You are on page 1of 3

अटी व शर्ती :-

1. अनुज्ञाग्राही हे प्रदान करण्यात आलेली जमीन ही भोगवटदार वर्ग-२ म्हणून धारण करतील.
2. प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनीचा वापर मंजूर प्रयोजना व्यतिरिक्त अन्य प्रयोजनासाठी अनुज्ञाग्राही यांना करता येणार
नाही.
3. प्रदान करण्यात आलेल्या जमिनीचा मंजूर प्रयोजनासाठी वापर करण्यापूर्वी नियोजन प्राधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, पर्यावरण
व वनविभाग यांचेकडील आवश्यकत्या त्या पूर्व परवानग्या घेणे अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक राहील.
4. उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांनी तहसीलदार व भारत संचार निगम लि. यांचे प्रतिनिधीशी संपर्क साधून जमिनीची संयुक्त मोजणी
विनामुल्य करून हद्द निश्चिती करणे बंधनकारक राहील.
5. शासन महसूल व वन विभागाचे कोणतेही व के व्हाही देण्यात येणारे निर्देश सर्व संबंधितांवर बंधनकारक राहतील.
6. प्रकरणी अनुज्ञाग्राही यांनी प्रस्तुत जमीनीवर संबंधित नियोजन प्राधिकरण यांचेकडू न रितसर परवानगी घेऊनच टॉवर/बांधकाम करणे
बंधनकारक राहील.
7. प्रस्तावित जमिनीखालील सर्व खाणी, खनिज पदार्थ, दगडखाणी यावरती शासनाचे अधिकार राखून ठेवले असून महाराष्ट्र जमीन
महसूल संहिता, १९६६ मधील तरतूदीनुसार खाणीचे काम करण्यासाठी, खनिजांचे शोध घेण्यासाठी सर्व वाजवी सोयींसह त्या
ठिकाणा पर्यंत पोहचण्याचे अधिकार शासनास राहतील.
8. अनुज्ञाग्राही यांनी प्रदान करण्यात आलेल्या जागेवर पथकिनारवर्ती नियमानुसार बांधकाम असलेबाबत बांधकाम विभागाचे अभिप्राय
प्राप्त करुन घेणे बंधनकारक राहील.
9. आवश्यकतेनुसार वन विषयक तरतूदीच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील
10. अनुज्ञाग्राही यांना स्थानिक प्राधिकारी म्हणून ग्रामपंचायतीकडील ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक राहील.
11. विषयांकित जमिनीचा ताबा आहे त्या स्थितीत तहसीलदार यांनी अनुज्ञाग्राही यांना देणेची कार्यवाही करावी. तसेच विषयांकित
जमिनीवर अतिक्रमणे होणार नाहीत याची जबाबदारी अनुज्ञाग्राही यांची राहील.
12. प्रदान के लेल्या जमिनीबाबत काही न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याचे निराकारण करण्याची जबाबदारी अनुज्ञाग्राही यांची राहील.
13. अनुज्ञाग्राही यांनी प्रदान के लेल्या शासकीय जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षामध्ये मंजूर प्रयोजनासाठी वापर करणे
बंधनकारक राहील, सदर मुदतीमध्ये मंजूर प्रयोजनासाठी वापर न के ल्यास प्रदान के लेली जमीन विनामोबदला शासन जमा करण्यात
येईल.
14. प्रदान के लेल्या शासकीय जमिनीचे शासन, महसूल व वन विभागाचे पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरण/गहाण/तारण/बक्षीसपत्र किं वा
सार्वजनिक-खाजगी सहभाग तत्वावर वापर करता येणार नाही. तसे के ल्याचे निदर्शनास आल्यास प्रदान के लेली जमीन शासन जमा
करण्यात येईल. त्यासाठी कोणतीही नुकसानभरपाई अनुज्ञागाही यांना मागता येणार नाही.

15. प्रस्तुत जमीन प्रदान आदेशातील अटी व शर्ती मान्य असलेबाबत रु.१००/- चे स्टॅम्प पेपरवर तहसीलदार यांचेकडे लेखी हमीपत्र
देणे अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक राहील. तसेच शासन परीपत्रक क्र.मुद्रांक-२०१७/अनौ.क्र.११/प्र.क्र.१३३/म-१ (धोरण)
दि.२४/१२/२०२० नुसार तहसीलदार आणि अनुज्ञाग्राही यांचे दरम्यान दस्त निष्पादित करण्यात यावा. सदर दस्त निष्पादित
झाल्यानंतर मंजूर जागेवरील चतुःसीमा दर्शवून प्रत्यक्ष ताबा (Physical Possession) भारत संचार निगम लि., कल्याण
यांना देणेची कार्यवाही तहसीलदार यांनी करावी.
16. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१ मधील नियम ४९ मधील तरतूदी १८ मध्ये मंजूर
के लेल्या शासकीय जागेतील इमारत/सिमा भिंत यांच्या दर्शनीभागावर प्रमाणपत्र लावणे बंधनकारक राहील.
17. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व त्याखालील नियमातील इतर सर्व साधारण अटी व शर्तीचे पालन करणे अनुज्ञाग्राही
यांचेवर बंधनकारक राहील.
18. वरील अटी शर्तीचा भंग के ल्यास प्रदान के लेली शासकीय जमीन शासन जमा करणेत यावी.

सही/- (अशोक शिनगारे)


जिल्हाधिकारी ठाणे

अटी व शर्ती :-

1. वाटपग्रही हे विषयांकीत मिळकत/जमीन हि भोगवटादार वर्ग-२ म्हणूनच धारण करतील.


2. विषयांकीत जमिनीचा वापर मंजूर प्रयोजनाव्यतिरिक्त अन्य प्रयोजनासाठी करता येणार नाही.
3. उप अधीक्षक, भूमी अभिलेख यांनी तहसिलदार व भारत संचार निगम लि. यांचे प्रतिनिधीशी संपर्क साधून जमिनीची संयुक्त मोजणी
विनामुल्य करुन हद्द निश्चिती करणे बंधनकारक राहील.
4. शासन महसूल व वन विभागाचे कोणतेही व के व्हाही देण्यांत येणारे निर्देश सर्व संबंधितांवर बंधनकारक राहतील.
5. सदरहू जमिनीचा दिलेल्या प्रयोजनासाठी वापर करण्यापूर्वी नियोजन प्राधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, पर्यावरण व वनविभाग
यांचेकडील आवश्यकत्या पूर्व परवानग्या घेणे अर्जदार यांस बंधनकारक राहील.
6. प्रकरणी प्रतिग्रहिता यांनी प्रस्तुत जमीन नियोजनांच्या अनुषंगाने कोणत्या वापर विभागामध्ये समाविष्ट आहेत व त्याअनुषंगाने
बांधकाम अनुज्ञेय आहे अगर कसे? याबाबत संबंधीत नियोजन प्राधिकरण यांचेकडू न परवानगी घेवूनच टॉवर बांधकाम प्रस्तावीत
करावे.
7. प्रकरणी प्रतिग्रहिता यांनी प्रदान करणेत आलेल्या जागेवर पथकिनारावर्ती नियमानुसार बांधकाम अनुज्ञेय आहे अगर कसे? याबाबत
बांधकाम विभागाचे अभिप्राय प्राप्त करुन घेणे बंधनकारक राहिल.
8. आवश्यक तेथे, सीआरसेड/पर्यावरण/मॅग्रोव्हज विषयक तरतूर्दीच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी यांची आवश्यकती परवानगी घेणे
अर्जदार यांचेवर अनिवार्य राहील.
9. सदर जमिनीचा आहे त्या स्थितीत ताबा तहसिलदार पालघर यांनी अर्जदार यांना देण्यात यावा. सदर जमिनीवर अतिक्रमणे होणार
नाही याची जबाबदारी अर्जदारांची राहिल.
10. प्रस्तुत प्रकरणी मंजुर के लेल्या जमिनीबाबत काही न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी
अर्जदारांची राहिल.
11. सदर जमिनींचा ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षात मंजूर प्रयोजनासाठी वापर करणे बंधनकारक राहिल. तीन वर्षात सदर जमिनीचा
मंजूर प्रयोजनासाठी वापर न के ल्यास मंजूर जमीन विनामोबदला शासनजमा करण्यात येईल.
12. विषयांकित जमीनीचे शासनाच्या महसूल व वन विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण/गहाण /तारण/ बक्षिसपत्र किं वा
सार्वजनिक खाजगी सहभाग तत्वावर वापर करता येणार नाही. के ल्यास सदर जमीन शासन जमा करण्यात येईल, त्यासाठी
कोणतीही नुकसान भरपाई मागता येणार नाही.
13. सदर आदेशातील अटी व शर्ती मान्य असल्याबाबत अर्जदार यांचेकडू न १००/- रूपये स्टॅम्प पेपरवर लेखी हमीपत्र घेण्यात यावे. तसेच
शासन परिपत्रक क्र- मुद्रांक-२०१७/अनौ.क्र.११/प्र.क्र.१३३/म-१ (धोरण), दि.२४/१२/२०२० नुसार तहसिलदार पालघर आणि
वाटपग्रही यांच्या दरम्यान दस्त निष्पादित करण्यात यावा.

14. उद्घोघातातील अ.क्र.०७ मधील शासन निर्णयात नमुद नुसार नमुना एक-अ (नियम ६(३) पहा) जमीन प्रदानाची सनद विहित
नमुन्यात तयार करून घेणे बंधनकारक आहे.
15. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ मधील नियम ४९ मधील तरतूदी १८ मध्ये मंजूर
के लेल्या शासकीय जमिनीच्या जागेतील इमारत/सिमा भिंत यांच्या दर्शनी भागावर प्रमाणपत्र लावणे बंधनकारक राहिल.
16. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व त्या खालील नियमातील इतर सर्व साधारण अटी व शर्ती लागू राहतील.

सही/-xxx (गोविंद बोडके )


जिल्हाधिकारी पालघर

You might also like