You are on page 1of 5

ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे । आश्रमी विचार षट कर्मे ।।१।।

वानप्रस्थ तरी संयोग वियोग । संन्यासी तो त्याग संकल्पाचा ।।२।।


परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथे याती धर्म कु ळ नाही ।।३।।
बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ।।४।।
तुका म्हणे कांही नाही नेमाविण । मोकळा तो सीण दु:ख पावे ।।५।।
संत तुकोबाराय या अभंगातून आश्रमधर्म प्रतिपादित करतात. महाराजांचा गाथा हे धर्म
शास्त्र नाही पण भक्ति शास्त्र आहे पण गाथ्यामधील भक्ती ही धर्माला सोडून नाही आणि
नीतीलाही सोडून नाही म्हणून गाथ्यामध्ये काही काही ठिकाणी नीतीचाही उपदेश आलेला
आहे आणि काही काही ठिकाणी धर्माचाही उपदेश आहे. भक्ती करण्याकरिता धर्म आणि
नीतीचे अनुष्ठान करावेच लागते. भक्ती ही वेदानुमोदित आहे. म्हणून गाथा हा भक्तीशास्त्राचा
ग्रंथ असला तरी त्याच्यात धर्म नीतीचे खंडण नाही. धर्माची व्याख्या करीत असतांना
आचार्यांनी असे म्हटले आहे, ‘यतो अभ्युदय नि:श्रेयस सिद्धि: स धर्म:’म्हणजे ज्या
अनुष्ठानामुळे अभ्युदय आणि नि:श्रेय या दोन्हीचीही प्राप्ती होते त्याला धर्म असे म्हणतात.
धर्म शब्दाचा दुसरा अर्थ आहे कर्तव्य कर्म. ज्याच्या वाटेला आलेले जे कर्म आहे व जे योग्य
कर्म आहे त्याला धर्म असे म्हणा.
आश्रम धर्माप्रमाणे प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. वर्ण वेगळा आणि आश्रम वेगळा.
तुकाराम महाराजांनी या अभंगात वर्णांची कर्मे सांगितली नाहीत तर आश्रमांची कर्मे
सांगितले आहेत. आपल्याकडे चार वर्ण आणि चार आश्रम आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
आणि शुद्र हे चार वर्ण आणि ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रमी,वानप्रस्थ आणि सन्यास असे चार
आश्रम आहेत आणि प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. यात सामान्य धर्म वेगळा आणि
विशेष धर्म वेगळा. सामान्य धर्म म्हणजे भगवंताची भक्ती करणे हा सामान्य धर्म सगळ्या
आश्रमांसाठी आहे. नाही नाही तर यच्चयावत मानवजातीचा तो धर्म आहे. निज धर्म हा
चोखडा । नाम उच्चारी घडोघडा ।।
या अभंगातून महाराजांनी विशेष धर्माचे प्रतिपादन फार विस्ताराने नाही पण थोडक्यात
के लेले आहे. महाराजांनी सांगितलेल्या धर्माचे पालन करणाऱ्यांची ऐहिकही आणि
पारलौकिकही उन्नती/ उत्कर्ष होईल.
पहिला आश्रम ब्रह्मचारी आश्रम आहे जो एक ते पंचवीस वर्षापर्यंत आहे. पंचवीस
वर्षानंतरच गृहस्थाश्रम स्वीकारावा. साधारणत: आयुष्य शंभर वर्षाचे मानून त्याचे चार
विभाग के ले गेले आहेत. पंचवीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, २६ ते ५० गृहस्थाश्रम, ५१ ते ७५
वानप्रस्थ आणि ७६ ते पुढचे आयुष सन्यास आश्रम.
ब्रह्मचारी धर्मात अक्षराची उपासना करावी किं वा साधना करावी. विद्या प्राप्त करून घ्यावी.
म्हणून किमान २५ वर्षापर्यंत इतर भानगडीमध्ये न पडता खूप अभ्यास करावा आणि विद्या
प्राप्त करून घ्यावी. विद्यार्थाचा देव एकच आणि तो म्हणजे विद्या. म्हातारे माणसे व्याकरण
शिकायला आला त्याला उद्देशून आचार्यांनी ‘भज गोविंदं’ स्तोत्र रचले.
या स्तोत्राचि एक पार्श्वभूमी आहे. एकदा आचार्य आपल्या शिष्यांबरोबर वाराणसीच्या
गल्लीतून फिरत असतांना त्यांनी एक वृद्ध गृहस्थाला पाणिनीच्या संस्कृ त व्याकरणाचे
नियम घोकत असतांना दिसला. त्या वृद्ध गृहस्थाची आचार्यांना दया आली व आचार्यांनी
त्याला उपदेश के ला की बाबारे ज्या वयात जे करायचे असते तेंव्हाच ते करावे. विद्या ही
ब्रह्मचारी आश्रमातच मिळवायची असते. या आश्रमात आता तुला फक्त पूजा अर्चा आणि
ईश्वर भक्ति के ली पाहिजे. आणि त्यांनी त्या वृद्धाला जो उपदेश के ला त्यातून भज गोविंदम
हे स्तोत्र त्यांनी रचले.
भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते ।
सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुकृ ङ् करणे ॥
म्हणून आधी अध्ययन आणि मग चिंतन व मनन करणे आवश्यक आहे. के वळ
अध्ययनाच्या प्रारंभाने इच्छित फल प्राप्त होत नाही. फळापर्यंत पोहचण्यापर्यंत तो टिकला
पाहिजे.
तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्त काळ घडी आल्याविण ॥३॥
ज्या काळात विद्याभ्यास करायचा त्या काळात जप करीत बसला, तीर्थयात्रा करू लागला
हे योग्य नाही. ब्रह्मचाऱ्याला आई वडील हेच दैवत.
मायबाप के वळ काशी । त्याने न जावे तीर्थासी ।।
विद्या ही जीवनाच्या विकासाकरिता शिकावी के वळ पोट भरायचे साधन म्हणून शिकू नये.
मी एकाला विचारले की तु बँके त नोकरी कां करतो तो म्हटला एक तारखेला पगार मिळतो
म्हणून. पण आपण सगळ्या मंडळींना job satisfaction हा शब्द माहित आहे. कृ तकृ त्य
झालो इच्छा के ली ते पावलो. कृ तकृ त्य होण्यसाठी विद्या संपादन करावी.
विद्यापीठातल्या अभ्यास क्रमात काही ग्रंथांचा ठराविक भाग असतो. उदाहरणार्थ
ज्ञानेश्वरीच्या काही ओव्यांचे रसग्रहण, तुकाराम महाराजांचे काही अभंग. मग तो phd होतो
डॉक्टर होतो. पण त्याला ज्ञानेश्वरीचे मागच्याही ओव्या माहित नाहीत आणि पुढच्याही
ओव्या माहित नाहीत. म्हणजे तो परिपूर्ण नाही. आजकाल फक्त certificate ला महत्व
आहे.
म्हणून या hardskill बरोबर softskill अवगत करणे तेवढेच महत्वाचे असते. विद्येचा
संबंध जेंव्हा पोटाशी जोडला जातो त्यावेळेला मनुष्याचा उत्कर्ष होणे अवघड आहे.
आपण जे बोलतो त्याचे स्वतःला समाधान वाटायला पाहिजे. अभ्यासाच्या वयात
अभ्यासच के ला पाहिजे त्यावेळेला पोटाची चिंता करू नये. म्हणून विद्यार्थी दशेत माधुकरी
मागून अभ्यास करणारे पुष्कळ आहेत. अभ्यासाचा संबंध मनाच्या शांतीशी मनाच्या
विकासाशी संबंध जोडला गेला पाहिजे. विद्येच ओझं होत नाही. सर्व धनांमध्ये श्रेष्ठ धन
आहे.
न चोराहार्यम् न च राजहार्यम्, न भ्रातृभाज्यं न च भारकारि । व्यये कृ ते वर्धत एव
नित्यं, विद्याधनं सर्वधनप्रधानम्॥
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥
सुखार्थिनः कु तो विद्या नास्ति विद्यार्थिनः सुखम् । सुखार्थी वा त्यजेद् विद्यां विद्यार्थी वा
त्यजेत् सुखम् ॥
एकवेळ मुख्यमंत्र्याला विदेशाचा visa मिळणार नाही पण विद्वानाला पूर्ण जगाचा visa
उपलब्ध आहे. विद्येची किमत जाणण्यासही लायकी लागते. सरस्वतीची पूजा करा
लक्ष्मीला आपोआप मागे यावेच लागेल. ज्ञानाने धनाच्या पुढे गोंडा घोळावा का ? उलट
धानिकालाच ज्ञान्यापुढे गोंडा घोळायला पाहिजे.
वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत बुद्धि तल्लख असते. स्मरणशक्ती उत्तम असते. म्हातारपणी
विसर पडतो.
गृहस्थाश्रमीचे सहा कर्मे कोणती ? अध्ययन, अध्यापन, दान, यजन, याजन, प्रतिग्रह
ज्ञानदेवांनी या स्वधर्माच्या स्पष्टीकरणात अग्निमुखी हवन, देवपूजा, ब्राह्मण भोजन, गुरुभक्ती,
अतिथी सत्कार व ज्ञातिसंतोष यांचा उल्लेख के ला आहे. जेवढे म्हणून आपण सन्मार्गाने
मिळवलेले असेल, ते भोगार्थ न समजता ते स्वधर्मरूप यज्ञाद्वारा परमेश्वरास अर्पण करावे व
राहिलेले ते शेषप्रसाद म्हणून संतोषाने सेवन करावे.
अग्निमुखीं हवन । न करील देवता पूजन । प्राप्तवेळे भोजन । ब्राह्मणाचें ॥३-१०५॥
विमुख होईल गुरुभक्ती । आदर न करील अतिथी । संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ॥ १०६ ॥
ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणें प्रमत्तु । के वळ भोगासक्तु । होईल जो ॥ १०७ ॥
तया मग अपावो थोर आहे । जेणें तें हातींचें सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥
१०८॥
प्रत्येक गृहस्थाश्रमीने पंचमहायज्ञ करणे आवश्यक आहे. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, विप्रयज्ञ, भूतयज्ञ
आणि नृयज्ञ.
ब्रह्मयज्ञ या शब्दाचा अर्थ आहे स्नान झाल्यानंतर स्वाध्याय करणे. उठल्या उठल्या
भगवंताचे स्मरण करायला पाहिजे. काकड्याच्या अभंगात नामदेवराय अत्यंत कळकळीने
सांगतात-
उठा जागे व्हारे आता । स्मरण करा पंढरीनाथा । भावे चरणी ठेवा माथा । चुकवी व्यथा जन्माच्या ।।
धन दारा पुत्र जन । बंधु सोयरे पीशुन । सर्व मीथ्या हे जाणोन शरण रीघा देवासी ।।
मायाविघ्ने भ्रमला खरे । म्हणता मी माझेनी खरे । हे तो संपत्तीचे वारे ।साचोकारे जाईल ।।
आयुष्य जात आहे पहा । काल जपतसे महा । स्वहीताचा घोर वहा ।ध्यानी रहा श्री हरीच्या ।।
संत चरणी भाव धरा । क्षणक्षणा नाम स्मरा । मुक्ती सायुजता वरा । हेची करा बापांनो ।।
विष्णुदास विनवी नामा । भुलु नका भवकामा ।धरा आंतरी निजप्रेमा ।न चुका नेमा हारीभक्ती ।।
म्हणून सकाळी काकडा करणारे ब्रह्मयज्ञ करतात.
देवयज्ञ म्हणजे वैश्वदेवयज्ञ करणे. पितृ यज्ञ म्हणजे पितृंचे तर्पण करणे. रोज करावे लागते.
भूतयज्ञ म्हणजे जो प्राणी असेल गाय असेल, कु त्रा असेल आपल्या जेवणातला भाग
त्याला खाऊ घालणे.
नृयज्ञ म्हणजे अतिथी, अभ्यागत, गुरु, ब्रह्म यांची आपापल्या शक्तीप्रमाणे सेवा करणे.
आपण मिळवतो आणि आपण खातो तो चोर आहे. त्याने धर्माची ईश्वराची चोरी के ली
आहे. आपल्या मिळकतीतला चौथा भाग धर्मासाठी खर्च के ला पाहिजे असा दंडक आहे.
नाही चौथा तर एक दशांश तरी धर्मासाठी खर्च के ला पाहिजे.
सरकार जरी ६० वर्षाने retirement देते तरी धर्मशास्त्राने ५० वर्षानंतरच retirement
दिलेली आहे. दशरथ राजाचे चरित्र सांगतांना असे सांगतात की दशरथ राजाने आपला
चेहरा आरशात बघितला आणि त्याला एकच दाढीचा के स पांढरा दिसला. दशरथाने लगेच
ठरवले की आता रामाचा अभिषेक करायचा आणि आपण वनात तपश्चर्येला निघून जायचं.
वानप्रस्थ आश्रमात संयोगात वियोग आहे म्हणजे त्याने घरदार सोडलेच पाहिजे, बायको
मुलाचा त्याग के लाच पाहिजे असे नाही. भगवे वस्त्र धारण करण्याचीही गरज नाही पण
संयोगी वियोग म्हणजे मनातून सगळ्यांचा त्याग के ला पाहिजे.
सन्यासात त्याने विषयाच्या संकल्पाचा त्याग करायला पाहिजे. आपल्याला पुरस्कार
मिळावा आपला सत्कार व्हावा अशा प्रकारचे संकल्प किं वा आशा अपेक्षांचा त्याग करणे
याला सन्यास म्हणतात. साराचे ग्रहण करून असाराचा त्याग करणे हा सन्यास आहे.
एखादा साधु संत हव्यासापोटी अर्थार्जन सत्कार करवून घेत असेल तर तो हंस नाही तर
बगळा आहे. परमहंस हा परमार्थाच्या ठिकाणी वृत्ति स्थिर करतो. त्याची वृत्ति देहाकार रहात
नाही.
सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें । मी माजी
हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥
तो देहाला आपले स्वरूप मानतच नाही. तो परमात्मतत्त्वालाच आपले स्वरूप मानतो.
मनोबुद्ध्यहङ् कार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुःचिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुःन वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥
न मृत्युर्न शङ् का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥
अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
न चासङ् गतं नैव मुक्तिर्न मेयः चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥
तो परमहंस, उन्मनी स्थितीमध्ये गेला आहे.
अशा प्रकारे चारी आश्रम धर्माप्रमाणे वागत नाही त्याचा जन्म व्यर्थ आहे.

You might also like