You are on page 1of 2

...करारनामा...

करारनामा करून देणार :-

करारनामा करून घेणार :-


मी नामे श्री. याद्वारे करारनामा लिहून देतो की, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी
योजनेअंतर्गत माझे शेत मौजा- गट/ सर्व्हे क्र. आराजी हे.आर मध्ये शासनातर्फे सन २०२३- २४
मध्ये महात्मा गांधी ग्रामीण विहीर मंजूर करण्यात आली आहे. व सदर विहिरीचे बांधकाम
उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद, लघुसिंचाई उपविभाग, अथवा त्यांचे प्रतिनिधीचे तांत्रिक
सल्ल्यानुसार व स्थळावर सदर विहीर बांधकाम १०.५० मीटर खोल व ४.५० मीटर आतील
विहिरीचे व्यास व ३० मीटर बोअर मारून मला स्वतःला करावयाचे आहे व बांधकामाचा दर्जा
तांत्रिक सल्ल्यानुसार योग्य राखणे माझ्यावर बंधनकारक आहे व मला मान्य आहे. सदर विहिरीचे
बांधकामाकरिता वेळोवेळी झालेल्या कामाचे मोजमाप होऊन मुल्यांकनानुसार मला रक्कम देण्यात
येणार आहे. व त्याप्रमाणे जास्तीत जास्त रुपये ...........(रुपये
) चे अनुदान शासनाकडून देय आहे हे मला मान्य आहे . तसेच
शासकीय अनुदानापेक्षा जास्तीचा होणारा खर्च मला स्वतः करावयाचा आहे व हे मी मान्य करतो.
सर्वसाधारण कामाची प्रगती पाहून एक महिन्यातून एकदा कामाचे मूल्यांकन करण्यात येईल हि अट
मला मान्य आहे.
// २ //
सदर विहिरीकारिता देण्यात येणारे अनुदान हे वेळोवेळी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या
अनुदानामधुनच देण्यात येणार आहे. त्यामुळे अनुदान प्राप्त होण्यास विलंब झाला व त्यामुळे मला
अनुदानाची रक्कम मिळण्यास विलंब झाल्यास त्याबद्दल माझी तक्रार राहणार नाही , हे मी मान्य करतो.
सदर विहिरीचे बांधकाम मंजूर झालेल्या भूमापन क्रमांकामध्ये करणे माझेवर बंधनकारक
आहे व या बाबतीत मी कोणतीही दिशाभूल के ल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी माझेवर राहील व संपूर्ण
रक्कम माझेकडून वसूल करण्यात येईल हि अट मला मान्य आहे. सदर विहिरीकरिता मला देण्यात
आलेल्या अनुदानाचा योग्य वापर न के ल्याचे उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद लघु सिंचाई
उपविभाग, नागभीड अथवा त्याच्या प्रतिनिधीने ठरविल्यानुसार मला मिळालेले अनुदान अंशतः किं वा
पूर्णतः महसुलाची थकबाकी म्हणून माझेकडून वसूल करण्यात येईल हे मी मान्य करतो.
मी या पूर्वी शासकीय योजनेची विहिरीचा लाभ घेतलेला नाही. तसेच माझ्या कु टुंबात
शासकीय / निमशासकीय सेवेत नोकरीवर नाही.
मा. मुख्य कार्यपालन अधिकारी , जिल्हा परिषद चंद्रपूर आदेश क्र. सिंचाई /जि.प /सिंचाई
/मगांग्रावि/ / दिनांक व तांत्रिक मंजुरी क्र. / / दिनांक
मध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी मला मान्य आहेत. या संबंधाने मी धोशी आढळल्यास मी
सर्वस्वी जबाबदार राहीन हे मी मान्य करतो.
सदर विहिरीचे खोदकाम / बांधकाम करीत असतांना लावण्यात येणाऱ्या मजुरांना द्यावयाच्या
साहित्याचे ,पगाराची संपूर्ण जबाबदारी माझेवर राहील. तसेच विहिरीचे खोदकाम , बांधकाम सुरु
असतांना कामगारांचे सुरक्षेची पूर्ण जबाबदारी माझेवर राहील. यासाठी शासन अथवा खात्याचे
अधिकारी जबाबदार राहणार नाही याची मला जाणीव आहे व हि जबाबदारी माझेवर राहील हे मला
मान्य आहे.
टीप – १) विहिरीची पुनर्भरणाची व्यवस्था शेतकरी करेल यात हुजूर तक्रार राहणार नाही.
२) करारनामा झाल्यापासून सहा महिन्याच्या आत महात्मा गांधी ग्रामीण विहिरीचे बांधकाम
सुरु करणे अनिवार्य आहे व १४ महिन्याच्या आत बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे.
३) माझ्या कु टुंबातील घटक शासकीय किं वा मिनशासकिय सेवेत नोकरीवर नाही.
४) मी यापूर्वी शासकीय योजनेतील विहिरीचा लाभ घेतलेला नाही. तसेच त्या गटात विहीर
नाही.

स्थळ -
दिनांक - करारनाम करून देणाऱ्याची स्वाक्षरी

You might also like