You are on page 1of 5

श्री गुरुचरित्र पारायण

श्री दत्तावधूत क्षेत्र निखरें - राजापूर


श्री गुरुचरित्र पारायण
मनोगत
आजच्या धावपळीच्या जीवनात इच्छा असूनही श्री गुरुचरित्राचे
पारायण सर्व नियम पाळून करणे शक्य नाही. तसेच मूळ श्री गुरुचरित्र
स्त्रियांनी वाचू नये. याचे प्रमुख कारण असे आहे शब्द उच्चारणाने शरीरात
स्पंदने होत असतात.या तरंगांचा परिणाम आपल्या शरीरातील सर्व
अवयवांवर होत असतो. ग्रंथ, मंत्र, स्तोत्रे ही विशिष्ट पद्धतीने शब्दांची
रचनात्मक मांडणी असते. त्याचा परिणाम वाचकावर, ऐकणाऱ्यावर व

II
वातावरणावर होत असतो. जर शब्द पुरुष वाचक असतील तर त्याचे
परिणाम मनावर शरीरावर होत असतात. जर मासिक धर्माच्या स्त्रियांनी
दत्त
अशा शब्दांचा वापर जास्त के ल्यास त्यांच्या शरीरात तसे बदल घडून
स्त्रीत्वाला धोका संभवतो म्हणूनच विचारवंतांनी असे नियम के ले आहेत.
दे व

जसे काही मंत्र, स्तोत्रे, ग्रंथ स्त्रियांना बंधनकारक आहेत तसेच काही मंत्र
पुरुषांना बंधनकारक आहेत. इथे या विषयावर संपूर्णपणे मांडणे कठीण
गुरु

आहे. हा विषय वादाचा नाही तर स्पंदन शास्त्राच्या अभ्यासाचा आहे. असो


आपण श्री गुरुचरित्र सर्वाना स्त्री पुरुष लहान मुलेसुद्धा वाचू शकतील,
समजू शकतील व आपल्या या महान ग्रंथाची शिकवण शिकतील हे हिताचे
रा

ठरेल म्हणून हा प्रयत्न श्री गुरुकृ पेने करत आहोत. आपल्या वाचकांस मातृ
का

भाषेत सहज समजेल अशी मांडणी येथे मराठी भाषेत के ली आहे. तरी सर्व
वाचकास विनम्र विनंती प्रत्येक शब्द अमृत म्हणून मनापासून स्वीकारावा.

श्री गुरुचरित्राचे पारायण करत असताना तसे कोणतेच नियम नाहीत, मात्र
श्री गुरुचरणी भक्ती असावी, दृढ श्रद्धा असावी अशी प्रार्थना आहे.

कु णाशी खोटे बोलू नका, कु णाशी चुकीचे वागू नका, श्री गुरूं ना वाईट
वाटेल असे कर्म करू नका. सात्विक आहार घ्या. योग्य निद्रा घ्या. श्री
II

गुरूं ची कृ पा झाल्यावर आपणास कशाचीच चिंता करण्याची गरज नाही.


श्री गुरु दत्तात्रेय हे भक्तांच्या कल्याणासाठी अहोरात्र तत्पर असतात , फक्त
शरण जा चरणी लिन व्हा म्हणजे तुम्हीच सांगाल त्यांचे असीम प्रेम
भक्तांवर किती आहे. तुमचा वेळ फारसा घेत नाही आपण सुरु करूया श्री
गुरुचरणात सेवा आणि अनुभवुया दत्त चरणी सुख ... स्वामी निखरे.

श्री दत्तावधूत क्षेत्र निखरें - राजापूर


।। अध्याय पहिला ।।
।। मंगलाचरण, शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ ।।

श्री दत्तावधूत क्षेत्र निखरें - राजापूर

II
दत्त
दे व
दयानिधी यती l विनवितों मी श्रीपती l नेणें भावभक्ती l अंतःकरणीं ll

श्री गणेशाय नमः ।। हे गजानना तुला नमस्कार असो


गुरु

तू विश्वाचा प्रतिपालक आहेस. जे तुझी भक्ती करतात त्यांच्या


कार्यात विघ्ने येत नाहीत. तू चौदा विद्या व चौसष्ठ कलांचा
रा

स्वामी आहेस; तुझे माहात्म्य खुप थोर आहे म्हणूनच सुरवर,


का

मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात. हे


गौरीसुता ! गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू

बुद्धिदाता आहेस, म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना


करतो कि हे ग्रंथकार्य तू निजकृ पेने पूर्णत्वास ने, मला

आशीर्वाद दे, स्फू र्ती दे.


आई सरस्वती ! मी तुला नमस्कार करतो. श्री
II

नृसिंहसरस्वती हे माझे गुरु. त्यांच्या नावात तुझे नाव


असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू माझ्यावर प्रसन्न
हो. या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर.
सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव, विश्वपालक श्रीविष्णू
आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रीवर्गास
नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादि
श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वाना नमस्कार. तुम्ही
माझ्यावर कृ पादृष्टी ठे वून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र
प्रार्थना करतो.
श्री दत्तावधूत क्षेत्र निखरें - राजापूर अध्याय १ / १
मातापित्यास नमस्कार. आपस्तंभ शाखेचे, कौंडिण्य गोत्रात
जन्मलेले सायंदेव हे आमचे मूळपुरुष ( खापर पणजोबा).
साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र
देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्वलायन
शाखेचे, काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा हि माझी
आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून
मोठ्या आदराने सरस्वती- गंगाधर असे नाम धारण के ले आहे.
आमच्या कु ळावर पूर्वीपासून श्रीगुरुं ची कृ पा आहे.
त्यांनीच मला श्रीगुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा के ली आहे.

II
श्रीगुरूं च्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा
आहे. श्रीगुरु नृसिंहसरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार.

दत्त
ज्यांना आपले व आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे
वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्यांच्या घरी हे
दे व
गुरुचरित्र नित्य नेमाने श्रवण, पठण के ले जाईल त्यांच्या घरी
लक्ष्मी वास करेल, त्यांची मनोरथे पूर्ण होतील. इष्टकार्यसिद्धी
गुरु

होईल. तेथे सुख, समाधान नांदेल; दुःख, संकटे, चिंता पीडा व


व्याधी ह्यांचे निवारण होईल. श्रीगुरूं च्या वास्तव्याने पावन
रा

झालेल्या श्रीक्षेत्र गाणगापुरास जाऊन श्रीगुरुं ची आराधना


का

के ल्याने इष्ट फलप्राप्ती त्वरित होते.


गुरूने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक (

नामधारक ) अन्य ग्रामी राहत असे. एके दिवशी त्याचा मनात


श्रीगुरूं च्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो

गाणगापुराकडे वाटचाल करू लागला. तो श्रीगुरूं ना करुण


वचनांनी एकसारखा आळवीत होता- " गुरुदेव मी आपला
II

दास आहे. आपण माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने


समस्त दैन्याचे निरसन होते त्या तुम्ही आज मला दर्शन दिले
तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी
अत्यंत व्याकु ळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृ पा के ली
नाही तर मी कोठे जाऊ? वेद म्हणतात गुरु हेच त्रैमूर्ति आहेत.
भक्तांसाठी कृ पासिंधूच आहेत. कलियुगात ते 'नृसिंहसरस्वती'
या नावाने विख्यात होतील; अगम्य लीला दाखवून लोकांचा
उधार करतील.

श्री दत्तावधूत क्षेत्र निखरें - राजापूर अध्याय १ / २


हे गुरो ! त्या वेदवचनांना तू माझ्याबाबतीत खरे करून
दाखव. तुझ्या ठायी तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत. तू
परम दयाळू आहेस, म्हणून माझी तुला अशी विनंती आहे कि
मला भावभक्ती माहित नाही, माझे चित्त हि स्थिर राहत नाही.
तरीही मला वेगाने पाव. माझ्यासाठी माता, पिता, आप्त, बंधू,
स्वकीय सर्व काही तूच आहेस, हे गुरुदेवा ! तू माझे कष्ट व

II
माझे दैन्य हरण कर. तू सर्वज्ञ आहेस. मग माझ्या मनीचे दुःख

दत्त
तुला कळात नाही ? घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी
रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग. काहीतरी घेऊन
मग देणे हा तर व्यवहार झाला. त्यात तुझे काय औदार्य?

दे व
हे नरहरी ! माझ्यावर कृ पा करणे तुला सहज शक्य
असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस ? मी
गुरु
बालक तुझा सेवक आहे. त्याच्याबाबतीत एवढी कठोरता
धरणे तुला शोभत नाही. तू माझावर रागवला आहेस का?
रा

माझावर कृ पा करण्यासाठी एवढा विलंब का ? "


का

तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने


वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले. त्यांच्या

दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने


गुरुचरणांवर मस्तक ठे वून वंदन के ले. श्रीगुरूं च्या भेटीने त्याला

खूपच हर्ष झाला होता. त्याच्या हृदयात श्रीगुरुं ची मूर्ती


स्थिरावली होती !
II

श्री दत्तावधूत पादुका निखरे अध्याय १ / ३


श्री दत्तावधूत क्षेत्र निखरें - राजापूर

You might also like