You are on page 1of 5

रामनवमी निमित्त चिंतन

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम ।।36।।


भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम । तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम ।।37।।
आपले उपास्य दैवत राम राहतो कु ठे? कु ठे भेटेल ? कु ठे शोधू मी त्याला.
तैसा हृदयामध्ये मी रामू । असता सर्व सुखांचा आरामु । भ्रांतासी कामु विषयावरी ।।
कु ठे शोधिसी रामेश्वार आणि कु ठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयात
उपाशी.
संसाराचे चिंतन के ल्यास आपल्याला दुःख प्राप्त होईल आणि देवाचे चिंतन के ले तर सुख
प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणतात-
जगी होइजे धन्य या रामनामे । क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे । उदासीनता तत्वता सार आहे
। सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ।।५७।।
प्रभाते मनी राम चिंतित जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ।
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनी तो चि तो मानवी धन्य होतो ।।३।।
या राम नामाचे महत्व काय आहे तर ते तुकाराम महाराज सांगतात-
राम म्हणता रामची होईजे । पदी बैसोनि पदवी घेईजे ।
ऐसे सुख वचनी आहे । विश्वासे अनुभवोनी पाहे ।।
राम रसाचीया चवी । आण रस रुची के वी ।।
तुका चाखोनिया सांगे । मज अनुभव आहे अंगे ।।
"राम" ह्या उच्चारणद्वारे पाताळ – भूतल आणि आकाशात जे विषाणु असतील ते आपल्या
कड़े वाकड्या दृष्टीने पाहुच शकणार नाही.
पाताल भूतल व्योमचारिण श्छद्मचारिण: । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ।।11।।
तुकाराम महाराज म्हणतात-
मी तों अल्पमती हीन । काय वर्णुं तुमचे गुण। उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामांचे ॥
१॥
नाम चांगले माझे कं ठी राहो भलें । कपिकु ळ उध्दरिलें । मुक्त के लें राक्षसा ॥२॥
द्रोणागिरी कपीहातीं । आणविला सीतापती । थोर के ली ख्याती । भरतभेटी समयीं ॥३॥
शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखणिली । लंका दहन के ली । हनुमंते काशानें ॥४॥
राम जानकी जीवन । योगियांचें निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो॥५॥
दररोज रामायण वाचायला वेळ नाही मग दररोज एकश्लोकी रामायण म्हणत जा.
आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।
वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम्।।
बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम्।
पश्चाद्‌रावण कु म्भकर्ण हननम्‌, एतद्धि रामायणम्।।
श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांची रचना के ली. त्यांनी मनाच्या श्लोकांतून
मनाला उपदेश के ला.
"प्रभाते मनी राम चिंतित जावा", सकाळ ची वेळ सर्वाधिक छान असते अंथरुणावर
बसूनच आपण रामरायाच स्मरण कराव, ईश्वर तत्वाच चिंतन कराव जो भगवन्त करुण,
क्षमाशील, दयाळु आहे त्यांचा ह्या गुणांचे चिंतन करावे .
चिंतनाची वेळ मात्र पहाटेची ठेवा म्हणजे नकारात्मकता दूर होईल. राम नाम घेतल्यानेच
रोगाला मात करण्याची immune system चांगली होते.
*In Search Of Secrets of India* हे पुस्तक Paul Brantan ने आपल्या भारत यात्रेत जे
काही अनुभवलं आहे, ते वाचण्या सारख आहे, साधु संत गुरु भगवन्ताची वाट कशी
दाखवतात हे खुद्द ह्या ब्रिटिश लेखकाने अनुभवलं आहे.
त्या पुस्तकातलीच एक घटना सांगतो
तुम्ही आतापर्यंत allopathy, homeopathy या उपचार पद्धती ऐकल्या आहेत पण तिसरी
एक अत्यंत प्रभावशाली व खात्रीने गुण देणारी उपचार पद्धती आहे ramopathy
इंदुरचे एक महान रामभक्त मानलेले व्यक्तिमत्व होते श्री अच्युतानंद. त्यांच्याकड़े लोक
आपले कष्ट निवारण हेतु येत असत.
एक वेळेस एक बाई त्यांच्याकडे आल्या. त्यांना spinal cord संबंधित भयंकर रोग झाला
होता. सगळेच उपचार करुन पाहिले एलोपैथी, होम्योपैथी पण काहीच फरक पडेना. मग
त्या बाई अच्युतानंद बुवांकडे आल्या. बुवांनी त्या बाईला "रामोपैथि" सांगितली.
तुम्ही समर्थ रामदास स्वामींच लिहलेल *"करुणाष्टक"* रोज म्हणा,
अनुदिनिं अनुतापें तापलो रामराया ।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥
असही म्हणा "देवा माझ्या वर कृ पा कर माझा रोग, व्याधि नाहीसा कर". आणि ह्या नंतर
*श्री राम जय राम जय जय राम* 13 अक्षरी ह्या जपाची माळ करा. किं वा दररोज रामरक्षा
स्तोत्र म्हणा.
बाई सांगितल्या प्रमाणे करू लागल्या, रोज करुणाष्टक म्हणायला लागल्या, जप करू
लागल्या आणि काही काळाने त्या अगदी ठणठणित बऱ्या झाल्या.
श्रोतेहो एक लक्ष्यात घ्या "कु ठल्या जन्मी आपलं काही तरी चुकल आहे म्हणून आपल्याला
रोग होतात". तुका म्हणे पापे । येती रोगाचीया रूपे ।। तुका म्हणे पापे जाती रामाचीया जपे
तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे के ले जपता हरि.
बुद्धि नकारात्मक होत जाते मग रोग आपल्या वर हावी होत जातात.
म्हणून समर्थ रामदासानी आपल्याला रामाची उपासना करायला सांगितली आहे, ते का?
तर पहिली गोष्ट आपली बुद्धि व्यवस्थित राहते.
दूसरं आपल्याला योग्य आरोग्य प्राप्त होते एकू ण सगळ्यात महत्वाच म्हणजे आपण
मानसिक दृष्टया दृढ़ होत जातो.
तुम्ही शुद्ध खऱ्या मनाने रामाची उपासना करा, उपासनेचे फळ किती काय द्यायचे ते
रामराया ठरवतील.
गीते मधे अस म्हटलं आहे ज्ञान पेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे,
आमचे गुरुजी सांगतात ध्यान पेक्षा "ध्यास" श्रेष्ठ आहे.
रामाच्या चिंतनाच तुम्ही ध्यास ठेवा.
नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्षुमी वल्लभ तयाजवळी
कृ ष्णाच्या चरित्राचा उच्चार करा आणि रामाच्या चरित्राचे आचरण करा. कोण होते राम!
काय त्यांचे विचार होत! आचरण त्यांच कस होत! ह्या गोष्टींचा विचार करा.
वनवास जातानां जे प्रजेला म्हणतात आजपासून भरत तुमचा राजा होईल, त्याच ऐकावे
सर्वांनी, कै कयी मातेला कोणताही त्रास देऊ नये.
किती थोर मनाचे आहे हो रामराया.
ह्या सर्व गुणांचे आपण चिंतन करावे.
जर तुम्ही असच रामाच चिंतन के ल तर तुम्हाला ऐहिक जीवनातलं आरोग्य लाभेल. तुमच्या
जीवनातलं मानसिक सामर्थ्य वाढेल.
पहाटेच्या त्या चिंतनात बघा कसा परिणाम होईल, शब्दांमधे सांगण अवघड़ आहे...
दिवसभरा मधे जेव्हा जमेल जसे जमेल..
"श्री राम जय राम जय जय राम" या मंत्रावळी चा पठन करावा.
*रामरक्षास्तोत्र* जरी स्तोत्र म्हटले जाते तरी ते स्तोत्र नसून एक कवच आहे. रामरक्षा रोज़
म्हणा कारण ह्या मंत्रामध्ये शारिरीक रक्षण करण्याची क्षमता आहे.
सद्या जी भयंकर परिस्थिति निर्माण झाली आहे, ते पाहता तुम्ही जेवढ़ जमेल तेवढ़ राम
नामाचा उच्चार करा. राम रूपी शब्दात इतकी ताकद आहे के वळ
पाताल भूतल व्योमचारिण श्छद्मचारिण: । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ।।11।।
राम.... अस काय आहे हो ह्या राम नाम मधे?
तर आपण एक लक्ष्यात घ्या हा संम्पूर्ण सूर्यवंश (कु ळ) पवित्र, पावन, आदर्शवादी आहे
जितके सूर्यवंशी राजा ह्या भुतळा वर होऊन गेले त्यांची देह, वाणी, वाचा, कर्म कधीही
मलिन नाही झाले... अश्या कु ळात प्रभु श्रीविष्णु राम अवतारात जन्म घेतात, लोक
कल्याणासाठी.
हे राम राजा मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्यांचे पराक्रम अतुलनीय आहे, अवघ्या पाँच वर्षात
वानर सेनाच्या मदतीनें सेतु बांधण्याच काम अकल्पनीय आहे.
जो राजा कधी थकत नाही, जीवनात ज्यांना कधी आळस आला नाही, आयुष्य लोक
कल्याणासाठी अर्पण के ल आहे. त्यांच चरित्र चिंतन आपल्याला देखिल खूप काही
शिकवेल, अशी भावना ठेवा आणि राम नामस्मरण करा.
विश्वव्यापी परमात्मा त्या मूर्तिच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची नोंद घेतो, म्हणूनच तर
समर्थ रामदासानी मूर्ति स्थापना के ल्या।
तुकोबारायाने विट्ठलाच मंदिर बांधल. सगुणावर प्रेम कराव आपण ह्या भावनेन ज़गायला
शिका.

रामायण हा के वळ ग्रंथ नसून मानवी जीवन जगण्याच प्रेरक मार्गदर्शक आहे. जी राम कथा
गंधर्व, देवी-देवता, ऋषि-मुनि सम्पूर्ण विश्वाचे *आदी देव शिव आपल्या पत्नीला सांगतात
ती कथा खरच किती थोर असेल.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।

You might also like