Professional Documents
Culture Documents
Contract Agreement
Contract Agreement
करारनामा - (दिग्दर्शक)
करारनामा, आज दि. __, वार ______, महिना _____, सन 202 __ ईसवी ते दिवशी...
यांसी
2. लिहून देणार (दिग्दर्शक) यांनी लिहून घेणार (निर्माता) यांच्या "खुर्ची" या चित्रपटाचे चित्रीकरण व
प्रमोशनकरिता खालीलप्रमाणे तारखा व दिवस दिलेले आहेत. या तारखा लिहून घेणार (निर्माता) यांना
मान्य असून, या तारखांमध्ये उभयतांना काहीही फे रबदल करावयाचा झाल्यास, असा बदल दिग्दर्शक व
निर्माता या दोघांच्या विचाराने व एकमेकांच्या संमतीनेच करता येईल.
अ.क्र. तपशील तारखा व दिवस
1. प्री-प्रोडक्शन
2. १ ले शेड्युल
3. २ रे शेड्युल
4. पोस्ट प्रोडक्शन व प्रमोशन
वरीलप्रमाणे ठरलेल्या तारखा पाळणे ही या करारनाम्याची मुख्य अट असुन, ती पाळणे लिहुन घेणार
(निर्माता) व लिहून देणार (दिग्दर्शक) या दोघांवरती बंधनकारक राहील. मात्र उभयतांपैकी जो कोणी या
अटीचे पालन करणार नाही, त्याला समोरच्या पार्टीच्या, नुकसानाची भरपाई करुन द्यावी लागेल.
3. चित्रीकरण व प्रमोशन दरम्यान लिहून देणार (दिग्दर्शक) यांचा जेवण, प्रवास, निवास खर्च लिहून घेणार
(निर्माता) हे करतील.
4. लिहून देणार (दिग्दर्शक) यांना दिलेल्या मानधनाचे सर्व शासकीय कर म्हणजे उदा. सर्विस टॅक्स,
इन्कमटॅक्स, वगैरे लिहून देणार (दिग्दर्शक) स्वतः भरतील. परंतू लिहून घेणार (निर्माता) यांनी लिहून
देणार यांच्या मानधनातून टी.डी.एस. ची रक्कम वजा के ल्यास त्याचे इन्कमटॅक्सचे योग्य ते प्रमाणपत्र
लिहून घेणार यांना देण्याची जबाबदारी लिहून घेणार (निर्माता) यांची राहील. याकरिता सदर कराराद्वारे
लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना त्याबाबत लेखी संमती दिलेली आहे.
5. सदर चित्रपटाचे विकले जाणारे सर्व प्रकारचे हक्क (राईट्स). राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान,
चित्रपटाला मिळणारे अवार्डस्, रॉयल्टी वगैरे बाबींमध्ये लिहून देणार (तंत्रज्ञ) यांचा काहीही हक्क
राहणार नसून सदर चित्रपटाचे सर्व हक्क कायमस्वरुपी लिहून घेणार (निर्माता) यांचेकडेच राहतील.
वैयक्तिकरित्या मिळणाऱ्या अवार्डस् वर मात्र लिहून घेणार (निर्माता) यांचा हक्क नसून ते लिहून देणार
(तंत्रज्ञ) यांनाच मिळेल. लिहून देणार हे लिह्न घेणार यांना या कराराद्वारे अशी खात्री देतात की, सदर
चित्रपटाबाबत असलेले कोणतेही गुपित लिहण देणार (दिग्दर्शक) यांच्याकडून लिक होणार नाही.
6. सदर चित्रपटाच्या चित्रीकरण पूर्व, चित्रीकरण व प्रमोशनच्यावेळी लिहून देणार (दिग्दर्शक) यांची
कसलीही चीज वस्तू हरवल्यास, चोरीला गेल्यास, तसेच लिहून देणार यांचेकडून कोणताही फौजदारी
गुन्हा घडल्यास वा त्यांचेकडून इतर कोणाचेही काहीही नुकसान झाल्यास त्याची कसलीही जबाबदारी
लिहून घेणार (निर्माता) यांची नसून त्यासाठी लिहून देणार हे स्वतः वैयक्तिक जबाबादार असतील.
7. सदरील चित्रपट तयार करत असताना लिहुन घेणार (निर्माता) हे लिहून देणार (दिग्दर्शक) यांना क्रिएटिव्ह
स्वातंत्र्य देतील तसेच लिहुन देणार हे देखील लिहुन घेणार यांच्या योग्य सूचनांचा आदर करुन त्याचा
उपयोग सदर चित्रपटाच्या कामात करतील. त्याचबरोबर सदर चित्रपटासठी आवश्यक असणारे तंत्रज्ञ,
कलाकार यांची निवड लिह्न घेणार व लिह्न देणार यांच्या एकत्र विचारातून होईल.
8. लिहून घेणार (निर्माता) हे लिहून देणार (दिग्दर्शक) यांना, सदर करारनाम्यानुसार ठरलेले मानधन देण्यास
तसेच चिपटाच्या निर्मिती करिता आवश्यक असलेला आर्थिक प्रवाह वेळेत उपलब्ध करुन देण्यास
जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे सदर चित्रपट ठरलेल्या वेळेत व ठरलेल्या बजेटमध्ये (नैसर्गिक आपत्ति,
तांत्रिक दुरुस्ती असे मुद्दे वगळता) तांत्रिक व सर्वांगाने दर्जेदार व ठरलेल्या बजेटमध्ये चित्रपट पूर्ण करुन
देण्यास लिहुण देणार हे तितके च जाबबादार आहेत, हे लिहून देणार व लिहून घेणार यांना मान्य व कबुल
आहे.
9. लिहून देणार (दिग्दर्शक) व लिहून घेणार (निर्माता) हे कराराद्वारे खालील अ ब क या मुद्यांद्वारे स्वखुशीने
जाहीर करतात की,
1) उभयता सदर कराराचे वेळी 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ' या संस्थेचे अ वर्ग/ब वर्ग
सभासद असणे क्रमप्राप्त आहे. नसेल तर त्यांनी स्वेच्छेने प्रथम अखिल भारतीय मराठी चित्रपट
महामंडळाचे सभासद होणे जरुरीचे आहे.
2) काही कारणाने लिहून देणार (दिग्दर्शक) हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद
नसतील तर त्यांना लिहून घेणार (निर्माता) हे त्यांना रितसर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे
सभासद करून घेतील. त्यासाठी त्यांनी भरलेली रक्कम लिह्न देणार यांच्या मानधनातून कपात करण्यास
लिहून देणार यांनी या कराराद्वारे परवानगी दिलेली आहे.
3) सदर करार करुनही, सदर चित्रपटाचे काम करित असताना लिहुन देणार (दिग्दर्शक) व लिहून घेणार
(निर्माता) यांचेमध्ये काहीही वाद निर्माण झाल्यास वा दोघांपैकि कोणी एकाने सदर करारातील अटिचे
उल्लंघन के ल्यास, उभयतांमधील वाद सोडविण्याचा, त्यांचेमध्ये न्याय निवाडा करण्याचा निर्णय
देण्याचा व त्याची अमंलबजावणी करण्याचा पुर्ण अधिकार लिहुन घेणार व लिहून देणार यांनी 'अखिल
भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला' वा महामंडळाच्या 'लवाद समितीला' स्वईच्छेने दिलेला असुन
त्यांनी दिलेला निर्णय उभयतांवरती बंधनकारक राहील.
तरीही महामंडळाच्या निर्णयाविरुद्ध कोणी व्यक्ती/संस्था न्यायालयात गेल्यास त्याकरिता अखिल
भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यालय असलेले कोल्हापूर न्यायालय हे त्याकरिता
अधिकारक्षेत्र असेल व अशा के समध्ये महामंडळाने सदर के समध्ये के लेले प्रोसिडींग व दिलेला निर्णय,
हा न्यायालयात जाणाऱ्या व्यक्ती वा संस्थेच्या विरोधात पुरावा म्हणून दाखल करण्यात येईल.
येणेप्रमाणे लिहून देणार (दिग्दर्शक) व लिहुन घेणार (निर्माता) यांनी समजून उमजुन, अक्कल हुशारीने,
कोणाच्याही दडपणाखाली नसताना, नशापाणी न करता, पुर्णपणे शुद्धीवर असताना सदरील करार
मुक्कामी लिहुन तयार के ला व तद्नंतर तो वाचुन व समजुन घेऊन खालील दोन साक्षीदारांसमक्ष
उभयतांनी आपापल्या सह्या, अंगठे के ले असुन सदरील दस्त नोटरी के ला असे.
दिनांक : __ / __ / २०__
ठिकाण : पुणे. सही ________