You are on page 1of 10

महसुली पुस्तक परिपत्रक क्रमांक 25

महसूल पुस्तक परिपत्रक क्र.25


 
विषय - अपिल,पुनरीक्षण व पुनर्विलोकन
 
एक - अधिनियमांचे उपबंध
 
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 च्या प्रकरण 13 मध्ये (कलम 246 ते 259)
अपिल,पुनरिक्षण (रिव्हिजन) व पुनर्विलोकन (रिव्हयू)यासंबंधी विचार करण्यात आला आहे.प्रकरण
15 अन्वये महाराष्ट्र महसूल
न्यायधिकरणापूढे असलेल्या कामकाजास हे उपबंध लागू हेाणार नाहीत.
(कलम 146)

 
2.अपिले.-
महसूल अधिकाऱ्याने किंवा भूमापन अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाविरुध्द
करावयाची अपीले साधारणत: अशा अधिकाऱ्यांच्या निकट वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करण्यात येतात.
अधिनियमाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट के लेले अपील प्राधिकारी खाली दिलेल्या
तक्त्यामध्ये दर्शविले आहे. तक्त्या तील  स्थंभ 1 मधील अधिकाऱ्याने दिलेल्या एखाद्या
निर्णयाविरुध्द किंवा आदेशाविरुध्द तक्त्यातील स्तंभ 2 मध्ये दर्शविेलेल्या अधिकाऱ्याकडे अपील
करता येते. मग असा निर्णय किंवा आदेश स्तंभ 1 मध्ये विनिर्देश के लेल्या अधिकाऱ्याच्या
निर्णयाविरुध्द किंवा
आदेशाविरुध्द के लेल्या अपिलात दिलेला असो किंवा नसो. तथापि,कोणत्याही
परिस्थितीत अपिलांची संख्या दोन पेक्षा अधिक असू नये :-
 
                                            तक्ता

  महसूल अधिकारी                                     अपील प्राधिकारी
  (1) (2)

1. उप- विभागीय अधिकाऱ्याला दुय्यम असणारे उप- उप-विभागीय अधिकारी किंवा


विभागातील सर्व अधिकारी. जिल्हाधिकारी या बाबतीत
विनिर्दिष्ट करील असा सहायक
उप-विभागीय अधिकारी सहायक किंवा उप-
किवा उप- जिल्हाधिकारी 
जिल्हाधिकारी
2. उप-विभागीय अधिकारी, सहायक किंवा उप - जिल्हाधिकारी किंवा राज्य शासन
जिल्हाधिकारी या बाबतीत ज्याला
जिल्हाधिकाऱ्याच्या शक्ती निहित
करील असा सहायक किंवा उप-
जिल्हाधिकारी

3. जिल्हाधिकारी (मुंबईचा जिल्हाधिकारी नव्हे) किंवा विभागीय आयुक्त


ज्याला जिल्हाधिकाऱ्याच्या अपीलविषयक शक्ती
निहित करण्यात आल्या आहेत असा सहायक/उप-
जिल्हाधिकारी

4. कलम 15 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा राज्य शासन या बाबतीत विनिर्दिष्ट
वापर करणारी व्यक्ती. करील असा अधिकारी

  भूमापन अधिकारी अपील अधिकारी

1. जिल्हा निरीक्षक,भुमि अभिलेख,भूमापन तहसीलदार अधीक्षक, भूमि अभिलेख किंवा


आणि जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख याच्या राज्य शासन त्याबाबतीत विनिर्दिष्ट
दर्जापेक्षा उच्च दर्जाचे नसतील असे इतर अधिकारी करील असे त्याच दर्जाचे अधिकारी
 

2. अधिक्षक,भूमि अभिलेख व समान दर्जाचे इतर संचालक, भूमि अभिलेख किवा


अधिकारी राज्य शासन या बाबतीत ज्याला
संचालक, भूमि अभिलेख यांच्या
शक्ती निहित करील असा उप-
संचालक,भूमि अभिलेख.
3. जमाबंदी आधिकारी जमाबंदी आयुक्त
 
 
 

 
पदोन्नती  मिळाल्यामुळे किंवा पदनामात बदल झाल्यामूळेएखाद्या निर्णयाविरुध्द किंवा
आदेशानविरुध्द के लेले अपील तो निर्णय किंवा आदेश ज्या अधिकाऱ्याने दिला असेल त्याच
अधिकाऱ्याकडे होत असेल तर असे अपील त्यावर निर्णय घेण्यास सक्षम असलेल्या अन्य
अधिकाऱ्याकडेकरण्यात यावे. यासाठी, अधिनियमाचे कलम 226 अन्वये अशा सक्षम
अधिकाऱ्याकडेते प्रकरण हस्तांतरीत करण्यात यावे (कलम 247)
 
       3.(1)विभागाचे आयुक्त (2)जमाबंदी  आयुक्त (3) संचालक, भूमि अभिलेख किंवा ज्याच्याकडे
संचालक,भूमि अभिलेख यांच्या शक्ती निहित करण्यात आल्या आहेत. असा उपजिल्हाधिकारी  भूमि
अभिलेख (4)मुंबइचा जिल्हाधिकारी  किंवा त्याला दुय्यम असलेला व ज्याच्याकडे
जिल्हाधिकाऱ्याच्या अपीलीय शक्ती  निहित के लेल्या आहेत असा एखादा सहाय्यक किंवा
उपजिल्हाधिकारी .- समासात निर्देशिलेल्या अधिकाऱ्यांनी  दिलेल्या कोणत्याही  निर्णयाविरुध्द किंवा
आदेशाविरुध्द राज्य सरकारकडे अपील करता येईल. मात्र अशा अधिकाऱ्याच्या हाताखालील
कोणत्याही  अधिकाऱ्याकडेअपील होऊन त्या अपिलात झालेला जो निर्णय किंवा आदेश यावर अशा
अधिकाऱ्याने कोणताही निर्णय किंवा आदेश दिला असल्यास तो अपवाद ठरेल. दुसऱ्या शब्दात
सांगावयाचे झाल्यास, राज्य शासनाकडे करावयाचे अपील समासात निर्देशलेल्या अधिकाऱ्यानी 
दिलेल्या खालील निर्णयाविरुध्द किंवा आदेशान विरुध्दच करता येईल :-
 
(1)              
मूळ निर्णय किंवा आदेश , आणि

 
(2)              
पहिल्या  अपिलावर घेतलेला निर्णय  किंवा दिलेला आदेश (कलम 248)

    
4. पुनर्विलोकन
करताना देण्यात आलेला आदेश हा,जणू काही तो मूळ निर्णय किंवा आदेश
असल्याप्रमाणे अपीलयोग्य असेल. परंतू ,पुनरीक्षण करताना देण्यात आलेला आदेश हा जणू काही
तो अपिलात दिलेला आदेश असल्याप्रमाणे अपील योग्य असेल (कलम 249)
 
5. ज्या कालावधीमध्ये अपील किंवा पुनरीक्षणासाठी अर्ज करावयाचा असतो असा कालावधी
कलम 250,251 व 253  मध्ये विनिर्दिष्ट के ला आहे. ज्याविरुध्द अपील करण्यात आले आहे असा
आदेश जिल्हाधिकारी  किंवा,अधीक्षक,भूमि अभिलेख यांच्या दर्जापेक्षा कमी  दर्जाच्या अधिकाऱ्याने
दिला असल्यास 60 दिवस व इतर कोणत्याही प्रकरणात 90 दिवस अशी  ही मुदत असते.
ज्याच्याविरुध्द अपील करण्यात आले आहे असा निर्णय किंवा आदेश अर्जदाराला मिळाल्याच्या
दिआंकापासून ही  कालमर्यादा मोजावयाच असते. निर्णयाची  किंवा आदेशाची प्रत मिळण्यासाठी 
लागलेला कालावधी  वगळावयाचा असतो. या कालावधीचा अखेरचा दिवस रविवार किंवा राज्य
सरकारो मायता दिलेल्या इतर कोणत्याही सुट् ‌टीच्या दिवशी    येत असल्यास त्यानंतरचा कामाचा
दिवस हा उक्त कालावधीचा अखेरचा दिवस समजण्यात यावा. अशा मुदतीत अपील किंवा अर्ज  न
पाठवण्यास पुरेसे  कारण होते या संबंधी  अर्जदाराने अपील प्रधिकाऱ्याची  खात्री  पटवून दिल्यास
उक्त कालमर्यादेनंतरही अपील किंवा पुनरीक्षणाकरीता अर्ज पाठविता येईल.
 
6. खाली  दिलेले अपील योग्य नाहीत :-

 
(1)              
अपील किंवा पुनविर्लोकनाकरिता के लेला अर्ज दाखल करुन घेण्यासंबंधीचा
आदेश,
(2)              
पुनरिक्षणाकरीता किंवा पुनविर्लोकणाकरीता करण्यात आलेला एखादा अर्ज
फे टाळून लावण्यासंबंधीचा आदेश,
(3)                           
तहकु बीकरीता (स्टेकरिता) करण्यात आलेला अर्ज मंजूर करणारा किंवा
नाकारणारा आदेश (कलम 252)
 
7. अपिलाबरोबर किंवा पुनरिक्षणाकरीता किंवा पुनविर्लोकनाकरिता करण्यात आलेल्या
प्रत्येक अर्जाबरोबर ज्या आदेशावर आक्षेप घेण्यात आला असेल त्या आदेशाची  एक प्रत प्रमाणित
असली पाहिजे (कलम 254)
 
8. अपील प्राधिकाऱ्याला पक्षकाराची  बाजू ऐकू न घेतल्यानंतर अपील स्वीकारण्याची  किंवा
संक्षिप्तरीत्या फे टाळून लावण्याची  शक्ती आहे.अपील स्वीकारलेजाते तेव्हा,अपील प्राधिकाऱ्याने
सुनावणीची तारीख निश्चत करुन  त्याची नोटीस प्रतीवादी ला द्यावयाची असते. पक्षकाराचे म्हणने
एैकू न घेतल्यानंतर व कारणे लेखी नमूद के ल्यानंतर , ज्यविरुध्द अपील करण्यात आले आहे त्या
आदेशाचे विलोपन करु शकतो, तो आदेश पक्का  करु शकतो किंवा फिरवू शकतो  किंवा आणखी
तपास करण्यासंबंधीचा निदेश देऊ  शकतो,किंवा आवश्यक त्या निदेशांसह ते प्रकरण निकालात
काढण्याकरीता परत पाठवू शकतो (कलम 255)
 
9. मूळ आदेश देणारा महसूल किंवा भू-मापन अधिकारी  अपील प्राधिकारी , किंवा पुनरीक्षण
किंवा पुनविर्लोकन यासंबंधीच्या शक्तींचा वापर करणारा प्राधिकारी  कलम 256 मध्ये उपबंधीत
के ल्याप्रमाणे आदेशाची  अंमलबजावणी तहकू ब करण्यासंबंधीचे निदेश देऊ  शकतो.
 
10. पुनरीक्षण :- पुनरीक्षणासंबंधीचे उपबंध अधिनियमाच्या कलम 257 मध्ये अंतर्भूत
करण्यात आले आहेत. राज्य शासन आयुक्त, जमाबंदी आयुक्त व संचालक,भूमि अभिलेख
जिल्हाधिकारी,उप-संचालक ,भूमिअभिलेख ,सहाय्यक किंवा उप-जिल्हाधिकारी  या शक्तीचा वापर
रीतसर चौकशी सोडून इतर प्रकरणामध्ये करु शकतात. अधीक्षक,भूमि अभिलेख यांना
पुनरीक्षणाच्या पूर्ण शक्ती आहेत. तथापि, त्यांना रीतसर चौकशींचा अभिलेख मागवून आवश्यक ते
आदेश देण्याकरीता आपल्या मतांसह ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविता येईल. जेथे सर्वसाधारण
चौकशी  करण्यात आली असेल अशाच बाबतीत तहसीलदार,नायब तहसीलदार व जिल्हा
निरीक्षक,भूमि अभिलेख याला पुनरीक्षणाच्या शर्तीचा वापर करता येतो. राज्य शासन किंवा
पुनरिक्षणाच्या शक्ती  असलेल्या अधिकाऱ्याने हितसंबंधीत पक्षकारांना हजर राहण्याची  नोटीस 
दिल्याशिवाय आणि आशा आदेशाच्या पूष्टयर्थ आपले म्हणने ऐकवण्याची  संधी  दिल्याशिवाय दोन
खासगी व्यक्तीमंधील हक्कासंबंधीच्या एखाद्या प्रशांशी संबंधित असलेल्या आदेशामध्ये बदल करु
नये किंवा तो फिरवू नये.
 
11. पुनविर्लोकन - राज्य शासनाला,आयुक्ताला व जमाबंदी आयुक्ताला  तसेच संचालक ,
भूमि अभिलेख याना स्वत: किंवा त्यांच्या पूर्वाधिकाऱ्याने,स्वत:होऊन किंवा एखाद्या हितसंबंधीत
व्यक्तीचा अर्ज आल्यामूळे , दिलेल्या एखाद्या आदेशाचे पुनविर्लोकन करण्यासंबंधीच्या पूर्ण शक्ती
आहेत. जिल्हाधिकारी किंवा जमाबंदी आधिकारी त्यांच्या स्वत:च्या आदेशाचे पुनविर्लोकन करु
शकतो. परंतू त्याच्या पूर्वाधिकाऱ्याने आदेश दिला असेल व अशा आदेशाचे हस्तदोषाव्यतिरिक्त इतर
कारणांसाठी  पुनविर्लोकन करावयाचे असेल तर त्यांना यथास्थिती  विभागीय आयुक्तांची  अथवा
जमाबंदी आयुक्तांची मंजूरी घ्यावी लागते. एखदा महसूल किंवा भू-मापन अधिकारी त्या जिल्हयातून
गेलेला असल्यास व त्याला उत्तराधीकारी नसल्यास,जिल्हाधिकारी हा त्याच्या कार्यालयाचा
उत्तराधिकारी  असल्याचे मानन्यात येईल. जिल्हाधिकारी  किंवा जमाबंदी आधिकारी  याच्यापेक्षा
कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या निकट वरिष्ठाच्या मंजुरीने त्यांच्या स्वत:च्या किंवा त्यांच्या
पूर्वाधिकाऱ्याच्या आदेशाचे , हस्तदोषाव्यतिरिक्त इतर कारणासाठी पुनविर्लोकन करता येते. संबंधित
व्यक्तीने अर्ज के ला असेल त्या खेरीजवरुन, खाजगी व्यक्तीमधील अधिकाराच्या कोणत्याही
प्रशासनाला बाधक होणाऱ्या आदेशाचे पुनविर्लोकन करण्यात येणार नाही. असा अर्ज सादर
करण्याचा मर्यादित कालावधी 90 दिवस इतका आहे.
 
12. फक्त पुढील कारणांसाठीच आदेशाचे पुनविर्लोकन करण्यात येईल :-

 
(एक) नवीन आणि महत्वाची बाब किंवा पुरावा यांचा आढळ,
 
(दोन) अभिलेख वरुन सकृ तदर्शनी दिसणारी एखादी चूक किंवा दोष,किंवा

 
       (तीन) इतर कोणतेही पुरेसे कारण,

 
13. अपीलामध्ये किंवा पुनरीक्षणामध्ये ज्याचा विचार करण्यात आला आहे,अशा आदेशाचे
पुनविर्लोकन अपील किंवा पुनरीक्षण प्राधिकाऱ्याला दुय्यम असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून के ले
जाता कामा नये. पुनविर्लोकन करुन काढलेल्या आदेशाचे कोणत्याही सबबीवर पुनविर्लोकन करण्यात
येणार नाही.
 
14. अधिनियमाच्या काही  उपबंधान्वये असे उपबंधित के ले आहे की, त्या खाली  दिलेला निर्णय
किंवा आदेश अंतिम किंवा निर्णायक राहील. याचा अर्थ असा होतो की,अशा कोणत्याही निर्णयावर किंवा
आदेशावर अपिल होऊ शकत नाही. तथापि, कलम 257 खाली राज्य शासनाकडेनिहित के लेल्या पुनरीक्षण
शक्तीनुसार राज्य शासन असा कोणताही  निर्णय किंवा आदेश यामध्ये फे रबदल करु शकते,त्याचे विलोपन
करु शकते किंवा तो फिरवू शकते.
 
दोन - महाराष्ट् जमीन महसूल (अपिल,पुनरीक्षण व पुनविर्लोकन ) नियम 1967
असे संबोधलेल्या नियमांच्या तरतूदी
 
15. पुनरीक्षणासाठी  किंवा पुनविर्लोकनासाठी करण्यात येणारे प्रत्येक अपिल किंवा अर्ज समुचित
प्रधिकाऱ्यास उद्देशून विनंती  अर्जाच्या स्वरुपात के ला पाहिजे,तसेच त्याची  भाषा मुद्‌दे सूद व सुबोध
असली  पाहीजे. त्यावर अपील करण्याची  किंवा यथास्थिती, अर्जदाराची किंवा त्याच्या  रीतसर प्रधिकृ त
के लेल्या अभिकर्त्याची  सही किंवा अंगठयाची निशाणी असली  पाहिजे आणि त्यावर योग्य त्या किंमतीचा
न्यायालय फी  मुद्रांक असला पाहिजे.
 
16. अपील मध्ये किंवा अर्जामध्ये पुढील तपशील असला पाहिजे :-

 
(एक) अपील करणाऱ्याचे किंवा यथास्थिती,अर्जदाराचे नाव,

 
(दोन) त्याच्या वडीलांचे नाव,
 
(तीन) त्याचा व्यवसाय व राहण्याचे ठिकाण आणि पत्ता,

 
(चार) अपील करणाऱ्याचा किंवा अर्जदाराचा लेखनिक असल्यास ,त्याचे नाव व पत्ता आणी ,

 
(पाच) अपीलकार किंवा अर्जदार आपल्या अपीलाच्या किंवा अर्जाच्या पुष्टयर्थ ज्या
वस्तुस्थितीत विसंबून राहात असेल तिचे संक्षिप्त निवेदन आणि ज्यावर त्याने अपील किंवा
अजर् के ला असेल त्याआदेशाच्या किंवा निर्णयाच्या संबंधातील त्याच्या हरकतींची  कारणे.
 
असे अपील किंवा अर्ज समुचित प्रधिकाऱ्याकडे एकतर जातीने सादर करता येईल किंवा संपूर्ण टपालखर्च
आगाऊ भरुन डाके ने पाठविता येईल.
 
17.परिच्छेद 15 आणि 16 यामधील आवश्यक गोष्टींचे अनुपालन करण्यात न आल्यास ,
अपीलातील किंवा अर्जातील गुणावगुणांचा विचार के ला न जाता, ते फे टाळले जाईल.
 
18. महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्यांना कोणत्याही  अपिलांचे किंवा अर्जाचे एकत्रीकरण , त्यास
पक्षकार असलेल्या सर्वांंची असे एकत्रीकरण करण्यास संमती असल्यास, आणि त्यात कायदेविषयक व
वस्तुस्तितीविषयक समाईक प्रश्न असल्यास,करता येईल.
 
तीन पूरक सूचना
 
19.शासकीय परिपत्रक महसूल विभाग कमांक एलएाडी -3954/27854-ए,एफ, दि,17 जानेवारी
1958 .- सादा, भाडेपट् ‌टे ,इत्यादी राज्यपालांनी  के ले असल्याचे व्यक्त के लेले असते आणि घटनेच्या
अनुच्छेद 299 अन्वये तसे करण्यास प्राधिकृ त के लेले असताना जिल्हाधिकारी राज्यपालांच्या वतीने  त्या
करुन देतो तेव्हा,अनुच्छेद 299 च्या अर्थाच्या कक्षेत, राज्याच्या कार्यकारी शक्तींचा अवलंब करुन
शासनाच्या वतीने शासनाचा एजंट म्हणून जिल्हाधिकाऱ्याने असे दस्तऐवज के ले असल्याचे मानण्यात येते.
असे करार राज्यपाल व भोगवटादार यांच्यामध्ये के ले असल्याचे व्यक्त के लेले असल्यामुळे शासन
संविदात्मक बंधानशी  बांधले जाईल. दस्तऐवज एकदा करुन दिल्यानंतर व पूर्ण झाल्यानंतर त्यात एकतर्फी 
बदल करण्यास,सुधारणा करण्यास किंवा तो परत घेण्यास शासनास किंवा महसूल अधिकाऱ्यास मोकळीक
असणार नाही. राज्यपालांनी के ले असल्याचे किंवा आुच्छेद 299 च्या अर्थाच्या कक्षेत त्याच्या वतीने  करुन
दिले असल्याचे व्यक्त के लेले नसेल असे दस्तऐवज फक्त, जिल्हाधिकाऱ्याने,जमीन महसूल
अधिनियमाखाली त्याच्या संविधिक कार्याचा वापर करुन त्याचा महसूल अधिकारी म्हणून असलेल्या
क्षमतेमध्ये के लेले असतात. या दस्तऐवजामूळे खाजगी  व्यक्तींच्या नावाने  फक्त संविधिक बंधन निर्माण
होते. संविदात्मक बंधन नाही. म्हणून,राज्यपाल आणि भोगवटादार यांच्यामध्ये के ल्याचे व्यक्त ,के लेले नसेल
अशा सनदा, करार,कबुलायती ,इत्यादी  वरील अटी व शतीर् या मध्ये बदल करण्याची ,दुरुस्ती करण्याची 
किंवा त्या रद्‌द करण्याची  संपूर्ण शक्ती शासनाला किंवा महसूल अधिकाऱ्यांना आहे.
 
20. शासकीय ज्ञापन कमांक आरटीएस/4359/86187-एम,महसूल व वन विभाग ,दि.24 सप्टेंबर
1959.- अपील दाखल के लेले असेल तेव्हा,अधिकार अभिलेखासंबंधीची  विवादांची नोंदवही अंतीमरीत्या
बंद करण्यापूर्वी चौकशी अधिकाऱ्याने त्याच्या निर्णयासाठी  थांबलेच पाहिजे.
 
21. शासकीय परिपत्रक महसूल व वन विभाग कमांक एस.30/45027-जी,दि,ऑक्टोबर 1967.-
शासनाला महसूल देणाऱ्या शेत जमिनिंच्या विभाजनासंबंधीचे ,दिवाणी प्रकिया संहितेच्या कलम 54 अवये
दिवाणी  न्यायालयाने  काढलेले हुकू मनामे जिल्हाधिकाऱ्याकडे अंमलबजावणीसाठी पाठविण्यात येतात.
विभाजन हुकू मनाम्याशी  संबंधित असलेल्या बाबींमध्ये जिल्हाधिकाऱ्याने शेत जमिनींचे विषम विभाजन
के ल्याच्या कारणास्तव ,मुंबइ जमीन महसूल अधिनियम,1879 च्या कलम 211 खाली आयुक्तास अपील
विचारार्थ घेता येते काय किंवा पुनरीक्षण शक्तीचा वापर करता येतो काय असा मुद्‌दा उपस्थीत करण्यात
आला होत. प्रथम असे मानन्यात आले की,अभिकथित विषम विभाजन मुंबई जमीन महसूल
अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये करण्यात आले नव्हते तर दिवाणी प्रकीया संहितेच्या कलम 54
अनुसार करण्यात आले होत,यासाठी आयुक्ताला मुंबई जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 211 च्या
उपबंधानुसार असे अपील किंवा पुनरिक्षण विचारार्थ घेता येणार नाही . त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने
1966 चे विशेष दिवाणी अर्ज कमांक 1170 आणि 1195 या मध्ये या प्रशांचा निर्णय दिला. उच्च
न्यायालयाने असे प्रतिपादन के ले की, महसूल देणाऱ्या जमिनीच्या विभाजनासंबंधीच्या हुकू मनाम्याच्या
अंमलबजावणीबाबतच्या कार्यवाही मध्ये जिल्हाधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही  आदेशाविरुध्द मुंबई जमीन
महसूल अधिनियमाच्या कलम 203 अन्वये अपील विचारार्थ घेण्याची आणी उक्त अधिनियमाच्या कलम
211 खाली  पुनरीक्षण अर्जाची सुनावणी  करण्याची  देखील अधिकारीता आयुक्ताला आहे.

 
मध्य प्रदेश जमीन महसूल संहिता,1954, हैदराबाद जमीन महसूल अधिनियम ,1317 एफ आणि
महाराष्ट् जमीन महसूल अधिनियम,1966 यांच्या उपबंधाच्या संदर्भात या प्रश्नावर आणखी  विचार
करण्यात आला. तदनुसार महसूल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी पुढील सूचना आयूक्ताला आहेत. :-
 
      1) मध्ये प्रदेश जमीन महसुल सहीतेच्या उपबंधान्वये दिलेल्या अपिल आणि पुनरिक्षण शक्ती या,उक्त
अधिनियमाच्या किंवा त्याखाली  तयार के लेल्या नियमांच्या उपबंधांखाली दिलेल्या अशा आदेशापूरत्या
निर्बंधित असल्यामूळे ,कलम 41 अवये असे अपील विचारार्थ घेण्याची  किंवा कलम 46 अवये
पुनरीक्षणाची  सुनावणी करण्याची  कोणतीही  शक्ती  उक्त अधिनियमांखाली आयूक्ताला नाही.
 
हैदराबाद जमीन महसूल संहीतेच्या संबंध असेल तेथवर, महसूल देणाऱ्या जमिनीचे विभाजन कसे
करावे ते उपबंधीत के लेला विशिष्ट उपबंध संहितेच्या कलम 168 खाली आहे. हा उपबंध लक्षात
घेता,दिवाणी प्रकीया संहितेच्या कलम 54 अन्वये जिल्हाधिकाऱ्याकडे निर्दिष्ट के लेल्या विभाजा
हुकू मनाम्याची अंमलबजावणी करताना त्याने दिलेला आदेश हा हैदराबाद जमीन महसूल अधीनीयमाच्या
कलम 168 खालील आदेश असेल व म्हणून हैदराबाद जमीन महसूल अधिनियमाची  कलमे 158 आणि
166-ब याखाली अनुकमे अपीलामध्ये किंवा पुनरीक्षणामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशावर आक्षेप घेता
येईल.
 
महाराष्ट जमीन महसूल अधिनियम ,1966 हा संपूर्ण राज्यामध्ये 15 ऑगस्ट 1967 पासून लागू
करण्यात आला आहे.
नवीन अधिनियमामुळेतिन्ही प्रदेशामध्ये प्रचलित असलेले जमीन महसूल कायदे निरसीत झाले
आहेत. तथापि, नवीन अधिनियमाच्या कलम 336 च्या परंतुकान्वये,अधिनियम अमलात येण्यापूर्वी
प्रलंबीत असलेल्या कार्यवाहीचा,नवीन अधिनियम मंजूर के लेला नाही असे मानुन,म्हणजेच,त्या त्या
प्रदेशामध्ये प्रचलित असलेल्या निरसीत जमीन महसूल कायद्याच्या उपबंधानुसार निर्णय द्यावा. म्हणून
नवीन अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी प्रलंबीत असलेल्या कार्यवाहीचा पूवोर्क्त सूचनांनुसार परामर्श  धेण्यात
यावा,असे निदेश  महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
 
दिवाणी  न्यायालयाच्या हुकू मनाम्याची  अंमलबजावणी चालू असलेल्या प्रकरणासह धारण
जमिनीच्या विभाजनासंबंधीची तरतूद महाराष्ट जमीन महसूल अधिनियम ,1966 च्या कलम 85 मध्ये
के ली आहे. म्हणून दिवाणी  यायालय हुकू मनाम्याची  अंमलबजावणी करुन निर्णय दिलेल्या प्रकारणासह
15 ऑगस्ट 1967 नंतर निर्णय झालेल्या विभाजन प्रकरणांवर नवीन अधिनियमाच्या उपबंधाचे निंयत्रण
राहील. या उपबंधामध्ये अनुसूची  इ  सह कलम 247 खालील, जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशावर अपील
करण्याची तरतूद के ली  आहे. त्याच प्रमाणे  नवीन अधिनियमाच्या कलम 247 अवये जिल्हाधिकाऱ्याच्या
आदेशावर पुनरीक्षणामध्ये आक्षेप घेता येईल.

 
 
                           ....................
                    
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You might also like