You are on page 1of 7

( DISCLAIMER :- Following model draft of Partnership Deed is only for

information & understanding the required contents. Partnership firms are at


liberty to draft its deed as per mutual understanding of the partners )

भागीदारी घटनापत्र

हे भागीदारी घटनापत्र दिनांक ------------------- रोजी ----------- येथे

१. -------------------------, राहणार, ----------------------, “पहिल्या पक्षाचे भागीदार”

२. -------------------------, राहणार, ----------------------, “दुस-या पक्षाचे भागीदार”

3. -------------------------, राहणार, ----------------------, “तिस-या पक्षाचे भागीदार”

यांच्यामध्ये बनवून निष्पादित करण्यांत आले.

असे आहे की, वरील भागीदार “----------------------” या नावाने आणि प्रकाराने भागीदारीत
व्यवसाय करु इच्छितात.

आणि असे आहे की, भागीदार भागीदारीच्या अटी व शर्ती लेखी स्वरुपात आणू इच्छितात.

आता पक्षकारांनी खालील गोष्टी मान्य के ल्या आहेत.

१. नाव आणि प्रकार :


भागीदाराचा हा व्यवसाय “----------------” या नावाने आणि प्रकारे चालविण्यात येईल.

२. सुरुवात :
भागीदारीची सुरुवात ---------------------- पासून झाली असे समजण्यात येईल.

३. व्यवसायाचे स्वरुप :
भागीदारीचा व्यवसाय --------------------- असा असेल. भागीदार ठरवतील असा इतर
कोणताही व्यवसाय करु शकतील.

४. मुख्य कार्यालय :
भागीदारी संस्थेचे मुख्य कार्यालय, ----------------- येथे असेल व / वा भागीदार ठरवतील
अशा अन्य ठिकाणी असेल.

५. अतिरिक्त कार्यालय :
भागीदारी संस्थेचे अतिरिक्त कार्यालय, ----------------- येथे असेल व / वा भागीदार
ठरवतील अशा अन्य ठिकाणी असेल.
कृ .मा.प.

.. २ ..
६. कालावधी :
भागीदारीचा कालावधी ऐच्छिक असेल.

७. भांडवल :
भागीदारीचे स्थिर भांडवल रु. -------------------- एवढे असेल.

८. बँक खाते :
भागीदारी व्यवसायाचे बँक खाते कोणत्याही बँके त / बँकांमध्ये उघडण्यात येईल व ते खाते
भागीदार वेळोवेळी आपसांत ठरवतील त्या भागीदारांच्या स्वाक्षरीने चालविता येईल.

९. वेतन :
भागीदारांनी आपांपसात असे ठरविले आहे की, सर्व भागीदार हे सक्रिय म्हणून भागीदारी
व्यवसाय चालवतील आणि खाली नमुद के ल्याप्रमाणे मोबदला घेता येईल.

पुस्तकी नफ्याच्या पहिल्या रु. 3,00,000/- पर्यंत } पुस्तकी नफ्याच्या ९० टक्के


किं वा / तोटा असेल तर }

उर्वरित पुस्तकी नफ्याच्या } पुस्तकी नफ्याच्या ६० टक्के

“पुस्तकी नफा” हयाचा अर्थ आयकर कायदा १९६१ च्या कलम ४० (५) स्पष्टीकरण ३ मध्ये
अंतर्भूत असलेल्या अर्थाप्रमाणे असेल.

वरील मोबदला भागीदारांना खालीलप्रमाणे देण्यांत येईल.

भागीदारांचे नांव भाग

1. ------------------------------------- ३४ टक्के
2. ------------------------------------- ३३ टक्के
3. ------------------------------------- ३३ टक्के
१०० टक्के

“तथापि, जर तोटा ( नुकसान ) झाला तर कोणताही मोबदला देय असणार नाही. ”

पुढील पानावर..

.. ३ ..
१०. नफ्याचे प्रमाण :

भागीदारीतून होणा-या तोटयासह नफयातील हिस्सा भागीदारांमध्ये खालीलप्रमाणात


विभागण्यात येईल.

भागीदारांचे नांव भाग

4. ------------------------------------- ३४ टक्के
5. ------------------------------------- ३३ टक्के
6. ------------------------------------- ३३ टक्के
१०० टक्के

११. भागीदारांचे व्याज :


सर्व भागीदारांना त्यांच्या भागीदारीच्या पुस्तकातील भांडवली, चालू किं वा कर्ज खात्यातील
जमा शिलके वर १२% दराने किं वा आयकर काय्रदा १९६१ च्या कलम ४० (ब) यापैकी
जास्तीच्या दराने व्याज दिले जाईल.

१२. लेखा :
सर्व भागीदार हिशेबाची पुस्तके योग्यप्रकारे ठे वण्यास जबाबदार राहतील. भागीदारी
व्यवसायाच्या योग्य आणि आवश्यक हिशोबाच्या वहया ठे वल्या जातील व दरवर्षी मार्च
महिन्याच्या शेवटी त्या दिवशी संपणा-या आर्थिक वर्षाकरीता भागीदारीची मत्ता व
दायित्वे तसेच नफा व तोटा यांचा हिशोब के ला जाईल. हा लेखा भागीदार स्विकृ त
करतील तेव्हा तो त्यात उल्लेखीत सर्व विषयांबाबत निर्णायक व अंतिम मानला जाईल.
भागीदारांच्या स्विकृ तीनंतर तीन महिन्यांच्या आत त्या लेखा परिक्षणात एखादी
अभिव्यक्त चूक झाल्याचे आढळल्यास ती दुरुस्त करता येईल. भागीदारी व्यवसायाचे
पहिले
वर्ष ३१.०३. ------ रोजी संपेल.

१३. जबाबदा-या :

भागीदारांतर्फे आणि त्यांच्यात विनिर्देशपूर्वक असे ठरविण्यात आले आहे की, वैद्यकीय
व्यावसायिक म्हणून आवश्यक असलेली पदवी मिळविलेल्या भागीदारांनी व / वा
भागीदार नसलेल्या (परंतु) वैद्यकीय व्यावसायिकाने रुग्णांना कोणत्याही प्रकारची सेवा
दिल्यास, त्यासंदर्भातील चुका किं वा चुकीचे निदान यांच्या परिणामांना ते वैयकित्करित्या
जबाबदार (उत्तरदायी) असतील हे परिणाम आर्थिक. नागरी किं वा गुन्हेगारी असू
शकतात. वैद्यकीय
पुढील पानावर..
.. ४ ...

पदवी नसलेले इतर भागीदार अशा प्रकारच्या चुका / चुकीचे निदान किं वा इतर
कार्यवाहीला जबाबदार राहणार नाहीत. वैद्यकीय पदवी नसलेल्या भागीदारांना
अशाप्रकारच्या कारणास्त्व आर्थिक किं वा इतर नुकसान सोसावे लागल्यास वैद्यकीय
पदवी असलेले भागीदार त्यांना पुरेपूर आणि परिपूर्ण भरपाई देतील.

१४. कर्तव्ये :
प्रत्येक भागीदार
1. त्याची स्वत्:ची देणी वक्तशीरपणे देईल आणि भागीदारी संस्थेला व इतर
भागीदारांना
त्यासंदर्भात आलेल्या सर्व खर्चाची, दाव्यांची व मागण्यांची भरपाई देईल.
ब. इतर भागीदारांशी आणि भागीदारी व्यवसायाशी निगडीत व्यवहारांशी निष्ठावंत
राहील
आणि इतर भागीदारांना अशा व्यवहारांचे खरे स्पष्टीकरण देईल. तसेच
व्यवसायाच्या
व सर्वांच्या फायद्यासाठी सर्वतोपरी मदत करेल.
क. भागीदारी संस्थेच्या नांवे मिळालेले पैसे, धनादेश आणि हस्तांतरणीय रोखे तत्परतेने
भागीदारी संस्थेच्या नांवे असलेल्या बँक खात्यात जमा करेल.

१५. काही विशिष्ट निषिध्द कृ ती :


कोणताही भागीदार इतर भागीदारांच्या संमतीशिवाय
1. असा कोणताही गैरवाजवी करार करणार नाही जेणे करुन भागीदारी व्यवसायाला
तोटा
होण्याचा किं वा अशा व्यवहारातून कोणतीही देणी निर्माण होण्याचा धोका संभावेल.
ब. व्यवसायातील दैनंदिन व्यवहाराव्यतिरिक्त भागीदारी संस्थेची मालमत्ता कर्ज,
देणगी
किं वा तारण देणार नाही किं वा विकणार नाही.
क. व्यवसायाशी संबंधीत कोणतेही येणे असलेली रक्कम किं वा भाग सर्वस्वी सोडू न
देणार नाही.
ड. कोणत्याही व्यक्तीकरीता किं वा व्यक्तींकरीता जामीन किं वा हमीदार राहणार नाही.
तसेच भागीदारी संस्थेची किं वा संस्थेच्या मालमत्तेची हानी होईल असे कोणतेही
कृ त्य जाणीवपूर्वक करणार नाही.
इ. संस्थेतील त्याच्या भागाची मालमत्ता किं वा नफ्याचा वाटा दुस-या व्यक्तीला
विकणार नाही किं वा गहाण ठे वणार नाही.
फ. दैनंदिन व्यवहाराच्याव्यतिरिक्त कोणतेही विनिमयपत्र किं वा वचनपत्र काढणार
नाही. मान्य करणार नाही किं वा त्यांचे पृष्ठांकन करणार नाही.
ग. भागीदारातील कोणतीही रक्कम अशा कोणत्याही व्यक्तीला, संस्थेला किं वा
कं पनीला उसनी देणार नाही ज्यांच्यावर इतर भागीदारांनी पूर्वी लिखीत करारानुसार
बंदी घातली आहे.

पुढील पानावर..

.. ५ ..

१६. तरतुदींचा भंग :


जर एखाद्या भागीदाराने
1. वर उल्लेखित कलम १४ आणि १५ चा भंग के ल्यास किं वा
ब. कर्जबाजारी झाल्यास किं वा
क. जर अशी कोणतीही कृ ती के ल्यास किं वा व्यवसायिकदृष्टया गैरवर्तन के ल्यास जे
भागीदारी व्यवसायाच्या विघटनास कारणीभूत ठरेल तर अशा परिस्थितीत इतर
भागीदार त्या कृ त्याची माहिती मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत लेखी सूचना
देऊन भागीदारी संपुष्टात आणू शकतात. अशा परिस्थितीत उर्वरीत भागीदाराला दोषी
भागीदाराचा भांडवलातील आणि भागीदारीच्या मालमत्तेतील वाटा खरेदी करण्याचा
हक्क राहील.

१७. विवादाचा समझोता :

भागीदारीत व्यवसाय करीत असताना किं वा त्यानंतर भागीदारांमध्ये या घटनापत्रातील


अटी आणि शर्ती संबंधी निर्माण होणारे प्रश्न व मतभेद त्यावेळेस अंमलात असलेल्या
भारतीय लवाद कायदा १९४० अन्वये सोडविले जातील.

१८. कोणत्याही भागीदाराच्या मृत्यू, नादारी किं वा निवृत्ती यांमुळे भागीदारी विघटीत होणार
नाही. परंतु उरलेले इतर भागीदार व्यवसाय पुढे चालू ठे वतील.

१९. अवशिष्ट कलम :

येथे नमुद न के लेली कोणतीही भागीदारी व्यवसायाशी निगडीत बाब भागीदारांच्या


परस्पर सामंजस्याने ठरविली जाईल.

पुढील पानावर..
..६..

आम्ही वरील मजकू र साक्षीपूर्वक सही शिक्क्यानिशी कार्यवाहीत आणला, जो आमच्या वारसांना
व व्यवस्थापकांना बंधनकारक राहील.

आंतर उल्लेखीत ------------------------------------

पहिल्या पक्षाचे भागीदार

यांनी --------------------------------------------------

यांच्या समक्ष स्वाक्षरी व शिक्कामोर्तब करुन

सुपूर्द के ले.

--------------------------------------------------------------------

आंतर उल्लेखीत ------------------------------------

दुस-या पक्षाचे भागीदार

यांनी --------------------------------------------------

यांच्या समक्ष स्वाक्षरी व शिक्कामोर्तब करुन

सुपूर्द के ले.

---------------------------------------------------------------------

आंतर उल्लेखीत ------------------------------------

तिस-या पक्षाचे भागीदार

यांनी --------------------------------------------------

यांच्या समक्ष स्वाक्षरी व शिक्कामोर्तब करुन


सुपूर्द के ले.

--------------------------------------------------------------------

You might also like