You are on page 1of 9

तुमचं यश श्वासात अडकलंय

२० जून १९८१
नागपूरपासून आठ मैलांवर खापरी नावाचे खेडेगाव आहे. काही वर्षांपूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ लाईफट्रान्स या आमच्या संस्थेचे कार्यालय खापरीला होते. मी
जी तुला आत्ता हकिगत सांगणार आहे ती १९७४ मधे याच ठिकाणी घडली. कानपूरहून छत्तरसालसिंग नावाचे एक गृहस्थ मला भेटायला आले.
प्राध्यापिका सौ. लीलाताई किरकिरे त्या वेळी माझ्याकडेच साधनेसाठी होत्या. छत्तर- सालसिंग हे लखनौ हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश होते. त्यांच्या
मुलासाठी एका श्रीमंत घराण्यातील मुलगी सांगून आली होती. मुलीचे पालक मुलास कारखाना काढू न देणार होते. तेव्हा मुलाचं लग्न करावं की नाही असा
प्रश्न त्यांनी मला विचारला. अशा प्रश्नांची उत्तरं एका प्राचीन शास्त्राचा अभ्यास व साधना के ल्यावर अर्ध्या सेकं दात देता येतात. प्रश्न विचारणाऱ्याचा प्रश्न
विचारतेवेळी कोणता श्वास चालू आहे, त्यांचे उत्तर देणाऱ्याचा कोणता श्वास सुरू आहे, प्रश्न विचारणाऱ्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, प्रश्न
विचारणायाच्या श्वासात त्या वेळी वायू, अग्नी, पृथ्वी, जल आणि आकाश या तत्त्वांपैकी कोणते तत्त्व सुरू आहे यावर उत्तर काय द्यावयाचे ते ठरलेले
असते.
त्याचप्रमाणे मी त्याला उत्तर दिले की, त्याने आपल्या मुलाचे लग्न करू नये ! कारण उत्तर देताना मला असे दृश्य दिसले की, खेडेगावचा एक गजबजलेला
बाजार आहे. या बाजारात एक तरुण मोटरसायकलवर बसून आलाय. एवढ्यात त्याच्या अंगावर आकाशातून काही तरी पडलेय ! जे पडलेय त्याने त्या
तरुणाला दंश के लाय. त्यानंतर त्या तरुणाचा आणि चावणा-या प्राण्याचा मृत्यू झालाय !!
अर्थात छत्तरसालसिंगचा माझ्या सांगण्यावर विश्वास बसला नाहीच. मला ते अपेक्षित होतं. पण त्याने प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देणं माझं कर्तव्य
होतं. त्याच्या या मुलाचं नाव यशपाल असं होतं. बनारस युनिव्हर्सिटीतून तो एम. टेक. झाला होता. अमेरिके तील मोनेसोटा विद्यापीठातून त्याने पीएच. डी.
के ली होती. भारतात आल्यावर बिहारमधे त्याने कसलासा कारखाना सुरू के ला होता. मी छत्तर- सालसिंगला सांगितलं की तुझ्या मुलाचं जर तू लग्न
के लंस तर दोन महिन्यात तो मरेल !
यानंतर साधारण महिन्याभरानी छत्तरसालसिंग मला भेटला. त्याने मला देण्यासाठी मुलाच्या लग्नाची पत्रिका आणली होती! मी तो निमंत्रणपत्रिका घेण्याचे
नाकारले. मी त्याला मुलाचं लग्न करू नको सांगितल्यावरही तो पत्रिका देण्यासाठी आला होता. आता मला पुढच्या घडणाऱ्या प्रसंगाची जबाबदारी घ्यायची
आवश्यकता नव्हती. तो नाराज होऊन निघून गेला. लग्न झालं. त्यानंतर पंधरा दिवसांनी नागपूरमध्यॆ छत्तरसिंग मला पुन्हा भेटला. मला म्हणाला, लग्न
होऊन पावणे दोन महिने झाले. दोन महिने पूर्ण व्हायला अजून दोनच दिवस बाकी आहेत. तेव्हा मुलाच्या बाबतीत अजूनही तुम्ही सांगितलं होतंत ते घडेल
का ? आता गम्मत अशी की छत्तरसालसिंगने मला हा प्रश्न विचारला तेव्हा त्याचा आणि माझा जो श्वास चालू होता तोच श्वास त्याने लग्नाविषयी प्रश्न
विचारला तेव्हा दोघांचही चालू होता ! याचा अर्थ उघड होता की छतरसालसिंग हा प्रश्न विचारत असतानाच त्याच्या मुलाविषयी मी सांगितलेली घटना
घडत असली पाहिजे !!
तुझा मुलगा सध्या कोठे आहे ? मी त्याला विचारलं. तो म्हणाला, मुलगा सासरच्या खेडेगावी गेलाय. मी त्याला म्हणालो चल आपण तुझ्या मुलाच्या
सासरी जाऊ. ते खेडेगाव नागपूरपासूनच दोन-अडीच तासांवर होतं. आम्ही ज्या वेळी पोहोचलो त्याच्या आधीच फक्त दहा मिनिटा पूर्वी छत्तरसालसिंगच्या
मुलाचे प्रेत सासरच्या घरी आणून पोहोचते आले होते ! घरावर अर्थातच अवकळा माझी पसरली होती मुलाचे प्रेत बघून छत्तरसालसिंग तर जागच्या
जागीच बेशुद्ध पडला !
घटना अशी घडली होती की, यशपाल मोटरसायकलवरून बाजाराच्या दिवशी बाजार बघण्यासाठी म्हणून बाजारात गेला होता. तो बाजारात पोहोचला
तेव्हा त्याच्या डोक्यावरच्या आकाशातून एक घार गर्द सर्प आपल्या पायात पिवळा पकडू न उडत होती. एवढयात तिच्या पायातून सर्प सुटला आणि तो
नेमका यशपालच्या मानेवर पडला ! क्षणार्धात त्या सर्पाने यशपालच्या मानेला कडकडू न दंश के ला. के वळ प्रतिक्षीप्त किया म्हणून यशपालने तो मानेवरून
खाली झटकला. एवढ्यात घार तिरासारखी आकाशातून झॆपावली व खाली पडलेला सर्प तिने पुन्हा पायात पकडला आणि आकाशात भुर्रकन निघून गेली
! इकडे यशपालवर मात्र विषाचा परिणाम झाला आणि पुढल्या काही मिनिटातच त्याचे प्राणोत्क्रमण झाले !
आता मला सांग की, के वळ श्वासाचं परीक्षण करून सांगितलेल्या या उत्तराच्या शास्त्राचं महत्त्व तुला पटतंय की नाही ?
भाऊसाहेब देशपांडेंनी विचारलेल्या या प्रश्नाचं उतर अर्थातच होकारार्थी होतं !
मी भाऊं ना विचारलं,या शास्त्राचं नाव काय ?शिवस्वरोदयशास्त्र शिवस्वरोदयशास्त्र ? या नावाबरोबर मला एक घटना आठवली.
मावसबहीण सौ. रोहिणी दीक्षित आणि तिचे पती श्री. विद्याधर दीक्षित यांच्याबरोबर मी कल्याणहून दादरला येत होतो. शिवस्वरोदयावरून प्रश्नाची उत्तरे
श्री. विद्याधर दीक्षित हेही देतात. कल्याणला घाईगर्दीत व्ही. टी.ला जाणारी जी मिळेल तो लोकल आम्ही पकडली. दीक्षितांना घाटकोपरला उतरायचे
होते. ट्रेन सुरू झाल्यावर पत्ता लागला की ती घाटकोपरला थांबणार नसून एकदम कु र्ल्याला थांबणार आहे ! मी दीक्षितांना विचारलं, आता तुम्ही
घाटकोपरला कसे उतरणार ? दीक्षितांनी लगेच काहीच उत्तर दिलं नाही. मग एकदम नाकाशी आडवे बोट धरून त्यांनी श्वास तपासला आणि म्हणाले गाडी
घाटकोपरला थांबेल !
यानंतर आम्ही दुस-याच विषयावर बोलत राहिलो. गाडी एका मागोमाग एक स्टेशन्स मागे टाकत चालली होती. मग कधीतरी कमी वेगाने धावू लागली.
आणि काही मिनिटात मधेच थांबली. कु र्ला आलं असावं म्हणून मी बाहेर डोकावून बघू लागलो. एवढ्यात दीक्षित आपल्या कु टुंबासह उठले. मो आश्चर्यानं
विचारलं, उत्तरताय ? आता पुन्हा घाटकोपरसाठी मागे जावं लागेल.दीक्षित माझ्याकडे बघून हसले. आणि म्हणाले,बाहेरच्या स्टेशनवरचा बोर्ड वाचून बघ
नीट. मी मुद्दाम बोर्ड बघितला आणि चाट झालो. ते घाटकोपरच होतं ! सिग्नल नसल्यामुळे गांडी जी थांबली ती नेमकी स्टेशनातच! मी पुन्हा मान वळवन
दीक्षितांकडे बघणार एवढ्यात दीक्षित प्लॅटफॉर्मवर उतरूनही गेले होते !!
मला शिवस्वरोदयशास्त्र म्हणजे काय ते सांगता का ?मी भाऊं ना विचारले. आणि भाऊं नी सांगायला सुरवात के ली,
आत्म्याची ओळख पटविणाऱ्या अघोर तंत्राच्या अभ्यासाच्या सुरुवातीस सहा महिने शिवस्वरोदयशास्त्र शिकावे लागते. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात अंभृणी
ऋषींची कन्या वाक् किं वा वागंभृणी हिने देवीसूक्तम लिहिलं. हा ग्रंथ म्हणजे देवीतंताच्या उपासकांचा आद्यग्रंथ आहे. दुर्गा सप्तशती हा त्याचाच भाग आहे.
त्यातच चौसष्ट तंत्रविद्या सांगितल्या आहेत. त्यात नाडिज्ञान नावाचा एक तंत्र आहे. या नाडिज्ञानाच्या पहिल्या खंडातल्या चौतिसाव्या श्लोकातल्या १६
व्या पल्लवान स्वरज्ञानम् नावाचा उपभाग आहे. हे स्वरज्ञानम् म्हणजेच शिवस्वरोदयशास्त्र होय !
मनुष्याचे जीवन हे एक द्वंद्व आहे. उदय-अस्त, ग्रीष्म-वर्षा, दारिद्रय- श्रीमंती, यश- अपयश, दिवस-रात्री, झोप जागृती, सुख-दु:ख, जन्म-मृत्यू आणि
चंद्रनाडी- पूर्वनाडी या द्वंद्वातच माणूस अडकलेला असतो. यातून अनेक प्रश्न त्याच्या समोर उभे राहतात आणि शेवटचे जे चंद्रनाडी व सूर्यनाडीचे द्वंद्व आहे
ते जिंकता आले तर है सर्व प्रश्न सुटतात ! शिवस्वरोदय म्हणजे हे शेवटचेच द्वंद्व होय !
शिवस्वरोदय हे शास्त्र शरीराची अंतर्गत रचना आणि विविध इंद्रियांना प्राणशक्तीचा पुरवठा कसा होतो त्या निरीक्षणावर आधारलेले म्हणजेच प्रामुख्याने
प्राणायाम साधनेने प्रकट होणारे असे शास्त्र आहे. नुसते शिव- स्वरोदयशास्त्र अथवा नुसते योगशास्त्र अभ्यासल्याने या दोन्ही विषयांचे खरे ज्ञान होणे शक्य
नाही. विषयाचे अनुभवयुक्त उत्कृ ष्ट ज्ञान होण्यासाठी आपण काही निरीक्षणे व प्रयोग करून पाहणे हे चांगले.
एक चिकित्सा करा, की आपण स्वतः नेहमी काय करीत असतो त्या गोष्टीबद्दल चिंतन करा, तेव्हा असे आढळते की, खाणे-पिणे, दुःख इत्यादी भावना,
चालणे, थांबणे वगैरे कोणत्याही गोष्टी आपण सतत करीत नसतो; रात्रंदिवस आपण सतत अशी एकच क्रिया करीत असतो ती क्रिया म्हणजे श्वसनक्रिया
होय !श्वसनक्रियेस बंद के ल्यास मृत्यू येतो. म्हणून जिवंत असेपर्यंत (प्रत्येक सजीव जिवंत असतो तोपर्यंत) सतत श्वास घेत असतो व सोडू न देत असतो.
यावरून श्वसनक्रिया ही अतिशय महत्त्वाची क्रिया आहे, याबद्दल कोणाचीही खात्री पटल्यावाचून राहणार नाही.
आता दुसरे चिंतन स्वतःच्या विचार शक्तीबद्दल करून पाहा. असे आढळते की आपण सतत विचार करीत असतो. विचाराशिवाय राहणे हे आपणास
अशक्यच वाटेल. विचार थांबविण्याचा आपण प्रयत्न करून पाहा. असे आढळते. की, विचार थांबवणे ही क्रिया कु त्र्याचे शेपूट सरळ करण्याइतकी अवघड
आहे. अशा प्रकारचे स्वतःबद्दलचे जे चितन के ले जाते तेच आत्मचिंतन होय. आत्मचिंतन करण्यातही माणसाला एकाग्रता धारण करता येते.
वरील दोन निरीक्षणे करण्यास खूप वेळ खर्च करावा लागला तरी हरकत नाही. परंतु ती निरीक्षणे करून दिलेली अनुमाने खरी आहेत याची आधी खात्री
करून घेतल्यास शिव- स्वरोदयशास्त्र प्रत्यक्ष अनुभवण्यास उपयोगी होईल.आता विचारशक्ती किं चितकाल पर्यंत तरी थांबविण्याचा प्रयत्न करावा, त्यांत
हळूहळू यश येते व विचार थांबविता येतो. परंतु थोडा वेळ पर्यंतच विचार थांबविण्याच्या प्रयोगावरच आपण जर चिंतन के लेत तर असे आढळू लागेल की,
जेव्हा विचार थांबलेले असतात त्या वेळेपर्यंत तुमचा श्वास कोंडू न धरलेला राहतो.त्याचीच उलट चाचणी म्हणून आपण श्वास कोंडू न ठेवण्याचा प्रयत्न करा
आणि चिंतन करा. तेव्हा असे आढळेल की, जेव्हा श्वास कोंडू न ठेवला जातो तेवढा वेळ तुमचे विचारही स्थिर होतात, व त्यापासूस तुम्हाला एक प्रकारचे
सुख प्राप्त होते. मनाला शांतता लाभते. असे जर प्रत्यक्ष अनुभवता आले तर तुम्ही जेव्हा जेव्हा निरुत्साही, खिन्न अथवा दुःखी व्हाल व मनाला क्ले श
होतील तेव्हा हा प्रयोग करून मनाला शांती व स्थिरता प्राप्त करून देऊन त्या दुःखावर मात करू शकाल, त्याचप्रमाणे जेव्हा कठीण प्रश्न तुमच्या मनासमोर
असेल तेव्हा सुद्धा मन स्थिर करून पाहिल्यास तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणे सुलभ होईल.
हीच आहे प्राणायामाची कमाल ! ही तर नुसती चुणूक दाखवली गेली. जर तुम्ही प्राणशक्तीवर स्वतःचे नियंत्रण करू शकाल तर तुमच्यासमोर कोणतीही
अडचण अशो राहणारच नाही. योगी लोकांना कोणताही त्रास व दुःख भेडसावत नसते. याचे कारण त्यांचे स्वतःच्या प्राणावर स्वतःचे नियंत्रण असते.
तुम्ही तुमचा श्वास जास्त वेळ कोंडू न ठेवण्याचा प्रयत्न के लात तर लगेच तुमच्या लक्षात येते की, तुमची स्वतःची इच्छा असली तरी तुम्ही जास्त वेळ
श्वास कोंडू न धरू शकत नाही. आयत्या वेळी तुमचे नियंत्रण सुटते व एकदम उच्छ्वास बाहेर येतो आणि अनियंत्रितपणे भराभर श्वासोच्छ्वास होऊन तुम्हाला
धाप लागते, अशा प्रकारे प्राणायाम ही एक उपयुक्त साधना असली तरी, व प्रयत्नाने ती साध्य होऊ शकणारी असली तरी, अवघड आहे. आपण प्राणायाम
साध्य व्हावा म्हणून नाहक गडबड, घाई करू नये; कारण योग्य प्रकारे प्राणायाम झाला नाही तर तुमच्या अंगाला विनाकारण थरकाप होणे, एकाएकी
घामाघूम होणे, कसली तरी भीती वाटण वगैरेसारख्या अनिष्ट गोष्टीची व्याधी उपस्थित व्हायची . तरीही विनाकारण प्राणायाम या साधनेपासून अलिप्त राहणे
हेसुद्धा योग्य नाही. प्रत्येकाने प्राणायाम जरूर करावा.
पुन्हा एक नवे निरीक्षण सातत्यान करण्यासारखे आहे. ते म्हणजे आपण जेव्हा श्वासोच्छ्वास करतो तेव्हा त्या क्रियेवर सतत लक्ष देणे. असे के ल्यास
आपल्या लक्षात यॆॆतॆ की, रात्रं- दिवस आपण दोन्ही नाकपुडयांद्वारे श्वासोच्छ्वास करीत नसून कित्येक वेळा के वळ उजव्याच, तर कित्येक वेळा के वळ
डाव्याच अशा एकाच नाकपुडीद्वारे श्वासोच्छ्वास करीत असतो. मध्ये काही वेळा दोन्ही नाकपुंडघांद्वारे श्वासोच्छ्वास चालू असतोच. अशा रीतीने आपण
तीन प्रकारे श्वासोच्छ्वास करीत असतो हे निरीक्षण मोठे आश्चर्यकारक आहे.
आपल्याला दोन कान आहेत त्याची कारणमीमांसा करायची झाल्यास आपण असे म्हणू शकतो की, दोन्ही बाजूंचे ध्वनी ऐकता यावे म्हणून दोन कानांची
आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे दोन हात हॆ विविध कार्यासाठी उपयोगी आहेत. दोन पाय असल्यामुळे आपल्याला चलनवलन शक्य होते, तसेच दोन डोळे
असण्याचे प्रयोजन काय ? याचेही विश्लेषण असे करता येते की, दोन डोळ्यांमुळे त्रिमितीची (थ्रिडायमेशनल) जाणीव होते. म्हणजेच पदार्थीची जाडी,
लांबी-रुं दी, उंची असे आकाराचे ज्ञान होण्यासाठी दोन डोळे असणे आवश्यक आहे.
अशा प्रकारेच दोन नाकपुड्या असण्याचे प्रयोजन काय असावे ? याचे उत्तर शरीरशास्त्राने अजून पाहिले नाही; परंतु शिवस्वरोदय या आपल्या प्राचीन
शास्त्राने त्याचे महत्त्व शोधून हजारो वर्षे झाली !
दोन नाकपुड्यांवाटे श्वास चालतो तेव्हा आपल्या शरीरात विशिष्ट क्रिया घडत असतात व त्याचे परिणाम आपल्या जीवनावर होत असतात. एका बाजूला
मुक्तीसाठी जिवाची धडपड असते तर दुसऱ्या बाजूला जीवनाची ओढ असते, या रस्सीखेचीत आपले आचार- विचार भिन्न होत असतात व देहातही विशिष्ट
घडामोडी व त्याचा परिणाम होऊन कधी फक्त डाव्याच नाकपुडीद्वारे तर कधी के वळ उजव्याच नाकपुडीद्वारे श्वसन चालते. आणि दोन्ही नाकपुड्यांच्या
साहाय्याने आपले श्वसन फारच कमी वेळ चालत असते. निरोगी व्यक्तीचे दोन्ही नाकपुड्यांद्वारे चालणारे श्वसन हे के वळ ५ ते १० पळे इतके म्हणजे सुमारे
चोवीस सेकं द इतके कमी वेळ असते. यापेक्षा जास्त वेळ जर दोन्ही नाकपुड्यांद्वारे तुमचे श्वसन चालत असेल तर आपले आरोग्य बिघडण्याची व आपणास
रोगव्याधी होण्याची अवस्था जवळ आली असी त्याची ती एक खूण आहे असा शिव- स्वरोदयशास्त्राचा अनुभव आहे.
नाडी - श्वसन ज्या मार्गाने होते त्या प्राणवायु वाहून नेणा-या मार्गाला नाडी असे म्हणतात. प्राणवाहक अशा एकू ण दहा
नाड्या असून (त्यात तीन प्रमुख नाड्या आहेत) त्यांची नावे अशी : (१) इडा (२) पिंगला (३) सुषुम्ना (४) गांधारी ( ५ ) हस्तिजिव्हा (६) पूषा (७)
यशस्विनी (८) अलंबुषा (९)कु हू (१०) शंखिनी.
या दहा नाड्यांपैकी तीन प्रमुख या म्हणजे इडा पिंगला व सुषुम्ना या होत. त्यांची मुखे नाकात उघडलेली आहेत (किं वा त्यांची टोके नाकात आहेत असे
म्हटले तरी चालेल). त्या तिन्हींपैकी इडा नाडीचे डाव्या नाकपुडीजवळ उघडते, पिंगला नाडीचे टोक उजव्या नाकपुडीजवळ उघडते व दोन्ही नाकपुड्यांनी
श्वसन चालते तेव्हाच प्राणवायू सुषुम्ना नाडीच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो.
प्राणशक्ती ही खरोखरीच एक शक्ती अस्तित्वात असून संपूर्ण विश्व तिने भरलेले आहे. प्राणवायुयुक्त हवा आपण घेत असतो तेव्हा ही शक्ती आपण घेत
असतो, परंतु प्राणवायूच्या साहाय्याने शरीरातील अन्नपदार्थाचे मंद ज्वलन होत राहते व शरीरास कार्यशक्ती मिळते त्याप्रमाणेच शरीरात प्राणशक्तीचे प्रवाह
विविध कें द्रांतून होत असतात. जसे रक्त सर्व शरीरभर फिरत असते तशीच ही प्राणशक्ती विविध कें द्रांतून फिरते त्या कें द्रांना चक्रे असे नाव आहे. त्या
चक्रांची नावे अशी : आधारचक, स्वाधिष्ठान- चक्र, मणिपूरचक्र, अनाहतचक्र, विशुद्ध चक्र, मनश्चक्र, ब्रह्मरंध्रचक्र, ब्रह्मचक्र, महापद्मचक्र, विराटचक्र,
तालुका दशसहार मार्ग कें द्र, बलवानचक्र, आज्ञा- चक्र, अमृतचक्र, ब्रह्मद्वार इत्यादी. या चक्रांतून प्राणशक्तीचे प्रवाह फिरत राहतात. परंतु त्यावर आपले
नियंत्रण नसते. म्हणजेच विशिष्ट कारणांसाठी ज्या चक्रातून प्राणशक्ती वाहणे आवश्यक असते त्या वेळी त्याऐवजी भलत्याच चक्रातून ती वाहते. त्यामुळे
आपले जीवन सुख-दुःखाच्या परिणामांनी भरलेले असते व आपण परावलंबी अथवा पराधीन अवस्थेत असतो. जरा आपण योग्य चक्रातून स्वेच्छेप्रमाणे
प्राणशक्ती फिरवू शकलो तर आपणास अनेक सिद्धी प्राप्त होतील. शिवाय प्राणशक्ती ही अव्यक्त अशी शक्ती असल्याने तिचे नियंत्रण करणे अवघड असते.
परंतु प्राणवायूचे प्रवाह जसे वाहतात, त्या आधाराने किं वा त्याप्रमाणेच शरीरातून प्राणशक्तीचे प्रवाह बाहतात हे आपले भाग्य होय. प्राणवायू व हवा आपण
स्थिर करू शकतो व त्यामुळे प्राणशक्तीसुद्धा इच्छित दिशेने वाहवू शकतो ! म्हणून प्राणायामाच्या क्रियेचा मूळ आधार श्वासोच्छ्वास हाच आहे.
प्राणशक्तीचे स्वरूप मी स्पष्ट के ले. आहे परंतु पुन्हा सूचना करावीशी वाटते की, जो प्राणवायू व प्राणशक्ती यात भेद आहे तो विचारपूर्वक लक्षात घ्यावा.
प्राणवायू हा प्रयोगशाळेत तयार करता येतो व त्याच्यावर प्रयोग करता येतात तसे प्राणशक्तीबद्दल शक्य नाही. आत्मा हा प्रत्येकाला असून त्याचे प्रत्यंतर
घेणे जसे अवघड आहे तसेच प्राणशक्तीबद्दल आहे
प्राणशक्तीची विविध कार्ये आपल्या शरीरात चालतात त्यानुसार प्राणाचे विविध प्रकार आहेत. प्रत्यक्षतः सर्व प्राण सारखेच आहेत हे महत्त्वाचे आहे. विविध
प्राणांचे प्रकार पाच असून शिवाय पाच उपप्राण आहेत.
प्रमुख प्राणांची नावे अशी १) प्राण, २) अपान, ३) व्यान, ४) उदान, ५) समान. अशा प्रकारे पंचप्राण आपल्या देहाचे विविध हेतू पूर्ण करीत असतात.
१) प्राण हृदयात असतो २) अपान गुदस्थानात असतो ३) समान नाभिस्थानात
असतो ४) उदान कं ठस्थानात असतो ५) व्यान सर्व शरीरात व्यापून असतो.
(१) नाग २) कू र्म ३) कृ कल ४) देवदत्त ५) धनंजय. हे पाच उप प्राण कर्मास मदत करतात. नाग वायूमुळे ढेकर देणे ही क्रिया होते. कू र्मवायूमुळे नेत्रांची
उघडझाप होते म्हणजेच पापणीच्या हालचाली आपोआप व पुनःपुन्हा होत असतात त्यांचा सूत्रधार कू र्मवायू आहे. कृ कल या उपप्राणामुळे शिंक येण्याची
क्रिया घडते. देवदत्तवायूमुळे आपणास जांभई येत असते. धनंजय हा वायू मृत्यू झाल्यानंतरही आपला अधिकार देहावर ठेवतो, म्हणजेच मृत्यू होऊन गेला
तरी त्या देहात हा उपप्राण खूप वेळ राहिलेला असतो. त्यामुळे मेलेला मनुष्य पुन्हा जिवंत करायचा आसल्यस त्याच मृतात्म्याला पुन्हा स्वतःचा देह
लवकर व्यापून घेता येतो; असे जर नसते तर इतर मृतात्म्यांनी देहाच्या लोभामुळे मृत देह बळकावला असता !अशाप्रकारे मृत्यूनंतरचे देहाचे रक्षण करणारा
धनंजय हा उपप्राण सर्व शरीरात व्यापून राहिलेला आहे.
आपण शास्त्रात असे शिकलो आहोत की जेव्हा सूर्यमालिका नव्हती, कोणतेही तारे व आकाशगंगा आदी काहीच निर्माण झाले नव्हते तेव्हा काय होते?
काहीच नव्हते असे नाही, तर तेजस्वी असे धुलीकण अथवा अणुकण संपूर्ण आकाशाच्या पोकळीत भरून राहिलेले होते. त्यांच्यात जेव्हा हालचाल (वायू)
झाली तेव्हा एकमेकांचा आकर्षण- विकर्षण याचा समतोल ढळून तारे तयार होण्याची प्रक्रिया घडत राहिली त्यामुळे अणुकणांची प्रचंड वादळे झाली व
तेजोगोल निर्माण होऊ लागले. पुढे तेथे तारे उत्पन्न झाले व त्यांच्या समूहाच्या आकाशगंगा निर्माण झाल्या. ता-यांच्या स्वतःच्या ग्रहमाला तयार झाल्या,
आणि अशीच आपली एक पृथ्वी तयार झाली. पृथ्वी थंड झाल्यानंतर तिजवर प्रथम वनस्पती व नंतर प्राणीसृष्टी तयार झाली. या क्रियेला अब्जावधी वर्षे
लागली. याचप्रमाणे शिवस्वरोदयात अगर योगशास्त्रात किं वा तर्क शास्त्रात किं वा तत्त्वज्ञानातही तत्त्वांची उत्पत्ती प्रथम झाल्याचे मान्य आहे. हो तत्त्वॆ
म्हणजेच पंचमहाभूते होत. त्यांची नावे : १) आकाशतत्त्व २) अग्नितत्त्व ३) वायुतत्त्व ४) जलतत्त्व ५) पृथ्वी (ऊर्फ मृत्तिका अथवा घन ) तत्त्व.
जेव्हा अगदी पूर्वी काहीच नव्हते अशी अवस्था होती तेच पहिले आकाशतत्त्व (ऊर्फ पोकळी) होय. त्या आकाशतत्त्वात वायुतत्त्वाचा उदय झाला म्हणजेच
आकाशतत्त्वात सर्वत्र जी शक्तीची शून्य अवस्था होती ती ढळली गेली. त्यामुळे समतोल तुटला व वाहू लागला म्हणजेच स्थिरत्वांत गती निर्माण झाली.
त्यानंतर गतीची वाढ होऊन त्यात शक्तीची वादळे झाली व उष्णता अथवा अग्नी यांचा प्रभाव उमटू लागला ते अग्नितत्त्व होय. त्यानंतर अग्नितत्त्वाचा प्रभाव
ज्या ठिकाणी जितका जास्त झाला तितक्याच प्रमाणात विरुद्ध बाजूस थंडी निर्माण झाली, आणि पदार्थ सूक्ष्मरूपातून जड स्वरूपांत बदलू लागले त्यामुळे
जलतत्त्व ऊर्फ प्रवाही पदार्थाची स्थापना झाली हेच जलतत्त्व होय. याच जलतत्त्वातून आणखी घन स्वरूप पुढे निर्माण झाले व ते पृथ्वीतत्त्व ऊर्फ
मृत्तिकातत्त्व ऊर्फ घनतत्व होय.
कोणताही घनपदार्थ अतिशय तापवला तर तो विरघळून त्याचा रस तयार होतो, त्याला पुन्हा आणखी तापवले तर त्याची वाफ होऊन ते वायु स्वरूपात
बदलते आणि त्याच पुढचे स्वरूप शक्तीत विलीन होते म्हणजेच अग्नी ही एक शक्ती आहे त्याप्रमाणे पदार्थाचे शक्तीत रूपांतर होते, ती शक्ती काही तरी कार्य
करून शून्यत्व अथवा समतोल धारण करून राहते.. म्हणजे पुन्हा घनपदार्थापासून आकाश तत्त्वापर्यन्त स्थित्यंतरे होऊ शकतात.
आता देहाबद्दल जर विचार के ला तर असे आढळते की, देह हासुद्धा पंचतत्त्वांपासूनच तयार झालेला आहे व देहात अस्थि (हाडे), मांस,त्वचा, नाडी व रोम
इत्यादी आहेत ते घन पदार्थ होत म्हणजेच ते पृथ्वी- तत्त्वाचे ( देहातील) स्वरूप होय. याच प्रमाणे वीर्य, रक्त, मज्जा, मुत्र व लाख इत्यादी रस है देहातील
जलतत्त्वाचे स्वरूप होय, क्षुधा, तृषा, कांति व आळस इत्यादी गुण म्हणजेच देहातील अग्नि तत्त्वाचा प्रभाव होय. त्याचप्रमाणे धावणे, चलनवलन, स्फु रण,
आखडणे आणि पसरणे इत्यादी रूपाने वायु तत्त्व आपल्या देहात आहे. राग, लज्जा, भीती, आणि मोह इत्यादी गोष्टी के वळ भ्रामक असून त्या रूपाने देहात
आकाश तत्त्व आहे. अशा प्रकारे देहातही पंचतत्त्वांचा प्रभाव अथवा अस्तित्व आहे.

पंचतत्त्वांचा सतत आपणावर प्रभाव असला तरी एका वेळी कोणत्या तरी एकाच तत्त्वाचा जास्त प्रभाव असतो व इतर तत्त्वे तेवढ्यापुरती सौम्य आणि
त्यांच्या रूपाने राहतात प्रभावानुसार आपले आचारविचार व कृ ती घडतात.
शिवस्वरोदयशास्त्र नाडी आणि तत्त्वॆ यांच्या प्रभावाने भविष्य कसे जाणावे याचा विचार करते. इडा नाडी चालू असेल म्हणजेच डाव्या नाकपुडीद्वारे श्वसन
चालू असेल तेव्हा जर तत्वॆ विचारांत घेतली तर त्यात पाच पर्याय अथवा पाच प्रकार होतात.
(१) इडा नाडी - पृथ्वीतत्त्व, (२)इडा नाडी - जलतत्व, (३)इडा नाडी - अग्नितत्त्व ,(४)इडा नाडी - वायू तत्त्व,
(५) इडा नाडी- आकाशतत्त्व याप्रमाणेच पिंगला नाडी व विविध तत्त्वे यांचेही पाच प्रकार होतात व सुषुम्ना नाडीबरोबरही तत्त्वांचे पाच प्रकार होतात असे
एकू ण १५ पर्याय झाले.
इडा नाडीला चंद्रनाडी व पिंगला नाडीला सूर्यनाडी अशा पर्यायी संज्ञा आहेत; कारण चंद्रसूर्याचा प्रभाव आपल्या देहावर होतो तसा तो श्वसन- क्रियेवरही
होतो. शुक्ल पक्षात रात्रीच्या वेळी भाग्यवान माणसाची उजवी नाकपुडीच चालू असते म्हणजेच त्याला पूर्ण चंद्रबल असते व उजव्या नाकपुडीच्या श्वसनामुळे
पूर्ण सूर्यबल मिळते.
अशा प्रकारे त्या माणसाला कोणत्याही कार्यास शुभ वेळ प्राप्त होते.
याउलट कृ ष्ण पक्षांत रात्री चंद्राचा प्रभाव नसतो तेव्हा रात्री डावी नाकपुडी अथवा चंद्रनाडी चालणे चांगले समजले जाते. कारण जेव्हा चंद्रनाडी चालू असते
तेव्हा देहातून चंद्रशक्तीचा प्रभाव असतो व सूर्यनाडी चालू असते तेव्हा देहातून सूर्यशक्तीचा प्रभाव असतो. अशा प्रकारे देहातून चंद्रसूर्याच्या बाह्य
अस्तित्वाला प्रतिसाद दिला जातो ही आश्चर्याची गोष्ट आहे !
एकच नाडी सतत चालू नसते है मी आधीच सांगितले आहे. चंद्रनाडी व सूर्यनाडी आलटू न पालटू न चालू होत असतात. साधारणतः एक नाडी अडीच
घटका चालून बंद होते व पुढे दुसरी नाडी अडीच घटका चालून झाल्यावर बंद होऊन पुन्हा पहिली चालू होते. अशा प्रकारे दिवसा १२ वेळा व रात्री १२
वेळा जे स्थित्यंतर घडते. त्यास संक्रांती असे म्हणतात. अशा २४ आवृत्या दिवस व रात्री मिळून घडतात. अडीच घटका म्हणजे एक तास या हिशोबाने
एके क नाडी अनुक्रमे एक तासभर चालते. देहात चंद्रनाडी वाहते त्याला चंद्राचा उदय ( अथवा प्रभाव ) असे म्हणतात व सूर्यनाडी सुरू होते त्याला सूर्याचा
प्रभाव असे म्हणतात. शुक्ल पक्षांत पहिल्या तीन दिवसांत आपण बिछान्यातून उठताना चंद्रनाडी सुरू असणे हे विशेष शुभ लक्षण असून तो दिवस
आपल्याला सुखाचा व यशाचा असा जातो. कृ ष्ण पक्षांत पहिल्या तीन दिवसांत सूर्यनाडी सकाळी उठताना चालू असणे हे विशेष शुभ होय. परंतु यापेक्षा
सुषुम्ना नाडी चालू असेल तर त्या दिवशी अतिशय त्रास होतो. त्याचप्रमाणे विरुद्ध नाडी चालू असेल तरीसुद्धा दुःखदायक असा दिवस घडतो. म्हणून
दिवसाचा अंदाज घेण्यासाठी बिछान्यातून उठतानाच कोणती नाडी आहे व ती शुभ आहे की नाही हे पाहून त्या दिवशी वागणे चांगले.
एक साधे निरीक्षण तुम्हाला करता येईल. तुम्ही आर्थिक ओढाताण होऊ नये व सुखसंपत्ती मिळावी या इच्छेने लॉटरीचे तिकीट जेव्हा खरेदी करता तेव्हा
लगेच डावी नाकपुडी अथवा चंद्रनाडी चालू आहे की सूर्यनाडी ऊर्फ पिंगला उजवी नाकपुडी चालू आहे किं वा दोन्ही म्हणजे सुषुम्ना प्रवाह चालू आहे ते
सहज पाहा. जर सुषुम्ना नाडी चालू असेल तर लॉटरी तिकीट मुळीच घेऊ नका, किं वा घेतलेत तर ते वाया जाते की नाही ते पाहा.खात्रीने सुषुम्ना नाडी
चालू असताना घेतलेले तिकीट वायाच जाते.
इतके च नव्हे तर तुम्ही शुभ नाडी चालू असताना जर लॉटरी तिकीट घेण्यास गेलात आणि तुमच्या नशिबात तिकीट नसेल ( बक्षीस नसेल) तर लगेच
अशुभ नाडी सुरू होते. म्हणजेच तुम्हाला शिवस्वरोदयाच्या अभ्यासाने नेमकी सूचना कशी मिळते ते लक्षात येईल.
ऑफिसला कामाला निघताना सहज श्वसनक्रियेकडे लक्ष द्या. आणि सकाळी घराबाहेर निघताना चंद्रनाडी चालू नसेल म्हणजे डाव्या नाकपुडीने
श्वासोच्छवास चालत नसेल तर बाहेर अपयश व त्रास होणार अशी पूर्वसूचनाच आहे हे लक्षात घ्या आणि व्यवहार सांभाळून करा.
मी या शास्त्राचा उपयोग करून वरील प्रकारे रोज निरीक्षण करीत असतो. आणि हे शास्त्र चुकल्याचे मला कधीच आढळले नाही. सुषुम्ना नाडी चालू
असताना जेव्हा घराबाहेर निघतो तेव्हा एकदोन गाड्या चुकतात किं वा शेवटची योग्य लोकल गाडी असेल ती नेमकी रद्द झालेली असते, किं वा दोन नंबरच्या
प्लॅटफॉर्म ऐवजी चार नंबरवर येते ! मुंबईतले घोटाळे मुंबईकरच जाणोत ! मरीन लाईनहून चर्चगेटकडे जाणारी गाडी फास्ट होईल की नाही, विरार लोकल
होईल की, अंधेरी लोकल इत्यादी प्रश्न मनात येताच शिवस्वरोदयाचा उपयोग करून पाहिला आहे व योग्य नाडी चालत असेल तेव्हाच मनाप्रमाणे घडते.
विरुद्ध नाडी वाहते तेव्हा कितीही सावधानता ठेवून गेलो तरी नेमकी राखीव गाडी त्याच वेळी लागलेली असते व आपण जावे, ती गाडी बिघडली आहे
म्हणून सायडींगला टाकलेली असते !

आपला देह पंचतत्त्वांपासून झालेला असून रोज विविध वेळी आपल्या शरीरात पंचतत्त्वांचा विशेष प्रभाव असतो. त्याला तत्त्वांचा उदय असे म्हणतात. या
तत्त्वांचा उदय होण्याचा क्रम पुढीलप्रमाणे असतो. प्रथम वायुतत्त्व, दुसरे अग्नितत्त्व, तिसरे भूमीतत्त्व. चवथे जलतत्त्व पाचवे आकाशतत्त्व. प्रत्येक नाडी
आडीच घटका (म्हणजे एक तास) चालते. तेवढयाच अवधीत पाचही तत्त्वे उदय पावतात. अशा प्रकारे पहिल्या तासात समजा चंद्रनाडी सुरु आहे तर
त्यात चंद्रनाडीबरोबर वेगवेगळया वेळी वेगवेगळे तत्त्व चालते. त्या मुळे चंद्रनाडीच्या एकू ण पाच अवस्था झाल्या. त्या पाचपैकी पृथ्वीतत्त्व चालू असतानाची
अवस्था म्हणजे अतिशय फलदायक योग असतो. त्या योगावर अगदी प्रतिकू ल गोष्टीसुद्धा अनुकू ल होतात ! त्याची फलप्राप्ती लगेच मिळणारी असते.
त्याच्याऐवजी चंद्रनाडीत जलतत्त्वाचा उदय असेल तरीसुद्धा शुभ फलच मिळते. व ते लगेच मिळते. पृथ्वी तत्त्वावर आर्थिक फायदा चांगला होतो.
त्याचप्रमाणे वायुतत्त्व व चंद्रनाडी असा पर्याय असेल तर कर्माचे फल मिळत नाही; म्हणून हा योग चांगला नाही. चंद्रनाडीत जर अग्नितत्त्व असेल तर त्या
वेळी के लेले कर्म निष्फळ ठरते, तसे चंद्रनाडीत आकाशतत्त्वाचा उदय असेल तरीसुद्धा कर्म निष्फळ ठरते व शिवाय मनाला नवा त्रास होतो अशा कारणाने
कर्म करताना आकाशतत्त्व, अग्नितत्त्व व वायुतत्त्व या तीन तत्त्वांचा उदय अशुभ समजावा.
चंद्रनाडीनंतर पुन्हा एका तासाने सूर्यनाडी सुरू होते. व त्यांत पाच तत्त्वांचे उदय अनुक्रमे होतात. असे पर्याय असले तरी, दिवसा सूर्यनाडीच कर्म फलाला
योग्य नसल्याने त्यांत शुभ तत्त्व असूनही उपयोग नाही ! दिवसा चंद्रनाडी जे फल देते तसेच फल रात्री चंद्रनाडी देते.
एकं दरीत विचार के ल्यास असे आढळते की, तासांत फक्त दोन तत्त्वांचे उदय शुभफल देणारे आहेत व बाकीची तीन तत्त्वे शुभफल न देणारी व दुःखं उत्पन्न
करणाऱ्या योगाची आहेत ! हे पाहता शिवस्वरोदय जाणून वागणेच कसे शहाणपणाचे आहे ते ध्यानी आले असेलच.
दर दिवसाच्या दोन तासात जर दहा मिनिटेच चांगली, तर २४ तासात फक्त दोनशे चाळीस मिनिटेच शुभवेळेची आहेत. म्हणजेच रोज फक्त चार तास
चांगली वेळ आहे. अशा कारणाने आपल्या बहुतांशी घटना निष्फळ ठरतात. कित्येक घटना आपण चांगल्या अपेक्षेने करून व सावधानता ठेवूनही
तापदायक होतात. म्हणून चांगल्या वेळा नेमक्या ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करण्याचे शिवस्वरोदय- शास्त्र सांगते. पंचतत्त्वाचा उदय ओळखण्याचे प्रकार
शिवस्वरोदयात दिलेले आहेत, त्यांपकी पहिला प्रकार असा, स्वच्छ आरता घ्यावा. शांत चित्ताने दीर्घ श्वास घेऊन त्याचा उच्छ्वास आरशावर सोडावा व
लगेच त्यावर उमटलेली बाष्पाची आकृ ती पाहावी आणि निरीक्षणे करावी.
आरशावर जर चौकोनी आकृ ती उमटलेली असेल तर पृथ्वीतत्त्व आहे असे समजावे. आणि याच निरीक्षणाने ज्या नाकपुडीसमोर आरशावर वाफ साठली
असेल त्यावरून कोणती नाडी चालू आहे तेसुद्धा समजते. दोन वेगवेगळे बिंदू उमटल्यास सुषुम्ना नाडी चालू आहे हे समजावे. (आणि त्यामुळे तुमचे
निरीक्षण बरोबर येण्याची शक्यतासुद्धा गेल्यामुळे हे निरीक्षण पुन्हा वेगळया वेळी करावे.)
अर्धा चंद्र जसा दिसतो तशा प्रकारची आकृ ती जर आरशावर दिसली तर जलतत्त्व चालू असल्याचे समजावे, साधारणत: त्रिकोनी आकृ ती दिसली तर
अग्नितत्त्व चालू आहे असे समजावे. जर वर्तुळाकृ ती उमटलेली दिसली तर वायुतत्त्व आहे असे समजावे. यापैकी कोणत्याच प्रकारची आकृ ती स्पष्ट न
समजल्यास म्हणजेच विचित्र आकृ ती आढळल्यास आकाशतन्व चालू आहे असे समजावे. आकाशतत्वाचे उदयात असंबद्धता असते म्हणून विचित्र आकार
उमटतो.
या पद्धतीने तत्त्वांचे निरीक्षण करताना आरसा जवळ असणे आवश्यक असते. त्यामुळे जेव्हा बाहेरच्या ठिकाणी, प्रवासात अगर ऑफिसात आपण असतो
तेव्हा आरसा असणे अगर जवळ बाळगून अशी निरीक्षणे करणे गैरसोयीचे आहे, म्हणून दुसरा एक पर्याय आहे त्याचा वापर करावा
प्रत्येक तत्त्वाच्या गतीच्या लक्षणामुळे बाहेर येणाऱ्या उच्छ्वासाची दिशा. वेगवेगळी असते म्हणून त्या दृष्टीने निरीक्षण करून तत्त्व ओळखता येते. (१)
मध्यस्थानात उच्छ्वास वाहणे म्हणजे हवा सरळ बाहेर येथे नाकपुडीला बाहेर येणाऱ्या उच्छ्वासाचा स्पर्श जाणवत नाही अशी सरळ हवा बाहेर येते तेव्हा
पृथ्वीतत्व असल्याचे समजतात. (२) नाकपुडीच्या खालच्या बाजूस स्पर्श करून जेव्हा उच्छ्वास चालतो तेव्हा जलतत्व चाल असते. (३) नाकपूडीच्या
वरच्या भागास हवेचा स्पर्श जाणवतो, तेव्हा अग्नितत्त्व असल्याचे स्पष्ट होते. (४) श्वास जर तिरप्या गतीने म्हणजे नाकपुडीच्या बाजूंना स्पर्श करून चालत
असेल तेव्हा वायुतत्त्व समजतात (५) वरीलपकी कोणतेच निरीक्षण आढळले नाही तर म्हणजेच वहन असंबद्धतेमुळे होत असेल तर आकाशतत्व आहे असे
समजतात.
अडीच घटकात पृथ्वीतत्व पन्नास पळे, जलतत्त्व चाळीस पळे, अग्नितत्त्व तीस पळे, वायुतत्त्व वीस पळे आणि आकाशतत्त्व दहा पळे इतका वेळ असतात.
अडीच घटका म्हणजे एक तास या हिशेबाने पाहिल्यास पृथ्वीतत्त्व वीस मिनिटे, जलतत्व सोळा मिनिटे, अग्नितत्त्व बारा मिनिटे, वायतत्त्व आठ मिनिटे व
आकाशतत्त्व चार मिनिटे असते. हे निरीक्षण मूलभूत परिमाण या दृष्टीने आहे. प्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळी वेळ असू शके ल असे मला वाटते.
आपल्या शरीरात पंचतत्त्वांची स्थाने विशिष्ट आहेत, पृथ्वी तत्त्वाचे स्थान कटी (कं बर) हे आहे, या तत्त्वाची देवता ब्रह्म ही आहे. जलतत्त्वाचे स्थान नभी हे
असून तेथे विष्णू या देवतेचे अधिष्ठान आहे. अग्नितत्त्वाचे स्थान हृदय हे असून तेथील अधिष्ठित देवता रुद्र ही आहे. वायुतत्त्वाचे स्थान कं ठ हे असून तेथे
ईश्वराचे अधिष्ठान आहे. आकाशतत्त्वाचे स्थान मस्तकाच्या ठिकाणी आहे. याच दृष्टीने दोन्ही खांद्यांच्या ठिकाणी अग्नितत्त्व आहे. वायुतत्त्व नाभिकमलाच्या
ठिकाणी आहे. पृथ्वीतत्त्व गुडघ्यांच्या ठिकाणी आहे आणि उदकतत्त्व पायांच्या ठिकाणी आहे असे समजावे.
तत्त्वांच्या दृष्टीने चव ठरविलेली आहे. पृथ्वीतत्त्व हे मधुर स्वादाचे कारक आहे. जलतत्त्व तुरट चवीचे कारक आहे, तेजतत्त्व तिखट चवीचे कारक आहे,
वायुतत्त्व आंबट चवीचे कारक आहे व आकाशतत्त्व कडू चवीचे कारक आहे असे ध्यानात ठेवावे. या तत्त्वांच्या उदयात त्या त्या चवीच्या पदार्थाविषयी
आपण महत्त्व देत असतो. तत्त्वांची गती वेगवेगळी असल्याचे आढळते. म्हणजेच उच्छ्वास सोडताना नाकावाटे बाहेर येणारी हवा कमीजास्त जोराने बाहेर
पडते त्यावरूनही तत्त्व ओळखता येते. उच्छ्वास बारा बोटे अंतरापर्यंत जाणवतो त्या वेळी पृथ्वी तत्त्वाचा उदय असतो. जलतत्व चालू असताना उच्छ्वास
सोळा बोटे अंतरा पर्यंत जाणवतो, अग्नि तत्त्वाने वेळी फक्त चार बोटे अंतरापर्यंत उच्छ्वास जाणवतो; याप्रमाणे वायुतत्त्वाची गती आठ बोटे व आकाशतत्त्वाची
गती अस्पष्ट अथवा अनाकलनीय असते.
षण्मुखी या नावाची एक मुद्रा शिवस्वरोदयशास्त्रात सांगितली आहे. ही मुद्रा करण्याची क्रिया पुढीलप्रमाणे आहे :- प्रथम दीर्घ श्वास घ्यावा. नंतर दोन्ही
हातांचे अंगठे कानांच्या छिद्रात दाबून धरावेत. अंगठ्याजवळचे पहिले बोट डोळयावर ठेवून डोळे बंद ठेवावे.. मधली बोटे दोन्ही नाकपुड्यांवर दाबून
धरावीत. राहिलेली बोटे तोंडावर धरून तोंडही बंद ठेवावे. एकू ण या प्रकाराने आत घेतलेला श्वास अगदी कोंडू न ठेवावा. दोन डोळे, दोन कान, नाक व
तोंड असे सहा मार्ग या क्रियेत बंद होत असल्याने ह्या कृ तीला षण्मुखी- मुद्रा असे नाव आहे. श्वास कोंडल्यामुळे जरी नाकावाटे बाहेर येऊ शकला नाही.
तरी तो तोंड, डोळे किं वा कान या ठिकाणी दाब देऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करील म्हणून सर्वच मार्ग बंद के ल्यामुळे तो पूर्णतः कोंडला जाईल. या
कृ तीमुळे जेव्हा जीव लागतो गुदमरु तेव्हा एके क रंग दिसतात. त्या रंगावरून कोणते तत्व उदय झाले आहे ते. ओळखतात. म्हणजे पिवळा रंग दिसतो तेव्हा
पृथ्वीतत्त्व चालू असते. पांढरा रंग दिसतो तेव्हा जलतत्त्व चालू असते. अग्नितत्त्व असेल तर तांबडा रंग दिसतो. वायुतत्त्व असेल तर निळा रंग दिसतो. वरील
चारही तत्त्वे स्पष्टपणे समजली नाही तर विचित्र, रंग दिसतात. त्यावरून आकाशतत्त्व चालले असल्याचे ओळखावे.
हे शास्त्र, तत्त्व ओळखणे आणि नाडी ओळखणे या दोन गोष्टींना महत्त्व देते. नाडी ओळखणे. लवकर जमते परंतु तत्त्व ओळखणे हे अवघड आहे. पण्मुखी
मुद्रा किं वा आरशावर उच्छ्वास सोडू न त्रिकोण, अर्धचंद्र किं वा अनिश्चित आकार असे निरीक्षण करून हळूहळू तत्व ओळखता येते. इनके समजल्यानंतर
कोणत्या नाडीत कोणते तत्त्व आहे व तो योग किती शुभ आहे किं वा किती अशुभ आहे हे ओळखून आपल्या जीवनाच्या यशापयशावर प्रकाश पडतो.
तसेच कोणतीही शुभाशुभ गोष्ट घडताना श्वास आत घॆणॆ व श्वास बाहेर सोडणे या दोन गोष्टीत "श्वास आत घेताना "हे जास्त महत्वाचे आहे. समजा,
चंद्रनाडी सुरू आहे व जल अथवा पृथ्वी ही उपयुक्त शुभतत्त्वॆ सुद्धा उदयात आहेत परंतु प्रत्यक्ष क्रिया करताना जर तुम्ही उच्छ्वास बाहेर सोडत असाल तर
कार्याचा नाशच होईल. परंतु जर कार्य करताना श्वास आत घेतला जाईल तर सर्व शुभयोग बरोबर जमला ! म्हणून शुभवेळी शुभ अपेक्षेचे कर्म करताना
श्वास आत घेण्याची क्रिया होणे महत्त्वाचे आहे.
दान देताना पुण्यप्राप्तीची जर अपेक्षा असेल तर श्वास आत जाण्याच्या वेळीच दान देण्याचे कृ त्य व्हावे, यावरून
वरचे विवेचन ध्यानात येईल. कोणत्या वारी कोणती नाडी चालणं आवश्यक आहे याचा विचार सांगितला आहे.
त्यानुसार गुरु, शुक्र, बुध आणि सोम या वारी चंद्रनाडी चालू असताना विशेष शुभयोग असतात. चंद्रनाडीचे हे वार शुक्ल पक्षात आणखीनच जास्त शुभ
समजावेत. सूर्यनाडी जॆव्हा रविवार, मंगळवार आणि शनिवार या तीन दिवसात चालते तेव्हा चांगले योग असतात, शिवाय कृ ष्ण पक्षातले हे वार सूर्य
नाडीच्या उदयास विशेष चांगले योग दॆतात.
नाडी जशी चालू राहते त्यानुसार कोणत्या दिशेकडे शुभ घटना होती या संबंधीची विचारही लक्षात ठेवावा पूर्व आणि उत्तर या दिशेस जाताना मात्र चंद्रनाडी
चालू असणे चांगले नसते. शत्रूकडू न धोका उत्पन्न होतो. दक्षिण व पश्चिम या दिशांना सूर्यस्वरावर जाऊ नये, कारण चंद्रनाडीचा प्रभाव पूर्व व उत्तरेला तर
सूर्यनाडीचा प्रभाव दक्षिण व पश्चिमेला असतो.
समजा, शुक्ल पक्ष असेल तर त्या दिवशी चंद्रनाडीची वेळ शुभ आहे. परंतु ती ज्या एक तासभर चालू राहणार आहे त्या वेळेत पाच तत्त्वांचे अंमल अथवा
प्रभाव असतोच; पृथ्वी- तत्व ५० पळे म्हणजे २० मिनिटे, जलतत्त्व ४० पळे म्हणजे सोळा मिनिटे चालेल, अग्नितत्त्व १२ मिनिटे म्हणजे ३० पळे चालेल,
वायुतत्त्व २० पळे म्हणजे आठच मिनिटे असेल व आकाश तत्त्व दहा पळे म्हणजे चार मिनिटे असेल. याप्रमाणे वेळ विभागला असला तरी अनुक्रम पहिले
वायुतत्त्व, दूसरे अग्नितत्त्व, तिसरे पृथ्वीतत्त्व, चवथॆ जलतत्त्व व पाचवे आकाशतत्त्व असा असल्याने एका तासाच्या वर्गीकरणाचा अनुक्रमही असाच असेल.
म्हणजेच चंद्रनाडीतील एका तासाला पहिली आठ मिनिटे वायुतत्त्वाची झाली; त्यानंतर बारा मिनिटे अग्नितत्त्वाची होतील, त्यानंतर वीस मिनिटे पृथ्वी
तत्त्वाची, सोळा मिनिटे जलतत्त्वाची, शेवटची चार मिनिटे आकाशतत्त्वाची झाली. असे वर्गीकरण झाल्यानंतर योग चांगला कोणता व वाईट कोणता ते
ठरवावे.
चंद्रनाडी + पहिली आठ मिनिटे वायुतत्त्व - अशुभ योग पण चर कार्यास ठीक. २) चंद्रनाडी+नंतरची बारा मिनिटे अग्नितत्त्व -अशुभ वेळ,
चंद्रनाडी+वीस मिनिटे पृथ्वीतत्त्व→ अत्यंत शुभ वेळ, स्थिर कार्यासाठी. ४) चंद्रनाडी+बारा मिनिटे जलतत्त्व -अत्यंत चांगला लाभयोग लगेच शुभ होते..
५) चंद्रनाडी चार मिनिटे आकाशतत्व - सर्व कार्याचा नाश होणारी वेळ, के वळ ईश्वरचिंतनास योग्य.
असा चंद्रनाडीचा योग असला तरी त्यातली विशिष्ट छत्तीस मिनिटेच शुभयोग संभवतो, म्हणून नाडी आणि तत्त्वे या दोन गोष्टींचा विचार के ला तरच
शिवस्वरोदयशास्त्र अचूक मार्गदर्शन करू शके ल. याच तासाची आवृत्ती एका आड एक याप्रमाणे होईल.
कारण नंतरचा एक तास सूर्यनाडी सुरू होईल व तिचा एक तास झाल्या नंतर पुन्हा चंद्रनाडी सुरू होईल. सूर्य- नाडीचेही निरीक्षण लक्षात घ्यावे. (१)
सूर्यनाडी + आठ मिनिटे वायुतत्त्व अशुभ योग २) सूर्यनाडी+ बारा मिनिटे अग्नितत्त्व → घात व दुष्ट कार्यासाठी चांगला योग ३) सूर्यनाडी+वीस मिनिटे
पृथ्वीतत्त्व - रात्रीच्या वेळी अत्यंत शुभयोग ४) सूर्यनाडी+सोळा मिनिटे जल तत्व -रात्रीच्या वेळी चांगलायोग ५)सूर्यनाडी+चार मिनिटे आकाशतत्त्व-
अतिशय घातकी वेळ.
यावरून लक्षात ठेवावे की आधी सांगितलेल्या योग्य वारी कृ ष्ण पक्षात रात्रीच्या वेळी व दिवसा सूर्यनाडी वरीलप्रमाणे योग देईल व चंद्रनाडी शुक्ल पक्षात योग्य
वारी विशिष्ट वेळी अगदी चांगले योग देते. अशा प्रकारे दिवसा व रात्री के व्हा के व्हा काय काय करावे ते लक्षात घ्यावॆ.
चंद्रनाडी व सूर्यनाडी जालटू न पालटू न एके क तास चालतात असे जरी सांगितले असले तरी जेव्हा एक नाडी बंद होऊ लागते व दुसरी नाडी सुरू होऊ
लागते तो बदल काही एकच श्वासात न घडता अनेक श्वासोच्छ्वासात हळूहळू घडतो, आणि त्याच प्रकाराला सुषुम्ना नाडीचा कालावधी असे संबोधतात.
सुषुम्ना नाडी ही सर्वच कार्याला अशुभ असल्याने त्या वेळी काहीच करू नये असे म्हणतात, आणि फक्त ज्याला योगविद्येची प्राप्ती लवकर करायची असेल
त्याने आपली साधना सुषुम्ना नाडीवरच करावी. ही नाडी तत्त्वे या दोहोंचा विचार के ल्यास १) सुषुम्ना नाडी+आठ मिनिटे वायू- तत्त्व, वाईट योग २)
सुषुम्ना+बारा मिनिटे अग्नितत्व, वाईट योग ३) सुषुम्ना + वीस मिनिटे -पृथ्वीतत्त्व वाईट योग ४) सुषुम्ना + सोळा मिनिटे -जलतत्त्व, वाईट योग ५)
सुषुम्ना + चार मिनिटे -आकाशतत्त्व वाईट योग परंतु योगाभ्यासाला चांगला !
वरील निरीक्षणात असे आढळते. की ज्याला आध्यात्मिक प्रगती भराभर करायची असेल त्याने सुषुम्नानाडी व आकाशतत्त्व या योगाची संधी साधल्यास
फक्त चार मिनिटे साधना करावी. संपूर्ण सुषुम्ना नाडी योग साधण्यासाठी चांगली आहे, शिवाय प्रत्येक तासात नाडी कोणतीही असली तरी आकाशतत्त्वाची
चार मिनिटे आध्यात्मसाधना करावी. शिवस्वरोदयशास्त्राचॆ हे निरीक्षण आणि योगशास्त्रातला प्राणायाम यांचा कसा पक्का मेळ आहे हे सहज पाहता येईल.
प्राणायामाच्या क्रियेत श्वास सूर्य नाडीने आत घेतात व कुं भक म्हणजे श्वास रोखून ठेवण्याची क्रिया करून नंतर चंद्रनाडीने हळूहळू उच्छ्वास सोडतात व
काही क्षण थांबून चंद्रनाडीने आत घेतात. पुन्हा कुं भक करून उच्छ्वास सूर्यनाडीने सोडतात असे वारंवार करणे हा योगशास्त्राचा अभ्यास आहे, व
शिवस्वरोदयशास्त्राप्रमाणे स्वप्रयत्नाने सुषुम्नानाडी चालू करण्याचाच हा एक अर्थ आहे.
प्रत्यक्ष शिवस्वरोदयानुसार सुषुम्ना नाडी चालू असण्यापेक्षा इतर नाड्या चालू असणे हेच कोणीही पसंत करील, कारण त्यामुळे जीवनाचा उपभोग चांगल्या
रीतीने मिळेल. पण योग शास्त्राला जीवनाच्या उपभोगापेक्षा सुषुम्नाप्रवाह चालू करून योगाभ्यास लवकर व चांगल्या प्रकारे करण्याची इच्छा आहे. हा
परस्परविरोध असल्याने शिवस्वरोदय हे शास्त्र योगाइतके पुढे आलेले दिसत नाही.
आपण आधी पाहिले की, एका तासात चंद्र व सूर्य नाडी यांचे प्रवाह सुरू व्हावे अशी अपेक्षा असली तरी प्रत्यक्षतः एका नाडीचा अस्त व दुसऱ्या नाडीचा
उदय ह्या संक्रमणाच्या वेळी सुषुम्ना प्रवाह सुरू होतो परंतु प्रत्यक्षत
तेवढयाच वेळेपुरता सुषुम्नाप्रवाह चालू होतो असे नसून तो वाटेल तसा चालू होतो, हे माझे अनुभवसिद्ध निरीक्षण आहे. चंद्रनाडी चालू असण्याच्या वेळी
आपल्याला एखादे इच्छित फळ मिळणार नसेल तर त्या वेळी लगेच दुसरा प्रवाह सुरू होतो व सुषुम्ना प्रवाहात रूपांतर लगेच होते, आणि आपल्या त्या
कार्याचा नाश झाल्याबरोबर लगेच पुन्हा चंद्रनाडीच सुरू होते ! हे खरोखरी आश्चर्य आहे. चंद्रनाडी व सूर्यनाडी यांच्यामध्ये सुषुम्ना नाडी कशी योजली
आहे ? सूर्यनाडीची चंद्रनाडी लगेच होऊ शकत नाही. चंद्र नाडीची सूर्यनाडी लगेच होऊ शकत नाही. पण चंद्रनाडीची सुषुम्ना नाडी लगेच होते,
सूर्यनाडीची सुषुम्ना नाडी लगेच होते, हे पाहता प्रत्यक्षतः सुषुम्ना नाडीचे वैशिष्ट्य अगदी खास असे आहे. आणि सुषुम्ना नाडी हाच खरा आपल्या
जीवनावर ठेवलेला एक नियंत्रक आहे ! तसे जर नसते तर एकदा चंद्रनाडीचे व एकदा सूर्यनाडीचे प्रत्येकी ३६ मिनिटे शुभ झाले असते. म्हणजेच चोवीस
तासात ३६ x २४=८६४ मिनिटे ( १४ तास २४ मिनिटे) दर दिवसाला शुभ फल देणारी ठरली असती. इतके काही आपले जीवन सुखाचे नाही हे
आपण प्रत्येक जण पाहतो, म्हणजेच कोणत्याही नाडीत सुषुम्ना नाडी चालते आणि आपले काम बिघडवते !
योगशास्त्रात त्याच सुषुम्ना नाडीला सुरू ठेवण्याचे प्रयत्न के ले जातात. सुषुम्ना नाडी तर सर्व कार्ये बिघडवणारी आहे. ही उलटसुलट निरीक्षणे पाहून
कोणीही घोटाळ्यात पडेल, परंतु जर कोणी त्यावर चिंतन करील तर एका महान रहस्याचा शोध यातून त्याला सापडेल. मी तो शोधला असून वे रहस्य
तुम्हाला सांगून टाकतो. योगशास्त्रातील प्राणायाम करण्यात सुषुम्ना प्रवाह चालू करण्याचा जो खटाटोप आहे तो आत्म्याचे चलनवलन सुषुम्नानाडीतून व्हावे
यासाठी ! कारण आत्मा ब्रह्मरंध्राकडे येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे सुषुम्नानाडीचा मार्ग ! प्राणायाम के ल्याने प्राणशक्ती सुषुम्नेतून वारंवार
वाहते, त्यामुळे सुषुम्नेतली आत्म्याची वाट अडकवून ठेवणारी कुं डलिनी ही शक्ती जागृत होते व आत्म्याची वाट मोकळी करून देते ! त्यामुळे आत्मा मुक्त
होतो व ब्रह्मरंधाच्या मार्गाने सुटतो, तेव्हाच तो पुन्हा कधीही जन्ममृत्यूच्या फे न्यात येत नाही. म्हणून योगशास्त्राचा अभ्यास म्हणजे के वळ सुषुम्नाप्रवाह
मोकळा करणे. प्राणायामामुळे ते कार्य घडते
शिवस्वरोदयात सांगितलेल्या चंद्र नाडी व सूर्यनाडी या दोन नाड्या का चालतात ? त्याचे कारण असे की, सुषुम्नेची वाट बंद असल्याने आत्मा थोडा वेळ
सूर्यनाडीत जातो तेव्हा तो मार्ग मोकळा होतो व सूर्यनाडी चालते. आत्मा चंद्रनाडीत जातो तेव्हा चंद्रनाडी सुरू होते. या दोन मार्गांतून आत्मा बाहेर निघाला
तरी तो जन्म- मृत्यूच्या फे न्यातून सुटत नाही, उलट या नाड्यांत तो येतो तेव्हा त्याला "शुभयोगांच्या पंचपक्वान्नाची ताटे " वाढू न ठेवलेली असतात !
त्यांचा स्वीकार करणे म्हणजे जन्ममृत्यूचा विळखा अधिक मजबूत होणे हे होय. म्हणून भोगांच्या लफड्यात सापडण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा आत्मा त्या
"शुभफलरूपी संकटातून "सुटका करण्या साठी सरळ सुषुम्नेत प्रवेश करतो ! त्यामुळे आपल्याला हवा असलेला योग असूनही सुषुम्ना नाडी सुरू झाल्याने
तो योग अपयश देतो ! अशा प्रकारे आपल्या जीवनाचे सुकाणू सुषुम्नेच्या रूपाने आत्माच वळवितो. हे रहस्य फार मोठे आहे व कळण्यास फार अवघड
आहे परंतु ज्यांना ते कळेल थोडक्यात जोवनाचा गाभा ओळख शकतील अशी मला खात्री वाटते.
डाव्या नाकपुडीने जेव्हा श्वासोच्छ्वास चालतो तेव्हा चंद्रनाडी सुरू झाली असे समजावे. त्या नाडीत कोणत्या तत्वाचा उदय आहे त्याप्रमाणे ही नाडी
शुभफल देते. चंद्रनाडी ही सर्व नाड्यांत शुभफल देणारी आहे. माझ्या माहितीप्रमाणे, जेव्हा आपला आत्मा चंद्रनाडीत येतो तेव्हा चंद्रनाडीचे कार्य सुरू होते,
आणि त्यामुळेच आपले कार्य सफल व्हावे की नाही हे आत्माच ठरवितो. चंद्रनाडी ही स्थिर कार्यातच विशेष यश देते. समजा, तुम्ही घर घेत आहात, त्या
वेळी नेमकी चंद्रनाडी चालू असेल तर ते घर तुम्हाला कायमचे लाभेल व तुमची भरभराट होईल. परंतु तुम्हाला घर विकायचे आहे व त्या वेळी चंद्रनाडी सुरू
असेल तर तुम्ही स्वत: अस्थिर असे कार्य करीत असल्याने त्या व्यवहारात तुमचे नुकसान होईल, जर त्या वेळी सूर्यनाडी असेल तर मात्र तुम्हाला घर
विकण्यापासून फायदा होईल कारण चर कार्यात सूर्यनाडी चांगला फायदा करून देते. मित्रप्राप्ती, वरिष्ठांकडू न चांगले काम करून घेणे, किं वा टिकाऊ
स्वरूपाची खरेदी करणे, असली कामे चंद्रनाडीवर यशस्वी होतात. त्याउलट सूर्यनाडीवर ती विघडतात. सूर्यनाडी चालू असताना जरी आपणास कोणी विष
दिले तरी ते उतरविण्याचे उपाय यशस्वी होतात.

साधारणतः चंद्रनाडी चालू असताना काय करावे ते पुढीलप्रमाणे ध्यानात घ्यावे. स्थिर कर्म, अलंकार
धारण करणे, दूरदेशी जाणे, आश्रम, मंदिरे व धर्मशाळा इत्यादी स्थावर गोष्टी करणे, तसेच आड, विहिरी, तलाव इत्यादी पाण्याचे साठे तयार करणे,
वास्तुच्या बांधणीसाठी मुहूर्त मेढ रोवणे, यात्रा, दान, लग्न, शांतिकर्म, पौष्टीक व दिव्य औषधी करणे, नातेवाइकांच्या भेटीस जाणे, गृहप्रवेश करणे, शेतीची
कामे, रोपे लावणे, तह करणे, विद्या शिकणे, मोक्षाची साधना, धर्मकार्य, दीक्षा देणे-घेणे, काळाची गणिते, सूत्ररचना, मंत्रसिद्धी, पाळीव प्राणी आणणे, काल
व व्याधींची चिकित्सा करणे, नव्या वाहनांवर बसणे, घरात व नगरात प्रवेश करणे, दुःख, शोक, विषाद, ज्वर, मर्च्छा इत्यादींचा प्रतिकार करणे. चैत्र शुक्ल
प्रतिपदेस, दक्षिणायन अगर उत्तरायण असताना सूर्योदयाच्या वेळी चंद्रनाडी सुरू असून त्यात जर पृथ्वी व जलतत्त्वे असली तर अन्नधान्य भरपूर होते,
वस्तू स्वस्त होतात, सर्वत्र सुभिक्ष होते, पण जर अग्नि व आकाश ही तत्त्वॆ असली तर चो-या व दंगे होतात, धान्यासाठी हालअपेष्टा उत्पन्न होतात.
चंद्रनाडीच्या वेळी कोणताही प्रश्न विचारला गेला व त्यातील अक्षरांची संख्या सम झाली तर उत्तर होकारार्थी व शुभ असते. परंतु प्रश्न विषम अक्षरात
विचारला गेला तर नकारार्थी उत्तर असते.
सूर्यनाडी - सर्व कार्यात, शुभ तत्त्वे असताना ही नाडी चालू असणे यश देणारे आहे. क्रू रांचे पठण, घातकी कृ त्ये,
विपयोग, शस्त्रांचे वार करणे, युद्ध, अक्रमण करणे, मद्यपान, शिकार, स्त्रियांचे बरोबर गमन करणे, घर्षण होणारी कृ त्ये, तोडणे, फोडणे, बीजमंत्राचे पटन,
चर्चा, यक्षीण, पिशाच, विष इत्यादीचॆ उच्चाटण, प्रेतांचे आकर्षण, शत्रुनिग्रह, वशीकरण इत्यादी सूर्यानाडी प्रवाहावर करवे. कोणत है प्रश्न विषम अक्षरांनी
विचारला गेला तर सूर्यनाडी शुभ फल देतात ; परंतु समपदात असलेला प्रश्न नकारर्थी उत्तर दर्शवितो.
दिवसा जे फल चंद्रनाडीपासून मिळते तेच फल रात्री चंद्रनाडीपासून मिळते. तसेच रात्री जॆ फल सूर्यनाडी पासून मिळते तसेच फल दिवसा चंद्रनाडीपासून
मिळते. सूर्यनाडीतही अग्नी व आकाश हो तत्त्वे अशुभ समजली जातात. चंद्र अथवा सूर्यनाडी यांपैकी एकच नाडी सतत काही दिवस चालेल तर त्या
माणसाचे आयुष्य संपत आले असल्याचे समजावे.
सुषुम्ना नाडी - सर्वच कृ त्यात ही नाडी विघ्न निर्माण करते. अशुभ कृ त्यातूनही या नाडीच्या वेळी आपत्ती आॊढवतात,
म्हणून शहाण्या माणसाने या नाडीच्या प्रवाहाचे वेळी सर्व कृ त्ये बंद ठेवावीत. कोणताही बेतसुद्धा ठरवू नये. मनाने के लेले कार्यसुद्धा या नाडीमुळे उलटे होते.
माझ्या माहिती प्रमाणे आपण अनेक योजना आखतो पण त्या प्रत्यक्षात येत नाहीत, कारण त्या वेळी नेमकी सुषम्ना नाडी चालते. फक्त योगाचा अभ्यास,
ईश्वराची पूजा, जप, चित इत्यादी कर्मे सुषुम्ना प्रवाहाचे वेळी करणे चांगले. त्यासून लवकर प्रत्यंतर येते. नेहमी सुषुम्ना प्रवाह स्वतःच्या इच्छेने चालू करू
ईश्वराची भक्ती करणे यालाच संध्या करणे असे म्हणतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ व मध्यरात्र या चार वेळी स्वेच्छेने सुषुम्ना प्रवाह चालू करून योगाचा
अभ्यास करावा.
मी आधी सांगितले आहे की, ज्या नाडीत आत्मा प्रवेश करतो त्या नाडीचा प्रवाह त्या वेळी चालू होतो. आत्मा जन्ममरणाच्या फे -यातून सुटण्यासाठी
मृत्यूच्या वेळी ब्रह्मरंध्रातून शरीराबाहेर जाणे हेच एकमेव योग्य आहे. सुषुम्नॆचॆ दुसरे टोक ब्रह्मरंध्रात उघडते. म्हणून आत्मा इतर नाड्यांतून बाहेर पडतो
म्हणजे तो तोंड, डोळे, नाक, कान, गुद्द्द्द्द्वार अथवा मूत्रद्वार या ठिकाणातून बाहेर पडतो. तो जर नाक, कान, डोळे यापैकी कोणत्याही मार्गाने बाहेर
पडेल तर त्यात उच्च योनीत पुन्हा जन्माला येतो, परंतु गुद्वार अगर मूत्रद्वार यातून बाहेर पडेल तर तो नीच योनीत जन्माला जातो, म्हणजेच त्याला क्षुद्र
कीटकांचा जन्म येतो. त्यालाच नरकवास म्हणतात. आत्मा डोळयातून बाहेर गेल्यास डोळे उघडे राहतात, गुद्द्वारातून गेल्यास शौच्याला होते, मूत्रद्वारातून
बाहेर गेल्यास लघवी होते, कान अथवा नाकातून गेल्यास ओळखता येत नाही पण सुषुम्नेतून ब्रह्मरंध्रातून बाहेर गेल्यास मुक्ती मिळते.
योगीलोक सुषुम्ना नाडीला फार महत्त्व देतात. जेव्हा सूर्यनाडी चालू असेल तेव्हा जर उजव्या काखेत दाब दिला तर लगेच सुषुम्ना नाडी चालते व त्यानंतर
चंद्रनाडी चालते. जेव्हा चंद्रनाडी चालते तेव्हा जर डाव्या काखेत दाब दिला तर लवकरच सुषुम्ना चालू होते व नंतर सूर्यनाडी सुरू होते. म्हणून योगी व
संन्याशी काखॆत कु बडी ठेवून सतत सुषुम्ना नाडी चालू ठेवतात व जप करीत राहतात. असे सतत करीत राहिल्याने त्यांचा मृत्यू समय जवळ आला तरी ते
सुषुम्ना प्रवाहच चालू करतात त्यामुळे आत्मा ब्रह्मरंध्रातून बार निघतो व त्यांना पुन्हा जन्म लवकर येत नाही. सुषुम्ना नाडीतून आत्मा जेव्हा स्वतंत्रपणे
वावरू लागतो त्यापूर्वी कुं डलिनी या नावाची शक्ती जागृत व्हावी लागते. शेवटच्या मणक्यात कुं डलिनी शक्ती आहे. पूर्वजन्मीच्या पापांची भरपाई के ल्यानंतर
अथवा प्रागायामाच्या अभ्यासाने ती जागृत होते तेव्हाच सुषुम्ना नाड्यांचे सर्व मार्ग उघडतात आणि आत्मा एके का चक्रांत जातो. जेथे जेथे तो जाईल ते ते
चक्र शुद्ध होते. व योगी ज्ञानाने व आत्मानंदाने सुखी होतो, व त्याला अनेक सिद्धीसुद्धा प्राप्त होतात. आत्मा जेव्हां सुषुम्ना मार्गाने डोक्याच्या कवटीत येतो
तेव्हाच जन्ममृत्यूच्या फे -यातून सुटका होते.
शरीरात कोठेही असणाऱ्या आत्म्याला यमाचे पाश बांधू शकतात. पण सुषुम्नेच्या मार्गाने कवटीच्या पहिल्या मणक्यात असलेल्या जागी यमाचे बंधन चालू
शकत नहीं, म्हणून योगविश्वात पारंगत असा योगी मृत्यू समय जवळ असेल तेव्हा सुषुम्नामार्ग आत्म्यास पहिल्या मणक्यात आणतो. मृत्यूची वेळ टळेपर्यंत
आत्मा तेथे स्थिर राहतो, वेळ झाल्यानंतर पुन्हा शरीरात कोठेही जाऊ शकतो. अशा प्रकारे पुनःपुन्हा मृत्यूची वेळ टाळून योगी आपले जडत्वातले कार्य
पूर्ण करतो आणि त्याला स्वतःला जड देहाची आवश्यकता वाटत नाही. तेव्हाच तो स्वेच्छेने समाधी घेऊन आत्मा ब्रह्मरंध्रातून बाहेर काढतो व पुन्हा
कधीही जन्मास येत नाही. हे पाहता सुषुम्नेमुळे आपले जोवन उद्ध्वस्त होते, आपले सर्व कार्य बिघडते, अपयश दुःख येते, हे जरी खरे असले तरी सुषुम्ना
ही नाडी हे एकच मोक्षाचे दार आहे हे महत्वाचे वाटते. म्हणून जेव्हा जेव्हा सुषुम्ना नाडी आपोआप चालू होते तेव्हा आपण देवाचा जप, प्राणायाम इत्यादी
आध्यात्मिक कार्य करण्याची संधी वाया घालवू नये. दिवसांचे, तिथींचे वगैरे संयोग म्हणजे सुषुम्नेचे काळ मानलेले आहेत. रात्रीचे तीन ते सकाळचे नऊ या
सहा तासांत सत्ययुग मानले आहे, सकाळचे नऊ ते दुपारचे तीन या सहा तासांना त्रेतायुग असे म्हणतात, दुपारचे तीन ते रात्रीचे नऊ या काळास
द्वारपारयुग असे म्हणतात व रात्रीचे नऊ सकाळचे तीन या वेळेस कलियुग असे म्हणतात. अशी चारही युगे एकाच दिवसात मोजतात त्यांपैकी सत्ययुगात व
त्रेतायुगात स्त्रीसंग करू नये; त्या वेळी स्त्रीसंग के ल्यास आयुष्य कमी होते. सिद्धी अगणित आहेत, त्यांपैकी आठ सिद्धी विशेष महत्त्वाच्या आहेत. त्यांतही
तीनच सिद्धी महत्त्वाच्या आहेत असे योगी लोक समजतात. त्यांची नावे : (१) संकल्पसिद्धी (२) प्राणसिद्धी (३) शौयसिद्धी अशी आहेत. गुप्त- विद्यांच्या
अभ्यासाने संकल्प सिद्धी प्राप्त होते. प्राणसिद्धी प्राणायामाच्या अभ्या- साने प्राप्त होते यात अपान वायूला अंतर्गत रोखून धरावे व नाकावाटे श्वास आत
घ्यावा, म्हणजे प्राण व अपान यांचा संयोग होतो त्याला कुं भक म्हणतात. आत घेतलेला श्वास कुं भकाच्या वेळी कोंडू न ठेवतात. त्यानंतर नाकावाटे उच्छ्वास
हळूहळू बाहेर सोडावयाचा असतो, श्वास पूर्णतः बाहेर गेल्यानंतर जीव गुदमरू लागे पर्यंत श्वास नाकावाटे अगर तोंडावाटे आत घेऊ नये त्याल ही शुद्ध
कुं भक असे म्हणतात. या अभ्यासाने निरोगीपणा प्राप्त होतो.
शौर्यसिद्धी : शरीरात प्राणशक्ती रोखून प्राणायाम के ल्यास ही सिद्धी प्राप्त होते आणि इच्छेने प्राणाला विविध चक्रांत स्थिर के ल्याने आपले बल वाढत
जाते, कुं डलिनी शक्ती प्राणायामामुळेच हलू लागते व स्वाभाविकपणे जर कुं डलिनी डाव्या नाकपुडीवर गेली तर चंद्रनाडी सुरू होते, तीच जर उजव्या
नाडीवर पडली तर सूर्यनाडी चालते. जेव्हा अपान वायूला गुदचक्रावर दाब देऊन कोंडू न ठेवले जाते व श्वास घेतला जातो तेव्हा प्राण व अपान यांचा संयोग
होतो व दाबामुळे कुं डलिनी शक्ती मेरू दंडातून वर वर सरकते. त्यामुळे एके क चक्र शुद्ध होत जाते व आत्मा मुक्तपणे सर्वत्र फिरू लागतो. म्हणून प्राणायामाचे
महत्त्व किती आहे याची कल्पना येते.
सुषुम्ना नाडी थोडा वेळच सतत अशी चालू शकते. पण जर ती सतत अर्ध्या तासापर्यंत चालली तर आपण ओळखावे की आपले आयुष्य अजून तीस वर्षे
आहे. याप्रमाणे दीड तासाला पंचवीस वर्षे आयुष्यमान असते. दोन तास चालली तर साडेबावीस वर्षे आयष्य अजून आहे, तीन तासाला सतरा वर्षे; पाच
तासाला दहा वर्षे आहे, सात तास चालली तर पाच वर्षे आयुष्य आहे, आठ तास चालली तर तीन वर्षे आयुष्य शिल्लक आहे, बारा तास चालली तर एकच
वर्ष आयुष्य बाकी आहे. जर चोवीस तास सुषुम्ना चालू राहिली तर एका घटके त अथवा तत्क्षणीच मृत्यू येतो. मृत्यू जवळ येतो तेव्हा मुषुम्ना प्रवाह बंद होतो
व श्वास नाकाऐवजीनतोंडावाटे सुरू होतो, त्यामुळे तोंडाला फे स येतो व एक ते दहा तासपर्यंत मृत्यू होतो. म्हणून योगी लोक पंचप्राणांच्या श्वासाला
मेरुदंडावर चढवून सर्व नाड्यांच्या गती बंद करतात. त्यामुळे कुं डलिनीशक्ती उताणी पडते व त्यांना काळाचे भय राहत नाही. अशा अवस्थेत समाधी लावून
ते वर्षानुवर्षे बसतात, त्यांचे आयुष्य काळाच्या जबड्यातून मुक्त होते. त्यांचे बळ पुनःपुन्हा वाढते व ते दीर्घ आयुष्य भोगतात.
ज्याप्रमाणे आपल्या देहात प्राण घेणे व सॊडणे सतत चालते. त्याप्रमाणे संपूर्ण विश्वसुद्धा स्पंदन होत असल्यामुळे संपूर्ण विश्व हाच एक अनंत असा देह
असून त्यातही एक प्रकारचे श्वसन चालू असल्याचा प्रत्यय योगी माणसाला येतो किं वा देह हीच एक संपूर्ण विश्वाची छोटीशी प्रतिकृ ती आहे असे म्हटले
तरी ते एकाच अर्थाचे होईल.
म्हणून देहातील प्राणायामक्रियेत तिन्ही काळाचे ज्ञान प्राप्त होते. विश्वाची जडणघडण पंचतत्त्वांमुळे होत आहे व तेथेही श्वसनक्रियेचे तत्त्व लागू पडते म्हणून
ब्रह्मांडाचा निर्णय आपण स्वतःच्या देहाच्या. साहाय्याने जाणू शकतो. जसे आपण म्हणतो की शितावरून भाताचीपरीक्षा त्याप्रमाणे आपला देह हाच एक
संपूर्ण विश्वाचा लहानसा घटक आहे. योगविद्या संपूर्णतः प्राणायाम या दृष्टीने विकसित झाली असून त्याच्या अभ्यासाने आपण मुक्त होतो म्हणजेच आपला
देह हे सूक्ष्मत्व व क्षुद्रत्व आहे ते सोडू न ब्रह्मांडरूपी देह धारण करतो. आणि ब्रह्मांडाचा प्राण तोच परमात्मा असल्याने त्याच्याशी एकरूप होतो, त्यालाच
खरी मुक्ती असे म्हणतात. म्हणून शिरस्वरोदयशास्त्र हे कपोल- कल्पित असे काही थोतांड नसून त्यातून वस्तूचे, घटनेचे, भविष्याचे, मुक्तीचे वगैरे विस्तृत
ज्ञान प्राप्त होते. आपण ते अनुभवरूपाने अभ्यासणे महत्त्वाचे आहे !
जर एखादा उत्सुक तुमच्याकडे शिवस्वरोदयाचा अभ्यास आणि अनुभव घेण्याच्या इच्छेने आला तर तुम्ही त्याला मदत कराल का ? मी शेवटचा आणि
महत्वाचा प्रश्न विचारला. कारण अनुभुतीखेरीज असणाऱ्या विद्वत्तेला कवडीचीही किं मत नसते.
मला वेळ मिळेल की नाही मांगता येत नाही. पण ठाण्याला पश्चिमेला श्री नवजोवन हाऊसिंग सोसायटीत तिस-या मजल्यावर रिसर्च फौन्डेशन फॉर
मंत्रयोग या आमच्या संस्थेची ज्योतिष विज्ञान शाखा आहे तिथे सौ. लीलाताई किरकिरे असतात. त्या उत्सुक व्यक्तीस जर त्याची लायकी असेल तर त्या
त्याला शिवस्वरोदयाची साधना विनामूल्य शिकवतील. मात्र वरील पत्त्यावर अशा माणसाने प्रत्यक्ष भेट्न लीलाताईंचा मुलाखतीसाठी वेळ घेतला पाहिजे.
नुसत्या पत्रावर मुलाखतीची वेळ देता येणार नाही. अशा विद्यार्थ्याना मधूनमधून मी तिकडे जाऊन अशा विद्यार्थ्यांना काही प्रात्यक्षिके तेवढी दाखवीन !
श्री. भाऊसाहेब देशपांडे यांच्याशी चर्चा झाल्यावर माझ्या हाती इन्स्टिट्यूट ऑफ पॅरॅसायकॉलॉजी (वसई, ठाणे) या संस्थेचे श्री. शरद वेलणकर (गूढविद्या
मासिकाचे संपादक) यांनी लिहिलेले शिवस्वरोदयशास्त्र याच नावाचे पुस्तक वाचावयास मिळाले. श्री. वेलणकर यांचे विवेचन आणि भाऊं शी झालेली चर्चा
यांच्या आधारे या विषयाचे स्पष्टीकरण अधिक चांगले होईल हे लक्षात आल्यावर दोघांच्याही माहितीचा वापर मी इथे के ला आहे.
माणसाप्रमाणे ब्रह्मांडसुद्धा श्वासो च्छ्वास करते ही वेलणकरांची कल्पना मोठी विलक्षणच म्हणता येईल. त्यांच्या या कल्पनेचा जो जो विचार करावा. तो तो
एक प्रश्न मनात सारखा उभा राहतो.
माणूस श्वासोच्छ्वास करतो तेव्हा त्याचा आत्मा बेंबीच्या वर श्वास पटलावर असतो मग ब्रह्मांड श्वासोच्छ्वास करते तेव्हा त्याचे श्वासपटल कु ठे असेल ?
आणि जर श्वासपटल असेल तर त्यावर आरूढ झालेला आत्मा म्हणून ब्रह्मांडातील कोणत्या ग्रहाची नेमणूक झाली असेल ? ब्रह्मांड प्राणायाम कसं करीत
असेल ? आणि मग प्राणायाम करणाऱ्या मनुष्ययोनीतील योग्याप्रमाणे ब्रह्मांडाच्याही सुषुम्नॆतून ब्रह्मांडाचा आत्मा वर सरकत ब्रह्मरंधातून बाहेर पडत असेल
का ?
पण हे तरी कसं शक्य आहे ? पिंडी तेच ब्रह्मांडी असल्यामुळे प्रत्येक जिवाचा आत्मा ब्रह्मरन्धातून बाहेर पडल्या- खेरीज ब्रह्मांडाचा आत्मा तरी ब्रह्मरन्धा
पर्यंत कसा पोहचणार ? कधी होणार हे शुद्धीकरण ?

You might also like