You are on page 1of 4

करारनामा

करारनामा आज दिनांक ०४ माहे डिसेंबर इ.स.२० २० रोजी

दिवशी नाशिक.

श्री. प्रदीप भालचंद्र विसपुते


उ.व.-५८ धंदा – नोकरी

रा.वृदावन गार्डन,ए-४ फ्लॅ ट न १०२


के दार नगर श्रामिक नगर,सातपूर,नाशिक. लिहून घेणार
ह.मु. श्रीकृ पा अपार्टमेंट, घर क्र.२
गोविंद नगर, नाशिक

यांसी
श्री.सागर बाळासाहेब शेळके
वय-२५ धंदा –नोकरी

रा.मनोरी बु. तालुका- येवला लिहून देणार


पो.देशमाने, जिल्हा- नाशिक

कारणे सदरचा करारनामा लिहून देतो ऐसे जे की,

1) मिळकतीचे वर्णन – तुकडी जिल्हा नाशिक पोट तुकडी ता.नाशिक पैकी नाशिक महानगर पालिका हद्दीतील
श्रमिक नगर,सातपूर भागातील‘’निर्माणस वृंदावन गार्डन,’’ के दार नगर या नावानेओळखले जाणारे भागातील इमारत न.ए
४,फ्लॅ ट न १०२ येणे प्रमाणे वर्णनाची मिळकत वीज कनेक्शन व पाणी पुरवठासह दरोबस्त असे चातुर्सिमा रेकॉर्ड ऑफ
राईट प्रमाणे.
२) वर कलम १ यात वर्णन के लेली मिळकत लिहून घेणार याची मालकीची व कब्जातील असून सदर संपूर्ण मिळकतीचे
लिहून घेणार हे एकमेव मालक आहेत. सदरची मिळकत ही लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना भाडे तत्वावर दिली आहे.
मिळकती बाबत अटी व शर्ती संबंधी लिहून देणार यांना लिहून घेणार याचे लाभत लिहून दिलेला सदर करारनामा असून अटी
व शर्ती पुढील प्रमाणे.

अटी व शर्ती
अ) वर कलम १ यात वर्णन के लेल्या लिहून घेणार यांच्या मिळकतीमध्ये लिहून देणार यांचा फक्त तात्पुरता
स्वरूपाचा कब्जा असल्याने लिहून देणार व लिहून घेणार यांच्यामध्ये सदर मिळकत संदर्भाने ११ महिने मुदतीचा भाडे
करारनामा म्हणून लिहून देणार यास दिला आहे. सदर करारनामा मुदत ही तारीख २०/०८/२०१७ ते १९/०६/२०१८
म्हणजे ११ महिने मुदतीचा राहील

आ) सदरील मिळकतीचा कायदेशीर हक्क व अधिकार हा लिहून घेणार यांच्याकडे राहील. लिहून देणार व लिहून घेणार यांचे
दरम्यान करारानुसार सदर व्यवहार हा फक्त राहण्यासाठी लिहून दिलेला आहे याची जाणीव आहे.

इ) वर कलम १ यात वर्णन के लेली मिळकतीची फी(भाडे)लिहून घेणार व लिहून देणार यांचे दरम्यान रक्कम रुपये
४०००/-(अक्षरी चार हजार)दरमहा इतकी ठरली आहे.सदर मिळकतीचे येणारे लाईट बिल हे लिहून देणार यांनी
करारनामा अस्तित्वात असे पर्यंत भरावयाचे आहे.

ई) सदरचे भाडे हे दर महिन्याचे १० ते २० तारखेच्या आत


द्यावयाचे आहे.
उ) लिहुन देणार यांनी लिहून घेणार यांना अनामत रक्कम रुपये
२०,०००/-(अक्षरी वीस हजार) मात्र मिळकतीचे संरक्षनार्थ (हमी)
म्हणून इतकी करारनामा अस्तीत्वात असे पर्यन्त जमा राहील.
ऊ) लिहून देणार यांनी मिळकतीचे काही नुकसान वैगरे झाल्यास

त्याची भरपाई त्याचे अनामत रकमेतून पूर्ववत करून घेण्यात येईल.

ॠ) वर कलम १ यात वर्णन के लेल्या मिळकतीचा कब्जा हा लिहून घेणार

यांना मुदतपूर्व पाहिजे असल्यास लिहून देणार यांना १ महिन्याची आगाऊ

नोटीस देणे गरजेचे आहे.

३) लिहून देणार यांनी सोसायटी कमिटीचे असलेले नियम व अटी नियमितपने

पाळणे गरजेचे आहे.

४) लिहून देणार यांनी मिळकतीचा वापर करतांना आजूबाजूच्या राहत असलेल्या लोकांकडू न गैरवर्तणूकीबाबत कळल्यास
लिहून घेणार यांना विना आगाऊ नोटीस न देता सदरची मिळकत खाली करून त्वरीत सोडण्यास सांगण्याचा अधिकार
राहील.

५) तसेच मिळकत पत्यावर लिहून देणार यांना राहण्याचा पुरावा म्हणून,ग्यास कनेक्शन,बँक खाते उघडणे,रेशनीग
कार्ड,आधार कार्ड काढणे ई.साठी पत्ता पुरावा म्हणून वापरनेसाठी लिहून घेणार यांची काहीही हरकत असणार नाही

६) मिळकतीचा वापर करताना कोणालाही कोणतीही इजा होईल असा वापर लिहून देणार हे करणार नाही.जर कोणास
जागा वापरामुळे आर्थिक शरीरीक नुकसान झाले तर त्यांची नुकसान भरपाईची जबाबदारी लिहून देणार यांचेवर
राहील.लिहून घेणार त्यास जबाबदार राहणार नाही.

७) वर कलम १ यात वर्णन के लेल्या करारनामा अन्वय लिहून देणार कब्जा बाबत महाराष्ट्र रेंट कन्ट्रोल ऍक्ट भाडेकरी
म्हणून कोणत्याही प्रकारचे हक्क अधिकार सांगणार नाही.आपण उभयतांमध्ये फक्त करारनामा हाच संबंध राहील. सदरील
करारनामा अस्तित्वात असे पर्यंत कु ठल्याही स्वरूपाचा अपघात व हानी झाल्यास,मिळकतीस नुकसान झाल्यास त्यास
लिहून देणार जबाबदार राहील

८) सदर कराराची ११ महिने मुदत संपल्यानंतर लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना मिळकतीचा खुला व निर्वाद असा
कब्जा जसा ताबा दिला होता त्याच पद्धतीने विना नुकसान करता परत द्यावयाचा आहे.

येणे प्रमाणे सदरचा करारनामा लिहून घेणार व लिहून देणार यांनी स्वसंतोषाने कोणाचेही धाक, दडपानास बळी
न पडता वाचून घेऊन, समजून घेऊन मुक्त संमतीने लिहून दिला असे.

येणे प्रमाणे हा करारनामा.

नाशिक .

तारीख.

1) ---------------------------
श्री. प्रदीप भालचंद्र विसपुते
(लिहून घेणार)
१) ---------------------------

श्री.सागर बाळासाहेब शेळके


(लिहुन देणार)

1) -----------------------------

२)-----------------------------

साक्षीदार

You might also like