चाचे प्रमाण व मार्गीन मनी ३
८ व्याजदर अनुदान ४
९ पत हमी निधी ४
१० निधी यंत्रणा ५
११ कर्ज वितरण ५
१२ परतफेड ५-६
१३ जमीन उपलब्धता व वैधानिक मंजुऱ्या ६-७
१४ प्रकल्प साठी आवश्यक वैधानिक मंजरु ी मिळावी ७
१५ तपशीलवार प्रकल्प अहवाल ७-८
१६ प्रकल्प अहवाल सादर करणे ८
१७ प्रकल्पाचे मूल्यमापन व मंजुरी ९
१८ अंमलबजावणी यंत्रणा ९-११
१९ प्रकल्पाचे नियंत्रण दे खरे ख ११-१२
२० जनजागत
ृ ी निर्माण करणे १२-१३
२१ परिशिष्ट -१ वैधानिक मंजुरी यादी १४
२२ परिशिष्ट -२ अर्जचा नमन
ु ा १५-१६

अनुक्रमिका
शब्दसूची

संशिप्तनाव पूर्णनाव
AHIDF ANIMAL HUSABANDRY INFRATRAURE
DEVELOPMENT FUND/ पशुसंवर्धन पायाभूत
सुविधा विकास निधी

NABARD National bank for Agricultural and Rural


Development/
MSME Micro Small Medium Enterprises / सूक्ष्म, लघु व
मध्यम उद्योग

DPR Detailed Project Report/ संपर्ण


ू अहवाल
PSC Project sanctioning Committee / प्रकल्प मान्यता
समिती

PAC Project Approval Committee/ प्रकल्प मंजुरी समिती

NLM National Livestock Mission/ राष्ट्रीय गोकुळ


मिशन
PMA Project Management Agency / प्रकल्प
व्यवस्थ्पान यंत्रणा

IDF Indian Dairy Federation / भारतीय दध


ु उत्पादक
संघ

EPF Employees Provident Fund / कामगार भविष्य


निर्वाह निधी
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी मार्गदर्शक तत्वे

प्रस्तावना:

नुकतेच प्रधानमंत्री यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान प्रोत्साहन पॅकेजमध्ये पशुसंवर्धन विषयक
पायाभत
ू सवि
ु धाच्या विकासासाठी १५००० कोटी निधी रुपयाची घोषणा केली आहे , ज्यामळ
ु े वैयक्तिक
उधोजक, खासगी कंपन्या, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), शेतकरी उत्पादक संघटना आणि कलम ८
अंतर्गत येणाऱ्या कंपन्या यांना गुंतुणूकसाठी प्रोत्साहन मिळे ल.

२. कार्यक्षेत्र:

पुढील परिच्छे दांमध्ये तपशीलवार सांगितल्यानुसार पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी सर्व राज्यांमध्ये
आणि केंद्रशासित प्रदे शात लागू केला जाईल.

३. उदिष्टे :

1. दध
ू आणि मांस प्रक्रिया क्षमता आणि उत्पादन वाढविण्यात मदत करणे व तसेच
उत्पादित पदार्थचे विविधीकरण यामुळे असंघटित ग्रामीण क्षेत्रातील दध
ु व मांस उत्पादकांना संघटित
क्षेत्रातील दध
ू आणि मांस बाजारापेठ उपलब्ध होण्यासाठी मदत होईल.

2. उत्पादकाला वाढीव किमतीच्या मोबदल्याची जाणीव करून दे णे

3. स्थानिक ग्राहकासाठी दर्चेदार दध


ु व मांस उत्पादनाची उपलब्ध करून दे णे

4. दे शातील वाढत्या लोकसंख्याचे प्रथिन समध


ृ गुणवत्ताच्या अन्नाची आवशकता पूर्ण करणे व जगातील
सर्वात जास्त कुपोषित मुलाची संख्या असलेल्या दे शातील कुपोषण मुक्त करणे.

5. रोजगार व उदोजक निर्माण करणे


6. दध
ु व मांस निर्यात करुन, निर्यातीस चालना दे णे

7. में ढी, शेळी, वराह, कोंबड्या, गाय, मैस यांना संतुलित व किफायतशीर खाद्य उपलब्ध करून दे णे

1
४. एएचआयडीएफ (AHIDF) अंतर्गत पात्र घटक :
1) शेतकरी उत्पादक संघटना
2) खासगी कंपन्या

3) वैयतिक उधोजक
4) कलम ८ अंतर्गत येणाऱ्या कंपन्या

5) सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योग (MSME)

५. राबिवणारी यंत्रणा :

मत्स्यपालन पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय, मंत्रालयच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा निधी पशुसंवर्धन व
दग्ु धव्यवसाय विभागामार्फ त राबविली जाईल.

६. एएचआयडीएफ(AHIDF) अंतर्गत पात्र घटक यांना मिळणाऱ्या योजना खालील प्रमाणे:

६.१ दग्ु ध प्रक्रिया : पात्र घटक दग्ु ध प्रक्रियाच्या पायाभूत सुविधाच्या निर्मितीसाठी पुढील योजनाचा लाभ घेऊ
शकतात :

६.१.१ : नवीन युनिट स्थापना किवा विद्यमान दग्ु ध प्रक्रियांना युनिट चे बळकठीकरण तसेच दर्जेदार,
स्वच्छ आणि पॅकेजिंग ची सुविधा आणि दग्ु ध प्रक्रिया सबंधित सुविधा

६.२ मूल्यवर्धित दग्ु धजन्य पदार्थांचे उत्पादन:

नवीन युनिटची स्थापना वविद्यमान मजबुतीकरणासाठी खालील दग्ु ध उत्पादनांच्या मूल्यवर्धनासाठी


पात्र घटक कर्ज घेऊ शकते

६.२.१ आईस्क्रीम युनिट


६.२.२. चीज उत्पादन युनिट
६.२.३ अल्ट्रा उच्च तापमान (यए
ू चटी) दध
ू प्रक्रिया टे ट्रासहपॅकेजिंग सवि
ु धा
६.२.४ फ्लेवर्ड मिल्क युनिट
६.२.५ दध
ु ाची पावडर उत्पादन एकक
६.२.६ मट्ठा पावडर उत्पादन यनि
ु ट
६.२.७ इतर कोणतीही दग्ु ध उत्पादने व मूल्यवर्धित उत्पादन युनिट
६.३ मांस प्रक्रिया आणि सुविधांचे मूल्यवर्धनः
६.३.१ शहरी, अर्ध शहरी किं वा गावा मधील में ढी, शेळी, कोंबडी, वराह आणि मैंस यांच्या नवीन मांस
प्रक्रिया युनिट किं वा विद्यमान मांस प्रक्रिया युनिटचे बळकठीकरण करणे

2
६.३.२ मोठ्या प्रमाणात एकात्मिक मांस प्रक्रिया सुविधा/ घटकाची स्थापना

६.३.३ मूल्यवर्धित उत्पादने : सौसेज, नगेटस, हम, सलामी, बेकॅन व इतर मांस उत्पादने यांच्या
मल्
ू यवर्धित सवि
ु धाची नवीन स्थापना व उद्योगाला बळकटीकरण करणे. या सवि
ु धा मांस प्रक्रियेचा
एकत्रित भाग असू शकतो किवा स्वतंत्र मुल्यवर्धित उत्पादन करणारा युनिट असू शकतो.

६.३.४ वरील मांस प्रक्रिया उदोगाच्या प्रकल्पच्या किमतीमध्ये सांडपाणी प्रक्रिया यनि
ु ट/ मांस
सूक्ष्मजीवशास्त्र चाचणी प्रयोगशाळा, अवशेष चाचणी प्रयोगशाळा, मांस साठवणुकीसाठी शितग्रह,चर्म
प्रक्रिया व त्यांचे साठ्वूणूकक्षत्र तसेच गोठवले उत्पादने व मूल्यवर्धित याचे २४ तासासाठी शीतकरण
सवि
ु धाच यांचा समावेश बंधनकारक आहे .

६.४ पात्र घटक/ लाभधारक नवीन पशु खाद्य निर्मिती युनिट किवा विद्यमान घटकांमध्ये बळकटीकरणसाठी

खालील प्रमाणे लाभ घेऊ शकतात:

६.४.१ मिनी, मध्यम आणि मोठ्या अ‍ॅनिमल फीड प्लांटची स्थापना


६.४.२ एकूण मिश्र राशन ब्लॉक मेकिंग युनिट
६.४.३ बायपास प्रोटीन यनि
ु ट
६.४.४ खनिज मिश्रण युनिट
६.४.५ समद्ध
ृ सिलेज बनवण्याचे युनिट
६.४.५ पशु खाद्य चाचणी प्रयोगशाळा हि मध्यम व मोठ्या पशख
ु ाद्य निर्मिती यनि
ु ट सलग्न करणे
किवा गुणवत्तापूरक खाद्य निर्मतीसाठी नवीन खाद्य चाचणी प्रयोगशाळा स्थापना करणे.

७.० कर्ज रकम व लाभार्थी हिस्सा :


७.१ एएचआयडीएफ अंतर्गतएकूण अंदाजित प्रकल्प किमतीच्या ९०% कर्जासाठी लाभधारक हा अनुसूचित
बँकेकडून प्रकल्प अह्वाल सादर केल्यानंतर पात्र होऊ शकतो. सूक्ष्मलघु व मध्यम उद्योगासाठी
(MSME) लाभधारकाचे योगदान १०% , मध्यम उद्योगासाठी लाभधारकाचे योगदान १५% तर इतर
उद्योगासाठी लाभधारकाचे योगदान २५% असू शकते.

७.२ प्रकल्प राबिवताना नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अपरिहार्यता, एस ओ आर (SORs) मधील बद्दल आणि
इतर अपरिहार्य परीस्थितीमळ
ु े प्रकल्पाच्या किमतीमध्ये वाढ होण्याच्या शक्यता लक्षात घेऊन विशिष्ट
कालमर्यादे त परं तु मंजुरीच्या २ वर्षाच्या आत प्रकल्प रक्कम / कर्ज रक्कम वाढविण्याची बाब लक्षात
घ्यावी.

3
७.३ जमीन खरे दी खेळते भांडवल, जुनी यंत्र सामुग्री व वैयातिक वापरासठी चे वाहन यांच्या कर्जासाठी
व्याज सवलत सवि
ु धा उपरोक्त योजनेतन
ू उपलब्द नाही.

८.० व्याज सवलत व कर्ज व्याजदर

८.१ व्याज सवलत : सर्व पात्र घटक/ लाभादारक ३%

८.२ व्याज दर : पात्र घटकासाठी सूक्ष्म व लघु अंतर्गत प्रकल्प किमितीच्या कर्जाचा व्याजदर हा
अनुसूचित बँकेकडून ई बी ए ल आर (EBLR) २०० पांइट पेक्षा जास्त नसावा परं तु दस
ु र्या प्रकाल्प
साठी अनुसूचित बँकेकडून ठरविला जाणारा व्याज दर वाणिज्य दराने ठरविला जावा

८.३ पशस
ु ंवर्धन व दग्ु धव्यवसाय विभाग प्रत्येक्षरित्या व्याजदर सवलत अनस
ु चि
ू त बँकाकडे भरणा करे ल,
पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय विभाग सुरवातीला व्याजदर सवलत रक्कम अनुसूचित बँकाच्या
विनंतीनुसार पहिल्या वर्षी भरे ल, दस
ु ऱ्या वर्षापासून व्याजदर सवलत रक्कम हि कर्जादारच्या नो एन पी
ए हकानस
ु ार अनस
ु चि
ू त बँकेने नोदणी केल्यानंतर भरणा करण्यात येईल.

८.४ पात्र घटक किवा लाभधारक यांनी घेतलेल्या कर्जची परतफेड कोणत्याही कर्ज कालावधीत /
वर्षामध्ये केली नाही तर ते व्याज दर सवलत सुविधेस पात्र राहणर नाही.

९.० पत हमी निधी :

९.१. रुपये ७५० कोटी रुपयांचा पत हमी निधी ची स्थापना करण्यात यावी आणि सदरील निधी
व्यवस्थापन नाबार्ड करे ल.

९.१.१ पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय विभाग प्रत्यक आर्थिक वर्षच्या सुरवातीला दरवर्षी ७५ कोटी या
प्रमाणे १० वर्षासाठी पत हमी पैसे भरे ल.

९.१.२ सक्ष्
ू म, लघु व मध्यम (MSME) परिभाषित मर्यादा अंतर्गत येणाया व व्यवहार्य प्रकल्पांनाच पत
हमी लागू असेल. सदरील हमी ची व्याप्ती २५% पर्यंत पत सुविधेसाठी कर्जदारास लागू असेल

९.१.३ सूक्ष्म, लघु व मध्यम (MSME) उधोग मानदं ड अंतर्गत नसलेल्या लाभधारकांना पत हमी लागू
नसेल परं तु पात्र घटक व्याज दर सावलीतीस पात्र असतील

९.१.४ नाबार्डकडून व्यवस्थापण करण्यात येणाऱ्या पत हमी निधी बाबबतच्या मार्गदर्शक सूचना
वैशिष्ट्यासाहित स्वतंत्रपणे जारी केल्या जातील
4
१०. निधी वाटप

१०.१ अनुसूचित बँकांनी एएचआयडीएफ चा १५००० कोटी चा निधी वितरीत केली जातील सन २०२०-
२०२१ पासन

१०.२ पात्र घटकांना कर्ज उपलब्ध करून दे ण्यासठी स्वताकडील आर्थिक संसाधनाचा उपयोग करू शकते

११. कर्ज वाटप :

११.१ ३ वर्षच्या कालावधीत अनुसूचित बँकांनी एएचआयडीएफ (AHIDF) चा १५००० कोटी चा निधी
वितरीत केली जातील सन २०२०-२०२१ पासून

१२. परतफेड :

१२.१ जास्तीत जास्त परतफेड कालावधी : मूळ रकमेवर एकूण ८ वर्षे असेल त्यामध्ये २ वर्ष
अधिस्थगनचा काळ पकडून असेल.

१२.२ मूळ रकमेवर जास्तीत जास्त परतफेडचा काळ हे १० वर्ष पेक्षा जास्त नसावा त्या अंतर्गत २ वर्ष
हा अधिस्थगनचा काळ असावा हे अनस
ु चि
ू त बँकांनी खात्री केली पाहिजे.

१२.३ तथापि प्रकल्पाची व्याप्ती आर्थिक गंत


ु व
ु निकेचा आकार पात्र घटकाची कर्ज परतफेडी क्षमता
इत्यादी विचार करून बँक त्यांच्या स्वतच्या अधिकारात परतफेडीचा कालावधी कमी करू शकते

१२.४ पुढे एएचआयडीएफच्या (AHIDF)अधीन राहून आणि पत तरतुदींच्या अधीनपरतफेडीची प्रक्रिया,


दं डात्मक व्याज, सुरक्षा आणि मर्यादा यासारख्या संबंधित निर्णय अनुसूचित बँक ठरवेल.

१२.५ एएचआयडीएफ (AHIDF) तरतुदीनुसारअधीन राहून व आर बी आय च्या व्यापक मार्गदर्शक


सूचनानुसार अनुसूचित बँक निधी ची किमत कर्जच्या जोखीम नुसार कर्जदर ठरवेल.

१२.६ एएचआयडीएफ(AHIDF)अधीन राहून अनिसुचीत बँक मंजूर प्रकल्पच्या अतिरिक्त वाढीव कर्जचा
विचार करू शकेल.

१२.७ अनुसूचित बँकने कर्ज मंजुरी दिल्यापासून सहा महिनीच्या आत कर्ज उचल केली नसल्यास
प्रकल्प नॉन स्टार्टर म्हणून गणला जाईल तसेच बँकने दिलेल्या मंजुरीच्या दिनाकापासून १२ महिनीच्या

5
आत प्रकल्प ची सुरुवात न केल्यास प्रकलपाची मंजुरी रद्द होईल, हे व्यापक दृष्टीकोनातून/ मार्गदर्शक
सच
ू नानस
ु ार आहे परं तु कर्ज दे णारी बँक या बाबत अंतिम निर्णय घेईल.

१२.८ कर्ज दे णारी बँक पात्र घटकाच्या समस्या/ मर्यादा/ अडचणी/ यांचा विचार करून लाभधारकाकडून
बँकेचे नियम व अठीनुसार प्रकल्प मागे घेण्याचा / काडून घेण्याचा विचार करू शकते.

१२.९ पात्र लाभधारकाकडून मल


ु भत
ू रक्कम पर्ण
ू भरे पर्यंत अनस
ु चि
ू त बँक पढ
ु ील कर्ज वितरण
थांबवण्याचा आणि प्रकल्प पूर्व मंजुरी दे ण्यचा विचार करू शकते या बाबतीत कर्ज दे णारी संस्था /
भारत सरकार/पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय, मत्स्यपालन, मंत्रालय हे कुठल्याही प्रकारच्या तोठा ,
नक
ु सान आणि प्रकल्प पर्ण
ू होण्यासाठी लागणारा खर्च यास जबाबदार राहणार नाही.

१३.० जमीन व वैधानिक परवाना मंजुरी :

१३.१ या योजनेतुन जनीन खरे दी, हस्तांतरण, भाडेपटी, प्रवेश/जोड इत्यादीसाठी कोणत्याही प्रकारची कर्ज
सवि
ु धा उपलब्द नाही.

१३.२ एएचआयडीएफ(AHIDF) योजनेसाठी पात्र लाभादारक/घटक कडे स्वतची जमीन असणे आवश्यक
आहे नसल्यास स्वतः विकत घेऊन भस
ू ंपादनाची सर्व प्रक्रिया पर्ण
ू करून प्रकल्पसाठीचा वित्त प्रस्ताव
सादर करवा

१३.३ दीर्घ मुदतीच्या भाडे तत्वावर (कमीतकमी ३० वर्ष ) असेलेल्या जमिनीची या प्रक्लापासाठी येईल
परं तु या साठी भाडे करार कालवधी हा अर्ज घेण्यासाटी पुरेश्या मुदतीचा असणे आवश्यक आहे . या भाडे
करार चे नाहरकत प्रमाणपत्र संबधित सक्षम प्राधिकरणानकडून तारण म्हणून बँकेला दे ण्यात यावे

१३.४ पात्र घटकांना किवा लाभ धारकांना लगेचेच/ मुदतपूर्वी भाडे करार संपुष्टात आणता येणार नाही
तसेह सदरची जमीन व इतर कर्जातन
ू तयार करण्यात आलेल्या सवि
ु धा यांची विक्री करता येणार नाही,
परं तु अपरिहार्य परीस्तीतीमुळे लाभधारक संबंधित बँकेचे परवानगी घेऊन कर्जाची पूर्ण रक्कम, लागू
असलेल्या व्याज व मुदतपूर्व रक्कम भरण्यासाठी लागणारा दं ड , एकरकमी अनुसूचित बँकेकडे भरून
करार संपुष्टात अनु शकतो.

१३.५ जमीन उपलब्द बाबत आवश्यक कागदोपत्री पुरावा व वैधानिक मंजुरी यांची प्रकल्प अहवाल मध्ये
स्पष्टपणे दर्शविण्यात यावे, आवशयक असणाऱ्या परवानयाची यादी परीश्ष्ट -१ जोडण्यात आली आहे

१३.६ संबंधित जमीन हि अडथळे विरहीत व अतिक्रमण नसलेली असल्याबाबत प्रमाणपत्र पात्र घटकाने
दे णे आवश्यक आहे .
6
१४.० प्रकल्पासाठी वैधानिक मंजुरी मिळणे बाबत :

१४.१ प्रकल्प राबिविण्यासाठी आवश्यक असणारया मंजुऱ्या, जेव्हा परवानग्या जरुरी असतील तेव्हा घेणे
पात्र घटकासाठी आवश्यक आहे , त्यासठी येणारा सर्व खर्च लाभधारकांनी स्वतः करायचा आहे .

१४.२ आवश्यक परवानग्यांची /मंजरु ी मिळवण्यासाठी लाभधारकांना राज्यशासनाच्या विविध विभागाकडे


संपर्क साधावा लागेल, त्यामुळे लाभधारका समोर अनावश्यक अडथळ निर्माण होऊ शकतात म्हणून
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने एक खिडकी प्रणाली राबवन
ू त्या द्वारे विविध मंजुरी मिळवण्याची
प्रक्रिया सल
ु भ करणायत यावी. जेणे करून लाभधारक संबधित प्रकल्प बँक व विभागाला जलदरीतीने
सादर होऊ शकेल, आवश्यक असणाऱ्या परवान्याची यादी परिशिष्ट -१ मध्ये दे ण्यात आली आहे .

१५.० तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करणे ( डी.पी.आर )

१५.१ पात्र लाभ धारकांनी कर्जासाठी परिपूर्ण व्यवहार्य प्रकल्प आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव तयार
करावा.

१५.२ प्रत्येक अहवालामध्ये दग्ु ध, मांस ,पशुखाद्य व उत्पादनाची जाहिरात यासाठी गुणवंतापरू क
व्यवस्थापन असेलेले युनिट स्थापन करण्यसाठी सादर करण्यात यावा.

१५.३ प्रकल्प अहवालात भविष्यातील बाजारपेठेच्या निर्मिती, रोजगारसंधी कच्चा मालाची खरे दी व
प्रकल्प संबधित इतर माहिती.

१५.४ दध
ु प्रक्रिया , मांस प्रक्रिया , मुल्यवर्धन व पशुखाद्य युनिट स्थापनेसाठी चा परिपूर्ण प्रकल्प
अहवालामध्ये खालील पायाभूत बाबीचा विचार करण्यात यावा,

१.० योग्य जागेची निवड

२.० आवशयक अभियांत्रिक आणि सामाजिक आर्थिक तपासण्या आणि सर्वक्षण.

३.० सुविधाचे नियोजन व रचना

४.० आदर्श नमन्


ु याचा अभ्यास

7
१५.५ प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी राज्यशाषण पशुसंवर्धन विभाग /पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय,
मत्स्यपालन, मंत्रालय भारत सरकार/ तांत्रिक सालागार सेवा पुरवठादार यांची तात्रिक मदत पात्र घटक
यांनी घ्यावी गरज पडल्यास उद्यमी मित्र पोर्टल (Udyami Mitra Portal) सिडबी(Small Industries
Development Bank of India) यांचा सल्ला घेण्यात यावा.

१५.६ राज्यशाषण पशुसंवर्धन विभाग पात्र लाभाधाराकाला प्रकल्प अहवाल बनविण्यसाठी तसेच एक
खिडकी प्रणाली द्वारे आवश्यक मंजुऱ्या, मिळण्यासाठी मदत करे ल

१६. प्रकल्प अहवाल सादर करणे:

१६.१ पात्रघटक हा प्रकल्प सिडबी (Small Industries Development Bank of India) याने बनवलेल्या
उदोमी पोर्टल मार्फ त संपूर्ण प्रकल्प अहवाल (D.P.R) सादर करे ल.

१६.२ अनुसूचित बँक प्रकल्पाचा मुल्याकन व मंजुरीनंतर एएचआयडीएफ ला व्याजदर सावलीतीसाठी


ओंनलाईन पद्धतीने मंजरु ीसाठी पाठवतील,

१६.३ व्याजदर सावलीतीबाबत च्या अर्ज परिशिष्ट -२ प्रमाणे भरण्यात यावा

१७. प्रकल्प मूल्यमापन आणि मंजुरी:

१७.१ पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय, विभागाने (DAHD ) स्थापन केलेल्या प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा
(PMA) अर्जची छाननी मल्
ु याकन करून बँकेच्या व्याजदर सवलीतीसाठी एएचआयडीएफ च्या प्रकल्प
मंजुरी समिती (PAC) कडे सादर करे ल.

१७.२ प्रकल्प मंजुरी समिती (PAC) नियमित बैठक घेऊन त्यांच्याकडे रुपये ५० कोटी पर्यंतच्या सादर
करण्यात आलेल्या प्रस्तावाला व्याजदर सावलीतीसाठी मंजुरी दे तील.

१७.३ रुपये ५० कोटी वरील प्रकाल्पसाठी प्रकल्प मंजूर समिती (PAC) प्रकल्पाची छाननी मुल्याकन
करून प्रकल्प मान्यता समिती (PSC) कडे मंजुरीसाठी प्रस्तावित करतील.

१७.४ अनुसूचित बँकने कर्ज मंजूर केलेल्या बाबत चे पत्र प्रकल्प मंजुरी समिती (PAC)/ प्रकल्प मान्यता
समिती (PSC)यांना प्रकल्प च्या व्याजदर सावलीतीसाठी पाठवणे अगोदर सादर करावे.

१७.५ प्रकल्प मंजरु ी समिती (PAC)/ प्रकल्प मान्यता समिती (PSC) हे सक्ष्
ू म, लघु व मध्यम अंतर्गत
येणारा प्रत्येक प्रकल्प हा पत हमी साठी बँकेने कर्ज मंजुरी दिल्यानंतर प्रस्तावित करतील .

१७.६ सर्व प्रकारच्या समिती द्वारे मुल्याकन पात्राता निकषावर आधारित जसे पात्र घटक बँक मंजुरी,
भौगोलिक प्राधन्य, सूक्ष्म व लघु उदोग (MSME) प्रमाणपत्र, क्षेत्रीय प्राधान्य ,मागणी आणि आर्थिक
व्यव्हारता त्याच्या आधारावर करण्यात येईल.

अंमलबजवणी यंत्रणा:

१८.१ एएचआयडीएफ (AHIDF) अंमलबजवणीसाठी पशस


ु ंवर्धन व दग्ु धव्यवसाय, विभाग(DADF)यांनी
खालील विविध समित्याचे गठन केलेल आहे .

8
१८.२.१ प्रकल्प मान्यता समिती

१८.२.१ रचना :

१. सचिव पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय विभाग भारत सरकार – अध्यक्ष

२. नाबार्ड चे मुख्य महाव्यवस्थ्पाक पदापेक्षा कमी आसु नये

३. पशस
ु ंवर्धन व दग्ु धव्यवसाय, विभागा चे आर्थिक सलागार

४. वित्तीय सेवा विभागाचे प्रतिनिधी त्यांचे पद सहसचिव पेक्षा कमी नसले पाहिजे

५. अन्न प्रक्रिया मंत्रालायचे प्रतिनिधी त्यांचे पद सहसचिव पेक्षा कमी नसले पाहिजे

६. सहसचिव ( पशु व डेअरी विभाग ) पशस


ु ंवर्धन व दग्ु धव्यवसाय, विभागाने

७. सबंधित राज्याचे सचिव

८. सहभागी बँकाचे प्रतिनिधी ते उपव्यवस्थ्पाक किवा मुख्यमहाव्यवस्थ्पाक सहसचिव पेक्षा कमी


नसले पाहिजे.

९. सहसचिव राष्ट्रीय गोकुळ मिशन (NLM) सदस्य

१८.१.२ अटी व संदर्भ (TORs)

१. प्रकल्प मान्यता समिती योजनेची मार्गदर्शक तत्वे तयार करे ल

२. योजनेच्या उपक्रम बाबत काही गोष्टीमध्ये वाढ करणे किं वा वगळणे तसेच वार्षिक कृती आराखडा व
निधी काढण्याबाबत इत्यादी, निर्णय घेणे.

३. प्रकल्प मंजरु ी समितीच्या शिफारशीनंतर प्रकल्पाच्या व्याजदर सवलत प्रकल्प मान्यता समिती
व्याजदर सवलत मंजूर करे ल.

४.सरु ळीत अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या अधिकार सोपविणे.

५. वैयक्तिक उपक्रमच्या भौतिक आणि आर्थिक लक्ष्य सध


ु ारित करणे आणि तसेचयनि
ु ट किं मत
दरु
ु स्ती करणे.

६. प्रकल्प मान्यता समिती (PSC) मध्ये पशस


ु ंवर्धन क्षेत्रातील बाह्य तज्ञांची निवड करणे

७. जेव्हा गरज असेल तेव्हा बैठक आयोजित करणे.

१८.३ प्रकल्प मंजुरी समिती (PAC):


१८.३.१ रचना:

9
१. सहसचिव राष्ट्रीय गोकुळ अभियान (NLM) - अध्यक्ष
२. नाबार्डचे प्रतिनिधी
३. पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय, विभागा चे आर्थिक सालागार
४. वित्तीय सेवा विभागाचे प्रतिनिधी
५. अन्न प्रक्रिया मंत्रालायचे प्रतिनिधी
६. संबधित बँकाचे प्रतिनिधी

७. डेअरी विभागचे प्रतिनिधी पशुसंवर्धन

८. सबंधित राज्याचे प्रतिनिधी (ज्याचे पद संचालक पेक्षा कमी असू नये)

९. सहआयुक्त/ उप आयुक्त/ संचालक राष्ट्रीय गोकुळ मिशन (NLM) चे संयोजक

अटी व संदर्भ (TORs)

1. प्रकल्प मंजुरी समिती (PAC) योजनेची मार्गदर्शक तत्त्वे तयार करे ल आणि ते प्रकल्प मान्यता
समिती (PSC) कडे मंजुरीसाठी पाठवेल.

2. प्रकल्प मंजरु ी समिती (PAC) योजनेच्या ५० कोटी रक्कम च्या पर्यंतच्या प्रकल्प साठी व्याजदर
सवलत मंजरू करे ल

3. प्रकल्प मंजुरी समिती (PAC) योजनेच्या ५० कोटी रक्कम वरील प्रकल्प साठी व्याजदर
सवलीतीसाठी प्रकल्प मंजुरी समिती (PAC) हे प्रकल्प मान्यता समिती कडे मंजुरीसाठी पाठवेल.

4. समितीची बैठक दरमहा किं वा त्यापर्वी


ू दे खील घेण्यात येईलहे प्रस्ताव अवलंबून राहील.

१९. प्रकल्प नियंत्रण कक्ष:

१९.१ पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय विभाग प्रकल्प व्यवस्थ्पान यंत्रणेचे ओउठ सोर्सिंग करे ल

१९.२. ऑउठ सोर्सिंग एजेन्सी अटी व शर्ती खालील प्रमाणे

१. प्रकल्प व्यवस्थ्पान यंत्रणेचे सर्व प्रकारच्या बाबीच्या मनष्ु यबालसाहित मख


ु ालायी पर्त
ू ता
करे ल, ज्यामुळे दे खरे ख, गंभीर समस्यचा शोध मंद प्रगतीचा प्रकल्प, नॉन स्तार्तर, प्रकल्प ,
भोगौलिक व क्षत्रीय प्राधान्य, प्रकल्पनिहाय प्रगती आढावा अहवाल व फलनिश्पती इ. बाबीचा
आढावा घेईल. दे खरे ख करणच्या पद्धतीची रचना प्रकल्प मंजरू समिती कडून मंजरू केली जाईल.

10
२. प्रकल्प व्यवस्थ्पान यात्रांना उद्यमी मित्र पोर्टल कामकाजाच्या वर दे खरे ख ठे वेल जसे प्राप्त
अर्ज, प्रक्रिया केलेल्या व बँककडे प्रलंबित असेलल्या अर्ज यम आई एस प्रणाली डाश बोर्ड चा
विकास, राज्याकडे प्रकल्प प्रस्तावसाठी पाठपरु ावा एएचआयडीएफसंबंधी लाभार्थ्याचे प्रश्नाची
उतरे दे णे, प्रस्तावाची माहिती एकत्रित गोळा करणे, बँकांशी सवांद साधने ई. प्रकल्प व्यवस्थ्पान
यंत्रणाचे प्रकल्पाचे मल्
ु याकन करून प्रकल्प मान्यता समिती व प्रकल्प मंजरु ी समिती कडे
पाठवणे.

३ प्रकल्प व्यवस्थ्पान यंत्रणाचे प्रकल्पाचे नियत्रण व मुल्याकनसाठी तसेच प्रकल्प अहवाल


बनविण्यासाठी सर्व प्रकारची मदत प्रकल्प मान्यता समिती व प्रकल्प मंजुरी समिती करे ल.

१९.३ प्रकल्प मान्यता समिती व प्रकल्प मंजरु ी समिती तसेच प्रकल्प व्यवस्थ्पान यंत्रणा
एकत्रितरित्या प्रकल्प नियत्रणाचे काम खालील प्रमाणे पाहतील.

१. प्रकल्प मान्यता समिती हे पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय विभाग मधील प्रकल्पाचे पर्वो
ुं लोकन
व नियत्रण करतील. प्रकल्प मान्यता समिती ची त्रिमासिक नियंत्रण सभा घेऊन त्यामध्ये
प्रकल्प चे प्रगती व पुंर्वोलोकन करण्यात येईल.

२.प्रकल्प व्यवस्थ्पान यंत्रणा पात्र लाभाधार्क डून प्रकल्पाचा प्रगीतीची मागिनी करून त्रामैसिक
आधारावर गोलाकारून भौमिक व आर्थिक यश/ प्रगती प्रकल्प मान्यता समिती समोर ठे वेल.

३.प्रकल्पाच्या अंमलबजवणी मध्ये तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे आवश्यक असल्यास


प्रकल्प मान्यता समिती प्रकल्पनिहाय मध्यावार्धी दरु स्ती करे ल, ज्यामध्ये प्रकल्पाच्या आवाका/
व्याप्ती कमी जास्त करणे प्रकल्पाची फेररचना करणे , तसेच मंजूर प्रकल्पा खर्चामध्ये एका
वस्तूपासून दस
ु र्या वास्तूमध्ये निधीचे पुनार्गामान करणे.

४.जर पात्रघटक बँककडून कर्ज वितरीत करण्यास अयशस्वी झाला तर सदर प्रकल्प नॉन
स्टार्टर मानन
ू समजला

१९ जनजागत
ृ ी:

२०.१ सदरील योजनेच्या अनेक भागधारक लाभ घेऊ शकतात, सादर भागधारकाना योजनेची
पुरेशी माहिती दे णे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना निधी उपलब्ध होईल व योजनेत भाग घेता
येईल. यासाठी केद्र्शाषण इलेक्ट्रॉनिकस प्रिंट व सोशल मिडिया चा जनजागत
ृ ीसाठी वापर करे ल.

२०.२ सदर योजनेच्या जनजागत


ृ ीसाठी स्टे क होल्डर्स ’जसे इंडियन डेअरी फेडरे शन (IDF),
कंपाऊंड पशुधनखाद्य उत्पादक संघटना (CLFMA), अखिल भारतीय पशुधन आणि मांस

11
निर्यातक ’असोसिएशन, राज्य सरकारची पशुधन कॉर्पोरे शन,] असोचॅम आणि इतर जागरूकता
तयार करण्यात सामील होतील.

२०.३ राज्य सरकार जनजागत


ृ ी करण्यासाठी सभा, कार्यशाळा, व्यवसाय मेळावे व चर्चासत्र
तसेच इलेक्ट्रॉनिकस प्रिंट व सोशल मिडिया माधाय्मचा वापर करे ल. या साठी राज्यसरकार व
इतरांना अर्थपुरवठा निधी करण्यात येईल.

**********

12
परिशिष्ट -१

वैधानिक मंजुरीची सूचक यादी

अनु वैधानिक मंजुरी


क्र
१ स्थानिक प्राधिकरण मजुरी राज्यशाषण नियमानुसार

२ जमीन मालकाचे जमीन भाडेतत्वावर दिल्यानंतर नाहरकत प्रमाणपत्र


३ प्रदष
ू ण नियत्रण मंडळाकडून प्रकल्प अस्थापना आणि संचालन करण्यासठी
परवानगी घेणे
४ व्यापार परवाने
५ भारतीय खाद्य आणि मानक प्राधिकरण
६ जल आणि हवा कायदे
७ राज्य विद्यत मंडळ
८ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (केवळ सूक्ष्म,लघु व मध्यम कंपनीसाठी
९ कंपनी कायदा अंतर्गत (फक्त कंपनीसाठी
१० कामगार कायदा / ई पी एफ (EPF)
११ इतर काही वैधानिक मंजर्या
ु जे संबंधित राज्य दग्ु ध, मांस, प्रक्रिया व पशुखाद्य
युनिट स्थापन करयाला लागेल.

13
परिशिष्ट -२

भारत सरकार
मत्स्यपालन पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय, मंत्रालय
पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय विभाग
----------------------------------------------------------------------------------------------------
ऑनलाईन अर्ज
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या व्याजदर सवलतीसाठी

फोटो

सही

अनु क्र
१ पायाभूत सुविधा
1. दग्ु ध प्रक्रिया
ब. मांस प्रक्रिया
क. पशख
ु ाद्य यनि
ु ट
ड. मूल्यवर्धन
२ पात्र घटक
1. शेतकरी उत्पातक संघटना
2. कलम ८ कंपन्या
3. वैयातिक उदोजक
4. खासगी कंपनी
5. सूक्ष्म,लघु मध्यम उधोजक

14
३ पत्ता
1. प्रस्थावित प्रकल्पाचे स्थान जिओ
(जिओसह)टॅ गिग
ं आणि स्थान नकाशा
आणि जागाचा फोटो
2. कॉर्पोरे ट कार्यालयाचे स्थान
3. वैयातिक पता
४ कंपनीची एकूण आर्थिक उलाढाल (शेवटचेतीन
वर्षांची ताळे बंद प्रदान करा)

५ सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग अंतर्गत येणाऱ्या


प्रमाणपत्र सदर करणे
६ पॅन / टीआयएन / आधार क्रमांक
७ दरू ध्वनी क्रमांक / मोबाइल क्रमांक

८ ईमेल पत्ता
९ कर्ज दे णाऱ्या बँकचे माहित
1. बँक नाव
2. बँक शाखा
3. पत्ता
4. शाखा प्रबंधक चा ईमेल पत्ता
5. दरू ध्वनी क्रमांक
6. आयएफएससी कोड
१० बँक खात्यांचा तपशील
1. बँकेचे नाव
2. बँक शाखा
3. पत्ता
4. कर्ज खाते क्रमांक
5. दरू ध्वनी क्रमांक
6. आयएफएससी कोड
११ प्रकल्प अहवाल तपशील

(अर्जदाराची सही)

कृपया खालील कागद पत्रे सोबत जोडा

1. प्रकल्पाचा पूर्ण अहवाल त्यामध्ये घटक निहाय किमती, एकूण किमती, आवर्ती किमत , निवळ समवेश
उत्पन आणि प्रकल्पाची व्यवहारता.
2. आधारभूत कागदपत्रे [पत्त्याचा परु ावा, पॅन / टीआयएन / आधार कार्डची प्रत, एमएसएमईप्रमाणपत्र (लागू
असल्यास), जमीन धारकाचा परु ावा(मालकी किं वा लीज, रूपांतरण),शैक्षणिक प्रमाणपत्र, प्रशिक्षण,

15
प्रमाणपत्राची छायाप्रत, उत्पन्नाचा पुरावा, बँक विवरणपत्र, प्रकल्पासाठी संबंधित मागील सहा
महिन्यांपासून
3. प्रकल्पाचा हवाला
4. मशीनरी आणि उपकरणांची यादी.
5. लय ओउट प्लान (सिव्हिल आणि मशीनरी दोन्ही) नोंदणीकृत आर्कि टे क्ट कडून
6. सर्व प्रशासकीय मंजुरी जसे स्थानिक प्रशासन कडील परवानग्या, व्यापार परवानेआस्थापनाची संमती,
राज्य प्रदष
ू ण नियंत्रण मंडळाकडून कार्य करण्यास संमती,प्रकल्पासाठी एफएसएसएएआय परवाना
आवश्यक आहे
7. उत्पादनाच्या गुणवत्तेच्या व्यवस्थापनाची खात्री करण्यासाठी रोडमॅप, उत्पादनाची जाहिरात आणिबाजार
विकाससाठी

16
भारत सरकार

मत्स्यपालन पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय, मंत्रालय

पशुसंवर्धन व दग्ु धव्यवसाय विभाग

17

You might also like