You are on page 1of 3

#अष्टविनायक दर्शन: अष्टविनायक दर्शन कसे करावे ?

🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏

अष्टविनायक दर्शनाचा क्रम आणि अंतर | अष्टविनायक दर्शन कसे करावे

१. पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर

२. दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

३. तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर

४.चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक

५. पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी

६. सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

७. सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर

८. आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती

अष्टविनायक यात्रा परिचय


गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात.
अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय. ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात या आठ
गणपतीच्या मंदिरांना भेट देण्याने मनाला शांत आणि शिथिल वाटते.

अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांना जोडू न तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय
दैवत गणपती होय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा के ली जाते. कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना
दूर करून समृद्धी प्रदान करतो. ही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली आहेत. ही आठही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृ ष्ठ असून ती मनाला
सुखावह वाटतात.

अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपतींच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. या प्रत्येक मंदिरांचा
स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक
मंदिरातील गणपतीच्या मुर्त्या विलक्षण आहेत. या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून भिन्न आहे. असे म्हटले
जाते की ही यात्रा पूर्णत्वास नेण्याकरिता सर्व आठ गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे. या प्रत्येक आठही देवळातील प्रत्येक गणपती
हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते. या विविध देवळांमध्ये मोरश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक,
बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी गणपतीची वेगवेगळी नांवे आहेत.

ही मंदिरे मोरगांव, रांजणगांव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड येथे वसलेली असून ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात
स्थित आहेत. या ८ मंदिरांपैकी ६ ही पुणे जिल्ह्यात आणि २ रायगड जिल्ह्यात असूनसुद्धा तुलनेने पुण्याहून जवळ पडतात.

अष्टविनायक दर्शनाचा क्रम आणि अंतर | Ashtavinayak Darshan Kram aani Antar
पहिला गणपती - मोरगावचा श्री मयुरेश्वर
मोरगांव हे पुण्याच्या आग्नेय (दक्षिणपूर्व) दिशेला स्थित आहे. ते पुण्याहून सासवड-जेजुरी मार्गे के वळ दोन तासांच्या अंतरावर आहे. अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ
हा मोरगांव येथील श्री मयूरेश्वराच्या दर्शनाने के ला जातो.

दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर


मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे श्री सिद्धेश्वर हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफु ला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.

तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर


पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर हे कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे.
महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून यु टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमॅॅजिका मार्गे सुधागढजवळ पाली स्थित
आहे.

चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक


पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे.
पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी
थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे
आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.

सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक


लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे.

सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर


हे देऊळ लेण्याद्रीपासून २० किमी आणि ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती


पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे. आणि पुन्हा मोरगांवच्या श्री मयुरेश्वराचे दर्शन घेण्याने अष्टविनायक यात्रा संपन्न होते.

क्रम मंदिर ठिकाण अंतर आणि मार्ग


१ मोरेश्वर मोरगांव, पुणे
२ सिद्धिविनायक सिद्धटेक, अहमदनगर मोरगांव - सिद्धटेक अंदाजे ६५ किमी
(सुपा-चौफु ला-पाटस-दौंड-सिद्धटेक)
३ बल्लाळेश्वर पाली, रायगड सिद्धटेक - पाली अंदाजे २२२ किमी
(सिद्धटेक-दौंड-पाटस-पुणे-कामशेत-खालापूर-पाली)
४ वरद विनायक महाड, खोपोली जवळ, रायगड पाली - महाड अंदाजे ४२ किमी
(खोपोली -पाली)
५ चिंतामणी थेऊर, पुणे महाड - थेऊर अंदाजे ११० किमी
(खोपोली-लोणावळा-कामशेत-पुणे-हडपसर-थेऊर)
६ गिरिजात्मक लेण्याद्री, पुणे थेऊर - लेण्याद्री अंदाजे १०० किमी
(लोणीकं द-पेठ-नारायणगांव-जुन्नर-लेण्याद्री)
७ विघ्नेश्वर ओझर, पुणे लेण्याद्री-ओझर अंदाजे १५ किमी
(गोलेगांव-कु मशेत-ओझर)
८ महागणपती रांजणगांव, पुणे ओझर - रांजणगांव अंदाजे ७० किमी
(नारायणगांव-शिंगावे-माळठाण-रांजणगांव)
९ रांजणगांव - मोरगांव अंदाजे ७० किमी
(पारगांव-के डगांव-सुपे-मोरगांव)

पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कं पन्यासुद्धा हे टूर्स आयोजित करतात. आपल्या
स्वतःच्या खासगी वाहनानेसुद्धा ही यात्रा करता येते. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याचे
रिसोर्ट उपलब्ध आहेत. अष्टविनायकाची ही मंदिरे २० ते ११० किमी इतक्या क्षेत्रात स्थित आहेत.

ही आठही मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत आणि या मंदिरांना भेट देण्याचा एक ठराविक क्रम आहे. परंपरेनुसार तीर्थयात्रा मोरगांवच्या मोरेश्वराच्या दर्शनाने
सुरु होते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगांव याक्रमाने मंदिरांना भेट देण्यात येते. या तीर्थयात्रेची सांगता मोरगांवच्या
मंदिराला पुन्हा जाण्याने होते.

अष्ट विनायक यात्रा कां करतात?


अष्टविनायक यात्रेकरिता भक्तमंडळी इतकी आतुर कां असतात याचे कारण अतिशय सोपे आहे: ते मानतात की के वळ या आठ मंदिरांना भेट देऊनच गणपतीचे
खऱ्या प्रकारे दर्शन घडू येऊ शकते. अशी ही त्यांची गहन श्रद्धा त्यांना या मंदिरांकडे खेचून घेऊन येते. या मंदिरांचे दर्शन घेण्याने त्यांना आनंद तर
मिळतोच पण त्याशिवाय एक प्रकारची मानसिक शुद्धतादेखील मिळते. या मंदिरांमध्ये गणपतीचे दर्शन घेण्याने त्यांची गणेशभक्ती अधिक गहिरी आणि अधिक
सात्विक होते. शिवाय असे मानले जाते की या सर्व मंदिरातील मुर्त्या या स्वयंभू असून त्यांच्या निर्मितीत मानवी हातांचा स्पर्शसुद्धा झालेला नाही. म्हणूनच या
देवळांमध्ये गणपतीचे दर्शन हे त्याच्या सर्वात सात्त्विक अवतारामध्ये मिळते. शिवाय आजकालचे आपले आधुनिक जीवन ताणतणावाचे असते. निसर्गरम्य अशा जागी
स्थित असलेल्या या देवळांना भेट दिल्याने मनाला हलके वाटते, शांत वाटते, प्रसन्न वाटते आणि पुन्हा आपली कर्तव्यपूर्ती करण्यासाठी ही यात्रा एक वेगळीच
उर्जा प्रदान करते.

"आठ अंक आठ प्रकारच्या प्रकृ तीशी जोडला गेला आहे. या अष्ट प्रकृ ती कोणत्या – पृथ्वी, वायू, जल, आकाश, अग्नी, चित्त, बुध्दी आणि अहंकार.
मग एका महापुरुषांनी सुचवले कि हरेक प्रकृ तीसाठी एके क गणपतीची स्थापना के ली जावी. बस, आणि काही नाही. १२ ज्योतिर्लिंग कां आहेत? अष्ट गणपती
काय आहेत इत्यादी मध्ये आपल्याला अडकण्याची गरज नाही. पुरातन काळामध्ये समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचा तो एक प्रयत्न होता. कारण त्याकाळी
थोड्या थोड्या अंतरावर, दर ६०० कि.मी. अंतरामध्ये एक नवी भाषा, एक नवी संस्कृ ती,नवीन राहणीमान पाहायला मिळणे साधारण गोष्ट होती.

उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, सर्वत्र काहीही समान नव्हते. तेंव्हा देशात, समाजामध्ये एकी कशी निर्माण करावी? अश्यावेळी सांगितले जायचे, १२
ज्योतिर्लिंगाची यात्रा करा, रामेश्वरला जा, काशीला जा, त्र्यंबके श्वर इत्यादीला जा. अश्या प्रकारे भ्रमण के ल्याने, तीर्थयात्रा के ल्याने देशात एकी निर्माण
होण्यास मदत होत होती. हेच कारण आहे.

अश्याच प्रकारे अष्ट विनायक आहेत. मुख्य विचारधारा हीच होती कि महाराष्ट्रभर लोक प्रवास करतील तेंव्हा तीर्थयात्रेचे फळ मिळेलच. तसेच एकमेकांना भेटू न,
जाणून घेऊन आपापसात जोडले जातील. त्याकाळी वेगळ्या सुट्टीची प्रथा नसल्याने तीर्थयात्रेलाच प्रवास, पर्यटन समजले जायचे.

कारण हे धार्मिक, पवित्र कार्य होते. म्हणून वेगवेगळी मंदिरे निर्माण के ली गेली. आणि लोकांनाही
वाटायचे कि अवश्य तेथे जावे आणि दर्शन घ्यावे."

परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “ गणपतीचे जे बाह्य रूप, ज्याला आपण ‘गजानन’ समजतो, त्याच्यामागे मोठे रहस्य दडलेले आहे. ज्ञानाचे,
विद्येचे अधिपती आहे गणपती. आणि ज्ञान-विज्ञान तेव्हाच उमजते जेव्हा माणूस आंतरिकपणे जागृत होतो. जेव्हा जडत्व असते तेव्हा ज्ञानाचा, विद्येचा अभाव
असतो आणि जीवनात चैतन्य किं वा कोणतीही प्रगती नसते. तर जर चैतन्याला जागृत करायचे असेल तर चैतन्याचे अधिदेव आहेत श्री गणेश यांची भक्ती के ली
पाहिजे. गणपतीला कोणी परके न समजता आपल्या आंतरिक शक्तीचे कें द्र मानले गेले आहे. आपल्या अंतर्मनात गणपतीची स्थापना करा.

जे निराकारापर्यंत पोहोचू शकत ते गणेशाच्या साकाररूपाचा आधार घेत हळूहळू निराकारापर्यंत पोहोचू शकतात. जो साकाररुपी गणेश आहे, जो गजवदन आहे,
त्याची पूजा करीत करीत निराकार परमात्म असलेल्या गणपतीपर्यंत पोहोचण्याची अद्भुत कला आपल्या भारतात आहे.”
संदर्भ आंतरजाल

You might also like