You are on page 1of 4

*मकर सक्रांत विशेष**-* *२०२१*

संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त: ०७:१५:१४ ते १२:३०:००

कालावधी: ५ तास १४ मिनिटे

महापुण्यकाल मुहुर्त: ०७:१५:१४ ते ०९:१५:१४

कालावधी: २ तास ० मिनिटे

संक्रांतक्षण: ०१:५३:४८

या कालावधीत सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे यालाच


सुर्यसंक्रमण म्हणतात. हा कालावधी जननप्रक्रियेसाठी अनिष्ट असतो. हा
हिंद ू धर्म संस्कृतीतील व नववर्षातील पहिला सण होय. या संक्रांती
बाबतीत अनेक अफवा किवा चुकीच्या गोष्टी पसरविल्या जातात. जसे
परवाच दि.१२/०१/२०२१ रोजी वेळ अमावास्या ही शेतकर्‍यांसाठीचा मोठा
सण झाला त्या दिवशी सद्ध ु ारी १२:२४ नंतरच धरणीमातेचे पज
ु ा दप ू न,
विधी केले पाहिजे. खरे तर त्या दिवशी मळ
ु नक्षत्र हे सकाळी ७:३८ लाच
संपले होते व यातून काही गैरसमज लोकांच्या मनामधे झाले की ही
अमावास्या खडतर आहे आणि मुळावर आहे .

असेच काही गैरसमज संक्रांतीबद्दल पण बोलले जातात , जसे की संक्रांत


अशभ
ु आहे , संक्रांत खराब आहे पण असे काही नसते. कारण या
संक्रांतीच्या दरम्यान स्वत: पिता असणारे सूर्यमहाराज आपल्या लाडक्या
पुत्रास शनि महाराजांना भेटावयास येतात असे म्हटले जाते. पिता पुत्राची
भेट ही अनिष्ट असते का?? ही भेट धनू राशीतून मकर राशीत
आगमन करून होते. यालाच आपण उत्तरायण म्हणतो. उत्तरायणात
धरणी माता कशी फुलून, बहरून, सौदर्याने नटुन-सजून अख्या

प्राणिमात्रास/ निसर्गास आपल सालस स्वरूप दर्शविते यासारखा आनंद

कोणता अशुभ असू शकतो? उलट उत्तरायण पर्वास स्वर्गाची दारे खुली

असतात असे म्हटले जाते. मग संक्रांत अशुभ कशी असणार?

आपल्याकडे संक्रांत ३ दिवस साजरी केली जाते. यातील पहिला दिवस

भोगी, दस ु य-संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किक्रांत


ु रा दिवस मख्
होय.

*पहिला दिवस-भोगी:*
भोगी याचा अर्थ भोग घेणे/ लट
ु णे. निसर्गातील अनेक भाज्या, जसे
की गाजर, जवस, घेवडा, पावटा इत्यादींची मिश्रित भाजी केली जाते. या

भाजीला महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे खें गट असे नाव आहे . हे खें गट


फक्त आणि फक्त संक्रांतीलाच केले जाते व यासोबत तीळ टाकलेली
बाजरीच्या भाकरीचाही मान असतो.

* दस
ु रा दिवस- मुख्य सक्रांत:*
या दिवशी आपण तिळाचे लाडू करतो. तिळगूळ घ्या गोड गोड

बोला असे महाराष्ट्रातील आपल्याकडील प्रसिद्ध वाक्य आहे . या दिवशी


आपण आपले शत्रू असो किवा रुसवा फुगव्याने का होईना दरु ावलेल्या
नातेसंबंधाना मागचे सारे विसरून तिळगळ
ू घ्या गोड गोड बोला असे
म्हणून जवळ करण्याचा प्रयत्न करतो आणि खरे च या सणाच्या
निमित्ताने का होईना आपापसातील वैर, मतभेद, हे वा, तिरस्कार

इत्यादींचे दरु ाकरण होते व आपुलकी, माया व प्रेमाची छाया तयार होते.
या मख्
ु य दिवशी सवाष्ण स्त्रिया भल्या पहाटे आपल्या ग्रामदै वत
असलेल्या मंदिरात ओवसा घेऊन जातात. यात गाजर, हरभरा. शेंगा,
उस इत्यादींची छोट्या लोटक्यात घालून व कापडीवस्त्र लोटक्यावर ठे ऊन
हळदी-कंु कवाने पुजा केली जाते. यास सुगडाचा वाण असे म्हणतात. घरी
आल्यानंतर या सग
ु डाच्या वाणास परु ण पोळीचा मानाचा नैवद्य दाखवला
जातो आणि स्त्रिया नवीन भांडी, वस्तु, गूळ, तीळ यासारख्या गोष्टी

दानधर्म करतात. संपर्ण


ू महाराष्ट्रात नव वधंच
ु हळदी कंु कवाचा पहिला

ू चालू होतो. एवढी सर्व शभ


मान याच दिवसापासन ु कार्ये याच दिवशी
पार पाडली जात असताना संक्रांत अशुभ किवा खडतर म्हणणे योग्य
आहे का?

*तिसरा दिवस- किक्रांत:*


किक्रांत म्हणजे छोटी संक्रांत. संक्रांतीदे विने मकरसंक्रांतीच्या (मुख्य

संक्रांतीच्या) दस
ु र्‍या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसास ठार मारले
आणि त्याच्या जाचातुन प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किक्रांत

म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिवस म्हणून दाखवलेला

असतो. हा दिवस शभ
ु कार्याला घेतला जात नाही.
आता या वर्षीची सक्रांत कशी आहे ते पाहू, या वर्षीची सक्रांत
बव करणावर आलेली आहे , हिचे मुख्य वाहन-सिंह असून उपवाहन-हत्ती
आहे . पांढरे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भश
ृ ुंडी आयुध आहे .
ू वयाने बालक स्वरूप आहे .
माथ्यावर कस्तरु ीचा टिळा लावलेला असन
ं ासाठी चाफा असून गोडपदार्थ अन्नभक्षण करीत आहे . भूषण म्हणून
सुंगध
प्रवाळ परिधान केलेला आहे . ही संक्रांत दे वजातीची आहे . संक्रांतीचे
वारनाव- नंदा तर नक्षत्र नाव- महोदरी असे असून पश्चिम दिशेकडून पूर्व
दिशीकडे जात आहे व आग्नेय दिशेकडे (दृष्टी) पाहत आहे .

संक्रांतीच्या पर्वकाळात कठोर शब्द टाळावेत. वक्ष


ृ तोड करू नये. उलट
ृ संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. सर्वाना तिळ
गोडगोड बोलण्याचा व वक्ष
गुळ घ्या गोड गोड बोला असे शब्दरूपी कथन केले पाहिजे.माझ्याकडूनही

तुम्हास व तुमच्या परिवारास मकर-संक्रांतीच्या हार्दिक शुभेछा...!

*शभ
ु ेच्छुक: श्री काळे गुरुजी,
वागदरी*
+91-9637987796/ +91-
9172438900

You might also like