You are on page 1of 19

कार्तिक पौर्णिमा, कृ त्तिका नक्षत्र,

कार्तिकस्वामी दर्शन
आणि धनप्राप्तीचे योग

सचिन मधुकर

परांजपे
दिनांक १९ नोव्हेंबर २०२१
(शुक्रवार) त्रिपुरारी पौर्णिमा व
श्रीकार्तिकस्वामी दर्शन....

(लेखक - सचिन मधुकर


परांजपे, पालघर)

श्रीशिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव,


श्रीगजाननांचे ज्येष्ठ भ्राता
श्रीकार्तिके य/कार्तिकस्वामी यांच्या
दर्शनाचा योग यंदा येतो आहे. दिनांक
१९ नोव्हेंबर २०२१
रोजी (गुरुवार
मध्यरात्रीनंतर उजाडता शुक्रवार)
“मध्यरात्री १ वाजून २९ मिनिटांपासुन
ते दुपारी २ वाजून २६ मिनीटांपर्यंत
आहे.”
"कार्तिक महिना, पौर्णिमा आणि कृ त्तिका
नक्षत्र" या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात
तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी
ज्या काळात कृ त्तिका नक्षत्र असेल तेव्हा
काळात श्रीकार्तिके याचे दर्शन घेण्याचा
शुभकाल मानला जातो. श्रीकार्तिके य हे

बल, बुध्दी,साहस आणि यशस्वितेचे


प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा
सेनापती मानला जातो. त्यामुळे
ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व
शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिके याकडे
आहे.
वर वर्णन के लेल्या पर्वणीकाळात
त्याचे दर्शन घेणे हे
"धनसंपत्तीकारक" ही मानले गेले
आहे. "कार्तिकस्वामींचे दर्शन
घेतल्यानंतर आगामी
सबंध वर्ष हे
हमखास धनलाभाचे जातेच असा
माझ्यासह अनेकांचा
वर्षानुवर्षाचा अनुभव आहे."
आर्थिक अडचणीत, कर्जात बुडालेल्या
व्यक्तींनी या पर्वणीकाळात अवश्य दर्शन
घेऊन प्रार्थना के ल्यास आगामी वर्ष हे
आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे.
श्रध्दा असेल तर हा अनुभव नक्कीच
येतो. विशेष म्हणजे इतरवेळी कार्तिके याचे

दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व


स्त्रीयांना वर्ज्य असले तरी या
पर्वणीकाळात स्त्रीयादेखील कार्तिके याचे
दर्शन घेऊ शकतात हे विशेष आहे.
(लेखक - सचिन मधुकर परांजपे,
पालघर)

...कार्तिके य हा ब्रह्मचारी असल्याने दर्शनाचे


वेळी त्यांना दंड, पाण्याने भरलेला कमंडलु, २७
रुद्राक्षांची माळ, कमळाचे फु ल (किंवा
कोणतीही पांढरी फु ले) आणि दर्भ अर्पण
करण्याची प्रथा आहे. अनेक भक्त प्रतिकात्मक
पातळीवर सोने (सुवर्ण


-Gold) देखील
अर्पण करतात ( हे प्रतिकात्मक अर्पण
असल्याने ते किमान १०० मिलीग्रॅम असले तरी
चालते). दर्शनाचे वेळी अत्यंत भक्तिभावाने
दर्शन घेऊन, वरीलपैकी शक्य असतील त्या
वस्तुंचे अर्पण करावे आणि अपेक्षित प्रार्थना
करावी.
दर्शनाचे वेळी कार्तिकस्वामींच्या २८ नावांचा
उल्लेख असलेले "प्रज्ञाविवर्धन स्तोत्रा"चे पाठ
के ल्यास अधिक उत्तम. विशेषत:
विद्यार्थीदशेतील मंडळींनी प्रज्ञाविवर्धन

स्तोत्राचे पाठ करुन कार्तिके याचे दर्शन घेणे


अधिक लाभदायक मानले गेले आहे.
(विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी हे पर्वणी
दर्शन खुप शुभ असते)
....सकाळी उठु न स्नान, दैनंदिन पुजाअर्चा
आटोपुन, आईवडील, गुरुं ना नमस्कार
करुन, शुचिर्भुतपणे दिलेल्या वेळेतच दर्शन
घ्यावे. वरीलपैकी शक्य असतील त्या गोष्टी
अर्पण कराव्यात, प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ

जमतील तसे करावेत. त्या दिवशी मद्यपान,


मांसाहार अर्थातच कटाक्षाने वर्ज्य करावा.
ब्रह्मचर्यपालनही करावे…

वरील तब्बल १३ तासांच्या पर्वणीकाळातही पुढील


काही वेळा या जास्त शुभ आहेत हे लक्षात घ्यावे

१८ आणि १९ नोव्हेंबर यांच्या मधील मध्यरात्री


(उजाडता शुक्रवार) ३ वाजून
३८ मिनिटांपासून
सकाळी ६ वाजून
५१ मिनिटांपर्यंत.

रोजी -
१९ नोव्हेंबर
सकाळी ८ वाजून १४ मिनिटापासून
ते सकाळी ११

वाजून १ मिनिटांपर्यंत
आणि

दुपारी १२ वाजून २५ मिनिटांपासून पासून ते दुपारी


१ वाजून ४८ मिनिटांपर्यंत.
(१९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजून ०१
मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत
राहूकाल असल्याने त्याकाळात अजिबात दर्शन घेऊ
नये ही नम्र विनंती आहे.)
पालघर व आसपासच्या परिसरात
भवानगड (के ळवे), वसई (निर्मळ) या
परिसरात कार्तिके यांची देवळे आहेत.
पुण्याला पर्वतीवर, कोल्हापुरला महालक्ष्मी
मंदिरालगत देऊळ आहे. स्वतंत्र मंदिर न

मिळाल्यास कोणत्याही दाक्षिणात्य


मंदिरातील मुरुगनस्वामींचे दर्शनही घेऊ
शकता (मुरुगन म्हणजेच कार्तिके य)

(लेखक - सचिन मधुकर परांजपे,


पालघर)

प्रज्ञाविवर्धन स्तोत्र

अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-स्तोत्र-मंत्रस्य
सनत्कु मारऋषि:।
स्वामी कार्तिके यो देवता। अनुष्टुप् छंद:।
मम सकल विद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोग:।

श्रीस्कं द उवाच।।
योगीश्वरो महासेन: कार्तिके योग्निनन्दन:।
स्कं द:कु मार: सेनानी: स्वामिशंकरसंभव: ।।१।।
गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वज:।
तारकारिरुमापुत्र: क्रौंचारिश्च षडानन: ।।२।।

शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्ध:सारस्वतो गुह:।


सनत्कु मारो भगवान् भोगमोक्षफलप्रद: ।।३।।
शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृ त।
सर्वागमप्रणेताच वांछितार्थप्रदर्शन: ।।४।।

अष्टाविंशति नामानि मदीयानीति य: पठे त्।


प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।।
महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम्।
महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ।।६।।
||इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम्||
ज्यांना वरील स्तोत्रवाचन अवघड वाटतं अशांसाठी
खाली दोन मंत्र देत आहे. दर्शन कालावधीत या
मंत्राचा मनातल्या मनात सतत जप सुरु ठे वावा.
दोन्ही मंत्र आलटून पालटून किंवा एकच कोणताही
मंत्रजप के ला तरी हरकत नाही.

१)श्रद्धां च, मेधां च, यशश्च, विद्यां प्रज्ञां च, बुद्धिं


बलसम्पदौ च, आयुष्य-मारोग्य-मतीव तेजः सदा
कु माराय शुभं करोतु...

२)कार्तिक्यां कृ त्तिकायोगे यः कु र्यात्स्वामिदर्शनम् ॥


सप्तजन्म भवेद्विप्रो धनाढ्यो वेदपारगः॥
आयुष्यातील सर्व प्रकारच्या
दारिद्र्याचा समूळ नाश करण्यासाठी
या दर्शनपर्वणीचा नक्की लाभ घ्या
(लेखक:- सचिन
मधुकर परांजपे)

(कृ पया फे सबुक व व्हॉट्सऍपच्या


माध्यमातून हा मेसेज "लेखकाच्या
नावासहीत" अधिकाधिक शेयर करा,
जेणेकरुन अधिकाधिक भाविकांना
या विशेष पर्वणीचा लाभ घेता येईल.)
सचिन मधुकर परांजपे
अत्तरवाले परांजपे
स्वराज्य भवन बंगला,
ग्राउंड फ्लोअर,
उमा निळकं ठ आणि कु बेर
शॉपिंगच्या मधली लेन,
सद्गुरु हॉटेलच्या समोर,
पालघर (पश्चिम)
मोबाईल:- 9823124242

You might also like