You are on page 1of 12

२) अनभ

ु वामत
ृ ातील चंद्रप्र�तमा
�ानदे वांचे ‘अनुभवामत
ृ ’ म्हणजे सा�ात्काराचा अनुभव शब्दात व्यक्त करणारे लघुकाव्य. या
काव्याची सुरवात त्यांनी �नरुपा�धक असणायार् व जगाचे जनक असणायार् ‘दे वोदे वींना’ वंदन करून
केल� आह�. हे दे वोदे वी �नरुपा�धक असूनह� जगाला जन्म दे ऊन जगाचे माता-�पता शोभतात, हे
म्हणणे प्रथमदशर्नी �वरोधाभासात्मक वाटते. या �वरोधाभासाचे स्वरूप कसे आहे त्याचा मागोवा
त्यांनी आपल्या या काव्यात घेतला आहे . आत्मानभ
ु व शब्दात व्यक्त करतांना शब्द तोकडे पडतात
याची त्यांना जाणीव आहे . पण तर� सुद्धा त्यांनी आपला हा अनुभव नाना प्र�तमांच्या सहाय्याने
वाचकाच्या मनावर �बंबवण्याचा प्रयत्न केला आहे . त्यांनी वापरलेल्या अनेक प्र�तमांमधे एक
महत्वाची प्र�तमा म्हणजे ‘चंद्र’.
अनुभवामत
ृ ाचे प�हले प्रकरण आहे ‘�शव-शिक्तसमावेशन’. यात प�हल्या पंचच
े ाळीस
ओव्यांमधे �ानेशांनी �शवशक्तीच्या अलौ�कक संसाराचे दृश्य �चत्र उभे केले आहे . हा संसार जर� �शव
व शक्ती या जोडप्याचा असला तर� वास्त�वक तेथे द्वैत नाह�. ते तत्व एकच आहे . ते ना स्त्री ना
पुरुष. काह�नाह�पणाने युक्त असे ते उदासीन तत्व आहे . �शव-शक्ती असा जो स्त्री-पुरुष भेद �दसतो,
तो केवळ शब्दातला आहे . अशा या वधव
ु रांना जाणावयास गेले तर त्यांना जाणणे दरू च रहाते, पण
त्यांना जाणणाराच त्यांच्या प्रवाहात वाहून जातो. त्यामुळे त्यांना वेगवेगळे वंदन तर� कसे करणार?
�शव-शक्तीचे वणर्न करतांना त्यांनी त्यांना नाव व रूप �दले व नकळत भेदाचा आश्रय केला गेला.
तथापी सवर् भेद �गळून एकाथार्चाच प्रकाश पाडणायार् या �शवशक्तींना त्यांनी अ�भन्नपणे वंदन केले
आहे .
चंद्रा�चया द�दावर� । होत चांदण्यांची �वखरु � ॥१-५६॥
चंद्राचे चांदणे सवर् जगात पसरते. त्याप्रमाणे त्याच्या ढे रपोटावरह� पडते. पण त्यामळ
ु े त्याच्या घरात
चांदणे सांडून फुकट गेले असे म्हणता येणार नाह� व चंद्र व चांदणे यात �भन्नपणह� येत नाह�. ते
स्वभावत:च एकरूप आहे त. त्याचप्रमाणे �शव-शक्ती व �ानदे व हे स्वभावत:च एकरूप आहे त.
�ानदे व म्हणजे �चदाकाशात उगवलेल्या �शवशक्तीरूपी पूणर् चंद्राचे चांदणे आहे त आ�ण हे �वखरु लेले
चंदणे सवर् जगाला एकरूपतेचा प्रकाश अ�भन्नपणे दे त आहे .
सद्गुरु हे कैवल्यकनकाचे दान करण्यात मागेपुढे पहात नाह�त व लहान मोठ्याचीह� �नवड
करत नाह�त. ते आपल्या गुरुतत्वाने �शवालाह� िजंकून घेतात. त्यांच्या कृपेवर �ानदे वांनी
‘पुनीवल�लेच’े म्हणजेच पौ�णर्मेचे रूपक केले आहे .
बोधचंद्रा�चया कळा । �वखरु ल्या एकवेळा ।
कृपापुनीवल�ळा । कर� जयाची ॥२-७॥
चंद्राच्या �वखरु लेल्या कळा पौ�णर्मेला एकत्र येतात. इथे चंद्र आहे तो बोधरूपी चंद्र. ‘अहं ब्रह्मािस्म’
आत्मप्रचीती, स्वरुपाची ओळख हा जो बोध आहे त्या बोधरूपी चंद्राच्या कळा �वखरु ल्या होत्या.
नामरूपात्मक जगद्भावाने चांगल्या --------- होत्या. ‘अयमात्मा ब्रह्म’, ‘अहम्ब्रह्मािस्म’, ‘तत्वम�स’
आ�ण सव� ‘खिल्वदं ब्रह्म’ असे बोधाचेह� चार भाग आहे त. हे बोधाचे चार भाग म्हणजे जणु बोधरूपी
चंद्राच्या कळा. आत्मा ब्रह्म आहे . तो माझ्यात आहे म्हणून ‘मी ब्रह्म’, तो तुझ्यातह� आहे म्हणून
तू ब्रह्म. तो माझ्यात आहे, तुझ्यात आहे , म्हणजेच सवार्त आहे , म्हणून हे सवर् जगच ब्रह्मरूप आहे ,
अशा बोधाच्या चार पाययार् आहे त. शेवटच्या पायर�वर पोचणे म्हणजे पूणर् बोध होणे.
�वखरु ल्या कळा । होती एकवट ।
पौ�णर्मेची भेट । होय जेव्हा ॥२-७-१७॥
तैसी नाना दृश्यी । �चन्मात्रप्रतीती ।
गरु
ु कृपामत
ू � । भेटताच ॥२-७-१८॥ (अभंग-अमत
ृ ानभ
ु व)
असा स्वामी स्वरूपानंदांनी अनव
ु ाद केला आहे . �शष्याच्या बोधरूपी चंद्राला ज्यावेळी गरु
ु कृपेची
पौ�णर्मा भेतते, त्यावेळी त्याचा �वखरु लेला बोध एकवटतो व सवर् दृश्य जगतात त्याला �चन्मात्राची
प्रतीती येत.े
ु ं चा म�हमा गावा �ततका थोडच आहे . यांच्या
अशा या अ�ानभ्रांती हरण करणायार् सद्गरू
तेजाच्या एका कवडशामुळे चंद्राला व सूयार्ला परस्पर�वरोधी शीतलतेचे व उष्णतेचे दान �मळाले.
(२-२३). श्रीमद्भगवद्गीतेतह� म्हटले आहे -
यदा�दत्यगतं तेजो जगद्भासयतेऽ�खलम ् ।
यच्चन्द्रम�स यच्चाग्नौ तत्तेजो �व�द्ध मामकम ् ॥१५-१२॥गी॥
सूय,र् चंद्र, अग्नी या सवा�ना प्राप्त झालेले तेज त्याचेच परमात्म्याचेच आहे . आ�ण परमात्मा व
सद्गुरु यांच्यात तर काह�च फरक नाह�.
यानंतर �ानदे वांनी आत्मस्वरूपाला �कंवा आणखी एक नवलाईचे वस्त्र पांघरले आहे .
चां�दणे स्वप्रकाशाचे । पांघुरला द्वैतदन
ु ीचे ।
तरू उघडेपण न वचे । चांदाचे जया ॥२-२५॥
या ओवीत �ानदे वांनी आत्मरूपाला चंद्र किल्पले आहे . त्याने द्वैतदन
ु ीचे दह
ु े र� वस्त्र पांघरले आहे . हे
वस्त्र चांदण्यांच्या प्रकाशाचे तलम, शीतल व शुभ्रधवल आहे. द्वैताचे वस्त्र असल्यामुळे त्याला दहु े र�
वस्त्र म्हटले आहे . थंडी भगल� नाह� म्हणून त्याने दहु े र� वस्त्र पांघरले असले तर� ते वस्त्र इतके तलम
व नाजुक आहे क� वस्त्र लपेटूनह� त्य़ाचे मूळचे स�दयर् तर लपत नाह�च, उलट त्याचे स�दयर् अ�धक
खल
ु ले आहे . त्या आत्मरूपी चंद्राने द्वैताचे दहु े र� वस्त्र घेऊन सायार् �वश्वालाच आपल्या पांघरुणात
घेतले आहे. या मोहक पांघरुणामुळॆ �वश्व अजून मोहक �दसते. द्वैतवस्त्रामुळे �वश्वाचा आभास जर�
मोहक �दसत असला तर� हे �वश्वरूपी पांघरुण घेऊनह� आत्मरूप चंद्र उघडाच आहे , असे �ानदे वांना
�दसते. कारण ते �नखळ आत्मरूप अनुभवत आहे त. या चंद्राचा आणखी एक �वशेष असा आहे क�
हा जे वस्त्र पांघरतो ते स्वप्रकाशाचे आहे . लौ�कक सष्ृ ट�तील चंद्र परप्रकाशी आहे . हा स्वयंप्रकाशी
परमात्मा �शव-शक्ती, जीव-�शव, गुरु-�शष्य, द्रष्टा-दृश्य वगैरे द्वैतरूपाने आ�वष्कृत झाला असला
तर� याचे उघडे रूप झाकले जात नाह�. त्याचे शुद्ध काह�नाह�पण, �नखळ स्वरूप तसेच रहाते. आरं भी
दृश्यरूपात जाणवणार� ह� चंद्राची प्र�तमा वाचकाला हळूहळू �नगण
ुर् ाप्रत घेऊन जाते.
या आत्मरूपात गुरुत्व व �शष्यत्व हे दोन्ह� भाव नांदतात. चंद्र व चांदणे एका चंद्रातच नांदत
नाह� का? (२-६२). त्याप्रमाणे �शष्य व गुरुनाथ या दोन्ह� शब्दांचा अथर् एकच होतो. तो म्हणजे
‘श्रीगुरु’. हा अथर् फक्त दोन �ठकाणी रहातो. असा हा गुरु�शष्यभाव परस्पर�वरोधी नाह� व प्रकट
होतांना एकत्वाचा भंग सुद्धा होत नाह�. अशा या श्रीगुरु �नवत्ृ तीची �नवत्ृ ती ह�च शोभा आहे . हे
�नवत्ृ तीचे चक्रवत� सम्राटपणाचे अ�धकार �मळवण्यासाठ� त्यांना काह�ह� करावे लागले नाह�. यद्ध
ु ,
प�पात, वाद�ववाद न करता ‘काह�नाह�पणातन
ू ’ ह� ‘राणीव’ ते भोगत आहेत.
गगन स�ू न पोट� । जै चंद्राची पघळे पष्ु ट� ।
त� चांद�णया तेणे उट� । आंगाची क�जे ॥२-७४॥
गगनह� पोटात घालन
ू जेव्हा चंद्राची पुष्ट� पघळते तेव्हा त्याच चांदण्याने त्याच्या अंगाची उट�
होते. त्या चंद्राच्या पघळणायार्, सतत वाहणायार् त्याच्या पष्ु ट�ने गगनालाह� आपल्या पोटात घेतले
आहे . �तने सवर् �वश्वाचा ग्रास केला आहे . त्याचे शीतल, शभ्र
ु व मल
ु ायम चांदणे सवर् �वश्वात पसरते.
चांदण्यांच्या रूपाने जणु चंद्राची पुष्ट�च पघळते. चंद्रामधन
ू पाझरणार� शीतल, मुलायम उट� सवर्
�वश्वावर शीतलतेचा, एक अना�मक सुगंधाचा वषार्व करते आ�ण त्याच उट�ने त्याचे सवा�गह� माखन

�नघते. त्यामुळे त्याची शोभा सहस्रपट�ने उजळते व तो अ�धक स�दयर्पूणर् होतो. तसेच हे आत्मरूप
आपल्याच दे हाच्या शोभेने �वश्वालाह� स�दयर् बहाल करते. चंद्र जसा आपल� शोभा वाढवण्यास स्वत:च
कारणीभूत होतो, त्याप्रमाणे हा �नवत्ृ तीचा चक्रवत� सम्राट सवर् �वश्वाचे साम्राज्य चालवूनह� स्वत:च्या
�नवत्ृ तीला स्वत:च कारणीभूत होतो. असा हा गोसावी म्हणजे �नवत्ृ तीनाथ आहे त, तसेच आ�दनाथ
शंकरह� आहे व सा�ात परमात्मरूपह� आहे . �कंबहुना या �तघात काह�ह� फरक नाह�.
या ग्रंथाचे चौथे प्रकरण आहे ‘�ान-अ�ान-भेद’. �ान हे अ�ान-सापे� असल्याने अ�ान
नाह�से झाले क� �ानह� नाह�से होते हा �वचार या प्रकरणात सां�गतला आहे. परा, पश्यंती, मध्यमा
व वैखर� या चार वाणींचा �नरास झाल्यावर त्यांना सापे� असणारे �ान-अ�ानह� जाते. गुरुकृपेमुळे
अ�ानाचा �नरास करून �ान इतके वाढत जाते क� त्या वाढ�मुळेच त्याचे �न:शेष �नधन होते. अशा
प्रकारे �ान-अ�ानाची सापे�ता लयाला गेल्यावर जे �ानमात्र उरते त्याचे वणर्न करतांना �ानदे व
म्हणतात -
तेधवां पु�नवा भरे । ना अंवसे सरे ।
ते चं�द्रं�च उरे । सतरावी जैसी ॥४-१५॥
म्हणो�न �ान उजळे । कां अ�ाने रुळे ।
तैसे नव्हे �नवार्ळे । �ानमात्र जे ॥४-१७॥
चंद्राची सतरावी कला म्हणजे त्याचा मूळ दे ह. त्या दे हावर शुद्ध प्र�तपदे पासून पौ�णर्मेपय�त
सोळा कला येतात व कृष्ण प्र�तपदे पासून त्या क्रमाक्रमाने कमी होत जाऊन त्या अमावास्येला नाह�शा
होतात. चंद्राच्या ज्या मूळ सतराव्या कलेवर त्या येतात व जातात ती सतरावी कला पौ�णर्मेच्या
योगाने पूणर् होत नाह� �कंवा अमावास्येच्या योगाने नाह�शी होत नाह�. ती सतरावी कला हाच चंद्राचा
मूळ दे ह आहे . सूयप्र
र् काशामुळे त्या कला भासतात व नाह�शा होतात. पण मूळ दे ह तसाच रहातो.
तसेच �ान व अ�ान या जणु �ानमात्रतेच्या कला आहे त. त्या नाह�शा झाल्या तर� चंद्राच्या
सतराव्या कलेप्रमाणे ती �ानमात्रता तशीच शुद्ध स्वरूपात रहाते. ती कोणत्याह� वत्ृ ती�ानाने प्रका�शत
होत नाह� अथवा अ�ानाने झाकल� झात नाह�.
पाचव्या प्रकरणात �ानदे वांनी सत ्, �चत ् व आनंद या सद्वस्तच्
ू या स्वरूपल�णातील तीन
पदांचे �ववरण करून त्याचे रहस्य स्पष्ट केले आहे . सत ्, �चत ् व आनंद हे सद्वस्तच
ू े स्वरूप ल�ण
आहे . येथे ह� तीन पदे वेगवेगळी �दसत असल� तर� ती तीनपणा �वर�हत असतात. म्हणजे ह� पदे
जर� तीन आहे त तर� सद्वस्तु एकच आहे . जे सत ् आहे तेच �चत ् आहे व तेच आनंद आहे . पदांमधे
जो भेद �दसतो आत्मानुभवात प्रत्ययाला येत नाह�. हे स्पष्ट करतांना �ानदे व म्हणतात -
शुक्लप�ांचा सोळा । �दवस साठवती कळा ।
पूणर् चंद्रमा सगळा । चंद्र� जेवी ॥५-८॥
शुक्ल प�ात सोळा �दवस एकेक कला साठवत शेवट� पूणर् चंद्रमा सगळा चंद्राच्या ठाय़ीच गोळा होतो.
चंद्राच्या सोळा कला वाढल्या �कंवा कमी झाल्या तर� चंद्र मूळ स्वरूपात असतो तसाच असतो. त्यात
काह� बदल होत नाह�. तसेच सत ्, �चत ् व आनंद या आत्मचंद्राच्या जणु कला आहे त. या कला जर�
�भन्न �भन्न भासत असल्या तर� आत्मवस्तू एकच आहे .
सत ्, �चत ् व आनंद ह� तीन पदे आपापसात संवाद साधन
ू जेव्हा खयार् अथार्ने एकरूप होतात
तेव्हा द्रष्टा द्रष्ट्याला भेटातो. या अभूतपूवर् भेट�तच आत्मप्रचीती येत.े या आत्मप्रचीतीचे वणर्न
�कतीह� प्र�तमा वापरून साकार करण्याचा प्रयत्न केला तर� शब्द �थटे पडतात. कारण हे आत्मरूप
‘हातचो�रया’ आहे . ते आपल्या हातालाह� चोरून रहाते. हे आत्मरूप असे �वल�ण आहे क� ते स्वत:ला
स्वत:पासून लपवते. हे स्पष्ट करतांना �ानदे व म्हणतात -
�दहा�चये दप
ु ार� । चंद्र जैसा असे अंबर� ।
ते असणे चांद�चवर� । जाणावे क� ॥५-४५॥
�दवसा दप
ु ार� चंद्र आकाशत असतो पण त्याला कोणी पाहू शकत नाह�. त्याचे ते असणे
आपल्यापुरतेच असते. सवर् जगात पसरलेल्या उज्ज्वल प्रकाशाला सोडून व जगाच्या सवर् व्यवहारांना
चोरून चंद्र आपला �नवांतपणा आपला आपणच भोगत असतो. �तथेह� स्वत:चा प्रकाश लपवून
आपल्यापुरताच असतो.
अनुभवामत
ृ ाचे सहावे प्रकरण आहे शब्दखंडन. अद्वैत दशर्नात शब्दप्रमाण महत्वाचे मानले
जाते. या दशर्नाच्या मते ब्रह्म�ानासाठ� प्रत्य� अनुमानाद� इतर प्रमाणे महत्वाची असल� तर�
ब्रह्म�ान केवळ शब्दप्रमाणानेच होते. शब्द म्हणजे वेद �कंवा उप�नषदे . परं तु �ानदे वांच्या मते केवळ
स्मारकाचे काम करण्यास शब्द उपयोगी आहे . अ�वद्येचा नाश करणे व आत्मा प्रका�शत करणे
यापैक� शब्द काह�ह� करू शकत नाह�.
अ�वद्या नाह�च तर शब्द नाश तर� कशाचा करणार? अ�वद्या म्हणजे वांझेचे मूल. अ�वद्या
भसते तेव्हाह� ती अिस्तत्वात नसते. भासत असतांनाह� अिस्तत्वात नसणे हे अ�वद्येचे मायावी स�ग
आहे . जे नाह�च त्याचा नाश करणे हे हास्यास्स्पद नाह� का? या अ�वद्येचा नाश कोण करु शकेल?
तो अंवसेच�े न सध
ु ाकरे । पोसंू पाताळींची चकोरे ।
मग
ृ जळींची जलचरे । काढू सख
ु े ॥६-५४॥
जो अमावास्येच्या चंद्राचे अमत
ृ पाताळात रहाणायार् चकोरांना पाजू शकेल त्याला कदा�चत ् अ�वद्येचा
नाश करता येईल.
अ�वद्या मळ
ु ात नाह�च आ�ण पन्
ु हा ती नाह� असे �सद्ध करण्याकरता यिु क्तवाद करणे ह� पण
अ�तशय हास्यास्पद गोष्ट आहे .
चकोरा�चया उद्यमा । होय ल�टकेपणाची सीमा ।
जर� �दहा�च चंद्रमा । �गव�सतु बसे ॥६-६७॥
चकोर हा क�वकिल्पत प�ी. हा म्हणे चंद्र�करणांतन
ू पाझरणारे अमत
ृ �पतो. चंद्र व चकोर यांचे हे
नाते सांके�तक व पारं पा�रक आहे . �ानदे वांनी या सांके�तक प्र�तमेला कलाटणी �दल� आहे . चकोराला
ृ प्यायचे असेल तर त्याने चंद्राचा रात्रीच शोध घेतला पा�हजे. तो जर �दवसा चंद्र शोधत बसला
चंद्रामत
तर त्याचा तो उद्योग फुकटच जाणार नाह� का? �कंवा
अवसे आला सुधाकरु । नोहे �च काई अंधारु ।
अ�वद्यानाशी �वचारु । तैसा होये ॥६-६९॥
अमावास्येच्या �दवशी चंद्र आला तर� त्याच्या योगे अंधार दरू होईल का? तसेच अ�वद्येचा नाश
करायला जर शब्द �नघाला तर� त्याचा काह� उपयोग नाह�. अशा प्रकारे अ�वद्येचा अभाव
असल्यामुळे �तचा नाश करायला �नघालेल्या शब्दाला �नरथर्पणा येतो हे �ानदे वांनी चंद्राच्या प्र�तमेने
स्पष्ट केले आहे .
अ�वद्येचा नाश करणे शब्दाला शक्य नाह�. तसेच आत्म्याला आत्मलाभ घडवूने दे णे सुद्धा
शब्दाच्या आवाक्याबाहे रचे काम आहे . हे स्पष्ट करतांना �ानदे वांनी प्र�तमांची मा�लका सादर केल�
आहे . सवर्च प्र�तमांना �मिश्कलपणाची व खेळकरपणाची छटा आहे .
आपुला मुकु�टं सवर्था । चंद्र बैसो आला समथार् ।
वर� चंद्र चंद्रा�चये माथा । वा वो नये ॥६-८६॥
शांकराने चंद्राला मस्तकावर धारण केले पण चंद्राला चंद्राच्या माथ्यावर हे त्या सवर् सामथ्यार्ने युक्त
अशा शंकरांना तर� शक्य आहे का? तसेच आत्मरूप �नव्वळ �ानमात्र असल्याने �ानाने �ानाला
�मठ� कशी मारावी? सिच्चदानंदरूप आत्मा आपला आपण �सद्ध आहे . तेव्हा शब्द आत्म्याला
आत्मत्व कसे काय दे णार? आत्मा हा कोणत्याह� प्रमाणाच्या मदतीने �सद्ध होत नाह� वा अ�सद्धह�
होत नाह�. अशाप्रकारे शब्दाच्या उपयोगाचे कौतुक करत करत अखेर�स शब्दाचा �नरथर्कपणा स्पष्ट
करण्यात या प्रकरणाची सांगता झाल� आहे .
सातवे प्रकरण आहे अ�ानखंडनाचे. २९५ ओव्यांच्या या प्रकरणतील प�हल्या १०१ ओव्यात
�ानदे वांनी अ�ानाचे खंडन केले आहे . ‘अ�ान हा भावरूप पदाथर् नाह�’ असे या ओव्यात त्यांनी �सद्ध
केले आहे . त्यांनी प्रथम अ�ानाचे खंडन उपरो�धक भाषेत केले आहे तर पुढे अ�तशयोक्तीच्या अंगाने
जात त्यांनी अ�ानाची �खल्ल� उडवल� आहे . हे करतांना त्यांनी सांके�तक, पारं पा�रक व ना�वन्यपूणर्
प्र�तमांची पेरणी केल� आहे .
अ�ानखंडनाच्या प्रकरणाला त्यांनी सात ओव्यांची प्रस्तावना �लह�ल� आहे . �ान व अ�ान
यांचे जीवन केवळ शब्दावरच अवलंबन
ू आहे . शब्दाच्या दयेवरच हे जगतात. त्यामळ
ु े शब्दाचे खंडन
होताच ते आपोआप कोसळून पडतात. खरं तर �ान व अ�ान हे परस्पर-सापे� आहे त. �ानाच्या
स्फुरणामळ
ु े अ�ान आहे असे भासते. वास्त�वक ते नाह�च.
तैसे जाणणेयाचां घर� । हे खोचला आन न कर� ।
का�य चांद�णयांह� उठे लहर� । मग
ृ जळाची ॥७-५॥
‘जाणणेयांचा घर�ं’ म्हणजे �ान व अ�ान यांच्या सापे�तेच्या प�लकडे असणयार् �नखळ व �नरपे�
अशा �ानमात्राच्या �ठकाणी जर� अ�ान खोचले तर� ते �नराळे आहे असे आढळून येत नाह�. त्याचे
स्पष्ट�करण करतांना स्वामी स्वरूपानंद अभंग अमत
ृ ानुभवात म्हणतात -
तैसे �नरथर्क । अ�ान ते साच ।
स्वरूपीं नाह�च । ठाव त्यासी ॥७-५-९॥
�ानासीच नाह� । जेथे �ानभान ।
अ�ान कोठून । आले तेथे ॥७-५-१०॥
त्या �ानमात्रतेत �ानालाच �ानभान नसते. मग तेथे तत्सापे� अ�ान तर� कोठून येईल? चांदण्यात
मग
ृ जळ �दसू शकेल का? मग
ृ जळाचा जळरूपाचा खोटा आभास सूयार्च्या कडक प्रकाशामुळे �नमार्ण
होतो. �दवसाच्या प्रकाशात ते भासते तेव्हाह� ते खोटे च असते. चंद्राच्या शीतल चांदण्याच्या प्रकाशाशी
तर त्याचा काडीमात्र संबंध येत नाह�. चांदण्याच्या प्रकाशात ज्याप्रमाणे मग
ृ जळाचा भास कधीच
�नमार्ण होणार नाह� त्याप्रमाणे �ानमात्रतेच्या �ठकाणी अ�ानाचा प्रवेश कदा�प शक्य नाह�. याच्या
आधी त्यांनी काजव्याचे उदाहरण �दले आहे . काजवा फक्त अंधारात प्रकाशू शकतो. �दवसा त्याच्या
प्रकाशाला �कंमत नाह�. काजव्याचा प्रकाश हा अंधार सापे� तर मग
ृ जळ �दवससापे�. दोघेह�
भासमात्र. त्यामुळे �नखळ �ानमात्रतेचा �नत्य सूयर् उगवला क� �ान-अ�ानाची परस्पर सापे�ता
संपुष्टात येते.
अशी प्रस्तावना करून त्यांनी अ�ानाचा धांडोळा घेण्यास सुरवात केल�. �ानदे व म्हणातात क�
अ�ान आहे असे मानले तर ते रहाणार कोठे ? ते आत्म्याच्या आश्रयानेह� राहू शकत नाह� व
आत्म्या�शवाय स्वतंत्रपणेह� राहू शकत नाह�. ह� गोष्ट वेगवेगळ्या प्र�तमांनी �सद्ध करता करता
�ानदे व म्हणतात -
ना पु�नवेच� अंधारे । �दहा भेणे रात्री मोहरे ।
येता�च सुधाकरे । �ग�ळजे जेवीं ॥७-३९॥
आत्म्याशी �वरोधी म्हणून हे अ�ान आत्म्याशी संबध
ं ठे ऊ शकत नाह� व आत्म्यापे�ा वेगळे मानले
तर ते �सद्धीला जाऊ शकत नाह�. अशा प्रकारे अ�ान हे दोन्ह� बाजूंनी व्यथर् ठरते. हे �सद्ध करत
असतांना �ानदे वांनी वर�ल ओवीत चंद्राचा दाखला �दला आहे . पौ�णर्मेच्या अंधाराने �दवसाला �भऊन
रात्रीकडे मोहरा वळवला तर त्याला चंद्र �गळून टाकतो. पौ�णर्मेचा अंधार म्हणजे जणु प्रकाशाला
�भणारे �दवाभीत. सकाळी सय
ू ार्ला घाबरून त्याने रात्रीकडे मोचार् वळवला तर तेथेह� त्याला थारा
�मळत नाह�. �दवसा सय
ू ार्मळ
ु े व रात्री चंद्रामुळे अंधाराला जसा थारा �मळात नाह� तसेच अ�ान सद्ध
ु ा
दोन्ह� बाजंन
ू ी व्यथर् ठरते.
पढ
ु े �ानदे व अ�ानाचे स्वरूप कसे आहे त्याचा धांडोळा घेणार आहे त. अ�ान ‘कायार्नम
ु ेय’
म्हणजे कायार्वरून अनम
ु ानाने �सद्ध करता येते क� ते प्रत्य�ाद� प्रमाणांनी �सद्ध करता येते का ते
पहाणार आहे त. प्रत्य�ाद� प्रमाणांनी अ�ानाची �सद्धी करावयास गेले तर �दसन
ू येते क� प्रत्य�ाद�
प्रमाणांनी जे घेतले जाते ते अ�ानाची करणी असून अ�ान नव्हे .
ना चांद ु येकु�च असे । तो व्योमी दण
ु ावला �दसे ।
ते �त�मर कायर् ऐसे । �त�मर नसे ॥७-४५॥
आकाशात चंद्र एकच असतो. पण जेव्हा आकाशात चंद्र दोन आहे त असे �दसते तर ते दृिष्टदोषाचे
कायर् आहे, दृिष्टदोष नव्हे . त्याप्रमाणे �ाता, �ान व �ेय ह� अ�ान नसून अ�ानाची काय� आहे त.
त्यामुळे प्रत्य� प्रमाणाने अ�ानाचे ग्रहण करता येणार नाह�. पुढे त्यांनी अ�ान कायार्नुमेय नाह� हे
�सद्ध करून अ�ान हे अप्रमाण कसे ठरते ते दाखवले आहे . इतक्या उपरह� जर अ�ान आहे असे
म्हणणे म्हणजे अमावास्येच्या �दवशी चंद्र आपल्या प्रकाशाने जगाला आनंद दे तो असे म्हणण्यासारखे
आहे . (७-८१)
अजूनह� वाद� ‘अ�ान आहे ’ हे आपले म्हणणे सोडण्यास तयार नाह�. �ानदे वांनी चंद्राच्या
उदाहरणाने आपला प� �सद्धा केला म्हणून वाद� प�ाने पुन्हा आपले म्हणणे चंद्राच्याच उदाहरणाने
मांडले आहे . वाद� म्हणतो -
नातर� चंद्र ु एकु असे । तो व्यो�मं दण
ु ावला �दसे ।
तर� डोळा �त�मर ऐसे । मानू ये क� ॥७-९०॥
आकाशात चंद्र एक आहे , त्या �ठकाणी जर दोन �दसू लागले तर दोन चंद्र �दसणे हे �त�मरकायर् आहे
हे मान्य, पणा दृष्ट�त दोष आहे असे तर� मानावे लागतेच ना? त्याप्रमाणे हा दृश्याचा पसारा पाहून
अ�ानाचे अनुमान करता येत.े
उत्तरादाखल �ानदे व म्हणतात क� वास्त�वक अ�ान म्हणजे केवळ अंधाराचा अकर् तर
आत्मा म्हणजे प्रकाशाची खाण. असे असता अ�ान आहे असे म्हणणे म्हणजी चंद्रासारखी धवल
वस्तू ज्याने धवलत्वाने रं गवून काढल� आहे त्याला चक्क काजळ म्हणण्यासारखे आहे . (७-९६). �कंवा
सवर् कळांनी प�रपूणर् असलेल्या चंद्राने तेथे जर अमावास्या �नमार्ण केल� तरच लखलखीत तेजस्वी
�ानाला अ�ान म्हणता येईल.
अहं कार, मन व बुद्धी यांच्या अतीत असणारे हे आत्मरूप इं�द्रयांच्या बाबतीत त्याहून अतीत
ठरते. त्याच्या पुढ्यात येण्यास अ�वद्या सुद्धा घाबरते. असे आत्मरूप जुगायार्च्या खेळासारखे
चकवणारे , फसवणारे , भ्रमात टाकणारे आहे . �शव-शक्तीच्या मीलनात पहाणायार्चे अिस्तत्वह� लुप्त
होत असल्यामुळे आत्मरूपाचे वणर्न करता येत नाह�. �ान अ�ानाची �मठ� पडते तेव्हा हे आत्मरूप
�दठ� फाकते व ‘मोटके’ दृश्य पहाते. हा सवर् व्यवहार चैतन्याच्या ----------- भरलेला रहातो. तेथे
वस्तच
ू ा ऐक्यभाव �बघडत नाह�.
चांद�णयाचा �गंवसु । चांदावर� पड�लया बहुवसु ।
काय केवळपणी त्रासु । दे �खजेल ॥७-१३८॥
चांदण्यांचे वस्त्राचे आच्छादन चंद्रावर पडते, म्हणन
ू चंद्राच्या केवळपणात काह� फरक पडतो का?
चंद्रावर त्याचेच चांदणे पडले तर� त्याच्या एकटे पणाला बाध येत नाह�. त्याप्रमाणे ते आत्मरूप द्रष्टा
होऊन दृश्य जगत ् पाहो �कंवा अनेक नामरुपे घेऊन दृश्यपणे पसरो, तर� तेथे दस
ु रे पणा नाह�.
आत्मरूपाची �दठ� फाकते व दृश्य पहाते. अद्वैताचाच पसारा �वस्तारत जातो, हे वणर्न
केल्यावर आता �ानदे व हा मांडलेला खेळ �मटण्याचे �चत्र रं गवतात. ‘मी मला बघावे’ अशी तीव्र इच्छा
होताच फाकत जाणारे आत्मरूप जेव्हा ‘मी मला पाहू नये’ अशी तीव्र इच्छा करते, त्यावेळी चंद्र अजून
उठलेला नसतो, तेव्हा सागर आपल्याच �ठकणी भरतो. (७-१५२) �कंवा अमावास्येच्या �दवशी चंद्र
स्वत:च सतराव्या अंशात �शरतो(७-१५३), त्याप्रमाणे नामरूपात्मक दृश्यास आत्म्याने आपल्या
स्वरूपी नाह�से केल्यावर दृश्यसंबंधाने आपल्यावर आलेला द्रष्टत्वाचा आरोप नाह�सा होऊन द्रष्टा,
दृश्य व दशार्न या �त्रपुट�र�हत, भेदशून्य �ानरूप स्वात्मभाव रहातो.
आत्मरूप केवळ ‘पहाणे’ रूपाने जागच्या जागीच भरलेले आहे . सवर् जग हा �चद्�वलास आहे .
म्हणून �वलास �मषाने एक चैतन्यच आपले आपल्याला पहात आहे. तेच आपले आपल्या �ठकाणी
स्फुरत आहे . स्फुरद्रप
ू ाने असणे हा चैतन्याचा स्वभाव आहे .
ऐसे हे दे खणे न दे खणे । हे आंधारे चां�दणे ।
मा चंद्रासी काय उणे । स्फुरते का ॥७-१७२॥
चंद्र उजेड व अंधार पहातो का? तसेच आत्मरूपाच्या �ठकाणी �नत्योदय असल्यामुळे पाहणे वा न
पाहणे दोन्ह� �गळून तो �नत्य द्रष्टा आपल्या मूळ रूपात राहतो.
अशी ह� आत्म्याची �चदै क्यभावात होणार� ल�ला म्हणजे दृश्य जगद्रप
ू ाने आपणच आपल्याला
पहाणे, आपणच आपल्याला भोगणे आपणच आपल्याला जाणणे आहे . आ�ण हा चैतन्याचा
�चद्�वलास अनुपम आहे . तेव्हा -------- कारण अ�ान आहे हे म्हणणे योग्य नाह�. �ान हा
कोणत्याह� प�रिस्थतीत अ�ानाचा धमर् होऊ शकत नाह�. चंद्रापासून ज्वाळा �नघणे जसे शक्य नाह�
त्याप्रमाणे अ�ानापासून �ानाची उत्पत्ती होणे शक्य नाह�. (७-२८५).
�ानदे वांनी अ�ानखंडनाच्या प्रकरणात शेवट� ‘म्हणो�न जग असक� । वस्तुप्रभा’ असा आपला
जगता�वषयीचा �सद्धांत मांडला. -
म्हणो�न सूयार्ची एवढा । चंद्र चंद्रा�च सांगडा ।
ना द�पा�चया प�डपाडा । ऐसा द�पु ॥७-२८८॥
प्रकाशु तो प्रकाशा क� । यासी न वचे घेई चक
ु � ।
म्हणो�न जग असक� । वस्तप्र
ु भा ॥७-२८९॥
सय
ू र् हा सय ु ना चंद्राबरोबरच करता येईल �कंवा �दव्याची बरोबर� दस
ू ार्एवढा, चंद्रची तल ु रा �दवाच करू
शकेल. त्याप्रमाणे आत्मल�लेची तल
ु नाच होऊ शकत नाह�. प्रकाशाची तल
ु ना फक्त प्रकाशाबरोबरच
होऊ शकते. त्याप्रमाणे त्या वस्तप्र
ु भेची तल
ु ना फक्त वस्तप्र
ु भेबरोबरच करता येईल. हे सवर् जग हे त्या
वस्तच
ू ीच प्रभा आहे .
असे कळून आले. अ�ानाचे खंडन झाले क� तत्सापे� �ानाचेह� खंडन वेगळे करावे लागत
नाह�.
एवं �ाना�ान� दोन्ह� । पोट� सु�न अह�न ।
उदे ला �चद्गगनी । �चदा�दत्यु हा ॥८-७०१॥
�ान व अ�ान ह� जणु वांझच
े ी जुळी मुले ठरल�. अ�ान अिस्तत्वातच नव्हते. अ�ानाच्या भ्रमाला
�चकटून असणारा �ानाचा भ्रमह� नाह�सा झाला. �ान व अ�ान या �दवस रात्रींना पोटात घालून
�चद्गगनात �चदा�दत्याचा उदय झाला. येथे आकाशाह� चैतन्याचे व सूयह
र् � चैतन्याचाच. आ�ण या
�चत्सूयार्चा उदय आहे तो �नत्योदय आहे . या �चत्सूयार्चा उदय झाला क� लौ�कक सष्ृ ट�तील सवर्
प्रकारचे भेद, �त्रपुट�, �वश्वाचा भास सवर्च मावळू लागतात. या सूयार्च्या प्रकाशात वेगळे च अलौ�कक
व दै �दप्यमान जग �दसू लागते. या अलौ�कक जगात सूयर् व चंद्र यांच्या उदय व अस्त यांची सापे�ता
नाह�शी होते. त्यामुळे या वेगळ्या जगातील अनुभवाचे �चत्रण करतांना सूयार्बरोबरच चंद्रोदयाशी
संबं�धत साहचार� कल्पनांचा पण �ानदे वांनी प्र�तमांच्या रूपात वापर केला आहे .
िजभ बोचल� रसे । सूय�ुर् च कमळीं �वकासे ।
चकोरु जाला असे । चंद्र�ु च मा ॥९-४॥
संपूणर् रस संवेदनाच जणु िजभेत गोळा होऊन जीभ रसाने थबथबते. सा�ात सूयच
र् कमळात वस्तीला
येतो. कमाळाचे सूय�दयासाठ� वाट पहाणे थांबते व चकोरालाह� आतुरतेने चंद्राची वाट पाहावी लागत
नाह�. कमळच सूयर् बनते व चकोरच चंद्र बनतो.
�सद्धावस्थेत आत्मरूपच आत्मरूपाला भेटत असते.
िजये पेरे �दसती उसीं । �तये लाभती रसीं ।
कां कळा �नवडती शाशी । प�ु नवे�चया ॥९-१७॥
प�डले चंद्रावर� चांदणे । समद्र
ु � जाले वरुषणे ।
�वषया करणे । भेटती तैसी ॥९-१८॥
उसाच्या कांडात जी पेरे �दसतात ती रसात �दसतात का? �कंवा पौ�णर्मेच्या चंद्राच्या कला वेगळ्या
�नवडता येतात का? त्या चंद्राशी एकरूपच असतात. त्याप्रमाणे �सद्धावस्थेत भेद मावळलेला
असल्यामुळे इं�द्रये व त्यांचे �वषय यात वेगळे पणा उरतच नाह�. चंद्रावर चांदणे पडते ते त्याचे
स्वत:चेच असते. तो स्वत:च स्वत:ची भेट घेतो. इं�द्रये व �वषय यांचा संबंधह� असाच असतो. त्याला
इं�द्रये व �वषय दोन्ह� आत्मरूप होतात.
�सद्धावस्थेत बाह्यत: �क्रया घडतांना �दसल� तर� �सद्धाचे अंतरं ग आत्मरूपात �वल�न झालेले
असल्यामळ
ु े त्याचे आचरण जर� इतरांसारखेच �दसत असले तर� त्या आचरणाचा स्पशर् त्याच्या
आत्मस्वरूपाला होत नाह�. अ�ानाचा शोध घेता घेता अ�ान नावाची वस्तच
ू नाह�
चंद्र वेचू गेला चांदणे । तेथे वे�चले काई कवणे ।
�वऊ�न वांझे स्मरणे । होती जैसी ॥९-२५॥
चंद्र चांदणे वेचायला गेला तर तेथे कोणी काय वेचले बरे ? �कंवा वांझल
े ा व्यायल्याचे स्मरण झाले तर
�तथे काय घडते? तसे �ान्याने कोणतेह� कायर् पार पाडले तर� तो अ�क्रयच असतो. �वषयह� आत्मरूप
झाल्यामळ
ु े त्याला ताित्वक दृष्ट�ने आत्मप्रत्ययच येत असतो.
अष्टांगयोग, प्रवत्ृ ती-�नवत्ृ ती, द्वैत-अद्वैत, भक्ती वगैरे जे सा�ात्काराचे मागर् आहे त त्या
मागा�चे सा�ात्कार झाल्यावर मागर् म्हणून महत्व संपलेले असते. त्यामुळॆ �सद्धावस्थेत �व�वध
मागा�ची मात्तबर� रहात नाह�.
प्रत्याहाराद� आंगी । योगे आंग टे �कले योगी ।
तो जाला इथे माग� । �दहाचा चांद ु ॥९-२६॥
सा�ात्काराच्या या अं�तम अवस्थेत अष्टांग योगाची अवस्था �दवसाच्या चंद्राप्रमाणे �ीण, �नस्तेज
व �फक� पडते. अष्ट अंगांच्या द्वारा समाधीपय�त पोहोचणारा हा योग आपल्या सवर् अंगांनी योगातच
अंग टे कतो.
द्वैताच्या अंगणात जेव्हा अद्वैत राबायला येते तेव्हा भक्तीच्या घरात एकाच ताटात सवर्
मागर्, स्वामी-सेवक हे सवर् एक होऊन अद्भत
ु असा कालोवा तयार होतो. मग दे वह� अ�तांचाच व
पूजाह� अ�तांचीच . मग अशा या अकृ�त्रम भक्तीचे �चत्रण करतांना �ानदे व म्हणतात
कां चंद्राते चं�द्रका । न म्ह�णजे तू ले का ।
तह� तो अ�सका । �तया क� ना ॥९-४६॥
चंद्राला ‘तू चं�द्रकेची शाल पांघरून घे’ असे सांगावे लागते का? चंद्राला तसे सां�गतले नाह� तर�
�तच्यासह तो पूणच
र् असतो. तशीच अद्वैतातील भक्ती असते. भक्त ज्या अवस्थेत असेल ती
भक्तीच. तो भजन करो वा न करो, तो दे वरुपच झालेला असल्यामुळे तेथे पूजा कोणत्या साधनाने
व कोणी कोणाची करावयाची? एकाच ड�गरात दे व, पूजक, पूजासा�हत्य कोरून सवा�ना समान
पातळीवर आणावे तसे �सद्धावस्थेत असते.
‘ग्रंथ-प�रहार’ हे या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण आहे . अनुभवामत
ृ ाच्या �न�मर्तीचे औ�चत्य काय ते
�ानदे वांनी या प्रकरणात स्पष्ट केले आहे . या प्रकरणाची सुरवात त्यांनी ल�डवाळ तक्रार�ने केल� आहे .
आत्मरूप गुरु एवढा उदार आहे क� त्याने केलेल� कृपा ह� आपल्या एकट्याच्या वाटणीची रा�हल�
नाह�, हा येथील तक्रार�चा सूर आहे . ह� दै वी कृपा आपण धड लपवूह� शकत नाह� व उपभोगूह� शकत
नाह� हा त्यांचा ल�डवाळ कांगावा आहे .
चंद्रासी अमत
ृ घातले । ते कोई तयाची येतल
ु े ।
�कं �संधु मेघा �दन्हले । मेघाचा भागु ॥१०-३॥
अगाधह� उचंबळती । ते चंद्राचीच शक्ती ।
वसंतु कर� तै होती । झाडाचे दानीं ॥१०-५॥
हा आत्मरूप गरु
ु एवढा उदार आहे , त्याच्या दातत्ृ वाचे रूप एवढे अजब आहे क� तो ‘मी, त’ू ह� भाषाच
नाह�शी करतो. त्यामळ
ु े या कृपेचा आनंद लट
ु ायला थोडासद्ध
ु ा मीपणा �शल्लक रहात नाह�. या दै वी
कृपेचे सामथ्यर् एवढे अगाध आहे क� ह� कृपा कोणीह� लपवन
ू ठे ऊ शकत नाह� व �नवांतपणे �तचा
उपभोग घेता येत नाह�. हे स्पष्ट करतांना त्यांनी अनेक प्र�तमांचा वापर केला आहे . त्यातील एक आहे
चंद्राची.
दै वी कृपेमुळे चंद्राला काय �मळाले तर अमत
ृ . पण ते एवढे से अमत
ृ त्याच्यापुरते मयार्�दत
रा�हले का? नाह�. तर तो चंद्र त्या अमत
ृ ाचा पथ्
ृ वीवर अखंडपणे वषार्व करत आहे व त्यायोगे
चकोर व वनस्पती पुष्ट होतात. समुद्र सतत उचंबळतात ते चंद्राच्याच शक्तीने नाह� का? चंद्राला जे
दै वी सामथ्यर् प्राप्त झाले ते तो चंद्र स्वत:पुरते ठे ऊ शाकला नाह�. त्याने त्यात सवा�नाच सहभागी
करून घेतले. त्या आत्मरूप �नवत्ृ तीच्या दारात चंद्र चक्क याचक म्हणून उभा आ�ण त्याला �मळाले
काय तर दोन अमत
ृ ाचे थ�ब आ�ण त्या अमत
ृ ाच्या माधय
ु ार्त वाटे कर� तर� �कती?
पथ्
ृ वीवर�ल सवर् प्रा�णमात्र, सूयर् असो, चंद्र असो वा �दवा असो, याच्या राज्यात भेट ह�
सगळ्यांना �मळणरच. �तथे लहान मोठा हा भेदभाव नाह� आ�ण याच्या राज्यातील उफराटा न्याय
म्हणजे भेट �मळणारह� व ती वाटल�ह� जाणार. हा येथील अ�ल�खत दं डक आहे . त्याप्रमाणेच
आपल्याला जो ऐक्यानुभव �मळाला तो ग्रंथबद्ध करण्याचे कायर्ह� त्या दै �वक� औदायार्नेच घडवून
आणले आहे .
आपल्याला जे कैवल्य-कनकाचे दान’ �मळाले त्यामुळॆ आपण ‘सूय�र् दठ�’ झालो आहोत असे
�ानेशांचे म्हणणे आहे . �चदाकाशात �चत्सूयार्चा उदय झाल्यामुळे आपल्याला सवर् �ठकाणी
प�रपूणत
र् ाच �दसते असे �ानेश म्हणतात.
बीजेचा चंद्र ु होये । प�र पुनवेचा आनु आहे ।
हो कां मी म्हणो लाहे । सूय�र् दठ� ॥१०-७॥
बीजेचा नाजुक, कोमल, स�दयार्ने युक्त चंद्र तर पौ�णर्मेचा प�रपूणर् स�दयार्चे प्रतीक असणारा पूणर् चंद्र
हे सवर् भेद पथ्
ृ वीवरून चंद्राकडे पहाणया�च्या बाबतीत. पथ्
ृ वीवरून चंद्रांच्या कलांमधील कमी-अ�धक
स�दयर् जाणवणे स्वाभा�वक आहे . पण सूयार्वरून जर चंद्राकडे पा�हले तर असा भेद कसा �दसेल?
�कंवा सूयार्पुढे हा बीजेचा व हा पौ�णर्मेचा चंद्र असा भेद करता येता नाह�. कारण सूयप्र
र् काशात चंद्र
�दसेनासा होतो. त्याप्रमाणेच आपल्या दृष्ट�तला भेदभवह� पूणर् लोपला आहे व त्या दै वी कृपेमुळॆच
आपण हे अनुभवामत
ृ रूपी पक्वान्न सवा�ना वाढले आहे . स्वानुभूतीचे अ�य्य दान सवा�साठ� खल
ु े केले
आहे , असे ग्रंथ प�रहारात स्पष्ट केले आहे .
अशप्रकारे त्यांनी चंद्र या प्र�तमेचा �वषय स्पष्ट�करणाकरता �व�वध प्रकारे उपयोग करून
घेतला आहे.

You might also like