You are on page 1of 6

ll श्री ll

करारनामा - (छायाचित्रकार)
करारनामा, आज दिनांक ८, वार - सोमवार, महिना - सप्टेंबर, साल २०२३ इसवी
ते दिवशी पर्यंत ...
QUEEN’s THRONE Production तर्फे प्रोप्रायटर
प्रांजली सुनिल पवार.
वय : २८ वर्षे, धंदा : व्यवसाय,
ऑ. पत्ता - फ्लॅट नं.१, सी-१ विंग, शांती निके तन सोसायटी,
गार्डन सिटी जवळ, वारजे, पुणे - ४११०५८.
मोबाईल : ९९२१३१४२६२. ... लिहुन घेणार (निर्माती)

यांसी

श्री. करण नारायण तांदळे.


वय : ३१ वर्षे, धंदा : व्यवसाय,
पत्ता : बोल्हाई मळा, जाधववाडी, चिखली,
पुणे - ४११०१४.
मोबाईल : ७८७५७५१६७३. … लिहून देणार (छायाचित्रकार)
कारणे करारनामा करतो की,
1. सदरील करारनामा निर्माता व छायाचित्रकार यांच्यामध्ये होत असून सदरील करारनाम्यामध्ये
निर्माती यांना लिहून घेणार तर छायाचित्रकार यांना लिहून देणार असे संबोधण्यात आलेले असून,
लिहून घेणार व लिहून देणार या शब्दांमध्ये लिहून घेणार व लिहून देणार हे स्वतः, त्यांचे वालीवारस,
असायनीस, विश्वस्त, प्रतिनिधी वगैरेंचा समावेश झालेला आहे.
1) लिहून घेणार (निर्माता) यांची QUEEN’s THRONE Production या नावाची प्रोप्रायटरी/
भागीदारी / प्रायव्हेट लिमिटेड चित्रपट निर्मीती संस्था असुन ते त्यांच्या सदर मराठी चित्रपट निर्मीती
करीत आहेत. लिहून घेणार निर्माता यांची सदरील चित्रपट निर्मिती संस्था व या संस्थेचे प्रोप्रायटर /
सर्व भागीदार / सर्व डायरेक्टर्स यांची निर्माते म्हणून 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ'
मुख्य कार्यालय, खासबाग, कोल्हापूर यांचेकडे रितसर नोंदणी झालेली आहे. सदर संस्था 'अखिल
भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची' अ वर्ग/ ब वर्ग सभासद असून तिचा नोंदणी क्रमांक ____ हा
आहे व निर्मात्यांचा नोंदणी क्रमांक ____ असा आहे.
2) लिहून देणार हे गाण्याचे छायाचित्रकार असून ते 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे’ अ
वर्ग / ब वर्ग सभासद आहेत व त्यांचा नोंदणी क्रमांक - १९८४२ हा आहे. लिहून घेणार यांनी
लिहून देणार यांना त्यांच्या “मी राणी लाखात चिकनी” या मराठी गाण्याचे छायाचित्रण
करण्याची विचारणा करुन, लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना सदरील चित्रपटाची पूर्ण कथा
तसेच सदर प्रोजेक्टबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना सदर
गाण्याचे छायाचित्रण करण्यास याअगोदर तोंडी होकार दिलेला आहे. त्यानुसार उभयतांमध्ये, त्यांचे
मानधन प्री- प्रोडक्शन, चित्रीकरण, पोस्ट प्रोडक्शन तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनवेळी प्रमोशन पर्यंतची
व्यवस्थापनाची जबाबदारी व सदर प्रोजेक्टसाठी द्यावा लागणारा वेळ तसेच इतर सर्व अटी व
नियमांची सविस्तर चर्चा झालेली असून उभयतांना सर्व अटी व शर्ती मान्य व कबुल आहेत.
त्यानुसार त्यांनी सर्व अटी व नियम करारनाम्याच्या स्वरुपात लेखी ठेवण्याचे ठरविल्यावरुन लिहून
घेणार व लिहून देणार यांचेमध्ये खालील अटी व शर्तीनुसार करारनामा करण्यात येत आहे.
3) लिहून घेणार (निर्माता) हे लिहून देणार (छायाचित्रकार) यांना “मी राणी लाखात चिकनी” या
गाण्याचे छायाचित्रणचे मानधन म्हणून एकू ण रुपये १२,०००/- (अक्षरी रक्कम बारा हजार रुपये
फक्त) देतील. हे मानधन लिहून देणार (छायाचित्रकार) यांना मान्य व कबुल आहे.
1. क्र. तपशील रक्कम
1. सदरील करारावर सही करतेवेळी २५%
2. सदर गाण्याचे छायाचित्रण सुरु होताना २५%
3. सदर गाण्याचे छायाचित्रण १ ले सत्र १०%
संपल्यावर
4. सदर गाण्याचे छायाचित्रण संपले नंतर १५%
5. सदर गाण्याचे पोस्ट प्रॉडक्शन पूर्ण झालेवर १५%
6. सदर गाण्याचे सेन्सॉर झालेनंतर १०%
अक्षरी रक्कम बारा हजार रुपये फक्त

2. लिहून देणार (छायाचित्रकार) यांनी लिहून घेणार (निर्माता) यांच्या मी राणी लाखात चिकनी या
गाण्याचे छायाचित्रण व प्रमोशनकरिता खालीलप्रमाणे तारखा व दिवस दिलेले आहेत. या तारखा
लिहून घेणार (निर्माता) यांना मान्य असून, या तारखांमध्ये उभयतांना काहीही फे रबदल करावयाचा
झाल्यास, असा बदल छायाचित्रकार व निर्माता या दोघांच्या विचाराने व एकमेकांच्या संमतीनेच
करता येईल.
अ.क्र. तपशील तारखा व दिवस
1. प्री-प्रोडक्शन
2. १ ले शेड्युल
3. २ रे शेड्युल
4. पोस्ट प्रोडक्शन व प्रमोशन
चित्रीकरणाच्या ठरलेल्या तारखांपेक्षा अधिक दिवस लागले तर
अतिरिक्त दिवसांचे मानधन डेली वेस ने देण्यात येईल.

वरीलप्रमाणे ठरलेल्या तारखा पाळणे ही या करारनाम्याची मुख्य अट असुन, ती पाळणे लिहुन घेणार
(निर्माता) व लिहून देणार (छायाचित्रकार) या दोघांवरती बंधनकारक राहील. मात्र उभयतांपैकी जो
कोणी या अटीचे पालन करणार नाही, त्याला समोरच्या पार्टीच्या, नुकसानाची भरपाई करुन द्यावी
लागेल.
3. चित्रीकरण व प्रमोशन दरम्यान लिहून देणार (छायाचित्रकार) यांचा जेवण, प्रवास, निवास खर्च
लिहून घेणार (निर्माता) हे करतील.
4. लिहून देणार (छायाचित्रकार) यांना दिलेल्या मानधनाचे सर्व शासकीय कर म्हणजे उदा. सर्विस
टॅक्स, इन्कमटॅक्स, वगैरे लिहून देणार (छायाचित्रकार) स्वतः भरतील. परंतू लिहून घेणार (निर्माता)
यांनी लिहून देणार यांच्या मानधनातून टी.डी.एस. ची रक्कम वजा के ल्यास त्याचे इन्कमटॅक्सचे योग्य
ते प्रमाणपत्र लिहून घेणार यांना देण्याची जबाबदारी लिहून घेणार (निर्माता) यांची राहील. याकरिता
सदर कराराद्वारे लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना त्याबाबत लेखी संमती दिलेली आहे.
5. सदर गाण्याचे विकले जाणारे सर्व प्रकारचे हक्क (राईट्स), राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान,
गाण्याला मिळणारे अवार्डस्, रॉयल्टी वगैरे बाबींमध्ये लिहून देणार (छायाचित्रकार) यांचा काहीही
हक्क राहणार नसून सदर गाण्याचे सर्व हक्क कायमस्वरुपी लिहून घेणार (निर्माता) यांचेकडेच
राहतील. वैयक्तिकरित्या मिळणाऱ्या अवार्डस्वर मात्र लिहून घेणार (निर्माता) यांचा हक्क नसून ते
लिहून देणार (छायाचित्रकार) यांनाच मिळेल. लिहून देणार हे लिहून घेणार यांना या कराराद्वारे अशी
खात्री देतात की, सदर गाण्याबाबत असलेले कोणतेही गुपित लिहून देणार (छायाचित्रकार)
यांच्याकडून लिक होणार नाही.
6. सदर गाण्याच्या चित्रीकरण पूर्व, चित्रीकरण व प्रमोशनच्यावेळी लिहून देणार (छायाचित्रकार) यांची
कसलीही चीज वस्तू हरवल्यास, चोरीला गेल्यास, तसेच लिहून देणार यांचेकडून कोणताही
फौजदारी गुन्हा घडल्यास वा त्यांचेकडून इतर कोणाचेही काहीही नुकसान झाल्यास त्याची
कसलीही जबाबदारी लिहून घेणार (निर्माता) यांची नसून त्यासाठी लिहून देणार हे स्वतः वैयक्तिक
जबाबादार असतील.
7. सदरील गाणे तयार करत असताना लिहुन घेणार (निर्माता) हे लिहून देणार (छायाचित्रकार) यांना
क्रिएटिव्ह स्वातंत्र्य देतील तसेच लिहुन देणार हे देखील लिहुन घेणार यांच्या योग्य सूचनांचा आदर
करुन त्याचा उपयोग सदर गाण्याच्या कामात करतील. त्याचबरोबर सदर चित्रपटासठी आवश्यक
असणारे तंत्रज्ञ, कलाकार यांची निवड लिहुन घेणार व लिहुन देणार यांच्या एकत्र विचारातून होईल.
8. लिहून घेणार (निर्माता) हे लिहून देणार (छायाचित्रकार) यांना, सदर करारनाम्यानुसार ठरलेले मानधन
देण्यास तसेच गाण्याच्या निर्मिती करिता आवश्यक असलेला आर्थिक प्रवाह वेळेत उपलब्ध करुन
देण्यास जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे सदर गाणे ठरलेल्या वेळेत व ठरलेल्या बजेटमध्ये (नैसर्गिक
आपत्ति, तांत्रिक दुरुस्ती असे मुद्दे वगळता) तांत्रिक व सर्वांगाने दर्जेदार व ठरलेल्या बजेटमध्ये गाणे
पूर्ण करुन देण्यास लिहुण देणार हे तितके च जाबबादार आहेत, हे लिहून देणार व लिहून घेणार यांना
मान्य व कबुल आहे.
9. लिहून देणार (छायाचित्रकार) व लिहून घेणार (निर्माता) हे कराराद्वारे खालील अ ब क या मुद्यांद्वारे
स्वखुशीने जाहीर करतात की,
1) उभयता सदर कराराचे वेळी 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ' या
संस्थेचे अ वर्ग/ब वर्ग सभासद असणे क्रमप्राप्त आहे. नसेल तर त्यांनी स्वेच्छेने
प्रथम अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद होणे जरुरीचे आहे.
2) काही कारणाने लिहून देणार (छायाचित्रकार) हे अखिल भारतीय मराठी चित्रपट
महामंडळाचे सभासद नसतील तर त्यांना लिहून घेणार (निर्माता) हे त्यांना रितसर
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद करून घेतील. त्यासाठी
त्यांनी भरलेली रक्कम लिहून देणार यांच्या मानधनातून कपात करण्यास लिहून
देणार यांनी या कराराद्वारे परवानगी दिलेली आहे.
3) सदर करार करुनही, सदर गाण्याचे काम करित असताना लिहुन देणार
(छायाचित्रकार) व लिहून घेणार (निर्माता) यांचेमध्ये काहीही वाद निर्माण झाल्यास
वा दोघांपैकि कोणी एकाने सदर करारातील अटिचे उल्लंघन के ल्यास,
उभयतांमधील वाद सोडविण्याचा, त्यांचेमध्ये न्याय निवाडा करण्याचा निर्णय
देण्याचा व त्याची अमंलबजावणी करण्याचा पुर्ण अधिकार लिहुन घेणार व लिहून
देणार यांनी 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला' वा महामंडळाच्या
'लवाद समितीला' स्वईच्छेने दिलेला असुन त्यांनी दिलेला निर्णय उभयतांवरती
बंधनकारक राहील.
तरीही महामंडळाच्या निर्णयाविरुद्ध कोणी व्यक्ती/संस्था न्यायालयात गेल्यास त्याकरिता
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यालय असलेले कोल्हापूर न्यायालय हे
त्याकरिता अधिकारक्षेत्र असेल व अशा के समध्ये महामंडळाने सदर के समध्ये के लेले प्रोसिडींग व
दिलेला निर्णय, हा न्यायालयात जाणाऱ्या व्यक्ती वा संस्थेच्या विरोधात पुरावा म्हणून दाखल
करण्यात येईल.
येणेप्रमाणे लिहून देणार (छायाचित्रकार) व लिहुन घेणार (निर्माता) यांनी समजून उमजुन,
अक्कल हुशारीने, कोणाच्याही दडपणाखाली नसताना, नशापाणी न करता, पुर्णपणे शुद्धीवर
असताना सदरील करार मुक्कामी लिहुन तयार के ला व तद्नंतर तो वाचुन व समजुन घेऊन खालील
दोन साक्षीदारांसमक्ष उभयतांनी आपापल्या सह्या, अंगठे के ले असे.

वरील सर्व मजकू र खरा व बरोबर असून आज रोजी पुणे मुक्कामी असताना उभयतांनी त्यावर
आपआपले स्वाक्षरी के ली असून सदरील करारनामा हा महाराष्ट्र राज्य नोटरीकडे नोंदणीकृ त
करण्यात येत आहे.

दिनांक - ०८/०९/२०२३.
ठिकाण – पुणे. सही ______
श्री. करण नारायण तांदळे.
(लिहून देणार, (छायाचित्रकार))
साक्षीदार -
1. सही :
नांव :
पत्ता : सही ______
प्रांजली सुनिल पवार.
QUEEN’s THRONE Production तर्फे प्रोप्रायटर
(लिहून घेणार, (निर्माती))
2. सही :
नांव :
पत्ता :

You might also like