You are on page 1of 8

BaagaIdarI

krarnaamaa
भागीदारीचा करार कराड येथे दिनांक ......... रोजी खालील पक्षाकारांत करण्यात आला आहे .

1. श्री............पनं ...... वय ..... राहणार..... ( पक्षकार १)

2. श्री............पनं ...... वय ..... राहणार..... ( पक्षकार २)

सर्व भागीदार सज्ञान असून भारतीय भागीदारी कायदा १९३२ नुसार भागीदारी करारनामा
करण्यास पात्र आहे त.

या भागीदारी कारारातील सर्व भागीदार यांना यानंतर कार्यकारी भागीदार संबोधण्यात आलेले
आहे . आणि यांतील पक्षकार यांनी सदर भागीदारी संबंधातील आणि आपसातील हितसंबंधाबाबत
मान्य केलेल्या अटी आणि शर्ती याद्वारे लेखी नोंद करण्याचे मान्य केले आहे . आणि आता हा
करारनामा खालील नुसार साक्षीत करण्यात आला आहे .
1. भागीदारीचे नांव:

भागीदारीचा हा व्यवसाय ............................... या नावाने केला जाईल आणि किंवा यांतील


भागीदार वेळोवेळी आपसात मान्य करतील त्यानुसार कोणत्याही इतर नावानुसार करतील.

2. सुरवात

भागीदारीचा हा व्यवसाय दिनांक .................. पासन


ू करण्यात आल्याचे मानले जाईल.

3. कालावधी

भागीदारी व्यवसायाचे कालावधी स्वच्छे वर ( At will ) राहील आणि सच


ू नेचा कालावधी तीन (३)
महिन्यांचा राहील.

4. व्यवसाय स्वरूप

भागीदारीचा हा व्यवसाय .......................... आणि या व्यवसायाच्या अनष


ु ंगाने येणारे इतर
व्यवसाय व यांतील भागीदार वेळोवेळी आपसात मान्य करतील त्यानुसार कोणताही इतर
व्यवसाय करतील.

5. हिशेबाचे वर्ष

भागीदारी व्यवसायाचे हिशेब दरसाल ३१ मार्च रोजी करण्यात येतील.

6. व्यवसायाची जागा

भागीदारीचा हा व्यवसाय ................... किंवा यांतील भागीदार वेळोवेळी आपसात मान्य करतील
त्यानुसार कोणत्याही इतर ठिकाणाहून करण्यात येईल.

७. भांडवल उभारणी

भागीदारीचे सरु
ु वातीचे भांडवल रु.५०,०००/- राहिल. जे यांतील सर्व भागीदार आणतील व
भागीदारी करीता पढ
ु े आवश्यक असलेले ज्यादा भांडवल यांतील सर्व भागीदार आपसात मान्य
करतील त्या अटीनुसार आणतील.
तसेच भागीदारी व्यवसायास ज्यादा भांडवलाची गरज असल्यास असे भांडवल सर्व भागीदारांना
मान्य असलेल्या अटीनुसार बँक, आर्थिक संस्था किंवा व्यक्तिक पातळीवर खाजगी संस्था व
व्यक्ती यांच्याकडून बाजारी व्याजदराने घेण्यात येईल. तसेच त्या रक्कमेची परतफेड करण्याची
जबाबदारी सर्व भागीदारांची एकत्रितपणे राहील.

८. नफा किंवा तोट्यातील हिस्सा

भागीदारीचा निव्वळ नफा किंवा तोटा यांतील भागीदारांमध्ये खालील हिस्स्यात विभागला जाईल
आणि भागीदार ते सहन करतील.

नाव. नफ्या तोट्यातील हिस्सा

1. श्री. ....................
2. श्री. .................

एकूण १००%

याद्वारे यांतील पक्षकारांत असेही मान्य करण्यात आले आहे की यांतील सर्व भागीदार हे
भागीदारीचे कारभारात पूर्णवेळ व आवश्यकतेनुसार लक्ष दे ऊन काम करतील आणि त्यांना
खालील प्रमाणेचा मोबदला दे तील.

याद्वारे यांतील पक्षकारांत असेही मान्य करण्यात आले आहे की जे भागीदार भागीदारीत भांडवल
गंत
ु वतील त्यांना त्यांचे भांडवल खाती शिल्लक जमा रक्कमेवर दरसाल १२% सरळ व्याज
दे ण्यात येईल किंवा भागीरांच्या खात्याला वर्ग करण्यात येईल.

याद्वारे यांतील पक्षकारांत असेही मान्य करण्यात आले आहे की सदर कार्यकारी भागीदार यांना
दे णेचा एकूण मोबदला हा खालील प्रमाणे निश्चित करण्यांत येईल.

प्रथम रु.३,००,०००/- पस्


ु तकी नफ्यावर रु.१,५०,०००/- किंवा ९०% जी
रक्कम जास्त असेल

शिल्लक राहिलेल्या पस्


ु तकी नफ्यावर ६०%
सदर नुसार निश्चित केलेला एकूण मोबदला हा यांतील पक्षाकारामध्ये त्यांचे वर नमूद नफ्याचे
हिस्स्यांत विभागण्यात येईल.

वरील प्रमाणे मोबदला ठरविण्यासाठी पस्


ु तकी नफा म्हणजे व्यवहाराच्या पुस्तकातून दिसणारा
नफा आणि आयकर कायदा १६९१ नुसार संबधीत वर्षासाठी दिलेला अथवा दे य वेतन वजा
करण्यापर्वी
ू कलम २८ ते ४४ डी ( प्रकरण -४ डी ) अन्वये ठे रविलेला मोबदला/मानधन वजा
करणेपर्वी
ू चा नफा होय.

यांतील कार्यकारी भागीदार यांना वरीलनुसार दे णेचा मोबदला/मानधन हा भागीदारीचा पुस्तकी


फा निश्चिंत केल्यानंतर भागीदार यांचे खाती जमा करण्यात येईल.

यांतील प्रत्यक भागीदार हे भागीदारीतील त्यांच्या एकूण मोबदला यातन


ू दरमहा त्यांचे स्वतःचे
खर्चा करीता ठराविक रक्कम उचल घेतील आणि कोणाही भागीदाराने भागीदारीतिला एकूण
मोबदल्यापेक्षा जास्त रक्कम उचल घेतली तर ती अधिक रक्कम तो भागीदार भागीदारीच्या
अंतिम हिशेब केल्यानंतर भागीदारांना परत करतील.

९. बँकेचे खाते

भागीदारीचे सरु
ु वातीचे बँकेचे खाते यांतील भागीदार भागीदारीच्या नावाने कोणत्याही बँकेत
किंवा संस्थेत उघडतील आणि यांतील सर्व भागीदारांचे एकत्रित सहीने चालवतील, तसेच बँक
खाते चालाविनेच्या अधिकारात आवश्यकतेनस
ु ार सर्व भागीदार आपसी संमतीने बदल करतील.

१०. इतर मिळकतीतील हिस्सा

भागीदारीची मशिनरी, स्टऑक, पुस्तकी कर्ज आणि इतर मिळकत यांत यांतील भागीदार यांच्या
नफ्याच्या हिस्स्यांत हक्क राहील.

११. भागीदारीचे हिशेब

भागीदारीचे सर्व हिशेबाची पुस्तके ठे वून भागीदारे चे सर्व व्यवहारांबाबात नोंद करतील आणि इतर
भागीदार यांचे संमतीविना ती इतरत्र ठे वली जाणार नाहीत. यांतील प्रत्यक भागीदार यांना किंवा
त्यांचे एजंट्सना ती तापासून उतारा घेता येईल आणि भागीदार काळात दरसाल ३१ मार्च रोजी
भागीदाराचा सर्व मिळकत जबाबदारी आणि भांडवला नफा तोटा आणि इतर व्याव्हारांचे हिशेब
करून भागीदाराचे सर्व खर्च आणि घसारा व भांडवल त्रट
ु ी यांचे तरतद
ु ी सहित भागीदारीचे नफा
तोटा पत्रक आणि ताळे बद
ं बनाविले जातील. जे हिशेब यांतील भागीदार यांनी सही केल्यावार
त्यात आढळणाऱ्या किरकोळ चक
ु ा व्यतिरिक्त ते भागीदार यांच्यावर बंधनकारक राहतील. चुका
यांतील भागीदार तात्काळ सुधारतील. सदर हिशेबानुसार भागीदार यांना दे णेचा नफा तोट्याचा
हिस्सा हा भागीदारीतील त्यांची उचल वजा करून त्यांचे हिस्स्यात जमा करतील आणि त्यानंतर
यांतील प्रत्यक भागीदार हा त्यांचे हिस्स्यातून रक्कम उचल घेणेस अधिकारी राहिल.

१२. भागीदारांची कर्तव्ये

अ. वेळोवेळी आणि नियमितपणे त्याची सर्व कर्ज आणि दे णी चुकती करून त्याचे खर्च दावे
कारवाई या पासून इतर भागीदार या पासून यांना आणि भागीदारांस मुक्त ठे वतील.

ब. भागीदार हे भागीदारच्या वतीने स्वीकारलेली रक्कम व चेक भागीदारीचे बँक खात्यात


तात्काळ जमा करतील.

क. इतर भागीदार यांचे बरोबर विश्वासाचे काम करतील व सदर भागीदाराचे सर्व
व्य्व्हारांबाबात इतर भागीदार यांनी खरी माहिती दे वून व्यवसाय करणेस सहकार्य
करतील.

ड. सर्व भागीदार भागीदारी व्यवसायात पर्ण


ू पणे लक्ष दे तील तसेच एकमेकांचा विश्वास
संपादन करतील व भागीदारी व्यवसायाकरीता अनुभव व ज्ञान यांचा उपयोग करतील.

१३. बंधने

कोणताही भागीदार इतर भागीदार यांचे परवानगीशिवाय,

1. या भागीदारी सारख्याच कोणत्याही व्यवसायात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेणार


नाही.

ब. भागीदारीच्या कामाचा काळ सोडून भागीदारीचे हितार्थ सदर भागीदारे ची मिळकत आणि
मालमत्ता गहाण तारण ठे वणार नाही किंवा त्यावर बोजा निर्माण करणार नाही.

क. कोणत्याही व्यक्तीस धंद्याची रक्कम कर्ज दे णार नाही.

ड. भागीदारीचा काळ सोडून धंद्याची रक्कम दे णेची हमी दे णार नाही.


इ. कोणताही करारनामा किंवा कोणाही व्यक्तीस जामिन जमानत दे णार नाही, किंवा इतर
भागीदार यांना हानी होवून सदर भागीदारीचे मिळकतीस अथवा तिचे भागासा हानी होईल
किंवा टाच लागेल असा कोणताही व्यवहार करणार नाही.

फ. भागीदारी व्यवसायाची मिळकत आणि नाफ्यातील हिस्सा हस्तांतर करणार किंवा तारण
ठे वणार नाही.

घ. भागीदारीचा काळ सोडून बिल ऑफ एक्स्चें ज किंवा नोट्स यांची दे वाण घेवाण करणार
नाही.

ह. भागीदारिस येणे असलेल्या कोणत्याही कर्ज राक्कामें च्या दाव्याबाबत पूर्ण


राक्कामेवारील हक्का व्यतिरिक्त कोणताही समेट करणार किंवा हाका सोडणार नाही.

ग. भागीदारी व्यवसायाचे वतीने दाखल केलेला दावा रद्द करणार नाही किंवा त्यावर बोजा
निर्माण करणार नाही.

ज. भागीदारी व्यवसायाच्या वतीने स्थावर मिळकत संपादित करणार नाही.

१४. निवत्ृ तीवेळीचे हिशेब

भागीदारी काळांत यांतील कोणताही भागीदार जर भागीदारीतून निवत्ृ त होऊ इच्छीत असेल तर
सदर भागीदारीचे हिशेब करून सदर निवत्ृ त भागीदाराचे भाग भांडवल नं दिलेल्या व्याज आणि
नफ्याचा हिस्सा जो निवत्ृ ती तारीख रोजीचा असेल त्या निश्चित करतील. आणि अश्या प्रकारे
निवत्ृ त भागीदार यांना दे य आढळणारी रक्कम त्यांना बाकीचे भागीदार आणि निवत्ृ त भागीदार
मान्य करतील त्यानुसार दे तील.

१५. लावाद

भागीदारी काळांत किंवा त्या नंतर यांतील भागीदार किंवा त्यांचे वारसदार किंवा प्रतिनिधींत सदर
भागीदारी संबध
ं ात कोणताही वाद झाला तर तो वाद आपसात सोडविण्यात आला नसल्यास
सदरचा वाद हा यांतील प्रत्यक भागीदार यांना एक यानुसार नियुक्त केलेल्या लावादांकडे
समाधाना करीता सुपर्द
ू करतील आणि भारतातील लावाद कायदा आणि त्याचे सुधारणाप्रमाणे
समाधान करून सदर लावाद यांचा निर्णय वादातील पक्षकार यांचेवर बंधनकारक राहील.

साक्षीत यांतील नमूद केलेले पक्षकार यांनी या कारारातील प्रथम दिवशी आणि वर्षी समक्ष सह्या करून
सदरचा कारारनामा कराड येथे पर्ण
ू केला आहे .
यांतील नमूद केलेले पहिले पक्षकार

1. श्री. ............................................

यांनी समक्ष सही केली आहे .

यांतील नमूद केलेले दस


ु रे पक्षकार

2. श्री. ............................................

यांनी समक्ष सही केली आहे .

साक्षीदार

1. श्री. ...........................................
2. श्री. ............................................

You might also like