You are on page 1of 3

बांबू हे के वळ गवत किं वा वृक्ष नसून गरीब, 

शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयंरोजगार देणारे महत्त्वपूर्ण साधन आहे. अनेक शेती
व उद्योगपूरक वस्तूनिर्मितीसाठी तसेच ग्रामीण भारताच्या आर्थिक उत्थानासाठी बांबू हा महत्त्वाचा घटक आहे. बांबू लागवड
अत्यंत कमी खर्चिक आहे. बांबूचा विस्तार झपाट्याने होतो व इतर गवतांच्या तुलनेत त्याला कमी पाणी लागते . बांबूमुळे
जमिनीची धूप थांबते व गुरांसाठी चारा उपलब्ध होतो. शेतजमीन, जंगल तसेच पहाडी प्रदेश कोठेही बांबू लागवड होते.
पर्यावरणरक्षणासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या बांबूपासून टोपली, फर्निचर, वस्त्र, दाग-दागिने, राखी यांसह अनेक वस्तू तयार
होतात. जीवनाच्या आरंभापासून तर थेट अंत्ययात्रेपर्यंत बांबू माणसाला उपयुक्त असणारी वस्तू असल्याने बांबू आधारित
कौशल्य विकासाला चालना देणे गरजेचे आहे.

B-ASC द्वारे चालवण्यात येणारे उपक्रम

1. कौशल्य विकास प्रशिक्षण

ब. बांबू आधारित उत्पादनाचा विकास आणि उत्पादन

1. बांबू फर्निचर
2. बांबू हस्तकला
3. बांबूचे दागिने
4. बांबू टेंट आणि ग्रीनहाउस
5. बांबूच्या घरघुती वस्तू
क. रोजगार निर्मिती
ड. उत्पादनांची जाहिरात आणि विक्री
6.
1. मानवेल
शास्त्रीय नाव: Dendrocalamus strictus (डेन्ड्रोक्येल्यामस स्ट्रीकटस् )   
फु लण्याचा कालावधी: ३०-३५ वर्षे 
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-५० फू ट 
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच
उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला,  फर्निचर,  BIO-CNG,  plyboard, खाण्यासाठी कोंब, चारा,
शेतीसाठी काठ्या
2. माणगा , मेस
शास्त्रीय नाव: Dendrocalamus stocksii (डेन्ड्रोक्येल्यामस स्टोक्सी )   
फु लण्याचा कालावधी: ठराविक असा नाही. 
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-४० फू ट 
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच
उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला,  फर्निचर,  खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या 
3. कटांग, काष्टी, काटे कळक, काटोबां   
शास्त्रीय नाव: Bambusa bambos ( बांबूसा बांबोस )   
फु लण्याचा कालावधी: ३५-५० वर्षे 
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ६०-८० फू ट 
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ५-६ इंच
उपयोग: बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG,  plyboard, खाण्यासाठी कोंब,
औषधी पाने, चारा.
4. भालुका, बराक, बाल्कू , भीमा  
शास्त्रीय नाव: Bambusa balcooa ( बांबूसा बाल्कू वा )   
फु लण्याचा कालावधी: ३५-४५ वर्षे 
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ३५-५० फू ट 
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ३-५ इंच
उपयोग:  बांधकाम, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG

बांबूचा वापर खालील क्षेत्रांमध्ये होतो

1. शेतीसाठी फायदा
2. एक प्राचीन औषध
3. गृहनिर्माण
4. बांबू राईस
5. बांबू भाजी
6. बांबूपासून कापड निर्मिती
7. ऑक्सिजनसाठी ढाल
8. धूप नियंत्रण
9. एक नूतनीकरण करण्यायोग्य संसाधन
10. लँडस्के प डिझाइन एलिमेंट
11. कचरा व पाणी नियोजन प्रणालीत वापर

You might also like